लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?

Submitted by कोहंसोहं१० on 1 November, 2019 - 22:10

माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.

पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.

त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

>>Submitted by उपाशी बोका on 6 November, 2019 - 12:44<<
कंन्विंसिंग वाटण्याजोगं आहे. पण अन्प्लॅन्ड्/अन्सर्टन एक्स्पेंसेस (अ‍ॅक्सिडेंट्स, मार्केट क्रॅश वगैरे), शिवाय हेल्थ केयर प्रिमियम्स, डिडक्टिबल्स इ. यांचं काय? हे आणि यासारखे अननोन्स १ करोडच्या गंगाजळीत बेक्ड इन आहेत काय?..

स्पाऊस नीट वागला नाही (????) आणि मरताना तो तुमचा लीगल आणि लिव्हिंग स्पाऊस असेल आणि तुम्ही तुमच्या विल नुसार प्रॉपर्टी मधला काहीही हिस्सा त्याला/ तिला ठेवला नाहीत, किंवा पुरेसा ठेवला नाहीत तर विल चॅलेंज (आणि रिव्होक) करता येते. अगदी भारतातही.
याविषयावर इथे बोलायची इच्छा न्हवती. तुम्ही खोदुन विचारताय म्हणून लिहिलं. यापुढे लिहिणार नाही. विषय वाढवायचा असेल तर दुसरीकडे बोलू.

> कायदा तुमच्या बाजूने नाही. तुम्ही कॉमन लॉ स्टेट मध्ये आहात, कम्युनिटी प्रॉपर्टी स्टेट मध्ये आहात, प्रॉपर्टी वर कोणाची नाव आहेत, तुमचं एकट्याच असेल आणि मृत्युपत्रात सध्याची आणि जिवंत स्पाऊसला काहीच भाग नसेल तर ती त्या मालमत्ते मधला हिस्सा मागू शकते.
लग्न शाबूत असताना कमावलेली संपत्ती तुमच्या एकट्याची असतं नाही. असूही नये. तसं वाटतं असेल तर आत्ताच लग्न बंधनातून मुक्त व्हा. >

हे आणि

> स्पाऊस नीट वागला नाही (????) आणि मरताना तो तुमचा लीगल आणि लिव्हिंग स्पाऊस असेल आणि तुम्ही तुमच्या विल नुसार प्रॉपर्टी मधला काहीही हिस्सा त्याला/ तिला ठेवला नाहीत, किंवा पुरेसा ठेवला नाहीत तर विल चॅलेंज (आणि रिव्होक) करता येते. अगदी भारतातही. >

हे, दोन्ही एकच नाहीय. पण तरी
'अगदी भारतातही' ऐवजी 'केवळ भारतातले' असे एखादे उदाहरण दिलेत तर बरं पडेल. इथे चर्चा नको असेल तर तुम्हाला योग्य वाटेल त्या धाग्यावर लिहा. माझ्या नजरेस पडेल बहुतेक. मग तिकडे बोलू.

बायकोचा ( /नवऱ्याचाह/) मुद्दा येऊ नये कारण
एवढ्या मोठ्या रकमेचा विचार करणाऱ्या जोडप्यांचे नवरा बायकोचे आर्थिक व्यवहार स्वतंत्रच असतील. तू तेरा देख इतके निर्ढावलेले असतील.

याची तरतूद केली का? ही काँ टिजन्सी विचारात घेतली का हे प्रश्नही पहिल्या पा नावरच्या छान निर्णय, सहज पुरतील इतकेच व्हेग आणि भोंगळ वाटू लागलेत.
त्यांनी फायनान्शल प्लानर कडे जावं आणि जात राहावं हे बरोबर. (कोहंसोहं - वाचताय ना?) शिवा य आतापा सूनच पर्सनल फाय नान्सचा अभ्यास सुरू करावा . म्हणजे प्लानर च्या म्हणण्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायला नको. कारण प्लानरसुद्धा वरच्यासारखा एक्स्ट्रीम लुक आउट वाला नसेलच हे कोणी सांगा.
ते अजूनही अ‍ॅक्युम्युलेशन स्टेज मध्ये आहेत. २५ लाखाव्यतिरिक्त (त्यांची आतापर्यंतची गुंतवणूक कमी जोखमीची, डेब्ट हेवी होती असं दिसतंय) १ करोड वर निघणा र्‍या उत्पन्नातला ब र्‍यापैकी हिस्सा पुढ लं किमान एक दशक वाचणार आहे. त्यातून गुंतवणूक होत राहील.
म्हणजे त्या २५ लाखात भर पडत राहील.
अ‍ॅक्युम्युलेशन स्टेज संपली की त्यांना पोर्ट फोलियो डेब्टकडे झुकवत जावा लागेल. वाढत्या वयाबरोबर कमी होणारी रिस्क कपॅसिटी) त्यामुळे मार्केट क्रॅश झालं तरी डेब्ड फंड हाताशी असेलच ऐन वेळी गरज पडली तर.
भारतात डायरेक्ट इक्विटी गुंतवणूक करणार्‍यांचं प्रमाण आधीच कमी. त्यात डेरिव्हेटिव्हजमध्ये किती जातील. सगळ्यांना बेस्ट रिटर्न्स, मार्केटला कायम बीट करता येणं, वॉरेन बफे होणं याची गरज आहे का? स्वतःचे पाय नी ट पसरता येतील इतके मिळाल्याशी कारण, लोक इथे एफ डी एफ डी चा जप करत असताना (मला वाटायचं मरा ठी मालिकांमधली पात्रच सगळी गुंतवणू़ क एफ डीत करतात) त्यांनी म्यु च्युअल फंडात पैसे गुंतवले तरी खूप प्रगती आहे. डेरिव्हेटिव्हज म्हणजे चंद्रयान लँड करता येत नाही आणि चालले शनीची कडी मोजायला.

