Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ना! अभी साखरपुडा सोडून
हो ना! अभी साखरपुडा सोडून गेला आणी डायरेक्ट लग्न करुन आला तेही अन्किताशी??? काय लॉजिक आहे.
सगळ अ.आणी आ आहे तरी सिन घडताना अभि येताना सगळ्याना दिसतो आणि बरोबरची अन्किता दिसत नाही? काय आमराईत लपुन बसलेली असते की काय?
अंकिता कुणाला दिसत नाही अगदी
अंकिता कुणाला दिसत नाही अगदी तशीच जसे लोक सापुला येऊ शकतात पण तिथून संजना परत जाऊ शकत नाही
तो अभिषेक तर असा बुळ्या आहे,
तो अभिषेक तर असा बुळ्या आहे, लगेच गेला सापू सोडून .. मालिकावाले असे काय? यांच्याकडे फक्त 2 shades ची माणसं, अती चांगली किंवा बेक्कार वाईट..
पांढरा आणि काळा सोडून दुसऱ्याही shades असतात म्हणो माणसांच्याही... अधलं मधलं, काही पटेल असं दाखवा की काहीतरी, सगळे आपले extreme टोकाला जाणारे ..>>>>>>> +१११
कायच्या काय सुरू झालेय आता. ही एकमेव मालिका आतापर्यंत जरा लाॅजिकल वाटत होती पण गंडलीये आता. अभि डॉक्टर दाखवलाय मग असा बुळ्या का , बावळट का आहे? एक काहीतरी दाखवा एकतर बावळट नाहीतर हुशार डॉक्टर. संजना वेडी होउन चाललीये की कपटी ? एक काहीतरी दाखवा. ही बाई स्मार्ट स्वाभिमानि आहे की निर्लज्ज? एवढा अपमान होत असताना कशी राहू शकते तिथे? कोणत्या अधिकाराने अभि आणि अंकिताला ओवाळते? आणि त्या मूर्ख अनिरुध्दला स्वत:ला नक्की काय हवंय बायको की संजना हे कोणत्या जन्मी उमगणार आहे? ... जानने के लिये अब नहीं देखें .. ..आई कुठे काय करते (या सगळ्यात )??
बाबांनी एव्हढे करून ठेवले आहे
बाबांनी एव्हढे करून ठेवले आहे आणि त्यात पोरं काहीना काही करत असतात मग बिचारी आई कुठे काय करणार
तो यश गौरीचा किती अपमान करतो,
तो यश गौरीचा किती अपमान करतो, इथून निघून जा काय आणि काय. मुळूमुळू रडत बसते नुसती. अभी पहिल्यापासून बुळ्याच आहे. मालिका संपणार आहे असा तूनळीवर विडिओ आहे. कांचन मरणार आहे शेवटी असं सांगतात, खखो राजवाडे जाणे.
लोक फार पर्सनली घेतात टि.व्ही
लोक फार पर्सनली घेतात टि.व्ही शोज मधल्या गोष्टी, त्या अभिषेकला म्हणे रिअल लाइफ मधे खूप हेट्रेड, धमक्या आल्या पब्लिकच्या !
सिरीयल ठिक चालु आहे अजुनही , पण अंकिता प्रकरणामुळे टीआरपी घसरणार दिसतोय !
लोक फार पर्सनली घेतात टि.व्ही
लोक फार पर्सनली घेतात टि.व्ही शोज मधल्या गोष्टी, त्या अभिषेकला म्हणे रिअल लाइफ मधे खूप हेट्रेड, धमक्या आल्या पब्लिकच्या !>>> अरे बाप रे! हे भलतच काहितरी
सिरीयल ठिक चालु आहे अजुनही ,
सिरीयल ठिक चालु आहे अजुनही , पण अंकिता प्रकरणामुळे टीआरपी घसरणार दिसतोय ! >>> +११११
त्या अभिला मारले होते, केस झाली होती त्याचे काय झाले?
हॉस्पिटलमधल्या मारहाणीपासून
हॉस्पिटलमधल्या मारहाणीपासून मालिका घसरणीला लागली आहे.
मुग्धा गोडबोले रानडे करीत असलेल्या पात्राचं त्या प्रसंगीचं वागणं अगदीच चुकीचं होतं. दोन माणसं हॉस्पिटलमध्ये तोडफोड मारहाण करताहेत तर ती अभिच्या सांगण्यावरून लपून बसली. मग प्रचंड घाबरून मारु नका त्याला असं पुटपुटत होती.
यश येईपर्यंत अभिला कोणीही सोडवलं नाही आणि त्याने एकट्याने सोडवलं. हाच प्रसंग पुढे फ्लॅशबॅकमध्ये दाखवला तेव्हा दोन वॉर्ड बॉइजही दाखवले. ते कुठे गेले? सेक्युरिटी?
