Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्टार प्रवाह awards youtube
स्टार प्रवाह awards youtube वर दोन मिनिटांचे बघितलं, मधुराणी कसली गोड दिसत होती.
कान्चन ने अनघाला बोलण
कान्चन ने अनघाला बोलण सिरियलच्या इतिहासासाप्रमाणे अपेक्षित असल तरी ती अगदी काहीही पाचपोच नसल्यासारखी बोलते, त्यातही अनघाने तिथे थाबायलाच नको होत , नाहितरी तो देशमुखाच्या घरचा मामला होता.
हिंदी अनुपमाचा एक सीन
हिंदी अनुपमाचा एक सीन बघण्याचा योग आला youtube वर, ती काव्या कसली भयाण आहे आणि अनुपमा, तिचा नवरा दोघेही नाही आवडले. ती अनुपमा मोनिशा म्हणून छान होती, तिथेच आवडली होती फक्त.
अरुंधती झालेली मधुराणी कितीतरी पटीने उत्तम आणि दोन्ही संजना पण चांगल्या त्या काव्यापेक्षा.
कांचनला कोणी विचारत नाही तरी
कांचनला कोणी विचारत नाही तरी उगीच प्रत्येक बाबतीत नाक खुपसते. आत्ता आत्ता तर यांच्याकडे पैसे नव्हते आणि काल कांचनने आठ साडया घेतल्या. अनिरुद्ध रोमँटिक नाही
तो ईतकी वर्ष घराच्या बाहेर रोमान्स करत होता म्हणून अप्पाना हा गैरसमज असेल
अनिरुद्ध स्वतःला फार हुशार समजतो, म्हणे माझ्या अनुभवामुळे मला नोकरी मिळतेय, मग ईतके दिवस का नाही मिळाली. विमल सुट्टीवर आहे वाटते. अरुंधती ईशा नाहीतर कांचनच्याच मागे असते. नुसतं शूटिंग करूनही डोकं दुखत असेल तिचं या बायकांमुळे.
प्रत्येकाने काय करायचे ते
प्रत्येकाने काय करायचे ते कांचन सांगत असते. कधीही, कसाही अपमान करते. तीनही मुलांच्या बाबतीतले मोठे निर्णय तेही त्यांच्या मनाविरूद्ध तिला घ्यायचे आहेत. त्यांच्या आईला ती सतत ओरडत असते. तरीही तिच्याकडून पूर्ण सेवा करून घेते. फारच निगेटीव्ह आहे ती!
तो ईतकी वर्ष घराच्या बाहेर रोमान्स करत होता म्हणून अप्पाना हा गैरसमज असेल >> हा हाहा
हो ना... एकदम आठ साड्या! अरु
हो ना... एकदम आठ साड्या! अरु साठी नाही आणल्या दोन त्यातल्या ते......!!!
अप्पाही कधी कधी फारच उथळ पणा करताना दाखवतात. म्हणजे त्यांना हॅपी गो लकी दाखवायचं आहे ते ठीके...पण अरुंधती इतकी प्रॉब्लेम मधे असताना सारखं कांचनच्या पुढे मागे करणं शोभतं का?
आणि अनुपमा मधली सगळीच पात्रं...अगदीच नाही आवडली! अरुंधती झालेली मधुराणी कितीतरी पटीने उत्तम आणि दोन्ही संजना पण चांगल्या त्या काव्यापेक्षा. आणि आपले संवाद, प्रसंग पण किती तरी चांगले आहेत.
अनुपमा मधे..............एव्हढे इश्युज असताना कुणी महाशिवरात्री इतकी भव्य रीतीने मनवेल का घरी? आणि आता परत होळीची तयारी.............!!
कैच्या कैच....
त्यांच्या आईला ती सतत ओरडत
त्यांच्या आईला ती सतत ओरडत असते. तरीही तिच्याकडून पूर्ण सेवा करून घेते. फारच निगेटीव्ह आहे ती! >>>>> होना ती म्हातारी डोक्यात जाते नेहमीच. काल म्हणाली मी भर लग्नात जीव देईन, पटकन तोंडून निघाले दे खरंच असेल हिंमत तर
. माणूस आपल्या कर्माने आणि इतरांना दिलेल्या वागणुकीने मोठा होतो. नुसते वय वाढले म्हणून नाही, हे या बाईकडे पाहून सारखं वाटतं.
आणि आपले संवाद, प्रसंग पण
आणि आपले संवाद, प्रसंग पण किती तरी चांगले आहेत. >>> अच्छा, असतीलच, खात्री आहे. बघत नाही, असेच youtubeवर कधी कधी काही सेकंदाचे बघायचे पूर्वी.
त्या स्टार प्रवाह awards रेड कार्पेटवर अरुंधती, संजना दोघी छान दिसतायेत. संजना रेड gown glam look मध्ये आहे.
आणि आता परत होळीची तयारी.....
आणि आता परत होळीची तयारी.............!! >>>>>>> आई कुठे महाएपिसोड आहे रविवारी त्यात सुद्दा होळी दाखवली आहे.
