विधानसभा २०१९ - सामान्य माणसाने मतदान कोणाला करायचे हा प्रश्नच आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2019 - 15:28

मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणात म्हणतात कॉग्रेस राष्ट्रवादी ने 15 वर्षात महाराष्ट्र लुटला ,मागे वळुन पाहतात तर काय..
स्टेजवर तेच सर्व बसलेले आहेत Happy

व्हॉट्सपवर जेव्हा हा विनोद वाचला तेव्हा हसायला आलेले खरे..
पण आता निवडणूक तोंडावर आली असताना कोणाला मत द्यायचे हा विचार करत असता हा जोकच माझ्यावर हसतोय असे वाटतेय.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी कोणाला मत द्यायचे जेणेकरून देशाचे कमीतकमी नुकसान होईल हे न समज्ल्याने मी अखेर मतदानच केले नव्हते.

पण नंतर वाटले नाही यार, चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, पण आपल्यासारख्या कुठलाही राजकीय झेंडा हाती न घेतलेल्यांनी मतदान करायलाच हवे. त्यातल्या त्यात चांगला पर्याय निवडायलाच हवा.

जेवढे माझ्या राजकीय बालबुद्धीला समजते त्यानुसार ज्या राष्ट्रवादीला भाजपाकडून भ्रष्टवादी म्हटले जायचे त्यांच्याच दिग्गज भ्रष्ट नेत्यांना यांनी आपल्यात सामील केले. मागच्यावेळीही राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार होती. पण भाजपाने तो घेतला नाही कारण आधी त्यांच्याच भ्रष्टाचाराविरोधात हे लढले होते. त्यामुळे यंदा त्यांना आधीच आत घेऊन पावन केले.

भाजपाचे माझे कट्टर भक्त मित्र याबाबत अवाक्षरही बोलायला तयार नसले तरी काठावरच्या समर्थकांमध्ये असंतोष आणि फसवले गेल्याची भावना दिसतेय.

त्याला मलमपट्टी करायला आणि यात भाजपची गंडलेली ईमेज सुधाराय्ला बहुधा मध्यंतरी पवारसाहेबांच्या मागे ईडी लावल्याची हूल उठवण्यात आलेली. जेणेकरून लोकांना वाटेल अग्ग बाई खरेच की, हे अजून भ्रष्टाचाराविरुद्धच लढत आहेत.

मी एक सामान्य नागरीक आहे. मला ते आतले राजकारण कळत नाही. म्हणून धागाही राजकारण विभागात काढला नाही. पण याचा अर्थ मी आंधळा आणि मुर्खही नाही. जे समोर चालले आहे ते बघू शकतो आणि स्वता:चे चूक वा बरोबर जे काही असेल ते मत बनवू शकतो.

आणि आता खरेच वीट आला आहे या सर्वच दलबदलू आणि फेकू लोकांचा. आघाडीला हटवून युती आणली आता युतीला हटवून पुन्हा आघाडी अशीच संगीत खुर्ची खेळण्यात रस नाही. कारण यापौकी कोणीच त्या पात्रतेचे वाटत नाही.

मग काय करावे? काय पर्याय समोर आहेत? थोडासा उलटसुलट विचार माझ्या लेवलला करतो.

१) भाजपा येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण त्यांचे पारडे जड झाले तर महागात पडतील. मग युतीतील प्रादेशिक पक्ष शिवसेनेला मत द्यावे का? जेणे करून त्यांच्यावर थोडा अंकुश राहील... खरेच राहील?

२) राजसाहेब म्हणत आहेत मला विरोधी पक्षनेता करा. करावे का? विरोधात कोणीतरी खळ्ळखट्याक हवाच.... पण ते ही भुमिका योग्य बजावतील का? की सेटलमेंट किंग म्हणून नावारुपास येतील?

