Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Dorra is big biss saheb
Dorra is big biss saheb jamindar type in telugu. His wife is dorsani. some type of women get high status and social respect just because they are married to a high status man esp like zamindar malgujar mamledar collector district magistrate etc. They are dorsani . It is a regular word not used in a derogatory sense.
Like this anagha parents are
Like this anagha parents are genuine rich and nice they don't understand that other people can have hidden stories and agenda.
अच्छा.
अनुपमा सारखच् चालु आहे सगळं,
अनुपमा सारखच् चालु आहे सगळं, फक्तं तिथे यशच्या गर्लफ्रेंडचा एक्स येतो.
तिथली सासु तर असह्य आहे, कंचन निदान कधीकधी दिसायला प्रेमळ दिसते .
मी बघायचे अनुपमा अधेमधे पण ज्या दिवशी टिझर पाहिले कि अनुपमा पार्टनर्/एकतर्फी लव्हरला सांगते कि मी उद्यापासून कामाला येणार नाही, मला माझं करिअर मला कुटुंबाच्या आनंदापेक्षा प्रिय नाही तेंव्हा पासून बघणे बन्द केले, बियाँड अनबिअरेबल..
कांचनचा स्वभाव इतका भयानक
कांचनचा स्वभाव इतका भयानक असुनही तिच्या अप्रुवलसाठी सगळे किती आटापिटा करतात:(. संजनाही.
Kanchan belongs in Panvel
Kanchan belongs in Panvel ashram
हाहा , और ये लगा सिक्सर ...
हाहा , और ये लगा सिक्सर ... फारच स्वार्थी , दिडशहाणी, मतलबी बाई आहे ती.
Dorra is big biss saheb
Dorra is big biss saheb jamindar type in telugu >>> याचा उल्लेख लक्ष्मण तांबोळी यांच्या आत्मचरित्रात आहे अस आठवतंय, ह्या लोकांच्या त्रासाला कंटाळून (दोरा) त्यांचे पूर्वज सोलापूरला पळून आलेले. वाघाशी लढाई वगैरे करायला लावायचे काहीजण जीवंत माणसांना. तसे त्यांच्या पणजोबा का कोणाला निवडले होतं, म्हणून रात्रीत ते पळून आले.
अरुंधती एवढे का ओरडली संजनावर
अरुंधती एवढे का ओरडली संजनावर. एकतर संजना बरोबर होती. अरुला काहीच माहिती नाही अविनाशच्या पैसे प्रकरणाबद्दल. दुसरी गोष्ट म्हणजे अरु त्या घरातून जायचे नाव घेत नाही. किती चिकट असावं एखादीने. एवढा अपमान होत असतानाही तिथेच राहते, म्हणजे गौरीच्या घरी राहते पण नावालाच. किती ती हौस स्वयंपाक करायची. तिथे म्हातारी आई कुरकुरणारे गुढगे सांभाळत सगळे करते पण अरुला तिची दया येत नाही. खाऊन पिऊन माजलेल्या एक्स सासुसाठी केवढा जीवाचा आटापिटा. संजनाने ओरडायला हवे अरुवर की बाई जा एकदाची, चिवडे बिवडे सगळं मिळतं बाहेर विकत, आम्ही आणू आणि खाऊ.
तरी मी अरुला ऑफर दिलेली
तरी मी अरुला ऑफर दिलेली डोंबिवलीत राहून पोळी भाजी केंद्र काढ. आईकडेही थोडं लक्ष देता येईल आणि तिच्या हातची चव आम्हाला चाखायला मिळेल आणि तिलाही चार पैसे मिळतील. रिसपेक्टही मिळेल. आईच्या घरात राहून करता येईल की मग मसालेवाले बाईसारखा बिझनेस वाढत जाईल. मोठं दुकान घेईल डोंबिवलीत.
अरुच्या ऑफिसमध्ये एक लग्न न
अरुच्या ऑफिसमध्ये एक लग्न न झालेली तरुण बाई दाखवलिये. ती आश्रमात वाढली आहे. पहिला विचार आला की बर झाल अरुला अजुन मुलगे नाहियेत. नाहितर लग्न लावुन टाकल असत तिने काही न बघता.