पोलिस आले होते तरी मारहाणीची व तोडफोडीची कंप्लेंट नाही , बातमीही नाही.
अभिला आपल्याला मारलं जातंय यापेक्षा जास्त दु:ख आपल्या डॉक्टरकीवर दोष लावला जातोय याचं झालं.
केस झाली आणि बातमी आली म्हणून हेच घाबरले. आणि केस मागे का घेतली तर हॉस्पिटलच्याच एका स्टाफने - अंकिताने साक्ष दिली. त्यासाठी आणखी ड्रामा.
शूटिंगसाठी गोव्याला गेल्यापासून मालिकेचा बिग बॉस झालाय आणि संजना थेट बिग बॉसमधल्या अटेंशन , अॅक्सेप्टन्स आणि इम्पॉर्टन्स सीकिंग हाउसमेटसारखी वागतेय. साखरपुड्यातली नाचगाणी पण बिग बॉस टाइपच होती.
जोडीदाराला दगा देण्याबाबत अभि बापावर गेलाय.
कांचन मरणार आहे शेवटी असं
कांचन मरणार आहे शेवटी असं सांगतात >>> आता कांचनला का मारताय?? काय संबंध ? फिसकन् हसूच आले हे वाचून
जोडीदाराला दगा देण्याबाबत अभि बापावर गेलाय>> हम्म् हेच आलं मनात.
संजना डिवोर्स घेऊन बसलीये
संजना डिवोर्स घेऊन बसलीये घराच्या बदल्यात.
अनिरुद्धचं मात्र तळ्यात-मळ्यात चाललय.
त्यामुळे ति बिथरलीये.ऊद्या तिला घर सोडावं लागलं तरी अनिरूद्धशी लग्न मात्र झालेलं नसल्याने ती रहाणार कुठे हा प्रश्नच आहे तिच्यासमोर.
ही एक मालिका आहे हे माहीत
ही एक मालिका आहे हे माहीत असूनही माझ्या मनात आलेले विचार,
मुळात पहिल्या पासून त्या अभिला ती अनघा अवडलीच नव्हती. केवळ स्वभाव चांगला आणि एक घटस्फोटित म्हणून सहानभूती. ह्या सहानभूतीला हे बेण प्रेम समजून बसलं. आणि ह्याला फूस लावली अरुंधतीनी. अरुंधतीला माहीत होतं की अंकिता सारखी हुशार मुलगी सून म्हणून आली की तिची घरातली किंमत अजूनच कमी होईल. ह्या insecurity मधून तिनी अभिला emotional blackmail करून अनघा त्याच्या घशात उतरवायचा प्रयत्न सुरू ठेवला. स्वतःला काय आवडतं आणि आईसाठी मी काय करू शकतो ह्या कात्रीत बिचारा अभी सापडला होता.
आई कुठे काय करते,
- आई रोज सकाळी उठून प्रत्येकासाठी वेगवेगळा नाष्टा बनवते. मालिकेच्या लेखकाच्या मते नाष्ट्याचे पदार्थ हे प्रेम मोजायचे एकक आहे. संजना फक्त कॉर्नफ्लेक्स देते म्हणून ती वाईट, आई 4 पदार्थ बनवते म्हणून चांगली. आपण insignificant होणार नाही ना ह्या भीतीतून आई 4 पदार्थ करते.
- आई एवढ्यात सगळ्यांना - हा माझा ह्या घरातला शेवटचा दसरा, हा माझा शेवटचा साखरपुडा, हा माझा शेवटचा पाडवा - हे पालुपद सतत ऐकवून खूप बोर करते. मनातल्या Insecurities मधून दुसऱ्यांना Emotional Blackmail करणे हा अभ्यासाचा विषय आहे.
- आई प्रत्येक कार्यक्रमात दामेकरी आवाजात गाणं बोलून बोर करते. घरात फक्त अप्पा आणि यशलाच वाटते की आईचा आवाज फार चांगला आहे. खरं तर आईचा आवाज प्रचंड सामान्य आहे. उलट त्या गौरीचा आवाज खूप चांगला आहे.
आईच्या खटकणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत पण तूर्तास एवढ्याच.
अभिचं कॅरॅक्टरच तसं आहे,
अभिचं कॅरॅक्टरच तसं आहे, कनफ्युज्ड , थोडा कॉवर्ड कॅटॅगरी !
तो अँबिशस नाही , मम्माज बॉय /फॅमिली बॉय म्हणून अंकिता स्वतःहूनच ब्रेकप करते ना ?
