Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळेच मालक अर्धवट असले तर....
सगळेच मालक अर्धवट असले तर.....?>>>आहेतच की
@भरत, रेखा आणि खोडबब्बरचा 'संसार'
आई कुठे काय करते म्हणता
आई कुठे काय करते म्हणता म्हणता बरंच काही करायला लागली..
बरोबर..
हो तोच.
हो तोच.
खोडबब्बर >>> हाहाहा.
खोडबब्बर >>> हाहाहा.
संसारची आयडिया सिरियलवाल्यांनी पण चोरलीय.
मराठी चित्रपटही आहे तसा फ्रेम
मराठी चित्रपटही आहे तसा फ्रेम न फ्रेम कॉपी केलेला. अशोक सराफ, तुषार दळवी, कविता लाड, सुशांत शेलार अशी मंडळी आहेत. रेशम टिपणीस नोकर दाखवली आहे कदाचित.
मराठी चित्रपटही आहे तसा फ्रेम
मराठी चित्रपटही आहे तसा फ्रेम न फ्रेम कॉपी केलेला. >>> हो, अनोळखी हे घर माझे नावाचा.
आज टपाल नावाचा चित्रपट लागला
आज टपाल नावाचा चित्रपट लागला होता दुपारी, त्यात मला अनघा दिसली, गावरान वेशात, बैलगाडीत बसलेली.
अरुचं स्वतंत्र आयुष्य असू शकतं असा विचारही कांचनला सहन होत नाही. तिच्या आयुष्यात कोणी येऊ नये अशी तिची ईच्छा आहे, हे पुढचे सुतोवाच तर नाही ना. तिच्या डोक्यात हे भरवू नकोस म्हणजे ती काही लहान आहे का. कमाल आहे कांचाची.
विशाखाचे संवाद चांगले आहेत या विषयावर.
कमाल आहे कांचाची>> +१ स्वत
कमाल आहे कांचाची>> +१ स्वत:च्या मुलाने दुसरी बायको घरात आणली तरी अरूनेच यांचे डबे भरायचे. पण अरूही काही कमी नाही. तिला भारी हौस आहे. विमल आहे स्वयंपाक करायला पण ही गौरीच्या घरात राहून यांच्यासाठीनाश्ता, दुपार-रात्रीच्या जेवनणाचे डबे पोचवते.
तिचे इतके कंडीशनिंग झाले आहे कि तिकडे तिची आजारी आई तिच्याच काळजीत एकटी असते पण तिला हे भरले घर सोडवत नाही. कशाला आता नविन माणूस तिच्या आयुष्यात आणणार आहेत? बिचारा तिला हवी ती मदत करत राहील, तिच्यासाठी झुरत राहील पण आई-आप्पा, मुलं, अनिरूद्ध सोडा, विमल जरी म्हटली कि आम्हाला सोडून जाऊ नका तरी अरू त्याला नकार देईल.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
भाग ४९१
ऑफिस मध्ये सुरुवात. दसृयाची पूजा आहे. अरू ने त्यात पिशवीत प्रसादाचा शिरा आणला आहे. तो सर्वांना आवड ला आहे. हा मस्त झाला आहे असे सर्व म्हणतात ह्याला गौरीने मदत केली आहे.
आता ऑफिसातील सर्व लोकांच्या बॅक स्टोरी सांगायचा कॅपशूल आहे. ते झाले की अरूचा उसासत त्यामानाने मी इतके सुरक्षित जीवन जगले आहे व्गैरे संवाद आहे.
सर्व तिला गायला सांगतात व ती एक छान गाणे म्हणते. : जो आव ड तो सर्वांना... हे प्री रेकॉर्डेड आहे बहुतेक पण छान आहे.
माझे इथे लिहून संपले पण ते गाणे संपलेले नाही. टीपी एपिसोड आहे बहुतेक.
हॅपी संतूर संगीत आहे.
कट टू कांचन अप्पा संवादः अनघाचे आई बाबा खूप आणतात. आपण काही रिटर्न मध्ये द्यायला हवे ना तर आजी त्यांच्याच दुकानातून साड्या घेउ म्हणते. संजना छान तयार होउन आली आहे. पण लग्न ठरले की मी ताई कडे जाईन म्हणते. इशा अन्नाचे कौतूक करत बोकाणा भरत येते.