तिथे म्हातारी आई कुरकुरणारे
तिथे म्हातारी आई कुरकुरणारे गुढगे सांभाळत सगळे करते पण अरुला तिची दया येत नाही. >>+१ + तिकडे एकट्या भावाला घर सांभाळावे लागते, त्याचे लहान पोर आईविना वाढते आहे. याचेही अरूला काही पडले नाही.
तसे ती कधी बोलत नाही पण त्यासाठी थांबली असेल. शिवाय संजनावर नजर ठेऊन वेळोवेळी तिला झापता येते व अन्यावरही आवाज चढवता येतो हा आनंदही मिळतो.
याघरात विमल काम करते शिवाय संजनाने कामासाठी दुसरी बाईही ठेवली होती(तिला पळवून लावले). आता अनघा येईल घरात ती बघेल. शिवाय गौरी समोरच राहते. ती सुद्धा वेळेला मदत करू शकते. मुलांचा काकाही अधून मधून स्वयंपाकाला येतो. पण अरूला हे घर सोडवत नाही हेच खरे.
खाऊन पिऊन माजलेल्या एक्स सासुसाठी केवढा जीवाचा आटापिटा. >>> त्यांनी तिला अर्धे घर दिले आहे
मलाही कळत नाही अरुचा काय एवढा
मलाही कळत नाही अरुचा काय एवढा चिकटपणा आहे साबा-साबुसाठी,आधि ठीक होत,मॅरिड होती त्याच घरात राहिली,सन्सार टिकवायला वैगरे त्यागमुर्ती बनुन केल सगळ आता खरोखर कशासाठी करतेय? कान्चनने असख्य वेळा बोलुन दाखवल होत की तुमच्या आइमुळे मला नावडती मुलगी सुन करुन घ्यावी लागली वर त्या अविनाशसाठीच घर टाकले ना तिने गहाण तरी तिच्याशी अबोला धरला होता,तरी ही परत तिच्याच पायाशी.
प्रत्यक्षात अशा सुना नसतातच पण अशा सासवा मात्र असतात.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
भाग ओपन्स विथ संजना आजी आबा वर शहाण पणाचा झोत टाकत आहे अवीच्या कर्जाच्या रिक्वयारमें टची चौकशी करा असे ती सांगते.
उसासे टाकत व्हिहीण गप्पा चालू आहेत. एकदम बासरीचे हळवे सूर चालू आहेत अनघा सिचुएशन चा आढावा चालू आहे. दोरसानी घारात पन
मॅसिव्ह ज्वेलरी जरीची साडी वगैरे. ही अभी अनघा वेगळी राहावीत असा चांगला प्रस्ताव मांडते पण अरू माझी मुलं घर आजी अप्पाला सोडून राहणार नाहीत. ते खूप अॅटेच्ड आहेत. त्यांना वेळ द्या असे म्हणेल. अनघाला सगळे खूप पेर्म देतील असा हवाला देते.
ताई तुम्ही किती धीराच्या आहेत. वगैरे आरती ओवाळते दुरसानी. पर्चंड बोअरिन्ग अरूचे स्वगत आहे
इथे संजना समजवायचा प्रयत्न करत आहे. तर अरू येउन मेजर कन्फरंटेशन. मग अन्या येतो व संजनाचा हात धरून तिला वर घेउन जातो!!
पण हे बेडरूम मध्ये जाउनही भांडण पुढे कॅरी करत आहेत. ती अवी बद्दल संषय पेरत आहे. संजना अरूला नीट बोलायला सांग म्हणते पतीला.
सुंदर काटेरी दुसरी बायको
प्रोमो मध्ये : ती फेमस एक प्रेमळ आई आहे ना झी ५ वर ती ट्रस्टी म्हणून येते. व अरू चे नाव माहीत आहे म्हणाते.
अरू अविनाशा भावोजींची वकीली उसासत करत आहे. आई अप्पांची समजूत घालत आहे.
वर्क लो ड मुळे झेंजरले आहे मी
वर्क लो ड मुळे झेंजरले आहे मी. उद्या एडिट करेन काही चुका असल्यातर.
संजना अनिरुद्धला सांगते -
संजना अनिरुद्धला सांगते - अरुंधतीला माझ्याशी नीट बोलायला सांग. मी अनिरुद्ध देशमुखची बायको आहे.
मग फिरून येणारा नेहमीचा संवाद -
तू माझ्या मागे लागली होतीस लग्नासाठी.
तुला नुसतीच मजा मारायची होती.