लोकांनी हेल्थ इन्शुरन्स, सरकारी रुग्ण्यालयं, चॅरिटेबल रुग्नालयं अजिबातच विचारात घेतलेली नाही.

माझ्या दृष्टीने दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. नि वृत्त झा ल्यावर मिळणार्‍या वेळाचं आणि रिकामपणाचं काय करायचं?
नव्या गोष्टी शिकणं, करयच्या राहून गेलेल्या गोष्टी करणं, पैसे न कमवताही कार्यरत राहणं. त्यांच्या कामाचं वर्णन पाहता ते पुढेही पैसे कमवत राहू शकतील. शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची काळजी घेणं. अ‍ॅमींनी मांडलेला नवरा घरी बसला की बायकोला त्याचा त्रास हो ऊ शकतो कारण तिचंही रूटिन डिस्टर्ब होणार आहे. हा मुद्दा व्हॅलिड आहे. दोघांनीही या मुद्द्याचा विचार करायला हवा.
दुसरा मुद्दा - वाढत चाललेली लाइफ एक्स्पेक्टन्सी आणि नव्या नव्या प्रकारचे आजार. तसंच वृद्धत्वात येणारं परावलंबित्व.

ते त्या स्टेजला येईतो, भारतात स्वेच्छामरणाची सोय येवो अशी माझी इच्छा आहे. (मीही त्याच नावेत आहे)

आजूबाजूला मुलं नसलेली, मुलं जवळ नसलेली माझ्या वयाची जोडपी बर्‍यापैकी संख्येने आहेत. पुढल्या तीस वर्षांत दीड पिढी बदलेल तेव्हा मुलं असलेल्या आणि जवळ असलेल्यांची आणि त्यांच्या मुला नातवंडांची विचारसरणी बदललेली असेलच.

यातले बहुतेक मुद्दे वेळेच्या खूप खूप खूऽऽऽखूप आधी निवृत्ती घेण्याच्या स्वानुभवावर आधारित आहेत. त्याबद्दल सविस्तर लिहीत नाही कारण इथले फेसलेस ट्रोल्स कुठल्या गोष्टी कुठे नेऊन ठेवतील याला सीमा नाही. त्यांचा त्रास न होण्याची लस टोचून घेतलीय. पण ते आजूबाजूला आहेत आणि डंख करतात ही गोष्टही नको आहे.

पूर्ण किंवा बहुतांश कॉर्पस वाइप आउट करणारा मार्केट क्रॅश हा जगबुडीसारखा असेल. त्यावेळी जे इतर सगळ्यांचं होईल , तेच माझं होणार. अशा गोष्टींची चिंता करायची तेवढीच करावी, हाही एक शिकलेला धडा.

बुद्धिमान,अती विचार करणाऱ्या लोकांची एक
खासियत असते.
पहिलं नसलेल्या समस्या शोधून प्रश्न निर्माण करायचा.
नंतर त्या सोप्या प्रश्नाचे उत्तर न शोधता ती समस्या आणि प्रश्न अजुन अवघड करायचा.
आणि मग त्या अवघड झालेल्या प्रश्नाचे उत्तर डोकफोड करून शोधायचे.
ह्या मध्ये सुंदर आयुष्याचे वाळवंट होते

@भरत, आणि @Rajesh188
माझे उदाहरण स्वत:चे टाकले आहे. किती पुरतील, वगैरे माहीत नाही.

भरत यांची वरील पोस्ट आणि एमी यांच्या सर्व पोस्टना +१११. अवांतर झालं तरी ते मुद्दे महत्वाचे आहेत.

हाब, तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग आणि ऑप्शन-डेरिव्हेटीव्ह वर सविस्तर धागा लिहाल का ? तो केदार यांचा धागा मी वाचतोय. मला अजून चांगले संदर्भ आणि पुस्तकांची सूची भेटली तर आनंद होईल. बरेच ब्लॉग्स वाचून आणि यूट्यूब पाहून जास्त गोंधळ झालाय .या क्षेत्रातील काही चांगले यूटुबर कोणी सांगेल का ? माझ्या व्यवसायातून मला चांगली अर्थप्राप्ती होते आणि ती दरमहा बचत म्हणून जुन्या पतसंस्था, सोनं आणि mutual funds मध्ये गुंतवत असतो.अजूनतरी अविवाहित असून घरच्यांबरोबर राहत असल्याने फार खर्च नसतो. भविष्यातही मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्या नसतील. रिस्क घेण्याची तयारी असून रोज काही तास वेळ देऊन इंट्राडे ट्रेडिंग आणि ऑप्शन-डेरिव्हेटीव्ह यांकडे second income source म्हणून कशी पावले टाकावीत ?

ते जे धागा लिहायला कारण कपल आहे त्यांचे मिडलाइफ क्राय्सिस आत्ता सुरू होत आहे असे मला वाट्ते. मी खूप ४४-४७ ब्रॅकेट मधले लोक बघते. ४३ हा तारुण्य फेक करायचा लास्ट पडा व. इथून पुढे सर्जरी हेअर ट्रान्सप्लांट ब्लड फेशिअल काही उपयोग नाही. पण अजून रग पूर्ण पणे गेलेली नाही. ह्या वयातले उच्च पदाला पोहोचलेले व न पोहोचु शकलेले पुरुष वेगवेग ळ्या प्रकारे स्ट्रेस मध्ये आहेत. इलोन मस्क उदा.
एक तर लफड्यात अडकणार नाहीतर आर्थिक घोटाळे करणार

