शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.


११५ चा जो रेझिस्टन्स आहे तो
११५ चा जो रेझिस्टन्स आहे तो कालच्या दिवसात दोनवेळा टेस्ट झालाय. प्राइझने जास्त खालची मुव्हमेंट नाही दिली. त्यामुळे तो थोडा वीक दिसतोय.

DIVISLAB २२०० च्या खाली
DIVISLAB २२०० च्या खाली क्लोजिंग. दहा वाजल्यानंतर एकाच रेंजमध्ये फिरत होता. २२०० च्या खाली सेलिंग प्रेशर असेल.


अंबुजा सिमेंट 196च्या खाली
अंबुजा सिमेंट 196च्या खाली बेअरिष आहे. शॉर्ट केला तर ट्रेंडलाईन लेव्हलवरून बाऊन्स करेल. ट्रेंडलाईनजवळ आला की प्रॉफिट बुकिंग नाहीतर जर ट्रेल करायचा झाला तर स्टॉप लॉस एकदम टाईट ठेवायला नको.

ट्रेन्डलाईनवरून बरोबर बाऊन्स
ट्रेन्डलाईनवरून बरोबर बाऊन्स झाला. 196-195 च्या मध्ये ओपनिंग मिळाली असती तर शॉर्ट करायला बेस्ट होता. पहिल्याच मिनिटात जी शॉर्ट रॅली आली ती ट्रेन्डलाईनजवळच गेली., त्यामुळे शॉर्ट नाही केला.

१०३३ लेव्हलला सपोर्ट घेत होता
१०३३ लेव्हलला सपोर्ट घेत होता ती ब्रेक झाले. १० वाजल्यानंतरनंतर एका रेंजमध्ये फिरत होता. ही रेंज ब्रेक केली तर पुढचा सपोर्ट १००० आहे. रेंजच्या वर ट्रेड करायला लागला तर पुन्हा वरती जाईल. मला यात ट्रेड घ्यायचा झाला तर शॉर्ट करणं प्रेफर करेन.


Perfect
Perfect

ग्लेनमार्क गॅप फील करून
ग्लेनमार्क गॅप फील करून पुन्हा वरची रॅली पकडतोय. शॉर्ट टर्म इन्वेस्टमेनसाठी चांगला वाटतोय. खाली यायला लागला तर ४१० स्टॉप लॉस असेल.

काल नितीन भाटियाने स्विंग
काल नितीन भाटियाने स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ अपलोड केलाय. या स्ट्रॅटेजीनुसार जे थोडेफार स्टॉक बघितले त्यात मला CHEMBOND हा शेअर मिळाला. हा शेअर १४२ च्या आसपास बाय होता. आजच त्याने १४२ ला ओपन होऊन १६३ चा हाय मारला. इंट्रेस्टिंग आहे स्ट्रॅटेजी बघा एकदा.
https://www.youtube.com/watch?v=5w5sTHW6Vko
बजाज फायनान्स घेतला होता काही
बजाज फायनान्स घेतला होता काही दिवसांपूर्वी.
काही प्रॉफिट बुक केला. पुढे काय करावे अजून क्लिअर कळत नाहीए. आज खाली गेला आहे.
स्टाॅप लाॅस ट्रेल करा.
स्टाॅप लाॅस ट्रेल करा.
सध्या 3100-3450 या रेंजमध्ये
सध्या 3100-3450 या रेंजमध्ये आहे. ट्रेंडलाईन सपोर्ट करतोय. ट्रेंडलाईन ब्रेक केली तर पुढील सपोर्ट 2750 आहे. वरची रेंज 3450 ब्रेक केली तर पुढचा रेझिस्टन्स 3800.

धन्यवाद अतरंगी, बोकलत.
धन्यवाद अतरंगी, बोकलत.
Cipla resistance zone 689.10
Cipla resistance zone 689.10-692.5

सेबीचे नवीन इन्ट्राडे नियम
सेबीचे नवीन इन्ट्राडे नियम बघितले का? इन्ट्राडे बंद करणार बहुतेक.
Tata motors cup and handle.
Tata motors cup and handle.


