लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?

Submitted by कोहंसोहं१० on 1 November, 2019 - 22:10

माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.

पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.

त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हा हा, बायको नाही लग्न करून घरात मोलकरीण आणलेली आहे. तीने इतकी वर्षे सोबत केली व त्या बदल्यात घराच्या मालकाकडून अन्न वस्त्र निवारा मिळवला. मालक इतका उदार की तो मेल्यावर ह्या बायकोरुपी मोलकरणीने त्याच्या घरात राहायचे की नाही, तिला पैसे मिळणार की नाही हे तिची आजवरची वागणूक बघून ठरवणार.... याची वागणूक कशी आहे हे बघायचा प्रश्न येतंच नाही, कारण? हा मालक ना...

पैशांचा प्रश्न आला की माणसांची खरी रूपे बाहेर दिसतात म्हणतात ते खोटे नाही.

Ami
ह्यांचा मुद्दा तत्त्वत: बरोबर आहे. Financial Planners सुद्धा तुम्हाला हे अनेकदा विचारू शकतील कारण ही सुद्धा एका प्रकाराची रिस्क आहे आणि ती मॅनेज करावी लागते. पुढे जाऊन कौटुंबिक प्रश्न उद्भवल्यास आधीच्या प्लॅनिंग चा फज्जा उडू शकतो.
आजच्या जगात सुख हे मग ते वैयक्तिक, कौटुंबिक वा सामाजिक असो , आर्थिक परिस्थितीशी पहिल्यापेक्षा अधिकाधिक निगडित होत आहे आणि इथून पुढे अधिक वेगाने होणार आहे.
आर्थिक परावलंबित्व किंवा आर्थिक कोंडमारा नातेसंबंध आणि family health बिघडण्याचे मोठे कारण म्हणुन पुढे येत आहे.

उतारवयात naturally रिटायर होणे वेगळी गोष्ट आहे आणि मनाला वा शरीराला गुंतवून ठेवणारा भरीव प्लॅन नसताना 'आपण irrelevant होत आहोत " हे स्विकार करणे जोडीदारा पैकी एकाला वा दोघांनाही अवघड होऊ शकते. ज्यात वाईट नाही पण असे झाल्यास काय असा विचार जरूर करावा.

> हो हो, घेऊनच जा तुमच्यासोबत उरले सुरले Lol > मला ज्याला द्यावेसे वाटते त्याला देणार. कायदादेखील माझ्या बाजूने आहे Lol Lol

> हे कोण सिद्ध करणार ? > मीच ठरवणार ना. Yearly performance review घेऊन मृत्युपत्र अपडेट करू शकते.

> तीने इतकी वर्षे सोबत केली व त्या बदल्यात घराच्या मालकाकडून अन्न वस्त्र निवारा मिळवला. > बरोबर! समाजसेवाम्हणून केली नव्हती सोबत, उदरनिर्वाहाचे साधन म्हणून केलेली.

> याची वागणूक कशी आहे हे बघायचा प्रश्न येतंच नाही, कारण? हा मालक ना... > तुम्ही तुमच्या कम्पनीच्या मालकाची वागणूक बघत होता वाटतं. अन तो तुमच्या मताला किंमत देत होता. बळी तो कान पिळी असतंय ओ...

> पैशांचा प्रश्न आला की माणसांची खरी रूपे बाहेर दिसतात म्हणतात ते खोटे नाही. > ऑफकोर्स. नाहीतर त्या बाईने आयटीवाल्याशी लग्न का केलं? समाजसेवा म्हणून का?
===

असो. स्त्रिवाद कोळून पिलेल्यांशी एवढा संवाद पुरे. यापुढे दुर्लक्ष करण्यात येईल.

> हो हो, घेऊनच जा तुमच्यासोबत उरले सुरले Lol > मला ज्याला द्यावेसे वाटते त्याला देणार. कायदादेखील माझ्या बाजूने आहे Lol Lol>>>

हायला, धागा यांचे 1 करोड कुठे गुंतवावे यासाठी काढला होता होय.... चांगला सस्पेन्स राखला.

