विधानसभा २०१९ - सामान्य माणसाने मतदान कोणाला करायचे हा प्रश्नच आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2019 - 15:28

मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणात म्हणतात कॉग्रेस राष्ट्रवादी ने 15 वर्षात महाराष्ट्र लुटला ,मागे वळुन पाहतात तर काय..
स्टेजवर तेच सर्व बसलेले आहेत Happy

व्हॉट्सपवर जेव्हा हा विनोद वाचला तेव्हा हसायला आलेले खरे..
पण आता निवडणूक तोंडावर आली असताना कोणाला मत द्यायचे हा विचार करत असता हा जोकच माझ्यावर हसतोय असे वाटतेय.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी कोणाला मत द्यायचे जेणेकरून देशाचे कमीतकमी नुकसान होईल हे न समज्ल्याने मी अखेर मतदानच केले नव्हते.

पण नंतर वाटले नाही यार, चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, पण आपल्यासारख्या कुठलाही राजकीय झेंडा हाती न घेतलेल्यांनी मतदान करायलाच हवे. त्यातल्या त्यात चांगला पर्याय निवडायलाच हवा.

जेवढे माझ्या राजकीय बालबुद्धीला समजते त्यानुसार ज्या राष्ट्रवादीला भाजपाकडून भ्रष्टवादी म्हटले जायचे त्यांच्याच दिग्गज भ्रष्ट नेत्यांना यांनी आपल्यात सामील केले. मागच्यावेळीही राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार होती. पण भाजपाने तो घेतला नाही कारण आधी त्यांच्याच भ्रष्टाचाराविरोधात हे लढले होते. त्यामुळे यंदा त्यांना आधीच आत घेऊन पावन केले.

भाजपाचे माझे कट्टर भक्त मित्र याबाबत अवाक्षरही बोलायला तयार नसले तरी काठावरच्या समर्थकांमध्ये असंतोष आणि फसवले गेल्याची भावना दिसतेय.

त्याला मलमपट्टी करायला आणि यात भाजपची गंडलेली ईमेज सुधाराय्ला बहुधा मध्यंतरी पवारसाहेबांच्या मागे ईडी लावल्याची हूल उठवण्यात आलेली. जेणेकरून लोकांना वाटेल अग्ग बाई खरेच की, हे अजून भ्रष्टाचाराविरुद्धच लढत आहेत.

मी एक सामान्य नागरीक आहे. मला ते आतले राजकारण कळत नाही. म्हणून धागाही राजकारण विभागात काढला नाही. पण याचा अर्थ मी आंधळा आणि मुर्खही नाही. जे समोर चालले आहे ते बघू शकतो आणि स्वता:चे चूक वा बरोबर जे काही असेल ते मत बनवू शकतो.

आणि आता खरेच वीट आला आहे या सर्वच दलबदलू आणि फेकू लोकांचा. आघाडीला हटवून युती आणली आता युतीला हटवून पुन्हा आघाडी अशीच संगीत खुर्ची खेळण्यात रस नाही. कारण यापौकी कोणीच त्या पात्रतेचे वाटत नाही.

मग काय करावे? काय पर्याय समोर आहेत? थोडासा उलटसुलट विचार माझ्या लेवलला करतो.

१) भाजपा येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण त्यांचे पारडे जड झाले तर महागात पडतील. मग युतीतील प्रादेशिक पक्ष शिवसेनेला मत द्यावे का? जेणे करून त्यांच्यावर थोडा अंकुश राहील... खरेच राहील?

२) राजसाहेब म्हणत आहेत मला विरोधी पक्षनेता करा. करावे का? विरोधात कोणीतरी खळ्ळखट्याक हवाच.... पण ते ही भुमिका योग्य बजावतील का? की सेटलमेंट किंग म्हणून नावारुपास येतील?

३) एखाद्या नवीन पक्षाला मत द्यावे का? एखादा नवीन पर्याय शोधावा का? एका मित्राने वंचित हा पर्याय सुचवला, तर एकाने एमआयएम. पण असे मत तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्यास फुकट जाण्याचीही शक्यता वाढते. तरी मनाच्या समाधानासाठी द्यावे का?

४) की मग नोटा झिंदाबाद!?