अरूने किचन मध्ये सर्व तयारी केली आहे. व सासूला बघायला सांगते. पण सासू इग्नोअर करते.
अनघाचे आई बाबा येतात. अप्पा पहिले सॉरी म्हणतात संजन हॅलो म्हणते. अनघाची आई परत नमस्कार करते. व स्वतःला अनिरुद्धची बायको म्हणते अनघा व मी एकाच घरात राहा णार ना. गोड बोलूनच ती ह्या घरात शिरली आहे. अनघा आई व अरु ह्यांचे भावनिर्भर संवाद आहेत.
उसासे मिश्रीत अश्रू पात संवाद व फारच भावनिक रुजुवात होते परत नात्यांची. अन्या प्रवास कसा झाला तब्येत कशी आहे वगैरे विचारतो.
आजी अरूला चा पाण्याचे बघ म्हणून आत हाकलते.
आई अनवधानाने आपण नवे दुकान सुरू केले आहे दहा एकर जागा घेतली आहे वगैरे बोलून जाते. तिला माहीत नाही हे किती पाण्यात आहेत.
परत अरूच्या खाण्याचे कौतूक बाहेरून कशाला मागायचे. दिवाळी नंतरचा मुहूर्त काढायचे ठरते. देण्या घेण्याची बोलणी करताना संजना हावरट नवी दहा एकर जमीनच मागते. लैच हरामी आहे.
लग्न गावाकडे करायचे आहे असे ते म्हणतात म्हनजे व्यवस्था नीट होईल. फाइव्ह स्टार हॉटेल पण आहे. तुम्हाला हवे असल्यास.
अन्या फक्त मुलगी व नारळ द्या म्ह न तो.
सिनीअर्स चा तोंड गोड करणे पक्षे एक मेकांना काजू कतली भरवणे समारंभ होतो. अरू उसासत कृतज्ञता व्यक्त करते.
आजी पण उठून डोलारा संभाळत अरू पाशी जाउन तिला बर्फी भरवते व तिला माफ करते. अरू रडत चेहरा वेडा वाकडा करत आहे
व संजना वैतागू न अन्या कडे डोळॅ वटारून बघते पण त्याचे डोळे अरू कडे व आई कडे लागले आहेत. दोघींच्या साड्या साध्या कलरच्या आहेत. पण सासूची एकदम चटाक आहे. व गजरा अंबाडा मोठा थाट आहे. अनघाची आई सुस्थितीतील खेडवळ दाखवली आहे. डोरले. मोठी बिंदी चार पदरी माळ डोक्यावरून पदर.
गोडबोलीत भाग संपला.
प्रोमो: अरू आता कधी लग्न होते अग दी डोळे आसुसले आहेत. वगैरे बडबड करत आहे तर अनघाला तिच्या एक्सचा फोन येतो. मी तुला ल्ग्न करू देणार नाही. अभी तिच्या कडे बघतो.
अनघाचे कानातले छान आहे.
अनघाचे कानातले छान आहे.
संजना अनघाचे आईबाप गावाकडचे आहेत त्यांना काय इतके नीट वागवायचे असे हेटाळणीने बोलते. तिला आजी समज देते. पण आजी स्वतः सुनेला किती बांधून घालते आहे. ते विसरली आहे. तिचे माणूस असणे व तिच्या साध्या इच्छा आकांक्षा, मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे ह्याकडे म्हातारी काणा डोळा करते. सोयीस्कर पणे. शी रिअली इज द मेन व्हिलन ड्रेसड इन अ गूड सारी.
अनघाचा एक्स आणून आता पाण्याला
अनघाचा एक्स आणून आता पाण्याला फोडणी देणार का?
अरुंधतीला दुर्गावतार धारण करायची आणि अभिला
रडारड करायची, आईच्या पदराखाली लपायची आणखी एक संधी.
काल तो म्हणाला - आई घोळ घालून ठेवते. Look who is talking.
