मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोलाज Lol

काल पहिला पाडवा म्हणुन सासरी गेलेलो. सगळेच चेहरे नविन होते (काही अपवाद वगळता Proud ). शांत बसायचं माहीत(च) नाही त्याचा हा परीणाम. इकडे तिकडे पाहीले तर समोरच्या सोप्यावर एक माणुस एका लहान मुलीला घेउन बसलेला. गुड्डी असे काहीतरी बडबडताना मगाशी ऐकलेले म्हणुन तिला मी हाक मारले "ये गुड्डी इकडे ये..." पन काही केल्या ति रियाक्षन देइना.. Sad मग तिकडून मेहुणुआने ओरडुन सांगितलं.... भावजी, तिच्या मम्मीचे नाव गुड्डी आहे... Uhoh आणि ती 'ती' नसुन 'तो' आहे.. Happy

नंतर कळ्ळे की तो माणुस त्या बाळाचे आजोबा नि 'गुड्डी' चे सासरे होत Proud
मनातल्या मनात त्या माणसाला शिव्या घात्ल्या....

मल्ल्या Rofl तु काय 'रोज एक वेंधळेपणा करायचाच' असा नविन वर्षाचा नेम केलायस का? तुझ नाव बदलुन 'वेंधळेबापु' ठेवल पाहिजे Lol

तु काय 'रोज एक वेंधळेपणा करायचाच' असा नविन वर्षाचा नेम केलायस का?
हटे... उलट आज कसला वेधळेपणा करायचं नाही म्हंटलं की काहीतरी झालेलं अस्तंच... Sad अन तेही नंतर कळतं की आपण काहीतरी वेगळं/चुकीचं केलं म्हणुन.. Uhoh

श्री... Lol Rofl Biggrin

Rofl

मल्ल्या बोर झाला तुझा वेंधळेपणा नविन काहीतरी (माकडचेष्टा) कर आता.. Proud

मल्ल्या बोर झाला तुझा वेंधळेपणा >> अगदी अगदी दक्षे.. , मल्ल्या आता काहीतरी हटके कर Proud

काल घरी कॉन्फरंसला मिळालेले भिंतीवरचे घड्याळ उघडले. डिजायनर की काय म्हणतात तसे होते. उघडत असताना मी म्हणाले... "व्वा.. भारिच आहे की.. काटा पण थर्माकोलचा आहे".. लेक माझ्याकडे पहायला लागला Uhoh

काट्यावरचे पॅकींग होते ते थर्माकोलचे Angry

सात-आठ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. आम्ही तेव्हा फिरोजपूरला होतो. आमचा एक मित्र, जो एअरफोर्समध्ये आहे, आग्र्याला होता. तो व त्याची बायको आम्हांला नेहमी आग्र्याला बोलावत असत. तेव्हा एका मार्च महिन्यात आम्ही चार दिवसांसाठी त्यांच्याकडे गेलो. जातानाही पंजाबमेलनी गेलो आणि येतानाचेही पंजाब मेलचे आरक्षण केले होते.
चार दिवस मजा करून आम्ही परत निघालो. सगळं सामान घेऊन स्टेशनवर पोहचलो. पंजाब मेल कोणत्या प्लॅट्फॉर्मवर येते ते विचारायला मी चौकशी खिडकीवर गेले. तर तो म्हणाला," गाडी चार नं.वर आहे." तेव्हा ४.२५ वाजत होते. गाडीची वेळ ४.५५ होती. म्हणून मी म्हणाले," आज गाडी लवकर आलेय का?" तर तो म्हणाला," नाही. उलट लेट झाली आहे. ती बघा निघाली." मी गाडी समोरून जाताना बघितली. मला काही कळेना. मी पटकन येऊन नवर्‍याकडून तिकीट घेऊन चेक केले तर त्यावर गाडीची वेळ ४.१५ होती. मला कळेना असं कसं झालं. नीट बघितलं तर तिकीटावर तिकीट काढल्याची जी वेळ होती ती होती ४.५५.
माझ्या वेंधळेपणामुळे आमची गाडी चुकली होती.

