विधानसभा २०१९ - सामान्य माणसाने मतदान कोणाला करायचे हा प्रश्नच आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2019 - 15:28

मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणात म्हणतात कॉग्रेस राष्ट्रवादी ने 15 वर्षात महाराष्ट्र लुटला ,मागे वळुन पाहतात तर काय..
स्टेजवर तेच सर्व बसलेले आहेत Happy

व्हॉट्सपवर जेव्हा हा विनोद वाचला तेव्हा हसायला आलेले खरे..
पण आता निवडणूक तोंडावर आली असताना कोणाला मत द्यायचे हा विचार करत असता हा जोकच माझ्यावर हसतोय असे वाटतेय.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी कोणाला मत द्यायचे जेणेकरून देशाचे कमीतकमी नुकसान होईल हे न समज्ल्याने मी अखेर मतदानच केले नव्हते.

पण नंतर वाटले नाही यार, चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, पण आपल्यासारख्या कुठलाही राजकीय झेंडा हाती न घेतलेल्यांनी मतदान करायलाच हवे. त्यातल्या त्यात चांगला पर्याय निवडायलाच हवा.

जेवढे माझ्या राजकीय बालबुद्धीला समजते त्यानुसार ज्या राष्ट्रवादीला भाजपाकडून भ्रष्टवादी म्हटले जायचे त्यांच्याच दिग्गज भ्रष्ट नेत्यांना यांनी आपल्यात सामील केले. मागच्यावेळीही राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार होती. पण भाजपाने तो घेतला नाही कारण आधी त्यांच्याच भ्रष्टाचाराविरोधात हे लढले होते. त्यामुळे यंदा त्यांना आधीच आत घेऊन पावन केले.

भाजपाचे माझे कट्टर भक्त मित्र याबाबत अवाक्षरही बोलायला तयार नसले तरी काठावरच्या समर्थकांमध्ये असंतोष आणि फसवले गेल्याची भावना दिसतेय.

त्याला मलमपट्टी करायला आणि यात भाजपची गंडलेली ईमेज सुधाराय्ला बहुधा मध्यंतरी पवारसाहेबांच्या मागे ईडी लावल्याची हूल उठवण्यात आलेली. जेणेकरून लोकांना वाटेल अग्ग बाई खरेच की, हे अजून भ्रष्टाचाराविरुद्धच लढत आहेत.

मी एक सामान्य नागरीक आहे. मला ते आतले राजकारण कळत नाही. म्हणून धागाही राजकारण विभागात काढला नाही. पण याचा अर्थ मी आंधळा आणि मुर्खही नाही. जे समोर चालले आहे ते बघू शकतो आणि स्वता:चे चूक वा बरोबर जे काही असेल ते मत बनवू शकतो.

आणि आता खरेच वीट आला आहे या सर्वच दलबदलू आणि फेकू लोकांचा. आघाडीला हटवून युती आणली आता युतीला हटवून पुन्हा आघाडी अशीच संगीत खुर्ची खेळण्यात रस नाही. कारण यापौकी कोणीच त्या पात्रतेचे वाटत नाही.

मग काय करावे? काय पर्याय समोर आहेत? थोडासा उलटसुलट विचार माझ्या लेवलला करतो.

१) भाजपा येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण त्यांचे पारडे जड झाले तर महागात पडतील. मग युतीतील प्रादेशिक पक्ष शिवसेनेला मत द्यावे का? जेणे करून त्यांच्यावर थोडा अंकुश राहील... खरेच राहील?

२) राजसाहेब म्हणत आहेत मला विरोधी पक्षनेता करा. करावे का? विरोधात कोणीतरी खळ्ळखट्याक हवाच.... पण ते ही भुमिका योग्य बजावतील का? की सेटलमेंट किंग म्हणून नावारुपास येतील?

३) एखाद्या नवीन पक्षाला मत द्यावे का? एखादा नवीन पर्याय शोधावा का? एका मित्राने वंचित हा पर्याय सुचवला, तर एकाने एमआयएम. पण असे मत तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्यास फुकट जाण्याचीही शक्यता वाढते. तरी मनाच्या समाधानासाठी द्यावे का?

