लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?

Submitted by कोहंसोहं१० on 1 November, 2019 - 22:10

माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.

पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.

त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

> उच्च वर्गातील एस्कॉर्ट सर्व्हिसेसचे रेट माहिती करून घ्या उत्तर सापडेल... > कल्पना आहे थोडीफार रेटची. आणि कदाचित त्यामुळेच हा वर्ग लग्नांतर्गत बलात्कार हा कायद्याने गुन्हा नसण्याबद्दल चिडीचूप बसलेला दिसतो असादेखील अंदाज आहे. (किंवा इथे एक धागा होता ना मी माझ्या शाळेपासूनच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे. बाकी सगळं ठीक चालूय त्रिकोणी कुटुंब वगैरे. पण मला दिवसातुन दोनदा हस्तमैथून करावं लागतं आणि बायको महिना-दिडमहिन्यातून एकदा सेक्स करायला तयार होते. मी कधीच तिला फोर्स केलं नाही पण आता मी मसाज पार्लर, एस्कॉर्ट शोधतोय <- हे होत असेल)

प्रश्न तेव्हा उदभवतो जेव्हा ल.ब. गुन्हा नसणे हा डिफॉल्ट कायदा बनतो आणि त्या स्त्रिया (+त्यांचे समर्थक) आपली कामं काहीतरी वेगळीच आणि महत्वाची असल्यासारखे प्रमोट करत राहतात.
तुम्हाला ज्या कामाचा जो मोबदला हवा आहे त्याचे आपापले वैयक्तीक करार करायला चालू केले आणि सरकारने डिफॉल्ट कायदे न बनवता फक्त त्या करारना कायद्याच संरक्षण दिलं की माझ्यासारख्याना प्रश्न पडणार नाहीत, विरोध करावासा वाटणार नाही.

मित्र मैत्रिणींनो, हा धागा भलत्याच वळणावर गेला आहे....कृपया धागाविषयाला धरून नसलेले प्रतिसाद थांबवावेत ही विनंती. अगदीच चर्चा हवी असल्यास नवीन धागा उघडून त्या विषयावर चर्चा करू.
मूळ धागा विषयावर अजूनही चांगली चर्चा होऊ शकेल असे मला वाटते आणि जर कोणी विषयाला धरून प्रतिसाद देऊ इच्छित असल्यास नवनवीन माहिती मिळेल.

अ‍ॅमी, इतकं सविस्तर नव्हतं माझ्या डोक्यात. नटून थटून नवर्‍याबरोबर पार्टीला जाणे इतकंच गृहिणीचे नगण्य काँट्रीब्यूशन धरले तरी तेवढी सर्व्हिसही महाग असते. बाकी पार्टीनंतर पुढचे होणारे व्यवहार बद्दल काही मत नाही...

हो अवांतर होतंय खूपच पण weaker section समजल्या जातात स्त्रिया विशेषतः गृहिणी म्हणून त्यांच्या प्रोटेक्शनसाठी कायदे आहेत जसे दलितांसाठी पण स्पेशल राईट्स आहेत.
एनिवेज, उच्चमध्यम वर्गीय महिलांबद्दल तुझी प्रतिकूल मतं एकूणातच आहेत, त्याचं काही होऊ शकत नाही, सो इथेच थांबू.

रिटायरमेंट आधी किती पैसे लागतील हे सांगणारे दोन वेगवेगळे दृष्टिकोन:
https://youtu.be/KLINZRYIquE

https://www.youtube.com/watch?v=8nzt-L3L5Ik

कंसर्व्हेटिव्ह ऑप्शन जास्त सेफ वाटतोय....पण रक्कम बरीच जास्त आहे...कदाचित योग्य गुंतवणुकीने हळूहळू कॉर्पस वाढवणे हा पण चांगला पर्याय असू शकतो.