शक्य झाल्यास तटस्थ लोकांनीच आपली तटस्थ मते मांडा आणि तटस्थ स्ल्ले द्या. राजकीय धुळवडीला ईतर धागे आहेतच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राज्यांना राष्ट्रीय पक्षांपेक्षा स्थानिक पक्ष जवळचे वाटतात
काँग्रेस पेक्षा राष्ट्र वादी जवळचा वाटतो.
आणि bjp पेक्षा सेना जवळ ची वाटते

5 वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्यांच्या समर्थकांनी आता नव्या येणाऱ्या सरकारविरुद्ध मुद्दे शोधावेत. भाजपने काय करायला हवे होते किंवा त्यांचे काय चुकले ते भाजपवर सोडून द्या. अजूनही भाजपमध्ये काँग्रेसपेक्षा चांगलं आत्मपरीक्षण होतं.

या निमित्ताने अचानक राजकीय मते पुन्हा व्यक्त करू लागलेल्या असंतुलित काँग्रेसी ट्रोलाच्या प्रतिक्रिया वाचून जाम मजा येतेय. आणखी येऊ द्या.

फारेण्ड, गेल्या काही दिवसां तला माहोल पाहिला तर त्या बातम्या खटकणार नाहीत. >>> भरत, जरा मधे २-३ पाने उलटून गेली आहेत पण या पोस्टच्या संदर्भाने उत्तर देतोयः भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, स्वबळावर सत्ता मिळू शकणार नाही वगैरे बरोबर आहे. खुद्द भाजपच्याच पारंपारिक मतदारांच्या पोस्ट्स पाहिल्या तर भाजप नेतृत्त्वाला आत्मपरीक्षण करावेच लागेल. लोकसभेच्या निकालांमधून अमर्याद सत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसू लागले होते, आणि अशा वेळेस जनता योग्य वेळी जमिनीवर आणते हे काँगेसनेही पूर्वी पाहिलेले आहे. आता भाजपला ही दिसले. हे नक्की कसे होते कोणालाच माहीत नाही पण होते हे अनेकदा दिसले आहे.

याबद्दलच्या मतांना काहीच विरोध नाही. मला आश्चर्य वाट्ले ते सगळ्या पेपर्स नी, स्वघोषित "लिबरल" वेबसाइट्स नी एका स्क्रिप्टमधून लिहील्यासारखी केलेली शरद पवारांची तारीफ. मॅन ऑफ द मॅच काय, करिष्मा काय, "बाप" काय. प्रत्यक्षात राष्टवादी मागच्या दशकात खूप जोरात असल्यापासून ते आत्तापर्यंत त्यांच्या जागा ५०-७० मधेच घुटमळत राहिल्या आहेत. राज्यभर प्रभाव कधीच नव्हता. आताही त्यापेक्षा वेगळे काहीच झालेले नाही. मागच्या काही महिन्यांत जी पडझड झाली ती होउन सुद्धा ५० पर्यंत पोहोचले हीच काय ती जमेची बाजू. ती पवारांच्या प्रचारामुळे मिळाली की इतर कारणांमुळे याबद्दल अनेक मते आहेत. पण तळाच्या फलंदाजांनी आडवे पट्टे फिरवून डावाचा पराभव टाळण्याइतकेच त्याला महत्त्व आहे. पण मीडिया फ्रेन्झी अशी की आता सत्ताच उलथवून टाकून हे सत्तेवर आले आहेत.

काहीही विशेष न करता काँग्रेस ४४, आणि तुलनेत राष्ट्रवादी ५४. वास्तविक २०१४ पेक्षा कमीच आहेत.

त्यात एखादी क्लीन कॅम्पेन चालवून लिबरल पक्षाने हे मिळवले असते तर ते क्रेडिटेबल होते. लोकसभेत राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या त्रुटी असंख्य असल्या- भाजपला शह द्यायला ते जानवे घालून हिंदू म्हणून प्रोजेक्ट करणे वगैरे प्रकार म्हणजे ७० च्या दशकात राजेश खन्नाने कानावर केस वाढवून अ‍ॅक्शन रोल करण्यासारखे विनोदी होते - पण निदान त्यांची कॅम्पेन स्वच्छ होती. एका जातीयवादावर टीका करताना स्वतः दुसरा जातीयवाद त्यांनी राबवला नाही.

