लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?

Submitted by कोहंसोहं१० on 1 November, 2019 - 22:10

माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.

पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.

त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

उंच इमारत ही गरज बिलकुल नाही.
उत्तम जेवण,उत्तम आरोग्य,आणि सर्व सुविधा युक्त घर,जन संपर्क बस .
आजार पणात उपचार एवढे पैसे .
वीज,टीव्ही,मोबाईल
गॅस ,गाडी(कोणती ही चार किंवा दोन चाकावर चालणारी).
एवढे असले खूप झाले.
अंबानी शी प्रतिस्पर्धा कराल तर सुखी होण्यासाठी अनंत जन्म घावे लागतील

अर्थात दिसलं आणि त्यावरची तितकीच काकूबाई बुरसटलेली प्रतिक्रिया ही दिसली. जी फक्त पोईंट आऊट करावीशी वाटली.
दुर्दैव म्हणणे चूक आहे हे सर्वज्ञात आहे, सुदैव म्हणणे यातही काही फरक नाही हेच सांगायचं होतं.

बरं बरं दुर्दैव म्हणणं हे चूक आहे हे सर्वज्ञात आहे म्हणून त्याबद्दल काही बोलावसं/पॉइंट आउट करावंसं वाटलं नाही का. गॉट ईट ताजेतवाने आजोबा.

"२५००० महिन्यात नक्की भागते याची खात्री आहे ना? हाय राईज इमारतीचा महिन्याचा मेंटेनन्स १०,००० + असतो असं ऐकलंय." ---> बहुतेक भागत असावे. मला आठवते तो गेल्या १० वर्षांपासून तिथेच राहतोय...बिल्डिंग फार मोठी नाही त्यामुळे मेंटेनन्स सध्यातरी ५००० च्या वर नसावा (माझा एक अंदाज....माहित नाही सध्या पुण्यात काय मेंटेनन्स असतो)

इच्छा असूनही मुलबाळ न होणे हे दुर्दैव नाही का? बाकी लग्न करून क्षमता असूनही मुलबाळ न होऊ देणारी कपल्स माझ्या अंदाजाने फार कमी असतील. असो...विषय तो नाही.

एक मुल हा विचार मला पण भुरळ देवून गेला .
पण तो अयोग्य आहे हे पटत आहे .
आयुष्य च्या मध्यानी ला.
पैसा सर्व सुख देवू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे.
तुमचे आरोग्य,जनसंपर्क,कुटुंब
हेच तुम्हाला स्वर्गीय आनंद देवू शकते.
करोड रुपये आहे पण मेल्यानंतर किती तरी तास जगाला माहित सुधा पडणार नाही तुम्ही गेला आहेत ते

लवकर निवृत्त व्हायचा विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी असेट्स आणि लायबिलिटीज चेक कराव्या लागतील. त्यादृष्टीने बघायचे तर

लोन फ्री घर असणे, मुलबाळ नसणे, आईवडील आर्थिक सधन असणे हे सगळे धन (म्हणून सुदैवी) मुद्दे आहेत.
साधी राहणी हादेखील.
===

बाकी सर्वज्ञात गोष्टी तुम्हाला इतर कोणीही समजावून सांगू शकेलच....

सगळ्यात महत्त्वाचे... नोकरी सोडल्यानंतर वेळ कसा घालवयाचा...एकतर दुसर काहीतरी काम/ छंद/ समाजसेवा किंवा अजून
पैशाची तरतूद... वेळ खर्च करण्यासाठी (पर्यटन, पार्टीस, शॉपिग, गावी घर बांधणे, घरसजावट)

आपण बोलतो...नोकरीमुळे मोकळा वेंळ मिळत नाही...पण नोकरीमुळे रोजचे ८ तास बिनखर्चाचे निघून जातात.

इच्छा असूनही मुलबाळ न होणे हे दुर्दैव नाही का? >> Sad दैववादावर बोलू तितके थोडे आहे.