४) की मग नोटा झिंदाबाद!?

शक्य झाल्यास तटस्थ लोकांनीच आपली तटस्थ मते मांडा आणि तटस्थ स्ल्ले द्या. राजकीय धुळवडीला ईतर धागे आहेतच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आधीच निकाल पाहिले म्हणून, नाहीतर लोकसत्ता वगैरेच्या बातम्या वाचून असे वाटले की शरद पवार व राष्ट्रवादीने महाराष्ट्र विधानसभा काबीजच केली आहे. जेमतेम पन्नास जागा. कॉंग्रेस व रा.वा. मिळून शंभर सुद्धा पार केल्या नाहीत. म्हणजे १५-२० जागांवर काही मते फिरली असती, यांनी गोंधळ केला नसता, त्यांनी मते फोडली नसती वगैरे तरीही काही फरक पडला नसता.

युतीच्या जागा अपेक्षेपेक्षा कमी आल्या, त्याची कारणे काहीही असतील पण अजून पर्याय काही दिसत नाही. आयत्या वेळी पावसात सभा घेउन पवारांमुळे इतपत पोहोचत असतील, तर उद्या ते निवृत्त झाल्यावर तीही शक्यता नाही.

पूर्वी- म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात- बलाढ्य एमसीसीचा संघ भारतात येई क्रिकेट दौर्‍यावर. त्यांच्याविरूद्ध एखादे अर्धशतक वगैरे मारणार्‍यांना आपल्या दृष्टीने खूप महत्त्व असे. अजूनही सध्या फारश्या कोणाला माहीत नसलेल्या एखाद्या वयोवृद्ध क्रिकेटपटूबद्दल बोलताना १९३५ साली एमसीसी विरूद्ध त्यांनी अर्धशतक मारले होते वगैरे त्यांच्याबद्दलच्या माहितीत येते. तसे वाटले ही बातमी वाचून. फक्त फरक इतकाच की पवार व राष्ट्रवादी खरे म्हणजे महाराष्ट्रात "एमसीसी" होते आत्तापर्यंत.

बहुदा भाजप ने विरोधक शून्य झालेत अशी हवा केल्याने लोकांना जितके आलेत ते ० वरून १०० वर गेले आहेत असा वाटत आहे. बाकी इतक्या प्रमाणात पक्षांतर होऊनही अपेक्षेपेक्षा फारच कमी सीट आलेत भाजप चे.

>>बाकी इतक्या प्रमाणात पक्षांतर होऊनही अपेक्षेपेक्षा फारच कमी सीट आलेत भाजप चे.<<
उलट पक्षांतरामुळेच भाजपाला फटका बसला असं माझं मत आहे. फडणवीसांचा फाजील आत्मविश्वास देखील नडला. सेनेचा मुमं पदावरचा दावा मात्र आता जास्त घट्ट झालेला आहे... Happy

>>> उलट पक्षांतरामुळेच भाजपाला फटका बसला असं माझं मत आहे. फडणवीसांचा फाजील आत्मविश्वास देखील नडला. सेनेचा मुमं पदावरचा दावा मात्र आता जास्त घट्ट झालेला आहे. >>>

सहमत

मग आता तू घर पाडू नकोस
तेही झाडे तोडणार नाहीत,

तुझे घर वाचवल्याबद्दल आदित्य ठाकरेंचे अभिनंदन

उलट पक्षांतरामुळेच भाजपाला फटका बसला असं माझं मत आहे. >>>>
सहमत. खोगिरभरती करून लोकांना आम्हीही त्यातलेच हे अगदी उघडपणे दाखवले. अर्थात ही भरती सीट्स जास्त भराव्यात यासाठी होती जे झाले नाही.