३) एखाद्या नवीन पक्षाला मत द्यावे का? एखादा नवीन पर्याय शोधावा का? एका मित्राने वंचित हा पर्याय सुचवला, तर एकाने एमआयएम. पण असे मत तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्यास फुकट जाण्याचीही शक्यता वाढते. तरी मनाच्या समाधानासाठी द्यावे का?

४) की मग नोटा झिंदाबाद!?

शक्य झाल्यास तटस्थ लोकांनीच आपली तटस्थ मते मांडा आणि तटस्थ स्ल्ले द्या. राजकीय धुळवडीला ईतर धागे आहेतच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आमदार नी पहिली प्राथमिकता ही स्वतःच्या मतदार संघातील प्रश्न सोडवणे ह्याला च दिली पाहिजे .
काही वर्षा पूर्वी एक सर्व्हे केला होता .
त्यात असे दिसून आले आहे की .
लोक प्रतिनिधी ना आपल्या मतदार संघात काय काम केले पाहिजे हेच माहित नाही .
कोणाचे ही वयक्तिक काम न करता सार्वजनिक फायद्याची काम झाली पाहिजेत.

Submitted by स्वप्ना_राज on 15 October, 2019 - 13:26

स्वप्ना राज उत्तम पोस्ट.
बरेच वा सर्वच मुद्द्यांशी सहमत.

पक्ष न बघता फक्त उमेदवार बघा यात खरेच सर्व उमेदवारांशी वैयक्तिक ओळख नसेल तर खरे खोटे डावे उजवे करणे सोपे नाही. निव्वळ शिक्षण हा निकष असू शकत नाही. नियत जास्त महत्वाची आहे.

नोटा वापरावे की नाही हे नोटाचे नियम काय आहेत यावरही अवलंबून. दखलच घेतली जाणार नसेल तर नोटा आणि सुट्टी टाकून फिरायला जाणे यात फरक नाही. त्यापेक्षा मग वाईटातले चांगले निवडा.

जो निवडून येईल त्याच्याकडून काम करवून घेण्याचे तत्व ठेवायचे. >>>> हे अगदीच मान्य. मग तो आपण मत दिलेला उमेदवार निवडून येवो किंवा दुसरा कुणी येवो. काम करवून घेण्याची ताकद मतदारात यायला हवी.

^^^^^
^^^^^

म्हणजे कसे?
छडी घेऊन बसायचे का त्यांच्यामागे?
कसेशक्यआहे?
आपल्याकडे हा एकच चान्स असतो.
मतदानाचा

अंजू, डोंबिवली मधुन कोण आहे? शाळेच्या ग्रूपवरही (जो ठार मोदी/ भाजपाप्रेमी आहे) हल्ली डोंबिवली बद्दल पोस्ट असल्या की भाजपा नको असा सूर असतो असं जाणवलंय.

डोंबिवलीत तेच परत रवींद्र चव्हाण, मनसेतर्फे मंदार हळबे. कॉंग्रेसतर्फे गुप्ते म्हणून स्त्री उमेदवार आहेत.

तुम्ही लिहिलं तो सूर जाणवतोय हे खरं आहे. त्यामुळे इथेही दुसऱ्यांना चान्स आहे. आमच्याकडे सेना आणि उमेदवार बदल आहे.

आमच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात कायम शिवसेना मनसे सामना जास्त होतो. कधी हे कधी ते येतात, कोणीही आलं तरी आनंदी आनंद. त्यामुळे नोटाचा विचार पण येतोय मनात. पण आमच्याकडे भाजप नसते कारण डोंबिवलीत त्यांची सीट असते. मागे दोघे वेगळे लढले तेव्हा आत्ता जे सेनेचे उभे आहेत त्याना bjp ने आपल्यात घेऊन तिकीट दिलेलं पण नंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतलेली, त्यामुळे सेना आलेली, त्याचं फळ म्हणून यावेळी उमेदवारी दिली बहुतेक सेनेसे त्यांना, त्याआधी मनसे आलेली निवडून.