बायका प्री मेनो पोझल त्यामुळे अति हायपर व हे लोकाम्वर दु ष्ट प णा करून डंख मारत राहणार, पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव बिहेविअर अगदी टोकाला जाउन पोहोचते. आई वडील म्हातारे होत असून आपण त्यांची काळजी घ्यायची आहे ही जबाब दारी घ्यायला हे रेडी असतात का नाही ते अजून क्लीअर नसते. वरच्या उदाहरणा तील बायको मूल नसल्याने फ्रस्ट्रेट झालेली असू शकते. ती पण ह्यांना सोडून नवा काही
चान्स घ्यायचा विचार करू शकते. मूल दत्तक. एकटे स्वतंत्र राहणे स्वतःचे पोटेन्शिअल चेक करणे वगैरे. उदा परमा चित्रपटा तील परमा.
दोन मुलांनंतर अफेअर करून खरा आनंद काय ते कळल्यावर एकटी राहून साधी नोकरी पत्करते. सर्व शक्यता आहेत.

ट्रेडिंगचा धागा आला की सांगा.

मला ना derivatives trading म्हणजे काही तरी लाईव्ह बॉम्ब हातात घेतल्यासारखे लोक वागतात आणि एकमेकांना सांगतात तिथे हात नको लाऊ बरका बॉम्ब फुटेल, ह्याची भारीच गम्मत वाटते. while on the contrary आयुष्यातला सर्वात मोठा derivatives trade ह्या लोकांनी ऑलरेडी केलेला असतो होम लोन घेऊन.

महिन्याकाठी भाडे भरून रिस्क फ्री राहण्याचा option होता ना पण नाही ह्यांनी ठरवले hot real estate मार्केटचा फायदा मिळविण्यासाठी आम्ही derivatives trade करणार आणि तो सुद्धा एकदम रिस्की आणि सुरुवातीपासूनच घाट्याचा. कसा ते बघू...

Derivatives मध्ये एक प्रकार आहे options trading आणि ह्यात एक प्रकाराचे option आहे put option. जे तुम्ही एखाद्या asset वर घेऊ वा विकु शकता.
ज्याने put option विकले तो म्हणतो तू मला ह्या $50 च्या प्रति शेअर $5 premium असे 100 शेअर्स साठी $500 तीन महिन्यांसाठी दे. मग पुढच्या तीन महिन्यात तुझ्या शेअरची floor price $50 फिक्स. शेअर जर $30 झाला तर तुझे प्रति शेअर $20 चे नुकसान मी देईन. तो $50 च्या वर $70 ला गेला तर $20 चा सगळा फायदा तू ठेव कुठल्याही केस मध्ये माझी कमाई फक्त आणि फक्त $500.

बघा आता आपण होम लोन घेतांना बँकेला काय म्हणतो.. ह्या घर नावाच्या शेअर ची price आहे 50 लाख. तीन वर्षानी माझ्या घराची किंमत घटून 30 लाख झाली तरी तुझी 50 लाखाची floor price फिक्स आहे आणि तुझे 20 लाखांचे नुकसान भरून देण्यासाठी मी बांधील आहे.
जर घराची price वाढून 70 लाख झाली तर तो 20 लाखाचा फायदा माझा. आणि ह्या trade साठी कॅपिटल उपलब्ध करून देण्याबद्दल मीच तुला premium देतो अर्थात interest.
हा 50 लाखाचा derivatives trade तुम्ही डोळे झाकून करणार आणि कोणी अरे मी 5000 (max risk) चे put options घेतले. Earnings call नंतर शेअर पडणार आहे 1000 सहज मिळतील.
असे म्हणाला की derivatives trade फार वाईट रे बाबा.. बॉम्ब आहे तो त्याच्याशी खेळू नको. Lol

तुम्ही accidental insurance policy घेता ना? that is Credit Default Swap अजून एक derivatives trade चा प्रकार. जे वापरून 2008 च्या subprime bonds च्या crisis मध्ये हुशार लोकानी बक्कळ पैसे कमावले. आणि आळशी लोक housing mortgage bond जगातील सर्वात सुरक्षित Investment vehicle मध्ये सगळे पैसे टाकून रिटायरमेंट एन्जॉय करत होते. ह्या सुरक्षित vehicle चा accident होऊन ह्यांना जाग येईपर्यंत त्यांचे अर्ध्याच्या वर पैसे उडाले होते.
They could have saved their retirement savings had they only looked in the credit default market.

अ‍ॅमीच्या पोस्ट्स आवडल्या.
'घरी राहाणार्‍या' बायका अनेकदा आर्थिक निरक्षर असतात. आमचे 'हे' बघतील, सांगतील, मी फक्त सही करते' असा दृष्टीकोन असतो. अशा कोणी बायका हा धागा वाचत असतील तर त्यांनी जरुर योग्य तो बोध घ्यावा. तुम्ही घरात जे घरकाम, मुलं वाढवणं करताय त्याचं मूल्य आहेच (बाहेर डे केअर वगैरे किती महाग आहे.) पण तुमची कपल म्हणून आर्थिक स्थिती काय , कुठे पैसे ठेवलेत, कोणाच्या नावावर - याचा अवेअरनेस हवाच.

राहण्यासाठी घर घ्यायला होम लोन घेतलं असेल तर ते डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग होतं का?
तुम्ही डेरिव्हटिव्ह ट्रेडिंगवर धागा काढा. मी थियरी शिकलोय. प्रॅक्टिकल जमतंय का बघू.