राष्ट्रवादी/पवारांबद्दल असे म्हणू शकतो काय? पवार ८०-९० च्या दशकांत सत्तेवर होते तोपर्यंत सुजाण, सुसंस्कृत, सर्वांना बरोबर घेउन जाणारे होते. मला आठवते त्यावरून नोकरदार वर्गाला सुद्धा पवारांचे सरकार/प्रशासन आवडत असे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते तेव्हा आख्खा महाराष्ट्र त्यांच्या बाजूने होता. पण गेल्या १०-१५ वर्षांत संभाजी ब्रिगेड पासून इतर अनेक जातीयवादी आणि प्रतिगामी लोकांना त्यांनी सपोर्ट केला. स्ंधी मिळेल तेव्हा छत्रपती, पेशवाई, पगडी/पागोटे असल्या गोष्टी चर्चेत आणल्या. अमोल मिटकरीसारखे लोक काय बोलतात ते एखाद्या सनातनी भाषणापेक्षा काय वेगळे आहे? सैराट मधल्या त्या पाट्लासारखे "त्यांच्या बायका, आमच्या बायका" छाप भाषणे पब्लिक टाळ्या पिटत ऐकते. (लोकसत्तेतील "लिबरल" बातमीनुसार "ते लोकांना आवडेल असे बोलतात"). लिबरल लोकांना हे नेते पुरोगामी दिसतात काय? अफजुलखानाचे निमित्त करून मुस्लिम समाजाविरूद्द संशय निर्माण करणारे जर फॅसिस्ट असतील, तर अनाजीपंतावरून ब्राह्मण समाजाविरूद्ध तेच करणारे कोण आहेत? कोल्हापुरात भाजप न येण्याचे कारण एकतर पुराच्या वेळेस सरकारविरूद्धचा राग असू शकेल, किंवा अनाजीपंत. दोन्हीपैकी काहीही असू शकते.

या असल्या काड्या करून सुद्धा जेमतेम ५४ पर्यंत पोहोचलेली राष्टृवादी. हे चॅम्पियन. ही महाराष्ट्रातील बदलाची चुणूक. पुरोगामी. लोकशाही वगैरे.

फरेंड +१
एखादा मुलगा नापास होणार असे सर्वांना वाटत असताना त्याला ५५ मार्क मिळाले की सारेजण कौतुक करतात तसे हे आहे. शरद पवार यांनी केलेल्या काही गोष्टींमुळे नितांत आदर असूनही अधून मधून त्यांना डॉग व्हिसल म्हणतात तसली वक्तव्ये करायचा मोह आवरत नाही.

तवलीन सिंग नावाच्या दोन व्यक्ती आहेत व ते दोघे अधून मधून अदलाबदल करून इंडियन एक्सप्रेस मध्ये लेख लिहितात असे वाटते. कधी कधी शुद्ध देशी मोदिभक्त तर कधी परखड विरोध. निदान यापुढे ग्रामपंचायत निवडणूकीत ३७०, तिहेरी तलाक, पाकिस्तानात घुसुन मारले वगैरे मुद्दे येणार नाहीत ही अपेक्षा !

>काँग्रेस ४४, आणि तुलनेत राष्ट्रवादी ५४. वास्तविक २०१४ पेक्षा कमीच आहेत.>

२०१४ च्या जागा अनुक्रमे ४२ आणि ४१. त्यात पोटनिवडणुकांचे निकाल आणि महाभरतीत बाहेर पडलेले आमदार अधिक उणे धरले तर अंतर आणखी अधिक होतील.
काही एक्झिट पोल्समध्ये दोन्ही काँग्रेस मिळून ४०-५० जागा येतील, असं दाखवलं होतं.
भाजपच्या कामगिरीपेक्षा विरोधी पक्ष संपला असं चित्र उभं होत असतानाचा हा पर्फॉर्मन्स . म्हणून उल्लेखनीय.

तीन तलाक , बुरखा, 370 आणि राम मंदिर झाले की बाकीची प्रगती करायला काँग्रेस आहे, तुमची गरज नाही , हे जनता सांगत आहे, टेम्पल बांधा अन पुढच्या निवडनिकीला राम म्हणा .

>.>> Submitted by फारएण्ड on 27 October, 2019 - 23:44 >>>

+ १

भाजपला अपेक्षित जागा न मिळाल्याची काही कारणे आहेत.

फडणवीस व भाजप २०१७ मधील महापालिका निवडणुकीपर्यंत सेनेला योजनाबद्ध विरोध करीत होते. आशिष शेलार व किरीट सोमय्या उद्धव व सेनेवर थेट टीका करायचे, तर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटिल मातोश्रीवर जाऊन उद्धवला चुचकारायचे. स्वत: फडणवीस सेनेच्या कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर न देता दुर्लक्ष करायचे. त्यामुळे सातत्याने भाजपवर टीका करून व पाठिंबा काढून घेण्याची धमकी देऊन भाजपला दडपणाखाली ठेवून आपल्याला हवे ते करण्याचे सेनेचे मनसुबे हवेतच राहिले.