त्यापूर्वी काही क्षण - मी आता तुझी बायको नाही. माझ्याशी आवाज चढवून बोलायचं नाही.
एवढा राडा झाल्यावर पुढच्याच क्षणी अरुंधती जिलबी खाता का विचारते.
कडक ट्रस्टीच्या भूमिकेत इला भाटे.
अरुंधती सोबत जुनी ओळख .
हिरीची एंट्री लांबली का...?
हिरीची एंट्री लांबली का...?
एवढा राडा झाल्यावर पुढच्याच
एवढा राडा झाल्यावर पुढच्याच क्षणी अरुंधती जिलबी खाता का विचारते.>> होना.
फोनवरून लिहिताना ऑटो
फोनवरून लिहिताना ऑटो करेक्टच्या चावटपणाकडेच अर्ध लक्ष द्यावं लागतं त्यामुळे नीट लिहिता येत नाही.
संजना म्हणतेय - मी आता मिसेस अनिरुद्ध देशमुख आहे म्हणून माझ्याशी नीट वागायचं. - असं एक्स मिसेस देशमुखला सांग.
त्याच्या जरंसं आधी अरुंधती म्हणते माझ्याशी आवाज चढवून बोलायला मी आता मिसेस देशमुख नाही.
म्हणजे मि. देशमुखांनी मिसेस देशमुख वर आवाज चढवला तर चालतो.
तिकडे करंट मिसेसला वाटतंय मिसेस या पदाला मान आहे तो मला मिळाला पाहिजे.
म्हणजे मिसेस पद असे तो ते मानाचं वाटतं. गेलं की फुकाचं.
जाऊ दे. मला नीट लिहिता येत नाहीए. आणि संजना हे पात्र भयंकर गंडलेलं आहे.
नवीन मॅडम पूर्वीच्या मित्राची
नवीन मॅडम पूर्वीच्या मित्राची आई असणार. त्या मित्राच अजुन लग्न झालेल नसणार
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
आई अप्पा हताश होत्साते बसले आहेत. वादाने भंजाळले आहेत. अरू येउन उसासत आई रात्रीची आरती केलेली नाही. व जेवायची भूक नाही. ती
गरम तूप मेतकूट भात करून पाठवू का विचारते. खरेतर गौरी कडून येताना तो गार होईल म्हणून पिश वीत गॅस व सिलिन्डर वर भाताचे भांडे ठेवऊन आणून आजी आबांसमोर ते उघडायचे व त्यांच्या घ शात तो २०० डिग्री गरम भात कालवून एक एक घास सोडायच तिचा सू प्लॅन आहे.
उस्सुसत आपलं उसासत.
आजी तिला दिवा लावून गाणे म्हणायची विनंती करते. नॉर्मल लोक रेडिओ युट्युब वर गाणी प्रार्थना लावतात अश्या वेळी. पण इथे एक अक्खे कॅप्टिव्ह माणूस मनोरंजना साठी नेमले असल्याने ती पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे आमच्या पिढीला पण आव्डेल असे गाणे म्हणून दाखव्ते. सासून गा ग म्हणले की गायचे एरवी नवरा तंबोरा गॅलरीतून खाली फेकून देतो ते नजरे आड.
नेक्स्ट डे. अरू पिशवीतून इडली घेउन घराकडे येत आहे. अभी येउन काल काय बोलणे झाले ते अपडेट घेतो. ती तो देते ह्यात इडल्या गार होतीन किनाइ गं आण तो ग्यास पिशवीतून.
सु अरू उसासत अभीला अनघाला कायम सुखात ठेव अशी विनंती करते. मग अभी च्या मनातले तिला सर्व कळते त्यामुळे अनघ्याच्या एक्स बद्दल तो सांगतो की सू अरूला सूटेन्शन येते. पण नशीबाने ती सु तलवार घेउन अन घाच्या एक्सच्या मागावर निघत नाही तर पोलिसांची मदत घ्या असे सुचवते. ( समीर वानखेडे अरूस फोन लावा तुरंत)
चांगल्या माणसाची फार परीक्षा घेउ नकोस असे ती तुळशी ला प्रारथना करते. ( पुअर प्लांट ते काय करणार)
आत घरातले संगीत हॅपी हॅपी: इशा ने दूध घेतले आहे कॉफी करुन स्वतः स्वतः हौ ग्रोनप. ( मुलं स्वतः स्वतः ड्रगज पण घेतात क्रूजवर!!! )
ती आई गिरी करून लेकीला कॉलेजात काळजी घेत घरी पण लक्ष दे असे सांगते. अरू साहील कसा आहे हे पण विचारते.