Inside bar intraday strategy:
Inside bar intraday strategy:-
https://youtu.be/jKaKp3wubLA
20 Aug 2020
______________________________________________________
21 Aug 2020
______________________________________________________
यासाठी मी एक स्क्रीनर बनवला आहे :-
https://chartink.com/screener/inside-bar-strategy-49
Stock selection करताना मात्र ट्रेण्ड, volume आणि मार्केटची दिशा लक्षात घ्यावी लागते.
भारीच.
भारीच.
(No subject)
_____________________________
TATACHEM 10:00 AM
Entry:-323.45
Exit:-328.55
Stop loss:-321
______________________________________________________
______________________________________________________
गेले काही दिवस ४३६-४३७ ला
गेले काही दिवस ४३६-४३७ ला सपोर्ट घेत होता. परवाच्या दिवशी हि लेव्हल ब्रेक करून ४३२ ची क्लोजिंग दिले. आता उद्या हा स्टॉक जर ४३६ च्या खाली ओपन झाला तर शॉर्ट करण्यासाठी चांगला असेल. ४३६ च्या जेव्हडा आसपास मिळेल तेव्हडा शॉर्ट करायला चांगला आहे कारण पुढचा सपोर्ट ४२८ ला आहे. त्यामुळे ४२८ च्या आसपास जर का हा आला तर तिथून एकतर बाउंस बॅक करेल नाहीतर एक दोन रीट्रेसमेन्ट देऊन हि ४२८ची लेव्हल ब्रेक करून अजून खाली जाऊ शकतो त्यामुळे ४२८ च्या आसपास मिळत असेल तर शॉर्ट करणं धोकादायक ठरू शकतं.

४०० च्या वर क्लोजिंग. आता ४००
४०० च्या वर क्लोजिंग. आता ४०० हा सपोर्ट बनलाय. जर का ४०० च्या वर ओपन झाला तर बाईंगसाठी चांगला असेल ४१० आणि ४१५ या दोन क्रिटिकल लेव्हल आहेत जिथून हा स्टॉक परत खाली येऊ शकतो.

सपोर्ट चा source काय आहे?
सपोर्ट चा source काय आहे?
Trandline का?
डिमांड सप्लाय झोन. हॉरीझॉंटल
डिमांड सप्लाय झोन. हॉरीझॉंटल ट्रेंडलाईन बोललात तरी चालेल.
चार्ट छान असतात तुमचे
चार्ट छान असतात तुमचे
Fibonasi लेव्हल ऍड करून बघा
Icici २०० moving average पण
Icici २०० moving average पण ४०० जवळच आहे पण क्लोसिंग ३५ पैसे खाली आहे
उद्या वर गेल्यावर २०० moving average पण सपोर्ट आहे
चार्ट छान असतात तुमचे>>>
चार्ट छान असतात तुमचे>>> धन्यवाद
Fibonasi लेव्हल ऍड करून बघा>>>> हो माईंडमध्ये असतो फिबोनासी. इंडिकेटर लावून एकदम कट टू कट लेव्हस फॉलो नाही करत. ट्रेडिंग करताना कुठलाच इंडिकेटर वापरत नाही मी. एक volume इंडिकेटर असतो त्याला पण जास्त वेटेज नाही देत.
Hindpetro पण बघा उद्या साठी
Hindpetro पण बघा उद्या साठी
177च्या वर बुलीश आहे तो.
177च्या वर बुलीश आहे तो. 177च्या खाली ओपनिंग दिली तर 177 रेझिस्टन्स बनेल.
हो १७७ १० ma आहे rsi macd
हो १७७ १० ma आहे rsi macd बघता उद्या क्रॉस करेल १७७
(No subject)
______________________________________________________
https://tradingqna.com/t/peak-margin-requirements-from-dec-1st-2020-its-...
Pages