परंतु असे फार काळ करता येणार नाही हे फडणवीस जाणून होते. त्यामुळे मुंबई महापालिकेत सेनेच्या बरोबरीने जागा मिळूनही फडणवीसांनी मुंबई महापालिका सेनेला आंदण देऊन टाकून सेना पाठिंबा काढून घेण्याची धमकी निरर्थक ठरवली. दुसरीकडे मराठ्यांना तब्बल १६ टक्के राखीव जागा देऊन मराठ्यांना शांत केले. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत सेनेला ताकदीपेक्षा खूप जास्त जागा युती नक्की केली. खडसे, बावनकुळे, तावडे अशा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना उमेदवारी नाकारून वाटेतील संभाव्य काटे दूर केले. विरोधकांचे अत्यंत वादग्रस्त, भ्रष्ट नेते भाजपत आणून जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला.

या सर्व निर्णयांचा विधानसभा निवडणुकीत आपल्याला भरपूर फायदा होईल असा त्यांचा अंदाज असावा. परंतु त्यांना अपेक्षित फायदा मिळाला नाही. भाजप मित्रांसहीत फक्त १६४ जागा लढवित असल्याने भाजप आपला पूर्वीचा १२३ हा आकडा पार करू शकणार नाही हे पूर्वीच नक्की झाले होते. मराठ्यांना राखीव जागा देऊनही निवडणुकीत मराठ्यांची पहिली पसंती राष्ट्रवादी व दुसरी पसंती शिवसेना होती. बऱ्याच नाराज सवर्णांनी मत दिले नाही किंवा नोटा हा पर्याय निवडला. तब्बल १२४ जागा लढवूनही सेनेचा जनाधार अत्यंत कमी असल्याने सेनेच्याही जागा कमी झाल्या व दोघांनाही फटका बसला.

खडसे व मुंडे हे ओबीसी नेते पराभूत झाले. बावनकुळेंना उमेदवारी नाकारली. त्यामुळे ओबीसी मतदार बरेच नाराज झाले आहेत. या नाराजीचा भविष्यात फटका बसेल. ज्या सवर्णांनी यावेळी मत दिले नाही किंवा नोटा हा पर्याय निवडला, ते पुढील निवडणुकीत नक्कीच मनसे किंवा योग्य विरोधी उमेदवाराला मत देतील.

एखाद्या विशिष्ट समाजघटकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या समाजघटकाची पुरेशी मते मिळत नाहीत आणि नाराज झालेले इतर समाजघटक विरोधात जातात, स्वतःच्या जागा कमी करून सेनेला त्यांच्या ताकदीपेक्षा खूप जास्त जागा दिल्याने स्वत:चा तोटा होतो व सेनेलाही फायदा होत नाही, विरोधकांमधील कचरा भाजपत आणून फारसा फायदा होत नाही, भक्कम जनाधार असलेल्या नेत्यांचा काटा काढण्यासाठी त्यांना उमेदवारी नाकारणे मतदारांना आवडत नाही . . . असे अनेक धडे फडणवीस या निवडणुकीतून शिकले असतील.

अहो पुरोगामी भाऊ, भाजपला मराठ्यांनी, सवर्णांनी , ओबिसिंनी मते दिली नाहीत तर मिळालेली मते वंचित कडून फुटलेली होती की काय?

यावेळी मतदान टक्का मागील वेळेपेक्षा 3 टक्के घसरला होता व भाजपच्या एकूण मतांपैकीच्या टक्केवारीत 2 टक्क्यांनी घट झाली (सुमारे 12 लाख मते). ही मते बंडखोरांना गेली असे मला वाटते. विधानसभेचा अंदाज बांधताना भाजप- शिवसेनेनं बंडखोरांना शून्य मते गृहीत धरली असावीत, ज्यामुळे त्यांचे अंदाज चुकले. तसेच भाजपचा हक्काचा मतदार यावेळी मतदानास बाहेर पडला नाही असे वाटते. विजय मिळणारच अशा भावनेतून आलेल्या शैथिल्यातून ते झाले असावे.

शाम भागवत सरांचे analysis यावेळी वाचायला मिळाले नाही. नाहीतर बरीच उपयुक्त माहिती मिळाली असती.


Submitted by फारएण्ड on 27 October, 2019 - 23:4
छान विश्लेषण फारेण्ड.