प्रत्येकाचे आयुष्य इच्छेनुसार जात नाही. मूल हा एक विषय नाही तर कधी पैसा, कधी शारीरिक शक्ती इ. इ. आपल्या इच्छाशक्तीच्या परिघाबाहेर असते. अशावेळी "दुर्दैव" म्हणणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला हतबलतेची अधिक जाणीव करून देणे आहे. अशा भाषेची गरज आहे का? ह्या बाबतीत हरिवंशराय यांचे वाक्य आठवते - "मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा. क्योंकी जो अपने मन का नही, वो इश्वरके मन का है और इश्वर कभी तुम्हारा बुरा नही चाहेंगे..." मूल नसले तरी तुमच्यासारखी प्रेमाची माणसे त्या जोडप्याच्या आसपास आहेत हे भाग्य ही फार थोड्यांना असते.

आता मूळ मुद्दा - मूल असले काय, नसले काय, म्हतारपण निभवायला मनुष्यबळ लागते. हे मनुष्यबळ केवळ 'अ‍ॅक्टीव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग' (स्नान-कपडे इ.) साठी नाही तर शरीर-बुद्धी साथ देईनाशी झाली की वृद्ध व्यक्तीच्या हिताचे निर्णय घेणारे (उदा: कुठली ट्रीटमेंट का ऑपरेशन इ.) आप्तजन हवे. माणसे आली की त्यांच्या लहान-मोठ्या अपेक्षा आल्या. उदा. एखाद्या भाच्या-पुतण्याने किंवा स्वतःच्या अपत्याने "इथे दिल्लीला आमच्या जवळ रेंटल होम मध्ये राहा तर बघू शकेन". अशा अपेक्षांचा सर्व विचार आत्ता शक्य नसला तरी भविष्यात सामोरे जाण्याची तयारी हवी. लवकर रिटायर होण्याने ही तयारी कमी पडू शकते.

एक सहज गणित करून पाहीले. पुढे १५ वर्षासाठी मुद्दलावर येणाऱ्या पूर्ण व्याजावर जरी जगले तरी मूळ मुद्दल आणि शेयर आणि फन्ड मधील गुंतवणूक अबाधित राहते. शेयर आणि फंड मधील २५ लाख गुंतवणूक 8% वार्षिक रिटर्न ने (विकले नसल्यामुळे टॅक्स फ्री) २० वर्षात एक कोटी १६ लाख होते, आणि ९% रिटर्नने एक कोटी ४० लाख...अर्थात हात न लावल्यास. १५ वर्षासाठी हीच रक्कम अनुक्रमे ८% आणि ९% रिटर्नने ८० आणि ९० लाख होते. माझ्या मते अजून १५-२० वर्षांनी नोकरी करून रिटायर होणाऱ्या एका मध्यमवर्गीय normal lifestyle वाल्या माणसाला कदाचित साधारणतः याच्या आसपास रक्कम मिळेल जी पुढे सेफ इन्स्टुमेंट (FD , RD, Post Office scheme etc) मध्ये जरी इन्व्हेस्ट केली तरी बऱ्यापैकी इनकम देईल. याव्यतिरिक्त मूळ मुद्दलीतला साठवलेला पैसा आहेच. मित्राच्या या मुद्द्यावर माझ्याकडे उत्तर नव्हते. काय सांगाल?

तसे पाहता, आपल्याकडचा retirement plan व financial independence बद्दल चा awareness (or lack thereof) पाहता, early retirement चा विचार एकदम स्तुत्य आहे. पण तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला सॉलिड प्लॅन व योग्य कृती देखील आवश्यक आहे.