राष्ट्रवादीला जागा मिळाल्या त्या पवार भिजले म्हणून नाही. त्यांना ग्रामीण भागातल्या त्यांच्या पारंपारीक मतदारांनी निवडून आणले. आत्महत्या करणारे शेतकरी बाजूला ठेवले तर जे बऱ्यापैकी शेतीत स्थिरावलेले शेतकरी आहेत ते भाजपच्या बाजूने नसून राष्ट्रवादीच्या बाजूने आहेत कारण कर्जमाफी देणे केवळ राष्ट्रवादी करत होते. निवडणुका व्हायच्या आदल्या दिवशी अशाच एका शेतकऱ्याशी बोलत होते, तो त्याचा आमदार निवडून आलायच असे बोलत होता, भाजपाने काही केले नाही, कर्जमाफी नाही म्हणून खूप भडकलेला. मला आश्चर्य वाटले खरेतर. कारण शेतीसाठी कर्ज घेऊन ते नंतर माफ करायचे व सगळ्यांना 72,000 रु वर्षाला द्यायचे यात मला तरी काही फरक दिसत नाही. त्याचा आमदारच निवडून आला आज. पण उद्या पवार निवृत्त झाल्यावर मात्र कठीण होणार.

>>सेनेचा मुमं पदावरचा दावा मात्र आता जास्त घट्ट झालेला आहे... 

आधी 'आम्हीच मोठा भाऊ' म्हणून झालं. मग 'छोटा मोठा भाऊ काही नसतं. नातं टिकवण्ं महत्त्वाचं' अशी कोलांटउडी झाली. आता परत 'आम्हीच मोठे भाऊ' असं म्हणायला मोकळे. हे खरे entertainment, entertainment, entertainment! Proud परत युतीत राहुन सरकारवर टीका करतातच. बीजेपीसाठी हे म्हणजे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. खरं तर सोडता येतंच नाहिये की. मज्जा मज्जा चालू आहे सगळी.

उलट पक्षांतरामुळेच भाजपाला फटका बसला असं माझं मत आहे.
>>>>

बरेच भाजप समर्थक आधी या भरतीचे समर्थन करताना म्हणत होते की रजकारणात एकहाती सत्ता हवी तर हे असे करावेच लागते, सगळेच करतात, सत्तेशिवाय लोकांची कामे करू शकत नाही, एकहाती बहुमत हवेच.. ब्लाह ब्लाह ब्लाह.

आता मात्र मी त्याच मित्रांच्या फेसबूक वॉलवर अपयशाचे (कमी यशाचे) खापर या भरतीवर फोडताना बघतोय Happy

>>ज्या पक्षाला तुम्ही मायबोलीवर धागे काढून आणि त्याखाली जहाल प्रतिक्रिया लिहून बिनधास्त बोल लावू शकता तो भाजप

आं??? मायबोलीवर लिहू शकतो. ट्विटर किंवा फेसबुकवर नाही हो. खरं तर मायबोलीवरसुध्दा लिहू शकतो. फक्त त्यामुळे देशद्रोही वगैरे म्हणून खटला भरला जायची शक्यता अजून तरी दिसत नाहिये एव्ह्ढाच फरक.

>>आता मात्र मी त्याच मित्रांच्या फेसबूक वॉलवर अपयशाचे (कमी यशाचे) खापर या भरतीवर फोडताना बघतोय

ह्याला माझी आजी 'वारा येईल तशी पाठ देणे' असं म्हणायची. फार उपयुक्त गुण आहे हा. Proud

कारण शेतीसाठी कर्ज घेऊन ते नंतर माफ करायचे व सगळ्यांना 72,000 रु वर्षाला द्यायचे यात मला तरी काही फरक दिसत नाही. त्याचा आमदारच निवडून आला आज. पण उद्या पवार निवृत्त झाल्यावर मात्र कठीण होणार. >> फडणवीस, नमो आणी शहा तर आकडेवारी देत होते की आम्ही एवढी सगळ्यात मोठी कर्जमाफी दिली म्हणून.. म्हणजे तोही सगळा जुमलाच. सर्व प्रश्नांवरचा जालिम उपाय '३७० पासून मुक्ती' पण नाही चालला असं दिसतोय एकंदर..
कर्जमाफी आणि ७२००० मधे तुम्हाला फरक दिसणारच नाही कारण त्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतात..

