विधानसभा २०१९ - सामान्य माणसाने मतदान कोणाला करायचे हा प्रश्नच आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2019 - 15:28

मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणात म्हणतात कॉग्रेस राष्ट्रवादी ने 15 वर्षात महाराष्ट्र लुटला ,मागे वळुन पाहतात तर काय..
स्टेजवर तेच सर्व बसलेले आहेत Happy

व्हॉट्सपवर जेव्हा हा विनोद वाचला तेव्हा हसायला आलेले खरे..
पण आता निवडणूक तोंडावर आली असताना कोणाला मत द्यायचे हा विचार करत असता हा जोकच माझ्यावर हसतोय असे वाटतेय.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी कोणाला मत द्यायचे जेणेकरून देशाचे कमीतकमी नुकसान होईल हे न समज्ल्याने मी अखेर मतदानच केले नव्हते.

पण नंतर वाटले नाही यार, चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, पण आपल्यासारख्या कुठलाही राजकीय झेंडा हाती न घेतलेल्यांनी मतदान करायलाच हवे. त्यातल्या त्यात चांगला पर्याय निवडायलाच हवा.

जेवढे माझ्या राजकीय बालबुद्धीला समजते त्यानुसार ज्या राष्ट्रवादीला भाजपाकडून भ्रष्टवादी म्हटले जायचे त्यांच्याच दिग्गज भ्रष्ट नेत्यांना यांनी आपल्यात सामील केले. मागच्यावेळीही राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार होती. पण भाजपाने तो घेतला नाही कारण आधी त्यांच्याच भ्रष्टाचाराविरोधात हे लढले होते. त्यामुळे यंदा त्यांना आधीच आत घेऊन पावन केले.

भाजपाचे माझे कट्टर भक्त मित्र याबाबत अवाक्षरही बोलायला तयार नसले तरी काठावरच्या समर्थकांमध्ये असंतोष आणि फसवले गेल्याची भावना दिसतेय.

त्याला मलमपट्टी करायला आणि यात भाजपची गंडलेली ईमेज सुधाराय्ला बहुधा मध्यंतरी पवारसाहेबांच्या मागे ईडी लावल्याची हूल उठवण्यात आलेली. जेणेकरून लोकांना वाटेल अग्ग बाई खरेच की, हे अजून भ्रष्टाचाराविरुद्धच लढत आहेत.

मी एक सामान्य नागरीक आहे. मला ते आतले राजकारण कळत नाही. म्हणून धागाही राजकारण विभागात काढला नाही. पण याचा अर्थ मी आंधळा आणि मुर्खही नाही. जे समोर चालले आहे ते बघू शकतो आणि स्वता:चे चूक वा बरोबर जे काही असेल ते मत बनवू शकतो.

आणि आता खरेच वीट आला आहे या सर्वच दलबदलू आणि फेकू लोकांचा. आघाडीला हटवून युती आणली आता युतीला हटवून पुन्हा आघाडी अशीच संगीत खुर्ची खेळण्यात रस नाही. कारण यापौकी कोणीच त्या पात्रतेचे वाटत नाही.

मग काय करावे? काय पर्याय समोर आहेत? थोडासा उलटसुलट विचार माझ्या लेवलला करतो.

१) भाजपा येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण त्यांचे पारडे जड झाले तर महागात पडतील. मग युतीतील प्रादेशिक पक्ष शिवसेनेला मत द्यावे का? जेणे करून त्यांच्यावर थोडा अंकुश राहील... खरेच राहील?

२) राजसाहेब म्हणत आहेत मला विरोधी पक्षनेता करा. करावे का? विरोधात कोणीतरी खळ्ळखट्याक हवाच.... पण ते ही भुमिका योग्य बजावतील का? की सेटलमेंट किंग म्हणून नावारुपास येतील?

३) एखाद्या नवीन पक्षाला मत द्यावे का? एखादा नवीन पर्याय शोधावा का? एका मित्राने वंचित हा पर्याय सुचवला, तर एकाने एमआयएम. पण असे मत तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्यास फुकट जाण्याचीही शक्यता वाढते. तरी मनाच्या समाधानासाठी द्यावे का?