अमितव, तुम्ही घेतलेला इन्फ्लेशन रेट (६%) हा जरा optimistic आहे. वैयक्तिक खर्चासाठी ९-१० % सयुक्तिक आहे.
याबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे, सध्याचा कॉर्पस at least inflation एवढ्या rate ने वाढणे देखील आवश्यक आहे. या उदाहरणात debt आणि विशेषत: equity mhanun निवडले आहे याची माहिती नाही पण overall debt:equity proportion बघता इन्फ्लेशन रेट मॅच होणे अवघड दिसते.

सीमंतिनी, चांगला मुद्दा मांडलात. परंतु ही समस्या मुलं असलेल्या सुद्धा अनेक वृद्धांची आहे (मुले वेगळे राहणे, जवळ नसणे, परदेशात असणे इत्यादी). परंतु जवळची फॅमिली असणं हे म्हातारपणात उपयोगी ठरू शकतं. पैसा असूनही हतबल झालेले वृद्ध असतातच.

मित्राच्या या मुद्द्यावर माझ्याकडे उत्तर नव्हते. काय सांगाल? >>>
आपल्या मित्राच्या प्लॅन मध्ये ' होप ' ही मुख्य strategy वाटते.
१. पुढील १५/२० वर्षे व्याज सध्या मिळते आहे तेवढेच राहील का ? व्याज ५ / ४ / ३ % झाले तर ?
२. शेअर आणि फंडस म्हणजे बँक मधली एफडी नाही: पंधरा / वीस वर्षांनंतर जेव्हा safe instruments मध्ये शिफ्ट करायचा विचार आहे नेमके तेव्हाच मार्केट क्रॅश झालेले असेल तर ?
३. Safe instruments मध्ये पैसे ठेवले की पुरेसा return मध्ये मिळेल याचीही काहीही शाश्वती नाही.
४. एका मध्यमवर्गीय normal lifestyle वाल्या माणसाला कदाचित साधारणतः याच्या आसपास रक्कम मिळेल >> म्हणजे ही रक्कम नक्कीच पुरेशी असेल हे लॉजिक समजले नाही !
५. सध्याची लाईफस्टाईल frugal असली तरी १५-२०-२५ वर्षांनी ती बदलू शकते किवा बदलावी लागू शकते (उदा: प्रकृती अस्वास्थ्य) हेही प्लॅन मध्ये धरावे लागेल ना..

नवीन Submitted by कोहंसोहं१० on 2 November, 2019 - 14:17 >> दादा ईन्फ्लेशन पकडाल की नाही?
१०० रुपयांवर ८% नी आठ रुपये व्याज मिळवले तरी ६% महागाईने त्या १०८ रुपयांचे १०२ झाले की. मग कमावलेल्या ८ रुपयांवर २५% नी टॅक्स पण भरायचा आहे, मग ऊरलेले २ रुपये पण गेले?
किती ऊरले?

तुम्ही ठेवींवर जो ८% व्याजदर मिळेल असे समजता आहात तो 'नॉमिनल" व्याजदर आहे... तुम्हाला तुमच्या समीकरणात 'रीअल' व्याजदर पकडायचा आहे आणि टॅक्सेस सुद्धा.
nominal - inflation = real
८ - ६ = २%
हा तुमचा ठेवीवर खरा परतावा.

असे का ? तर आज जी गोष्ट तुम्हाला १०० रुपयांना मिळते आहे तिच्यासाठी पुढच्यावर्षी तुम्हाला १०६ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हण्जे ठेवीवर तुम्हाला खर्‍या अर्थाने फक्त २% व्याजच मिळाले. ज्यावर तुम्हाला टॅक्स सुद्धा भरावा लागणार आहे आणि तो ही पूर्ण ८ रुपयांच्या कमाईवर.
रिटायर होणे एवढे सोपे असते तर सगळॅ करोडपती रिटायर्ड झाले असते.
आजच्या घडीला इनफ्लेशन, सगळ्या प्रकारचे टॅक्सेस जाऊन एक लाख रुपये महिन्याला मिळत असतील आणि आजारपण, प्रवास, कार सारखी मोठी खरेदी, मुलांचे शिक्षण असे मोठे खर्च आजिबात करणार नसाल तर मेट्रो शहरामध्ये चारपाच वर्षे भलीबुरी रिटायरमेंट काढू शकाल.

