आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरु सकाळी वॉक करून आली, मग आरामात बसून चहा घेतला, मग स्वयंपाक, मग पनवेलला. हेलिकॉप्टर आहे का तिच्याकडे. ईशा म्हणाली तू आज गाणारे, शेवटचा स कुठे गेला, गाणारेस म्हंटलं पाहिजे ना. अरु छान दिसत होती नटून थटून आणि कधी नव्हे ते चेहऱ्यावर दिलखुलास हसू.
सूत्रसंचालन करणारी बाई आयत्या वेळी बदलतात? सोपे आहे का ते. अरुला नाही ना सांगणार सूत्रसंचालन करायला. तीही सर्वगुणसंपन्न असल्यामुळे तेही उत्तम करेल.

शुभ प्रभात"

कार्यक्रमाची लगब ग आहे. इशा गौरी सेल्फी काढत आहेत. मेघना परत राठी बाईना रॅगिन्ग करत आहे. चुका करवणारच इशा पण राठी मॅडम ना चक्क तुम्ही नका न करू अँकरिन्ग म्हणते. पाव्हणे यायला सुरुवात झाली आहे. अरू पण छान तयार झाली आहे. लाल साडी यलो ब्लाउज केसांचा अंबाडा एकदम छान लग्नाच्या वाढदिवसासाठी केलेला ड्रेस मेकप पेक्षा छान आहे .

राठी बाई ना सुलेखा ताईंचा फोन आला आहे आई आजारी असल्याने त्या पुण्याला गेल्या आहेत. आशुतोष मात्र येत आहे. तो येतो मीट क्युट हॅपन्स अरू त्यांना चांगले सुनावते. व पुढे निघून जाते. मग ह्याच्या डोक्यात बल्ब पेटला की हीच अरुंधती जोगले कर आहे. हिचा बिन पाठीचा ब्लाउज अगदी छान आहे.

आजी आबा संजना अन्या रेडी आहेत व निघतात. एवढा धावपळीत अरू ने पूर्ण फराळ बनवून ठेवला आहे.

आजी संजना मध्ये भांडत बसल्या आहेत. आजींना तुम्ही खूप नटल्या आहात असे म्हणते तो आशरम आहे ना.

कट टू राठी मॅ ड म व मेघना ह्या खळे कर शी बोलत आहेत

कार्यक्रम सुरू होत आहे. लोक्स सोशल डिसटन्सिन्ग करून बसले आहेत. हे ऑडि पण आश्रमाचे आहे का? मी महा. चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये काम करत होते तेव्हा त्यांची दोन सभागृहे होती व त्यांचे रेंटल हे महत्वाचे उत्पन्न होते तसे असेल.

राठी बाईंचे ओपनिन्ग भा श्ण चांगले झाले मोठ्या लोकांना दीप प्रज्वलन करायाला बोलवले आहे. तेव्हा संजनाला हा तोच बिल्ड र असल्याचे डोक्यात स्ट्राइक होते.

दीप लावून झाल्यावर ही खळे कर अरू कडेच बघत स्टेज वर थांबतो राठी बाई त्यांना प्लीज सिट सांगतात. नजरे मिली प्यार हो गया.

कार्यक्रम सुरू होतो.

प्रोमो: कार्यक्रम पार पडतो. व अरूचे गाणे पण छान होते. उभे राहूनच आहे. बसून रागदारी टाइप नव्हे. व खळेकर त्यांचे कौतूक करतो.
आता बाकि च्यांच्या रिएक्षन उद्या!!! दीपोत्सव मध्ये वेगळेच गुलाबी फटाके फुटलेत जणू. ये. पुराने आशीक झिंदाबाद.

Ho glasses oversized aahe. They have tried to give him hipster/ mod look. But hair is terrible

मग ह्याच्या डोक्यात बल्ब पेटला की हीच अरुंधती जोगले कर आहे. हिचा बिन पाठीचा ब्लाउज अगदी छान आहे. ------------- हे वाचून फुटले lolzzz

तीन लग्नाळू मुलांची आई टिपिकल फिल्मी कॉलेज गर्ल सारखी वागतेय. And so out of character of Arundhati.
संजना त्याच्या मागे त्यांच्या घरी जाईल बहुतेक

अरु छान दिसते लाल साडीत पण तिचा लुक चेन्ज केला की तिच्या वागण्यात क्रुत्रीमता येते, केळकरच्या भुमिकेतला हिरो तेवढा काही लहान वाटत नाहिये.