काय राव! इतकी छान चर्चा चालू आहे ती का भलत्या वळणावर नेताय? धाग्याशी संबंधित नसलेल्या (आर्थिक गुंतवणूक आणि त्या मधील पर्याय) विषयावर प्लीज नका लिहू!
आपण ही सगळी चर्चा ४०+ वयोगटासाठी करतो आहोत पण retrospectively ही चर्चा जेव्हा आपण कमावते होतो (२५-३०) त्याच वेळी घडली पाहिजे. विशेषतः लग्न, मूल असे निर्णय घेताना. तेव्हा आता मागे वळून बघताना जर कोणी what I would like to tell my younger self (25 to 35 year old) about financial planning असे काही लिहू शकलात तर फार छान होईल.
मला नुकताच हा एक नवीन चॅनल सापडलाय युट्यूबवर त्यात शेअर मार्केट विषयी चांगली माहिती आहे :https://www.youtube.com/user/rachanaphadke

शिवाय या आधी दिलेल्या जोडप्याचा लग्नापूर्वी एकमेकांना आर्थिक बाबींसंबंधी विचारायचे प्रश्न यावरचा व्हिडिओ पण खूप चांगला आहे : https://youtu.be/LoM81EBr5J4

आपापली गाडी परत एकदा मूळ विषयाकडे वळवा आणि अर्ली रिटायरमेंट हवी तर निदान 1 करोड तरी हवेच का हे कॉन्फर्म करा. म्हणजे मी कंपनीने हातात नारळ देईपर्यंत रिटायरमेंटचा विचारही करायचा नाही हे ठरवेन. एकदा हाती नारळ पडला की नंतर मात्र माझे काही खरे नाही कारण आता उरलेल्या लिमिटेड वेळेत 1 करोड काही जमायचे नाही माझ्या नोकरीतून आणि शेअरबाजार अपणे बस की बात नही, जे आहे तेही जायचे. त्यामुळे रिटायरमेंट नंतर 1 करोड नसलेल्यानी खायचे काय हा धागा कोणीतरी उघडा...

Happy Happy Happy

जिज्ञासा, मनी टॉक लग्न/ मुलं होताना हवाच, पण ही वरची चर्चा लय ड्यांजर आहे. मऊ काळजाच्या माणसाने चर्चा वाचली तर लग्न मूल अशी ऐहिक सुखे सोडून हिमालया तील केसरी टूर्स पापिलवार होतील. Wink
या चर्चेत ह्युमन कॅपिटल/ आपलं पैसे मिळवण्याचं जे लिमिट आहे त्याचा ओझरता उल्लेख झालाय पण तो सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असावा. ते काढण्याचे काही ठोकताळे असतील, पण त्यात स्टॅंडर्ड डेविए शन फार असेल असं वाटतं. आणि ते सतत recalibrate करत रहावं लागत असेल. तुमचे स्किलसेट एक बेस नंबर दे ई ल, पण तुमचा attitude, मिळणाऱ्या संधी, राईट प्लेस राईट टाईम असणे, पर्झेविअरंस इ. इ. हा नंबर शेप करेल. त्यात सामोरं जायला लागणारे कडू गोड प्रसंग असे अनेक व्हेरिए बल ही असतील. जे कदाचित फॅक्टर करता येतील.
ही चर्चा ३५+ वयाचे लोकं करताहेत. १० वर्ष तरुण असताना आणि आणखी १० वर्षांनी याच व्यक्तींचा दृष्टीकोना अगदीच भिन्न असेल. आणि असायलाच हवा.
आणि यंगर सेल्फ ला सगळं स्पून फीड कशाला? डोळे उघडे ठेवून ज्ञान कसं मिळवायचं इतकं शिकवलं, जबाबदारी घ्यायला शिकवलं ते पुरे मला वाटतं. बाकी जर्नी मधल्या चुका हाईंड साईट मध्ये अनुभव बनून येतात. Happy

लग्नापूर्वी एकमेकांना आर्थिक बाबींसंबंधी विचारायचे प्रश्न यावरचा व्हिडिओ पण खूप चांगला आहे :
लग्न म्हणजे दोन जीवांचे
संमोह मिलन असे समजल जायचे.
आता लग्न म्हणजे दोन जीवांचे व्यापारी मिलन
असे समजणे इष्ट आहे

अमितव, या बाबतीत भरपूर व्यक्तीसापेक्षता असणारच. पण तरीही आपल्याकडे पैशांच्या गुंतवणुकीविषयी फार कमी साक्षरता आहे. त्या दृष्टीने काही अनुभवाचे बोल ऐकायला मिळाले तर आवडतील.