आयुष्यात कोणावर तरी विश्वास टाकावाच लागतो मग ज्याच्याशी गाठ बांधली गेली आहे आणि इतकी वर्षे संसार केलेला आहे त्याच्यावर विश्वास टाकण्यात काय गैर आहे. सुरुवातीच्या वर्षांत ठरवून केलेल्या लग्नात विश्वास नसणे समजू शकते पण लग्नाला 20-25 वर्ष झाल्यावर पण अविश्वास! असे लोकं संशयाने वेडे होतं नसतील का ? पैशाचं काय घेऊन बसले ज्या व्यक्तीवर विश्वास नाही अश्याच्या बाजूला झोपताना ही व्यक्ती तोंडावर उशी दाबून माझा जीव घेईल, हिनी/ह्यानी केलेलं मी जेवतो/जेवते, विष घातलं असणार असे नेक्स्ट लेवल विचार यायला पाहिजेत! Happy

अमा,
४५+ पुरुष आणि प्री एम स्त्रीयांबाबत तसेच अपत्यहीन स्त्री आहे तेव्हा फ्रस्टेट असू शकते वगैरे तुमचे सरसकटीकरण खटकले.
वर उल्लेख केलेल्या जोडप्यातील स्त्री गृहिणी आहे एवढीच माहिती आपल्याला आहे. अपत्यहीन असणे हे स्विकारुन तिने तिचे आयुष्य आखले असेलच ना. बहुतांश प्री एम आणि एम स्रीयांबाबत बोलायचे तर रोजची जीवनशैली चांगली, शिस्तीची असेल, मूळ स्वभावात सकारात्मकता असेल तर हा काळ सर्वसामान्य जातो. अगदी अपत्यहीन स्त्रीयांचाही. थोडाफार शारीरिक त्रास होतो पण तो योग्य उपचारांनी सहज मॅनेज होतो. मुळातच जीवनशैली योग्य नसेल तर मात्र या काळात त्याचे परीणाम विशेष जाणवतात. पुरुषांच्या बाबतीतही मी हेच म्हणेन. मुळात मिडलाईफ क्रायसिस बद्द्ल बोलायचे तर प्रत्येकाचे 'हे मिडलाईफ ' असे समजायचे वय वेगळे . ही फेज खरेच क्रायसिस असतो का? स्वतःला मोजणे, नव्याने समजून घेणे, पुढील आयुष्याची आखणी करणे होते हे चांगलेच आहे ना! आता त्यातच साठत आलेला तणाव आणि इतर टॉक्झिक बाबींमुळे काही नकारात्मक वर्तन घडले तर त्याचा ट्रिगर मिडलाईफ नाही तर चुकीची जीवनशैली .

सनव,
घरी रहाणार्‍याच नाही तर नोकरी करणार्‍या स्त्रीया देखील आर्थिक निरक्षर आढळतात. बरेचदा हे कंडीशनिंगमुळे होते , तसेच संधी नाकारल्यानेही होते. तसे तर आर्थिक निरक्षर पुरुषही आढळतात. मात्र कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना कुणी हटकत नाही.

स्वकष्टार्कित संपत्तीचे काय करायचे याचा अधिकार तुम्ही रहाता तिथल्या कायद्यानुसार मिळणार. मात्र बरेचदा लग्न-संसार यात आर्थिक व्यवहार एकत्र येतात. स्त्री गृहिणी असली तरी तिच्या नावावर गुंतवणूक करणे वगैरे सर्रास होते. अगदी स्थावर मालमत्ता देखील असते. भारतात स्त्रीधन म्हणून गाठीशी सोने असते. स्त्रीला माहेरुन संपत्ती मिळालेली असते. कुटुंब म्हणून आर्थिक नियोजन करताना परस्परांना विश्वासात घेवून मात्र आंधळा विश्वास न टाकता सामजस्याने निर्णय घ्यावे लागतात. त्यात 'गृहिणी असलेली पत्नी नीट वागली नाही तर' असा विस्कळीतपणा उपयोगी नाही. 'तू माझ्याशी शेवट पर्यंत नीट वागली नाहीस तर' असे म्हणून संपत्ती काठीसारखी वापरणार असाल तर तोही एकप्रकारचा छळच. नातेच जर श्रीमंत नसेल तर मग कशालाच अर्थ नाही.

वर कुणीतरी लिहिले आहे की मोठी रक्कम असेल तर व्यवहार स्वतंत्रच असतील तर बरेचदा त्याच्या उलट असते, व्यवहार अधिक गुंतलेले असतात.

Swati2 pl read full post. I have said all possibilities are there. I am trying to support the point of view of the wife who is in the most vulnerable position in this scenario. And have wished the best for this unknown couple.

अमा, मी पोस्ट वाचली. मित्राची पत्नी गृहिणी आहे आणि ते जोडपे अपत्यहीन आहे एवढेच आपल्याला माहित आहे.
>>बायका प्री मेनो पोझल त्यामुळे अति हायपर व हे लोकाम्वर दु ष्ट प णा करून डंख मारत राहणार, पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव बिहेविअर>> असे विधान सार्वत्रीकरण करणारे नाही का?
असो. मला जे खटकले ते मी लिहिले. तुमचे म्हणणे माझ्यापर्यंत नीट पोहोचले नसेल तर तो माबुदो.