हातपाय चालेनासे झाल्यावर पालनकर्ते (केयरगिव्हर) म्हणून एखादीच नातेवाईक व्यक्ती मदतीला असेल तर तिचे भले व्हावे म्हणून अशा प्रकारची मृत्यूपत्र करतात. उदा: दोन-तीन मुले व पत्नी ह्यात पत्नी व मुलगा त्रास देत असतील पण मुलगी मायेने करत असेल तर मरणपत्र वार्षिक आढावा इ पद्धतीचे काही करावे. पण सहचराशिवाय इतर कुणी केयरगिव्हर नाही, सध्या पत्नीशी संबंध मधुर आहेत तर साप-साप म्हणून भुई धोपटण्यात काय अर्थ आहे. पत्नी किंवा पती सगळ बळकावेल पेक्षा वार्धक्यात माझी बुद्धी चालेनाशी झाली की माझी काळजी कोण घेणार हा दोघांनी मिळून विचार करणे जरूरी आहे.
नाहीतर त्या बाईने आयटीवाल्याशी लग्न का केलं? समाजसेवा म्हणून का? >> Happy कोण कुणाशी का लग्न करेल हे सांगता येत नाही. धीरूभाईने का केल कोकीलाबेनशी लग्न? पण ते लग्न दोघांनी कसं निभवलं ह्याचा अनेकांना आदर्श वाटतो.

मालक इतका उदार की तो मेल्यावर ह्या बायकोरुपी मोलकरणीने त्याच्या घरात राहायचे की नाही, तिला पैसे मिळणार की नाही हे तिची आजवरची वागणूक बघून ठरवणार.... याची वागणूक कशी आहे हे बघायचा प्रश्न येतंच नाही, कारण? हा मालक ना...
>>>>

कोणताही मालक आपल्या मृत्युपश्चात मोलकरणीला आपली प्रॉपर्टी देऊन जात नाही.
असे असते खरेच तर मी ईंजिनिअरींग सोडून मोलकरणीचाच कोर्स केला असता.

धीरूभाईने का केल कोकीलाबेनशी लग्न? पण ते लग्न दोघांनी कसं निभवलं ह्याचा अनेकांना आदर्श वाटतो.
>>>>

खरे कारण त्यांनाच माहीत. जे त्यांनी जगाला सांगितले वा जगाने जे तर्क केले ते खरे असेलच असे नाही.

कायदा तुमच्या बाजूने नाही. तुम्ही कॉमन लॉ स्टेट मध्ये आहात, कम्युनिटी प्रॉपर्टी स्टेट मध्ये आहात, प्रॉपर्टी वर कोणाची नाव आहेत, तुमचं एकट्याच असेल आणि मृत्युपत्रात सध्याची आणि जिवंत स्पाऊसला काहीच भाग नसेल तर ती त्या मालमत्ते मधला हिस्सा मागू शकते.
लग्न शाबूत असताना कमावलेली संपत्ती तुमच्या एकट्याची असतं नाही. असूही नये. तसं वाटतं असेल तर आत्ताच लग्न बंधनातून मुक्त व्हा.

लग्न बंधनातून मुक्त >>अरे अरे!! त्या बिचार्‍या को.सो. यांच्या मित्राच्या फक्त रिटायरमेन्ट चा इश्यू असताना आणि १ करोड पुरेत का इतका गोड प्रश्न असताना त्यांच्या बायकोला अ‍ॅमींनी विषारी की विखारी बनवून जायदाद से बेदखल आधीच केलं आहे. आता तुम्ही त्यांचा उगीच डिव्होर्स पण करायला निघालात. नका हो असं करू! Proud