तीन लग्नाळू मुलांची आई टिपिकल फिल्मी कॉलेज गर्ल सारखी वागतेय. And so out of character of Arundhati. >>>>>>>> अगदी अगदी. ते केळकरशी भाण्डण अनपेक्षित होत अरुकडून. मला वाटल आता ही म्हणेल , " सॉरी हा, चुकून धक्का लागला तुम्हाला. माझ लक्ष नव्हत. " पण झाल उलटच. सन्जना किव्वा इशा अस बोलली असती तर गोष्ट वेगळी होती.

आणि ते देविकाला ' अमुक रस्ता डावीकडे, तमुक पुतळा' उजवीकडे' सान्गण्यापेक्षा सरळ तिला पत्ता एसेमेस करायचा ना.

कट टू राठी मॅ ड म व मेघना ह्या खळे कर शी बोलत आहेत >>>>>>> मेघना खळेकरावर फिदा झाल्यासारखी वाटली.

तेव्हा संजनाला हा तोच बिल्ड र असल्याचे डोक्यात स्ट्राइक होते. >>>>>>> फोटो बघितला होता ना त्याचा नेटवर. मग समोरच बसलेला तरीही हिच लक्ष नव्हत. राठी मॅडमने अनाऊन्समेण्ट केल्यावर हिच्या डोक्यात टयूब पेटली.

शुभ प्रभातः

भाग ५०२: कार्य क्रम छान पार पडतो. अरुचे गाणे खरंच मस्त गायली आहे. परत ऐकण्या सारखे आहे. आशु खळेकर ते गाणे रेकॉर्ड करून घेतो.
देविका आशु व अरु ह्यांचा कॉलेजचा गृप आहे.

अरूचे सर्व कौतूक करतात अगदी अन्या पण छान गायलीस छान दिसतेस म्हणतो. संजना मेजरली जेलस

मग गाण्यां नं तर देविका व अरू ह्यांच्या गप्पा होतात. अरू त्यांची सर्वांषी ओळख करून देतात आशू आपण हूनच मी अरुंढतीचा मित्र अशी अन्याची ओळख करून घेतो. तो एक्स हसबंड आहे अशी ओळख करू न् देते पनवती व मी संजना आणि आता अन्याची बायको अशी ओळख करून लगेच प्लॉट विकायची बाते करतो. आशु तिला कट करतो. मैत्रीणीं शी बोलतो व तिला कट करून अरू देविकाशी गप्पा मारायला पुढे होतो.
स्ण्जनाची तर नाक कटगयी बाप.

आजी आजो बा पण ह्या नव्या बदलले ल्या संकल्पनेने एकदम गोंधळलेले आहेत.
इथे भाग संपला:

प्रोमो मध्ये आशू म्ह णतो मी तिचे गाणॅ व तिला विसरणे शक्यच नाही. हे देविका समोर. अन्या संजना खोलीत हा तिचा मित्र वगिअरे बोलत आहेत तर अन्या उखडतो मित्र वगैरे नाही गं आता त्याच्या पुरुषी अहंकाराला ठेच पोहोचली आहे कारण नवा बेटर तरूण व श्रीमंत प्रतिस्पर्धी अचानक त्याने टाकून दिलेल्या स्त्री साठी उभा राहिला आहे.

तेच ना, चांगली तयार झालीये आणि समोर हीरोची एन्ट्री म्हणून लगेच character change? , एरवी स्वत:च सतरा वेळा सॉरी सॉरी म्हणुन बाजूला खिसकली असती.

आणि अरुचे सोलो गाणे कसे काय आता, उगच बळेबळे हीरोवर इम्प्रेशन म्हणून? त्या बायकांकडून गाणे बसवून घेत होती त्या कुठे आहेत ?

आशुतोष आपल्या कॉलेजात होता आणि मित्र होता हा साक्षात्कार अरुंधतीला कधी होतो?
की कालचं भांडण खोटं होतं?
आणि हिचं कॉलेज शिक्षण अर्धवट राहिलाय ना? नक्की किती वर्षं होती कॉलेजात?

तो सु अरु पेक्षा लहानही वाटतो... दुसरा जरा बरा हिरो घ्यायला काय झाले यांना....? सुबोध भावे खूपच गोड दिसला असता...पण परवडत नसेल...मग हा ... गरिबी हटाओ कार्यक्रम वाटतो....

गरिबी हटाओ कार्यक्रम वाटतो....>> Lol चांगलाय तो दिसायला , पण तो चष्मा काहीतरीच दिलाय तेवढा बदला म्हणावं, तिच्यापेक्षा लहान दिसला तरी चालेल.

आशु खळेकर ते गाणे रेकॉर्ड करून घेतो.>>>> Lol
स्ण्जनाची तर नाक कटगयी बाप>> Lol अमा तुम्ही जबरी लिहीता, वाचता वाचता मधेच फुटायला होतं‌.
हो तो अनुपमा चा हीरो भारी आहे एकदम.