जास्त विषय किचकट न साधं सोपा विचार करूया.
नोकरी ही आर्थिक प्राप्ती साठी केली जाते.
त्या नोकरी मधून आपण घर चालवतो,छंद पुरे करतो,आणि बचत करतो.
नोकरी मधून निवृत्ती घेतली की तुमचा आर्थिक प्राप्तीचा मार्ग बंद होतो.म्हणजे जी काही रक्कम तुमची बचत केलेली आहे त्या रकमेचे नियोजन अशा रीतीने करावे लागते की तुमच्या उर्वरित आयुष्यातील गरजा व्यवस्थित भागल्या जाव्यात.
नोकरी असताना तुम्ही बचत करत असता ती क्रिया निवृत्ती नंतर बंद होते..फक्त जगता यावे हाच उद्येश असतो.
तुमची जीवनशैली सांभाळण्यासाठी महिन्याला किती पैसे लागतात हे माहीत असल्या मुळे तसे नियोजन करावे.
70 च्या आसपास चा जन्म असल्या मुळे आयुष्य जास्तीत जास्त 80 वर्षच गृहीत धरावे.
जोपर्यंत शरीर उत्तम रित्या काम करत आहे तोपर्यंत फक्त व्याज वर च खर्च भगवण्याचा प्रयत्न करावा.
65 किंवा त्या पुढे वय गेले की तुमचा खर्च वाढू शकतो.
कारण आजारपण डोके वर काढतो.
तेव्हा तुम्हाला मुळ रकमेचा काही हिस्सा हा दर वर्षी वापरावा लागेल .
फक्त नवरा बायकोच असाल तर दोघांचे संबंध उच्च पातळीवर असायला हवेत.
माणूस हा समूह प्रिय प्राणी आहे .
किती ही वलगणा केल्या तरी एकटा व्यक्ती सुखाने आयुष्य जगू शकत नाही पैसा असला तरी.
मानसिक गरज ठराविक वयानंतर अनिवार्य असते.
गावीच जी लोक स्थायिक आहेत.
घरा शेजारी नोकरी आहे
(शिक्षक,पोलिस,तलाठी ईटीसी)ती लोक खूप सुखी आहेत.
नोकरी( पैस्याची आवक)आणि शेती करून ग्रामीण जीवन जगतात ते शहरातील श्रीमंत मध्यम वर्गीय पेक्षा किती तरी पटींनी मानसिक दृष्टी नी सुखी आहेत .आजी आजोबा नातवंडं बरोबर छान दिवस घालवत आहेत..
त्या घरात कोण्ही एकाकी पडलेलं नाही.
मुल पण एकाकी नाहीत आणि वृद्ध सुधा एकाकी नाहीत.
स्वर्ग सुख दुसरे तिसरे काही नसून हेच आहे.

स्वाती, सहमत आहे. म्हणूनच म्हटलं की कोणी संपत्ती काठीसारखी वापरुन आपल्याला ब्लॅकमेल करु शकेल अशी वेळ बायकांनी येऊ देऊ नये.
वेळीच जागं व्हावं आणि स्वतःची आर्थिक तजवीज करावी. त्यात जर मूलबाळ नसेल तर गृहिणी वगैरे शक्यतो पर्याय घेऊच नये. उलट चाईल्डफ्री असल्याचा फायदा घेऊन मस्त करीयर करावं.

ते तर आहेच. स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावे, रिटायरमेन्ट अथवा इस्टेट प्लानिंग करताना आंधळेपणाने मुलांना किंवा स्पाउस ला सर्वस्व देऊन टाकू नये इ. म्हणणे सर्व बरोबरच आहे, नवरा/ बायकोशी पुढे जाऊन पटले नाही तर काय हेही प्लानिंग योग्य आहे. पण ज्या स्त्रिया काहीही कारणाने होममेकर असतील त्यांना अशी शिक्षा मिळाली पाहिजे की दुसर्‍या स्त्रिया तसे करू धजणार नाहीत ( कोलॅटरल डॅमेज! चालतंय! ) ही जी वॄत्ती आहे ती स्त्रीवादी नसून सॅडिस्टिक वाटते. असो. यापेक्षा जास्त लिहिण्यात अर्थ नाही. धागा भरकटला आहे आधीच.

गरजे पुरता पैसा जरूर असावा .
पैसे कमविणे हे वाईट नाही
पण पैसे म्हणजेच सर्व काही असे समजणारे चुकत आहेत .
कुटुंब मधील नात्यात ,प्रेम,जिव्हाळा असणे हे पैसे asnya पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे .
कमी पैसे असतील आणि कुटुंबात नाती,प्रेम,जिव्हाळा ह्या तिन्ही बाबतीत तुम्ही यशस्वी असाल तर अतिशय आनंदी जगू शकता ..
फक्त पैसा तुम्हाला भौतिक सुख देईल( ते पण शरीराला manaval पाहिजे) पण आनंद देवू शकणार नाहीत .
अशी लोक लवकर निराशेच्या भावनेने घेरली जातात मग त्या तून व्यासणात सुख शोधत बसतात आणि शारीरिक आरोग्य बिघडून अजुन दुःखात जातात..

> स्त्री गृहिणी असली तरी तिच्या नावावर गुंतवणूक करणे वगैरे सर्रास होते. > सर्रास नक्कीच होत नाही.

> अगदी स्थावर मालमत्ता देखील असते. > खूप दुर्मिळ. स्वतःची/वारसाहक्कातून मिळालेली काहीच संपत्ती नसलेल्या बायकोला, फक्त तिच्या नावावर घर घेऊन देण्याइतके श्रीमंत कितीजण असतील? आणि ते तसं का करतील?

> भारतात स्त्रीधन म्हणून गाठीशी सोने असते. स्त्रीला माहेरुन संपत्ती मिळालेली असते. > हे ठिकय.
ती तिचीच संपत्ती आहे.

> कुटुंब म्हणून आर्थिक नियोजन करताना परस्परांना विश्वासात घेवून मात्र आंधळा विश्वास न टाकता सामजस्याने निर्णय घ्यावे लागतात. > 'आंधळा विश्वास न टाकता' हे महत्वाचे.

> त्यात 'गृहिणी असलेली पत्नी नीट वागली नाही तर' असा विस्कळीतपणा उपयोगी नाही.> हा विस्कळीतपणा का वाटतोय? ते स्पष्ट अपेक्शा सांगणे आहे.

