शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.
इंट्राडे चार्ट्स
Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आज पर्यंत झेरोधा, अप स्टॉक
आज पर्यंत झेरोधा, अप स्टॉक बंद पडण्याचा अनुभव होता आज पहिल्यांदा NSE चा असा अनुभव.
आज ज्यांच्या ईंट्रा डे पोझिशन होत्या त्यांचे काय झाले ?
मी निफ्टीचे दोन Put शॉर्ट केले होते. मी पोझिशन घेताना नेहमीच ओव्हर नाईट घेतो. टिक डेटा येणे बंद झाल्यावर झेरोधाला फोन केला, कारण त्यांनी स्टॉप लॉस ऑर्डर पण कॅन्सल केल्या. काहीच करता येण्यासारखे नव्हते मग जेवण करुन शांतपणे झोपलो.
मार्केट चालू झाल्यावर दोन्ही वर प्रॉफीट बूक केला.
आज जर मार्केट परत चालू झाले नसते आणि उद्या जर गॅप डाऊन ओपन झाला असता तर जबरदस्त लॉस झाला असता.
आज ११ च्या आधी ट्रेड पूर्ण
आज माझा ११ च्या आधी ट्रेड पूर्ण झाल्याने काही प्रॉब्लेम आला नाही. ११:४०वाजता सर्वच थांबले होते.
सगळ्या ब्रोकर्स ने ईंट्रा डे ,fno पोजिशन BSE वर close केल्या.(३:१० वा)
कारण,
Nse ने मार्केट पुन्हा चालू करण्याची कुठलीच कल्पना ब्रोकर्स ना दिली नाही.(जे ३.३० वा चालू झाले)
मी पोझिशन घेताना नेहमीच ओव्हर
मी पोझिशन घेताना नेहमीच ओव्हर नाईट घेतो.
>>>>>>
तुम्ही hedge करता का?
मी 9.20च्या आत पोझिशन घेतो
मी 9.20च्या आत पोझिशन घेतो आणि 9.30-40 पर्यंत बाहेर पडतो. कधी ट्रेल केला तर जास्तीत जास्त 10 पर्यंत कॅरी करतो.
तुम्ही hedge करता का?>>>
तुम्ही hedge करता का?>>>
नाही.
मी 9.20च्या आत पोझिशन घेतो
मी 9.20च्या आत पोझिशन घेतो आणि 9.30-40 पर्यंत बाहेर पडतो. कधी ट्रेल केला तर जास्तीत जास्त 10 पर्यंत कॅरी करतो.
Submitted by बोकलत on 24 February, 2021 - 21:28
>>>>>>
अरे वा,बोकलत तुम्ही इंट्रा डे प्रो आहात,स्टॉक selection आधीच करता की रियल टाईम.
तुम्ही hedge करता का?>>>
तुम्ही hedge करता का?>>>
नाही.
Submitted by अतरंगी on 24 February, 2021 - 21:42
>>>>>>
म्हणजे तुमचे रिस्क मॅनजमेंट जबरदस्त असेल, कारण गॅप अप/डाऊन ची शक्यता असल्याने ओव्हर नाईट पोजिशन धोकादायक ठरू शकते तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल..
तुम्ही इंट्रा डे प्रो आहात
तुम्ही इंट्रा डे प्रो आहात,स्टॉक selection आधीच करता की रियल टाईम.>>> नाही अजुन प्रो नाही झालो. प्रो व्हायला भरपूर वेळ जाईल अजून. स्टॉक सिलेक्शन आधीच करतो शक्यतो सकाळी ८ ते ९.
फेब्बूरवारी सिरीज मेली
फेब्बूरवारी सिरीज मेली
मार्च एप्रिल पकडून कॅलेंडर स्प्रेड करायचा विचार आहे
कुणी केले आहे का ?
म्हणजे तुमचे रिस्क मॅनजमेंट
म्हणजे तुमचे रिस्क मॅनजमेंट जबरदस्त असेल, कारण गॅप अप/डाऊन ची शक्यता असल्याने ओव्हर नाईट पोजिशन धोकादायक ठरू शकते>>>>>
मी डे ट्रेड करतो. पण पोझिशन घेताना ओव्हर नाईट घेतो. लाॅस मधल्या पोझिशन शक्यतो कॅरी करत नाही.