विसरले मी जुने एपिसोड !
अरे पण अशा प्रकारे लग्न
अरे पण अशा प्रकारे लग्न केल्यावर ह्याने यायचंच कशाला इकडे तडमडत शिव्या आणी मार खायला. आणी ते ही अनघा तिथेच असताना. थांबायचं ना अंकिताकडेच थोडे दिवस. फोनवर ह्या लोकांना कल्पना देऊन. पण असं नॉर्मल माणसं करतील.
हो तर. ती स्वतःहूनच ब्रेकप
हो तर. ती स्वतःहूनच ब्रेकप करते .
तिनी अभिला emotional blackmail करून अनघा त्याच्या घशात उतरवायचा प्रयत्न सुरू ठेवला>>>> हे अंशतः असू शकतं पण अभिला अनघा आवडत होती म्हणून तिने प्रयत्न केले. त्याच्यावर कधी लादले नाही तिला. शेवटी प्रेम करणे आणि संसार करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनघा तिला चांगला संसार करू शकेल अशी वाटली म्हणून तिने प्रयत्न केले. यात मला तरी चुकीचे वाटत नाही. अंकिता जर प्रेम असूनही एंगेजमेंट मोडू शकते तर उद्या लग्नही मोडू शकते. आता अभिच बावळट आहे त्याला कोण काय करणार. So he deserves this. नंतर रडतच बसणार आहे तो.
एकंदर अरूंधतीची तिनही मुलं
एकंदर अरूंधतीची तिनही मुलं जरा विचित्रच आहेत
आता अरूंधतीने ते घर सोडून
आता अरूंधतीने ते घर सोडून निघून जाण्यातच शहाणपण आहे. संजना अंकिताला बसू देत फुगड्या खेळत. लागलं तर ईबाळ पण येईल.
स्टार प्रवाहच्या पेजवरही या
स्टार प्रवाहच्या पेजवरही या मालिकेला खूप शिव्या पडल्या आहेत, हा नवा ट्विस्ट कोणालाच आवडलेला नाही, उगाच पाणी घालून भलताच ट्रॅक पकडलाय मालिकेने असं मत बऱ्याच जणांनी मांडलं आहे तिथे. अभी अगदी वडिलांच्या सारखा निघाला असाही सूर आहे लोकांचा comments मध्ये, TRP घसरणार आता बहुतेक मालिकेचा, लोक ही मालिका बघणं सोडून देतील लवकरच असं दिसतंय.
छ्या, बोअर करायला लागली आता ही मालिका, कंटाळा आला
एकंदर अरूंधतीची तिनही मुलं
एकंदर अरूंधतीची तिनही मुलं जरा विचित्रच आहेत

<<<
अरुंधतीचे सासरे सोडून पूर्ण फॅमिलीच ड्रामॅटिक आहे पण नॉर्मल असती तर गोष्ट घडलीच नसती आणि पुढे कशी सरकणार !
हो खरंय दिपांजली.
हो खरंय दिपांजली.
अनघा बोलली ते पटलं. आधीच झालं ते बरं झालं नाहीतर अभिसारख्या -इथे काहीतरी शब्द वापरला तिने- सोबत संसार जमला धसता ह्याअर्थी.
आता आईचं बिचारं असणं, घरासाठी खपणं तरीही कुणाला तिची कदर नसणं हा विषय बाजुला राहिलाय.
मालिका वाढवायच्या नादात
मालिका वाढवायच्या नादात कुठेतरी घेऊन गेले आहेत आणि आता कदाचित परतीचे मार्ग सापडत नाहीत त्यामुळे भरकटल आहे सगळंच
कशाचाच कशाला पत्ता लागत नाही .... काहीही दाखवतायेत ...
अनिरुद्ध काहीच बोलत नाही असे कसे एवढा जबाबदार मोठ्या पदावर काम केलेला यशस्वी माणूस अजिबात काहीच करत नाही ...
त्याला असे कसे firm decision घेता येत नाही ... संजना काहीही करत आहे आणि हा हात बांधून उभा नुसता
सगळी मालिका परत ट्रॅक वर आणायला वेळ लागणार असे दिसते एकूण
अनिरुद्ध काहीच बोलत नाही असे
अनिरुद्ध काहीच बोलत नाही असे कसे एवढा जबाबदार मोठ्या पदावर काम केलेला यशस्वी माणूस अजिबात काहीच करत नाही ...>>> त्याचं जे करायचं ते करुन झालंय म्हणून. आता अरूंधती ते निस्तरतेय. कशाला पण? जा बाई निघून तिथून आणि पोरं त्याच्या हवाली करून जा.