> 'तू माझ्याशी शेवट पर्यंत नीट वागली नाहीस तर' असे म्हणून संपत्ती काठीसारखी वापरणार असाल तर तोही एकप्रकारचा छळच. > मुलं (अनेकवचन!) नसतील, सासूसासर्यांची वृद्धापकाळात काळजी घेतली नसेल तर गृहिणीच कुटुंबातील काँट्रीब्युशन इतकं नगण्य होतं की हिला उच्चमध्यम वर्गाची लाईफस्टाईल नक्की का मिळतीय हा प्रश्न पडतो. केवळ एक काहीतरी संस्था पूर्वपार चालत आलीय म्हणून त्यातले सो कॉल्ड नियम पाळत रहायचे का? आणि सगळ्यांनी त्याचं आंधळेपणाने समर्थन करत रहायचं?

भविष्यात मी माझ्या नवऱ्याशी नीट वागले नाही तरी त्याच्या (भूत/भविष्यकाळातील) स्वार्जित मिळकतीत मला निम्मा हिस्सा मिळालाच पाहिजे आणि हा कायदा फेरे घेतल्याघेतल्या लागू झाला पाहिजे ही अपेक्षा नक्की कुठून तयार होतेय?
त्याने त्याच्या अपेक्षा स्वच्छ सांगितल्या/लिहल्या तर तो छळ का बरे वाटतोय?
त्याने एकट्याने कमावलेला पैसा, मिळकत त्याच्या मृत्यूनंतर मला मिळणे हा माझा हक्कच आहे या वाटण्याला नक्की काय बेस आहे?
===

सनव +१.

===
जनहितार्थ जारी - उच्च मध्यमवर्गातल्या गृहिणीमधे मला शून्य रुची आहे. आणि मी स्त्रीवादी नाही.

हिला उच्चमध्यम वर्गाची लाईफस्टाईल नक्की का मिळतीय >>> तुमच्या भाषेत सांगायचे तर तिच्या तशाच ब्रीडिंग मुळे आणि तेव्हाच्या इतर सेलिंग पॉइन्ट्सकडे पाहून त्या नवरा या प्राण्यानेही त्याच त्या पूर्वापार चालत आलेल्या पध्दतीनुसार तो करार स्वमर्जीने केल्यामुळे!! अन त्या दोन पार्ट्यांना तो करार मान्य असेल तर इतरांनी समर्थन करण्याचा प्रश्न आला कुठे? Uhoh

मी माझ्या नवऱ्याशी नीट वागले नाही तरी त्याच्या स्वार्जित मिळकतीत मला हिस्सा मिळालाच पाहिजे ही अपेक्षा नक्की कुठून तयार होतेय? >>> एक तर करार, कायद्याच्या भाषेत बोला नाही तर लग्न नावाच्या जुनाट पद्धतीच्या भाषेत बोला. तुम्ही दोन्हीची सरमिसळ करताय! "नीट वागले नाही" म्हणजे नक्की काय ? लग्न या कराराच्या लँग्वेज मधे त्या वागण्याला डिफाइन केले गेले आहे का?

राहण्यासाठी घर घ्यायला होम लोन घेतलं असेल तर ते डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग होतं का? >>भरत, थोड्यावेळात लिहितो.

>> स्त्री गृहिणी असली तरी तिच्या नावावर गुंतवणूक करणे वगैरे सर्रास होते. > सर्रास नक्कीच होत नाही.>>>
माझ्या आईच्या, मोठ्या कझिन्स्च्या पिढीत गृहिणी असणे सामान्य बाब होती. आणि मध्यमवर्गी घरात तरी स्त्रीच्या नावावर रिकरिंग डिपॉझिटचे अकाउंट , त्या साठलेल्या रकमेतून फिक्स्ड डिपॉझिट असे असायचे. थेंबे थेंबे तळे साचे असे होत पुंजी जमा व्हायची. पोस्टात खाते असायचे. बर्‍याच घरातून बोनस मिळाला की ते पैसे पत्नीच्या नावावर एफडीत गुंतवले जायचे. आता भारतात असे काही होत नाही का?

गृहिणी असलेल्या पत्नीच्या नावावर स्थावर मालमत्ता का असते? >> भारतात कितीही नाकारले तरी सरकारी बाबू जमात हे करते. का करते याचे उत्तरही सर्वांना माहित असते.

>>हा विस्कळीतपणा का वाटतोय? ते स्पष्ट अपेक्शा सांगणे आहे.>>
' नीट वागली नाही तर' हे वर्डिंंग विस्कळीत आहे. अपेक्षा स्पष्ट सांगाव्यात, अगदी मुद्देसुद लिहून द्याव्यात पण नुसतेच 'नीट वागावे' हे व्यक्तीनुसार आणि व्यक्तीच्या वयानुसार बदलणार.
स्वतःला प्रोटेक्ट करावेच पण असे करताना दुसर्‍यावर अन्याय करत नाही ना याचाही विचार असावा. नवर्‍याच्या स्वकष्टार्जित संपत्तीबाबत पत्नीला सेन्स ऑफ एनटायटलमेंट असणे चुकीचेच आहे. मात्र त्याच वेळी एकदा पूर्ण वेळ गृहिणी असेल अशीच पत्नी निवडल्यानंतर पतीने आर्थिक बाबींत मालक-गुलाम अशा पद्धतीचे नाते ठेवणे हे देखील चूकच. कुटुंबातील जेष्ठांची काळजी घेतली जावी, यात दोघांचेही पालक आले ही अपेक्षाही योग्यच. मात्र मूल असेल तर /मूल नसेल तर हे पटले नाही . मुल होणे न होणे हे काही त्या जोडप्याच्या सर्वस्वी हातात नाही. मुलं नाहीत आणि घराबाहेर पडून नोकरी करायची परवानगीही नाही अशा स्त्रीया आजही भारतात बर्‍याच आहेत.
नगण्य कॉन्ट्रिब्युशन असताना उच्चमध्यमवर्गाची लाईफस्टाईल हे जे तुमचे म्हणणे आहे तर तशा प्रकारचे आयुष्य त्या जोडप्याने जो राजीखुशीने लग्न नावाचा करार केलाय त्यातून आहे. आम्हाला नोकरी करणारी सून नको, आमच्या घरात नोकर चाकर आहेत, सुनेला घरकामातही लक्ष घालायची गरज नाही असे सांगूनच लग्न केल्यावर तिला ही लाएफस्टाईल का यावर आपण बाहेरुन टिपण्णी का करावी. तो त्यांच्यातला करार झाला ना.