अरुंधतीने मुलीकडची म्हणून लग्नात सामील व्हावं.
लग्न झाल्यावर कांचनला अनघाच्या रूपाने अरुंधती.२ मिळेल.
काल तिला आणि अभिला अप्पाने खूपच सोम्य शब्दांत सुनावलं. थोबडवायचा सीन चालला असता. त्याआधी अरुंधतीला कोणीतरी थोबडवायला हवं. देविका चालेल.काल आई अप्पांची औषधं घेऊन आली होती.
विशाखाने सांगितलेलं यांना कळलं तरी वळणार नाही.
२५ लाखांचा प्रश्न होता तर अनिरुद्ध , अप्पा, केदार विशाखा मिळून सहज सोडवू शकले असते. ( अभि पगार घेत नाही बहुतेक)
अनिरुद्धच्या जॉब प्रोफाइलच्या ५०+ माणसाकडे करोडची गुंतवणूक सहज असायला हवी. पण मराठी मालिकांचे लेखक कर्ज खूप दाखवतात आणि गुंतवणूक एफ डी मध्ये करतात. Negative returns.
नवीन कोण छान असेल आणि अरुवर
नवीन जर कोणी छान असेल आणि अरुवर खरोखर प्रेम करत असेल तर अरुने विचार करावा त्याचा. ह्या लोकांसाठी राबत राहू नये.
असं कसं अंजू, मग ती स्वार्थी,
असं कसं अंजू, मग ती स्वार्थी, निर्दयी आणि निलाजरी नाही का ठरणार. अनिरुद्धचं ठिक आहे, तो पुरुष आहे आणि त्याला कोणत्याही वयात प्रेमात पडायची मुभा आहे
परवा संजनाने फोन केला तेव्हाही अरु औषधं आणायलाच गेली होती. किती वेळा औषधं आणते. अनिरुद्ध आणि संजना तर रिकामेच असतात, तसे तर अभि आणि यश सोडला तर सगळे घरीच असतात पण औषधं हिच आणणार तेही रोज. एवढा स्वयंपाक करायला आणि डबे भरायला वेळ कसा मिळतो. डबेही जंबो साईझ दाखवायला हवेत पण अगदीच छोट्या पिशवीत असतं सगळं. अनिरुद्ध आणि संजना काय खातात ते नाही दाखवत.
हाहाहा चंपा, खरं आहे. हिंदी
हाहाहा चंपा, खरं आहे. हिंदी बघत असतील त्यांना माहीती असेल पुढे काय होणार ते, तसंच इथे होईल.
मी बघते अंजू, हिंदी अनुपमा...
मी बघते अंजू, हिंदी अनुपमा....
पण त्यात बरच वेगळं आहे. एकतर गुजराती असल्याने सारखे ढोकळा, जलेवी, गरबा.....
नटूनथटून लोक फिरत असतात.
अनुपमा ही नर्तिका दाखवली आहे. त्यातली संजना..म्हणजे काव्या ही फारच उथळ नटमोग्री आहे.....
त्यात सासू विरोधात जाते...हीचा मित्र आल्यामुळे. इथेही तीच लक्षणं दिसताहेत...
अच्छा, मागे युट्युबर दोन दोन
अच्छा, मागे युट्युबर दोन दोन मिनिटं बघितलेलं पण फार बघवत नाही.
अनुजबद्दल तिथल्या अनिरुद्ध म्हणजे वनराजची काय प्रतिक्रीया असते, तिच इथे दाखवतील.
मी ती मालिका पाहत नाही पण
मी ती मालिका पाहत नाही पण तिथले अभिनेते पात्रांच्या वयापेक्षा खूप लहान आहेत.
इथे अरुंधती ४५-५० ची वाटते. मिलिंद गवळी अनिरुद्धच्या वयाचा आहे
आई अप्पा वयाने लहान आहेत.
अरुंधती ५५ ची वाटते, अनिरुद्ध
अरुंधती ५५ ची वाटते, अनिरुद्ध ४५ चा, संजना ४० ची
अरुंधती ज्या प्रमाणे सगळ्यांना चांगुलपणाचे डोस पाजत असते त्यावरून ती अप्पाची पण सासू वाटते.