अरू पनवेल ला जायला निघते.
आजी बेडरूम मध्ये दागिने विकायला काढले आहेत ते बघत आहे. अप्पा आपण मुलांनी चांगले संस्कार केले आअहेत अविनाश तसा नाही किती गोड आहे. संजना ने त्यांच्या डोक्यात शंका पेरली आहे त्यामुळे म्हातारी रडकी झाली आहे. हे आपल्या सुनांचे नातीचे व नातसुनांचे स्त्री धन आहे.
त्याला हात लावायचा नाही असे सुजाण पेट्रार्की सांगते जे आजी ऐकते
कट टू पनवेल : अरू आली आहे. राठी बाई संचालिका ह्यांची ओळख होते. अरू त्यांना पण सु नमस्कार करते. यस्स इला भाटे ह्यांची function at() { [native code] }यंत पावलो पावली इरिटेटिन्ग एंत्री झालेली आहे. सर्व शक्तिमान अश्या सुलेखा ताई सर्वे करायला आल्या आहेत.
कामकाजाची चौकशी करते. इरिटेटिन्ग इला!! बजेटची चौकशी करते दीपोत्सवाच्या. ते पाठ्वू न देइन असे संचालिका ताई सांगतात.
सुरेश व चंदा ह्या नव्या नोकरांना इइ बोलवते व माहिती विचारते. ह्यांचे चिल्लर करप्सन इ इ शोधून जाब विचारते.
प्रोमो : अरू गाणे शिकवत आहे. व इइ तिला बघते. तिला अ जो हे नाव माहेत आहे म्हणे.
एक नंबर अमा......keep it up.
एक नंबर अमा......keep it up.
बहुधा मानसी मगिकर ने सोडले
बहुधा मानसी मागीकर ने सोडले असावे..म्हणून इला भाटे! तिचा आश्रमातला रोल वेगळा ठेवला की झाले!.. आता ट्रस्टी!
मानसी मागीकर संचालक होत्या.
मानसी मागीकर संचालक होत्या. आता संचालक बाबीही बदलल्या. उदा भाटे ट्रस्टी वाटल्या. सर्प्राइज इन्स्पेक्शन करायला आल्यात.
दूरदर्शनवर एका राष्ट्रीय
दूरदर्शनवर एका राष्ट्रीय शोकाच्या वेळी असे सुधीर फडकें पराधीन आहे जगती हे गाणं गायले होते.
हे गाणं ऐकलं की मला सुतकाचंच फीलिंग येतं.
गीत रामायणातील आहे ना? कोणत्या प्रसंगी?
सुलेखा केळकर- त्या बिल्डर
सुलेखा केळकर- त्या बिल्डर आदित्य केळकरची आई- आदित्य केळकर अरुचा पुर्वाश्रमीचा मित्र.
साहिलने आई सिरियल सोडली, सध्या तो सन मराठीच्या ' बाबा' ( आस्ताद काळे) सिरियलमध्ये दिसतोय. हिरो झालाय तिकडे.
मानसी मागीकर माझी तुझी रेशीमगाठमध्ये आहेत.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
भाग ४९६: इइ बाई करप्क्षन उघडीस आणले आहे. चवकशी चालू आहे. खंग्री मॅन ला दुसरे ग गिरहाइक मिळाले आहे. १/३ भाग ह्यातच चालू आहे. चिल्लर करप्शन. आता फर्दर टाइम पास सु अरू हम को मन की शक्ती देना गाणे शिकवत आहेत. ताई आश्रमातील बायकांची डिटॅ ल वारी चौकशी करत आहेत. एकदम गौरी देशपांडे मुक्काम फील्स. तिथेही मेजर ट्रस्टी सुलेखाताईच आहेत. सु अरू व सुलेखा ताई ह्यांची ओळख होते. इ इ एकदम इंदिरा गांधी मोड मध्ये आहे.
सू अरू तिचे उसासत धन्यवा द म्हणते. व त्या किती छान आहेत म्हणते. सुलेखा ताई आपल्या ट्रस्ट ची शान आहे असे बायका म्हणतात.