"जोडीदारावर पूर्ण विश्वास आहे का?" दोघांनाही हा प्रश्न विचारणे आणि तोही वेगवेगळा हे प्लॅनिंगमध्ये मदत करणार्‍या प्रोफेशनल-त्रयस्थ माणसाने विचारणे आजिबात ईनवॅलिड नाही (कितीही ऑफेंडिंग वाटले तरी). प्रोफेशनल प्लॅनरच्या क्लायंटला विचारण्याच्या प्रश्नावलीचा तो एक भाग असतोच असतो. प्रोफेशनल प्लॅनर्सना त्यांच्या ट्रेनिंग/अभ्यासादरम्यान कौटुंबिक कलह अस्तांना वा मागाहून ऊदभवल्यास फायनॅनशिअल प्लॅनिंग कसे करायचे ह्याच्या केस स्टडीज असतात.
डॉक्टरकडे चेकप ला गेल्यावर जसे तो विचारतो (दारू, सिग्रेट ड्रग्ज असे काही सेवन करता का? ह्याच्याही पुढे काही स्पेसिफिक केसेस मध्ये मल्टिपल से. पार्टनर्स आहेत का असेही विचारल्या जाते) तसाच हा वैधानिक टाईप्सचा प्रश्न आहे.
सिनेमातला रेफरंस चालत असल्यास शॉशंक रिडंप्शन मध्ये अँडी आणि कंपनी फॅक्टरीच्या गच्चीवर टार पसरवण्याचे काम करतांना तो कॅप्टन हॅडलीच्या टॅक्स वाचवण्यासबंधी प्रश्नावर "बायकोला वन टाईम टॅक्स फ्री गिफ्ट करू शकतोस" असे ऊत्तर देण्याआधी "तुझा तुझ्या बायकोवर विश्वास आहे का" असा ईंटिमेडेटिंग आणि ऑफेंडिंग प्रश्न विचारतो ज्याने कॅप्टन हॅडलीचा भडका ऊडतो. वेल अँडीच्या प्रश्नाला ईतर सार्कॅस्टिक पैलू असतात पण जेव्हा तो टॅक्सबद्दल बोलतो तेव्हा हॅडली त्याचे विचारणे ऑफेडिंग वाटत नाही.

खरे कारण त्यांनाच माहीत. जे त्यांनी जगाला सांगितले वा जगाने जे तर्क केले ते खरे असेलच असे नाही. >> पोस्ट अर्धवट तोडून परत तेच कशाला सांगायचं... पूर्ण पोस्ट अशी होती - Happy कोण कुणाशी का लग्न करेल हे सांगता येत नाही. धीरूभाईने का केल कोकीलाबेनशी लग्न? पण ते लग्न दोघांनी कसं निभवलं ह्याचा अनेकांना आदर्श वाटतो.

स्वेच्छा निवृत्ती घेताना घटस्फोट सुद्धा घ्यावा का?
असा धागा पहायला मिळाला तर फार आश्चर्य वाटणार नाही.

जोक्स द् अपार्ट
स्वेच्छा निवृत्ती घेताना जोडीदाराची परवनगी आवश्यक असणे गरजेचे. हा निर्णय दोघांचा असावा हे मात्र खरे

पण ते लग्न दोघांनी कसं निभवलं ह्याचा अनेकांना आदर्श वाटतो.
>>>
यातला पण अर्थ बदलतोय ..
तसेच कसे निभावले याचा आदर्श घ्यायचा तर त्यात काय विशेष होते? करोडो लोकं लग्न निभावतात. पण ते का निभावतात हे देखील त्यांनाच ठाऊक असते Happy

तसेच कसे निभावले याचा आदर्श घ्यायचा तर त्यात काय विशेष होते? >> इथे आर्थिक बाबींची चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने धीरूभाई वारल्यावर संपत्तीची वाटावाटी यावरून मतभेद झाले. प्रकरण कोर्टापर्यंत गेले. तिथेही आईच्या सल्ल्याने प्रकरण सोडवा/सोडवू असे सर्वांचे ठरले. "काकी"चे (आई) मत असे एक दिवसात महत्त्वाचे ठरत नाही. लग्न, मुले, कंपनी ह्या सर्वातील नाती दोघांनी नीट निभवली तर अवघड प्रसंगातून मार्ग निघतो अगदी जोडीदार गेल्यावर सुद्धा. सबब लवकर निवृत्ती घेताना एकत्र भविष्य आखणे महत्त्वाचे, उगाचे संशय करून फायदा नाही. बायको 'विषारी' आहे असे काही पुरावा नसताना उगाच मनात आणू नये.

सर्वात आधी तुमच्या मित्राने त्याचे रिस्क प्रोफाइल बघितले पाहिजे. रिटायर झाल्यावर पैसे सेफ ठिकाणी गुंतवले तरीही महागाई (inflation) ला मात करण्यासाठी इक्विटी (स्टॉक मार्केट) मध्ये गुंतवणूक करण्याशिवाय पर्याय नाही. अर्थात त्यासाठी ऑप्शन्स, फ्युचर्स, डेरिव्हेटिव्स अशा नावांची काहीही गरज नाही.

