लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?

Submitted by कोहंसोहं१० on 1 November, 2019 - 22:10

माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.

पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.

त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

योग्य निर्णय !!! स्ट्रेस मध्ये जीवन जगण्यापेक्षा निवांत जगा !!!
किती पैसे पुरतील हे पर्सन टु पर्सन आहे पण चालून जायला पाहिजे..

माझ्या मते रिटायरमेंट शक्य आहे. शुभेच्छा.
माझा एक्स-बॉस ४४ व्या वर्षी रिटायर झाला आणि आता पुण्यात राहातो.
मी स्वतः १२ डिसेंबरला रिटायर होणार आहे.

त्याच्या सध्याच्या कॉर्पसमध्ये राहणीमान न बदलता निवृत्त आयुष्य जगणे सहज शक्य आहे.
हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवायला हवा.
व्याजाने येणारा पैसा गरजेपेक्षा जास्त असेल तर त्यातली काही गुंतवणूक इक्विटी मध्ये शिफ्ट करता येईल. रादर, करायला हवी. किंवा व्याजातून उरलेली रक्कम इक्विटी मध्ये गुंतवायला हवी.

लोन फ्री घर असेल आणि मुलबाळ नसतील (माझ्यामते दोन्ही सुदैवानेच आहे!!) आणि अतिशय साधे राहणीमान असेल तर १ कोटी पुरतील असे वाटते.
===

> मी स्वतः १२ डिसेंबरला रिटायर होणार आहे. > अरे वा घेतलात का निर्णय! छान!! शुभेच्छा!!!

यात फक्त आर्थिक विचार केला आहे. जगण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नसतो. शारिरिक व मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी काही नियोजन केले पाहिजे. रिटायरमेंट नंतर तुम्ही काही काळ उत्साही असता पण नंतर आळशी बनत जाता.(स्वानुभव). कशा ना कशात गुंतून राहणे महत्वाचे असते. अन्यथा मानसिक स्वास्थ्य धोक्यात येते.

योग्य निर्णय!
कामाचा ताण.....हे मोठे कारण आहे.tabyetiipeksha पैसा जास्त नाही.उद्या मेडिकल खर्चाचे काय होईल या विवंचनेत आजचे दिवस वाया घालवू नयेत.सुदैवाने आर्थिक दृष्ट्या तुमचे मित्र सक्षम आहेत.

उत्तम निर्णय. आणि त्यांनी व्यवस्थित २-३ वर्षे ऑलरेडी विचार केलाय, आणि अजून २-३ वर्षांनी रिटायर होणार म्हणजे अजून नीट आ़खणी करायला वेळ आहे.

मला असं वाटतं की राहतं घर सोडून एखादं अजून घर असावं ज्याला चांगलं भाडं येईल. यामागचा माझा विचार असा आहे ही भाडं दरवर्षी थोडंफार (जास्तीत जास्त १०%) वाढवू शकतो. शिवाय इतर उत्पन्न जास्त नसेल तर भाड्यातून येणार्‍या उत्पन्नावर करही जास्त बसणार नाही. त्यामुळे भाड्यातून येणारा पैसा हा आपल्या खर्चातल्या inflation-prone component साठी वापरायचा - म्हणजे वाढीव भाड्यामुळे हे खर्च बॅलन्स होतील, आणि इतर गुंतवणूक - ज्यातून साधारण ठराविक आणि फिक्स्ड रिटर्न येतात - त्यातून येणारं उत्पन्न फिक्स्ड खर्चांसाठी - म्हणजे इन्शुरन्स प्रिमियम वगैरे - वापरायचं.

पण लवकर रिटायर होऊनसुद्धा थोडाफार पैसा मिळेल आणि थोडाच वेळ खर्च करावा लागेल असं काहीतरी काम करावं, किंवा काही नवीन, आवडीच्या गोष्टी शिकून (skill diversification) त्यात काहीतरी काम करता येतं का ते पहावं असं मला वाटतं. मी जर लवकर रिटायर झाले तर असं काहीतरी करण्याचा विचार आहे - उदा. मी २-३ विदेशी भाषा थोड्याफार शिकलेय, त्यातील एखादी व्यवस्थि शिकून त्यात पुढे काहीबाही करता येतं का ते पहाणार.

