Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरु घरी येते तेव्हा एक
अरु घरी येते तेव्हा एक कसलेतरी रडके गाणे वाजलेले.
आता यशगंधार व गौरी जोडी जमली पण मूल होउ शकत नाही.
अभी अनघा प्रेम जमले पन अंकिता मध्ये आहे ती लग्न व्हायला काही ही करू शकते. आणि बाबांना तिथेच जॉब मिळाला आहे जो गरजेचा आहे. अभीचे फारच कॉर्नर झाले आहे. एखादा जीव द्यायचा अश्या परिस्थितीत.
इशा गोइन्ग स्टेडी विथ सम गाय. तो यश भो चक पणा का बरे करतो.
एकूण कांच न बाई फुटाण्यासारखी तडा तडा उडणार आता.
खरे तर अरु घर सोडून गेली व अन्या घरी येउन राहिला संजना समवेत तर प्रश्न सुट तील. तिचे पण नवे जीवन सुरू होईल. ती अनघाच्या फ्लेट मध्ये राहू शकेल कि नाही. पण मग रोज भांडान कसे होईल.
अरूंधती जास्त आवडते
अरूंधती जास्त आवडते अनुपमापेक्षा.
अनुपमा अशी पुटपुटल्यासारखी का बोलते?
४ / ५ एपिसोडपूर्वी
४ / ५ एपिसोडपूर्वी अनुपमामध्ये दादीकडे जाऊन घरी येताना वनराज आणि अनुपमा एकीकडे थांबतात.. झाडाखाली अनुपमा बसलेली असते तर तिच्यावर वाऱ्याने झाडावरची फुले पडतात.. झाड चांगले आंब्याच्या झाडाएवढे असते.. आणि फुले कुठली पडतात तर शेवंतीची..आणि फुले चक्क दाखवली आहेत. कायच्या काय दाखवतात.. नशीब गुलाब नाही दाखवला..
खरे तर अरु घर सोडून गेली व
खरे तर अरु घर सोडून गेली व अन्या घरी येउन राहिला संजना समवेत तर प्रश्न सुट तील. ....>>> मागे ती म्हणते ना कि मी आईकडे जाऊन राहते, पुढे मुलाच्या प्रेमापोटी साबा संजनाला स्विकारतील. पण सासरेबुवा तू घर सोडलेस तर मी पण घर सोडणार असे बोलून तिचा विचार खोडून काढतात.
अरूंधती जास्त आवडते
अरूंधती जास्त आवडते अनुपमापेक्षा. >>>>>>>> मलाही. रुपाली गान्गुली सारा भाई व्हर्सेस मध्ये आवडली होती. अनुपमा मध्ये मात्र ती सतत भडकून, ओठ मुडपून बोलते. कधी कधी श्रीदेवीची नक्कल करते. ओव्हरएक्टिन्ग करते. त्यामानाने मधुराणीचा अभिनय संयत आहे.
मला तरी मराठीतलाच भाग जास्ती योग्य वाटला >>>>>> ++++++++११११११११
अरु घरी येते तेव्हा एक कसलेतरी रडके गाणे वाजलेले. >>>>>> मला ते गाणे आवडले. कुठल्या चित्रपटातले आहे हे?
इशा गोइन्ग स्टेडी विथ सम गाय. तो यश भो चक पणा का बरे करतो. >>>>>>> कसला भोचकपणा? बरोबर वागत होता तो. सध्या ईशाच वय लक्षात घेता तिने आधी शिक्षणावर आणि करियरवर लक्ष दयाव. तो मुलगा चीप आहे.
खरे तर अरु घर सोडून गेली व अन्या घरी येउन राहिला संजना समवेत तर प्रश्न सुट तील. तिचे पण नवे जीवन सुरू होईल. >>>>>>> हो ना. पण सासरेबुवा तिला जाउ देतील तर ना.
अरु काउन्सेलिन्ग नतर घरी येते
अरु काउन्सेलिन्ग नतर घरी येते तेव्हा तिला आलेला मानसिक थकवा तिने अभिनयाने अगदी छान दाखवलाय. ती अनिरुद्धलाही छान सान्गते की एकदा सन्जनाला स्विकारलय तर ती माझ्यासारखी नाही म्हणून तक्रार करु नका . हिन्दी मालिका बघत नाही पण यात थोड ओव्हर होत असल तरी ठिक आहे.
कान्चनच्या मनाविरुद्धच नातसुना घरात येणार तर! , गौरीच्या आइने यश-गौरी बद्दल इतक्या लवकर कशाला सान्गायच सन्जनाला?
