आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अविबद्दल सस्पेन्स ठेवलाय का? हाणा मेल्यांना. >> काही कळत नाहीये, जॉब जातोय की राहतोय ! बायको नाहीच आहे सध्या ती रमलीय अजून ही मध्ये. ह्याला ही कटवला तर अरुची आणखी वाट लागेल पैसे उभे करताना

हो ना..मला स्वप्न दृश्य दाखवलं की जाम राग येतो.....खूपच संताप येतो. Taking us for granted.....!
Angry
कैच्याकैच!
अविनाश fraud आहे

त्याची बायको रेशीमगाठमध्ये आहे, बरसातमध्ये नाही.. स्वप्न दृष्याचा मलाही राग आला. सरळ सांगा ना तो खोटारडा आहे म्हणून. घर जायची वेळ आली तरी अरुची अकड काही जात नाही. ईशा कधी मोठी होणार. अजूनही पिझा, कोल्डड्रिंक दिलं की खूष होते ती. ते खाणं एवढंही नव्हतं उरलेले की एक कुटुंब जेऊ शकेल, अरुचं आपलं काहीही. कांचन पैसे तर उभे करणार नाही पण दुसऱ्याला जज करण्यात पुढे.

हॉटेल असोसिएशनवाल्यांनी अरुंधती वर केस करायला हवी - हॉटेलातले पदार्थ कधीचे केलेले असतील काय माहीत.

उद्याच्या भागात सगळी देशमुख फॅमिली दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला जाणार आहे. संजना संकट

एक मोठी गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली. त्याचा फटका बसला . तरीही अरुंधतीला अक्कल आलेली नाही. अविनाश गायब आहे हे घरी सांगायचे नाही.

शुभ प्रभातः

भाग ४९९: संजना अन्या कंपनी सुरू करायच्या प्रयत्नात आहेत. डिस्कशन चालू आहे. बिझने स चालू करायचा प्रयत्न आहे. सध्या आशुतोष केळकर ह्याची माहिती जमव्णे चालू आहे . तो म्युझिक अल्बम पण काढतो. गूगल सर्च करत आहे संजना व शी इज मैटी इमंप्रेस्ड.

हिला मोठा मासा दिसल्याने लाळ गळत आहे सध्या.

आई अप्पा इशा लंडनला जायचे प्लॅनिन्ग करत आहेत मजे मजेत. अन्या बाहेर जायला निघतो. तर इशा थांबवते तर तिला रागवतो उद्या अरूचा कर्र्यक्रम आहे तिथे जायचे का ते हा बघू मी काही गॅरंटी देत नाही व्गैरे बोलून जातो. ऑल वेज हाय अँ ड मायटी. अरू ऑफिसात व मग तिथून पनवेल ला जा यचा प्लॅन आहे. पण त्या आधी सर्व स्वयंपाक करून किचन मध्ये ठेवला आहे.

संज ना इज रीलेंट लेसली पुटिंग डाउन अरु व अवि. कृत घ्न मेली.

तर इक डे एच डी एफ सी एटीम चे संगीत वाजले अगदी मुहूर्तावर( सॅलरी क्रेडिट झाली ( माझी) !!!) तर मागे वळू बघितले तर अवि एक बॅग घेउन आला आहे इन शॉर्‍ट त्याचे व संजना चे एक कन्फ्रंटेशन होते. पण तो संयम राखून तिला मेडम्चा म्हणतो. तिची मोडस ऑपरेंडी म्हणजे घट्ट नात्यांमध्ये वार करत करत करत लोकांना एकटे पाडायचे. व व्हलन्रेबल करून त्यांचे अ‍ॅसेट काढून घ्यायचे. अशी माणसे अग्दी बघितली आहेत जवळून .

त्याने निलीमाच्या वडिलांची वसई ची जमीन विकून आठ लाख आणले आहेत. अप्पा त्याला सल्ला देतात. व तो ही आपले सर्व डीलिन्ग अप्पांना समजावून उघड करून सांगायचे ठरवले आहे. हीच सावकार असल्यासारखी असल्यासारखी बाकीचे कधी देणार विचारते.

ती लगेच भांडायला च निघते अरे तुरे करून बोट दाखवून पैसे मागत आहे व खडूस कमेंत पास करत आहे.

तिचे आरो प ऐकून आई अप्पा पण विचलित झाले आहेत.

कट टू ऑफिस : कार्यक्रमाची पूर्वतयारी भरपूर उत्साहात चालू आहे.

प्रोमो मध्ये: अरूच्या कार्यक्रमाला कसे जायचे ते प्लानिन्ग चालू आहे. व तिला गायचे टेन्शन आले आहे.