आजी आबा जेवत आहेत. संजना येते व सूप करते आहे व चीज सँडविच पण बन्वते आहे. इशा येते व एक सँदविच आणि सूप मी पण घेइन म्हण ते. ती चिल कूल नाइस डंबो हे ते टीन लेंगवेज शब्द वापरून कळ वते की तिच्या मैत्रीणी येणार आहेत. मैत्रीणी घरी येणार त्यांचे खाणॅ
बघायला ती आईला फोन करते व तू कधी येणार विचारते. का तर मैत्रीणींचे खाणे पिणे बघायला. हिला आईच पाहिजे आई म्हण ते जरा उशीर होईल म्हणोन पण ही चार परेन्त पोहोचायचे म्हणते मुलीच्या मैत्रिणींसाठी अरू भेळ पाणी पुरी करायचे ठरवते.
ऑफिसचे पण प्रेश र आहे. हा जॉब ठी क पण बोर्ड मीटिन्ग हे ते किंवा आमच्या सारखे बॅक ऑफिस जॉब असले तर ओव्हर नाइट पण काम करावे लागते सॉफ्ट वेअर रिलीज असले तर. असे घरी पार्टी साठी स्वयंपाक् करायला कसे निघून येता येइल
इ इ तिला बोरीवली हायवे परेन्त सोडायची ऑफर देते व त्यामुळे राठी बाई जरा नाराज होते.
संजना आता घर विकायच्या मोड मध्ये आहे. कशे ही करून!! काय सुपर पनवती आहे.
त्या साठी ती आई अप्पांना पटवायचं तर पहिले मुलांशी बोलले पाहिजे असे ठरवून प्लांन सुरू करेल.
इ इ हिची चौकशी करत आहेत
इथे भाग संपला
प्रो मो: मध्ये मैत्रीणी आल्या तरी आई पोहोचलेली नाही( व्हॉट सिन) मग संजना आंटी चाट मागवते होम डिलिव्हरी. व काम होते.
अरू घरी आल्यावर लेफ्ट ओव्हर बघून वैतागते. संजना गप्प आहे व स्मगली बघते.
काल २० वर्षांची घोडी- गवंडी
काल २० वर्षांची घोडी- गधडी स्वतः: हून दुदू प्याली, लग्नाळू मुलगा बिलं भरतो म्हणून त्यांचं कौतुक.
बाळीला भेळ, पाणीपुरी बनवता येत नाही? किंवा स्विगीवरून मागवायचे माहीत नाही.
आजोबा टुणटुणीत आहेत. स्वतः:ची औषधं स्वतः: जाऊन आणू शकतील.
घटस्फोट होणार हे किमान सहा महिने आधी माहीत असताना ही कामं त्यांची त्यांना तयार करायला हवं होतं. खरं तर आधीपासूनच.
पण मग आई कुठे काय करते ते याचं उत्तर बदलावं लागलं असतं.
चीझ सॅंडविच हेल्दी फूड आहे का?
राठी बाईंना डच्चू देऊन अरुंधतीची तिथे स्थापना होईल का?
बिल्डर केळकर समोर मोठाच पेच येणार. मैत्रिणीच्या भावनांसाठी प्रोजेक्ट स्क्रॅप करायचा.
मग आई कुठे काय करते ते याचं
मग आई कुठे काय करते ते याचं उत्तर बदलावं लागलं असतं. > हो ना. आईला ग्रेट दाखवण्यासाठी बाकी सर्व कथा तयार केलेली वाटते.
ती तितकी चांगली सुगृहीणी नसती आणि संजना जरी गुणवान असती , तरी ही इतकी वर्श अशी फसवणूक चूकच. हा फोकस आवडला असता.
पराधीन आहे जगती फार सुरेख म्हट्ल आहे अरू ने .
हे गाणं ऐकलं की मला सुतकाचंच
हे गाणं ऐकलं की मला सुतकाचंच फीलिंग येतं.
गीत रामायणातील आहे ना? कोणत्या प्रसंगी? >>होय. भरत रामाला परत घेऊन जायला येतो तेव्हा श्रीरामाला दशरथाच्या निधनाची बातमी कळते. त्यावेळी भरताची समजूत काढताना रामाच्या तोंडी हे गीत आहे. (https://www.aathavanitli-gani.com/Song/Paradhin_Aahe_Jagati)
मला आवडते हे गीत. Very poignant and somber.
Pages