विधानसभा २०१९ - सामान्य माणसाने मतदान कोणाला करायचे हा प्रश्नच आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2019 - 15:28

मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणात म्हणतात कॉग्रेस राष्ट्रवादी ने 15 वर्षात महाराष्ट्र लुटला ,मागे वळुन पाहतात तर काय..
स्टेजवर तेच सर्व बसलेले आहेत Happy

व्हॉट्सपवर जेव्हा हा विनोद वाचला तेव्हा हसायला आलेले खरे..
पण आता निवडणूक तोंडावर आली असताना कोणाला मत द्यायचे हा विचार करत असता हा जोकच माझ्यावर हसतोय असे वाटतेय.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी कोणाला मत द्यायचे जेणेकरून देशाचे कमीतकमी नुकसान होईल हे न समज्ल्याने मी अखेर मतदानच केले नव्हते.

पण नंतर वाटले नाही यार, चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, पण आपल्यासारख्या कुठलाही राजकीय झेंडा हाती न घेतलेल्यांनी मतदान करायलाच हवे. त्यातल्या त्यात चांगला पर्याय निवडायलाच हवा.

जेवढे माझ्या राजकीय बालबुद्धीला समजते त्यानुसार ज्या राष्ट्रवादीला भाजपाकडून भ्रष्टवादी म्हटले जायचे त्यांच्याच दिग्गज भ्रष्ट नेत्यांना यांनी आपल्यात सामील केले. मागच्यावेळीही राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार होती. पण भाजपाने तो घेतला नाही कारण आधी त्यांच्याच भ्रष्टाचाराविरोधात हे लढले होते. त्यामुळे यंदा त्यांना आधीच आत घेऊन पावन केले.

भाजपाचे माझे कट्टर भक्त मित्र याबाबत अवाक्षरही बोलायला तयार नसले तरी काठावरच्या समर्थकांमध्ये असंतोष आणि फसवले गेल्याची भावना दिसतेय.

त्याला मलमपट्टी करायला आणि यात भाजपची गंडलेली ईमेज सुधाराय्ला बहुधा मध्यंतरी पवारसाहेबांच्या मागे ईडी लावल्याची हूल उठवण्यात आलेली. जेणेकरून लोकांना वाटेल अग्ग बाई खरेच की, हे अजून भ्रष्टाचाराविरुद्धच लढत आहेत.

मी एक सामान्य नागरीक आहे. मला ते आतले राजकारण कळत नाही. म्हणून धागाही राजकारण विभागात काढला नाही. पण याचा अर्थ मी आंधळा आणि मुर्खही नाही. जे समोर चालले आहे ते बघू शकतो आणि स्वता:चे चूक वा बरोबर जे काही असेल ते मत बनवू शकतो.

आणि आता खरेच वीट आला आहे या सर्वच दलबदलू आणि फेकू लोकांचा. आघाडीला हटवून युती आणली आता युतीला हटवून पुन्हा आघाडी अशीच संगीत खुर्ची खेळण्यात रस नाही. कारण यापौकी कोणीच त्या पात्रतेचे वाटत नाही.

मग काय करावे? काय पर्याय समोर आहेत? थोडासा उलटसुलट विचार माझ्या लेवलला करतो.

१) भाजपा येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण त्यांचे पारडे जड झाले तर महागात पडतील. मग युतीतील प्रादेशिक पक्ष शिवसेनेला मत द्यावे का? जेणे करून त्यांच्यावर थोडा अंकुश राहील... खरेच राहील?

२) राजसाहेब म्हणत आहेत मला विरोधी पक्षनेता करा. करावे का? विरोधात कोणीतरी खळ्ळखट्याक हवाच.... पण ते ही भुमिका योग्य बजावतील का? की सेटलमेंट किंग म्हणून नावारुपास येतील?