पन हे चांगले होणार तिथे आशुतो श केळकर तिच्या जुन्या ओळखी चा संदर्भ देणार . ई ई तर सून करून घ्यायला टपलेलीच आहे.
कुठे मिळ तात असले लोडेड एक्स बॉय फ्रेंड एकत्रफा प्यार करने वाले?! मी टिकलीचे पाकीट पण आणले आहे.

अनिरुद्ध आणि संजनाने आपापली नेट वर्थ ( आर्थिक) एकमेकांना सांगितलेली नाही. नोकऱ्या मिळेपर्यंत खर्च कसा चालवतात त्यावर बोलणे नाही. आता बिझिनेस काढणार तो बंगला विकून येणाऱ्या पैशांत का?

आला का अविनाश.?आणखी एक महाराडा होता होता वाचला.

कालच्या भागातला आशिष कुलकर्णीचा अभिनय चांगला होता. नेहमीसारखा ओरडत नव्हता. अरुंधतीचा फोन आला तेव्हा लगेच चेहरा हसरा केला.

लंडन कुठून पैदा केलं काल?

आशुतोष केळकर म्युझिक अल्बम काढतो म्हणजे यश आणि अरुंधती की तो निकल पडी. अरुंधती अगं अगं म्हशी म्हणत गाणी रेकॉर्ड करेल.

हल्ली जागा विकून फक्त ८ लाख येतात? कमाल आहे. आणि अव्याचं घर विकत ख्यायला शेजारी वाट बघतोय तर हा बाहेर गिर्हाईक शोधत कशाला फिरतो येडपट.
केळकर मॅन एकंदरीत तारणहार असणार. अरूला पैसे देणार, यशचं करीयर बनवून देणार... व्वा!

बंगला विकून येणाऱ्या पैशांत का?>. बंगल्याचा हाफ शेअर तो विकून संजना अन्या निखिल ला एक् फ्लॅट प्लस ह्यांना कॅश पण मिळेल. असा होरा आहे. वसई जव्ळ जमीन म्हणजे सोन्याचाच तुकडा. इथे आठ लाख दिले असतील. कर्ज भागवूनही उरतील. त्या शेजारच्या बाईला फ्लॅट हवा होता भावा साठी तो विकून देता येइल व अवि निलीमा पण बंगल्यावर.

कर्ज आधीच मागवलं ना? अरुंधती ने दिलेल्या पैशांतून.

मराठी मालिकांच्या लेखकांचं सामान्यज्ञान . त्यात आठच लाख बसले.
अप्पा आई, अनिरुद्ध, केदार आणि त्याची बायको मिळून २५ लाख सहज उभे करू शकले असते. एवढं सेव्हिंग असायलाच हवं.
तर तो केदार पण जमीन विकतोय आणि कर्ज काढतोय.

आशिष कुलकर्णी कोण?
आजही आशुतोष दाखविलाच नाही का?
अमा, लोडेड बॉय फ्रेंड्स फक्त सिरीयल्स मधे असतात....!!
प्रेमळ, हँडसम, नायिकेचा गावंढळपणा, बावळटपणा, सगळं सगळं आवडणारे.....

केदारी.. Lol
पण मला आवडतो तो.
आठ लाखाची सोय झाली...आता सतरा कसे जमविणार?

ईशाचे वय चुकीचे दाखविले आहे. पिझ्झा, सॅंडविच देऊन तुझ्या मैत्रिणींचे फ्लॅट किती भारी असतील एव्हढे बोलले कि लगेच मन बदलले तिचे.
घर पाडून बिल्डींग तयार होऊन फ्लॅटची चावी हातात पडे पर्यंत लग्न होईल तिचे. तिला काय फायदा त्याचा?

तिचा डोक्याचा भाग रिकामा आहे सो एवढा पुढचा विचार नाही करु शकत ती, तिला वाटतंय आपण आज जन्मलो आहोत आणि कायम इथेच राहणार आहोत.

आता ते अरुचं जवळपास प्रत्येक भागात किमान एकदा तरी 'आई अप्पांना ह्या वयात' हा डायलॉग प्रचंड भयानक डोक्यात जातोय. सगळ्या जगाची तारणहार हीच आहे जणू. अगं बाई काही होत नाही त्यांना, तुझ्यापेक्षा खुप जास्त जगून आणि पाहून झालंय त्यांचं आता, तरी टुणटुणीत आहेत आणि राहतील. तू जे काही अति आणि निरर्थक काळजी करत जळवासारखी चिकटून बसलीस त्या घराला, तिथून निघ आधी आणि तुझं तुझं बघ. जाऊदेत, मी का पालथ्या घड्यावर पाणी ओततेय ..

आणि अरु ने ते पिझा वगैरे उरल्या बद्दल जरा जास्तीच कांगावा केला...
एव्हढे लेक्चर काय द्यायचे प्रत्येक वेळेस!
हिचा काय स्वयंपाक अगदी अचूक होतो का रोज?