पुण्यात घरच्या किमतीच्या किती टक्के घरभाडे असते?
हैद्राबादला साधारण साडेतीन ते चार टक्के.
आता स्थावर मालमत्तेचे भाव आधी सारखे वाढणार नाहीत.
नवीन घर इन्व्हेस्टमेंट म्हणुन घेणे आता फायद्याचे ठरणार नाही.

साडेतीन ते चार टक्के एवढंच आहे इथेपण. ईएमआयच्या १/४ पेक्षा कमी भाडं येतं. सध्या नवीन/दुसरं घर घेणं हा नुकसानीचाच निर्णय आहे.
+
या मित्राला मुलं नाहीयत हे विसरू नका. वारसा म्हणून द्यायला कोणी नाहीय. संपत्ती शून्यच्या जवळ करून वर जावं लागलं तरच तो फायद्यात असेल Wink

मानव +१.
रिव्हर्स मॉर्टगेजचा पर्यायही आहे त्यांना.

मस्त निर्णय आहे. शक्य असेल तर एखाद वर्ष/ सहा महिने कंपनीतून sabbatical घेऊन बघता येईल की पूर्ण रिटायर झाल्यावर कसं वाटतंय. कोणीतरी वर लिहिल्याप्रमाणे नोकरी नसली तरी वेळ चांगला जावा यासाठी नियोजन हवे नाहीतर फार कंटाळा येऊ शकतो.
Our rich journey (https://www.youtube.com/channel/UChObmEJP3bgGUXJGc2ePP3Q) म्हणून एक चॅनल आहे. ते दोघे नवरा बायको असेच लवकर निवृत्त झाले आहेत. त्यांचे पैशांचे अंदाज जरी अमेरिकन असले तरी त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केले हे पाहता येईल. तुमच्या मित्राला खूप शुभेच्छा!

१ कोटी रुपये असतील तर ते रिटायरमेंट साठी कसे गुंतवावेत याचा एक छान तक्ता आणि विवरण साधारण १ महिन्यापूर्वी टाइम्स व इकॉनॉमिक टैम्स वेल्थ मधे आला होता. खाली लिंक आहे. हा तक्ता मला खूप आवडला होता. तुमच्या मित्रासाठी अगदी योग्य आहे. यात त्यांनी ३ प्रकारच्या एकाच वेळी करण्याच्या गुंतवणुकीचे लॉजिक दिले आहे. सर्वांनी वाचावे असे छान आर्टीकल आहे..

https://economictimes.indiatimes.com/wealth/plan/is-rs-1-crore-enough-to...

पण मला विचाराल तर इतरांनी म्हणल्याप्रमाणे काहितरी उद्योग केलाच पाहिजे तब्येत चांगली रहाण्यासाठी. तुम्ही तुमच्या मित्राला समजवण्यासाठी अजून २० तास घालवा. वर्थ इट.

माझ्यामते भाड्याचं घर ही गरज वाढत जाणारी आहे. विशेषतः जर रिअल इस्टेट एजंटकडे न देता जर स्वतःच घराची जाहिरात केली आणि थोडे कष्ट घेऊन भाडेकरार स्वतः रजिस्टर केला (आजकाल अगदी सोपं झालंय ते) तर भरपूर रिस्पॉन्स + थोडं जास्त भाडंही मिळू शकतं (स्वानुभव आहे). मी घर इस्व्हेस्ट्मेंट साठी - म्हणजे ते विकून होणार्‍या नफ्यासाठी - घ्यायचं म्हणतंच नाहिये. पण इतर गंतवणुकीसोबत त्यातल्या त्यात खात्रीपूर्वक रेग्युलर आणि वाढतं उत्पन्न मिळण्यासाठी मला हा पर्याय चांगला वाटतो. जेव्हा दुसरं घर मेंटेन करणं कठीण वाटू लागेल तेव्हा
विकून टाकायचं. असो, मी आपल्यापुरता विचार केलाय हा.

योग्य निर्णय!

