Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजे... रताळ, थालीपीठ >>
मंजे... रताळ, थालीपीठ >>
,
करपट थालीपीठा चा प्रश्ण.. 'माझे काय चूकले' या बीबीवर टाक्..लोक त्यातनही सोल्युशन सांगतिल
ग्रेट चाहे दुनीया इधर की उधर
ग्रेट चाहे दुनीया इधर की उधर हो जाये ये बीबी हमेशा रौशन रहे अम्मा........
मंजे
मंजे
अगो ग्रेट आहेस , तो मित्र
अगो ग्रेट आहेस , तो मित्र जेवण्यापुर्वी १० दा विचार करेल .

मला तर बरेचदा अचानक समोर आलेल्या माणसांचं नावचं आठवत नाही . 
आशुतोष , आता तु भारतात परत आलास की तुझं काही खरं नाही .
केदार
सही किस्से आहेत. हा एक माझा:
सही किस्से आहेत. हा एक माझा: एक दिवशी सकाळी सकाळी ऑयल इंडिकेटर ऑन झाला म्हणुन गाडी घेऊन सर्विस स्टेशनला गेले. तिथुन सरळ ऑफिसला गेले. संध्याकाळी निघताना अंधार झाला होता. मी नेहेमीच्या सवयीने गाडी हाय वे वर काढली. एका गाडीला ओवर टेक केल्यावर लक्षात आले की मागचा गाडीवाला फ्लॅश मारतोय. सहसा काही चुकीचे लक्षात आले की असे इंडिकेट करतात ना लोक. मग मी सीट बेल्ट लावलाय का बघितला, ट्रंक बंद आहे, दारं बंद आहेत सगळे बघितले. तेव्हा मला असे एकदा वाटले की गाडीतले कंट्रोल्स नीट दिसत नाहीयेत. मी विचार करतेय की आज फारच ढग आलेत, अंधारुन आलेय त्यामुळे असे असेल
तो मागच्या फ्लॅश मारतच होता. मला वाटलं त्याला नक्की पुढे जायचय म्हणुन हाय बीम मारतोय. जायचय तर दुसर्या लेनमधुन जा ना. मला कशाला फ्लॅश मारतोय. मी अजिबात ह्याला जाऊ देणार नाही म्हणुन मी जरा स्पीडमधे काढली. मग मधे मी गॅस घ्यायला गाडी एका गावात घेतली. तिथे एका वळणावर अंधारात पुढचा रस्ता दिसेना तेव्हा लक्षात आले की हेड लाइट्स बंद होते
माझ्या गाडीचे हेड लाइट्स नेहेमी ऑटो वर ठेवलेले असतात. पण सकाळी सर्विस सेंटरच्या लोकांनी रीसेट केले असणार. नशीब मामुने नाही बघितले नायतर तिकिट नक्की होते.
केदार , मंजिरी भन्नाट
केदार , मंजिरी भन्नाट
रताळं???
रताळं???
सिंडरेला.... रिस्की वेंधळेपणा, हो!

तू बराच वेळ काही रिस्पॉन्स देत नाहीस म्हटल्यावर त्या मागच्या गाडीवाल्यालाच वाटलं असेल की आपणच काहीतरी वेंधळेपणा करून फ्लॅश मारला की काय
एक किस्सा- कोर्टात मोबाईल फोन
एक किस्सा-
असे अनेक किस्से झालेत.
कोर्टात मोबाईल फोन वापरास बंदी आहे. त्यामुळे मोबाईल सायलेट मोड वर ठेवावा लागतो, नाही तर एक तर बंद ठेवावा लागतो. मोबाईल वाजल्यास जप्त करुन नंतर दंड आकारण्यात येतो.
एके दिवशी एका अशिलाचे वकील बाहेर गावी गेलेत म्हणुन पुढची तारीख मिळाणे करिता अर्ज घेऊन कोर्टात आला. आणि त्याचा मोबाईल अचानक वाजला. मग त्याने तो गडबडीत काढुन ऑन करुन बोलण्यास बाहेर जाऊ लागला. तेव्हढ्यात जज्ज साहेबांनी आदेश दिला, "मोबाईल इकडे आणा!" तर हे बहाद्दर सरळ मोबाईल च्या पलिकडील इसमास (त्याचे वकिलांना) म्हणाले, "थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी." म्हणत सरळ डायसवर चढुन जज्ज साहेबांच्या हातात मोबाईल दिला. त्या प्रकाराने सर्वच अचंबित झाले. नंतर सर्वांना हसु आवरेनासे झाले.
"थांबा साहेब बोलता आहेत
"थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी." >>
लै भारी.
>>"थांबा साहेब बोलता आहेत
>>"थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी." >>

