लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?

Submitted by कोहंसोहं१० on 1 November, 2019 - 22:10

माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.

पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.

त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एक गल्लत होतेय माझ्या प्रतिसादाचा अर्थ काढताना,
आवडीचे काम आणि छंद जोपासत आनंदाने आयुष्य जगणे हे चांगलेच आहे.
प्रश्न आहे तो अमुकतमुक वयापर्यंत काम करा, पुरेसा पैसा गाठीशी जमवा, मग अश्या आयुष्याकडे वळा या विचारसरणीचा
तेव्हाही किती पैसा कमावला आहे आणि आता त्यात कसे उरलेले आयुष्य मॅनेज करायचेय हे पैश्याचे व्यवहार तुमच्या डोक्यातून कधीच निल नाही होणार. हिशोबीच आयुष्य झाले ते सुद्धा..
मुळात आनंद असा ठरवून आणि प्लान करून लुटता येतो का याबाबतही मी साशंकच आहे.

तेव्हाही किती पैसा कमावला आहे आणि आता त्यात कसे उरलेले आयुष्य मॅनेज करायचेय हे पैश्याचे व्यवहार तुमच्या डोक्यातून कधीच निल नाही होणार. हिशोबीच आयुष्य झाले ते सुद्धा. ---->>>>> हा प्रश्न ६० नंतरच्या रिटायरमेंट नंतरही राहतोच. उलट आर्थिक नियोजन केले नसेल आणि ६० ला रिटायरमेंट आली तर उरलेले आयुष्यही चिंतेतच जाते. एखाद्याने वेळेपूर्वीच निवृत्ती घेतली असेल तर घेण्यापूर्वी भविष्याचा सर्व विचार करून घेतली असल्यास कदाचित हा विचार येणार नाही.

मुळात आनंद असा ठरवून आणि प्लान करून लुटता येतो का याबाबतही मी साशंकच आहे. >>>>> मी म्हणेन हा आयुष्याचा खरा आनंद लुटण्यासाठी केलेला प्लान आहे

कोण कसल्या परिस्थितीतून गेलेत, जात आहेत, त्यांचे छंद
नक्की कुठले आहेत हे माहिती नसताना, केवळ अमुक रक्कम निवृत्तीला पुरेल का या प्रश्नावर समाज कर्तव्य, देश कर्तव्य यावर डोज पाजणे योग्य आहे का?

इथे अर्ली रिटायरमेंट घेतलेल्यांची जी कौतुकं सांगितली जात आहेत त्या सर्व उदाहरणांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे.... पेन्शन!!
अरे पेन्शन चं ऑप्शन असेल तर चपराशीसुद्धा अर्लि रिटायरमेंट घेऊ शकेल. सिंगल इन्कम, विथ किड्स, नो सोशल सिक्युरिटी ऑर पेन्शन वाले कोणी रिटायरीज माहिती असतील तर सांगा.
आणि फुलटाईम स्टॉक, ऑप्शन्स, फ्युचर्स खेळणारे म्हणजे रिटायरमेंट नव्हे. फक्त जॉब चेंज.
आयटीतली मखमली स्ट्रेस सोडून त्याहून बेकार स्ट्रेस अंगावर घेण्यात काय पॉईंटे.

केवळ अमुक रक्कम निवृत्तीला पुरेल का या प्रश्नावर
>>>

मी हा प्रश्नच बाद केलेला आहे.
लक्ष्मी चंचल असते. अमुकत्मुक रक्कम पुरेल मी प्लन करेल हा भ्रम आहे किंवा एक जुगार.

हा प्रश्न ६० नंतरच्या रिटायरमेंट नंतरही राहतोच.
>>>
सरकारी नोकरी पेंशन ६० निवृत्ती हे गणित आता बाद झाले आहे मुळातच

मी म्हणेन हा आयुष्याचा खरा आनंद लुटण्यासाठी केलेला प्लान आहे
>>>>
तारुण्य काबाडकष्ट करण्यात घालवायचे आणि वार्धक्य मौजमजेला प्लान करायचे.
बरं यातही ग्यारंटी नाहीच. ना पैश्याची ना आयुष्याची.
उद्या गणित फसले तर १०-१५ वर्षांच्या ब्रेकनंतर पुरे झाले छंद म्हणत पुन्हा ६५ व्या वर्षी कमावायला बाहेर पडायचे.