कालचं मुग्धा रानडेंनी
कालचं मुग्धा रानडेंनी रंगवलेलं अभिच्या डॉक्टर बॉसचं पात्र आगाऊ आणि भोचक वाटलं. लग्न कधी करतोय, बॉडी सायकल , आम्ही लग्नाचा विचार केलेला नाही असं तो म्हणत असताना अंकिताला त्याचं लग्न ठरतंय असं सांगणं.
शिवाय नुसते एम बी बी एस डॉक्टर सर्जरीत असिस्ट करू शकतात असा एक प्रश्न पडला.
कालचं मुग्धा रानडेंनी
कालचं मुग्धा रानडेंनी रंगवलेलं अभिच्या डॉक्टर बॉसचं पात्र आगाऊ आणि भोचक वाटलं. लग्न कधी करतोय, बॉडी सायकल , आम्ही लग्नाचा विचार केलेला नाही असं तो म्हणत असताना अंकिताला त्याचं लग्न ठरतंय असं सांगणं.
<
ती स्वतःच आहे डॉयलॉग रायटर सिरीयलची , मुग्धा गोडबोले (रानडे)
घरगुती संबंध आहेत असं समजायचं
घरगुती संबंध आहेत असं समजायचं. अरुंधतीपण तिच्यासाठी खायला घेऊन जाते किंवा पाठवते. अभि भुलतज्ञ असतो तर असू शकेल सर्जरी वगैरे. ईशा फार बोर करते. किती प्रताप दाखवणार तिचे राजवाडेनाच ठाऊक. कांचनची मुलं तर तिला विचारत नाहीत, पण दुसऱ्यांच्या आयुष्याचे निर्णय तिलाच घ्यायचे असतात. नवीन साडया नेसून गप पडायचं तर ते नाही. लिपस्टिक किती भडक लावतात तिला.
ईशा त्या मुलाला सांगते कि
ईशा त्या मुलाला सांगते कि तिला घरात रहायला आवडत नाही. मागे ती एकदा घरातून पळून गेली होती. पण पुढे काय झाले होते ते ती पुर्णपणे विसरली आहे.
लग्न कधी करतोय, बॉडी सायकल ,
लग्न कधी करतोय, बॉडी सायकल , आम्ही लग्नाचा विचार केलेला नाही असं तो म्हणत असताना अंकिताला त्याचं लग्न ठरतंय असं सांगणं.घरगुती संबंध आहेत असं समजायचं. >>>>>>>> अरे तिनेच तर चेक केल होत ना अरुंधतीला, जेव्हा तिला डायबेटिस झाला होता. सो, तिचा भोचकपणा पटणेबल आहे.
मागे ती एकदा घरातून पळून गेली होती. पण पुढे काय झाले होते ते ती पुर्णपणे विसरली आहे. >>>>>>>> अगदी अगदी. ती हेही विसरली आहे की ह्याआधी सुद्दा तिच्या एका मित्राने तिला ब्लॅकमेल केल होत तेव्हा अरुने तिला वाचवल होत. तिकडे 'अनुपमा' मध्ये तर अनुपमाच्या मुलीने घरुन पळून जाण्याचा रे़कॉर्डच केला आहे.
ही मालिका हिंदी ‘अनुपमा’
ही मालिका हिंदी ‘अनुपमा’ सारखी आहे का? ती मी पहाते आहे काही दिवस.
हो
हो
सेम टू सेम, सुनिधी!
सेम टू सेम, सुनिधी!
फक्त काही पात्रांचा फरक ए...म्हणजे अनुपमा ची सून वनराज च्याच ऑफीस मधे आहे, जी इकडे नाही. बा चा भाउ त्यांच्या कडे राहतो, जो इकडे नाही, गौरी ची आई अनिरुद्धची बॉस होती...जी तिकडे नाही.....
आणि अनुपमा मधला भडक, बटबटीत पणा पण नाही.....
अनुपमा चा लहान मुलगा कायम त्या शेजारणीशी फ्लर्ट करत असतो..... अगदी उघड उघड...... त्या मानाने यश जरा सौम्य आहे!
३१ चा एपि आवडला मला.
३१ चा एपि आवडला मला. अनिरुद्धची ॲक्टिंग आणि संवाद खुप छान होते.
हो अनुपमा बघवत नाही. बटबटीत
हो अनुपमा बघवत नाही. बटबटीत नि वाईट कलाकार
मला तर वाटतय, अनिरुद्ध आता
मला तर वाटतय, अनिरुद्ध आता सन्जनाला घेवुन परत इकडेच राहायला येइल.
अनिरुद्धची ॲक्टिंग आणि संवाद खुप छान होते.>>> वेल! तो नेहमिचच पॉपकॉर्न सारखा तडतडत असतो सो नथिन्ग न्यु
पोपकॉर्न सारखा तडतडत असतो
पोपकॉर्न सारखा तडतडत असतो
छान होता आजचा भाग. मला वाटलं अनिरुद्धला हार्ट अटॅक येतो की काय एवढा तो लाल झाला होता. संजना म्हणते अपमान करून घ्यायला जाऊ नकोस पण तिलाच अपमान करून घ्यायची खुमखूमी जास्त दिसते. ईशाला छान थोबडवणार आहे अरुंधती उद्या, देविकाने चुगली केली वाटते 
थँक्स...
