विधानसभा २०१९ - सामान्य माणसाने मतदान कोणाला करायचे हा प्रश्नच आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2019 - 15:28

मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणात म्हणतात कॉग्रेस राष्ट्रवादी ने 15 वर्षात महाराष्ट्र लुटला ,मागे वळुन पाहतात तर काय..
स्टेजवर तेच सर्व बसलेले आहेत Happy

व्हॉट्सपवर जेव्हा हा विनोद वाचला तेव्हा हसायला आलेले खरे..
पण आता निवडणूक तोंडावर आली असताना कोणाला मत द्यायचे हा विचार करत असता हा जोकच माझ्यावर हसतोय असे वाटतेय.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी कोणाला मत द्यायचे जेणेकरून देशाचे कमीतकमी नुकसान होईल हे न समज्ल्याने मी अखेर मतदानच केले नव्हते.

पण नंतर वाटले नाही यार, चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, पण आपल्यासारख्या कुठलाही राजकीय झेंडा हाती न घेतलेल्यांनी मतदान करायलाच हवे. त्यातल्या त्यात चांगला पर्याय निवडायलाच हवा.

जेवढे माझ्या राजकीय बालबुद्धीला समजते त्यानुसार ज्या राष्ट्रवादीला भाजपाकडून भ्रष्टवादी म्हटले जायचे त्यांच्याच दिग्गज भ्रष्ट नेत्यांना यांनी आपल्यात सामील केले. मागच्यावेळीही राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार होती. पण भाजपाने तो घेतला नाही कारण आधी त्यांच्याच भ्रष्टाचाराविरोधात हे लढले होते. त्यामुळे यंदा त्यांना आधीच आत घेऊन पावन केले.

भाजपाचे माझे कट्टर भक्त मित्र याबाबत अवाक्षरही बोलायला तयार नसले तरी काठावरच्या समर्थकांमध्ये असंतोष आणि फसवले गेल्याची भावना दिसतेय.

त्याला मलमपट्टी करायला आणि यात भाजपची गंडलेली ईमेज सुधाराय्ला बहुधा मध्यंतरी पवारसाहेबांच्या मागे ईडी लावल्याची हूल उठवण्यात आलेली. जेणेकरून लोकांना वाटेल अग्ग बाई खरेच की, हे अजून भ्रष्टाचाराविरुद्धच लढत आहेत.

मी एक सामान्य नागरीक आहे. मला ते आतले राजकारण कळत नाही. म्हणून धागाही राजकारण विभागात काढला नाही. पण याचा अर्थ मी आंधळा आणि मुर्खही नाही. जे समोर चालले आहे ते बघू शकतो आणि स्वता:चे चूक वा बरोबर जे काही असेल ते मत बनवू शकतो.

आणि आता खरेच वीट आला आहे या सर्वच दलबदलू आणि फेकू लोकांचा. आघाडीला हटवून युती आणली आता युतीला हटवून पुन्हा आघाडी अशीच संगीत खुर्ची खेळण्यात रस नाही. कारण यापौकी कोणीच त्या पात्रतेचे वाटत नाही.

मग काय करावे? काय पर्याय समोर आहेत? थोडासा उलटसुलट विचार माझ्या लेवलला करतो.

१) भाजपा येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण त्यांचे पारडे जड झाले तर महागात पडतील. मग युतीतील प्रादेशिक पक्ष शिवसेनेला मत द्यावे का? जेणे करून त्यांच्यावर थोडा अंकुश राहील... खरेच राहील?

२) राजसाहेब म्हणत आहेत मला विरोधी पक्षनेता करा. करावे का? विरोधात कोणीतरी खळ्ळखट्याक हवाच.... पण ते ही भुमिका योग्य बजावतील का? की सेटलमेंट किंग म्हणून नावारुपास येतील?