माझे आजोबा ५८-६० वर्षी निवृत्त झाले. मग जवळपास ३५-३६ वर्षे पेंशन मिळवली. आजोबा गेल्यावर आजीने तीच पेंशन अजून ७-८ वर्षे मिळवली. दोघांनाही शेवटपर्यंत डायबेटीज ब्लडप्रेशर वा कसलाही आजार नाही. शेवटपर्यत धडधाकटपणे लिफ्ट नसलेल्य बिल्डींगचे तीन माळे चढत उतरत होते. मज्जानू लाईफ !
येत्या काळात कोण असे धडधाकट आयुष्य जगेल याची खात्री आहे का ईथे कोणाला? विषयांतर समजू नका. आज जे आपण आरे पाडत आहोत ते उद्या आपल्यावरच पलटवार करणार आहे.

"तारुण्य काबाडकष्ट करण्यात घालवायचे आणि वार्धक्य मौजमजेला प्लान करायचे. बरं यातही ग्यारंटी नाहीच. ना पैश्याची ना आयुष्याची.">>>>>> हेच तर! असे जगण्यात काहीच अर्थ नाही म्हणूनच अर्ली रिटायरमेंट ना. निदान थोड्या प्लांनिंग वर उरलेले आयुष्य खासकरून राहिलेले तारुण्य मनासारखे जगता येते. आयुष्यात पैसा पुरेल की नाही या विवंचनेत आयुष्याच्या शेवटपर्यंत घाण्याच्या बैलाप्रमाणे कामाला जुंपून घेण्यात काय मजा.
उद्या गणित फसले तर १०-१५ वर्षांच्या ब्रेकनंतर पुरे झाले छंद म्हणत पुन्हा ६५ व्या वर्षी कमावायला बाहेर पडायचे.>>>>>>> असे होऊ नये म्हणूनच शक्य ते प्लांनिंग करायचे....जेवढे आपल्या हातात आहे, शक्य आहे तेवढे करायचे.

उरलेले आयुष्य खासकरून राहिलेले तारुण्य मनासारखे जगता येते. ..
>>>>

एक्झॅक्टली..
हेच थोडेसे तारुण्य मौजमजेला राखायचे हेच मला पटत नाही.
मुळातच आधीच्या अखंड तारुण्याची काशी करणारे आयुष्य जगू नये की कुठेतरी त्याला अगदी फुल्लस्टॉप लावावासा वाटेल. तारुण्यातही जरा एंजॉय करा आणि म्हातरपणातही जरा कमवा.

येत्या काळात कोण असे धडधाकट आयुष्य जगेल याची खात्री आहे का ईथे कोणाला?>>>>> आजच्या ताणतणावाच्या कॉर्पोरेट जगात ६० पर्यंत राहिलात तर नाही.
आज जे आपण आरे पाडत आहोत ते उद्या आपल्यावरच पलटवार करणार आहे.>>>>>>>> म्हणूनच ताणतणावाखाली आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करत राहण्यापेक्षा योग्य वेळ आली की निवृत्त व्हावे आणि उरलेले आयुष्य सुखात आनंदात जगावे. तब्येत चांगली राहील. अर्ली रिटायरमेंट हा यासाठी चांगला उपाय ठरू शकतो की.

चांगली चर्चा
@स्वाती२, आजोबांचे उदाहरण आवडले.

तारुण्य काबाडकष्ट करण्यात घालवायचे आणि वार्धक्य मौजमजेला प्लान करायचे. >> इथली लोकं तरुणपणी मजा करत नाहीत का? नुसते पैसे साठवत बसतात आणि ते खर्च करायचं विसरुन जातात का? माझ्या माहितीतली फारिनची लोकं तरी मस्त मजेत जगतात. कामाचा ताण आपण घेऊ तेवढा असतो. तो ही आयटी मध्ये कोणी फारसा घेत नाही. आयटी मध्ये इतकं कामाचं प्रेशर मी तरी बघितलेलं नाहिये. मजेत/ आनंदात जगायचं आणि त्यामानाने बक्कळ पैसा कमवायचं प्रोफेशन आहे हे.

"मुळातच आधीच्या अखंड तारुण्याची काशी करणारे आयुष्य जगू नये की कुठेतरी त्याला अगदी फुल्लस्टॉप लावावासा वाटेल." >>>> यावर मानव पृथ्वीकर यांचे वाक्य थोडेसे बदलून लिहितो - कोण कसल्या परिस्थितीतून गेलेत, जात आहेत, त्यांचे काम नक्की काय आहे हे माहिती नसताना, केवळ काम करण्यात आधीचे तारुण्य वाया गेले असे समजणे योग्य आहे का?