अ‍ॅमी, तुझा मुद्दा कळला नाही.
ती बाई लाईफस्टाईल डिझर्व करते का, तिचं योगदान नगण्य का कसं हे तू किंवा मी कसं ,कोणत्या अधिकाराने ठरवणार? मी फक्त इतकं म्हणू शकते की तिचं योगदान कितीही मोठं असलं तरी तिला त्याचा आर्थिक मोबदला मिळाला नाहीये त्यामुळे तिने स्वतःला प्रोटेक्ट करावं. यापलीकडे काय म्हणणार?
घरात एक प्रेझेन्स असणं हे अमूल्य आहे. त्याला क्वांटिफाय करता येत नाही. अगदी मदतीला नोकर असले तरी नुसतं नोकरांवर सोडलेलं घर आणि गृहिणीने/गृहस्थाने मॅनेज केलेलं घर यात खूप फरक असतो. शिवाय सगळंच नोकर करतात आणि गृहिणी नुसतीच टीव्ही बघत लोळते हे उच्चमध्यमवर्गात नसतं. श्रीमंत फॅमिलीत असू शकतं.
माझ्या ओळखीत अर्ली रिटायरमेंट घेतलेले पुरुषही आहेत. दोन्ही पुरुषांना प्रत्येकी एकेकच मूल आहे आणि ते मूल नोकरांवर सोडून दिलेलं नाही, बाबा घरात असतो. त्यामुळेच त्यांच्या बायका करीयर करु शकत आहेत.
थोडक्यात , जे काही काम कोणी करत असेल त्याला व्हॅल्यू केलं जावं इतकंच म्हणणं आहे.

मुलं (अनेकवचन!) नसतील, सासूसासर्यांची वृद्धापकाळात काळजी घेतली नसेल तर गृहिणीच कुटुंबातील काँट्रीब्युशन इतकं नगण्य होतं की हिला उच्चमध्यम वर्गाची लाईफस्टाईल नक्की का मिळतीय हा प्रश्न पडतो. >> उच्च वर्गातील एस्कॉर्ट सर्व्हिसेसचे रेट माहिती करून घ्या उत्तर सापडेल...

> माझ्या आईच्या, मोठ्या कझिन्स्च्या पिढीत गृहिणी असणे सामान्य बाब होती. आणि मध्यमवर्गी घरात तरी स्त्रीच्या नावावर रिकरिंग डिपॉझिटचे अकाउंट , त्या साठलेल्या रकमेतून फिक्स्ड डिपॉझिट असे असायचे. थेंबे थेंबे तळे साचे असे होत पुंजी जमा व्हायची. पोस्टात खाते असायचे. बर्याच घरातून बोनस मिळाला की ते पैसे पत्नीच्या नावावर एफडीत गुंतवले जायचे. आता भारतात असे काही होत नाही का? > 'माझ्या संपर्कातील कोणाचीही नोकरी गेली नाही, आर्थिक भरभराटच होतेय म्हणजे मंदी आलीच नाहीय' याच्यासारख वाटत नाही का हे? भारतात किती लोकं लग्न करतात? त्यातल्या किती स्त्रियाना अर्थार्जनाचा स्रोत उपलब्ध नाहीय? आणि त्यातल्या किती स्त्रियांचे पती तुम्ही सांगितलं तसं करतात? सर्रास नसावेत. तो एक धागा होता ना दारावर आलेल्या विक्रेत्याकडून ३००₹ चा गाऊन घ्यायचा म्हणलं तर पैसे कोण देणार यावर झालेली बोंबाबोंब <- हे सर्रास असणार.

> भारतात कितीही नाकारले तरी सरकारी बाबू जमात हे करते. का करते याचे उत्तरही सर्वांना माहित असते. > भारतात किती सरकारी बाबू आहेत? त्यातले काळा पैसा मिळवणारे किती आहेत?

> ' नीट वागली नाही तर' हे वर्डिंंग विस्कळीत आहे. अपेक्षा स्पष्ट सांगाव्यात, अगदी मुद्देसुद लिहून द्याव्यात पण नुसतेच 'नीट वागावे' हे व्यक्तीनुसार आणि व्यक्तीच्या वयानुसार बदलणार. > बरोबर. त्यामुळे मृत्युपत्र, लग्नकरार नियमीत अपडेट करावा प्रत्येक जोडप्याने. सरकारी डिफॉल्ट कायदे असू नयेत.

> स्वतःला प्रोटेक्ट करावेच पण असे करताना दुसर्यावर अन्याय करत नाही ना याचाही विचार असावा. > बरोबर.

> मात्र त्याच वेळी एकदा पूर्ण वेळ गृहिणी असेल अशीच पत्नी निवडल्यानंतर पतीने आर्थिक बाबींत मालक-गुलाम अशा पद्धतीचे नाते ठेवणे हे देखील चूकच. > मालक-गुलाम ऐवजी मालक-नोकर/सेवादाता चालेल का?