एरियातली लोकल लेवलवरची बरीच कामे मात्र झाली आहेत पण ते आमदार अखत्यारीत येत नाही खरंतर.

आत्तातरी चित्र असं दिसतंय की दोन्ही ठिकाणी मनसेला चान्स आहे पण कल्याण ग्रामीणमध्ये जास्त शक्यता.

डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मध्ये जे आमदार आहेत त्यांना विरोध होताच पण कल्याण ग्रामीणमधल्या उमेदवारात बदल झाला, डोंबिवलीत नाही.

तुमच्या मतदारसंघात सर्वात सुशिक्षित वा सर्वात प्रामाणिक (किंवा हे दोन्ही निकष एकत्रित) असलेल्या उमेदवाराला ही मत देऊ शकता. >> हे बेश्ट + त्याने आधी काय चांगली कामे केलीत हे पण. शुभेच्छा, तुम्हाला चांगला नेता मिळो.

यावेळेस भाजप प्रचार करताना दिसतेय, मुलांनी येऊन माझ्या घराच्या आजूबाजूला छोटी पत्रके लावली, फोन नंबरवर मिस कॉल द्या म्हणजे फडणवीस बोलतील तुमच्याशी सांगितले. आता फडणवीस किती जणांशी बोलणार, त्यांनी रेकॉर्डएड मेसेज ऐकवला, इथल्या आमदाराने काय कामे केलीत त्याचे पुस्तक पाठवले (हे पहिल्यांदा बघितले, पुस्तक चांगले 5 -6 पानांचे पण इंग्रजीत आहे. मला मिळाले पण माझी बाई जिथे राहते तिथे वाटले नाही, तिथे तसेही यांचे इंग्रजी कोणाला कळणार), लाऊडस्पीकरवरून संदेश देणे सुरू आहे. आमच्या भागात इतर कोणाचा प्रचार बघितला नाही अजून. लोकसभेच्या वेळेस काहीच गडबड नव्हती त्यामुळे आताची गडबड लक्षात येतेय. तेव्हा सेनेचा उमेदवार होता आमच्या मतदारसंघात.

म्हणजे कसे?
छडी घेऊन बसायचे का त्यांच्यामागे?

त्यांची घरे आपल्याच भागात असतात, तिथे जायचे. आमच्या आमदाराचे घर भर रस्त्याला लागूनच आहे, त्याचा कसकसा विकास झाला ते बघितलेय गेल्या 20 वर्षात Happy Happy
आमच्या इथे लोक जाऊन बसतात खाली. तिला भेटावे लागते मग आलेल्यांना. आपण दुर्लक्ष केले तर जे पाठपुरावा करतात त्यांची कामे होतात, आपली राहतात.

सेना कमी पडली, अट ठेवलीच नाही यावेळी राणे नको अशी किंवा भाजपने वाटाण्याच्या अक्षता लावल्या.>>>
सेनेच्या नेतृत्वाने स्वतःची ताकद कमी करून घेतली, त्यामुळे भाजप देईल त्या सीट्स घ्याव्या लागल्या, स्वतःच्या अटी घालता आल्या नाहीत. भाजपने जो सीट आणेल त्याला उघडे दार ही नीती ठेवली आणि 'स्वाभिमान' विसरून लोक घुसताहेत आत.

यावेळेस मनसे व वंचित सीट्स घेणार अशी हवा आहे. ते स्वतःच स्वतःला आम्ही दमदार विरोधी पक्ष म्हणून येणार म्हणताहेत. मनसेने परत आशा लावलीय लोकांना. बघू काय होते ते. मला मनसे परत आलेली बघायला आवडेल. वंचितबद्दल चांगले मत नाही, म्हणजे आंबेडकरांबद्दल. त्यांचे विचार बाबासाहेबांसारखे नसून कम्युनिस्ट जास्त वाटतात.
मात्र ओवेसीच्या पक्षाला एकही जागा नको असे वाटते. ती युती मोडली ते बरे झाले. ओवेसीचे '15 मिनिटे पोलीस बाजूला करा, मग आम्ही बघा काय करतो हिंदूंचे' वगैरे ऐकून उतरलाच तो माणूस मनातून. आता त्याचे मतांसाठी मतपरिवर्तन झाले असेलही. सगळ्यांचेच होते म्हणा.