उत्तम आरोग्य कमवायचे असेल तर वयाची तीस वर्ष जोपर्यंत होत नाहीत
तोपर्यंत सर्व व्यसन पासून दूर राहणे .
फास्ट फूड बिलकुल नको,कॉल्ड ड्रिंक्स सारख्या पेय वर पूर्ण
बहिष्कार,रोज नियमित व्यायाम हे केलेच पाहिजे.
पण आपण उलट करतो 30/३५ वयापर्यंत सर्व व्यासणाच्या आहारी जातो.
व्यायाम करत नाही.
फास्ट फूड शित पेयं न बरोबर मजबुत खातो आणि 35 ओलांडली की आरोग्य सांभाळ ची कसरत करून व्यर्थ प्रयत्न करतो.
तसे च आर्थिक स्थैर्य हवे असेल तर वयाच्या 45 वयापर्यंत बचत,योग्य गुंतवणूक करून पैसे येण्याचे विविध मार्ग निर्माण करणे ह्या वर भर दिला पाहिजे.
पण होत काय नोकरी लागली की जो पगार मिळतो तो वाढत्या क्रमाने आपल्याला मिळत राहील असा स्वतःचा गोड समज करून घेतो.
मग dikhavati वस्तू वर विनाकारण पैसे उडवले जातात .
32 इंच टीव्ही मध्ये काम चालत असेल तरी 56 इंचाचा टीव्ही घेणे.
प्रवास करण्यासाठी स्माल car पण चालत असली तरी कर्ज काढून महागडी गाडी घेणे.
मोबाईल,हॉटेलिंग,असेच शोक फक्त dikhavati साठी स्वतःला लावून घेणे.
हल्ली खिशात 2 रुपये नसले तरी बँका तुमच्या पगार वर फायनान्स करतात त्या मुळे गरज नसलेल्या वस्तू सुधा खरेदी केल्या जातात.
घर घेताना ते investment आणि राहण्यास सोयीस्कर हा विचार करूनच घेणे.
फक्त बँक कर्ज देते म्हणून फायदा न देणारी गुंतवणूक न करणे उत्तम.
हे सर्व नोकरी चालू आहे तो पर्यंत ठीक चालते .
पण नोकरी गेली की अशा स्वभाव ची माणसं अत्यंत गंभीर आर्थिक संकटात सापडते.
आता पर्यंत पैसे खर्च करून ज्या वस्तू घेतल्या ला असतात त्या कसलाच इन्कम न देणाऱ्या असतात.
आणि त्यांची value खूप कमी झालेली असते.
अशी आर्थिक संकटात सापडलेली सर्व थरांमध्ये असलेली लोक तुम्हाला आजूबाजूला दिसतील.
अगदी मोठमोठे उद्योग पती सुधा आहेत.

काहीही जबाबदारी नसताना लग्नापूर्वी एकटा जीव सदाशिव असताना पगाराच्या 50 टक्के saving/इन्व्हेस्टमेंट हवी. लग्न झाल्यावर पण मूल होईपर्यंत 50% जमायला हरकत नाही. मूल झाल्यावर काही वर्षे 30 टक्के आयडियल आहे. नसेल जमत तर नोकरी बदलायला हवी आणि आधीच्या नोकरीच्या तीस टक्के जमवायला हवी. आपला अनुभव वाढतो तसं पुढचे goals प्रत्येक जण ठरवू शकेल.

मुंबई जेव्हा विस्तारली आणि नवी मुंबई आणि अलिबाग येथील जमिनीला सोन्याचा भाव आला .
तेव्हा तेथील स्थानिक लोकांना जमिनी च्या बदल्यात भरमसाठ पैसे मिळाले त्या लोकांची मुलाखत mid day ह्या सांज दैनिकाने प्रसिद्ध केली होती.
लाभार्थी लोकांनी पैसे मिळताच कोणत्या गोष्टींना पसंती दिली हे शोधले असता बहुसंख्य लोकांनी आलिशान घर बांधली,आलिशान गाड्या खरेदी केल्या.
उंची शोक पाळायला survat केली असे दिसून आले होते .
त्यातील खूप कमी लोकांनी योग्य गुंतवणूक करून संपत्ती वाढवली .
पण बहुसंख्य लोक परत आर्थिक टंचाई chya संकटात सापडली.
तसेच कौन बनेगा करोड पती मधील विज्येत्यांची सुधा हीच अवस्था झाली.
मला ह्या उदाहरण वरून फक्त मानवी स्वभाव वर प्रकाश टाकायचा आहे

