इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Udemy वर mayank rasu या व्यक्तीचे कोर्सही चांगले वाटताहेत. आज ऑफर आहे udemy वर साडे चारशे रुपयात कोर्स उपलब्ध आहेत.

Backtesting करतोय.

Deploy करता येईल अशी एक पण स्ट्रॅटेजी मिळत नाहीये.
तुम्ही कुठे पोचलात?

मी सुरू करेन बॅकटेस्टिंग या आठवड्यात. ब्रूट बॅकटेस्टिंग मध्ये मिळेल काहीना काही. एक सर्व्हर पण घ्यायचा विचार आहे. लॅपटॉप pc वरून करणं रिस्की आहे.

लोकस पीसीवर करत आहे.

तुम्ही काय काय बॅकटेस्ट केल्या?

तुम्ही ब्लूशिफ्ट वगैरे ट्राय केलं का?

मी परवाच घेतला AWS सर्व्हर. mean reversion टेस्ट करतोय. २०,५०,१००,२०० ema साठी. एकूण सहा हजारच्या आसपास कॉम्बिनेशन्स आहेत. दहा पंधरा दिवस चालेले बॅकटेस्टिंग त्यामुळे सर्व्हर घ्यावाच लागला.

हायला, तुम्ही mean reversion वर पोचलात….

मी आत्ता कुठे talib वरचे ईंडिकेटर बॅकटेस्ट करायला सुरुवात केली आहे.

काल निफ्टीवर सगळे moving average चेक केले.

मी सध्या दोन महिन्यांच्या डेटावर काम करतोय. नन्तर 1yr डेटावर काम करणार आहे. पण लाईव्ह मार्केट मध्ये खेळ बदलू शकतो. झेरोधाने BO ऑर्डर काढून टाकले त्यामुळे ऑर्डर कशी प्लेस करायची याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? माझा विचार आहे कंडिशन मिट झाल्यावर एक रेग्युलर ऑर्डर टाकायची आणि ती कम्प्लिट झाली की दोन ऑर्डर टाकायच्या एक स्टॉप लॉस आणि दुसरी टार्गेट. पण हे खूपच किचकट वाटतंय. तीन ऑर्डर ट्रॅक करायला लागतील. पहिली ऑर्डर प्लेस झाली की नाही तिचा स्टेटस बघा. नन्तर दोन ऑर्डर प्लेस करायच्या त्यांचा स्टेटस बघा. त्यातली एक कम्प्लिट झाली की दुसरी कॅन्सल करा. कटकट आहे खूप. त्यात पुन्हा अल्गो पुढे गेला की ते टेन्शन. BO मस्त होती एक कम्प्लिट झाली की दुसरी ऑटोमॅटिक कॅन्सल व्हायची.

मला अजून डिप्लॉय करण्यासारखी स्ट्रॅटेजीच न मिळाल्याने पुढचा काही विचार केलेला नाही.

तुम्ही बॅकटेस्टींगला मिनिट डेटा घेतला आहे का? कोणत्या टाईमफ्रेम वर बॅकटेस्ट करताय?

मी निफ्टी ५,१५,३०,६० मिनिटवर बॅक टेस्ट करत आहे.

याहू वरुन ५ मिनिट चा ६० दिवस आणि १ मिनिटचा ७ दिवसाचा डेटा मिळत आहे.

पण मला तेवढ्या डेटावर बॅकटेस्ट करण्यात काही पॉईंट दिसत नाही.

मिनिट डेटा कुठे विकत मिळतो माहित आहे का?

बोकलत मी पाच दिवसांपूर्वीच झिरोदा अकाऊंट उघडले.
Bracket Order नाही, पण GTT आहे ना.
पोझिशन घेतानाच GTT मध्ये स्टॉपलॉस आणि टार्गेट देता येते, पण टक्केवारी मध्ये, आकड्यात नाही. टक्केवारीत स्टॉपलॉस, टार्गेट द्यायचे असेल तर एका ऑर्डर मध्ये काम होईल.

GTT सिलेक्ट न करता पोझिशन घेतली की मग वेगळी GTT - OCO प्लेस करून त्या मध्ये स्टॉपलॉस आणि टार्गेट अकड्यात देता येते, पण या दोन ऑर्डर्स होतात मग. पहिली ऑर्डर प्लेस करणे आणि ती प्लेस झाली का याचे स्टेटस, मग GTT - OCO ऑर्डर प्लेस केली की झाले.

हो BO बंद आहे. पण आज मी सहज अल्गो मध्ये टाकून बघितली तर तात्पुरती बंद आहे असा मेसेज आला होता. कदाचित थोड्या दिवसांनी सुरू होऊ शकते. तुम्ही म्हणताय तसं GTT आहे पण GTT फक्त CNC साठी आहे ना?

पण GTT फक्त CNC साठी आहे ना? >>
हे चेक नव्हतं केलं.
आता पाहिलं तर, हो फक्त CNC ला आहे GTT.

मी इन्ट्राडे करत नाही आता, फक्त स्विंग -पोझिशन्स / ऑप्शन्स रायटिंग.

मला एक सांगा, झिरोदा मध्ये स्टॉपलॉस ऑर्डर लावताना, मार्केट स्टॉपलॉस ऑर्डर लावता येते का?
शेअरखान मध्ये, ट्रीगर प्राईस मध्ये स्टॉपलॉस प्राईस दिली आणि एक्झिक्युट प्राईसमध्ये 0 टाकले की ट्रीगर झाल्यास ती मार्केट प्राईसला एक्झिक्युट होते.

झिरोदा मध्ये एक्झिक्युट प्राईस 0 टाकली तर ऑर्डर एक्सेप्ट होते, पण इथे पण मार्केट प्राइसला एक्झिक्युट होईल का?
हेल्प मध्ये असे काहीच लिहिलेले दिसले नाही.

माझ्याकडे बँक निफ्टी चा टिक डेटा आहे. पाच वर्षांचा. लिंक टाकतो आज उद्या मी गूगल ड्राईव्हची.>>

ओके.

तुम्हाला अजून कुठला डेटा पाहिजे असेल तर सांगा. डाउनलोड करून ठेवतो.>>>>

मी निफ्टी १०० मधल्या सगळ्या स्टॉक्सचा मिनिट लेव्हल देता शोधत आहे.

रच्याकने,

बँक निफ्टी TBT डेटा ची फाईल काय साईझची झाली? Happy

झिरोदा मध्ये एक्झिक्युट प्राईस 0 टाकली तर ऑर्डर एक्सेप्ट होते, पण इथे पण मार्केट प्राइसला एक्झिक्युट होईल का?>>> हे कधी ट्राय नाही केलं.
बँक निफ्टी TBT डेटा ची फाईल काय साईझची झाली? >>> दीडशे दोनशे mbच्या आसपास आहे.
मी निफ्टी १०० मधल्या सगळ्या स्टॉक्सचा मिनिट लेव्हल देता शोधत आहे.>>> कधीपासूनचा पाहिजे.

झिरोदा मध्ये एक्झिक्युट प्राईस 0 टाकली तर ऑर्डर एक्सेप्ट होते, पण इथे पण मार्केट प्राइसला एक्झिक्युट होईल का?
हेल्प मध्ये असे काहीच लिहिलेले दिसले नाह?~~ slm म्हणून सेपरेट ऑपशन आहे त्यासाठी आणि gtt मध्ये आकड्यात पण ऑर्डर देता येते

Pages