अनघाचे बाबा 'अनुपमा' मध्ये,
अनघाचे बाबा 'अनुपमा' मध्ये, अनुपमाचा आणि वनराज चा घटस्फोट करणारे जज का वकील दाखवलेत . तिकडे झाला पण घटस्फोट आणि ती वेगळी राहायला पण लागली
आधी 'आई कुठे काय करते' बरी
आधी 'आई कुठे काय करते' बरी आणि वास्तवाच्या जरा जवळ वाटायची. कथेला वेग होता. आता कैच्याकै चालू आहे, ते ही संथ गतीने. अनुपमाचा वेग बरा आहे मग.
एकूणातच कूठल्याही छानशा
एकूणातच कूठल्याही छानशा चाललेल्या कार्यक्रमात काहितरी ड्रॅमटिक घडल पाहिजेच अस सगळ्या मराठी सिरियली लिहणार्याला का वाटत , ही मालिका त्यातल्या त्यात बरी होती पण नाही तिथेही अगदी साधी गुडी उभारायची असो नाहीतर कुणाचा बर्थडे असो, अगदी सापु असला तरी ढॅणढॅण म्युझिक वाजवुन येतातच विचका करायला.
प्राजक्ता..:खोखो:
प्राजक्ता..
नाच गाण्याची फार हौस यांना!!
अरुंधतीला माहीत होतं की
अरुंधतीला माहीत होतं की अंकिता सारखी हुशार मुलगी सून म्हणून आली की तिची घरातली किंमत अजूनच कमी होईल >>>>>>
देशमुख फॅमिली जशी अरुंधतीला किंमत देत नाही तिथे अंकिता, सन्जनासारख्या हुशार, करियर करणार्या बायकान्ना सुद्दा कस्पटासमान लेखतात. स्पेशली कान्चन, तिला घरात येणारी नातसून सुद्दा तिची सेवा करणारी हवी. तिच्या मुलीने (विशाखा) करियर केलेल तिला चालत. पण तिच्या सुनान्नी, नातसुन्नानी घराबाहेर पडू नये.
अंकिता सारखी हुशार मुलगी >>>>>>>> काय उपयोग ह्या हुशारीचा जर अन्किता, सन्जना सारख्या सेल्फ मेड बायकान्ची हुशारी पुरुषान्ना ह्या ना त्या मार्गाने मिळवण्यात जात असेल तर? ह्यान्ची आयुष्ये पुरुषान्भोवती घोटाळत आहेत, ह्याना आधाराला पुरुषच लागतो. अर्थात अरुन्धतीही काही वेगळ करत नाहीये म्हणा. एकीकडे अनिरुद्दला ' आता मला तुमच्याबदल प्रेम वाटत नाही. मला घटस्फोट हवाय. मी स्वतन्त्र झालेय. मला तुमची गरज नाही.' वै वै बडबडते तर दुसरीकडे हि अजूनही बायकोची कर्तव्ये निभावते. का?
स्वतःला काय आवडतं आणि आईसाठी मी काय करू शकतो ह्या कात्रीत बिचारा अभी सापडला होता. >>>>>> बिच्चारा? एवढच जर होत तर तेव्हाच सान्गायच होत ना त्याने अरुन्धतीला की मी अन्किता शिवाय कुणाचाही विचार करु शकत नाही. सो, प्लीज हे प्रयत्न थाम्बव. मी तिला विसरु शकत नाही. म्हणजे प्रश्नच मिटला. पण ह्याच पहिल्याचपासून काहीच क्लिअर नसत. सतत तळयात-मळयात. हा डॉक्टर कसा काय झाला तेच कळत नाही.
काय उपयोग ह्या हुशारीचा जर
काय उपयोग ह्या हुशारीचा जर अन्किता, सन्जना सारख्या सेल्फ मेड बायकान्ची हुशारी पुरुषान्ना ह्या ना त्या मार्गाने मिळवण्यात जात असेल तर? ह्यान्ची आयुष्ये पुरुषान्भोवती घोटाळत आहेत, ह्याना आधाराला पुरुषच लागतो. >>> point है, मस्त.
अर्थात अरुन्धतीही काही वेगळ करत नाहीये म्हणा. एकीकडे अनिरुद्दला ' आता मला तुमच्याबदल प्रेम वाटत नाही. मला घटस्फोट हवाय. मी स्वतन्त्र झालेय. मला तुमची गरज नाही.' वै वै बडबडते तर दुसरीकडे हि अजूनही बायकोची कर्तव्ये निभावते. का? >>> हे ही मस्त.
सूलू >>+१
सूलू >>+१
सुलुच्या पोस्ट १०० मोदक
सुलुच्या पोस्ट १०० मोदक
Pages