आणि अरु ने ते पिझा वगैरे उरल्या बद्दल जरा जास्तीच कांगावा केला... >>>>>>>>>> अगदी अगदी. बाहेर मित्र- मैत्रिणीन्ना न्यायच नाही, जी काही मज्जा करायची ती घरात. बाहेरच काही मागवायच नाही. वरुन अन्न वाया जातय म्हणून लेक्चर दयायच. ईशाला आणि तिच्या मैत्रिणीन्ना प्रायव्हसीची गरज असते हे तर अरुच्या गावीच नाही. बाहेरच जग असुरक्षित असत ना.

यश किव्वा अभिचे मित्र घरी आलेले अरुला बर चालत. हल्ली कोणाचे काय हेतू असतील ते सान्गता येत नाही.

आई अप्पा इशा लंडनला जायचे प्लॅनिन्ग करत आहेत >>>>>> इथे ह्यान्च्या धाकटा मुलगा कर्जात बुडालेला आहे आणि ह्यान्ना लंडनला जायचेय. सन्जनाचेही तेच, जॉब हातात नाहीये आणि हिला सिन्गापूरला जायचेय.

यश किव्वा अभिचे मित्र घरी आलेले अरुला बर चालत.>>> त्यांचा एकही मित्र घरी आलेला दाखवला नाही.
बुडालेला आहे आणि ह्यान्ना लंडनला जायचेय.>>>+१

शुभ प्रभातः
भाग ५००: अव्वी चे रड गाणे चालू आहे.

\कट टू ऑफिसः ही उगीच जास्तीचे फायली घेउन कामे करत बसली आहे अमेरिकेची प्रेसि डेंट आहे . प्युन शी गप्पा करत आहे. उद्या लवकर निघयचे तर मला सगळॅ स्वयंपाक पाणी करून निघावे लागेल. जाताना मी डबा घेते आपण नाश्टा करू. म्हणते. किती तो स्वयंपाक उत्साह.

नेक्स्ट डे: अप्पा चहा करतात्त व तिला देतात. ही काळजीने आई ची तब्येत बरोबर आहे का विचारून. आजीला अविनाशची काळजी आहे. ती उसासे टाकत सिचुएशन चा function at() { [native code] } आ ढावा घेत आहे. इशा सॉरी इशूडी आली आहे. लाडे लाडे इशा व गौरी आई बरोबर जाणार आहे. त्या आईला नटवणार आहेत. आश्रमात कार्यक्रमाची कामे पण करवणार आहे ती. मुलींकडून.

आईचे टेन्शन बघुन मुलीला हसू येतो आहे.

कट टू अन्या संजना: संजना अन्यावर पुढे जायचे प्रेश र टाकत आहे. नितिन शहा बरोबर फॉलो अप घ्या म्हणते. आता ती केळकर ला फोन
कर णार आहे. संजना अरू च्या कार्यक्रमात तिची काय मजा होईल् ते गंमत बघायला टी पी म्हणून जाणार आहे कार्यक्रमाला.

कट टू आश्रमः इशा गौरी अरू आल्या आहेत. तयारी चालू आहे. मुलींचे टॉप्स छान आहेत. अरू आपलाच आश्रम असल्याच्या थाटात ओळख करू न देत आहे. तीन चार लोकांना मुलींची तीच तीच ओळख करून देत आहे. मेघना गौरीची मदत घेत आहे.
मजेचे वातावरण आहे. मुली कृ श्णा ला स्टँड अप कॉमेडी करायचा सल्ला देत आहेत. कार्यक्रमाची रूप्रेषा सिंहावलोकन चालू आहे. राठी बाई सूत्र संचालन करणार आहेत.

मेघना राठी बाईला उगी कन्फुजि करत आहे.

इथे भाग संपला;

प्रोमो मध्ये मीट क्युटः हिरो कार मधून उतरून फोन वर बोलत बोलत आत येत आहे त्याची अरूशी टक्कर होते. व तिच्या हातातला फोन पडतो.
तो फोन उचलून तिच्या हातात देतो. ती छान नटली आहे. लाल साडी झुमके केसांचा शोभिवंत अंबाडा व चेहरा पण हसरा आहे. ती त्याच्या कडे बघ ते. ..... प्यार हो गया प्यार होगया. स्कूटर को साइड कार मिलगया.

टक्कर होऊन प्यार? तोच जुना फॉर्म्युला?
तिथे कांचन संजनाची टक्कर झाली तर वॉर झालं.
यांचे फोन फुटत का नाहीत?

स्वयंपाक उत्साहाला नावं ठेवू नका. त्याचं कौतुक करायची ट्रेंड आहे. सुरुवात कशीही करा, शेवट अन्नपूर्णा स्तवनानेच होतो.