छावा, जज्ज वेडा नाही झाला का ही रिअॅक्शन पाहून?
थांबा साहेब बोलता आहेत
थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी >>> अ श क्य
मी इमॅजीन करुन हस्तेय एकटीच 
छावा ... आजच्या रीफ्रेशींग
छावा
... आजच्या रीफ्रेशींग डोस साठी हा एकच किस्सा पुरसा आहे 
थांबा साहेब बोलता आहेत
थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी >> लै भारी राव. मी इकडे एकटाच वेड्यासारखा हासुन रायलो.
>>>>"थांबा साहेब बोलता आहेत
>>>>"थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी."
छावा
>>>>"थांबा साहेब बोलताहेत
>>>>"थांबा साहेब बोलताहेत तुमच्याशी."
तेवढ्यात कोर्टाने त्यास खडसावुन बाहेर जाऊन तोंड मोकळे करुन येण्यास सांगितले व नाममात्र दंड केला.
छावा
------------------------
आमच्या इथेही कोर्टात मजेशीर किस्सा झाला होता. एक इसम कोर्टामध्ये केस चालु असताना तोंडात तम्बाखुची गुळणी धरुन बसला होता. त्याची साक्ष आल्यावर महाशय कुत्र्यासारखं तोंड वर करुन मुखरस सांभाळीत बोलायला लागले. त्याची ती अवस्था बघुन कोर्टात बाकीचे लोक हसायला लागले.
त्या गुळणीवाल्या अशिलाच्या वकिलाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.
छावा अन ससेभाऊ, तुम्ही दोघं
छावा अन ससेभाऊ, तुम्ही दोघं कोर्टात काय करता?
"थांबा साहेब बोलताहेत
"थांबा साहेब बोलताहेत तुमच्याशी.">>>>>>>>>>
भन्नाट किस्सा आहे.
बाय द वे, मला कोर्ट (इथे न्यायाधीश ह्या अर्थाने) म्हणजे डॉ मोहन आगाशे आणि तो साक्षीदारच्या ऐवजी वकील असलेला (?)
मकरंद अनासपुरे दिसला.
म्हणजे डॉ मोहन आगाशे आणि तो
म्हणजे डॉ मोहन आगाशे आणि तो साक्षीदारच्या ऐवजी वकील असलेला (?)
मकरंद अनासपुरे दिसला.
>>
काल 'कायद्याचं बोला' पाहीलास का??
<<<"थांबा साहेब बोलता आहेत
<<<"थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी." >>>