३) एखाद्या नवीन पक्षाला मत द्यावे का? एखादा नवीन पर्याय शोधावा का? एका मित्राने वंचित हा पर्याय सुचवला, तर एकाने एमआयएम. पण असे मत तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्यास फुकट जाण्याचीही शक्यता वाढते. तरी मनाच्या समाधानासाठी द्यावे का?

४) की मग नोटा झिंदाबाद!?

शक्य झाल्यास तटस्थ लोकांनीच आपली तटस्थ मते मांडा आणि तटस्थ स्ल्ले द्या. राजकीय धुळवडीला ईतर धागे आहेतच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आमच्या इथे लोक जाऊन बसतात खाली. तिला भेटावे लागते मग आलेल्यांना. आपण दुर्लक्ष केले तर जे पाठपुरावा करतात त्यांची कामे होतात, आपली राहतात.
>>>

पाठपुरावा म्हणजे लाचारी , लोचटपणा, कमीपना घ्यायची आणि हाजी करायची तयारी वगैरे...

यावेळी निवडणुकीवर काहीच विशेष चर्चा झाली नाही आणि या धाग्याने १०० पण गाठलं नाही याचं आश्चर्य वाटतंय.
असोच. मनसे ला कमबॅकसाठी शुभेच्छा!

सनव कारण कोणालाच रस उरला नाही किंवा आता कोणाच्यासाठी भांडायचे हे समजत नाही.
असो
चर्चा करा किंवा नको पण मतदान
आज करा रे सर्वांनी

मी आत्ताच माननीय श्री श्री श्री नरेंद्रजी मोदीजी याना मत देऊन आलो. माझं मत विकासाला माझं मत श्री मोदीजीना.

मी मतदान करून आले . मला जो योग्य वाटलं त्या उमेदवाराला मत दिल . मतदान हा केवळ हक्क नसून जबाबदारी आहे त्यामुळे ती पार पाडली पाहिजे हे माझं मत आहे . मग परिस्थिती कितीही वाईट असो ..

लायक उमेदवार नसेल तर जो थोडाफार लायक आहे त्याला मत देऊन त्याला मजबूत करा, तो यावेळेस हरेल पण त्याला कळेल की त्याला थोडाफार का होईना सपोर्ट आहे

सपोर्ट वाढवण्याच्या अपेक्षेने तो काम करेल.

साधना
सहमत
पक्ष चांगले उमेदवार देत
नसतील तर जनतेनं च मतदान विचार करून केले पाहिजे

>>लायक उमेदवार नसेल तर जो थोडाफार लायक आहे त्याला मत देऊन त्याला मजबूत करा, तो यावेळेस हरेल पण त्याला कळेल की त्याला थोडाफार का होईना सपोर्ट आहे सपोर्ट वाढवण्याच्या अपेक्षेने तो काम करेल.
This soulds good to ears... and pleases guilty concious.. but party ops don't work like that. कमी लायक ला मत नाही दिलं तरी जी पार्टी हरेल (ज्यात कदाचित अधिक लायक ऊमेदवार असू शकतील?) ती जोवर सत्तेत येत नाहि तोवर असे अनेक लायक ऊमेदवार विशेष काहिही काम करू शकत नाहीत. मनसे, सेना, यांच्यातील अशा लायक ऊमेदवारांच्या कारकीर्दी चा अभ्यास करून पहा. असे अनेक होतकरू, लायक, ऊमेदीचे तरूण कालांतराने मागे पडतात, निराश होतात किंवा सत्तेसाठी पक्षपालट करतात. राजकारणात सत्ता हाती असल्याशिवाय काहीही ठोस करता येत नाही.
असो. आणि चांगल्या ऊमेदवाराला मत दिले तरी त्यांचे पक्ष नेत्रूत्व (मनसे, राष्ट्रवादी, वंचित..) यांचेकडे पाहिल्यावर हात आवरता घ्यावा लागतो. Proud
आणि चुकून अशी मत विभागणी झाली (कारण मतदार चांगल्या ऊमेदवाराला मत देतात) तरी सत्तेच्या जोड तोड समिकरणात सगळेच मुसळ केरात जाते.
सध्ध्या तरी एकच पर्याय आहे: त्यातल्या त्यात जो पक्ष स्थिर सरकार देईल व काहितरी कामे करेल असे वाटते त्यालाच मत द्यावे. त्यातही केंद्रात व राज्यात जर एकच पक्ष सत्तेत असेल तर राज्याचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा युती ला पर्याय नाही. अगदीच दहा पंधरा जागा कमी पडल्या तर अपक्ष व ईतरांची चांदी होईल या पलिकडे या निवडणुकीचा महाराष्ट्रातील निकाल तरी आधीच लागलेला आहे.