गुजराती लोक लवकर लग्न करतात
गुजराती लोक लवकर लग्न करतात त्यामुळे तिकडे ते खपून जात असेल. समीर धर्माधिकारी अनिरुद्धच्या वयाचा वाटतो. सत्तावीस तारखेला अरुला वाचा फुटणार म्हणजे तोपर्यंत समीरची एन्ट्री झालेली असेल कदाचित.
भरत.. आई अप्पा खरे तर ८०
भरत..
आई अप्पा खरे तर ८० प्लस दाखवायला हवे...... अनिरुद्धच जर बावन्न त्रेपन्न चा असेल तर.! पण मग ...त्यांच्या दुखण्यांमधेच अर्धी सीरीयल संपून जाईल!
अनुपमा मधेही ठीक वयाचे दाखवलेत की...कोण लहान वाटलं तुम्हाला? काव्या..? ती तर एक्स्पेक्टेड आहेच!
तिथली इशा खूप गोड आहे.....हिच्यापेक्षा.....!!!
दाखवलेली वयं नाही म्हणत. त्या
दाखवलेली वयं नाही म्हणत. त्या अभिनेत्यांची वयं. ती मालिका पाहत नाही त्यामुळे ते त्या त्या पात्राच्या वयाचे दिसतात का माहीत नाही. अनुपमा, तिचा नवरा आणि मित्र तिन्ही .
इथे आई अप्पा ७२-७५-७८ चालले असते.
इथे ईशा तिच्या वयापेक्षा मोठी वाटते. यश प्रत्यक्षात मोठा आहे पण नाही वाटत. गौरी अपेक्षित वयाची दिसते.
तिथली इशा खूप गोड आहे....
तिथली इशा खूप गोड आहे.....हिच्यापेक्षा.. >>> ही लक्षात नाही माझ्या पण गौरीची तिथली भुमिका करणारी गोड वाटली. अनुचा एक मुलगा पण फार हिरो मटेरीयल आहे, कुठला तो माहीती नाही.
अनुचा मुलगा - समर - हिरो
अनुचा मुलगा - समर - हिरो मटेरिअल आहे.

आणि तिथली गौरी- नंदिनी- फार थोराड वाटते मला..................
मग मला कोण छान वाटली, बघेन
मग मला कोण छान वाटली, बघेन परत.
समर का अच्छा, मस्त आहे तो.
शुभ प्रभातः इथले वाचून
शुभ प्रभातः इथले वाचून अनुपमा पन बघायला सुरू केली आहे.
आपला भाग ४९२: अनघा अभीची प्रेमळ बडबड चालू आहे. अनघा अजूनही विश्वास ठेव णारी भाबडी आहे. अभी अजूनही यश च्या रागात आहे. तो घालवाय्चा अनघा प्रयत्न करते. व अरूवरचा पण उसासे क्वीन लगेच आत येत पेन घ्यायला आले उगीच सॉरी करत जायला बघते. मुलाचे बोलणे आईला लागत नसते. वेडा कुठला म्हणते. उसासे उसासे लै प्रेम. तिला त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत.
खंग्री मॅन एक पीस टाकतो. अनघ्याच्या नवर्याचा फोन आहे. तो तर म्हणतो तू माझे आयु श्य उध्वस्त केलेस तसे मी तुला करू देणार नाही
परत. ती जरा साषंक दिसत आहे. अरू विचारते तर रॉग्न नंबर आहे म्हण ते.
अरूने गडबडीत पण अनघा च्या आईसाठी श्रीखंडा च्या वड्या बनवल्या आहेत. अभी अनघाला पोलिसात जाउ म्हणतो तर ती नकार देते. हाउ कम? ती इतकी शहाणी आहे पण इतकी समोरुन थ्रेट आहे तर पोलिसात जात नाही? समथिन्ग इज सर्टनली रॉन्ग. हिअर.
हनिमूनला कुठे जायचे ठरवले आहे का विचारून त्याला डिस्ट्रॅक्ट करते आहे.