घर जर संपूर्ण मालकीचे असेल तर २ जणांचा खर्च ४०,००० रुपये महिना या बजेटमध्ये भागू शकेल, असा माझा अंदाज आहे. (संदर्भ ) दोघांचे १ वेळ जेवण रुपये १००/- प्रत्येकी धरून दिवसाला ४०० आणि महिन्याला १२,००० असा अंदाज केला. फोन, इंटरनेट, इलेक्ट्रीसिटी वगैरे ५,००० महिना आणि रिक्षा प्रवास वगैरे २०० रुपये दिवसा प्रमाणे ६००० रुपये महिना धरून २३,००० रुपये महिना खर्च होतो. ५,००० रुपये महिना सोसायटी फी, ३००० रुपये महिना कपड्यांचा खर्च, ९००० रुपये महिना सहलीचे धरून ४०,००० रुपये महिना होतात. कदाचित तुमचा अंदाज वेगळा असळा, पण सांगायचा मुद्दा इतकाच की अगदी उपाशी पोटी आणि मन मारून जगावे लागणार नाही. या सर्व किमती आजच्या आहेत. २० वर्षांनी जेवणाची थाळी १००० रुपयाला होईल, या म्हणण्याला आज काही अर्थ नाही कारण आपण पोर्टफोलिओची वाढ बघताना त्यात महागाई दर (inflation) बघणार आहोत.

यानंतर मुद्दा येतो की १ करोड पुरतील की नाही. यासाठी उत्तम उपाय म्हणजे मॉन्टे कार्लो अ‍ॅनॅलिसिस केला पाहिजे. यासाठी मी फायरकॅल्क ही साईट वापरली. यात रक्कम रुपयांमध्ये देता येत नाही, पण ढोबळ अंदाज येण्यासाठी १ करोड हे ७० रुपये प्रति डॉलर वापरून अंदाज घेतला तर पैसे पुरतील असे दिसते. (यात मुद्दल शिल्लक राहाते, पण तुमच्या मित्राला असे काही दडपण नसेल तर चित्र अजून सोपे दिसेल). मी पुढील अंदाज वापरले. वार्षिक खर्च ६ लाख रुपये (Spending ~ ८६०० डॉलर ), शिल्लक १ करोड (Portfolio ~ १५०,००० डॉलर) आवश्यकता ४० वर्षे, Not retired yet, अजून ३ वर्षांनी २०२२ मध्ये रिटायर होणार तोपर्यंत दरवर्षी ~५,६०,००० रुपये वाचवणार (~८००० डॉलर), महागाई दर (inflation) ६%, How will your spending vary in the future मध्ये Percentage of Remaining Portfolio आदल्या वर्षाच्या ९५% दर, A portfolio with random performance, with a mean total portfolio return of 10% and variability (standard deviation) of 10%. Assume an inflation rate of 6.00% धरले.

यानुसार १००% केसमध्ये पैसे पुरतील असा अंदाज आहे. अर्थात हा अंदाजच आहे, पण १ ठोकताळा म्हणून हाडाचा फायनान्शियल प्लॅनर नेहमीच मॉन्टे कार्लो अ‍ॅनॅलिसिस करतो.

किमान ५-६ करोड हवेत किंवा विषारी बायको नको या अश्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करून, हा धागा पूर्ण डिरेल होण्याऐवजी ट्रॅकवर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. कृपया गोड मानून घ्या.

तिथेही आईच्या सल्ल्याने प्रकरण सोडवा/सोडवू असे सर्वांचे ठरले.
>>>>
करोडोंची प्रॉपर्टी आणि एका आईच्या सल्याने हे ठरले हे सुद्धा आपण बांधलेला अंदाज वा आपल्यापर्यंत आलेली बातमीच. सत्य त्या कुटुंबालाच ठाऊक Happy

बायको 'विषारी' आहे असे काही पुरावा नसताना उगाच मनात आणू नये.
>>>

माझी पोस्ट कोट करून लिहिलेल्या प्रतिसादाच्या पॅराग्राफमधील हे शेवटचे वाक्य असल्यने क्लीअर करतो माझा या विषारी बायको चर्चेशी काही संबंध नाही.
मला साप विषारी की बिनविषारी हे ओळखता येत नाही तर लोकांच्या बायका कश्या हे ओळखणे टू मच Happy

अमितव,
भारतातले स्वार्जित मालमत्तेबद्दलचे कायदे काय आहेत हे माहीत करून घ्या; जमलं तर....