४) की मग नोटा झिंदाबाद!?

शक्य झाल्यास तटस्थ लोकांनीच आपली तटस्थ मते मांडा आणि तटस्थ स्ल्ले द्या. राजकीय धुळवडीला ईतर धागे आहेतच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सनव, जागांच्या नुकसानीचा किंवा फायद्याचाही उहापोह करण्यासाठी भाजप नेहेमी निवडणुकीनंतर चिंतन करीत असतो. आताही तसे होईलच.

चर्चेची गाडी वरील प्रतिसादा मार्फत नोटा कडे वळलिय आता बंडखोरांच्या स्टेशनात पोहोचली की चर्चा संपूर्ण होईल.

>>अभ्यासू आणि गणितज्ञ फडण२.० यांनी आमच्या जागा कमी झाल्या असल्या तरी २०१४ च्या तुलनेत स्ट्राइक रेट वाढला आहे, 

पडलं तरी नाक वरच त्यातली गत

>>अरे, आले की सगळे.... उगीच गेले गेले म्हणून वावड्या उठलेल्या… असो.

अग, विरोधक नसतील तर लोकशाही कसली? मग एकाधिकारशाही. ती तर आपल्या देशात नाही. Wink

असो. तरी बाकी बीबीजच्या मानाने इथे चांगली चर्चा होतेय हे छानच. टच वूड!!!

जागांच्या नुकसानीचा किंवा फायद्याचाही उहापोह करण्यासाठी भाजप नेहेमी निवडणुकीनंतर चिंतन करीत असतो. आताही तसे होईलच. >> अमितशेठ थैल्या घेऊन बसतील ना Biggrin

आज धन त्रयोदशी आहे मुहूर्त चांगला आहे.
कोणत्या पक्षाचे आमदार फुटणार नाहीत.
कारण ह्या निवडणुकीत
बाकी लोकांची हालत बघितली आहे.
इतर मधले विकत घेता येतील

जागांच्या नुकसानीचा किंवा फायद्याचाही उहापोह करण्यासाठी भाजप नेहेमी निवडणुकीनंतर चिंतन करीत असतो. आताही तसे होईलच. >> अमितशेठ थैल्या घेऊन बसतील ना Biggrin

नवीन Submitted by चिवट on 25 October, 2019 - 11:11. >>>

भावा तुला आरामाची गरज आहे. पावसात भाषणाला उभ राहून, ईडी च्या कार्यालयाला भेट देऊनही आणखी 5 वर्षे विरोधी बाकांवर बसण्याचा धक्का छोटा नाही हे मी जाणतो.

मी-माझा, तुला बसलेला धक्का समजु शकतो. २०० पार सोडा, कुण्थत १०० पार केल्याने झालेली दमछाक दिसली रे सर्वांना. महाजनादेश यात्रा काढुन, बाकीच्या पक्षातले गणंग घेउन, विकासच्या लंब्या चौड्या बाता मारुन, उगाच इडीला मागे लावुन सुद्धा रताळ्याला घाम फुटलाय ना?

हरयाणात पण कसे फटके बसले, पोटनिवडणुकांत काय झालं ह्यावरुन आता आणखी एक्खादा हल्ला प्रायोजित करनार शेठिया ;-).

नवीन Submitted by चिवट on 25 October, 2019 - 12:39>>

अश्रू पुसायला रुमाल, पावसापासून वाचण्यासाठी छत्री, बरनोल, विरोधकांच्या बाकांवर सुरनळीवाल्या गाद्या वगैरे काही लागलं तर सांग भावा.

मी वरील गोष्टींचा पुरवठा करण्याची शिफारस नक्की करेन.