> कुटुंबातील जेष्ठांची काळजी घेतली जावी, यात दोघांचेही पालक आले ही अपेक्षाही योग्यच. > आर्थिक स्वतंत्र नसलेल्या बाईने सासूसासर्यांची काळजी घेणे अपेक्षीत आहे. न कमवणाऱ्या स्त्रीचे पालकदेखील सांभाळणे परवडत नाही सध्याच्या परिस्थितीत.... म्हणजे परत सध्याची वर्चस्ववादी पितृसत्ताकच चालू राहणार. चालणार आहे का हे स्त्रीवाद्यांना?

> मात्र मूल असेल तर /मूल नसेल तर हे पटले नाही . मुल होणे न होणे हे काही त्या जोडप्याच्या सर्वस्वी हातात नाही. > वर सनवने लिहलंय 'तुम्ही घरात जे घरकाम, मुलं वाढवणं करताय त्याचं मूल्य आहेच (बाहेर डे केअर वगैरे किती महाग आहे.)' त्यासंदर्भात आहे ते. मुलं नसतील तर काम कमी होत नाही का? हिला उच्चमध्यम वर्गाची लाईफस्टाईल नक्की का मिळतीय, ती ते काय काम करून कमवतेय हा प्रश्न आहे.

> नगण्य कॉन्ट्रिब्युशन असताना उच्चमध्यमवर्गाची लाईफस्टाईल हे जे तुमचे म्हणणे आहे तर तशा प्रकारचे आयुष्य त्या जोडप्याने जो राजीखुशीने लग्न नावाचा करार केलाय त्यातून आहे. आम्हाला नोकरी करणारी सून नको, आमच्या घरात नोकर चाकर आहेत, सुनेला घरकामातही लक्ष घालायची गरज नाही असे सांगूनच लग्न केल्यावर तिला ही लाएफस्टाईल का यावर आपण बाहेरुन टिपण्णी का करावी. तो त्यांच्यातला करार झाला ना. > बरोबर त्यांच्यातला करार झाला! त्या दोन व्यक्तींमधला करार. तो त्यांनी आपापसात लेखी करावा.
आता सरकारने जे विवाहविषयीचे कायदे बनवले आहेत त्यातल्या डिफॉल्ट कायद्याने कसे आणि का असावे सांगा -
• पतीच्या (भूत/भविष्यकाळातील) स्वार्जित मिळकतीततला निम्मा हिस्सा पत्नीला मिळालाच पाहिजे आणि हा कायदा फेरे घेतल्याघेतल्या लागू झाला पाहिजे.
• पतीने एकट्याने कमावलेला पैसा, मिळकत त्याच्या मृत्यूनंतर पत्नीला मिळणे हा तिचा हक्कच आहे.
• लग्नांतर्गत बलात्कार हा कायद्याने गुन्हा नसणे
∆ हे मुद्दे त्यात असावेत का?

> ती बाई लाईफस्टाईल डिझर्व करते का, तिचं योगदान नगण्य का कसं हे तू किंवा मी कसं ,कोणत्या अधिकाराने ठरवणार? > तिच्या नावाने विल करा, लग्न केलं की संपत्तीत ५०% वाटा मिळतो, तसा कायदा आहे/असावा असे त्रयस्थ व्यक्ती कोणत्या अधिकाराने ठरवताहेत? त्याच अधिकारने पण विरुद्ध बाजूने मी प्रश्न विचारतेय.

> मी फक्त इतकं म्हणू शकते की तिचं योगदान कितीही मोठं असलं > च्यक योगदान मोठं नसत.

> तरी तिला त्याचा आर्थिक मोबदला मिळाला नाहीये > स्वाती२ ज्या स्त्रियांबद्दल बोलताहेत त्याना मिळाला की आर्थिक मोबदला. बाकीच्यांना थेट मिळाला नाही पण त्यांच्या+ मुलांच्या उदरनिर्वाहची सोय झालीय.

> घरात एक प्रेझेन्स असणं हे अमूल्य आहे. त्याला क्वांटिफाय करता येत नाही. अगदी मदतीला नोकर असले तरी नुसतं नोकरांवर सोडलेलं घर आणि गृहिणीने/गृहस्थाने मॅनेज केलेलं घर यात खूप फरक असतो. शिवाय सगळंच नोकर करतात आणि गृहिणी नुसतीच टीव्ही बघत लोळते हे उच्चमध्यमवर्गात नसतं. श्रीमंत फॅमिलीत असू शकतं.
माझ्या ओळखीत अर्ली रिटायरमेंट घेतलेले पुरुषही आहेत. दोन्ही पुरुषांना प्रत्येकी एकेकच मूल आहे आणि ते मूल नोकरांवर सोडून दिलेलं नाही, बाबा घरात असतो. त्यामुळेच त्यांच्या बायका करीयर करु शकत आहेत.
थोडक्यात , जे काही काम कोणी करत असेल त्याला व्हॅल्यू केलं जावं इतकंच म्हणणं आहे. > तुम्ही जी काही कामं करताय, त्याचा जोकाही मोबदला, ज्याकाही रुपात तुम्हाला हवा आहे ते सगळं वैयक्तिक करार करून घ्या. डिफॉल्ट कायदे मागू नका. आणि तुमची कामं वैयक्तिक महत्वची आहेत की सामाजिक तेदेखील एकच काय ते ठरवा. मी माझं घर मॅनेज करते सामाजिक काम की वैयक्तिक? मी माझ्या मुलांची काळजी घेते सामाजिक की वैयक्तिक? सामाजिक कार्य असेल तर समाजाने अनालाईझ केलं तर आरडाओरडा करू नका

Pages