कट टू अन्या संजना इन बिल्डर्स ऑफिस. संजना प्रॉपर्टी विकायला आम्ही तयार आहोत असे सांगते. तो माणूस पार्टनरशी बोलतो म्हणतो. व त्यांचे गळ्यात पडायचे प्रयत्न जरा हाणून पाडतो.
कट टू अनघाचे आई आबा: लग्नाची चर्चा जावयाला दिवाळीस घरी बोलवू म्हणते आई. ति चे बाबा पैसे देतो घराचे कागद सोड्वून आणा म्हणतो. व्याह्यां कडून कैसे पैसे लेनेने असा इशू आहे. अनघाची आई घराची शांत करून घ्या म्हणते पण अनघा मी कसे असे सांगो म्हणते.
ताई फार चांगली आहे आहे आहे असा त्रिवार जयजय कार होतो परत एकदा. आई अजून ओल्डीज ला गावी घेउन घ्यायच्या मोड मध्येच आहे.
ही आही अनघाला पन चिडवते. आई सारखी सासू मिळाली आहे म्हणते. काय ही अंधभक्ती. स्क्रिप्ट रायटरला फोडला पाहिजे.
अरू दिवाळी फराळाच्या मागे आहे. चिवड्याच्या तयारीत आहे. गौरी सासूशी गप्पा मारते आहे. तिला पण साडी दिली आहे त्यांनी.
अरू उसासत हसत बीए करायची इछ्च्चा व्यक्त करते. गौरी तिला पोस्टल बीए करायचा सल्ला देते. ती नोकरी करते आहे त्याचे गौरीला फार आनंद झाला आहे. आता दिवा ळीचा कार्यक्रम व त्याची तयारी पनवेल ला जाणे. हे ते चालू आहे.
गप्पा करत भाग संपला सुद्धा.
प्रोमो मध्ये संजना आई अप्पांना तुम्ही रस्त्यावर येणार घर विकले नाहीतर म्हणत असते तर झोळीवाली कॉटन साडी बाई येउन असे काही होत नाही. मी आहे ना अशी ठाम पणे उभी राहते. म्हातारे गप्प आहेत.
आता कालच्यामॅचचे हायलाइट बघते.
शुभप्रभातः
शुभप्रभातः
भाग ४९३: ऑफिस चा सीन अरू ऑफिसातली काम करून पनवेल ला जायचे असते पण ती दुसरी मुलगी उद्या जायचे ठरवते कोणी तरी ट्रस्टी सुलेखा ताई आहेत त्यांचे कौतूक कॅपसूल आहे मग त्या उद्या ये णार म्हणून उद्या पनवेलास जाय चे ठरते. ती डिग्री शिक्षण घ्यायचा मनसुबा सांगते.
ती मुलगी मदत करायला पेपर्स आण बोलते. स्कूल् लीव्हिन्ग सर्टिफिकेट व बारावी सर्टिफिकेट घरून आणायचे ठरवते. ह्याचा पत्ता नाही पण अरुंधती जोगले कर एम ए असे एक स्वप्न बघून होते.
कट टू अनघाचे आई बाप हे श्रीमंत व दिलदार असे विचित्र काँबिनेशन आहे. कुठे असतात हे लोक?! अरू ला बोलणी करायला बोलवते अनघाची आई. फोन लावते. घरी चहाला बोलवते ( अनघा च्या फ्लॅट वर) उसा से टाकत अरू हो म्हणते. ऑफिस झाल्यावर सोशल लाइफ.
एका बाई साठी ही सासू तयारीला लागते. नवृयाला जिलेबी आणायला पाठवते ड्राय्वर घेउन.
कट टू अनघा अभी: भेळ व पाणी पुरी खाण्याचा प्रेमळ प्रसंग. खंग्री मॅन हे ते तुकडॅ टाकत आहे. तिचा नवरा फोन करतो हे खरेतर डेंजरस आहे. पोलिस कंप्लेट करायला हवी म्हणतो आहे अभी व ती अॅग्री होते. ती फारच एक्साइटॅ ड आहे. हळद मेह्नंदी संगीत परत करायचे आहे.