किमान ५-६ करोड हवेत किंवा विषारी बायको नको या अश्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करून, हा धागा पूर्ण डिरेल होण्याऐवजी ट्रॅकवर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे>>>>> धन्यवाद उपाशी बोका !!!! मित्राला मॉन्टे कार्लो अ‍ॅनॅलिसिस करायला सांगेन. धाग्याने भलतीकडेच वळण घेतले होते...परंतु तुमचा उपयोगी असलेला प्रतिसाद सुखावून गेला.

with a mean total portfolio return of 10% and variability (standard deviation) of 10%. Assume an inflation rate of 6.00% धरले. >> Lol
दादा ते १९३० मध्ये दक्षिण ध्रुवावर नाही २०२२ मध्ये भारतात रिटायर होत आहेत. Proud NSE VIX चा काल परवाचा नंबर आहे २० तो ही मार्केट ऑल टाईम हाय असतांना भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि स्टेबल ५० कंपन्यांसाठीचा ज्या भारतीय स्टॉक मार्केट रिप्रेझेंट करतात.

२० नंबर म्हणजे पुढच्या ३-४ महिन्यात मार्केट +/- २०% वर खाली होण्याचा चान्स आहे १ स्टँडर्ड डेविएशन म्हणजे ६८%. ऊरलेल्या ३२% मध्ये २०% च्या बाहेर काहीही होऊ शकते. २० ही बॉर्डरलाईन वॉलॅटिलिटी नंबर आहे ज्याच्या पुढे प्रत्येक पॉईंट ते अजून वेगाने अनस्टेबल होत जाते. तुम्ही जसा टाईम वाढवाल ऊदा. ३-४ महिन्याचे एक वर्ष केले तर हा २० नंबर अजून वाढवावा लागेल. Vol~~Time.

जगातल्या सर्वात स्टेबल अमेरिकन मार्केटची Vol १५ च्या आसपास आहे तुम्ही 10% variability कुठून काढलीत ?
ऑक्टो. २००८ मध्ये अमेरिकेच्या वॉल ईंडेक्सने ६० चा आकडा क्रॉस केला होता. म्हणजे आज पुन्हा तो ईवेंट रिपिट झाला तर तुमचे १ करोड ४० लाखावर आले समजा...समजायचे काय भारतीय मार्केट २००८ ते २००९ मध्ये ५०% पडलेच होते.. घराच्या किंमती ३०% पडतील त्या वेगळ्या.
ह्यासाठी तरी ऑप्शन प्रायसिंग समजून घ्या म्हणजे ईंप्लाईड वॉलॅटिलिटी कशी काढतात समजेल.

तुम्ही १०% अ‍ॅन्युअल रिटर्न म्हणत आहात म्हणजे ५ वर्षात तुम्हाला कमीतकमी क्युम्युलेटिव ६१% रिटर्न मिळाला पाहिजे पण स्टॉक मार्केट बघितले आहे का भारताचे? मुष्कीलीने ४०-४५% रिटर्न्स आहेत मागच्या पाच वर्षात? तेही मार्केट ऑल टाईम हाय असतांना.
तुमच्या ह्या अ‍ॅझुम्ड नंबर्सना काही फॅक्ट्सचा बेस आहे की असेच राऊंड फिगर नंबर्स घेतले आहेत?

असेच आपले सर्च केले आणि मोंन्टे कार्लो अनालिसिस साठी ही साईट सापडली जिथे काही parameters देऊन पाहता येते की असलेली रक्कम किती वर्षापर्यंत चालू शकेल.
https://www.retirementsimulation.com/

@हायझेनबर्ग
मी खरंतर उत्तर देणार न्हवतो, पण तुम्ही ज्या आत्मविश्वासाने आकडे फेकत आहात, त्याचे कौतुक वाटते. VIX हा व्होलॅटिलिटी दाखवतो, महागाई नाही. त्यामुळे तुमच्यासारखे डेरिव्हेटिव्ह ट्रेडर्स तिकडे लक्षपूर्वक बघत असले तरी लाँग टर्म इंव्हेस्टरच्या दृष्टीने त्याला फारसे महत्व नाही. “In the short run, the market is a voting machine but in the long run, it is a weighing machine.” - Benjamin Graham
शिवाय reversion to the mean तुम्हाला माहीत असेलच.