आशु खळेकर ते गाणे रेकॉर्ड करून घेतो.>>> को संगित क्षेत्रातही काम करतो ना, मग अरूधतीला मोठी गायिका करेल.

चान्गला आहे की हिरो,मराठमोळा वाटतो.चश्म्याची फ्रेम फारच मोठी दिलिये.
पण समिर धर्माधिकारी,मिसो अजुन सुट झाले असते.
अनुपमा मधला हिरो अगदी हिरो मटेरियल आहे आणि तो नक्किच लहान वाटतो.

मला ओंकार गोवर्धन आवडतो. हिंदीतला हिरो जास्त छान आहे मात्र. ओमकार अभिनय छान करेल. हिंदीतला माहीती नाही कसा करतो.

मला अरुसाठी स ध, रा शृंगारपुरे जास्त आवडले असते म्हणा. उगाच माझं, बघत नसताना, हाहाहा.

संजनाचं पात्र फार obviously आणि अनावश्यक रीत्या निगेटिव्ह आणि मीन केलेलं आहे. याचा अर्थ तसं केल्याशिवाय अरुंधती चांगली दिसणारी नाही असं यांना वाटत़ंय.

शुभ प्रभातः

भाग ५०३: लोक्स कार्यक्रमावरून घरी आले आहेत. संजना खडूस गिरी करत आहे. मुले खळेकर चे कौतूक करत आहेत. तर अन्या इन्सेक्यु अर होत आहे. तो सर्वां ना उठा झोपा करतो उद्या त्याला दिवाळीस पण ऑफिसात जायचे आहे.

अरू व गौरी सोफा चा बेड करून चादर घालू झोपायच्या तयारीत आहेत खूप थकल्या आहेत. गौरी मुळातच छान स्वभावाची केअरिन्ग दाखवली आहे ती सासूला दूध हळद हवी का पाय दुख् ताहेत का वगैरे विचारते तरी निदान. त्या कार्यक्रमाचा आढावा घेत आहेत.

चांगल्या अन नॅचरल गप्पा दाखवल्या आहेत.

अन्या संजना बेडरूम मध्ये: नव्या असंतोषाची बीजे रोप ली जात आहेत. खंन्ग्री मॅन लाडू चिवडा खाउन हुषार झाला आहे. संजना आशुतोष चे कौतूक करत आहे तर अन्या लगेच जेलस झाला आहे. संजना लगेच ह्या कॉलेजातील मैत्रीचा आपल्याला फाय्दा कसा होईल हे बघत आहे.
तेव् ढ्या सीन साठी संजना ची हेअर स्टाइल बदलली आहे व झोपायच्या आधी पण पफ केलेलं आहे केसांम ना. अजून एक मेंदू असलेले एक क्यारेक्टर कार्टून मध्ये आसतो. मोजो जोजो हा पावर पफ गर्ल चा व्हिलन त्या सारखे दिसत आहे.

अन्या ला आठव ते की देविकाने त्याचा उल्लेख केला होता.

देविका कडून आशू अरुची माहिती घेत आहे. २६ वर्शानंतर त्याचे ती सध्या काय करते चालू आहे. देविका त्याला सर्व अरू अपडेट देते.

अरू झोपली आहे पण तिला जुन्या आठ्वणी येत आहेत. अन्याने दिलेली वागणूक व पुढचा लढा. इथे चांगला बासरी व कोरस आहे. तर यश चा फोन येतो तो लंडन मधे असल्याने काळे जॅकेट घालून आहे. अरूला फोन वर रडूच येते. तिला त्याची आठवण येते आहे

आशू देविकाला क्लीअर करतो की मला अरूला आधार व्गैरे नाही द्यायच पण तिचा मित्र व्हायला आवडेल.

इथे भाग संपला.

प्रोमो: अरू डबे घेउन पहाटेशी तयार होउन येते आजी वि चारते तयार होउन आलीस का तर ती म्हन ते हो. आज काही मला ह्यांना मुलांना उटणे लावायचे नव्हते . खंग्री मॅन एक फटा का ढ्याव सोडतो. आजी आबा चेहरे दाखवले आहेत.

आता उद्या रम्य दिवाळी पहाट व प्रेमाचे फटाके उडायला सुरू होतील. इर्शाद इर्शाद.

सोफा चा बेड >>>>>> तो सोफा कम बेड छान होता. आवडला.

गौरी मुळातच छान स्वभावाची केअरिन्ग दाखवली आहे >>>>>>>> हि सु अरुच थर्ड व्हर्जन आहे. दुसरी सु अरु अनघा.

2000

Pages