ठेवी आणि गुंतवणुकीतून मिळणारे हे एक लाख रुपये दर पाच वर्षांनी पन्नास टक्क्यांनी वाढवत चला. मग असे पुढच्या चाळीस वर्षांपर्यंत करून एक कंझर्वेटिव डिस्काऊंट रेट (चाळीस वर्षात ठेवी आणि गुंतवणुकीवर मिळणारा सरासरी परतावा) घेऊन ह्या सगळ्या चाळीस वर्षातल्या रकमांची आजची टाईम वॅल्यू फॉर मनी काढा. ती असेल तुम्हाला आज रिटायर होण्यास लागणारी मिनिमम अमाऊंट.
मला विचाराल तर मिनिमम ५-७ करोड ईन्वेस्टमेंट बेस असल्याशिवाय हा विचार करू नये. राहत्या रिअल ईस्टेट ची मार्केट प्राईस ह्या समीकरणात धरू नये. ईस्टेट मिळणार असेल तर त्यावर लागणार्‍या टॅक्सेसचा विचार आधी करावा.

चिन्मय, हाब, छान मुद्दे मांडलेत.
"पुढील १५/२० वर्षे व्याज सध्या मिळते आहे तेवढेच राहील का ? व्याज ५ / ४ / ३ % झाले तर ?"---> भारतात तशी होण्याची शक्यता कमीच आहे. व्याजदर इन्फ्लेशन वर पण अवलंबून असतात. जर व्याजदर कमी झालेच तर महागाई पण कमी झालेली असेल आणि पर्यायाने खर्च हि कमी अथवा तेवढाच असू शकतो. ही परिस्थिती विकसित देशात आहे. परंतु एकंदरीत विकसनशील देश आणि लोकसंख्येचा विचार करता महागाई कमी होण्याचे चान्सेस तसे कमी वाटतात.
"शेअर आणि फंडस म्हणजे बँक मधली एफडी नाही: पंधरा / वीस वर्षांनंतर जेव्हा safe instruments मध्ये शिफ्ट करायचा विचार आहे नेमके तेव्हाच मार्केट क्रॅश झालेले असेल तर ?"---> होऊ शकते. परंतु २० वर्षाची दीर्घ गुंतवणूक त्यावेळीही चांगला परतावा देऊ शकते. साधारण शेयर आणि फंड मध्ये २० वर्षाच्या दीर्घ मुदतीत वार्षिक १२% परतावा तरी मिळतो असे म्हणले जाते. तरीही वर पकडलेला दर ८-९% त्यापेक्षा कमीच आहे.
"एका मध्यमवर्गीय normal lifestyle वाल्या माणसाला कदाचित साधारणतः याच्या आसपास रक्कम मिळेल >> म्हणजे ही रक्कम नक्कीच पुरेशी असेल हे लॉजिक समजले नाही ! ----> सांगायचा मुद्दा हा होता की एवढ्या मिळणाऱ्या पैशातही साधारण मध्यमवर्गीयांचे भागू शकेल असे वाटते. एक ढोबळमानाने विचार केल्यास अजून १५-२० वर्षांनी रिटायर होणाऱ्या साधारण मध्यमवर्गीय माणसाला ७०-८० हजार महिना पेन्शन मिळू शकते. तेवढेच माझ्या मित्रालाही तो जेंव्हा ६० चा होईल तेंव्हा वरील आकडेमोडीने मिळू शकेल आणि त्यापुढेही. आता जर त्यावेळी ७०-८० हजार महिना एवढे पैसेही पुरेसे नसतील तर मग सामान्य माणसे जगूच शकणार नाहीत.
"सध्याची लाईफस्टाईल frugal असली तरी १५-२०-२५ वर्षांनी ती बदलू शकते किवा बदलावी लागू शकते (उदा: प्रकृती अस्वास्थ्य) हेही प्लॅन मध्ये धरावे लागेल ना.."----> बरोबर. त्यावेळी आत्ता गुंतवलेली परंतु न वापरलेली रक्कम तसेच मुद्दल उपयोगाला येऊ शकेल.