>> प्रश्नांवरचा जालिम उपाय '३७० पासून मुक्ती' पण नाही चालला असं दिसतोय एकंदर..

मी तर ह्यावर काही बोलायचंच नाही असं ठरवल्ंय कारण माननीय वगैरे पंतप्रधान म्हणालेच आहेत डूब मरो. आणि मला पोहायला येत नाही. Proud

बाकी आरेचा गाजावाजा निवडणुकीपेक्षा जास्त मीडियातच झाला. मीडिया हाइप वरून तरी वाटलेलं की आरेच्या प्रश्नावरून किमान वातावरण तापवण्याचा प्रयत्न होईल. पण एक मनसे सोडला तर बाकीच्यांनी औषधापुरताही तो मुद्दा प्रचारात आणला नाही.
याचे दोनच अर्थ निघतात, एकतर पब्लिकला मेट्रो हवी होती, किंवा या पर्यावरणवादी मुद्द्यांमध्ये जनतेला काडीचाही इंटरेस्ट नाही, त्यापरास बाकीचे मुद्दे लोकांना अधिक महत्वाचे वाटले. पुन्हा जवळजवळ अख्ख्या मुंबईचं माप युतीच्या पदरात पडलं, यातूनच काय ते समजा.

मात्र या निवडणुकीत खरी दाणादाण उडाली ती मनसेची. किमान आतातरी सरड्यासारखं रंग बदलणं सोडावं, इतकं राज ठाकरेंना कळलं तरी पुरे. सभा गाजवून फक्त मीडिया जिंकता येतो, निवडणूक नाही. दरवेळेला पक्षाचं मार्केटिंग करण्यासाठी कधी ब्लू प्रिंट, कधी मुख्यमंत्रीपद, कधी प्रमुख विरोधी पक्ष अशा नवनव्या युक्त्या लढवून त्यांनी अख्ख्या पक्षाच्या अजेंड्याच जणू व्यंगचित्रच करून टाकलंय. दोन घरचा पाव्हणा, तिन्ही काळ उपाशी म्हणतात ते यालाच.

मनसे बाबत चर्चा करण्यातही अर्थ नाही. काँग्रेसने काडीचीही मेहनत घेतली आहे असे कुठेच दिसले नाही. भाजपने सुरुवातीपाूनच राष्ट्रवादी आणि पर्यायाने पवार यांवरच लक्ष केंद्रित केलेलं दिसलं. राष्ट्रवादी गाळात जाणार असे चित्र उभे झाले होते. राष्ट्रवादीच्या यशाने सेनेला अधिक फटका बसला. युतीच्या वल्गना '२५० पार ' असताना आलेले निकाल फार चांगले आहेत असे वाटत असेल तर तो जुमला आहे.

>>मात्र या निवडणुकीत खरी दाणादाण उडाली ती मनसेची<<
दुर्दैवी वास्तव. अर्थात, याला राज ठाकरेच कारणीभूत आहेत. २५-३० वर्षांपुर्विचा, आणि अगदि बाळासाहेब हयात असेतोवर जाणवणारा मराठी माणसाचा "माज" आता यापुढे मुंबईत दिसणार नाहि...