I am looking for a practical advice (not only for myself). जसे राजसी यांनी लिहीले आहे. काही काही गोष्टी उशीरा लक्षात येतात. उदा. Compounding effect चा फायदा करुन घेणे. विशेषतः ppf मध्ये जिथे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मोठी रक्कम एकरकमी भरल्यास त्यावर अधिक व्याज मिळू शकते.
लहान मुलांसाठी minor ppf account उघडता येते आणि त्यातील करमुक्त गुंतवणूक मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येऊ शकते.
प्रत्येकाने आपले डिमॅट खाते काढून ठेवावे.
आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांविषयी विशेषतः गुंतवणूकविषयी व्यवस्थित नोंद ठेवावी. दरवेळी गुंतवणूक करताना नॉमिनेशन करायला विसरू नये आणि नॉमिनेशन केल्याचा पुरावा सोबत ठेवावा. हा पुरावा दर काही वर्षांनी तरी अपडेट करावा. आपल्या जवळच्या व्यक्तीला या साऱ्याची कल्पना देऊन ठेवावी.
टर्म इंशुरन्स जितक्या लहान वयात काढाल तितका कमी हप्ता बसतो.

ज्यांना कमावती आधार देणारी मुले मुली आहेत/नाहीत यांच्यासाठी अकाली रिटायरमेंट कशासाठी आणि लागणारा पैसा वेगवेगळे असणार ना? ती रकम किती? इकडे गाडी वळवा.
डेरिवटिवजवगैरे नंतर.

काहीही जबाबदारी नसताना लग्नापूर्वी एकटा जीव सदाशिव असताना पगाराच्या 50 टक्के saving/इन्व्हेस्टमेंट हवी. लग्न झाल्यावर पण मूल होईपर्यंत 50% जमायला हरकत नाही. मूल झाल्यावर काही वर्षे 30 टक्के आयडियल आहे.>> Rofl
किती पगार असतात bachelor मुलामुलींचे असं तुम्हाला वाटतंय. नाही एक अंदाज सांगा.
हे तर तुम्ही जॉबला लागल्यापासून रिटायरमेंट प्लॅन केल्यासारखे झाले.
असे केले तर आयुष्य कधी आणि कसे जगणार?

किती पगार असतात bachelor मुलामुलींचे असं तुम्हाला वाटतंय. नाही एक अंदाज सांगा.
>>>>
आमच्याईथे फ्रेशरना ३८ हजार देतात पहिला पगार
असे प्रत्येकाने आपले सांगा एवरेज काढूया

काहीही जबाबदारी नसताना लग्नापूर्वी एकटा जीव सदाशिव असताना पगाराच्या 50 टक्के saving/इन्व्हेस्टमेंट हवी. लग्न झाल्यावर पण मूल होईपर्यंत 50% जमायला हरकत नाही. मूल झाल्यावर काही वर्षे 30 टक्के आयडियल आहे.>> सामान्यपणे ५०/३०/२० रूल ऐकला जातो त्याचे हे व्हेरियंट आहे. म्हणजे मुले असली काय नसली काय पगाराच्या २०% बचत दरमहा करावा. ३०% खर्च आवडीच्या वस्तू किंवा नजीकच्या भविष्यकालीन गोष्टींसाठी (उदा: पुढच्यावर्षी एम.बी.ए, उन्हाळ्यात मनाली, इ इ) साठी ठेवावे, ५०% रक्कम दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व जुने कर्ज (उदा: गाडी, शिक्षण इ) यावर खर्च करावा. जॉबला लागल्यापासून रिटायरमेंट प्लॅन करणे ह्यात काही वावगे नाही. अंथरूण पाहून हातपाय पसरणे ह्यात काही वाईट नाही. बीस की उमर जो है खेल साठ मे ऐसा क्या गुनाह किया के लूट गए म्हणायची वेळ आणू नये :).