हाब, इन्फ्लेशन कळीचा मुद्दा असला तरी तो सामान्य किंवा अतिसामान्य जीवनशैलीला फार अफेक्ट करेल असे वाटत नाही. तुम्ही जो टॅक्स चा मुद्दा मांडलात तो बऱ्याच गोष्टींना गैरलागू आहे जसे की शेयर आणि फंड मधील गुंतवणूक. दोन्हीवर दीर्घकालीन नफ्यावर चांगली सूट आहे. पण ती तशीच राहील की नाही हे सांगता येत नाही हे मात्र खरे. १ करोड बँक ठेवीवर ७% वार्षिक दराने ७ लाख रुपये येतात परंतु योग्य गुंतवणूक केली तर taxable income फक्त ५.२५ लाख असेल (१.५ लाख 80C आणि २५,००० 80D....मला हे २च माहीत आहेत सध्यातरी....अजूनही काही सोयी असतील तर माहीत नाही) त्यानुसार टॅक्स वर्षाला १८ हजारच्या आसपास जाईल. अजून काही वर्षांनी टॅक्स स्लॅब जेंव्हा वाढतील तेंव्हा टॅक्स अजून कमी असेल त्यामुळे टॅक्स हा मुद्दा गौण मानावा लागेल.

"मला विचाराल तर मिनिमम ५-७ करोड ईन्वेस्टमेंट बेस असल्याशिवाय हा विचार करू नये." --> सामान्य जीवनशैलीसाठी एवढी रक्कम खरेच लागेल का? मेट्रो शहरात जे सामान्य मध्यमवर्गीय राहतात आणि १५ वर्षात रिटायर होत आहेत त्यांच्याकडे एवढी रक्कम असू शकेल? तसे असल्यास अर्धे शहर रिकामे करावे लागेल.

कोसो
हाब, इन्फ्लेशन कळीचा मुद्दा असला तरी तो सामान्य किंवा अतिसामान्य जीवनशैलीला फार अफेक्ट करेल असे वाटत नाही. >>
Inflation चे calculation हेच मुळात सामान्य माणसाला जगण्यासाठी लागणार्‍या बास्केट ऑफ़ रिटेल गुडस ( Consumer Price Index) च्या बदलणार्‍या किमतीवर बेतलेले असते.

जर व्याजदर कमी झालेच तर महागाई पण कमी झालेली असेल आणि पर्यायाने खर्च हि कमी अथवा तेवढाच असू शकतो.>> तुमचे हे गृहीतक चूक नाही पण counter intuitive आहे. कमी व्याजदर म्हणजे जास्त पैसा हातात खेळता = महागाई.
त्यात तुम्ही हे घडण्यासाठी लागणारा एक मोठा time span तुमच्या foresight मध्ये 'हं हे तर चटकन असे होईल' असे गृहीत धरत आहात. Keynes स्कूल of thought सांगते की The market can stay irrational longer than you can stay solvent.

