शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.
इंट्राडे चार्ट्स
Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इक्विटीवर 5x तरी आहे fno वर
इक्विटीवर 5x तरी आहे fno वर काहीच मिळणार नाही.
यामुळे liquidity वर परिणाम
यामुळे liquidity वर परिणाम होईल का?
शेअर मार्केट मध्ये सॉलिड काही
शेअर मार्केट मध्ये सॉलिड काही नसते
पैशाच्या एक तर लिक्विड नैतर गॅस अशा दोनच अवस्था असतात
(No subject)
(No subject)
पैशाच्या एक तर लिक्विड नैतर
पैशाच्या एक तर लिक्विड नैतर गॅस अशा दोनच अवस्था असतात>>
शेअर मार्केट मध्ये सॉलिड काही नसते>> असतात ना काही लोअर सर्किट लागून अनसोल्ड रहाणारे.
(No subject)
beautiful and successful
beautiful and successful trading year. Thanks 2020.

अभिनंदन बोकलत.
अभिनंदन बोकलत.
अभिनंदन बोकलत.
अभिनंदन बोकलत.
मला पण छान गेले हे वर्ष.
२२२ ट्रेडींग दिवस.... ६६ नफ्यात.....
मी ५४% नफा
मी ५४% नफा
मी मार्च पासून इन्ट्रा डे,
मी मार्च पासून इन्ट्रा डे, ऑप्शन्स नाही केले. फक्त पोझीशन्स आणि गुंतवणूक. आता निफ्टी १३८०० च्या वर गेला तेव्हा सगळ्या पॉझिशन्स क्लोज केल्या. 3५% प्रॉफिट बुकिंग १ एप्रिल पासून.
बजाज फिनान्स ने तर मला १२३%
बजाज फिनान्स ने तर मला १२३% प्रॉफिट दिला..
माझेपण ट्रेडिंग (जे अधूनमधून
माझेपण ट्रेडिंग (जे अधूनमधून करायचो आणि तेही पोझिशनल) सध्या बंद आहे.... नवीन वर्षात परत सुरुवात करावी म्हणतोय!
बाकी investment return बघता Infy ने चांगला फायदा करुन दिलाय
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन अतरंगी. विंनिंग रेशो
अभिनंदन अतरंगी. विंनिंग रेशो जबरदस्त आहे.
(No subject)
मी गेल्या दोन तीन वर्षात
मी गेल्या दोन तीन वर्षात शेअर्समध्ये छोट्या-मोठ्या प्रमाणावर investment, positional trading, BTST आणि intraday हे प्रकार करुन बघितले.
Investment मध्ये काही शेअर्सनी खुप चांगले returns दिले जसे की Infy पण काही शेअर्सची निवड चुकल्यामुळे (IBHF आणि Yes bank) पैसे अडकून पण राहिले.
उरलेल्या तीन प्रकारात BTST चा सक्सेस रेट सगळ्यात चांगला होता.
जाणकारांचे काय मत आहे BTST बद्दल?
BTST करताना call action बद्दल
BTST करताना call action बद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे,नाहीतर penalty लागू शकते.
Call auction:-
https://youtu.be/SuSXKlxF2Qg
ऑक्शन
ऑक्शन
हो ऑक्शन, वरती चुकून action
हो ऑक्शन, वरती चुकून action झाले.
(No subject)
ICICIPRULI @important level
डे ट्रेडिंगमध्ये जे ट्रेड
डे ट्रेडिंगमध्ये जे ट्रेड करायचो ते मी एक्सल फाईलमध्ये लिहून ठेवायचो पण जेव्हापासून डायरीत लिहायला सुरुवात केले तेव्हापासून इमोशन कंट्रोल आणि डीसीप्लिनमध्ये कमालीची सुधारणा झाले.
तुमचे अक्षर चांगले असल्यामुळे
तुमचे अक्षर चांगले असल्यामुळे डायरीत लिहिल्यावर सुधारणा होणारच.
तुमचे अक्षर चांगले असल्यामुळे
तुमचे अक्षर चांगले असल्यामुळे डायरीत लिहिल्यावर सुधारणा होणारच>>>
डायरीत लिहिताना घाईत लिहितो त्यामुळे तेव्हडं अक्षर चांगलं नाही येत. मला वाटतंय शाळेत वही स्वछ नीटनेटकी ठेवायची असं आपल्या मनावर बिंबवलं असतं त्यामुळे जेव्हड्या कमी चुका होतील तेव्हढ्या बऱ्या या मेंटलिटीने ट्रेडिंग होत असावी.
(No subject)
ICICIPRULI @important level
Submitted by swwapnil on 7 February, 2021 - 23:28

>>>>>>>>
Icicipruli 491 ची क्लोजिंग
Icicipruli 493 ची क्लोजिंग आहे. 500 स्ट्राईकला CE ओपन इंटरेस्ट वाढलाय. जर उद्या ओपनिंग 495 च्या आसपास दिली तर 500 च्या आसपास जाऊन खाली येऊ शकतो. त्यामुळे तिथे लॉंग पोझिशन घेताना काळजी घ्यायला हवी.
. 500 स्ट्राईकला CE ओपन
. 500 स्ट्राईकला CE ओपन इंटरेस्ट वाढलाय. >>>>>>>>
बरोबर.
माझ्या मते जो पर्यंत ५००च्या वर क्लोज येत नाही आणि call OI कमी होत नाही तो पर्यंत मोठी पोझिशन घेणे जरा जास्त रिस्की आहे.
शिवाय मला head and shoulder ची शक्यता पण वाटत आहे. right shoulder अजून तयार झाला नाही. लेफ्ट शोल्डरचा हाय ५०० च्याच जवळ आहे. २४ डिसेंबर नंतर १ फेब पर्यंत Head आहे. त्या दरम्यान स्टॉक वर गेला आहे पण व्हॉल्यूम कमी आहे.
धन्यवाद बोकलत आणि अतरंगी.
धन्यवाद बोकलत आणि अतरंगी.
हे असलं यापूर्वी कधी पाहिलं
हे असलं यापूर्वी कधी पाहिलं होतं काय? #देश संकट मे है.
Pages