मनालीला काय आहे ? बॅचलर असतांना हनिमून Lol
मुले ईस्ट युरप, कंट्री साईड जापान, चायानाचे डेवल्पड टाऊन्स, डायविंग/स्नॉर्कर्लिंग चे लेसन्स अशा गोष्टी करतात आजकाल Proud

४०-५० हजार स्टार्टिंग सॅलरी मल्टिनॅशनल कंपन्या सोडून कुठे मिळते? पण समजा मिळाली ५० हजार (६ लाख अ‍ॅन्युअल)

सरासरी १०% टॅक्स ५०००
घरभाडे ५०००
खाणेपिणे १००००
गाडीचा हप्ता २०००
फोन्/ईंटरनेट्/युटिल ३०००
पेट्रोल/ट्रान्स्पोर्ट ५०००
ग्रुमिंग्/जिम/मेंटे/फॅशन ३०००
ईंश्युरन्स २०००
डिपार्टेमेंटल स्टोर ५०००
वीकेंडचे लहान सहान मनोरंजन ५०००

अगदी मिडिओकोर लाईफ जगले तरी ४५ हजारात काही होत नाही. एमबीए, मनाली फिनाली सोडून द्या ईस्ट युरप तर जाऊच द्या २०% आणि ५०% सेविंग ऊगीच मनाचे आकडे आहेत. जसा पगार वाढेल तसे वरचे खर्च वाढतील. तीशी आली की घराच्या डाऊन पेमेंट्साठी मारामार/धावपळ/ ऊसनवारी तिथे रिटायरमेंट प्लॅनिंग म्हंटल्यावर हसतील की ती तोंड फाटेस्तोवर.

जिथे मोठ्या कंपन्या हजारोंनी एम्प्लॉईज फायर करत आहेत तिथे ही मुले स्टार्टस्प्स किंवा क्र्जाचा बोजा घेऊन हायर एज्युकेशनला जात आहेत. कुठून मिळणार आहेत पगार स्टार्टअप मध्ये... दोन चार वर्षाकरता रहाणे खाणे मॅनेज झाले मोठी गोष्ट आहे.
जी मिडिओकर मुले आहेत त्यांचे असे वरच्यासारखे काटकसरी हातातोंडाशी काम असते.

हां आता ह्या समीकरणात बाप नावाची ० ईंट्रेस्ट ने कर्ज देणारी आणि दरवर्षी न चुकता संपूर्ण कर्जमाफी देणारी बँक अ‍ॅड मग करा हवे तेवढे रिटायरेमंट प्लॅनिंग.

मी फ्रेशर होते तेव्हा मला जेवढा मासिक पगार 6हजार होता आणि 6 लाखांचा एक 1/2 bhk flat (नक्की किती ते आठवत नाही आता) भांडुप स्टेशनजवळ विकायला होता. आई माझ्या मागे लागली होती की मी तो घ्यावा आणि जर काही कारणांनी emi मला जमला नाही पूर्ण, तर ती मदत करेल. मी काही तेव्हा interest दाखवला नाही,मला उगीच नसती भानगड नको, मी आपली FD/RD मध्ये जमतील तसे खुश होते. आज त्या फ्लॅट चा काय rate झाला असेल? कारण त्यांनतर तीन वर्षांनी तिनी ठाण्याला वृन्दावन सोसायटीत 10 लाखांचा 1 bhk घेतला त्याची किंमत आज already 75 लाख आहे. मी काही वेगळी राहत नव्हते, गाडीचा पास, बस-रिक्षा सोडून काही खर्च नव्हता. मोस्टली माझा सगळा पगार emi मध्ये गेला असता आणि मला कॉलेज सारखे पॉकेटमनी आईकडून घ्यावे लागले असते. आज 80-90 लाखाची तरी इन्व्हेस्टमेंट असली असती, परत मुंबईत स्वतः च घर.