एकाच time span मध्ये काय होऊ शकेल ते सांगतो,
Inflation वाढते आहे असे दिसले की ते कमी करण्यासाठी RBI व्याजदर वाढवणार किंवा तसे घडवणार्‍या similar योजना सरकार आणणार. म्हणजे तुम्ही एकीकडे तीच सामान्य /अतिसामान्य जीवनशैली जगण्यासाठी जास्त पैसे मोजणार आणि दुसरीकडे तुम्हाला ठेवीवर marginally वाढीव व्याजदर मिळणार. ह्या दरम्यान double whammy मुळे गंगाजळी घटली की ते कव्हर करण्यासाठी तुम्हाला इक्विटी मार्केट मध्ये जास्त रिस्क घ्यावी लागणार. म्हणजे vulnerable परिस्थितीमध्ये risk on करावे लागणार.
पून्हा environmental, regulatory, geopolitical risk सुद्धा आहेत. ओला/कोरडा दुष्काळ, जर कधी भारत पाक युद्धाची ठिणगी पडलीच, अमेरिकेत abrupt सत्ताबदल झाला, अमेरिका कुठे युद्धात उतरली, enron, housing crisis असे काही घडले तर Currency मार्केट, रुपया चलन मुल्य, व्याजदर, स्टॉक मार्केट, महागाई the entire system can go into a downward spiral. ज्यावर तुम्ही कितीही प्लानिंग केलेले असले तरी तुमचा काहीही कंट्रोल नाही.
इतिहास सांगतो ह्या गोष्टी आज ना उद्या नक्की होतातच.. They are bound to happen.
आणि जर हे तुमचा मित्र 60 चा असताना झाले तर it has potential to wipe out all the gains.

Tax मध्ये नुसता income tax असेच नाही तर gst, tolls, लिक्विडिटी crisis झाल्यास घ्यावा लागणारा bid-ask spread loss (उदा घराची किंमत मार्केट व्हॅल्यू एवढी न मिळणे), insurance चे चढे प्रीमियम हे सगळे तुम्हाला haunt करू शकते.

घाबरवत नाहीये पण हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊन योजना आखण्याची जी नितांत गरजेचे आहे त्यालाच financial planning म्हणतात. असे होईल असे वाटत नाही तसे होणार नाही हा आत्मविश्वास घातक आहे.

इन्फ्लेशन वर पण अवलंबून असतात. जर व्याजदर कमी झालेच तर महागाई पण कमी झालेली असेल आणि पर्यायाने खर्च हि कमी अथवा तेवढाच असू शकतो >>> तुम्ही इथे इकॉनॉमी लेवल ची महागाई / इन्फ्लेशन आणि individual लेवल ची महागाई/ इन्फ्लेशन यांची गल्लत करीत आहात.
गेल्या १० वर्षात इंटरेस्ट रेट नक्कीच कमी झाले आहेत. पण individual level म्हणजे वर खर्च मात्र वाढलेला दिसेल.

इन्फ्लेशन कळीचा मुद्दा असला तरी तो सामान्य किंवा अतिसामान्य जीवनशैलीला फार अफेक्ट करेल असे वाटत नाही >>> इन्फ्लेशन affects everybody, without fail. केवळ ८% इन्फ्लेशन रेट धरला (optimistic) तरी केवळ १५ वर्षात खर्च तीपटी हून अधिक होईल (with same lifestyle). आत्ताचे वय धरले तर अजून ५०-५५ वर्षांची तजवीज करायची आहे.

तसे असल्यास अर्धे शहर रिकामे करावे लागेल >>> आपल्या इथे खरेच चिंताजनक परिस्थिती आहे. मात्र अपल्याईथे अजून तरी थोडीफार एकत्र कुटुंब पद्धती असल्याने हा crisis पुरेसा notice झालेला नाही. शक्य असल्यास काही ज्येष्ठ (निवृत्त, व स्वतंत्र राहत असलेले) लोकांशी या विषयावर (about their personal finance) संवाद करून बघा.

Heisenberg plus one. Optimism and hope will not be enough. People of my generation now 55 and above globally esp EU US are planning on working till 64 minimum. Up to 70 max then old age up to 85. This is after your life goals are achieved. Liabilities are paid off. Esp age 40 is when your mid life crises have not even started. Budget for major illness divorce death political and social uncertainty. If he is stressed ask him to renegotiate the deal with his company. Wife should pick up work or start a small home based service business . Coz you know economic independence of women is a must.