साधारणपणे १ कोटी रूपयांवर आयकर वजा करून वार्षिक ६ लाख रूपये व्याज मिळेल. कंपनीकडून साठविलेला प्रॉव्हिडंट फंड २० लाखांच्या आसपास असेल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निथीत नियमित गुंतवणुक असेल तर आतापर्यंत ती शिल्लक ५० लाखापर्यंत असेल. इतर शिल्लक व पुढील २-३ वर्षांचा पगार मिळून निवृत्त होताना हातात २ कोटींच्या आसपास रक्कम असेल ज्यावर महिन्याला किमान १ लाख रूपये व्याज मिळेल.

एवढी रक्कम पुरेशी ठरेल.

रिव्हर्स मॉर्टगेज केलेले घर आपण भाड्याने देऊ शकतो का? रिव्हर्स मॉर्टगेजमधे घराच्या किंमतीच्या किती टक्के उत्पन्न मिळते? रिव्हर्स मॉर्टगेज संदर्भात पुर्ण माहिती कुठे मिळेल?

"मी स्वतः १२ डिसेंबरला रिटायर होणार आहे">>>>> शुभेच्छा उपाशी बोका.
"रिटायरमेंट नंतर तुम्ही काही काळ उत्साही असता पण नंतर आळशी बनत जाता.(स्वानुभव). कशा ना कशात गुंतून राहणे महत्वाचे असते" >>>>एकदम बरोबर. या एका कारणासाठीच मी स्वतः लवकर निवृत्तीच्या विरोधात आहे. किमान पन्नाशीत आल्याशिवाय निवृत्तीचा विचार करू नये असे मला वाटते (निदान माझ्यासाठी). तरुणपणी रिकामा वेळ ख्याल उठू शकतो. सोशल लाईफ वर परिणाम होऊ शकतो कारण सर्व समवयस्क कामामध्ये असतात. लवकर रिटायरमेंट नंतर लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही थोडाफार बदलू शकतो असे माझे वैयक्तिक मत. परंतु लोकभयास्तव किंवा अन्य काही कारणामुळे स्ट्रेसफुल आयुष्य घालवण्यात पण मजा नाही. एखाद्या छंदाबाबत खरंच खूप पॅशन असेल तरच वेळ जाऊ शकतो परंतु दुर्दैवाने मला तरी तो नाही त्यामुळे कदाचित मला ५५ च्या आधी पूर्णवेळासाठी निवृत्ती घेणे पटत नाही.
जिज्ञासा आणि विक्रमसिंह, लिंक साठी धन्यवाद. फॉरवर्ड करतो त्याला.

इथे काहींनी नमूद केल्याप्रमाणे दुसऱ्या घराचा पर्याय माहित नाही किती योग्य असेल. समजा ४०-५० लाखात १ bhk घेतला तर महिन्याला मिळणारे घरभाडे आणि भविष्यात वाढत जाणारी किंमत हि फायद्याची ठरेल कि त्याच पैश्याची फिक्स डिपॉजिट आणि थोडीफार शेयर किंवा फंड मधील गुंतवणूक फायद्याची ठरेल (अर्थात दीर्घ काळाचा विचार करता)?

इन्फ्लेशन चा विचार करता, जमलेला कॉर्पस पुरेसा नाही असे वाटते. Inflation can play havoc in real long term. नेट वर उपलब्ध कॅल्क्युलेटर वापरून लागणारी रक्कम काढता येईल. www.freefincal.com या ब्लॉगवर early retirement साठी पुष्कळ माहिती आहे.

या बरोबरच तुम्ही दिलेला financial planner कडे जाण्याचा सल्ला योग्य आणि आवश्यक वाटतो आहे.

नवीन Submitted by चिन्म य on 2 November, 2019 - 07:57 >>> पूर्ण अनुमोदन.
वरच्या अघळपघळ आणि ईमोशनल प्रतिक्रियांमध्ये एकमेव सेस्न्सिबल प्रतिक्रिया.

तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?>> आयटी मध्ये नोकरी केलेल्या अ‍ॅवरेज माण्साची लाईफस्टाईल आणि कमी वय बघता ही रक्कम खूप कमी आहे. किती पुरेशी आहे ते financial planner अर्थात पैशांचा डाग्दर सांगेल ना? प्रायवेट वेल्थ मॅनेजमेंट, अ‍ॅबिलिटी टू टेक रिस्क आणि विलिंगनेस टू टेक रिस्क, स्टॉक मार्केटचे ज्ञान, लाईफ ईन्श्युरन्स, ईस्टेट प्लॅनिंग अशा आणि अनेक विषयांचा अभ्यास असतो त्या लोकांचा.
तुमचा मित्र financial planner कडे जायला तयार नाही म्हणजे तो "रिस्क" ह्या महत्वाच्या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. असे लोक त्यांच्या स्वतः बरोबरच कुटुंबाला आर्थिक संकटात टाकू शकतात, आज सुबत्ता असली तर असे होण्याची शक्यता जास्तच. निर्व्यसनी, साधी लाईफस्टाईल असणे वगैरे अघळपघळ गोष्टी आहेत.

मायबोलीवर मला अमूक तमूक त्रास होतो काय करू तेव्हा काही लोक जोतिषापासून डॉक्टरपर्यंतचे सगळ्या प्रकारचे सल्ले देतात, त्यातलाच हा अजून एक प्रकार.

बाकी सर्व छान आहे पण "..नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय....." हाच सर्वात मोठा धोका आहे... कारण मन अत्यंत चंचल असते, आणि कल हवी असणारी गोष्ट आज सुख देत नाही.... किंवा त्या गोष्टीचा फोलपणा कळतो.... म्हणून जेव्हा नोकरी सोडण्याची तयारी आहे तर... २ ते ४ महिने तरी सरळ सुट्टी वर जावे... आणि बघावे आपले छंद आपल्याला किती ऐंगज करतात... कारण आपण मोकळे पण जग धावत असते ... आणि काहीवेळाने छंद निरस किंवा अडगळ वाटते... उदा टीव्ही वर असणारे सा रे ग म प सारख्या स्पर्धा... सुरवातीला जीव तोडून बघत असू... नाविन्य होते... नंतर रटाळ वाटू लागले आणि टीव्ही बंद राहू लागला.. आणि छंदाचा कंटाळा आला.. अर्थात हा माझा अनुभव... त्यामुळे मला वाटते पळ काढ न्यापेक्षा सुट्टी टाकून वेळ काढून जगावे... अर्थात आपल्या वर्किंग ओव्हर पूर्ण करून नंतर .. वेळ द्यावा.. असे मला वाटते

इक्विटी मधली इन्व्हेस्टमेंट चा स्प्रेड कसा आहे? त्यांनी ज्या सेक्टर्स मध्ये गुंतवणूक केली आहे त्यांची एकस्पेक्टड trajectory काय आहे? रिव्हर्स मोर्गेज करायची वेळ आली तर किती मिळतील, कसे मिळतील इ इ बऱ्याच गोष्टी त्यांना financial planner सांगतील. फक्त एक नाही उलट दोन वेगळ्या चांगल्या planners कडून सल्ला घेतला पाहिजे. ते प्लॅनरकडे जायला नाही म्हणतात कारण त्यांना अंदाज आहे की प्लॅनर त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडेल. असे तर नाही ना?

ते फ्रुगल जगतोय वगैरे आता कमावत असताना ठीक आहे. एक उदाहरण बघा. 15 वर्षांनी त्यांचे समवयस्क निवृत्त होऊन केसरी, वीणा, वैगेरे बरोबर कुठेकुठे भटकायला जातील, अनेक जोडपी मिळून काही काही प्लॅन करतील, त्यावेळी त्यांना परवडणार नाही. त्यावेळचं सोडा ते तर आतासुदध ते कमावते असल्याशिवाय परवडणार नाही. हे फक्त एक उदाहरण म्हणून दिले. भरपुर पैसे कमावला आहे पण गरजा कमीच आहेत असे जगणे वेगळे आणि मन मारायला लागून जगायला लागणे वेगळे. तर त्यांची दुसऱ्या परिस्थिती ओढण्याचे चान्सेस जास्त आहेत असे फर्स्ट रिडींग मध्ये वाटते.

