Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टॉवेल आणि लुंगी
टॉवेल आणि लुंगी
हा किस्सा माझ्या बालपणीचा,
हा किस्सा माझ्या बालपणीचा, माझे बाबा मला नेहामी शा. शि. (शारिरीक शिक्षण) च्या दिवशी मैदानावर सोडायला यायचे, आणि न्यायला पण.. पन नेहमी उशिरा यायचे..उन्हात उभ राहुन माझा दर शनिवारि पुतळा व्हायचा... तर एके शनिवारी मला ते म्हणाले तु चिडचिड करण्यापेक्षा त्या विनोबान्च्या पुतळ्याजवळ येउन थाम्ब... मी वैतागालेले आणि चिडुन विचाराला "हा आणि कोणता पुतोबा"... आणि आम्ही दोघेही बराच वेळ हसत होतो.... खि खि खि... माझी ताई अजुनही कधी कधी चिडवते... काय पुतोबेश्वरी म्हणुन...
माझी एक मैत्रीण सर्पमित्र
माझी एक मैत्रीण सर्पमित्र (चुकल मैत्रिण) आहे..(बरेचदा) पावसळ्याच्या दिवसात ती (बहुदा) डिमान्ड मधे असायची (कारण पावसळ्यात साप बाहेर पडतात म्हणे खराखोटा सर्प मित्र आणि मैत्रिणीना माहीत) असो ..... तर एकदा ती घरी आली ..पार्कीन्ग मध्ये स्कुटी लावली आणि घरी पळाली (कित्ती ती घाई??) सामान डिकीमध्येच्... नन्तर नवरा आल्य्यावर्...खिडकीतुन चावी फेकली त्याच्या अन्गावर आणि म्हणाली सामान डिकीतच राहिलाय घेउन ये ना प्लीज्...नवर्याने चावी लावाली..डिकी उघडली ..सामान काढाल पिशवी काढली आणि किन्चाळला जोरात.... पिशवित काहितरी वळवळतेय म्हणुन.. आणि शहाणी मैत्रिण वरुन म्हणते..मुर्खा ओरडतोयेस काय मी कित्ति घाबराले... बिन विषारीच साप आहे ना..ओह्ह्ह्ह्ह विसरालेच की त्याला सोडायला पर्वतीवर..
ती साप पकडते तेव्हा साप पण
ती साप पकडते तेव्हा साप पण किंचाळतो म्हणे. आणि मग ती सापाला पण ओरडते, मुर्खा ओरडोयतोस काय, मी कित्ती घाबरले बिनविषारीच आहे ना मी.
साप ओरडत नाही ...फुत्कारतो...
साप ओरडत नाही ...फुत्कारतो... पण ती त्याच्यावर ओरडल्याचा ऐकीवात नाही बुवा...
पण ती त्याच्यावर ओरडल्याचा
पण ती त्याच्यावर ओरडल्याचा ऐकीवात नाही बुवा..
ति मनातल्या मनात ओरडत असेल... कारण सापाला कान नसतात ना...
मल्ली , पनु , चिनगुडी
मल्ली , पनु , चिनगुडी
अई गं हसुन हसुन वाट लागली
अई गं

हसुन हसुन वाट लागली आहे माझी.
आणि चिन्गुडी तुझी मैत्रीण काय धन्य आहे? पकडलेला साप सोडायचा विसरली, आणि विसरली ते विसरली वर नवर्यालाच अक्कल शिकवते कि साप बिनविषारी आहे ओरडतोयेस काय म्हणून
होना... धन्यं म्हणजे नंतर तर
होना... धन्यं म्हणजे नंतर तर ती आली कि आम्ही तीला आधीच विचारायचो कि बाई काही साप,नाग, गाडुंळ नाहीयेना पर्स किंवा डिकी मध्ये... माझ्यातर ती स्वप्नात यायची सापाला कुरवाळत आणि माझ्याकडे बोट दाखवुन म्हणतेय की अरे माझी मैत्रिण आहे ... बिनविषारी आहे.. काही नाही करणार... मार डंख तिला..
