अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हडळीचा पाळणा

जो जो रे जो पिल्ला, जो जो रे जो
भुतुंच्या जगात स्वागत तुझे, दात विचकत हसतात सारे
देते मी तुला खेळणे हाडांचे, भेसुर रडु नको
जो जो रे जो

बोकलत आहेत मामा तुझे, जावळ काढण्या येतील पुढे
टकलावर तुझ्या सध्या तरी दिसत नाही केसांचे फडे

जो जो रे जो

पहाता तुझे अमानवी रुपडे, मानव काका चक्कर येऊन पडे
आत्या तुझ्या नावासाठी रश्मी आणी मृणाल पुढे

जो जो रे जो ....

सर्वांना Light 1 Proud

अय्यो आणि मी आत्या>> सोन्याची अंगठी घ्यावी लागेल तुम्हाला हडळबाळासाठी.

भुतं सोने वापरतात काय ? मृणाली नाहीतर हाडाची माळ घेऊन जा..सगळं कुटुंब आपापल्या सोयीनुसार वापरू शकेल..

कहर आहे! Rofl
आमच्या बाळाचा पाळणा, बारसं वगैरे आणि आम्हालाच कल्पना नाही. Lol
यानिमित्ताने श्री बोकलतजी यांना 'मामा' बनवल्याबद्दल रश्मीजी यांचे जाहीर आभार. Proud

बोकलत, बारश्याला सहकुटुंब येण्याची तयारी करायला गेलेत. Proud

हो श्रवु, सोने नसले तरी हाडांची माळ चालेल.

महिनाभर मी जरा महत्वाच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे जास्त लक्ष द्यायला वेळ नाही मिळत. तुमचं चालू दे. मी येईन लवकरच.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका....

एक घडलेली गोष्ट...
१९७९ सालची सत्यघटना .

सकाळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती.

एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते.
तेवढ्यात एक उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती.

तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता.

त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ.

त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे..
पुढे मोठ्या तुसडेपणाने - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे त्याने बरीच मुक्ताफळे उधळली. तरीही ती व्यक्ती शांतच होती,,,

थोड्या वेळाने - त्या गीता वाचणाऱ्या व्यक्तीने उठून आसन गुंडाळले तसे एकदम ४ दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले व एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला व आदबीने सलाम करून दार उघडून उभा राहिला.

हे सगळं पाहिल्यावर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला व त्या व्यक्तीची क्षमा याचना करू लागला.

त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली, तेव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की, "ज्या संस्थेत तू संशोधन करण्यास आला आहेस ना त्या भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे... डॉ. विक्रम साराभाई ."

मग मात्र तो नास्तिक , देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला, माफी मागू लागला...
तरीही डॉ, साराभाई शांतच..

ते म्हणाले, जर या जगात एखादी गोष्ट आहे , तर नक्कीच त्याचा कोणीतरी निर्माता आहे, मग ती आजची असो की महाभारत कालीन असो .
आणि हे त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते. तेंव्हा - *टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा, सर्व सायन्स देखील यातच आहे .*

ही गोष्ट घडली तेव्हा भारतीय पातळीवरच्या विविध १३ संशोधन संस्था या डॉ. साराभाईंच्या नांवावर होत्या.
तर तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अणू संशोधन मंडळाचेही अध्यक्ष म्हणून डॉ. साराभाई यांची नियुक्ती केली होती.

चालू वर्ष हे डॉ. विक्रम साराभाई यांचे 100 वे जयंती वर्ष आहे...
म्हणून एक आठवण ...

त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन !

गल्ली चुकली वाटत ??
चुकीच्या नावाने होणारे फॉरवर्ड्स चुकीच्या बोळात शिरले .

घटना केव्हा घडली आणि घटनेतील शास्त्रज्ञाचा मृत्यू केव्हा झाला हे बघा. आणि त्यांना न्यायला येणारे कमांडोज, लाल दिव्याची गाडी. केवढा अमानवीय किस्सा आहे हा.

>> मग मात्र तो नास्तिक , देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला, माफी मागू लागला...

हो रडणारच, मग काय तर. जाम तंतरली असेल त्याची. देवावर विश्वास नसणाऱ्याला भुतावर सुद्धा विश्वास ठेवायची वेळ आली.

Lol
तसंच पाहिजे देवावर विश्वास ठेवत नाहीस काय !
तरीही साराभाई शांत होते असं किती वेळा आलयं, शांत ,शांत , बुद्धाची आठवत आली. नऊ वर्षांंच्या भुताला शोभत नाही हे ! त्या वयात आम्ही कसे अवखळ होतो.

Pages