अजून एक उदाहरण - एक दूरच्या भावाला नोकरी लागल्या लागल्या 2bhk फ्लॅट घेतला त्याच्या आई- बाबानी. त्याला 18हजार वै टेकहोम असेल 12 वर्षणपूर्वी. 35 लाखाचा फ्लॅट होता . त्याच्या सॅलरी वर जमणारच नव्हते. मामीच नावं घातलं तिनी downpayment दिला आणि त्याची पूर्ण सॅलरी emi मध्ये जायला लागली. तो नोकरीच्या गावात वेगळा राहत होता, roommates बरोबर. त्याला वापरायला जास्तीचे पैसे हवे म्हणून त्याने हातपाय मारले आणि जास्तीत जास्त पगाराची नोकरी शोधत राहिला. लग्न झाल्यावर बायकोला घेऊन नव्या-कोऱ्या स्वतःच्या घरात राहता आलं. आता मुलं झाल्यावर ती जागा कमी पडते म्हणून नवीन सव्वा दोन कोटीचे 4bhk घर घेतले. पाहिलं घर एक कोटीला गेलं. नव्या घराचा मस्त downpayment झालं. आई-वडील आणि सगळे 4bhk +servant रूम असलेल्या घरात एकत्र रहातात. भावजय मला प्रॉब्लेम काय सांगत होती नव्या घराचा की तिच्या लहान मुलांशी खेळण्यासाठी नव्या कॉम्प्लेक्स मध्ये मुलं नाहीत कारण ज्यांचे इतर फ्लॅट्स आहेत त्यांची मुलं कॉलेज मध्ये आहेत.

मी फक्त 50% saving/इन्व्हेस्टमेंट सुचवली आहे. माझे अनुभव तर काही जबाबदारी नसताना सगळीच सॅलरी invest करण्याचे किंवा न करणाचे आहेत.

तिथे रिटायरमेंट प्लॅनिंग म्हंटल्यावर हसतील की ती तोंड फाटेस्तोवर. >> हसून प्रश्न सुटणार असेल तर हरकत नाही. काही संस्कृतीत/व्यवसायात "निवृत्ती" हा कॉन्सेप्टच नाही. उदा: एखादी भाजीवाली आजी बोजा उचलतो तोवर भाजी विकतच रहाते तर एखादी लुईस हे मरेपर्यंत पब्लिकेशन हाऊस चालवत राहते. तसं जगायचे असेल तरी हरकत नाही. त्यांना तसं करण्याची शक्ती मिळो म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण तसं जगायचे नसेल तर मनचे कुठले का आकडे सेव्हिंग मध्ये गेले पाहिजेत ह्यात दुमत नसावे.

हां आता ह्या समीकरणात बाप नावाची ० ईंट्रेस्ट ने कर्ज देणारी >> पालक. आई पण देते ०% कर्ज...

(बाकी मनालीला ट्रेक साठी जातात कुणी कुणी. हनिमून साठी मनाली पर्यंत जायची वाट बघणारी लोक माहितीत नाहीत Happy )

Retirement planning सारखा लाँग टर्म गोल असेल
किंवा नसेल तरी उत्पन्नाच्या ४०-५० टक्के बचत करणे शक्य आहे असं वाटतं. अर्थात त्यासाठी पुरेसे प्रयत्न नक्कीच करायला लागतील (उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा खर्च मर्यादित करायला शिकण्यासाठी).

केलेली बचत योग्य प्रकारे invest करता आली तर उत्तमच !

ता. क. मी स्वतंत्र राहून आपला / कुटुंबाचा खर्च चालवणाऱ्या बद्दल बोलतोय.

खरं आहे. आपल्या इथल्या सुरूवातीच्या पगारात सर्व काही बसवणे मुश्किल असते. त्यातून जर नोकरीसाठी परगावी जावे लागले तर खर्च अजून वाढतात. त्यातल्या त्यात बरी गोष्ट अशी की बरेचदा शैक्षणिक खर्च पालक उचलतात आणि ते कर्ज मुलांवर येत नाही.
२०-३०-५० हा ठोकताळा असेल तरी जे २०% असतील ते कुठे गुंतवायचे? जर शेअर बाजारात गुंतवायचे झाले (जबाबदारी नाही म्हणून जोखीम घेता येईल) तर अनुभव नसणार मग अजून काय अधिक जोखमीचे पर्याय असतात?
इक्विटी म्युच्युअल फंड सोडून.