३) एखाद्या नवीन पक्षाला मत द्यावे का? एखादा नवीन पर्याय शोधावा का? एका मित्राने वंचित हा पर्याय सुचवला, तर एकाने एमआयएम. पण असे मत तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्यास फुकट जाण्याचीही शक्यता वाढते. तरी मनाच्या समाधानासाठी द्यावे का?

४) की मग नोटा झिंदाबाद!?

शक्य झाल्यास तटस्थ लोकांनीच आपली तटस्थ मते मांडा आणि तटस्थ स्ल्ले द्या. राजकीय धुळवडीला ईतर धागे आहेतच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>सेनेची साथ नसती तर भाजपाचे पानिपतच झाले असते...<<

या असल्या जर तर ला राजकारणात काही अर्थ नसतो.
दोन्ही कॉंग्रेसही मग वेगवेगळ्या लढल्या असत्या आणि त्याने समीकरणे अजुनच बदलली असती.

बाकी उर्मटपणा, कामे केली नाहीत वगैरे आरोपांना फारसा काही अर्थ नाही.
आधीच्या सरकारांपेक्षा हे सरकार नक्कीच उजवे होते.

फक्त सत्तेसाठी पक्षाच्या प्रतिमेला न साजणाऱ्या तडजोडी करणे आणि लोकांना गृहीत धरणे या दोन गोष्टींचा फटका मात्र भाजपाला नक्की बसला.

>>> , हरयाणात कसे स्वबळावर ठिगळ लावलं जेजेपीचं!! >>>

हरयाना व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्ण वेगळी आहे.

>>> जेजेपीचा आधार घेतला आणि तिथे अजय चौतालाला (जेजेपीच्या दुष्यंत चौतालाचा गुन्हेगार बाप) फर्लो मिळाला !! ना खाउंगा..... >>>

कोणत्याही कैद्याला दरवर्षी ७ आठवडे फर्लो मिळण्याची घटनात्मक तरतूद आहे. उद्या युवराज किंवा राष्ट्रीय जामात आत गेले तरी त्यांनाही प्रतिवर्ष ७ आठवडे फर्लो मिळेल.

>>> फक्त सत्तेसाठी पक्षाच्या प्रतिमेला न साजणाऱ्या तडजोडी करणे आणि लोकांना गृहीत धरणे या दोन गोष्टींचा फटका मात्र भाजपाला नक्की बसला. >>>

+ १

हरयाना व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. >> दोन्हीकडे चड्डी घसरलीच की.. स्वबळावर घ्याकी वर!!

>>> दोन्हीकडे चड्डी घसरलीच की.. स्वबळावर घ्याकी वर!! >>>

नागव्याने दुसऱ्यांच्या कपड्यांची काळजी करू नये.

सर्व विषयात शून्य मार्क मिळाल्याने अत्यंत ढ विद्यार्थ्याने, वर्गात पहिला आलेल्या विद्यार्थ्याला फक्त ८० टक्के मार्क मिळाले म्हणून खिजवायचा प्रयत्न करणे जितके हास्यास्पद व मूर्खपणाचे लक्षण आहे, तितक्याच हास्यास्पद व मूर्खपणाच्या प्रतिक्रिया येथील कॉंग्रेसी बुणग्यांकडून येत आहेत.

काही बाबी त्रिवार सत्य आहेत .
सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शी हातमिळवणी राज्य पातळीवर करणार नाही.
सेनेच्या मागण्या वाढल्या म्हणून bjp विरोधी पक्षात बसतो असे जाहीर करणार नाही
जेव्हा bjp काहीच नव्हती तेव्हा सेने नी त्यांना जवळ केले आणि इथे पाय रोवण्यासाठी मदत केली हे पण सत्य आहे .