इन्फ्लेशन आणि टॅक्सला गौण मानण्याची चूक करू नका. छान छोकी त रहात असतील तर वाईंड डाऊन करताना खर्च कमी होतील. फ्रुगली जगत असतील तर आणखी काटकसरीने जगण्याचं प्रेशर/ स्ट्रेस येईल का? मला वाटतं ट्रायल बेसिस वर वर्ष दोन वर्ष घरी राहून बघा. नाही झेपत आहे वाटलं तर हायटेक मध्ये परत नोकरी मिळणे तितकेसे कठीण नाही. मोठा हुद्दा आणि इ ची काळजी पडणारे का? पुण्यात स्टार्टअप जोइन करा. किंवा कन्सल्टिंग करा.

आता स्पष्ट विचारतो: जॉब सोडायला बरेच वर्ष एका कंपनीत काम, त्यामुळे झालेली बढती, वाढलेला पगार, आता या वयात बदल करायचा असेल तर आहे तशी पोझिशन पुण्यात सहज मिळत नाहीये आणि रीलोकेट करायची किंवा पोझिशन मध्ये कॉम्प्रोमाईज करायची इच्छा नाही, आणि बऱ्यापैकी saving आहे तर रिटायर व्हावं असं वाटतंय असं आहे का? ह्यात चूक बरोबर किंवा जज बिलकुल करायचं नाहीये. फक्त तुम्ही त्या दृष्टीने समजून घेतलंत तर कदाचित योग्य प्रश्न समजेल. एकाच कामाचा, तशाच प्रेशरचा कंटाळा असं काही आहे का पैशासाठी काहीच करायचा कंटाळा आलाय ते जाणून घ्या.

वरील प्रतिसाद वाचल्यावर माझा सल्ला असा आहे की शक्य असल्या निव्रुत्तीनन्तर आहे तो फ्लाट विकून एका छोट्ञा शहरी राहायला जावे व तेथे छोटासा फ्लाट विकत घ्यावा. त्यामुळे निव्रुत्तीच्या वेळी असलेल्या बचतीत भर पडेल. पहा शक्य आहे का?

प्रतिसाद आवडलेत. वाचतोय.
कमावते असण्यापेक्षा ( ती आर्थिक पातळी कितीही असो) नसताना आवक वीस पंचवीस टक्के होते हे साधे गणित आहे. त्यात
१) दर दहा वर्षांनी होणारी महागाई,
२) उतरते गुंतवणूकीवरचे व्याज धरल्यास
जेमतेम जगता येते.

हाब, तुमचा प्रतिसाद घाबरवणारा आहे. त्याचा उद्देश त्यांना प्लानर कडे पाठवणं हा आहे, हे कळतंय. तरीपण.

मी सुद्धा गेल्या वर्षी लौकरच रिटायरमेंट घेण्याचा विचार केला होता, आणि इन्फलेशन, एकदा सर्व मिळकती बंद झाल्या की कमी होणारी रिस्क टेकिंग कॅपसिटी त्यानुसार एकदंतरीत मिळणारा कमी व्याजदर, मेडिकल / इतर इमर्जन्सीज वगैरेंचा विचार करता मला निदान ३-४ करोड (मालकीच्या घरा व्यतिरिक्त) हाताशी असल्याशिवाय शक्य नाही असे जाणवले आणि मी तो नाद सोडून दिला.

