इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बोकलत, अतरंगी आणि नियमीत लिहीणारे इतर सगळे, तुमच्या चर्चांचा फार फायदा होतो. अभ्यास अजुन रिफाईन करायला मदत होते आहे.

हे सगळं भावकॉपी मधे असते. <<< एक प्रश्न आहे. पुढचा महीना उद्या सुरु होईल तर तिथे असलेला डेटा कितपत खरा ( ऑथेन्टीक ) समजायचा ?

बोकलत, अतरंगी आणि नियमीत लिहीणारे इतर सगळे, तुमच्या चर्चांचा फार फायदा होतो. अभ्यास अजुन रिफाईन करायला मदत होते आहे.>>>>>+१११
आता वेळ मिळाला आहे तर शिकून घेतोय.इथे खूप छान माहिती मिळते

एक प्रश्न आहे. पुढचा महीना उद्या सुरु होईल तर तिथे असलेला डेटा कितपत खरा ( ऑथेन्टीक ) समजायचा ?>>>>>.

मला तुमचा प्रश्न नीट समजला नाही. NSE च्या वेबसाईटवरुन घेतलेला डेटा authentic समजायचा तर कोणता समजायचा?

तुम्ही भावकॉपी डाउनलोड करा. ती पाहून काही शंका असेल तर परत विचारा. त्यात सगळ्या एक्सपायरीजचा सगळ्या स्ट्राईक प्राईजचा डेटा असतो.

NSE च्या वेबसाईटवरुन घेतलेला डेटा authentic समजायचा तर कोणता समजायचा? <<< तसं नाही, महीना सुरु होतो आहे तर अजुन पूर्णपणे उलाढाल सुरु झालेली नाही म्हणून असलेला डेटा उपयोगी पडतो का असं म्हणायच होतं.

की डे ट्रेड्स करायचे असल्याने आज दिवसाअखेरीस जे काही दिसतय त्यावर उद्याचा ट्रेड ठरवणे असं करायचय ?

अजुन एक विचारते, पोझिशनल ट्रेड्स साठी एवढा लवकरचा डेटा उपयोगी पडतो का?

दोन ते तीन महीने ही सिस्टीम फॉलो केली की स्टॉकचा फिल यायला सुरुवात होतो. एप्रिलचा फ्युचरचा ओपन ईंटरेस्ट वाढायला मागच्या आठवड्यातच सुरुवात झाली.

फक्त ऑप्शन डेटावर ट्रेड घेता नाही येणार. तो फक्त तुम्हाला स्टॉकचा कल , साधारण सपोर्ट रेझिस्टन्स कुठे आहे हे सुचवू शकेल.

रोज दिवसा अखेर क्लोज कुठे आला, कॅशचे डिलिव्हरी पर्सेंटेज काय होते, फ्युचर चा OI कितीने बदलला, ऑप्शन कोणत्या लेव्हलला आणि किती राईट झाले हे सर्व मी पहातो.

यात अजून एक महत्वाचे म्हणजे ATP/VWAP. त्यापासून क्लोज कुठे आहे हे सुद्धा डे ट्रेडर साठी महत्वाचे.

फक्त ऑप्शन डेटावर ट्रेड घेता नाही येणार. तो फक्त तुम्हाला स्टॉकचा कल , साधारण सपोर्ट रेझिस्टन्स कुठे आहे हे सुचवू शकेल. <<< अर्थात. २/३ गोष्टींच कॉम्बीनेशन करुनच करावं लागणार.

यात अजून एक महत्वाचे म्हणजे ATP/VWAP << VWAP बद्दल काल परवाच कुठे तरी वाचलं . पुन्हा शोधावं लागेल.
बाय द वे, यु ट्युबवर elearnmarkets हे चॅनल मला आवडलं .

यु ट्युबवर elearnmarkets हे चॅनल मला आवडलं >>>>>

त्यावर विवेक बजाज चा derivative data analysis चा व्हिडिओ पहा.

त्याचा एक वेबिनार पण आहे त्यांच्या वेबसाईट वर ८०० की १००० रुपये fees आहे.

यु ट्युबवर elearnmarkets हे चॅनल मला आवडलं>>> +1111111
त्याचा एक वेबिनार पण आहे त्यांच्या वेबसाईट वर ८०० की १००० रुपये fees आहे.>>>> सध्यातरी काहीच घेऊ नका तिथून. मी 3 दिवसांपूर्वी एक वेबिनार घेतलं तर पैसे कट झाले आणि ते वेबिनार अकाउंट मध्ये दाखवत नाही. त्यांचा सपोर्ट स्टाफसुद्धा वर्किंग नाहीये सध्या असं दिसतंय. माझा प्रॉब्लेम सुटला की पोस्ट करेन इथे.