स्वयंपाक उत्साहाला नावं ठेवू नका>> गेला पूर्ण आ ठवडा function at() { [native code] } भयंकर वर्क् लोड मुळे घरी आल्यावर हलायचे पण र त्राण नसायचे मग स्विगीवरून दोन सँड्विच मागवून खाल्ले आहेत. काल कुकर लावायचा तर तुरीची डाळ संपलेली. मग मुगाचे वरण लावले पण ते माझ्या सासूचे फेवरिट मग काही खाववेना. दही भात नेला डब्यात. आल्यावर परत वरणा ला फोडणी द्यावी तर शेवटी सँडविच च मागवले. आनी गोल बटाटा भजी!!! ह्या लेव्हल वर कौतूक वाटतेच. फट फाटी सासर्‍याबरोबर आरामात चहा घेउ न मग स्वयंपाक करून मग पनवेलास प्रवास करून जायचे व दिवस भर मेहनत करून रात्री गाणे पण गायचे हे काहीतरी सुपर वुमन लेव्हल स्टॅमिना आहे.
आता हिला आयत्या वेळी गायचे टेन्शन येउन संजना कुत्सित पणे टाळ्या वाजवेल व तेव्हाच आशुतो ष केळ कर यशो मति मैया स्टाइल गाणे पुढे नेइल कि काय? अन्या जळफळेल ?

आज मला सारेगामा ज्युक बॉक्स मध्ये पंडित जितेंद्र अभिषेकींची पाच छान क्वालिटी गाणी सापडली जरूर ऐका लोका.
अबीर गुलाल काटा रुते कुणाला घेइ छंद मकरंद आणि दोन गाणी आहेत.

ओंकार गोवर्थनला खळ्या पडतात. बऱ्याच जणी पडतील त्यांत.
अनिरुद्ध कालच insecure झाला होता.

संजनाला काल गुगल म्हणायला काय झालं होतं? ते लोक केस नाही करणार कौतुक केलं तर.

अनु पमा मधला अनुज पण गोड आहे. बाल खेळणॅ ( टॉय बॉय ) परवा एक एपिसोड आला बघण्यात त्यात ते कामा निमित्त टेचात घरून बाहेर पडतात. त्यांच्या संजनाला तिथे जॉब असतो पण पहिल्याच दिवशी ती तिथे त्यांचे लफडे आहे असे झाईर करून हपिसात भां डण करून बाहेर पडते. त्या वेळी त्या अनुज ने फार भारी विनोदी निळा चट्टेरी पट्टेरीसूट घातला आहे. व तितकाच विनोदी आडव्या पट्ट्याचा निळा पिवळा टाय लावला आहे. तर हे कामाला जातात तर तो गाडी चालवत आहे व रोड वर खड्डे असल्याने धक्के बसून एकमेकांवर आदळतात व एकदम जंगी पाउस सुरू होतो. असले जुने टॅक्टिक चालू होते मग हताश होउ न बंद केला. हे अनूज आसुतोष व्हँपायर हवे होते. असली मजा तब आता.

व्हेंपायर डायरीज मधले डेमन व स्टेफन बघा. function at() { [native code] उच्च हँडसम बॉय्ज गर्ल्स. ड्रीम अ लिटिल बिगर डार्लिन्ग.

आता, लॉकडाउनमध्ये मुंबईत घरगुती टिफिन सर्व्हिसेसचं पेव फुटल़य.
तुमच्या लोकल फेसबुक ग्रूपमध्ये पहा किंवा विचारा.
मुंबई टिफिन सर्व्हिसेस असाही एक ग्रूप आहे. तिथे जाहिरात टाइप पोस्ट टाकणारे बरेच लोक लोकेशन मात्र लिहीत नाहीत.

मुंबई टिफिन सर्व्हिसेस असाही एक ग्रूप आहे>> मी आहे तिथे मेंबर. काही ही बनवून कुठेही पोह्चवतात हे लोक्स. मला बिर्याणी व चिकन ६५ ची वीकेंड सर्विस चालू करायची होती पण सध्या काही जमेना .

यांचे फोन फुटत का नाहीत?>> अगदीच फुटला नाही पण तुटला. फोन, बॅटरी आणि त्यावरचे झाकण अश्या त्या फोनच्या तिन चिपळ्या झाल्याचे दिसले.
माझा जुना फोन पडला कि असाच तुटायचा आणि जोडला कि पुन्हा चालू व्हायचा.

अप्पुडीने चहा केला तर जगबुडीच आली.

मेघना , राठी बाईंच्या का मागे लागलीय? . ती त्यांच्या आत्मविश्वासाला पिना मित्र होती.
ब्लॅंकेट करप्शनमध्ये त्या सामील असाव्यात

Pages