मार्च एप्रिल पकडून कॅलेंडर
मार्च एप्रिल पकडून कॅलेंडर स्प्रेड करायचा विचार आहे
कुणी केले आहे का ?>>>>
मी आजच 15100 PE शाॅर्ट केला.
मार्जिन दुसरा फेज लागू
मार्जिन दुसरा फेज लागू झाल्यापासून मार्केट जास्त मूव्हमेन्ट देत नाहीये असं मला वाटतंय.
पायथन कोणी वापरतं का?
पायथन कोणी वापरतं का? नवीन रुल्स अल्यापासून याची गरज आहे असं वाटतंय. मी शिकायला सुरवात केले.
शेअर मार्केट म्हणजे जुगार.
शेअर मार्केट म्हणजे जुगार. पैसे मिळवणं अशक्य आहे. सामान माणसाने यापासून दूर राहिलेलं बरं.
फक्त आठ दहा ओळींचा कोड वापरून
फक्त आठ दहा ओळींचा कोड वापरून पाच मिनिटात fno लिस्टेड १४० स्टॉकचा डेटा एक्सेल फॉरमॅट मध्ये डाउनलोड झाला. गेल्या एक वर्षाचा.
पायथन कोणी वापरतं का? नवीन
पायथन कोणी वापरतं का? नवीन रुल्स अल्यापासून याची गरज आहे असं वाटतंय. मी शिकायला सुरवात केले.>>>>>
मी पण सुरुवात केली आहे.
आज सकाळ पासून एका कोडवर
आज सकाळ पासून एका कोडवर डोकेफोड करत बसलोय. सारखा एरर येतोय ....
राम आणि बोकलत वेगळे आहेत
राम आणि बोकलत वेगळे आहेत दाखवायचा हट्ट भारी आहे
राम आणि बोकलत वेगळे आहेत
राम आणि बोकलत वेगळे आहेत दाखवायचा हट्ट भारी आहे>>> अहो पूर्ण बिझी शेड्युल आहे. त्या चारोळ्या करण्याइतका कुठला टाईम आलाय.
नवीन काय रूल्स आले आहेत कळतील
नवीन काय रूल्स आले आहेत कळतील का?
डेली मार्जिन बंद होणार
डेली मार्जिन बंद होणार
पुरा पैसा दो माल लो
डेली मार्गिन पूर्ण बंद नाही
डेली मार्गिन पूर्ण बंद नाही होणार. 5x मार्जिन मिळणार.
सप्टेंबर 2021
सप्टेंबर 2021
मार्जिन खल्लास , टाटा , गुडबाय
सरकारचा कर किती कमी होईल ?
सरकारचा कर किती कमी होईल ?
इक्विटीत var+elm द्यायचा आहे.
इक्विटीत var+elm द्यायचा आहे. तो साधारण 20% असतो त्यामुळे तिथे 5x मार्जिन मिळणार. फ्युचर ऑप्शन्स ऑलरेडी लेव्हरेज प्रोडक्ट आहेत. दहा लाखाचा फ्युचर होल्ड करायला 2 लाख लागतात त्यामुळे तिथे पण 5x मार्जिन असतं.
Trading सुरू करण्यासाठी कुठले
Trading सुरू करण्यासाठी कुठले अँड्रॉइड अॅप घ्यावे. Groww app चे review मध्ये अनेकांनी सर्व्हिस चांगली नसल्याचे लिहिले आहे.
खरं तर ट्रेडिंग मोबाईलवरून
खरं तर ट्रेडिंग मोबाईलवरून करू नये हे माझं मत आहे. ट्रेडिंगसाठी मोठ्या स्क्रीनचा pc असावा. मी झेरोधा, अपस्टॉक्स, शेरखान, फायर्स या मोबाईल ऍप वरून ट्रेडिंग केली आहे. आणि सगळे ऍप व्यवस्थित वर्क करतात.
अतरंगी तुम्ही झेरोधा वापरता
अतरंगी तुम्ही झेरोधा वापरता का? आणि कुठून शिकताय? मी https://quantra.quantinsti.com/ वर बेसिक शिकलोय.
झेरोदा मस्त आहे
झेरोदा मस्त आहे
SAIL बद्दल काय मत आहे?
SAIL बद्दल काय मत आहे? चांगलाच सुटलाय!
काल जरा पडला पण सॉल्लीड ग्रोथ दाखवलीय गेले काही महीने!
Pages