रोजच्या उखाळ्यापाखळ्या वाचून कॉलेजातील लुटूपुटूची निवडणूक आठवतेय, यांच्याकडे एकमेकांना टोमणे मारण्यवाचून मुद्देच नाहीयेत का?

सेनेच्या नेतृत्वाने स्वतःची ताकद कमी करून घेतली, त्यामुळे भाजप देईल त्या सीट्स घ्याव्या लागल्या, स्वतःच्या अटी घालता आल्या नाहीत. भाजपने जो सीट आणेल त्याला उघडे दार ही नीती ठेवली आणि 'स्वाभिमान' विसरून लोक घुसताहेत आत. >>> अगदी अगदी आणि घेतायेत तेही ह्याला त्याला.

प्रादेशिक पक्षांची ताकद अजून कमी व्हावी भविष्यात असा हेतू असावा, त्यासाठी ही खेळी असेल. पण पटत नाहीये अजिबात. त्यातल्या त्यात फक्त गडकरीना पटत नसावं हे इतर पक्षातून आयात करणे. मधूनमधून त्यांच्या मुलाखतीतून दिसतं.

खरे तर हा विषय दर काही वर्षांनी ऐरणीवर येतो (च) आणि मग पुन्हा सर्व जैसे थे.. असो त्या निमित्ताने दर वेळी आपल्या समजूती, विचार, व कृती हे पुन्हा पुन्हा तपासून पहायची संधी मिळते हे काय ते खरे.
तर पुन्हा एकदा: निव्वळ तत्वे, आदर्श ई. वर चालणारा कुठलाच पक्ष वा सरकार या जगात अस्तित्वात नाही.. आयाराम गयाराम सत्तेची समीकरणे हे सगळ्याच प्रगत, अप्रगत, गंजलेल्या देशांमधून सुरू आहे. त्यामूळे त्याचा काही एव्हडा बाऊ करायची गरज नसते. किंबहुना जे जे ऊमेदवार निवसून येण्याची शक्यता आहे त्यांना पक्षात घेऊन त्यामार्गे एकहाती सत्ता आल्यास अनेक महत्वाचे व धोरणी निर्णय घेणे व राबवणे सोपे ठरते हा ही त्यातला एक स्ट्रॅटेजिक भाग असल्याने, सत्ता हाती असेल तर पुढे सर्व शक्य आहे या न्यायाने भाजपा वा सेने ने स्वताची दारे सर्वांना खुली केली असल्यास त्यात काही गैर नाही. आता अनैतीक, दुटप्पी, वगैरे असले निकष असतील तर हे गेले अनेक दशके सुरू आहे.
राहिला प्रश्ण ऊमेदवार योग्यतेचा वगैरे. तर खेदाने असेनमूद करावेसे वाटते की आपल्या पिढीचा (म्हणजे ७०-८० जन्म धरुयात) त्यातही कष्ट्करी, हुशार अशा मध्यमवर्गीय मुला मुलींचा करीयर चॉइस पूर्णपणे चुकला असे म्हणावे लागेल. अर्थ, मान, यश, समाधान वगैरे साठी राजकारणा सारखा ऊत्तम करियर पर्याय नाही. पण आपाण ठरलो बुध्धी व संस्कार जिवी वर्ग! 'त्या' वाटेला जायचे नाही या आपल्याच पालाक व ईतर सुजाण समाज वर्गाने घालून दिलेल्या बंधनरेषेत राहून आपण निव्वळ आपला वैयक्तीक विकास करून घेतला... आता जेव्हा मात्र समाज, नागरीहक्क, सुव्यवस्था, असे सिस्टींम संबंधीत प्रश्ण व न सुटलेली कोडी ऊभी राहिली तेव्हा मात्र आपल्यातला राजकीय विचारवंत अचानक जागृत होतो आणि 'त्या' सर्वांच्या नावाने बोंबा मारत सुटतो. मग कुठेतरी अनेक वर्षे मनात दाटलेले या बाबतीतले नैराश्य, ऊदासीनता, हतबलता या सर्वाची एकत्रीत परिणीती म्हणजे 'नोटा' किवा 'मतदान न करणे' असे आपल्याच मनाला सुखावणारे, आपल्या मनातील अपराधी भावनेला पुरक असे ऊपाय आपल्याला योग्य वाटू लागतात.
आधीच अशा गोंधळलेल्या वर्गाला मग निव्वळ त्या त्या काळापुरते कुठल्यातरी मुद्द्याच्या अनुशंगाने गोंजारू पाहणार्‍या किंवा आपल्याला जे आधीच माहित आहे व योग्य वाटते तेच निव्वळ ओरडून सांगणार्‍या प्रतिनिधी वा पक्षाला आपण मत देऊन त्या काळापुरते आपला दुखावलेला अहंकार व नाकर्तेपणाची बोच याला आपण क्रुतकृत्य करून घेतो. पुन्हा ४ वर्षांनी ये रे माझ्या मागल्या.
निव्वळ चेहरे बदलतात, नावे बदलतात, चिन्हे बदलतात, पण मूळ प्रश्ण आप्ल्या जागी कायमच असतो.

