इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही tcs लाॅंग केला होता की शाॅर्ट?

मी १७१७ आणि १७२५ ला शाॅर्ट केला.

परवा त्यात जरा जास्तच सेलिंग प्रेशर आलं होतं. आज मी संधीच बघत होतो शाॅर्ट करायला.

8000 अजूनही सपोर्ट आहे निफ्टीचा. ओपन इंटरेस्ट कमी होत नाहीये. तो तुटला तर पुढचा सपोर्ट 7500.

आज झिरोदा आणि माझे ग्रह क्रॉस होत होते बहुतेक. सकाळी महींद्रा लाँग करायला गेले, ऑर्डर उचलली नाही.
क्रुड शॉर्ट केला. प्रॉफीट झाला होता. एक्झिट ऑर्डर उचलली नाही , मॉडीफाय करे पर्यंत फिरला. लॉस झाला. नविन वर्ष एकूण धडाक्यात सुरु झाले आहे. अर्थात क्रुड मध्ये एंट्री घ्यायची घाईच केली होती. क्न्फर्मेशन हा नियम तोडल्याची शिक्षा. !!

क्न्फर्मेशन हा नियम तोडल्याची शिक्षा. !!>>>>

ट्रेड जर्नल बनवलं आहे का?

मी अशा सर्व चुका त्यात लिहून ठेवतो.

या शिवाय मी माझ्या सर्व लाॅस मधे गेलेल्या ट्रेडचे स्क्रिनशाॅट घेऊन ठेवले आहेत. त्यात माझ्या entry, exit ट्रेड घेण्याचे कारण नमुद केलेले असते.

एक्सेल मधे प्रत्येक ट्रेड, काय किंमतीला, किती वाजता घेतला, का घेतला , त्यात झालेल्या चुका हे सर्व असते.

ट्रेड मधे जर लाॅस झाला असेल तर त्याचा ५ मिनिटसचा चार्ट त्या खाली वर सगळी लिहिलेली माहिती काॅपी पेस्ट लिहून त्याचा स्क्रिन शाॅट सेव्ह करून ठेवलेला असतो. ते सगळे स्क्रिन शाॅटस एका पाॅवर पाॅईंट फाईल मधे सेव्ह करून ठेवतो.

कधी कधी office आणि ट्रेडिंगच्या कसरती मधे खंड पडतो. अशा वेळेस निदान लाॅस मधले ट्रेड लिहून ठेवणे मग कधीतरी नंतर त्याचे स्क्रिन शाॅट घेणे असे होते.

ट्रेड जर्नल बनवलं आहे का? <<<< जर्नल असे नाही पण excel आहे. त्यात बाकी तपशीलांबरोबर काय चुकलं आणि काय बरोबर आलं हे लिहीते थोडक्यात.

आता डिटेल लिहीन आणि चुकलेल्या ट्रेड्सचे स्क्रीन शाॅट्स पण इतर माहितीसह वर्डमध्ये सेव्ह करेन.

धन्यवाद. नविन वर्षाच्या सुरुवारीला नविन शिकवण मिळाली.

dropbox.com किंवा Google Drive सारख्या वेबसाईटवर खाते तयार करुन, तिथे अपलोड करा.

फाईल/फोल्डर च्या नावाच्या सर्वात उजव्या बाजुला किंवा स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजुला असलेल्या शेअर सेटींग मधे जाऊन anyone with link can view निवडा व ती लिंक इथे द्या.

तीन वेगळ्या लिंक देण्याऐवजी, एक नवा फोल्डर बनवुन, त्यात या तीन फाईल ठेवा, व त्या फोल्डरची वरील सेटींगप्रमाणे एक लिंक दिली तरी चालेल.

Watchlist for 07.04.2020
1. ASIANPAINT(L)
ASIANPAINT 07.04.20.JPG
2. CONCOR(L)
CONCOR 07.04.20.JPG
3. AMARAJABAT(S)
AMARAJABAT 07.04.20.JPG
4. TITAN(S)
TITAN 07.04.20.JPG
5. LICHSGFIN(S)
LICHSGFIN 07.04.20.JPG

सर्व charts going down..........nifty 7500 looks bottom if we think 2008 type market....

नाहीतर....Where is bottom?

जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही तोपर्यंत मार्केट कितीही पडू शकतं. सध्याच्या परिस्थितीत कुठलाच अंदाज बांधू नाही शकत.

मी colpal, hdfcbank, itc शाॅर्ट.

Colpal दोन टार्गेटस देऊन ट्रेलिंग स्टाॅप लाॅस हिट.

Hdfcbank मधे पहिला टार्गेट मिळाला. बघू अजून किती देतोय.

Itc दोन टार्गेटस मिळाले. ट्रेलिंग स्टाॅप लाॅस १७९.२ वर आहे. लवकरच ऊडेल असं दिसतंय.

Watchlist for 08.04.2020
1. ICICIBANK(L)
ICICIBANK 080420.JPG
2. JUBLFOOD(L)
JUBLFOOD 080420.JPG
3. TCS(L)
TCS 080420.JPG
4. PEL(S)
PEL 080420.JPG
5. LT(S)
LT 080420.JPG

आज jublfood आणि tcs मध्ये लॉंग पोझिशन घेतली होती. Jublfood 1407 एन्ट्री होती आणि sl 1397 चा. काय गडबड झाली माहीत नाही sl त्या किमतीला न येताच हिट झाला. बहुतेक टेक्निकल प्रॉब्लेम झाला असावा. मग Tcs मध्ये आहे त्या किमतीत बाहेर पडलो. Tcs पण 1765 ची एंट्री होती. दोन्ही ट्रेड स्ट्राईक प्राईझला घेतले होते. आज दिवस न्हवता.

काय गडबड झाली माहीत नाही sl त्या किमतीला न येताच हिट झाला. बहुतेक टेक्निकल प्रॉब्लेम झाला असावा.>>>>>>>>>>>>

https://tradingqna.com/t/i-placed-a-stop-loss-order-which-got-executed-b...

नितीन कामथची पोस्ट पहा.

Watchlist for 09.04.2020
1. CUMMINSIND(L)
CUMMINSIND 090420.JPG
2. M&MFIN(L)
M&MFIN 090420.JPG
3. CHOLAFIN(L)
CHOLAFIN 090420.JPG
4. AMBUJACEM(S)
AMBUJACEM 090420.JPG
5. TCS(S)
TCS 090420.JPG
6. BPCL(S)
BPCL 090420.JPG

Nifty playing with 9000.....
For One Month.....
10000-->7500-->9020-->8000-->9100-->??????
levels not EXACT...

मार्केट is checking.... Everyone...

Pages