ट्रोल लोकांना उत्तर द्यायचं नव्हतं. पण फुल्टॉसच दिलाय तर

१. सरकारची कामगिरी उत्तम आहे. आयारामांमुळे कमी जागा आल्या. - कामगिरी उत्तम आहे, तर आयारामांची गरज का पडली?
२.एकटे लढले असते तर १४४+ मिळाल्या असत्या. - दुकट्याने २२० मिळणार होत्या. मिळाल्या?
आणि एकटे लढणार म्हणजे शिवसेनेतून पण आयात करणार होते का?
फडण२.० ची 'मी परत येईन' क्लिप पाहिली. एकच वाक्य तीनदा म्हणायला ते कागदावर नोटेशन बघत होते का? दुसऱ्या टर्ममध्ये प्लेबॅक न घेता स्वत:चं गाणी म्हणणार की काय?
नद्यांची गाणी म्हणून झाली. आता आरेत कत्तल केलेल्या झाडांची म्हणा.

दोन्हीकडे चड्डी घसरलीच की.. स्वबळावर घ्याकी
चिवट ची प्रतिक्रिया
विचित्र असतात .
इथे कोणता पक्ष उत्तम सरकार चालवेल ह्याची चर्चा आहे.
Bjp सरकार चालवत आहे केंद्रात आणि राज्यात ते सर्व भारतीय लोकांचे प्रतींधिक आहे .
हिंदू चे सरकार नाही नशीब.
हिंदू साठी bjp नी सत्तेचा वापर केला नाही.
नाही तर परत कधी निवडणूक होणार च नाही.
पण हा chidku bjp
वर टीका करण्या आडून हिंदू ना नाव ठेवत आहे .
Bjp वर टीका करा तो अधिकार आहे पण त्या आडून धार्मिक टीका कराल तर चुकीचे आहे

नागव्याने दुसऱ्यांच्या कपड्यांची काळजी करू नये.

Submitted by पुरोगामी on 26 October, 2019 - 16:41 >>>

जाऊद्या भाऊ, कुठे पालथ्या चमच्यावर पाणी ओतताय...

तो बघा त्या विदुषकाला साथ द्यायला इतके दिवस अड्ड्यावर ना फिरकणारा असंतुलित ट्रोल ही आरेवारे करत आलाय...

>>> जेव्हा bjp काहीच नव्हती तेव्हा सेने नी त्यांना जवळ केले आणि इथे पाय रोवण्यासाठी मदत केली हे पण सत्य आहे . >>>

काहीही. भाजपच्या १९८० मधील स्थापनेपासूनच महाराष्ट्रात भाजपची ताकद सेनेपेक्षा बरीच जास्त होती. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत दीड महिना वय असलेल्या भाजपने एकट्याने स्वबळावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात १२ आमदार निवडून आणले होते. कॉंग्रेसशी युती करून सुद्धा
सेनेचे शून्य आमदार निवडून आले होते. आपला बालेकिल्ला समजणाऱ्या ठाणे-मुंबईत सुद्धा कॉंग्रेसशी युती असूनही व कॉंग्रेसची प्रचंड लाट असूनही सेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. १९७८ मध्ये सुद्धा ३५ जागा लढवून सेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत सेनेने प्रचंड लाट असलेल्या कॉंग्रेसशी युती करून मुंबई या आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात लोकसभेच्या २ जागा लढविल्या होत्या व दोन्ही जागांवर सेनेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत सेनेचा फक्त १ आमदार निवडून आला होता, तर भाजपचे १६ आमदार निवडून आले होते. सेनेला मुंबई-ठाण्यातील काही प्रभाग वगळता बाहेर कणभरही जनाधार नव्हता. भाजपचे आमदार १६ असले तरी ते महाराष्ट्रातील सर्व भागातून निवडून आले होते.

भाजपमुळे सेना मुंबई-ठाण्याच्या बाहेर लोकांना माहिती झाली ही वस्तुस्थिती आहे.

>>सरकारची कामगिरी उत्तम आहे. आयारामांमुळे कमी जागा आल्या. - कामगिरी उत्तम आहे, तर आयारामांची गरज का पडली?<<
गरज पडली? राजकीय घडामोडींचे इतके सरळसोप्पे अर्थ असतात का?
भाजपाकडे उमेदवार नव्हते म्हणून बाहेरुन आयात केले हा अन्वयार्थ फक्त एकतर बाळबोध विश्लेषक लावू शकतात किंवा वेड पांघरून पेडगावला गेलेले!
उद्देश विरोधी पक्षाला जास्तीत जास्त कमकुवत करण्याचा होता जो काही ठिकाणी सफल झाला पण एकंदर राज्याचा विचार करता फसला.