अमितव
>>>

तशी केस नसते म्हणून तर आता पुरे झाले म्हणत त्या जगण्याला एकदम फुल्लस्टॉप द्यायचा विचार मनात डोकावतो.

"तशी केस नसते म्हणून तर आता पुरे झाले म्हणत त्या जगण्याला एकदम फुल्लस्टॉप द्यायचा विचार मनात डोकावतो" >>>> कोणाच्या मनात कोणत्या कारणामुळे कोणता विचार डोकावतो हे तुम्ही कशावरून सांगू शकता?

कोहंसोहं
मी धाग्याच्या केसबद्दल लिहितच नाहीये. जनरल लिहितोय. कोणालाही सल्ला नाहेये.
मुळात धागाकर्त्यानेही आपली नाही तर मित्राची केस लिहिली आहे. म्हणजे त्याबद्दल १०० टक्के त्या मित्रालाच ठाऊक जे ईथे उपस्थित नाहीयेत.

तशी केस नाही यावर विश्वास बसणं कठिण वाटलं म्हणूनच विचारलेलं की नक्की समस्या काय आहे? आहे त्या जॉबचा कंटाळा आला आहे, आणि त्या हुद्द्याचा/ तितके पैसे देणारा जॉब हव्या ती शहरात सहज सापडत नाहीये. आणि स्टेप डाऊन करायचं नाहीये कारण.....
हाताशी बर्‍यापैकी पैसे आहेत. सो आता रिटायर होऊया! असा विचार नक्की नाहिये ना?

अमितव, आताच्या आपल्या प्रतिसादाशी सहमत.
आनंदात जॉब जगूनही जेव्हा लोकं अर्ली निवृत्ती घेतात तेव्हा त्यांचे प्लान ध्येय पॅशन सारे काही ठाम ठरलेले आहे असे समजावे. ईतरांचे सल्ले आणि पैश्याचे प्लानिंग हे दुय्यम असते तिथे. जी लोकं जगाला जगायचे कसे शिकवतात त्यांच्यावर आपण काय चर्चा करणार आणि त्यांना काय सल्ले देणार..

अमितव
धाग्याच्या सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे 'परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय' एवढेच कारण मला ठाऊक आहे.
तसेच शेवटी लिहिल्याप्रमाणे - 'एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे' . यामुळे अगदी खरे कारण खोलात जाऊन काढून घेणे मलातरी गौण वाटले.
त्याचा मुख्य प्रश्न वेळेपूर्वी निवृत्ती साठी किती पैसा लागेल आणि प्लांनिंग करताना कोणते पैलू लक्षात घेतले पाहिजेत हा होता. त्यामुळे मी साधारण किती पैसे लागतील आणि आहे तेवढे पुरतील की नाही यावर चर्चा सुरु केली.
बाकी IT किंवा इतरही क्षेत्रामध्ये लवकर निवृत्ती घ्यावी कि नाही किंवा असे वाटण्याचे खरे कारण काय असावे यावर एक वेगळा धागा निघू शकेल. तुम्ही किंवा ऋन्मेऽऽष काढू शकता हवे असल्यास Happy

कोहंसोहं, हा धागा आपलाच आहे हे मला आता लक्षात आले Happy
मी आधीच म्हटल्याप्रमाणे फाईनान्शिअल बाबीत माझे ज्ञान शून्य. जाणकार लोक योग्य सल्ले देतीलच
पण
एक सहज आठवले.
मध्यंतरी टर्म प्लान घेताना त्या एजंटने माझे वय पगार खर्च लोन वगैरे विचारून त्याच्याकडील सॉफ्टवेअरमध्ये काही कॅलक्युलेशन करून माझ्या लाईफची किंमत सांगितली. सुमारे ३.६५ करोड. आणि त्यानुसार मला कमीतकमी दोन करोडचा टर्म प्लान घेणे योग्य असे सुचवले.
बघा असा एखादा इन्शुरन्स प्लानर ते देतील साधारण योग्य सल्ला आ!णि आकडा.

कालपासून हा प्रतिसाद लिहावा की नाही विचार करत होते पण आता लिहूनच टाकते. भीती दाखवणारा आहे किंवा कॉशस करणारा आहे.

बायको शांत आहे की विषारी आहे याचा विचार करा. शांत वाटत असेल तर खरंच ती शांत आहे का याचा परत एकदा विचार करा. ती शांत वाटू शकते पण तिचं रुटीन बीइंग सायरस मधल्या सिमॉन सिंग सारखं असू शकतं.