वर्षा, प्राची भारीच आहेत किस्से! Happy
प्राची, माझा एकदा असाच घोटाळा झालेला! तिकिटावर जी तारीख होती त्याबरोबर जी वेळ होती ती १२.३० PM.
आणि मी ते त्याच्या दुसर्‍या दिवसाचे तिकिट समजून त्या रात्री प्रवासास निघाले. एकाच बर्थवर दोन-दोन माणसे कशी ह्याचा छडा लावताना झालेल्या घोळाचा पत्ता लागला! बरं, रात्री-बेरात्री मधेच कुठे उतरताही येईना! मग काय! भरला दंड, दिले टीसी ला जास्त पैसे आणि मिळवला एक बर्थ कसाबसा!!

काटा पण थर्माकोलचा आहे... Biggrin Rofl

एकदा आम्ही मुंबई हून बँकॉक ला निघालो होतो. तिकिटात रात्री १२.०५ अशी फ्लाईट ची वेळ असल्यामुळे तारीख बदललेली होती..आम्ही दुसर्‍या दिवशी निघायचे म्हणत आरामात घरी बसलो होतो. आठेकवाजता पुन्हा एकदा सहज तिकिटावर नजर टाकली आणी अक्षरशः दणाणली..कारण तारीख जरी उद्याची असली तरी एअरपोर्टवर मात्र आज रात्रीच ९ पर्यन्त पोचायचे होते..मग काय जी धावपळ उडाली एकदम..धडपडत (आणी आपल्याच वेंधळेपणा चा राग करत!!) पोचलो एकदाचे वेळेवर..

अरे..मी माझा किस्सा टायपेपर्यन्त अरुंधती चा सिमिलर किस्सा आला... व्हॉट अ कोइन्सीडंस Happy

आज सकाळ्च्याला च्या बनवली. तोंडात टाकताच थुंकली. मला वाटलं दूध खराब झालं कि काय. कॅनवरची डेट बघितली तर अजून आठवडा होता एक्स्पायर व्हाय्ला. म्हणून नवीन भांड्यात परत चहा बनवला, परत तेच, परत थू थू... मग डिटेल अ‍ॅनालिसिस केली तेव्हा लक्षात आल कि साखर म्हणून मीठ टाकलं चहात. काय करणार, साखर आणि मीठ यात visible difference नाहीयं ना इकडे Sad

अरे..मी माझा किस्सा टायपेपर्यन्त अरुंधती चा सिमिलर किस्सा आला... व्हॉट अ कोइन्सीडंस

ग्रेट पीपल आल्वेज थिन्क अलाईक ! हाकानाका?
एक मात्र खरे . त्या रेल्वे प्रवासाचे तंत्र मलाही काही कळत नाही बुवा. बस आणि रेल्वे असा पर्याय असेल तर मी नेहमी बसने जातो . कितीही अन्तर असले तरी. एक तर पहिल्यान्दा त्या रेलवेचा विषिष्ट वास डोक्यात घुसला की आठ दिवस त्याची 'धुन्दी' उतरत नाही.पुनन्हा ते वेटिंग अन अगेन्स्त कन्फर्मेशन वगैरे वगैरे . मला सारखे वाटत असते की माझे अधिकृत तिकीट देखील टेक्निकली काहीतरीच्झूक आहे असे दाखवून टीसी मला दन्ड करणार, उतरवून देणारवगैरे. ते वेटिंग लिस्ट्वरचे रिझर्वेशन म्हनजे जीव टांगणीला . मला कोणी धीर देईल का? Happy

मला कोणी धीर देईल का? >>> टोणगा एवढी भिती वाटत असेल तर खरचं रेल्वेने प्रवास करु नकोस , बघ दिला की नाही धीर . Proud

मी आप्ला आब्रूदार माणूस त्या टीसीने तिकीट पाह्यला मागितले तर तो ओके करीपर्यन्त माझ्या जीवात जीव नस्तो. मागे दिल्लीला जाताना मध्यप्रदेशात डाकू सारखे दिसणारे पोलीस डब्यात आले. इकडे तिकडे संशयाने पहात डब्याच्या ह्या कडेपासून त्या कडेपर्यन्त ते गेले . ते तर मलाच शोधीत असल्यासारखा फील मला आला. (दुसर्‍या डब्यात काही मंडली दारू पीत बसली होती. त्यांच्याकडून त्यानी ती दारू जप्त केली आणि स्वतः तिसर्‍या डब्यात जाऊन पीत बसले ! (म्हणे !))

Pages