तीन वर्षांनी तिनी ठाण्याला वृन्दावन सोसायटीत 10 लाखांचा 1 bhk घेतला त्याची किंमत आज already 75 लाख >> तुम्ही किती साली फ्रेशर होतात असा प्रश्न विचारणार नाही (जंटलमनगिरी सोडू नये Proud ) पण त्यानंतर तीन वर्षांनी घेतलेला हा १० लाखांचा फ्लॅट जर २००४-०५ च्या आधी घेतला नसेल तरच हे ट्रान्झॅक्शन फायद्याचे ठरेल. २००४ च्या नंतर असेल तर फायदा त्याआधी असेल तर तोटा. म्हणाजे रूढार्थाने तोटा नाही पण ह्यापेक्षा चांगला फायदा सहजी होऊ शकला असता.

बारा वर्षात ३५ लाखाच्या रिअल ईस्टेटचे १ करोड म्हणजे साधारण ३००% रिटर्न म्हणजे अंदाजे वर्षाला ९-९.५% .. हे रिटर्न्स ओके-ओके आहेत.. ग्रेट नाहीत. तुम्हाला एफडीवर सुद्धा एवढेच मिळाले असते ते सुद्धा अतिशय कमी रिस्कवर.
रिअल ईस्टेट खरेदी विक्री ची ऊस्तवार न करता ह्यापेक्षा चांगले रिटर्न्स मागच्या १२ वर्षात सहजी ऊपलब्ध होते....एवढ्या मोठ्या ईन्वेस्टमेंट होरायझन्साठी आणि अ‍ॅग्रेसिव रिस्क प्रोफाईल ते नेहमीच असतात.

पे युवरसेल्फ फर्स्ट या तत्वाने चालल्यास सुरुवातीपासूनच चांगले सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट करता येते. आधी सेविंग % ठरवून मग उरलेल्या पैशामध्ये खर्च भागवला तेही बऱ्याच वर्षात शिस्तबद्ध पद्धतीने, तर कदाचित पुढे उपयोग होऊ शकतो.
१५-२० वर्षांपूर्वी आधी वार्षिक पगाराच्या १० पट रकमेत मोठ्या शहरात चांगले घर यायचे. गेल्या ७-८ वर्षात पगार वाढला नाही परंतु घराच्या किमती वाढत राहिल्या त्यामुळे साधारण घरासाठी हवी असलेली रक्कम १५ पट झाली. किंवा स्वस्तात हवे असल्यास शहराबाहेर जावे लागे. सध्या पगाराच्या तुलनेत घर हवे असेल तर किमान २० पट द्यावे लागतात. त्यामुळे फ्रेशर्स ना पालकांच्या मदतीने सुद्धा चांगल्या शहरात चांगल्या एरियात घर घेणे खूप अवघड झाले आहे. सध्या लग्न झाल्यावर दोघांच्या पगारात मोठ्या EMI वर घर घेणे हा ट्रेंड आहे. त्यामुळे बॅचलर असताना शक्य तेवढे सेविंग केलेले केंव्हाही चांगले.
रिटायर प्लांनिंग बद्दल बोलायचे झाल्यास अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे वयाच्या २५ पासूनच दरमहा ५-१०% रक्कम बाजूला ठेवावी जेणेकरून लवकर रेटायर्मेंटसुद्धा शक्य होईल.

किती साली फ्रेशर होतात असा प्रश्न विचारणार नाही --- मी खूप मेहनत घेतली आहे त्या वाक्यासाठी, त्यामुळे माझे वय कळू नये म्हणून Happy
मुद्दा असा की emi मुळे झक्कत पैसे बाजूला टाकण्याची सवय लागते. जास्त return येत नाही हे मान्य. पण tangible काहीतरी असतं. आई आणि भाऊ दोघांच्या केसमध्ये ती राहतं घरं असल्यामुळे investment पण म्हणता येणार नाही.पण मग स्वतः च्या घरात राहायचा आनंद किती लवकर मिळाला भावाला. भावाला दुसऱ्या घराच्या वेळेस पहिल्या घराची रक्कम डाउन payment म्हणून वापरता आली. मार्केट मधील काही कळत नसेल तर इन्व्हेस्टमेंट सोपी नसते पण तेच एखाद्या नामांकित बिल्डर च्या स्कीममध्ये सहसा तोटा होत नाही.
जमीन घेतली तर जास्त फायदा होऊ शकतो पण त्यासाठी जमिनीकडे देखरेख करायची नीट सोय हवी.
फ्लॅट कुठे, कधी घेऊन, कधी विकायचा हे गणित नीट जमलं तर 12% पर्यंत returns मिळू शकतात. Flat इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन हव्या तश्या भाड्याच्या घरात राहायचे.