लग्नाला साधारण १५ वर्ष झाली असतील. एकमेकांना २४ तास सहन करण्याइतकं तुमचं नातं डेव्हलप झालं आहे का हे पहा. कि सेव्हनइयरइच x २ झालं आहे? व्हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ मधल्या जॉर्ज-मार्थासारखे तुम्ही होणार नाही याची खात्री आहे का हे चेक करा.

घराबाहेर पडून इतर लोकांत मिसळत राहण्याचा, काम करण्याचा मानसिक फायदा विसरू नका.

आई शप्पत काय प्रतिसाद आहे. मी ह्याच बाबीचा दुसर्‍या बाजूने विचार करून ठेवा म्हणून लिहायला आले होते. एकदम च टका बसला.
मिसेसना उत्पन्नाचे साधन नाही .तर त्यांच्या नावे विल करून ठेवायला हवे. असे त्यांना सांगा. म्हणजे ह्यांना काही झाल्यास त्या उघड्यावर पड णार नाहीत.

१) अमिताभच्या वैयक्तिक गरजा उद्दिष्टे, ......
त्याचा धाकटा भाऊ अजिताभ अमिताभचा फंड म्यानेजर होता. नंतर ९६-९७ मध्ये काहीतरी बिनसलं. आता फारकत. हे त्या वेळच्या मासिकांत आलेलं. मुद्दा असा की फंड म्यानेजर किंवा आपल्यालाही गुंतवणूकीचं गणित जमेल असं नाही.

२) मी ४५ ला रिटायर होऊन वीस वर्षं झाली. जगतोय. काहीही करत नाही. दोन हजार सालचे व्याजदर, आवक आणि महागाई आणि आताचे पाहिल्यास कित्येक पट फरक झाला.
दोनशे प्रतिसादांकडे धागा चाललाय म्हणून आता लिहितोय. फार विचार करत नाही. मेडिक्ल इंशुरन्सही वीस वर्षे हप्ते भरून काही ही क्लेम न करता या वर्षी बंद केले. कारण मागच्या वर्षी साठ पासठ वयासाठी दोघांना लाखाला अठ्ठावीस हजार हप्ता केला न्यु इंडियाने. त्या अगोदर १७ सालापर्यंत नऊ हजार होता. . शिवाय फुल भरपाई बंद करून रोगांना क्यापिंग केलय. हे सर्व फक्त हॉस्पिटलमध्ये अडमिट झाल्यास असते. इयर वरच्या ट्रिटमेंटला नाही.
३) कमी टक्के पण सेफ गुंतवणूकच ठेवली आणि माझे डोके अजिबात चालवत नाही. पस्तीस वर्षं जुना एजंटच जे सांगतो ते करत आलो.

----------
३) बायको विषारी ?/ विखारी ? म्हणजे काय?

> मिसेसना उत्पन्नाचे साधन नाही .तर त्यांच्या नावे विल करून ठेवायला हवे. असे त्यांना सांगा. म्हणजे ह्यांना काही झाल्यास त्या उघड्यावर पड णार नाहीत. >

मृत्युपत्र नक्की करा पण त्यात 'माझ्या मृत्यूनंतर घर, पैसे बायकोच्या नावे होतील' असं सरसकट लिहू नका.

लक्षात घ्या ही सगळी 'तुमची एकट्याची स्वार्जीत' मालमत्ता आहे, तिचं काय करायच हा सर्वस्वी 'तुमचा एकट्याचा निर्णय' असणार आहे.

बायको शेवटपर्यंत माझ्याशी नीट वागत राहिली तर (<-हा सगळ्यात महत्वाचा भाग!) ती तिच्या मृत्युपर्यंत या घरात राहू शकते. तिला महिना खर्चाला क्ष पैसे मिळत राहतील. तिच्या मृत्यूनंतर उरलेले पैसे एखादया संस्थेला दान होतील, किंवा ट्रस्ट स्थापन करून 'माझ्या' नावाने गरीब मुलीसाठी स्कॉलरशिप चालू करायची.
बायको नीट वागली नाही तर माझ्या मृत्यनंतरच या गोष्टी करायच्या.

अशा काहीतरी तुम्हाला हव्या त्या अटी आणि नियम असलेलंच मृत्युपत्र करा. उगाच सेंटी होऊन बायकोला सगळं देऊ नका.

Pages