राज्य पातळीवर राष्ट्रीय पक्षाचे बहुमतातील सरकार बिलकुल नको अस माज मत आहे.
राष्ट्रीय पक्ष स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात.
त्या मुळे bjp 103 वर आटोपली हे खूप महत्त्वाचे आहे सरकार बनविण्यासाठी दुसऱ्या पक्षाची गरज लागेल आणि ती स्थानिक पक्ष असलेला शिवसेना पूर्ण करेल .
Bjp ला स्वतःला 144 चा आकडा पार करून न देण्यात ह्या राज्यातील जनतेचे शाहणपण च आहे .
राष्ट्र वादीची ग्रामीण भागात चांगली पकड आहे .
फक्त कर्ज माफी ही ग्रामीण भागाची गरज नसते .
वर साधना नी त्याचा उल्लेख केला आहे ग्रामीण अर्थ व्यवस्था देशाच्या हितासाठी वाढत राहावी गरजेचं असते .
सिंचनाची सोय,रस्ते,आणि भांडवल हे तिथे पुरवलं तर त्याला बळ मिळत.
शक्यतो arthvat माहितीवर ठाम मत मांडणे टाळले पाहिजे .
मुंबई आणि परिसर युती कडे गेला असला तरी ह्या शहरी पट्ट्यात जास्तीत जास्त मराठी प्रतिनिधी राज्याला मिळाले ही आनंदाची बाब आहे .
महाराष्ट्र सरकार निवडताना
देश पातळीवर जावून मतदान करण्याची गरज नाही स्थानिक प्रश्न प्रथम स्थानावर असावेत.
काश्मीर प्रश्न,पाकिस्तान,370 ,ह्याचा महाराष्ट्र शी काय संबंध आणि त्या प्रश्र्नाशी काही ही देणे घेणे नाही .
राज्याचा विकास आणि
बाकी राज्याचे प्रश्न महत्वाचे.
राष्ट्रीय प्रश्न सोडवायला केंद्रात bjp ला राज्यांनी पाठवली आहे .
राज्य च्या बोकांडी देशाचे प्रश्न बसवू नका

फारेण्ड, गेल्या काही दिवसां तला माहोल पाहिला तर त्या बातम्या खटकणार नाहीत.
निवडणुका घोषित व्हायच्या आधी आणि नंतरही खूप उशिरापर्यंत भाजपने शिवसेनेला झुलवत ठेवणं, एकहाती सत्ता मिळवू असा विश्वास
युती झाल्यावर दोनशेपारच्या घोषणा,
लोकस भा निव डणुकींपासून ते पार विधानसभेला राष्ट्रवादीने तिकीट दिले ल्या उमेदवाराचे भाजप मध्ये पक्षांतर - (आधी त्याबद्दल मौन पाळून किंवा निवडून ये ण्याचे निकष , कार्यक्रम राबवण्यासाठी बहुमत इत्यादी कारणं देणारे) कोणी आता त्याला खोगीरभरती म्हणत असलं तरी गेल्या महिना दीड महिन्यातल्या हेडलाइन्स ' आज भाजपमध्ये महाभरती ' अशा होत्या. ज्या जागा शिवसेनेच्या होत्या तिथे त्या लोकांना सेनेत पाठवण्यातही भाजपायींचा हात होता, असं "आता सेनेचे उ मेदवारही फडणवीसच ठरवणार" या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून मानता येईल.

मतदान होण्यापूर्वी आणि एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्ष संपल्यात जमा झाल्याचा कालवा. यात लोकसभेत मिळाले ल्या मतांच्या आधारे केलेलं प्रोजेक्शनही आलंच.

वंचित आघाडीमुळे याही वेळा आघाडीच्या किती जागा गेल्या हे बघायला हवं.
भविष्यात महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता काँग्रेस-राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित बहुजन आघाडीचा असेल,' - असं देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आहे.

या सगळ्याच्या तुलनेत राष्ट्रवादीला मिळालेलं यश नक्कीच उल्लेखनीय आहे. २०१४ मध्ये मिळालेल्या जागा उणे पक्षांतर केलेले आमदार यांच्या तुलनेत आता जिंकलेल्या जागा हा फरक नक्की किती हे पाहायला हवं. यात पवारद्वयीला मिळाले ल्या ईडी नोटिसीचा भाग किती हेही बघायला हवं.
ईडी नोटिसीवरून - काल संध्याकाळी आकाशवाणीवर अर्ध्या तासाचं निवडणूक वार्तापत्र होतं. त्यात अजित पवारांचं नाव होतं का आठवत नाही. त्यांना मिळालेल्या मताधिक्याचा उल्लेख नव्हता हे नक्की. गंमत म्हणजे पडलेल्या महत्त्त्वाच्या उमेदवारांत गोपीचंद पडळकर हे नाव होतं. Happy

बंडखोरी करून निवडून आलेल्या भाजपच्या लोकांना सत्तेत सामावून घेतलं जाईल्, असं फडणवीस म्हणाल्याचं ऐकलं. हे झालं आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री झाले तर फारच मजा येईल. घराणेशाही, अनुभव, आधीचं काही काम नसताना थेट मुख्यमंत्रीपदाचा दावा, याबद्दल अभ्यासू मतं ऐकायला आवडतील.