म्हणुनचं म्हणतात वाटतं शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये . एक तर वकिलाला फी द्या अन अशा चुका करुन वर परत दंड भरा
दिपुर्झा..... "रताळ्या" काय
दिपुर्झा..... "रताळ्या"
काय तर एक एक नमुने..... भन्नाट सुरु !!
हा लेटेस्ट किस्सा - कैरोला
हा लेटेस्ट किस्सा -
कैरोला असलो की रोज संध्याकाळी एक फोन घरी करुन डेली रिपोर्टींगचा शिरस्ता.गेल्या आठवड्यात असाच ऑफिसमधून निघायच्या आधी फोन केला. फोनवर नेहमीप्रमाणे अर्धांगिनीची बडबड चालू झाली.
ईतक्यात सेक्रेटरी येऊन रीपोर्टसमध्ये काही बदल करायचेत का म्हणुन विचारत आली. हँड्स फ्री कानाला होताच तरीही मी गप्पच कारण अर्धांगाचा मंजुळ(?) स्वर कानात पडत होता. शिवाय घरी फोन केल्यावर माझा रोल फक्त श्रोत्याचा,हो,नाही,ठीक यापलीकडे फारसं काहीच बोलु न देण्याचा अर्धांगाचा आटोकाट प्रयत्न.
सेक्रेटरीला कशाला ताटकळवत ठेवा म्हणुन तिला पटापट बदल सांगितले.तरी ती आपली मख्ख चेहरा करुन उभीच. कानात ठणाणा तसाच चालू.
२ मिनिटांनी डोक्यात प्रकाश पडला की सेक्रेटरीला मराठीत बदल काय हवे होते ते सांगितले आणि फोनवर अर्धांगिनीशी अरेबिकमध्ये बोललो.
आशुतोष , तरी तुला सांगत असतो
तरी तुला सांगत असतो , एका वेळी कुठल्यातर एकाच योध्याशी लढत जा .
श्री,काय करणार? माझ्या
श्री,काय करणार? माझ्या युद्धकौशल्यावर असलेला माझा अतिआत्मविश्वास नडतो
तोषा... सेक्रेटरीनी मख्ख
तोषा...

सेक्रेटरीनी मख्ख चेहरा केला पण संपदाची काय रीअॅक्शन होती रे
मंजे,संपदाला कळेचना की अचानक
मंजे,संपदाला कळेचना की अचानक हा मराठी सोडून कोणत्या भलत्याच भाषेत बरळायला लागला? म्हणुन ठणाणा आणखी जोरात चालू
तोषा, बायकोला आरेबिक कळते का?
तोषा,
बायकोला आरेबिक कळते का?
तोषा नाहीतर तू अरेबिक मधे
तोषा

नाहीतर तू अरेबिक मधे बायकोशी बोलल्यानंतर ती म्हणायची, एवढा वेळ मी हेच तर सांगत होते तुला.....
परवा लायब्ररीतून डीवीडी
परवा लायब्ररीतून डीवीडी आणल्या. गड्बडीत परत करायला झाले नाही. काल नक्की परत करायच्या म्हणुन
टिफिनबरोबर ब्यागेत ठेवल्या. नेहमी मी ब्रीफ्केस मध्ये अश्या परत करायच्या गोष्टी ठेवते. घरी वेळ झाला नाही म्हणुन ऑफिसात बसुन पुर्ण ब्रीफकेस आवरली. परतताना लायब्ररीत गेले व ब्रीफकेस मध्ये पाहिले तर डीवीडीज नाहीत. ऑफिसात विसरल्या म्हणुन स्वतःलाच शिव्या घातल्या. ( दोन डीस्कस प्रतीदिनी १५० रु. ची फोडणी) घरी आले, टिफिन घासायला टाकायचा म्हणुन टीफीन्ची ब्याग उघड्ली तर आत डिवीडीज.
आता कपाळाला हात लावला. ( कारण शिव्या पहिलेच दिल्या होत्या)
तेवढ्यात कन्या उड्त आली व म्हणे " आपने अभी तक वापस नहीं किया?" तु. क.
मी खलासच.
बायकोला आरेबिक कळते का?<<<<<
बायकोला आरेबिक कळते का?<<<<< देशातल्या की कैरोतल्या?
" आपने अभी तक वापस नहीं
" आपने अभी तक वापस नहीं किया?">> मामी, तुमची कन्या घरी हिंदी का बर बोलते, तुम्ही मराठी शिकवल नाही का ? मनसेवाल्याना नाव सांगु का , सांगु का.
Pages