जोक्स अपार्ट,.
सगळे लोक भाजपने काय चुका केल्या यावर भर देताना दिसत आहेत. मला वाटतं भाजपचं यश फार ओबवियस आहे अशी मानसिकता तयार झाली होती. असे का असावे? इतर पक्ष मृतवत आहेत याची खात्री? की भाजपला नेहेमीच लागणाऱ्या बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाव्यात ही सुप्त इच्छा? भाजप व शिवसेना यावेळी युती करून लढले. व दोन्ही काँग्रेस ही युती करूनच लढले. परंतु जनतेने आधीच्या त्याच सरकारला पुन्हा संधी दिली. असे का झाले नी काँग्रेस युतीला संधी का मिळाली नाही, याचा विचार करण्या ऐवजी. भाजपा व शिवसेनेच्या प्रत्येकी ११ जागा कमी झाल्या (ज्याने त्या दोन्ही पक्षांना किती फरक पडला, हाही एक प्रश्न आहे) यावर समाधान मानणे विरोधकांच्या समर्थकांनी सोडून दिले व दोन्ही काँग्रेस नक्की कुठे कमी पडल्या यावर विचार केला तर काहीतरी फरक पुढील निवडणुकांत पडेल.

नाहीतर विरोधकांच्या नशिबात कुंथणेही लिहिलेले नसेल.

विरोधकांचे समर्थक असकाय करू लागलेत की आता मुख्यमंत्री त्यांचाच हाय!

करोत बापडे. आता तरी येडी ईडी हात धुवून मागं लावणार बघा स्पॉट नाना!

विरोधकांचे समर्थक असकाय करू लागलेत की आता मुख्यमंत्री त्यांचाच हाय!

करोत बापडे. आता तरी येडी ईडी हात धुवून मागं लावणार बघा स्पॉट नाना!

नवीन Submitted by रॉनी on 25 October, 2019 - 13:21 >>

ईडी तर आता दुप्पट वेगाने काम करणार...

अग, विरोधक नसतील तर लोकशाही कसली? मग एकाधिकारशाही. ती तर आपल्या देशात नाही>>>

अरे इथेच कोणी लिहिले होते, इथून उठून सगळे दुसरीकडे गेले, काही म्हणाले व्हाट्सअप्पवर गेले. मीही तेच म्हटले, इथे जी चर्चा ती व्हाट्सअप्पवर होणार नाही, तिथे समविचारी एकत्र जमणार, विरोधकांना काढून टाकले जाणार.

भाजपा ला त्यांचा फाजील आत्मविश्वास नडला.
उगाच खोगीरभरती/मेगाभरती करुन विरोधी पक्षाला संपवण्याची चाल भाजपाच्याच अंगलट आली.
येणारे लोक जितक्या प्रमाणात त्यांच्या वोटबॅंक घेउन आले त्यापेक्षा जास्त प्रमाणात निष्ठावंतांच्या नाराजीचा फटका भाजपाला बसला.
त्यातून परत आता फक्त भाजपाच आणि विरोधक तर संपल्यातच जमा असा जो काही माहौल तयार करण्यात आला होता त्याचा उलटा परिणाम असा झाला असावा की आता आपल्या वोट देण्या न देण्याने काही फरक पडत नाही; भाजपाच येणार अश्या समजूतीने/ भाजपा हवाय पण बाहेरुन आणलेला, लादलेला उमेदवार नकोय/ गृहित धरल्याची भावना या किंवा अश्या अनेक कारणांनी भाजपाचे अनेक संभाव्य मतदार घरीच बसले असावेत आणि याउलट आम्ही संपलेलो नाही असे दाखवायला राष्ट्रवादीवाले वगैरे आवर्जून मतदानाला उतरले असावेत.
गेल्या दोन लोकसभा निवडणूकीत आणि गेल्या विधानसभा निवडणूकीत दिसलेला भाजपाच्या पारंपारिक मतदारांमधला उत्साह यंदा दिसला नाही.

भाजपाचे सूज्ञ नेते आत्ता जरी उघडपणे पीछेहाट मान्य करत नसतील तरी पक्षाच्या चिंतन बैठकीत या सगळ्याचा उहापोह होईल आणि याच्यावर उत्तरे शोधली जातील अशी अपेक्षा आहे.