काय लागला निकाल ?

वर काँग्रेस असताना मोदी 20 वर्षे गुजरातमध्ये नंदनवन फुलवत होतेच ना ?

काँग्रेस - 134
शिवसेना - 53
भाजप - 39
राष्ट्रवादी - 19
मनसे - 13
वंचित - 1
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

पक्ष स्थापन होऊन झालेली वर्ष आहेत, निकालासाठी थांबा २दिवस

कोणत्या पक्षाला मतदान करायचं या प्रश्नाचं उत्तर दुसर्‍या धाग्यावर दिलं आहेच. पुन्हा इथेही लिहितो.

https://www.maayboli.com/node/68349

नगरसेवक पदावर अपक्ष म्हणून निवडून आला तरी त्याला भाजपचा छुपा पाठिंबा होता म्हणत भाजपवर बोचरी टीका करणार्‍यांना छिंदम बसप तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभेला उभा राहिला तरीही त्या पक्षावर टीका करायची हिंमत होऊ नये?

https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/shrip...

https://lokmat.news18.com/maharashtra/western-maharastra/controversial-n...

मुद्दामच काँग्रेस धार्जिण्या वर्तमानपत्रांच्या लिंका दिल्या आहेत. आता सर्वांनाच कळलं असेल की खरा लिबरल पक्ष कोण आहे?

ज्या पक्षाची छिंदम अपक्ष म्हणून निवडल्या जाण्यात चूक आहे असा बिनबुडाचा संशय जरी मनी आला तरी आपण त्याला बिनदिक्कत शिव्या घालू शकतो तो भाजप?

की याच छिंदमला उघड उघड विधानसभेची उमेदवारी देऊनही त्या पक्षावर टीका करायला जीभ चळाचळा कापते तो बसप?

ज्या पक्षाला तुम्ही मायबोलीवर धागे काढून आणि त्याखाली जहाल प्रतिक्रिया लिहून बिनधास्त बोल लावू शकता तो भाजप निवडून येंण्यातच तुमचे कल्याण आहे. ज्यावर टीका करायलाही दहशत वाटते असे इतर पक्ष निवडून येण्यात नव्हे.

Bjp शिवसेना
सत्तेवर येणार हे नक्की झाले आहे.काँग्रेस विषयी लोकांना बिलकुल आपुलकी वाटत नाही .
त्यांचे कर्तृत्व च tas आहे .
वंचित ची जातीयवादी भूमिका महारष्ट्र कधीच मंजूर करणार नाही .
राष्ट्रवादी ग्रामीण भागात तग धरून आहे .
आणि काम पण आहे .
राज ठाकरे आहेत हुशार .पण त्यांना सर्वांनी दाबून टाकलंय.
राज ना विरोधी पक्षनेतेपद मिळावे म्हणजे त्यांचे काम दिसेल .
माणूस वाईट नाही

डोंबिवलीत गेल्या आठवड्यात परत हवा कमळाकडे वळलीय. आमच्या भागात काही सांगता येत नाही, मला इंजिन चान्सेस जास्त वाटतायेत.