भारताचे इंफ्लेशन इथे बघता येईल. साधारण १०% हा अंदाज अगदीच वाईट किंवा पूर्णतः चुकीचा नाही. पण तुमची रिस्क प्रोफाईल अगदी वेगळी असेल तर ५-६ करोड कशाला, अगदी १० करोड होईपर्यंत काम करत राहिलात तरी कुणाचीच हरकत असणार नाही.

मी खरंतर उत्तर देणार न्हवतो,>> का?
पण तुम्ही ज्या आत्मविश्वासाने आकडे फेकत आहात, त्याचे कौतुक वाटते. >> कुठला आकडा चुकला दाखवता का?
तुम्ही माझा प्रतिसाद तरी वाचलात का? तुम्हाला तो कळला का? Uhoh

माझ्या प्रतिसादात ईफ्लेशन/ महागाई ऊल्लेख तरी आहे का? तुमच्या १०% standard deviation ~~ Variability ~~ Volatility च्या गृहीतकाला चेंलेंज केले आहे.
जिथे भारतीय ईंडेक्स सांगतो की तो २०% पड्ण्याचे चांसेस ६८% आहेत तिथे तुम्ही १० % कुठून फेकत आहात एवढेच विचारले.

आकडे फेकत आहात म्हणजे खोटे बोलत आहात असे न्हवे, तर तोंडावर फेकत आहात. (५-६ करोड वगैरे) >> तो नंबर कसा काढू शकतो त्याचे पूर्ण अ‍ॅनालिसिस आणि स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे. ते तुम्ही स्कीप केलेले दिसते. असो.

तुम्ही बफे, ग्राहम ह्यांचे कोट्स देता. त्यांची ईन्वेस्टमेंट फिलॉसॉफी काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? कुठल्या कंटेक्स्टमध्ये त्यांचे कोट्स अप्लिकेबल होतात ते मी तुम्हाला डीटेल मध्ये सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल का?

बर्‍याच लोकांना माहित असते वॉरन बफे शेअर मार्केटमध्ये पैसे कमाऊन श्रीमंत झालेला माणूस आहे. पण ते नेमके असे वेगळे काय करतात जे ईतरांना जमत नाही ते फार कोणालाच माहित नसते.

ग्रॅहम 'वॅल्यू ईन्वेस्टर' होते.. बफे वॅल्यू/ अ‍ॅक्टिविस्ट ईन्वेस्टर आहेत... व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट चा अर्थ जी कंपनी आज काही कारणाने खूप स्वस्त झाली आहे किंवा अजून कुणाला ज्या कंपनीची खरी ईंट्रिन्सिक वॅल्यू समजलेली/दिसलेली नाही अशी पण त्याच बरोबर जी जिच्यात अजून खूप प्रॉफिट मेकिंग पोटेंशिअल बाकी आहे.. अशा कंपन्या (ज्यात तुम्ही आम्ही आजही $१००० लावायलादेखील धजणार नाही) हुडकून काढून त्यांचे शेअर्स प्रचंड प्रमाणात विकत घेऊन, त्याद्वारे वोटिंग राईट्स जमवून कंपनीच्या मॅनेजमेंटला आपल्या हिशोबाने चालायला भाग पाडून बिझनेस प्रॉफिट मिळवणे असा आहे. एका कंपनीसाठी शेअर जमवायला सुरूवात करून तिला नफ्यात आणण्याची ही प्रोसेस ५-१०-१५-२० कितीही वर्षांची असू शकते.
दर वेळी अ‍ॅक्टिविझम (मॅनेजमेंट टेकओवर करणे) केला नाही तरी डीप वॅल्यू कंपन्यांमध्ये दशकेच्या दशके सतत ईन्वेस्ट करत राहणे.

ही वेगळी ईन्वेस्टमेंट फिलॉसॉफी आहे जीमध्ये मार्केटमधले ऊतार चढावाचा फारसा फरक पडत नाही कारण कंपनीच्या प्रॉफिट मेकिंग मशीनच्या नाड्या बफेंच्या हातात असतात.
थोडक्यात तुम्ही तुमच्या टीममधील स्मार्टेस्ट आणि बेस्ट परफॉरर्मिंग एम्प्लॉईवर पैसे लावणे आणि त्यांना तुम्हीच ग्रूम करणे. हे तुम्हाला आम्हाला जमणार आहे का? आहे का तेवढा पेशन्स, लाँग टर्म व्ह्यू आणि वेळ आपल्याकडे?