फ्लॅट चा मेंटेनन्स , इंटरेस्ट आऊटगो, टॅक्सेस इत्यादी सर्व धरले तर रिटर्न्स बरेच कमी होतील ना. त्याबरोबरच रिअल इस्टेट हवी तेव्हा हव्या त्या किमतीला काढता येईलच असेही नाही. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करताना पुरेसा liquidity bachup असणे ही आवश्यक आहे.

"बारा वर्षात ३५ लाखाच्या रिअल ईस्टेटचे १ करोड म्हणजे साधारण ३००% रिटर्न म्हणजे अंदाजे वर्षाला ९-९.५% .. हे रिटर्न्स ओके-ओके आहेत.. ग्रेट नाहीत. तुम्हाला एफडीवर सुद्धा एवढेच मिळाले असते ते सुद्धा अतिशय कमी रिस्कवर."
"फ्लॅट चा मेंटेनन्स , इंटरेस्ट आऊटगो, टॅक्सेस इत्यादी सर्व धरले तर रिटर्न्स बरेच कमी होतील ना" >>>>> घर संपूर्ण डाउन पेमेंट वर घेतलेले नसेल तर यापेक्षा जास्त फायदा मिळू शकतो.
एक उदाहरण घेऊन पाहिल्यास:
३५ लाखाची इस्टेट घ्यायला त्यांनी समजा २७ चे लोन (साधारण ७५%) आणि स्वतःजवळचे ९ लाख टाकले असा अंदाज धरला तर मूळ गुंतवणूक ९ लाख. आणि घर जर गुंतवणूक म्हणून घेतलेले आहे असे समजून येणारे भाडे २०००० जरी पकडले तरी EMI साठी त्यांना फक्त महिना साधारणपणे ७००० महिना द्यावे लागतील (इथे २७ लाखाच्या लोन वर ढोबळमानाने २७००० हजार हफ्ता २० वर्षांसाठी असे गणित धरले आहे. सध्या लोन चे रेट कमी आणि रेंट पण जास्त मिळते त्यामुळे होणारा फायदा जास्तच असेल पण फ्लॅट चा मेंटेनन्स खर्च त्यातून निघाला हे गृहीत धरू) आता हे घर १० वर्षांपूर्वी घेतले आहे असे पकडले तरी अजून १० वर्षे घराचा हफ्ता बाकी आहे हे धरून अजून ३२,४०,००० लोन राहिले आहे.
आता हेच घर ७५ लाखाला विकले असे गृहीत धरले तर अंदाजे ४२,५०,००० रक्कम हाताला येईल ( ३२,४०,००० लोन जाऊन).
आता गुंतवलेला पैश्यावरचे व्याज काढले तर १० वर्षासाठी ते असे येईल:
९ लाख एकरकमी: ११.२५ % व्याज: २७.३ लाख
महिना ७००० रिकरिंग १० वर्षासाठी ११.२५ % व्याजदराने: १५.५ लाख
टोटल : ४२.८ लाख.
म्हणजे इन्व्हेस्टमेंट वर साधारण ११.२५% रिटर्न मिळाला आहे. यात थोडाफार बदल केला तरी १०% पेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो.

अर्थात सध्या असे होणे सोप्पे नाही कारण घराच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत आणि दरवर्षी किमतीत होणारी वाढ कमी झाली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घर घेणे जमत असल्यास घ्यावे परंतु नसल्यास इक्वीटी योग्य पर्याय वाटतो.

हो , वरच्या वाक्यांना. म्हणून नवीन नोकरी लागलेल्या जबाबदारी नसलेल्या लोकांना चांगला option, हातात पैसा आला म्हणून एकदम हुरळून जायला नको, इन्व्हेस्टमेंट ची शिस्त बालवाडीपासून.

Pages