अन्कितापेक्षा अनघाच आता सुट होइल अस वाटतय अभिला.मागच्या दोन्ही भागात अनघा गोड दिसत होती.
मला ते गाणे आवडले. कुठल्या
मला ते गाणे आवडले. कुठल्या चित्रपटातले आहे हे?>> माहीत नाही पण छान होते मला कालवा कालव व्हायला लागली म्हणून मी ते ऐकले नाही. २५ वर्शाचा जॉब संपला तरी लास्ट वर्किंग डे ला रडू येते रिकामे वाट्ते इथे तर मेजर रिलेशन शिप संपली हे बरोबर दाखवले आहे. अन्या पण घरी येउन थकलेला दाखिवला आहे.
इशाच्या वयातच मित्र असतात की. फोन कोणाचा आला आहे हे फोन मध्ये डोकावून बघणे ही कोण नवी मैत्रीण विचारणे ते ही दोन तीन दा हे भोचकच वाटले मला तरी.
अरुंधती म्हणजे मधुराणी
अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुळकरच्या कवितेचे पान या कार्यक्रमातले तिचे गायन.. https://youtu.be/ZJMZjtzihLg?t=659
अरुंधतीच्या लग्नाला २५ वर्षे
अरुंधतीच्या लग्नाला २५ वर्षे झाली असे तो मॅरेज कोन्सेलर म्हणाला. म्हणजे मोठ्या मुलाचे जास्तीत जास्त वय २४ . यशचे २२.
२४ व्या वर्षी डॉक्टर लोक सेटल झालेले नसतात. मास्टर्स करायची सुरुवातही झालेली नसते.
दुसरं काही शिकले ल्या मुलांचं करियरही २२ पर्यंत सेट होत नाही आणि लग्नाला ते वय कमी आहे.
हे बारीकसे तपशील गंडले आहेत . पण मुलांच्या लग्नाचे वय होईपर्यंत मालिका ताणत नाहीएत हे बरं आहे. एकाच वेळी अनेक ट्रॅक चालवतात आणि त्यात काहीतरी घडतंही.
कालच्या भ्रामरी प्राणायामात कानाच्या पाळ्या का आणि कशा बंद करायच्या? कान बंद करतात ना?
हिंदी मालिकेत गुजराती कुटुंब
हिंदी मालिकेत गुजराती कुटुंब दाखवले आहे आणि गुजराती मुलं लवकर लग्न करतात. तोच ट्रेंड इथेही असेल. यश पण वयाने लहानच आहे पण स्वतःचे लग्न जमवून बसला आहे. बहिणीवर ईतकी दादागिरी का. अरुंधती घर सोडून गेली तर हक्काची मोलकरीण जाईल आणि चांगले चुंगले खायलाही मिळणार नाही. अजूनही मुलांना कॉफी, डबा हातात देणे चालूच आहे, कितीही उद्योग करत असली तरी तितकीशी बिझी वाटत नाही अरु.
येस चंपा..... मीही नेहमी
येस चंपा..... मीही नेहमी विचार करते...ही इतके क्लासेस वगैरे घेते आणि सदा सासू- सासर्यांना चहा देऊ? नाश्ता देऊ? मुलाना डबा देऊ,जेवायला वाढू का ? ...यातच तर गुंतलेली दिसते.....!!
अनुपमा मधे त्यांची सून ही वनराजच्याच ऑफीस मधे काम करत असल्याचे दाखवले आहे. इथे ते एक वगळलं!
आणि सासूचा भाऊ ही त्यांच्याच कडे राहत असतो...तेही नाही. पण हिंदी मालिका अतिशय भडक, बटबटीत आहे...सर्वच बाबतीत... संवाद, मेक अप, क्लोज अप्स........ती मुलगी, पाखी हरविते...आणि सापडल्यावर घरी आणल्या वर अनुपमा आणि वनराज तिच्या शेजारी बसून तिचे पापे घेत राहतात आणि तिच्या डोक्यावरुन हात फिरवीत राहतात हे.....असंख्य शॉट्स मधे दाखविले! तेच ते शंभरदा..........!!
मी त्या पाखीच्या जागी असते ...तर शुद्धिवर येऊन 'अब बस भी करो मॉ' ...........असे म्हटले असते!
मोठ्या मुलाचे जास्तीत जास्त
मोठ्या मुलाचे जास्तीत जास्त वय २४ . यशचे २२. >>> तेच तर. आजच्या जगातली मुलं आहेत ना ही, मग हे वय करीयर सेट करायचे आहे की लग्न लग्न खेळायचे ?