बाकी फडणवीसांचा एका ठराविक कारणामुळे द्वेष करणाऱ्यांचे ताकाला जावून भांडे लपवणे आता सरावाचे झालेय!

भाजपमुळे सेना मुंबई-ठाण्याच्या बाहेर लोकांना माहिती झाली ही वस्तुस्थिती आहे.

बाळासाहेबांचा झांझवात तुम्ही नाकारत आहात का .
देश पातळीचे नेते वाजपेयी जी अडवाणी जी बाळासाहेबांना भेटायला यायचे त्याच विश्लेषण कसं कराल.
राजकारणात कमजोर पक्ष च्या नेत्या ला काही किंमत नसते हे सूत्र आहे

भरत
सातारा मतदार संघ विषयी तुम्हाला किती
माहिती आहे

काही ठिकाणी पक्ष बघून मतदान होते आणि काही ठिकाणी उमेदवार बघून
काही नेते महाराष्ट्र मध्ये असे आहेत ते कोणत्या ही पक्षात गेले तरी निवडून येतील. .
पश्चिम महाराष्ट्र सातारा,कोल्हापूर etc
हा काँग्रेस राष्ट्र वादी चा गड आहे .
त्यांचे नेते स्थानिक लोकांशी समरस झालेले आहेत.
त्या मुळे.
udhyan राजे हे जनतेत कधीच मिसळले नाहीत.
छत्रपतींचे वारस हीच सर्वात मोठी ओळख त्यांची होती .
छत्रपती महाराष्ट्र चे दैवत .
ते राष्ट्र वादी chya नावा वर निवडून यायचे .
पक्ष बदलला ते हरले

भाजपचे काय चुकले याचा फार विश्लेषण होतंय. पण काँग्रेस का निवडून आली याच्यावर कोणीच बोलत नाहीये. मला पडलेला हा फार मोठा प्रश्न आहे. काँग्रेस हायकमांड सध्या हाच विचार करत असणार कि आम्हाला निवडून का दिला?

महाराष्ट्र मध्ये तरी काँग्रेस राष्ट्र वादी मुळे निवडून आली त्यांची युती आहे ना.
दुसरे bjp chaya राज्यात.
व्यापारी,नोकरदार,उद्योग पती, सर्व आर्थिक संकटात सापडले .
मोठ मोठे उद्योगपती कर्जाच्या विळख्यात सापडले आणि लोकांचा रोजगार जावू लागला .
हे कारण आहे bjp विरोधी मत निर्माण होण्या मागे

>>इथे भाजप समर्थकच महाभरतीमुळे कमी जागा आल्या म्हणताहेत.<<
मी पण तेच म्हणतोय..... त्याबद्दल काही वादच नाहीये.
भाजपाने एक चाल खेळली आणि ती तितकीशी यशस्वी झाली नाही
पण म्हणून ती चाल होती हे नाकारता येत नाही.... तो भाजपाचा नाईलाज होता या निष्कर्षाबद्दल गंमत वाटते.

>>> बाळासाहेबांचा झांझवात तुम्ही नाकारत आहात का . >>>

हा तथाकथित झंझावात सेनेला स्थापनेपासून पहिल्या २४ वर्षात फक्त १ आमदार देऊ शकला. भाजपशी युती झाल्यानंतर भाजपच्या मतांमुळेच सेनेचे आमदार निवडून यायला लागले. ठाकरेंचा तथाकथित झंझावात फक्त करमणूक करू शकतो, मते देऊ शकत नाही हे पुढील पिढितही दिसत आहे.