आता माझ्या लहानपणीचा माझाचं
आता माझ्या लहानपणीचा माझाचं एक किस्सा .... त्या वेळेस आम्ही फ्रेश दुध घ्यायचो डायरेक्ट गवळ्याकडुन... तर आमचा हा मॉडर्न गवळी रिक्क्षा घेऊन संध्याकाळी दुध द्यायला यायचा...आणि घराबाहेर येऊन हॉर्न वाजवयाचा....की माझी आणि ताई ची भांडणं सुरु व्हायची..कोण दुध आणायला जाणार म्हणुन?... तर एकदा असाच हॉर्न वाजला... माझं आणि ताई चं भांडण होऊन आई नी मला पातेलं घेउन पिटाळलं..... मी चिडचिड करत गेले आणि त्या रिक्क्षेवाल्याच्या हातात (हिम्मत बघा) पातेलं देउन खेकसले "एक लिटर" (अजुन ताई खिडकीतुन दात विचकावत होतीच.... ) तो रिक्क्षेवाला चकीत.. (आधी चकीत आणि मग चक्कीत जाळ ...कोल्हापुरची न मी)...तो म्हणे "हे काय"...मी ताई ला शिव्या देउन वळुन पाहीले तर हा साधा रिक्क्षेवाला होता...(शेजारच्या काकु घरुन मीटर चे पैसे आणुन देत होत्या).... आणि त्याची टिवटिव सुरु झाली.... संध्याकाळच्या येळेला मस्करी करतीये कार्टी म्हणुन्...मी धुम ठिकुन घरात आणि आधी जाऊन ताई ची धुलाई
आमचे एक मित्र जोडपे आहे... तर
आमचे एक मित्र जोडपे आहे... तर त्याना रस्ता चुकायची फार खोड आहे... ब्रुसेल्स मध्ये पीक टायमाला लांब बसेस असतात आणि दुपारी कमी गर्दीच्या वेळी साध्या ( छोट्या /नॉरमल) बसेस असतात्...तर मैत्रिण पहिले वेळेस आली तेव्हा दुपारी आली आणि पुढच्या वेळेस नवर्याला घेऊन आली तेव्हा संध्याकाळी आली... आणि नेहामी प्रमाणे उशीर झाला आणि तीने फोन केला आम्ही रस्ता चुकलो होतो आणि आता तुमच्या बिल्डींगची बेल वाजवत आहे पण तुम्ही दरवाजा का नाही उघडत? आम्ही म्हणालो पण तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात्...तर ते दोघे भलत्याच ठिकाणी होते... मग कसेतरी पोहोचले ते ...मी चकित झाले अगं एवढसं ब्रुसेल्स, त्यात तु येऊन गेलेली आहेस त्या ठिकाणी परत येताना कसा काय रस्ता चुकु शकतेस? तर तिचा उत्तर "अगं पहिल्या वेळेस लहान बस ने आले..आज लांब (मोठी) बस होती आणि सगळयात मागच्या दाराने उतरले...म्हणुन रस्ता चुकले.." या उत्तरावर मी निरुत्तर...
ते लोक आता जायाच्या ठिकाणचा मॅप घेउनच जातात आणि पत्ता न चुकता दिशा चुकतात आणि बरोबर उलट दिशेला जातात्...अणि वर हसं नको व्हायला म्हणुन म्हणतात की तेवढाच नविन भाग एस्क्प्लोर केला...
...
ऑफीस मध्ये एकदा क्लायंट
ऑफीस मध्ये एकदा क्लायंट फीडबॅक संदार्भात चर्चा चालु होती खुप तंग वातावरण होतं...आदल्या दिवशीच क्लायंटने बोंब मारली होती तर आम्ही स्ट्रॅटेजी ठरवत होतो... मी म्हणाले " आपण असा ...*^&%&^ करुया.... म्हणजे कसं आपण आपली सावधानी घेतलेली बरी..." आणि अचानक माझ्या कलीग ला काय सुचलं काय माहीत ...भर मीटींग मधे गाणं म्हंटलं " जरासी सावधानी जिंदगी भर आसानी" आणि आम्ही सगळे एकमेकांकडे एक क्षण पाहीलं आणि जो काही हशा पिकला.. नंतर सगळ्यानी मिळुन त्याचं बारसं केला... काय नाव ठेवलं हे सुद्न्यास सांगणे न लगे....