आज बर्‍याच दिवसांनी चार्ट पाहून ट्रेड केला.

ITC & HDFCBANK short...

दोन्ही मधे १% प्रॉफीट घेतला. बाकी ट्रेलिंगवर....

त्यावर विवेक बजाज चा derivative data analysis चा व्हिडिओ पहा.

त्याचा एक वेबिनार पण आहे त्यांच्या वेबसाईट वर ८०० की १००० रुपये fees आहे. << ओके. शोधते. थॅन्क्स.

माझा प्रॉब्लेम सुटला की पोस्ट करेन इथे. << चालेल. तो वर यु ट्युब बघते.

1. SUNPHARMA Short Loss Entry: 344.5 Exit: 345.4
Reason: Gap up opening in nifty. selling pattern in sunpharma 1min candle.
SUNPHARMA TD 27.02.20.JPG
2. COLPAL Long Profit Entry: 1199.95 Exit: 1206.7
Reason: Market started moving up. put writing on 1200 SP
COLPAL TD 27.02.20.JPG

माझा प्रॉब्लेम सुटला की पोस्ट करेन इथे. >>>> कस्टमर केअरला फोन केला की ते मदत करत आहेत. माझा प्रॉब्लेम क्लिअर केला अर्ध्या तासात.

माझा प्रॉब्लेम क्लिअर केला अर्ध्या तासात. << सो व्हिडीओ दिसतोय ना आता ? मी उद्या/परवात बघेन. किती वेळ राहतात हे पेड व्हिडीओज ?

tvc_5776c3664af5c8a8c7faab0191fa315a.png

INFY 5 mins

जर याने २.१५ च्या आत हायर लो केला तर लाँग करता येईल.... छोटासा ट्रेड होऊ शकेल दिवस संपता संपता.

सो व्हिडीओ दिसतोय ना आता ? मी उद्या/परवात बघेन. किती वेळ राहतात हे पेड व्हिडीओज ?>>>> हो दिसतोय व्हिडिओ. एकदा व्हिडिओ घेतला की कधीही पाहू शकता. मी तीन महिन्यांपूर्वी घेतलेला व्हिडिओ अजूनही दिसतोय. पर्मनंट राहतात बहुतेक.

घेतला मी ६५१.५ ला. ६५४. ७५ ला पहिला प्रॉफीट घेतला, दुसरा ६५८.०५ ला. बाकी ऊरलेली quantity, घेतलेल्या रकमेला no profit no loss वर स्टॉप लॉस हिट.

Pidilitind मधे पुट रायटिंग वाढत आहे. १४०० ला थोडे काॅल्स राईट झालेत.

15 mins चार्टवर ascending triangle pattern/ inverted flag and pole दिसतो आहे.

Watchlist for 30.03.2020
1. INDUSINDBK(S)
INDUSINDBK 30.02.20.JPG
2. BAJFINANCE(S)
BAJFIN 30.02.20.JPG
3. HDFCLIFR(S)
HDFCLIFE 30.02.20.JPG
4. BPCL(S)
BPCL 30.02.20.JPG

आज Bajfinance आणि hdfclife शॉर्ट केले. Hdfclife मध्ये लॉस झाला आणि bajfinance मध्ये प्रॉफिट.

मी hindunilvr, colpal शाॅर्ट केले. थोडा प्राॅफीट मिळाला. बाकी quantity चा स्टाॅप लाॅस हिट.

Pidilitind घेतला आहे स्विंग ट्रेडिंग साठी.

Pidilitind घेतला आहे स्विंग ट्रेडिंग साठी.>>> ऑप्शन चेन बघून घेतला की चार्ट? मी काल वेबिनार पाहिलं त्यात सांगत होते कॉल+पुट ओपन इंटरेस्ट दहा लाखाच्या वर पाहिजे.

ऑप्शन चेन बघून घेतला की चार्ट?>>>>>

दोन्ही.

काल वेबिनार पाहिलं त्यात सांगत होते कॉल+पुट ओपन इंटरेस्ट दहा लाखाच्या वर पाहिजे.>>>>>

कोणता वेबिनार?

ओके.

चांगला आहे का? काल मी पण करणार होतो. पण दुसरा केला.

मी पूर्ण नाही केला अजून. ४०-४५ मिनिटाचा व्हिडिओ बाकी आहे, पण जेव्हडा बघितला त्यात बेसिक सांगितलंय, तुम्हाला कंटाळा येईल ऐकताना.

Pages