ह्या विषयावर आमच्याकडेही थोडे विचारमंथन झाले आहे. त्यानुसार,
-रोजचे थोडेफार खर्च मिटवण्यासाठी तरी पैशाचा एखादा लहानसा का होईना, वाहता झरा असावा. त्यासाठी मुलांचा अभ्यासवर्ग चालवणे किंवा घरगुती पदार्थ करून विकणे, घरघंटी चालवणे असं काहीतरी करता येईल.
- छंदवर्ग, साहित्य, मनोरंजन, प्रवास ह्यासाठीचा खर्च वहाता पैसा असला की जाणवत नाही पण साठवणुकीतून करताना दडपण येतं.
- तब्येत, आजारपण वगैरेसाठी किती पैसा लागेल ह्याचा नेम नाही. तस्मात व्यायाम, आनंदी रहाणं, सकस व सात्विक आहार, झोप, मैत्र वगैरे गोष्टी सांभाळाव्यात. माझ्या मते पंचवीस एक लाखाचं एक FD त्यासाठी करून ठेवावं व विसरुन जावं. इन्शुरन्स चा हप्ताही मोठा असतो व कधीतरी काहीतरी खुसपटे काढून ते पैसे द्यायला नकार देतात.
- मालकीचं घर असेल तर एखादी ओळखीतील पेईंग गेस्ट ठेवता आली तर सोबत + आयत्या वेळेस काही लागलं तर मदत असा दुहेरी फायदा होईल.

आणखी एक मुद्दा:
इथे FD बद्दल बरीच चर्चा झाली आहे. PMC Bank सारखी स्थिती पुढेही येणारच. त्यामुळे सगळी अंडी वेगवेगळ्या टोपलीत ठेवावी लागतात हा मुद्दा लक्षात घ्यावा. शुभेच्छा

> आत्ताचे वय धरले तर अजून ५०-५५ वर्षांची तजवीज करायची आहे. > यातल्या hope and optimism बद्दल कोणाला काय बोलायचं नाहीय का Wink
१०० वर्षचे आयुष्य मी && माझ्यावर आर्थिक अवलंबून असणारा जोडीदार जगणार आहे. तेव्हा आम्हाला डायपरसाठी आणि ते बदलायला माणूस ठेवावा लागेल त्यासाठी पैसे लागतील. म्हणून मला ५-७ करोड जमेपर्यंत धापा टाकत नोकरी करावी लागेल....

ॲमी हो ना. Lol
मी तर ८० आणि फारच झालं तर ८५ वर्षे गृहीत धरलेले टू बी ऑन सेफर साईड. ८० किंवा त्या आधी कसल्याही प्रकारचे दुसऱ्यावर अवलंबून रहाण्याचे अपंगत्व/मानसिक स्थिती येण्या आधी गचकलेले बरे.

प्लानरकडे गेल्यावर पत्नीलाही नोकरी मिळतेय का ते बघा. आहे ती नोकरी रिटायरमेंटपर्यंत सोडू नकाच. निवृत्तीनंतरही अर्थाजनाचे मार्ग शो धा असे सल्ले मिळतील असं वाटतंय.
पेपरात केस स्टडीज देतात त्यात आणखी एक पार्ट टाइम जॉब धरा असा सल्ला वाचलेला आहे. पण त्या लोकांचे बेत असतात. इतक्या काळत गाडी, इत क्यात स्वतःच पहिलं, दुसरं घर. मुलांचं परदेशी शिक्षण. इ.

आपल्या गोष्टीतल्या जोडप्याला यातलं काहीही नकोय तरी त्यांचं आयुष्य कठीण दिसतंय.

मानव,
८०-८५ म्हणजे (माझ्यापेक्षा) optimistic च आहात की!
मीतर स्त्री आहे. म्हणजे मेनोपॉजनंतर (५०-५५ किंवा त्याच्या आत!) लूनी होणार असं पकडून चाललेय Wink एकदाचे आपणच लूनी झालो कि मग काय टेन्शनच नाय फायनांशिअल प्लॅनिंगच Rofl Rofl
===

गंभीरपणे -
मेडिकलचा खर्च स्कायरॉकेट होणार वगैरे बोलताना स्कायरॉकेट खर्च करवणारे आजार झालेच तर उपचार न घेता स्वित्झर्लन्डला dignitas मधे जाण्याचा विचार करणारी माणसदेखील असतात हे माहित असतं का फा.प्ला.ना?

Pages