लग्नानंतर पहील्यांदा आम्ही
लग्नानंतर पहील्यांदा आम्ही सगळे (सासर आणि माहेरचे लोक्स) मिळुन जेजुरीच्या खंडोबाला दर्शनासाठी गेलो होतो...मी आणि नवरा अभिषेकाला बसलो..लब्बाड गुरुजींनी पंचाम्रूत आणलंच नव्हतं...आता आली का पंचाईत (हातचं गिर्हाईक कसं जाऊ द्याचं??) त्यानी आम्हाला पुजेला बसवलं आणि सुरु झाले मंत्र... मला जाम कंटाळा आला होता आणि भुक पण खुप लागलेली.... गुरुजींनी पळीभर दुध दिलं...नवरोबांनी मम म्हणत वाहीलं...मी नवर्याच्या हाताला हात लावला.. (लई बोर काम)...असं करत करत.. तुप झालं...मध झाला..दही झालं ..... गुरुजी मला प्रसन्न झाले आणि केळाचा एक काप माझ्या हातावर ठेवला... मी लगेच अधाश्यासारखा खाऊन पण टाकला... अणि सगळे माझ्याकडे टकमक बघायला लागले... गुरुजी पटकन खेकसले... "ते वाहायला दिला होता....खायला नाही... नैवेद्याला अवकाश आहे अजुन... " मी लईच कावरीबावरी झाले तेव्हा
... नेक्ष्ट टाईम नो मिश्कीट... गुरुजीना आधीच विचारले पंचाम्रूत व्यवस्थित आहे ना "प्री-मिक्सड" 
चिन्गुडी , एकसे एक किस्से
चिन्गुडी , एकसे एक किस्से आहेत .
<<< त्या वेळेस आम्ही फ्रेश दुध घ्यायचो डायरेक्ट गवळ्याकडुन... >>>
पण तुमच्या ह्या वाक्याने पडता पडता वाचलो , नंतर तुम्हाला काय म्हणायचं आहेत ते लक्षात आलं
काय एकसे एक किस्से आहेत !
काय एकसे एक किस्से आहेत !
>>त्या वेळेस आम्ही फ्रेश दुध घ्यायचो डायरेक्ट गवळ्याकडुन.
>>त्या वेळेस आम्ही फ्रेश दुध
>>त्या वेळेस आम्ही फ्रेश दुध घ्यायचो डायरेक्ट गवळ्याकडुन.....

माझा सकाळचा
माझा सकाळचा वेंधलेपना.......
रोज सकाळी ६.३० ला बायकोला शालेला सोडायला जात असतो.. मी गाडी काढेपर्यंत बायडी कुलुप वगैरे लाउन खाली पार्कींग मध्ये येते. आजही ति रोजच्या प्रमाने कुलुप लावुन आली. मि तिला शाळेतही सोडुन आलो. गाडी पार्क करुन वर गेल्यावर आठवले की माझ्या कडे घरची चावीच नाही.
माझ्याकडची चावी दरवाज्याला होती, म्हंजे बायकोने कुलुप लावुन दोन्ही चाव्या तिच्या कडेच ठेवल्या ? नाईलाज म्हनुन पुन्हा तिच्या शाळेला गेलो (सांगवी-टु-भोसरी)
प्रार्थना चालु असल्याने शिपाई कडुन तिने चावी पाठवुन दिलि. तिच्या कडुन चावी घेउन आलो... घरात आल्यावर कळ्ळे की माझी चावी माझ्याकडेच होती..
फुकटचा कात्या कुट झाला सकाळ सकाळी....
कुणी गोड पिठ्ल (पाकातले
कुणी गोड पिठ्ल (पाकातले गुलाबजामुन) खाल्लय का??? मला छान जमले होते.