राज ठाकरे लोकसभेला उभे न राहता फक्त मोदी शहाना पाडा म्हणत राहिले, त्या पूर्वी मोदींच्या आंघोळीचे पाणी प्यावं इथल्या नेत्यांनी असं म्हणालेले. त्यामुळे लोकांनी फक्त टाळ्या वाजवल्या. एकतर अति कौतुक किंवा अति तिरस्कार अशी दोन टोकं. आता निदान निवडणुकीत उतरलेत, हे बरं केलं.

आजवर माबोवर अत्यंत थंड पडलेली निवडणूक आहे ही!
निवडणुकीत दम राहिलेला नाही की इथले सभासद दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर निघून गेल्याचा परिणाम?

लोकांना कळुन चुकलंय की कोणिही आलं तरी त्यांच्या दैनंदिन आयुष्यात शष्प फरक पडणार नाही. ३७०/पुलवामा ह्यमुळे सरकार भाजी-भाकरी स्वस्त करणार नाही , ना रस्त्यावरचे खड्डे गायब होणार. मग कशाला हवी पंचाईत ?

भांडणे झाल्याने अनेक वेब साईटवरील आयडीचे डिपॉझिट जप्त झाले आहे,
त्यामुळे निवडणूक या विषयावर कुठेही फारसे धागे नाहीत,

शिवाय उडवलेल्या आयडीचे आता व्हाट्सअप ग्रुप आहेत , तिथे चर्चा
होतात

इथले सभासद दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर निघून गेल्याचा परिणाम?>>>

गेले का शेवटी? हुश्श्य!!!!!!

शिवाय उडवलेल्या आयडीचे आता व्हाट्सअप ग्रुप आहेत , तिथे चर्चा
होतात>>>>>

पण तिथे सगळे समविचारी असणार ना? विरुद्ध मतवाले गृपवर कुठून येणार... शिवाय ग्रुपवरून लोकांना उडवल्यावर
नवा फोन नंबर घेऊन येता येत नाही. मग सगळी चर्चा एकतर्फी होणार हो... सगळे भक्त एका ग्रुपवर, सगळे पुरोगामी दुसऱ्या ग्रुपवर. मग कसली चर्चा होतेय, कप्पाळ!!!!!

महाराष्ट्रात पुन्हा एकदा युती सरकार! छान झाले. आता काही दिवस पुन्हा खुर्ची व पद यावरून फटाके ऊडतील. आदित्य ठाकरे महाशयांना ऊ.मु. मंत्री पद मागतील, काही भरोसा नाही. नाही तर गेला बाजार सांस्क्रुतीक मंत्री (बॉलीवूड, पेज थ्री, वगैरे वगैरे...!).
बाकी, मनसे ० बघता, वंचित १ ने पक्षाचे नाव बदलून 'संचित' करायला हरकत नाही. Proud

राज ठाकरेंची अवस्था टाळ्या हजार मते शून्य अशी झाली आहे. आता लोकही शहाणे झालेत. निव्वळ करमणूक कुठे आहे व कामाची शक्यता कुठे आहे हे सर्वांना कळायला लागलय. बरे आहे लोकशाही साठी. राणे कं पण अशीच जमिनीवर आली असती तर बरे झाले असते.

मी शक्यता व्यक्त केल्याप्रमाणे डोंबिवलीत कमळ आणि कल्याण ग्रामीण मध्ये इंजिन आलं. एकमेव सीट मिळाली राज ठाकरे यांना. असं होणार हा अंदाज होताच, लोकं बोलत होती ते ऐकून ही शक्यता लिहिलेली.

>>कल्याण ग्रामीण मध्ये इंजिन आलं
शेवटी ईंजीन ची जागा जंक्शन मध्येच नाही का? Proud
बरेच डबे घसरले, ऊरलेले दुसर्‍या ईंजीन बरोबर गेले..

हो, आता शपथविधी होईपर्यंत मज्जा आहे सगळी. त्यात शरद पवार मध्येच स्वतःची काडी टाकून उरलीसुरली उणीव भरून काढतील.

Pages