आणि लग्न म्हणजे काय गंमत वाटते का यांना. असो. यश साहेबांनी तर खऱ्या आयुष्यात ऑलरेडी लग्न केले पण आहे आणि त्याची बायको अजूनच लहान आहे. बालविवाह 
यश साहेबांनी तर खऱ्या
यश साहेबांनी तर खऱ्या आयुष्यात ऑलरेडी लग्न केले पण आहे आणि त्याची बायको अजूनच लहान आहे. बालविवाह Lol >>> हो तुम्ही लिहिलेले वाचुंन सहज गुगल केले तर यश (अभिषेक देशमुख ) हा ऍक्टर, डायरेक्टर आणि रायटर सुद्धा आहे. आणि पुढील माहिती जशीच्या तशी त्याच्या प्रोफाइल वरून उचललेली
Some of his works include Marathi television program ‘Passant Ahe Mulagi’; He is best known for his feature films – ‘Home Sweet Home’ and his plays, and for his writing and directing – ‘Hey Frida! And ‘Karve… Tase’, which were also listed for international festivals in Bulgaria in 2015 and Egypt in 2015.
मागे यांचे लग्नाचे फोटो
मागे यांचे लग्नाचे फोटो youtubeवर बघितलेले. अभिनेत्री अमृता देशमुख याची सख्खी बहिण आहे.
२४ व्या वर्षी डॉक्टर लोक सेटल
२४ व्या वर्षी डॉक्टर लोक सेटल झालेले नसतात. मास्टर्स करायची सुरुवातही झालेली नसते.>>>अजुन नाही सेटल झाला. तो अंकिताबरोबर मास्टर्स करायला परदेशी जाणार असतो. आताही काही दिवसांपुर्वीच तो कामाला लागला आहे.
मला वरचा फोटो पाहून कॉलेजच्या
मला वरचा फोटो पाहून कॉलेजच्या कल्चरल डेची आठवण झाली. तेबी फर्स्ट इयर
२५ वर्शाचा जॉब संपला तरी
२५ वर्शाचा जॉब संपला तरी लास्ट वर्किंग डे ला रडू येते रिकामे वाट्ते इथे तर मेजर रिलेशन शिप संपली हे बरोबर दाखवले आहे. अन्या पण घरी येउन थकलेला दाखिवला आहे. >>>>>>>>> ++++++१११११११
फोन कोणाचा आला आहे हे फोन मध्ये डोकावून बघणे ही कोण नवी मैत्रीण विचारणे ते ही दोन तीन दा हे भोचकच वाटले मला तरी. >>>>>>> मेबी इतक्या सकाळी सकाळी मैत्रिणीचा फोन येणे यशसाठी शॉकिन्ग असेल. पण तो मुलगा बरोबर वाटला नाही. आधीच फॅमिली इश्युजमुळे ती बिथरलेली आहे, सो अश्या परिस्थीतीत तो मुलगा तिचा गैरफायदा घेऊ शकतो. पार्टीत नाचताना तो कसा तिच्याकडे बघत होता. ह्याआधी एका मित्राने तिला ब्लॅकमेलिन्ग करायचा प्रयत्न केला तेव्हा अरुन्धतीने तिला वाचवल होत. आता तिने पुन्हा तिने नवीन घोळ घालू नये म्हणजे मिळवल, पुन्हा अरुन्धतीच्या डोक्याला ताप.
आणि सासूचा भाऊ ही त्यांच्याच कडे राहत असतो >>>>> ते मराठीमध्ये नाही दाखवल ते बर झाल.
अभिषेक म्हणजे यशची खरी बायको गोड आहे.
येस सुलू....... त्या
ही पोरगी बहुतेक राजवाडे &सन्स
ही पोरगी बहुतेक राजवाडे &सन्स आणि हॅपी जर्नी सिनेमांत होती.
ही पोरगी बहुतेक राजवाडे &सन्स
ही पोरगी बहुतेक राजवाडे &सन्स आणि हॅपी जर्नी सिनेमांत होती. >>> पानीपत मध्ये होती .
श्रवू , मी अनुपमा चा तो
श्रवू , मी अनुपमा चा तो फुलवाला भाग बघितला.
कैच्याकै. शेवंतीची फुले आणि पाकळ्या वरुन कुणीतरी भुरभुरत होते बहुतेक. आणि यांना इतके प्रेम कसे वाटू लागले एकमेकांबद्दल अचानक?
यातली जुनी संजना हिंदी सिरीयल
यातली जुनी संजना हिंदी सिरीयल गुम है किसीके प्यारमे मध्ये येणार आहे. हल्लीच मी ही हिंदी सिरीयल बघायला घेतली (गुम है किसीके प्यार मे), youtubeवर समजलं.