ऊपाय तेच नेहेमीचे:
१. संपूर्ण दुर्लक्ष करणे.
२. प्रत्त्येक मिळेल त्या फोरम वर आपली खंत, हतबलता, चीड, ई. सर्व व्यक्त करत फिरणे.
३. आपल्या पुरते जे काही फायद्याचे आहे त्याचा स्विकार करणे.
४. आजचे मरण ऊद्यावर..

५. करोडोतील फक्त काही हजार मात्र एक पर्याय निवडतातः निवडणुकीला ऊभे राहणे. अर्थातच हे सर्व लोक त्या साठी साम, दाम, दंड, भेद सर्वाचा वापर करतात. बिघडले कुठे? त्यांचे ध्येय त्यांनी निवडले आहे.. आणि कधी ना कधी ते यशस्वी होणारच या वा त्या मार्गाने. आपल्याला ते पटत नसेल तर त्यावर एकच ऊपाय आहे, आपण स्वतः कळपात शिरणे, निवडणुकीला ऊभे राहणे. जमणार आहे का? माझा एक मित्र होता सोलापूर चा. त्याचा शाळेतला 'ढ' मित्र पण आर्थिक सुस्थितीत असलेला याने तर ऊघड ऑफर दिलेली. काहि विशेष नाही एक दोन चार करोड गुंतवा, एकदा कॉर्पोरेटर, वा पदावर निवडून आलात की एकाचे दोन या भावाने रीटर्न गॅरेंटेड आहेत. आता त्यातही तत्वे, आदर्श, जनसेवा ई. सर्व थोड्या फार प्रमाणात पाळून हे असे रीटर्न्स देखिल मिळत असतील तर सौदा बुरा नही है!
तेव्हा निव्वळ घृणा करण्यापेक्षा, ठोस कृती केली तर बदल घडण्याची शक्यता अधिक आहे.
समोरून बैल तोही टोकेरी शींगांचा अंगावर धावून येत असेल तर आपल्यालाही बैल शिंगासकट व्हावेच लागेल. आता " बैल फॉर अ बैल मेक्स द होल वर्ल्ड बैल " Happy असली बैल विधाने वा दाखले कुणी देणार असेल तर त्यांना एव्हडेच ऊत्तर आहे: वी जस्ट वाँट अ वर्ल्ड ऑफ बेटर बैल्स! Happy
तटी: आपण नोकरीत असतो त्यामूळे आपण स्वतः (थेट) कुठल्याच हीन राजकारणाचा वा भ्रष्टाचाराचा भाग नाही अशी कुणाची भाबडी समजूत असेल तर देव तुमचे भले करो!