अभ्यासू आणि गणितज्ञ फडण२.० यांनी आमच्या जागा कमी झाल्या असल्या तरी २०१४ च्या तुलनेत स्ट्राइक रेट वाढला आहे, असं काल म्हटलं. मज मंदबुद्धीस पडलेला प्रश्न. गेल्यावेळी युती आघाडी दोन्ही नव्हत्या. यावेळी आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आधीपेक्षा कमी जागा लढवल्या. निम्म्या म्ह टलं तरी हरकत नाही. यात सेना भाजपच्या जागा घटल्या. कॉ, राकाँच्या वाढल्या. स्ट्राइक रेट चौघांचेही वाढलेच ना? मग भाजपचा स्ट्राइक रेट वाढला यात नक्की काय विशेष झालं?

नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याबद्दल आणि नितीश राणे भाजपच्या तिकिटावरून विधानसभेत पोचल्याबद्दल भाजप समर्थकांचे विशेष अभिनंदन.

रच्याकने सिंधुदुर्गातल्या सगळ्या लढ ती सेना भाजपचा अधिकृत उमेदवार विरुद्ध त्यांचाच प्रायोजित अपक्ष उमेदवार अशा होत्या.

पुन्हा एकदा आपलं कौशल्य दाखवून देण्याची संधी अमित शहा यांना दिल्याबद्दल हरयाणातल्या जनतेचे अभिनंदन.
योगेश्वर दत्त, बबिता फोगट या देशभक्त राष्ट्रवादी मंडळींना नाकारून जनतेने कोणता संदेश दिला?

. हे खरे entertainment, entertainment, entertainment! >>>
पण तोच तो विनोदी प्रयोग किती वेळा बघणार!

गुजरातमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अल्पेश ठाकोर यांचा पोटनिव डणुकीत पराभव झाला.

वरच्या पोस्टमध्ये उदयन भोसले यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी चेरी ऑन द केक होता, हे लिहायचं राहिलं.

वंचित नी उमेदवार च्या नावा पुढे जातीचा उल्लेख करून सुसंस्कृत महाराष्ट्र ला up आणि बिहार सारख्या राज्यांचे पंक्तीत बसवण्याचे प्रयत्न हाणून पाडले ह्या बद्धल महारष्ट्र च्या जनतेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
अमित शाह नी राज्याच्या प्रश्नाला बगल देत 370 ,triple तलाक असले ह्या राज्याशी संबंधित नसलेले मुद्धे आणायचे प्रयत्न केले आणि त्याचा bjp ला फटका बसला.

मुळात भाजप ची निवडणूक स्ट्रॅटेजि हि विविध सर्वे आणि मार्केटिंग कंपन्यांच्या सल्ल्याने तयार होते. कमी अधिक प्रमाणात सर्व पक्ष अश्या प्रकारचे सर्वे करून घेतात. यात कुठेतरी १४५ चा एकदा स्वबळावर गाठायचा आणि नाहीच जमले तर अजून काही अपक्ष मॅनेज करून शिवसेनेचा त्रास कमी ठेवायची स्ट्रॅटेजि ठरली होती. त्यामुळे निवडणुकीच्या आधी सर्व पक्षांतरे करवून लोक गोळा केले गेले. आणि शेवटी त्याच खेळीने १०५ चा आकडा गाठता आला.

महागाई नियंत्रणात असल्याने बहुतेक शहरी भाग भाजपकडेच राहिलाय. पुण्यासारख्या शहराची हस्त नक्षत्राच्या पावसात झालेली अवस्था ताजी असूनही लोकांनी राष्ट्रवादीला काही मत दिले नाही. पण शेतमालाच्या किमती सातत्याने गेली ३ ४ वर्षे कमी राहिल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. उत्तर पुणे, नाशिक, नगर या भागात २ ३ वर्षे इजिप्त वरून आयात केलेल्या कांद्यावरून फारच असंतोष होता. त्याचाही परिणाम दिसून आला. कोल्हापूर मध्ये जिथे पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला तिथे एकही निवडून आला नाही. त्याउलट सांगली शहरात भाजप कायम राहिली.

