एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
इथे (तेलगुबहुल) देशी कंपनीत
इथे (तेलगुबहुल) देशी कंपनीत काम करत असताना वारंवार सांगूनही अनेक ठिकाणी माझ्या नावाचं स्पेलिंग Swathi करत असत. त्यांच्या मते मलाच माझ्या नावाचं इंग्रजी स्पेलिंग माहीत नव्हतं आणि ते सुधारणं हे त्यांचं आद्य कर्तव्य (karthavya?!) होतं!
दक्षिणी लोकांत, t म्हणजे 'ट'
दक्षिणी लोकांत, t म्हणजे 'ट' आणि th म्हणजे त असे ऐकलेले आहे.
थ असेल तेव्हा कस लिहितात
थ असेल तेव्हा कस लिहितात दक्षिणेत.
म्हणजे आपण त आणि ट साठी t वापरतो तसे ते त आणि थ साठी th वापरतात का.
असावे अन्जू प्रश्न रास्त आहे.
असावे अन्जू प्रश्न रास्त आहे. मला माहीत नाही.
---------------
स्वादिष्ट -चूक, स्वादिष्ठ - बरोबर हे माहीत नव्हते.
दुराभिमान - चूक, दुरभिमान - बरोबर, हेही माहीत नव्हते.
देशवासीयांना - चूक देशवासींना- बरोबर ..... हे सुद्धा
सुतोवाच - सूतोवाच
गणपतीच्या आरतीत कोणीतरी चूकीचे रुप 'शिवसूत' का 'महेशसूत' असे काहीतरी असे मागे वापरलेले. माझ्या मते ते चूकीचे होते. लिहील्यानंतर काहीच प्रतिक्रिया नाही.
त्यांना विचारायला पाहिजे काय
आश्विनी नावाबद्दल.
त्यांना विचारायला पाहिजे काय नाव आहे ते. इथे दोन्ही नावं व्याकरणदृष्ट्या मला बरोबर वाटतात त्यामुळे व्याकरण नाझीगिरी करायची पण संधी हुकली.
अश्व + क्तिन् (इन् ) प्रत्यय = अश्विन् म्हणजे ज्याच्याकडे अश्व आहे/आहेत असा. त्याचे स्त्रीरूप अश्विनी.
अश्विनचा मुलगा आश्विन आणि मुलगी असेल तर आश्विनी. जनकाची मुलगी जानकी, भगीरथाने आणलेली भागीरथी इत्यादी ठिकाणी पहिल्या स्वराची वृद्धी होते. तसेच अश्विनची मुलगी आश्विनी.
"अश्विनची मुलगी आश्विनी" हे
"अश्विनची मुलगी आश्विनी" हे पटण्यासारखे आहे. पण "स्वादिष्ट" आणि "देशवासीयांना" हे शब्द चुकीचे कसे? माझ्या मते दोन्ही शब्द बरोबरच आहेत.
एक प्रश्न अनेक दिवसांपासून
एक प्रश्न अनेक दिवसांपासून सतावतोय :
मला “क ळ ले” की मला “ क ळा ले” ? कोणते रूप बरोबर ?
मान्यवर मराठी लेखकांना दोन्ही रूपे वापरतांना बघितले आहे, म्हणून अजूनच गोंधळ.
जाणकारांनी प्रकाश टाकावा प्लीज
कळले - हेच शिकलेले आहे.
कळले - हेच शिकलेले आहे. घरातही बोललेले आहे. बाकी टेक्निकॅलिटी करता कॉलिंग - हपा, अनिंद्य व कुमार
कळले हेच बरोबर आहे
कळले हेच बरोबर आहे
सोल सोलले
वळ वळले
कळावे सोलावे वळावे असे शब्द आहेत पण त्याचा अर्थ वेगळा आहे.
काही अकारान्त धातूंना
काही अकारान्त धातूंना भूतकाळाचे प्रत्यय जोडण्यापूर्वी अन्त्य 'अ' ऐवजी 'आ' असा आदेश (मूळ अक्षराबद्दल दुसरें योजिलें जाणारें अक्षर (प्रतिनिधि); बदली येणारा वर्ण. ) होतो
जसे - नीघ- निघाला, पळ - पळाला, म्हण - म्हणाला , उड - उडाला, बूड - बुडाला
संदर्भ - व्याकरणात भरपूर्न मार्क्स मिळवा - स.ध. झांबरे
माझ्या मते कळले आणि कळाले दोन्ही चालावे.
असेच गळले आणि गळाले.
यात अर्थभेद आहे, असेही वाटत नाही.
एका तळ्यात होती बदके पिले
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख गाण्यात आहे ना ओळ ' त्याचे तया कळाले तो राजहंस एक'
शतजन्म शोधताना गाण्यात देखील ' विझाल्या' आहे. बहुतेक वृत्ताची गरज म्हणून वापरत असतील
भरत, एकदम योग्य नियम आणि
भरत, एकदम योग्य नियम आणि उदाहरणे!
कळाले इतकं ही चुकीचं नाही हे
समजलं. कळाले.सर्वांना थँक्यू.
सर्वांना थँक्यू.
@ भरत,
… यात अर्थभेद आहे, असेही वाटत नाही…..
होय. म्हणून जास्तच कन्फ्यूजन होत होते माझे. अर्थभेद असता तर लक्षात ठेवायला सोपे झाले असते
..कळले आणि कळाले दोन्ही चालावे….
ओके. बहुतेकदा “कळले” असेच वापरतो पण दुसरेही चुकीचे नाही हे समजले. थँक्यू.
BTW, परीक्षेत झांबरे काकांना “भरपूर्न” मार्क्स मिळाले असतील का ?
@ मेधा,
…विझाल्या …
कवितांमधे कवीलोक शब्दांबाबत थोडी लिबर्टी घेतात म्हणून आणि कविता मला समजत नाहीत म्हणून लक्षात आले नसतेच.
Pages