संपूर्ण दुर्लक्ष करणे हा उपाय काही वर्षांपूर्वीपर्यंत ठीक होता. (आजची परिस्थिती याच उपायांमुळे उद्भवलेली आहे). पण आता देश व जग दोन्ही पूर्णपणे बदललेले आहे. त्यामुळे आता सगळ्यांनीच डोळे उघडे ठेवून वावरायला हवे.

तू सामान्य माणूस आहेस तर मी तुला सांगेन?
पण तू असामान्य आहेस गरीबांचा शारूख. आनंदी रहा.
सामान्य माणसे कोणाला मत द्यायचे ते तू धागा विणल्यामूळे बदलणार नाहीत.
सामान्य माणसे म्हणजे काय ते तूझ्यासारख्या बोलघेवड्याला कसे कळणार.
जा प्रचाराला जा, म्हणजेच कामाला.

जिंदादिल मी सामान्य राजकीय बुद्धीचा असामान्य माणूस आहे
असो
सोम्वारची आख्खी सुट्टी आहे, मत तर द्यायचेच आहे. मनसे कडे झुकतेय. थोडा अंदाज घेतला. लोकांमध्येही हाच् प्रवाह आहे. राजसाहेब विरोधी प्क्षनेते.

राज ठाकरे उभे नाहीयेत ना निवडणुकीत, मग ते विरोधी पक्षनेते कसे होतील. मनसे विरोधी पक्ष म्हणून आला तरी, टेक्निकली निवडून आलेल्यां मनसे आमदारांपैकी कोणीतरी होईल ना विरोधी पक्षनेता विधानसभेत.

निवडणूक लोकशाही ची गरज आहे म्हणून होतेय.
लोक अशी पण निवडणुकीला जास्त गंभीर पने घेत नाहीत .
पक्ष बदलून स्थिती कधीच बदलत नाही असा अनुभव आहे लोकांना .
त्या मुळे कमीत कमी
आपण ज्यांना मत देणार आहे ती व्यक्ती चांगली आहे का हेच बघावे

राज ठाकरे उभे नाहीयेत ना निवडणुकीत, मग ते विरोधी पक्षनेते कसे होतील.
>>>>

ठाकरे आहेत ते
रिमोट कंट्रोल आपल्याच हातात ठेवतात Happy

मी माननीय श्री नरेंद्रजी मोदीजी यांना मतदान करणार आहे. ते डोंबिवली मतदार संघातून उभे आहेत.

>>तोरसेकर वाणी , मनसे विरोधी पक्ष होईल
अर्थातच! त्यात काय विशेष? कारण बाकी ईतर सर्वच सत्तेच्या मांडेवर बसायला निघालेत. Proud
रच्याकने: सर्व सत्तेत व जेम्तेम ५ आमदार विरोधी पक्षात, असे काहीसे बघायला मिळणार का? Happy

तुमच्या मतदारसंघात सर्वात सुशिक्षित वा सर्वात प्रामाणिक
>>
आडखळलो न इथ. नेते लोक्स प्रामाणिक कसकाय रस्त्यात? आमचे केजरीवाल काका आहेत प्रामाणिक, पण ते लढवताताहेत का?

मत तर द्यायचेच आहे. मनसे कडे झुकतेय. थोडा अंदाज घेतला. लोकांमध्येही हाच् प्रवाह आहे. राजसाहेब विरोधी प्क्षनेते.>>>
आता कसं लिहीलंस. तस स्पष्ट लिहीत जा.. हा धागा माझी राजकीय मते ऊधृत करण्यासाठीच काढलेला आहे.
बाकी मत तु कोणाला दे तो तुझा व्यक्तीगत प्रश्न.