फडणविसांनी खडसेंना दूर ठेवले... कारण ते पदासाठी सशक्त स्पर्धक होते.... तावडेंना तिकीटच दिले नाही. आणि पंकजा मुंढे यांचे नाव स्पर्धेत यायचाच अवकाश (हे नाव पुढे कसे आले ? काय कर्तुत्व ?) त्यांना पण हरविले. मस्त खेळी केली.

सेनेची साथ नसती तर भाजपाचे पानिपतच झाले असते...

दुसर्‍यांदा सत्ता दिली... आता तरी उद्दामपणा, खोटारडेपणा, सत्तेचा माज कमी करुन जनतेसाठी कामे करतील अशी अपेक्षा.

<< भाजपाचे सूज्ञ नेते आत्ता जरी उघडपणे पीछेहाट मान्य करत नसतील तरी पक्षाच्या चिंतन बैठकीत या सगळ्याचा उहापोह होईल आणि याच्यावर उत्तरे शोधली जातील अशी अपेक्षा आहे. >>

------- विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ED/ CBI/ IT चा महागैरवापर करु नका असा महाचिंतन शिबिरात घडलेल्या महाचिंतनामधून महानिष्कर्ष निघाल्यास तो मोदी - शहा यांना मानणे बंधनकारक असेल...
महाउर्मटपणाला जागा दाखवली आहे.

भ्रष्टाचारी व्यक्ती असेल तर कारवाई व्हायलाच हवी.... पण येथे केवळ विरोधकांना नमोवण्यासाठी वापर झाला आहे, होतो आहे. भ्रष्टाचारी व्यक्ती भजपात आल्यावर कारवाई होण्याची प्रक्रिया थांबते.... पोत्यानी उदाहरणे आहेत.

खरं सांगायचं झालं तर मुख्यमंत्रीपद हे आदित्य ठाकरे यांच्यासाठी खूपच लहान पद आहे, त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारावे अशी सगळ्या मराठी बांधवांची इच्छा आहे.

आदित्य ठाकरे पंतप्रधान व्हावेत ते दिल्लीला जावेत आणि तिथे त्यांची राहुल गांधी यांच्याशी ओळख व्हावी. दोघांनी मग पकडापकडी, लपाछपी, घोडागाडी असे खेळ एकत्र खेळावेत. मीडियाने त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करावं. मायबोलीवर त्यावर धागे निघावेत. आपण पॉपकॉर्न खत कोक पीत ते वाचावेत, बॅकग्राऊंडला धुळवाडीची गाणी लावावीत. जमलंच तर आपणही आपलं मत मांडावं. जीवन सार्थक व्हावे.

>>> आदित्य ठाकरे पंतप्रधान व्हावेत ते दिल्लीला जावेत आणि तिथे त्यांची राहुल गांधी यांच्याशी ओळख व्हावी. दोघांनी मग पकडापकडी, लपाछपी, घोडागाडी असे खेळ एकत्र खेळावेत. मीडियाने त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करावं. मायबोलीवर त्यावर धागे निघावेत. आपण पॉपकॉर्न खत कोक पीत ते वाचावेत, बॅकग्राऊंडला धुळवाडीची गाणी लावावीत. जमलंच तर आपणही आपलं मत मांडावं. जीवन सार्थक व्हावे. >>>

Rofl

आणि खेळून दमल्यानंतर दुदु पिऊन आईच्या मांडीवर झोपी जावे.

>>> सेनेची साथ नसती तर भाजपाचे पानिपतच झाले असते... >>>

भाजपची साथ नसती तर सेनेचे ३० सुद्धा आमदार निवडून आले नसते.

भाजपने स्वबळावर २८८ जागा लढविल्या असत्या तर किमान १४० जागा आल्या असत्या.

भाजपने स्वबळावर २८८ जागा लढविल्या असत्या तर किमान १४० जागा आल्या असत्या. >> हो ना, हरयाणात कसे स्वबळावर ठिगळ लावलं जेजेपीचं!!
जेजेपीचा आधार घेतला आणि तिथे अजय चौतालाला (जेजेपीच्या दुष्यंत चौतालाचा गुन्हेगार बाप) फर्लो मिळाला !! ना खाउंगा.....

Pages