कायच्या काय आर्टिकल - म्हणे दहा वर्षात 90000 प्रति महिना लागतील इन्फ्लेशन प्रमाणे.
म्हणजे आज जे रिटायर झाले आहेत 60 वय असल्यामुळे त्यांचे जगणे अशक्य आहे का जर त्यांना पेन्शन चाळीस किंवा पन्नास असेल तर? कायच्या काही आडाखे लावतात...

>>नवीन Submitted by हायझेनबर्ग - एक... on 2 November, 2019 - 08:26<<. +१
अठ्ठेचाळीसाव्या वर्षी रिटायरमेट, आणि १ करोडचाच गोल असेल तर कठिण आहे. साधारण ८०-८५ वर्षांचं आयुष्य, येत्या ३०-३५ वर्षात येणारी महागाई, अनिश्चितता, डिसेंट लाइफस्टाइल इ. बाबींचा जमाखर्च मांडला तर तूटच दिसेल...

२५ लाख शेअर्स , म्युच्यल फंडस मध्ये आत्ताच आहेत.
तीन वर्षांत याव्यतिरिक्त १ करोड असतील जे फिक्स्ड रिटर्न्स इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवलेले असतील.

भौतिक गरजा कमी करणे.
आरोग्य ला प्राधान्य देणे.
योग्य सकस आहार मध्ये बिलकुल katoti नको.
ब्रँडेड वस्तू चा शोक बिलकुल नको .
आहे त्या पेश्यात तुम्ही आरामात,मजेत आयुष्य काढाल.
आपण म्हणजेच जग आणि मी ज्या स्थितीत राहतो तीच सर्वोत्तम स्थिती असा माज ठेवा .
काय लागत माणसाला जगण्यासाठी.
योग्य आहार,घर,सामाजिक जवळीक,आणि सर्वात महत्वाचे उत्तम आरोग्य .
बाकी सर्व गोष्टी गौण आहेत.

एक ठोकताळा म्हणून चटकन इन्फ्लेशन च गणित केलं तर आजचे २५००० प्र तिमहिना हे ४० वर्षानंतर 2.5 लाख प्रतिमहिना होतात. भारतात महागाई वाढण्याचा दर 6% घेतलाय. तसचं १ कोटी शिल्लकीच्या व्याजातील 70% वापरावे लागणार असतील तर बाकी कुठला व्हेरिएबल न घेता पुरतील. पण तब्ब्येतीच्या तक्रारींना भारतात तुम्हाला तुमच्या पैशातून एन्श्युरंस लागतो. अर्थात रिव्हर्स मोर्गेज मध्ये घर विकलं तर तो ही एक रिसोर्स होईलच.
भागेल, पण मला रिस्की वाटलं. इथे पेपर मध्ये असल्या प्रश्नांना उत्तरे कॉलम मध्ये टिपिकल सल्ला दैनंदिन गरजा भागवण्यापुरता काही पार्ट टाईम जॉब करा असा असतो.
घरी राहायला लागलं की हे करू ते करू किंवा काही महागडा छंद सापडणे यात बजेट कोलमडत असं वाचलं आहे. जग फिरायची इच्छा नाही होणारे का? ४० वर्षे फार मोठा कालखंड आहे त्यातल्या रिस्क कशा काढतात कोण जाणे पण काही एक फॅक्टर समीकरणात टाकून ताळेबंद मांडला की लक्षात येईल. हे तुम्ही किंवा मी काढून फायदा नाही. त्यांनी आणि त्यातल्या कोणी तज्ज्ञाने करावे.

बाकी मूल नसणे हे सुदैव पक्षी मूल असणे हे दुर्दैव सुचवणार्या टिपिकल मिडलकलास काकूबाई पोस्ट बद्दल काय बोलावे!

२५००० महिन्यात नक्की भागते याची खात्री आहे ना? हाय राईज इमारतीचा महिन्याचा मेंटेनन्स १०,००० + असतो असं ऐकलंय.

> बाकी मूल नसणे हे सुदैव पक्षी मूल असणे हे दुर्दैव सुचवणार्या टिपिकल मिडलकलास काकूबाई पोस्ट बद्दल काय बोलावे! > Lol Lol मूळ लेखातलं ' दुर्दैवाने मूलबाळ नाही.' हे दिसलं नाही का रेअर उच्चवर्गतल्या आजोबांना?

Pages