थँक्स...
मी अनुपमा उड्या मारत पाहिली व आता नव्या भागात पण उड्या मारतच पहात आहे. ही आता नव्याने पाहीन असं वाटत नाही.
अनि रुद्धचा मोनोलॉग तसा एक
अनि रुद्धचा मोनोलॉग तसा एक नट म्हणून ही खूपच अव घड होता. चांगले काम केले आहे त्याने.
येस..अगदी spontaneous अ
येस..अगदी spontaneous अॅक्टींग होती त्याची. हातवारे जरा जादा झाले..पण तेही एक feature म्हणून चालून जाईल.....
चांगले काम केले आहे त्याने. >
चांगले काम केले आहे त्याने. > हो , प्रथमच अभिनय केलाय जरा चांगला. बरेच मुद्दे ठीक होते त्यातले. अरु , आप्आनि, कांचन किंवा इतरही कोणी त्या दुसर्या मुलाचा फारसा उल्लेखही करत नाहीत ते कोडं होत मला पण. त्याबद्दल फारसं एक्स्प्लनेशन पण नाही दाखवलेलं. कांचन च पुत्रप्रेम तिकडे कधी दाखवलेल नाही.
अनिरुद्ध ने खूप छान अभिनय
अनिरुद्ध ने खूप छान अभिनय केला. आजच्या भागात इशाने आणि अरुंधतीने पण छान अभिनय केला. दोन्ही भाग बघण्यालायक आहेत. सगळ्यांनी मेहनत घेतलिये हे दिसतय.
इशाच प्रकरण आणि त्याची चर्चा सगळ्यांसमोर नको व्हायला हवी होती. फक्त अनिरुद्ध आणि अरुंधतीबरोबर व्हायला हवी होती. अरुंधतीच सारखं मला मान खाली घालायला लावु नकोस हे मलापण खटकत होत. टीनेज मुलांना, मुलींना नाही कळत ते.
खरं आहे...इतक्या घरातल्या
खरं आहे...इतक्या घरातल्या सगळ्या समोर तमाशा झाल्याने इशा ला अधिकच राग आणि अपमान वाटला असणारे.
तिनेही चांगलं काम केलं....
इशाला खरेच उगीचच मार पडला आहे
इशाला खरेच उगीचच मार पडला आहे. देविका फार भोचक आहे. अरुंधती फार इरिटेट करते कधी कधी श्वास टाकत टाकत बोलते. इथे मुलगी एलिअनेट होते आहे दूर जाते आहे त्या कडे लक्ष दे की आधी. मारल्याने काय प्रश्न सुटतात का?! तरी बरे यश ने काही पटटा सोडला नाही. डोकेदुखी निव्वळ. आता इशा जीव द्यायचा प्रयत्न करेल. पुढील भागात.
अनिरुद्ध ने खूप छान अभिनय
अनिरुद्ध ने खूप छान अभिनय केला. आजच्या भागात इशाने आणि अरुंधतीने पण छान अभिनय केला. दोन्ही भाग बघण्यालायक आहेत. सगळ्यांनी मेहनत घेतलिये हे दिसतय.>>+१
इथे मुलगी एलिअनेट होते आहे दूर जाते आहे त्या कडे लक्ष दे की आधी. >> तिचे प्रयत्न चालूच होते. पण इशा जास्त आक्रस्ताळी आहे. त्यातून आता तिने केलेल्या कोणत्याही चूकीचे कारण म्हणजे त्यांचा घटकस्फोट हे सांगायला ती मोकळी. तिकडून तिला फसवण्याचे जोरदार प्रयत्न तो मुलगा करतच आहे. तिला मारून काहीच होणार नाही त्यापेक्षा मानसशास्त्रज्ञ्याकडे समुपदेशन करावे. सेक्स एज्युकेशन द्यावे.
आता इशा जीव द्यायचा प्रयत्न करेल.>>> हो. पण पहिल्या मजल्यावरून उडी मारून काय होणार, हात-पाय मोडून पुढचे ६ महीने घरी बसेल.
इथे मुलगी एलिअनेट होते आहे
इथे मुलगी एलिअनेट होते आहे दूर जाते आहे त्या कडे लक्ष दे की आधी. मारल्याने काय प्रश्न सुटतात का?! >> त्यावेळेस पालक स्वतःचा कन्ट्रोल घालवुन बसतात, मुलगी न सान्गता एका रिसॉर्टला गेलिये हे एकल्यावरच तिथे पोहोचपर्यत तिने १००० विचार केले असतिल. अर्थात मारायला नकोच पण ती प्रतिक्रिया याने येते.
इशाच पात्र रन्गवणारी मु लगी अॅक्टिन्ग चान्गली करत असली तरी इथे बर्याच वेळा येवुन गेलेय तस ती तितकी लहान दिसत नसल्याने ती ईम्युचर अल्लड अशी वाटतच नाही त्यामूले तिने दिलेली कारणही पटत नाहीत.
Pages