हिला सगळे छान छान हवे आहे. तिला आईचा फोन येतो अरू ला चहा ला बोलवले आहे ते सांगते. एकदम आउट ऑफ कॅरेक्टर उत्साही दिसते आहे. म्हणजे परत काहीअरी राडा होणार. अनघाचा कॅजुअल ड्रेस छान आहे.
ते बाबा चिवडा जलेबी घेउन येतात. बेल वाजते व अरू उसासे टाकत नमस्कार म्हणते. आज घरच्या लोकां ना आराम आहे वाट्ते लिहे परेंत
अप्पा शेजवान चकली वर नवल करत आहेत. अरू ला का बोलवले आहे म्हणून आजी टेन्शन मध्ये आहे. अप्पा लगेच विहीणी विहीणी गप्पा
किती गोड वगिअरे कॅपसूल.
अनघाची आही एकरंगी खेडेगावातली श्रीमंत दोरसानी. अरू आयत्या चहाने सुखावते. अनघाची आई ही एकदम श्रीमंताची लाडावलेली प्रोटेक्टेड वाइफ आहे. सर्व चांगलेच चाललेले आहे व एकदम बेस बिहेविअर व भावनिक जलेबी तळत असते. पोटची पोर वगिअरे चालू करते तरी हे दुसरे लग्न आहे.
नवरा लगेच चालायला निघून गेला.
आजी आपल्या सासू ची गार्हाणी सांगत आहे. एकदम अन्याचे दुसरे लग्न झाल्याने काही अडचणी तर नाही येणार असे म्हणत अस्ते तर संजना समोर उभीच. बिल्डर कडे चौकशी करायला गेलो होतो म्हणते. ही प्लॉट विकायच्याच मागे आहे. टॉवर्स बांधायचा हिचा बेत आहे कायम व ती फोर्स करत आहे.
अविनाश चे पैशाचा प्रॉब्लेम नक्की काय आहे हे चेक करा हे ती सांगते हे बरोबर आहे. तो खरेच फार गोलमाल बोलत आहे.
प्रोमो मध्ये एकदम अरू संजना वर उखडून हात पण उगारेन म्हणते. हेच तेव्हा नवर्याच्या मिठीत सापडली तेव्हा करायला हवे होते चांगले दात पाडू व ग्यालरीतून ढकलून द्यायला हवे होते. अन्या माझ्या बायकोशी असे बोलायचे नाही म्हणत अंगावर येतो तर ती ते " मी आता तुमची बायको नाही!!!" म्हणते.
अभिच्या पत्रिकेतले योग पाहता
अभिच्या पत्रिकेतले योग पाहता अनघाचा एक्स नक्की त्यांच्या लग्न समारंभात राडा घालणार.
आश्रमवाल्या मानसी मागीकर बाई दाखवतच नाहीयेत. त्या होत्या तोवर अरुंधतीला त्यांचं ऑफिसात नोकरी द्यायचं सुचलं नसणार.
आश्रम पनवेलला आणि हापिस बोरिवलीला.
आश्रम म्हटलं की काही
आश्रम म्हटलं की काही गैप्रकार चालतात की काय असेच वाटते...... !! उंबरठा सिनेमा आठवला....!

अन्या माझ्या बायकोशी असे बोलायचे नाही म्हणत अंगावर येतो तर ती ते " मी आता तुमची बायको नाही!!!" म्हणते...या दोन वाक्यां मधे परस्पर संबंध काय? अन्या कुणालाही असे म्हणू शकतो ना.. की माझ्या बायकोशी असे बोलायचे नाही.... ही आता बायको असण्या नसण्याचा काय संबंध? की अरुंधतीला असे वाटले ..की तो आपल्यालाच (माझी बायको! ) असे म्हणत आहे?
"माझ्याशी आवाज चढवून बोलायचं
"माझ्याशी आवाज चढवून बोलायचं नाही. मी आता तुमची बायको नाही."
मी वर लिहिलंय ते.
अमा ............दोरसानी
अमा ............दोरसानी म्हणजे काय?
Pages