लग्न झाल्यावर नवरा म्हणाला
लग्न झाल्यावर नवरा म्हणाला सुधारस आवड्तो. त्यात काय मोठ? अस म्हणुन मी पातेलेभर पाण्यात एक लिम्बु आणी वाटीभर साखर घालुन २ तास वाट बघत बसले कधी सुधारस होतोय याचि? शेवटी फ्रीज मधे ठेवुन सरबत म्हणुन नवर्यालाच पाजले.
रोज सकाळी ६.३० ला बायकोला
रोज सकाळी ६.३० ला बायकोला शालेला सोडायला जात असतो.. >>> मल्ली लेका तुझ्या हातात बेड्या पडतील अशाने , एक तर नाबालीग मुलीशी लग्न केलं असं जाणवतयं तुझ्या पोस्टवरुन आणि त्यात परत तु ते मायबोलीवर कबुलही करतोयेस
एक तर नाबालीग मुलीशी लग्न
एक तर नाबालीग मुलीशी लग्न केलं असं जाणवतयं तुझ्या पोस्टवरुन आणि त्यात परत तु ते मायबोलीवर कबुलही करतोयेस
आतारे काय कारायचं ?
आभोआकफ
आभोआकफ
मल्ली बिन्धास्त सांग रे
मल्ली बिन्धास्त सांग रे मायबोलीवर ओरडून. तू तरी कुठे बालीग आहेस ? कोण च्याल्येंज देईल त्याला बोलाव कट्ट्यावर
२-३ दिवसानपासुन कोणिच
२-३ दिवसानपासुन कोणिच वेंधळेपणा केला नाहि वाट्त!!!
२-३ दिवसानपासुन कोणिच
२-३ दिवसानपासुन कोणिच वेंधळेपणा केला नाहि वाट्त!!!>>>>>>>>
खरच मी पण आत्ता हेच म्हणणार होते.
मला वाटत कि आता सगळ्यांनी वेंधळेपणा सोडून ईब्लिसपणा करायला सुरूवात केली आहे.
हाय. पहिले पोस्ट इथे. कपडे
हाय.
पहिले पोस्ट इथे. कपडे उलटे घालण्यात माझा कॉपीराइट आहे. म्हणजे शिवण दिसतील असे उल्टे किन्वा
मागील बाजु पुढे पुढील बाजु मागे. असे. परवा एक कुड्ता घरातुन जाताना बरोबर घातला होता पण फिटिन्ग अजीब वाट्ले म्हणुन हापिसात जाउन लगेच उल्टा करुन घातला. मागील बाजु पूढे. तसेच काम केले. मग बाहेर जायचे होते म्हणुन खोलीतुन बाहेर आले व एका कलीग शी बोलत होते तर लक्षात आले की हे आपण उल्टे घातले आहे. सही बाजुवर मला कळावे म्हणुन एक पॅचवर्क ही होते. मग परत तो बदलुन सुल्टा घातला.
व बाहेर गेले. कलीग निदान माझ्यासमोर तरी हसले नाहीत.
बापरे काय भन्नाट किस्से एकेक
बापरे काय भन्नाट किस्से एकेक
प्यान्टीची झिप्/बटन्स न लावता
प्यान्टीची झिप्/बटन्स न लावता कोण गावभर फिरून आलेत आणि नन्तर आपण कोणाकोणाला भेटलोय त्याची आठवण काढीत बसलेत असे कोण कोण आहेत इथे ?
हुड काय हे? आप ह्यांभी?
हुड काय हे? आप ह्यांभी?
प्यान्टीची झिप्/बटन्स न लावता
प्यान्टीची झिप्/बटन्स न लावता कोण गावभर फिरून आलेत आणि नन्तर आपण कोणाकोणाला भेटलोय त्याची आठवण काढीत बसलेत असे कोण कोण आहेत इथे ? >>>
गावभर नाही पण शिकागो च्या कॉन्फरन्स मध्ये दुपार पासुन संध्याकाळ फिरलो होतो. प्यांट काढताना लक्शात आले.
Pages