बफे आणि मंगर जेव्हा बर्क.हाथ. च्या अ‍ॅन्युअल मिटिंग मध्ये बोलतात तेव्हा ते त्यांच्या कंपनीच्या भागधारकांशी जे त्यांच्यासारखे लाँग टर्म वॅल्यू ईन्वेस्टर आहेत त्यांच्याशी थेट बोलत असतात. आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टर नसल्यास त्यातले सगळे आपल्यासारख्या ईन्वेस्टर्सना लागू होत नाही.
त्यामुळे लक्षात घ्या बफे स्ट्रॅटेजी "फाईंड, ईन्वेस्ट अँड फर्गेट" आहे... अर्ली रिटायरमेंट घेणारा ज्याचा पोर्टफोलिओ हेच त्याच्या ऊत्पन्नाचे साधन आहे बफेची फिलॉसॉफी वापरू शकत नाही.

अजून एक लक्षात घ्या .. सीएनबीसी वगैरेचे रिपोर्टर्स आर्ट्स मेजर असतात ते फक्त पब्लिक साठी एक दिपून जाणारी स्टोरी बनवतात. ह्या लोकानी कधी कंपनीचा ताळेबंद सुद्धा हातात घेतलेला नसतो. त्यातले काय शक्य आहे, काय नाही किती फॅक्ट आहे किती मसाला हे मार्केटच्या बोचर्‍या पाण्यात ऊतरल्यावरच कळते. आणि खरे मार्केट analysis रिपोर्टस तुम्हाला सहजी फ्री मध्ये वाचायला देखील मिळणार नाहीत.

बर्कशायर हाथवेच्या (जी बफेंनी अशीच अ‍ॅक्टिविझम द्वारे आपल्या कह्यात घेतली) एका ओवरटेकिंग्मध्ये मार्केट चार वेळा पडून पुन्हा वर येते पण त्या दरम्यान ना ते डगमगता, ना त्यांना काही विकावे लागते. आले का लक्षात आता ग्रॅहम/बफे 'वेईंग गेम का आणि कशाला म्हणतात ते?' का त्यांना 'ओरॅकल ऑफ ओमाहा' म्हणतात... कारण ते खूप पुढचे बघू शकतात आणि जे बघितले तसे घडेल असे प्रयत्न करूही शकतात आणि ते करतांना पेशंटली संधीची वाट देखील बघू शकतात....

आपल्या ह्या वरच्या केससारख्याचे कटथ्रोट प्लॅनिंग त्यांना करायला दिले तर ते सुद्धा कदाचित आपल्यासारखेच विचार करतील.
तुम्ही-आम्ही करू शकणार आहोत का त्यांच्यासारखे पेशन्स ने वॅल्यू ईन्वेस्टिंग. आहे का तेवढी कॅपिटल, पेशन्स आणि वेळ आपल्याकडे?.
आणि त्याही आधी पोटेंशिअल असणार्‍या स्वस्त कंपन्या जशा ग्रॅहमना ओळखता येत, जे त्यांनी बफेंना शिकवले तसे आजवर अनेक ग्रेट माईंड्स ना जमले नाही. ते तुम्हाला जमणार आहे का?

तुम्ही-आम्ही ह्या संसाराच्या मायाजालात गुरफटलो असतांना विवेकानंदाचे कोट्स फेकून काय होणार आहे?

शिवाय reversion to the mean तुम्हाला माहीत असेलच. >> आणि रिवर्जनच्या निगेटिवसाईडला तुम्ही ७० चे झालात तर? मुलाच्या कॉलेज फी भरण्याच्या वेळी मार्केट ३०% पडले? दवाखान्याच्या खर्चाच्या वेळी रिवर्जन सायकलला ट्रफ आला?
थोडक्यात रिवर्जन सायकलचे शेड्यूल तुम्हाला माहित असल्यास आणि तुम्ही अजून सवाशे वगैरे वर्षे जगणार असे तुम्हाला पक्के माहित असल्यास तुम्ही दरवेळी मीन रिवर्जन होण्याची वाट बघू शकता.

अमितव,
बघितला का भारतातला कायदा?
> Submitted by अमितव on 6 November, 2019 - 20:29 > बरोबरएय का हे जे काही एवढ्या कॉन्फिडन्टली लिहलंय ते?

Pages