फारएण्ड मेडिया फ्रेन्झी हि फार हवा करणारा भाजप उताणा पडल्याने जास्त आहे. मेडिया कशासाठीही फ्रेन्झी मोड मध्ये जाऊ शकतो. बाकी भाजपच्या बाकी सगळ्या चुका क्षम्य असल्या तरी मूळ असंतोष हा शेतमालाला न मिळालेला भावामुळे आहे. आणि दुर्दैवाने समोर दुसरा कोणी नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस ला मते मिळाली. ह्या निमित्ताने तरी भाजप चे डोळे उघडले तर ते राज्यासाठी चांगलेच आहे.

ईथली चर्चा गंमतीशीर वाटली.
मिडीयात पवारसाहेबांची हवा जाणूनबुझून जास्तही केली जात असेल.
पण मोदींनी गेले पाचसहा वर्षे जे स्वत:चे ब्रांडींग आणि मार्केटींग केले आहे त्याला काय म्हणाल या पार्श्वभूमीवर.. कि त्याला वेगळा चष्मा लावायचा Happy

हो ना,

ज्युनिअर क्लार्क 10 वर्षे घासल्याशिवाय सिनियर होत नाही, हे एकदम मुख्यमंत्री,

सुपरफास्ट

>>> भाजपला मराठ्यांनी, सवर्णांनी , ओबिसिंनी मते दिली नाहीत तर मिळालेली मते वंचित कडून फुटलेली होती की काय? >>>

लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीला ५२ टक्के मते मिळाली होती. ५ महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत ४२ टक्के मते मिळाली. काही सवर्णांनी, काही ओबीसींनी व काही मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला मत न दिल्याने ही घसरण झाली.

मी तसा bjp चा समर्थक काही वर्षा पासून होतो.
पण आता नाही .

Bjp राज्य करण्यासाठी सपशेल नालायक ठरली आहे.
सर्व क्षेत्रातील लोकांशी चर्चा केल्यानंतर माज ठाम मत झाले आहे .
विकास chya कोणत्याच निर्णयात सर्वांना सामावून घेत नाही .
शाह मोदी जोडगोळी सांगेल ते .
निर्णय घेताना सर्व प्रकारच्या लोकांची मत विचारात घेवून ठाम निर्णय घेणे अपेक्षित असते.
आणि हा फॉर्म्युला पूर्वीची सरकारे वापरत होती .

आणि हा फॉर्म्युला पूर्वीची सरकारे वापरत होती .

नवीन Submitted by Rajesh188 on 28 October, 2019 - 16:36 >>>

काही उदाहरणे वगैरे आहेत काय?

>>Bjp राज्य करण्यासाठी सपशेल नालायक ठरली आहे......
विकास chya कोणत्याच निर्णयात सर्वांना सामावून घेत नाही

एकाच पोस्टमधील दोन परस्परविरोधी विधाने Proud
विकासाचे निर्णय घेतले हे मान्य आहे तरी सरकार सपशेल नालायक?

बाकी ते मिडियातल्या चार चौकटी वाल्या चर्चा वाचून आपली राजकीत मते ठरवणाऱ्या बऱ्याच जणांना असे कंफ्यूज कंफ्यूज बघितलेय त्यामुळे फारसे आश्चर्य वाटत नाही.

गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर दूजाभाव केला गेला.
स्वपक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या मतदारसंघात निधी न देणे.
त्या मुळे काम होत नाहीत आणि लोकप्रतिनिधी बदनाम होतो त्याची लोकप्रियता घटते
योजना फक्त जाहीर कारणे पण निधी न देणे
चांगली आकर्षक विकासाची योजना जाहीर करणे पण त्या मध्ये वरचेवर बदल करून सरकारी कर्मचारी ना योजना यशस्वी करणे मुश्किल करून टाकणे.
ही ठराविक उदाहरणे

@फा
शरद पवारांचे कौतुक होण्यामागे भाजपच्या इलेक्शन आधी केलेल्या वल्गनासुध्दा कारणीभूत आहेत असं माझं नम्र मत आहे. लोकसभेच्या यशानंतर महाराष्ट्र विधानसभा ही फॉर्मॅलिटी आहे असं सगळ्यांना वाटत होतं. खुद्द फडणवीससुध्दा आम्ही कुस्तीला तयार आहोत पण विरोधक नाहीयेत वगैरे म्हणाले होते. भाजप 220 वगैरे अगदी एग्क्सिट pol मध्ये सुध्दा सांगितले होते. अशा स्थितीत भाजपला स्वबळावर मेजॉरिटी नं मिळता शिवसेनेची मनधरणी करायला लागणे हे पाहणे अतिशय करमणूक करणारे आहे. त्यामुळे पवारांचे कौतुक हे काही अंशी भाजपच्या या सगळ्या overconfidence मुळे सुध्दा होते आहे.
नापास होणारा विद्यार्थी 58% मिळवून खुश असेल तर अर्थात मी बोर्डात येणार, मी बोर्डात येणार, मी बोर्डात येणार असं परीक्षेआधी 3 वेळा म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची थट्टा होणारच ना!