याउलट काँग्रेस काहीही न करता, मुख्य नेता विखे पाटील सोडून गेलेला असता परत निवडून येते म्हणजे लोकच त्यांना निवडून देत आहेत हे दिसतंय. कुठेतरी लोकांना काँग्रेस हवी आहे. बहुधा राहुल गांधी यावेळेस न आल्याने काँग्रेस चा फायदा झालेला असावा.

राज ठाकरे यांनी रोज १० ते ५ काम केले पाहिजे. उगाच रविवारी रात्री ८ ते ९ काम करून निवडून येणे अशक्य आहे. मुलाच्या आजारामुळे झालेल्या दुर्लक्षानंतर आता ते पूर्ण वेळ कामाला लागतील अशी अपेक्षा आहे. एक आमदार आहे हि त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्याला टिकवता आणि वाढवता आले पाहिजे.

मुळात महाराष्ट्र राज्य राजकीय दृष्ट्या जागरूक मतदार आणि कोकण, उत्तर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असे मोठे राज्य आहे. आणि यात १०५ आमदार आणणे अशक्यप्राय अवघड आहे. शरद पवार याना गेली वीस वर्षे जमलेले नाही. फडणवीस यांनी ते जमवून आणले आहे. यातून ते धडा घेऊन या टर्म मध्ये फालतू बडबड आणि माज कमी करून काहीतरी भरीव काम करतील हि अपेक्षा आहे. लोकांना चांगले शिक्षण, रस्ते, नोकरी, वगैरे हवे आहेत. आणि पुढील टर्म ला ३७०, राम मंदिर , सावरकर, पाकिस्तान असे काही करून मत मागायची वेळ यायला नको. ज्या लोकांनी सहा महिन्या पूर्वी त्यांना मत दिले त्यांनी सहा महिन्यात जाऊन दुसर्यांना मत दिले हा बदल होणे दुर्दैवी आहे. पुढील पाच वर्षे शिवसेनेचे खिशातले राजीनामे पाहण्यात जाऊ नये हीच देवाला प्रार्थना.

चिडकु
सहमत.
अजित पवार धरण मध्ये मुतायला निघाले होते.
काँग्रेस ,राष्ट्रवादी नी खूप वर्ष राज्यावर सत्ता गाजवली .
पण जेव्हा त्यांनी
माज दाखवायला survat केली तेव्हा जनतेनी त्यांना घरी बसवले.
Bjp सुद्धा धुंद झाली होती तिची धुंदी जनतेने उतरवली आहे आहे आता जबदरी नी काम करेल.
आणि अजित पवार ना धरणात तर नाहीच पण धरणाच्या आजूबाजूला सुद्धा मुतायला येणार नाही

स्ट्राईक रेटचा दावा हा फडण२० चा महान निर्लज्जपणा होता. कारण युती झाली म्हटल्यावर सेनेची मतं तुम्हाला मिळणं आणि तुमची मतं सेनेला मिळणं हे आलंच. मग कमी जागा लढल्याच्या दाव्याला काय अर्थ आहे? आणि भरत म्हणाले तसं तो रेशो सगळ्यांचाच वाढला असेल.
अजूनही आपलं काय चुकलं , कोअर मतदार का दूर गेले हे फडण२० ला कळलं नाहीये आणि समजून घ्यायची गरजही वाटत नाहीये. जे १०० सीट मिळाले तेही बहुतेक लोकांनी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींकडे बघून दिले. (किंवा जिथे उमेदवार चांगला होता तिथे त्याच्याकडे बघून दिले.)
एकच खंत आहे की अजून थोड्या जागा कमी आल्या असत्या तर सत्ताबदल होऊ शकला असता तो झाला नाही.
तसंच ईव्हीएमबद्दल एक्झिट पोलनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू होती ती आता थंड पडली आहे. २२० प्लस वगैरे तर भाजप समर्थक पण स्वीकारत नव्हते. म्हणजे ही एक मिडियाकडून फक्त चाचपणी होती का - की लोक २२० प्लस स्वीकारतील का?