हिन्दीमधली सन्जना म्हणजे
हिन्दीमधली सन्जना म्हणजे काव्या मिथुन चक्रवर्तीची सून आहे. मदालसा शर्मा नाव आहे तिच.
अच्छा, अनुपमा नाही बघितली
अच्छा, अनुपमा नाही बघितली कधी. मदालसा कोण ते youtubeवर बघेन एखादा शॉट बघून.
मराठी आई मधल्या जुन्या संजना दिपाली पानसरेबद्दल लिहिलं मी, तिने आधीही काही हिंदी सिरियल्स केल्याचा उल्लेख होता त्यात पण मराठी केल्यात हे अजिबात सांगितलं नाही त्या व्हिडीओत ते थोडं खटकले.
अभि कसला चम्या आहे. अनघाने
अभि कसला चम्या आहे. अनघाने लग्न काय, मैत्रीही ठेऊ नये त्याच्याशी. त्या दिवशी तर मारे नाचत होता, प्रेमात पडलोय म्हणून. त्या अनघाला ताटकळत ठेवलं आणि स्वतः वडिलांना भेटायला गेला. तिची माफी तरी मागितली की नाही ते दाखवलंच नाही. स्वतः काहीच ठाम निर्णय घ्यायचा नाही आणि स्वतःवरून चाललेली भांडणे बघत बसायची.
यश तर गुंडाच वाटतो. आता त्या साळवीला मारतोय. कुणीतरी त्याला चांगलं ठोकलं पाहिजे म्हणजे मारामारीची खुमखूमी जाईल त्याची.
कांचन नेहमी कटकट करत असते विशेषतः अरु बाहेर निघाली की. हे लोक खाण्यासाठीच जगतात असे वाटते. प्रत्येकाच्या आवडीचं बनवून, साफसफाई करून अरु पनवेलला गेली. जायला यायला किती वेळ लागतो त्याचा हिशेबच नाही.
कांचन नेहमी कटकट करत असते
कांचन नेहमी कटकट करत असते विशेषतः अरु बाहेर निघाली की. हे लोक खाण्यासाठीच जगतात असे वाटते. प्रत्येकाच्या आवडीचं बनवून, साफसफाई करून...>>> तिने तर तशी अटच घातली होती कि घरातलं सगळं करायचं मग बाहेर पडायचे. कोणाचीही अबाळ होऊ द्यायची नाही. अरूंधती तर अजूनही सकाळी मुलांना उठवते, डबा भरून देते, चहा करून देते.
हो ना आणि वरून म्हणते की
हो ना आणि वरून म्हणते की मुलांना मी नाही लाडावलं
ईशा तर अगदी लहान मुलींसारखी वागते. सकाळी आईच्या कुशीत लोळते काय आणि रात्री मित्राशी फोनवर गप्पा मारते 
नोकरी गेल्याच्या रागात
नोकरी गेल्याच्या रागात अनिरूद्धने कांचनला अरूंधतीवर सोडून दिले. साबा आता थयथयाट करणार.
इबाळ धोका खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही वाटते. नाही तेव्हा वडिलांकडून भरपूर पैसे घेत असते आणि त्या मुलाला घरचे नवे हेडफोन घेऊन देत नाहीत म्हणून सांगते.
अरुंधती उच्छ्वास सोडत का
अरुंधती उच्छ्वास सोडत का बोलते? खूपच गांजलेली आहे, डोक्यावर खूप ओझं आहे, हे दाखवायला का?
आश्रमवाल्या बाईचं कॅरॅक्टर विचित्र वाटलं. मानसी मागीकरांनी हाय पिचचा आवाज लावला होता. आणि पहिल्यांदाच भेटलेल्या बाईला पाहून न जन्मलेल्या मुलीची आठवण काढून रडू काढलं. तसंच त्यांच्या तोंडचे 'या बायका' 'या बायका' खटकलं. कदाचित माध्यमांत असे आश्रम चालवणार्या बायका शांत, समंजस, मॅच्युअर , खंबीर दाखवलेल्या असतात त्याची सवय झाली असेल.
अनिरुद्धची लक्षणे नवी नोकरी आणि गर्ल्फ्रेंड दोन्ही गमवण्याची आहेत.
अरुंधतीला गाण्यासाठी त्या
अरुंधतीला गाण्यासाठी त्या आश्रमात बोलावले होते पण तिचा आवाज फार काही ग्रेट आहे असे नाही वाटत. म्हणजे गाण्यासाठी खास बोलवावं किंवा आग्रह करावा असा.
Pages