इथे तुमच्या पार्टीतले लोक म्हणताहेत, इतरही एकटे लढलो असतो तर १४४+ आले असते.
त्यांच्यासाठी आहे ते.
बाकी आपल्या सरकारच्या कामाबद्दल खात्री असती तर विरोधी पक्षांना (आणि पक्षातील स्पर्धकांना) कमकुवत करायची गरज पडली नसती.

भाजपला विरोधी पक्ष नसलेली लोकशाही हवी आणि त्यांच्या
इथल्या समर्थकांनाही विरोधी आवाज नकोय. दोघांनाही उत्तर मिळालं असेल.

आर्थिक स्थिती सावरली नाही.
शेती पासून सर्व उद्योगांना चांगले दिवस आले नाहीत
तर फक्त धर्म ह्या एकाच गोष्टी वर हिंदू उपाशी पोटी bjp ला मत देणार नाहीत .
बाकी धार्मिक लोकांसारखे हिंदू नक्कीच धर्मवेड्या मध्ये येत नाहीत .
इथून पुढे फक्त आर्थिक प्रश्न ना वरच bjp नी लक्ष द्वावे आणि पुढील 50 वर्ष राज्य करावे

>>बाकी आपल्या सरकारच्या कामाबद्दल खात्री असती तर विरोधी पक्षांना (आणि पक्षातील स्पर्धकांना) कमकुवत करायची गरज पडली नसती.<<
परत एकदा बाळबोध अपेक्षा.... चाणक्यनिती वगैरे काही ऐकलेच नाहीये की आता उगाच ओढूनताणून समर्थन करायचेच असे ठरवलेय?

भाजपाला विरोधी पक्ष नको असला तरी किमान महाराष्ट्रातील मतदाराला आज या घडीला तो हवा आहे. इतर समर्थकांचे माहित नाही पण मला एकाधिकारशाही नकोय

पण तरीही या निकालाचा अर्थ भाजपाला जनतेने सरसकट नाकारलेय असे लावणारे महान आहेत. मतदारांनी वॉर्निंग दिलीय आणि भाजपाचा थिंकटॅंक त्याचे गांभीर्य ओळखून व्यूव्हरचना आखण्याइतका नक्कीच समंजस आहे.

>>> बाकी आपल्या सरकारच्या कामाबद्दल खात्री असती तर विरोधी पक्षांना (आणि पक्षातील स्पर्धकांना) कमकुवत करायची गरज पडली नसती. >>>

भाजपच्या सरकारच्या कामांची आणि आपल्या पक्षाच्या व नेत्याच्या कमकुवतपणाची विरोधकांनाच इतकी खात्री होती की ते ऱांगा लावून भाजपत येत होते.

>>> भाजपला विरोधी पक्ष नसलेली लोकशाही हवी आणि त्यांच्या इथल्या समर्थकांनाही विरोधी आवाज नकोय. >>>

विरोधकांचा आवाज पूर्ण बंद करण्याची घटना भारताच्या इतिहासात एकदाच घडली होती (१९७५ ते १९७७ या काळ्या कालखंडात).

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच साताऱ्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे निकालही २४ ऑक्टोबर रोजी हाती आले. साताऱ्यामधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये जे उदयनराजेंच्या बाबतीत घडलं तेच गुजरातमध्ये अल्पेश ठाकोर यांच्याबाबतीत घडले आहे.

गुजरातमधील विधानसभेच्या सहा जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. सहा पैकी तीन जागांवर भाजपाने तर तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या अल्पेश यांचा पराभव झाला आहे. अल्पेश यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. राधनपुर येथील विधानसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये अल्पेश यांचा साडेतीन हजारहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.

वंचित नी जात लीहली
उमेदवाराच्या नावा समोर आणि महाराष्ट्र नी त्यांना कचऱ्याचा डब्बा दाखवला .
ह्या देशात फक्त दोनच मागास राज्य आहेत up आणि बिहार ते जाती वर मत देतात आणि गरिबी मध्ये खितपत पडतात .
महाराष्ट्र जातीयवादाचा विरोध करतो हे वंचित ला समजले नाही

Pages