भाजपच्या जल्लोषावर विरजण
हरयाणामध्ये ७५ जागा जिंकण्याच्या दर्पोक्ती करुन साधे बहुमतही मिळवू न शकल्याने भाजपचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांची निराशा झाली. पराभवाचा झटका बसल्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांना अमित शहा आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाचारण करण्यात आले. हरयाणाच्या निकालामुळे अमित शहा इतके निराश झाले, की त्यांनी गुरुवारी ग्रेटर नोएडातील लखनावली येथे होणाऱ्या आयटीबीपीच्या ५८ व्या रेंजिंग परेडचा कार्यक्रम रद्द करावा लागला. या कार्यक्रमात अमित शहा ३५ वीर जवान आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करणार होते. आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून अमित शहा यांनी हरियाणामध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत हालचाली केल्या.
महाराष्ट्रात युतीला दोनशेहून अधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा ठेवलेल्या भाजपला निदान साध्या बहुमतासह सत्तेत परतणे शक्य झाले; पण हरयाणाचे निराशा करणारे निकाल लागल्यामुळे भाजपच्या उत्सवी जल्लोषावर विरजण पडले. हरयाणातील गृहित धरलेला विजय साजरा करण्यासाठी दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयात जंगी तयारी करण्यात आली होती. हरयाणाच्या विजयाच्या जल्लोषासाठी भाजपने ७५ किलो लाडू आणि ७५ किलो फुलांची व्यवस्था केली होती. भाजपच्या कार्यालयात दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, हरियाणात बहुमतापाशीही पोहोचू न शकल्यामुळे पक्षाच्या मुख्यालयात सन्नाटा पसरला आणि विजयाच्या जल्लोषाचा बेत रद्द करण्यात आला. सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा भाजप मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथसिंह, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे भाजप नेत्यांनी स्वागत केले. केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर झालेल्या दोन विधानसभा निवडणुका जिंकून भाजप विजयी वाटचाल करीत असल्याची भावना अमित शहा यांनी या वेळी व्यक्त केली, हरियाणामध्ये तीन टक्के अधिक मते मिळवून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.

https://m.maharashtratimes.com/india-news/haryana-bjp-hit/articleshow/71...

एकाच पक्षाचे बहु मतातील केंद्रात किंवा राज्यात सरकार असणे
हे केंद्र आणि राज्य दोघांना धोकादायक हे जनतेला अनुभवांनी माहीत आहे .
इंदिराजी चे एकहाती सरकार आणि मोदींचे एकहाती सरकार ह्या दोन्ही सरकारनी दाखवून दिले आहे
त्या मुळे जनता लगेच चूक सुधारते

Evm वर सतत टीका केल्या मुले ह्या वेळी तो फॉर्म्युला वापरायची पध्टत बदली असे राष्ट्रवादी ्चा नेता बोलला होता

Ed नी bjp किंवा सेनेच्या नेत्या वर धाड मारली नाही पण विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मारली .
हे सूचक आहे सरकारी यंत्रणेचा वापर विरोधकांना भीती दाखवण्यासाठी केला जातोय आणि हे लोकशाही च्या आरोग्याला घातक आहे.

हे मस्त आहे.
http://results.eci.gov.in/ACOCT2019/ConstituencywiseS13234.htm?ac=234
लातूर ग्रामीण -
धीरज देशमुख १ ,३४,६१५ मतं मिळवून विजयी.
दुसरा क्रमांक नोटा २७,४४९ मतं.

बोरिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे. २०१४ आणि आताही बाहेरचा उमेदवार देऊन प्रचंड मताधिक्य. यंदा विनोद तावडेंचं तिकीट कापलेलं. मनोज राणे हे नाव कधी ऐकलं नव्हतं. इथेही नोटाला १००००+ मतं आहेत.

Pages