पक्षांतर का करू नये हा एक प्रश्नच आहे. एक तर कुठचेही पक्ष स्वतःच त्यांच्या विचारधारेशी कायमस्वरूपी प्रामाणिक नसतात. त्यांनी भुमिका बदलली की उमेदवारांपासून कार्यकर्ते ते थेट सतरंजीहोल्डर्सचं कानकोंडं होतं. आता आपलं आणि आपल्या चेल्यांचं हे असं फदफदं होणं ज्यांना पटत नाही त्यांनी थेट राजकारणच सोडायला पाहिजे. मात्र राजकारण हाच ज्यांचा धंदा आहे त्यांनी राजकारण नाही केलं तर दुसरं काय करायचं?

पवारच अनेकदा बोलले आहेत (आता सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात तेच सिनियर आहेत)- सत्ता असल्याशिवाय लोकांची कामं करता येत नाहीत. आता तत्त्वं आणि विवेक वगैरेची गाथा, आणि लोकांची कामं करता येणं (आणि त्या बदल्यात मिळणारी बहुआयामी रिटर्न्स) यातलं काय निवडणार उमेदवार लोक?

तुमचा प्रश्न भयंकर पद्ध्ततीने आणि नाईलाजाने व्हॅलिड आहे आणि त्याला उत्तर नाही. तुम्ही राहत असलेल्या समाजाची वागणुक आणि थॉटप्रोसेस दोघांना स्वीकारावी लागणार आहे- तुम्ही आणि तुमचा उमेदवार.

देशात आता पर्यंत किती तरी निवडणूक झाल्या .
किती तरी पक्ष सत्तेवर आले नी गेले .
पण राज्यकारभार कधीच बदलत नाही.
प्रशासन कधीच बदलत नाही , तीच अडवणूक,
तोच भ्रष्ट कारभार आज सुधा चालला आहे .
कोणता ही पक्ष सत्तेत आला तरी हे कधीच बदलत नाही .
प्रशासन चा दर्जा उलटा खालावत चालला आहे .
आपण उगाचच भांडत बसतो .
सर्व पक्ष एकाच माळेचे मणी आहेत .
आता राजकारभार करणारे नेते बदलायची वेळ आली आहे .
तीच तीच लोक आणि पक्ष ह्यांना निवडून देण्यापेक्षा .
त्यातल्या त्यात चांगल्या सामान्य व्यक्तीला निवडून दिले पाहिजे

लोक प्रतिनिधी हा प्रकारचं बंद झाला पाहिजे,

आय ए एस केडर हेच सर्वोछ ठेवावे व सरकारी नोकर देश चालवतील

नाहीतरी मंत्रयांचे पी ए हेच असतात

काँग्रेस राज्यात सुधा पोलिस भ्रष्ट होते बीजेपी राज्यात सुद्धा त्यात बदल नाही
.
काँग्रेस राज्यात शेतमालाला भाव मिळत नव्हता bjp chya राज्यात सुद्धा मिळत नाही .
काँग्रेस chya राज्यात
साधं ७/१२ उतारा देण्यासाठी सुद्धा तलाठी अडवणूक करत होते bjp च्या राज्यात सुद्धा करतात.
काँग्रेस राज्यात सामान्य लोकांना न्याय मिळत नव्हता bjp राज्यात सुद्धा मिळत नाही .
काँग्रेस च्या राज्यात कंत्राटी कामगारांचे शोषण होत होते bjp च्या राज्यात सुद्धा होत आहे.
काँग्रेस च्या राज्यात रस्ते खराब होते bjp च्या राज्यात सुद्धा रस्ते खराब च आहेत
काँग्रेस च्या राज्यात सरकारी काम देताना टक्केवारी घेतली जायची bjp च्या राज्यात सुद्धा तीच परंपरा पुढे चालू आहे .
सरकार बदलून कोणताच बदल झाला नाही हाच आता पर्यंतचा अनुभव आहे

Pages