ते एकदाच म्हणाले पण रेकॉर्ड करणारा क्यामेरामन बालाजी फिल्म्सचा असल्याने त्याने तीनदा दाखवलं असं असेल! Proud

हो माझ्या पहिल्या पॅरा मधे साधारण त्याबद्दल लिहीले होते. भाजपच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळणे, पब्लिकचा भ्रमनिरास आणि भाजप विरोधकांना त्यातून होणारा आनंद. ते समजू शकतो.

मी बोर्डात येणार असं परीक्षेआधी 3 वेळा म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची थट्टा होणारच ना! >>> हे समजू शकतो. भाजपची कामगिरी किंवा त्यांच्यावरच्या टीकेबद्दल मी बोलत नाहीये.

पण यात काही नवीन नाही. लोकसभा आणि विधानसभा यात काही महिन्यांच्या अंतराने झालेल्या निवडणुकात लोकांचा कल बदलल्याचे आधीही अनेकदा दिसले आहे. त्यामुळे ज्यांनी हे गृहीत धरले ते आधीची अनेक उदाहरणे विसरले होते असेच म्हणावे लागेल.

मला फक्त आश्चर्य वाटले ते पवारांना एकदम लायनाइझ केले गेले त्याचे. अगदी एका स्क्रिप्ट मधून आल्यासारखे. लोकसत्ता, लोकमत, निखिल वागळे, अगदी बिगुल सारख्या साइट्स. जणू काही हे ओपिनियन पीस नसून बातमी होती पीटीआय ने दिलेली जी सर्वांनी प्रसारित केली. भाजपच्या जातीयवादावर तोफा चालवणारे मिटकरींसारख्यांबद्दल बोलताना एकदम टोन बदलून बोलू लागले.

आणि पवारही कधी उतरले, तर त्यांच्यावर वैयक्तिक आरोप झाल्यावर. तोपर्यंत नाही. पक्षाशी त्यांची लॉयल्टी किती आहे ते ही यातून दिसते. तसेही भाजप आणि पवार यांचे डावपेच पाहिले तर एकमेकांना फार अडचणीत न टाकण्याचाच पॅटर्न आहे.

रामाचे देऊळ बांधणार म्हणून हुंकारणारे राम कोण होणार अन भरत कोण होणार , ह्यावरून लढत आहेत.

370 झाल्यावर लोकांना अक्कल शिकवत होते, तिकडे जाऊन प्लॉट घ्या,

मग आता दोघांपैकी एकजण काश्मीरचा मुख्यमंत्री का होत नाही ??
Proud

ते एकदाच म्हणाले पण रेकॉर्ड करणारा क्यामेरामन बालाजी फिल्म्सचा असल्याने त्याने तीनदा दाखवलं असं असेल! >>> Lol

>>;;मला फक्त आश्चर्य वाटले ते पवारांना एकदम लायनाइझ केले गेले त्याचे. अगदी एका स्क्रिप्ट मधून आल्यासारखे. लोकसत्ता, लोकमत, निखिल वागळे, अगदी बिगुल सारख्या साइट्स. जणू काही हे ओपिनियन पीस नसून बातमी होती पीटीआय ने दिलेली जी सर्वांनी प्रसारित केली.

यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? तेही आजच्या काळात जेव्हा इलेक्शनआधी आपण मोदींना सफाई कामगारांचे पाय धुताना टीव्हीवर पाहतो. मखमली गालिच्यावर कचरा वेचताना पाहतो. मोदींचे 18 तास काम आणि शहांची चाणक्यनीती याबद्दल कान किटेपर्यंत ऐकतो. आश्चर्य फक्त मोदींच्या काळात मीडियाला आपलं कौतुक करायला लावणारा हा कोण? असं वाटलं तर त्यात काही तथ्य आहे. बाकी मीडिया काय जो नाचवेल त्याच्यासाठी नाचतो.

Pages