विधानसभा २०१९ - सामान्य माणसाने मतदान कोणाला करायचे हा प्रश्नच आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2019 - 15:28

मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणात म्हणतात कॉग्रेस राष्ट्रवादी ने 15 वर्षात महाराष्ट्र लुटला ,मागे वळुन पाहतात तर काय..
स्टेजवर तेच सर्व बसलेले आहेत Happy

व्हॉट्सपवर जेव्हा हा विनोद वाचला तेव्हा हसायला आलेले खरे..
पण आता निवडणूक तोंडावर आली असताना कोणाला मत द्यायचे हा विचार करत असता हा जोकच माझ्यावर हसतोय असे वाटतेय.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी कोणाला मत द्यायचे जेणेकरून देशाचे कमीतकमी नुकसान होईल हे न समज्ल्याने मी अखेर मतदानच केले नव्हते.

पण नंतर वाटले नाही यार, चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, पण आपल्यासारख्या कुठलाही राजकीय झेंडा हाती न घेतलेल्यांनी मतदान करायलाच हवे. त्यातल्या त्यात चांगला पर्याय निवडायलाच हवा.

जेवढे माझ्या राजकीय बालबुद्धीला समजते त्यानुसार ज्या राष्ट्रवादीला भाजपाकडून भ्रष्टवादी म्हटले जायचे त्यांच्याच दिग्गज भ्रष्ट नेत्यांना यांनी आपल्यात सामील केले. मागच्यावेळीही राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार होती. पण भाजपाने तो घेतला नाही कारण आधी त्यांच्याच भ्रष्टाचाराविरोधात हे लढले होते. त्यामुळे यंदा त्यांना आधीच आत घेऊन पावन केले.

भाजपाचे माझे कट्टर भक्त मित्र याबाबत अवाक्षरही बोलायला तयार नसले तरी काठावरच्या समर्थकांमध्ये असंतोष आणि फसवले गेल्याची भावना दिसतेय.

त्याला मलमपट्टी करायला आणि यात भाजपची गंडलेली ईमेज सुधाराय्ला बहुधा मध्यंतरी पवारसाहेबांच्या मागे ईडी लावल्याची हूल उठवण्यात आलेली. जेणेकरून लोकांना वाटेल अग्ग बाई खरेच की, हे अजून भ्रष्टाचाराविरुद्धच लढत आहेत.

मी एक सामान्य नागरीक आहे. मला ते आतले राजकारण कळत नाही. म्हणून धागाही राजकारण विभागात काढला नाही. पण याचा अर्थ मी आंधळा आणि मुर्खही नाही. जे समोर चालले आहे ते बघू शकतो आणि स्वता:चे चूक वा बरोबर जे काही असेल ते मत बनवू शकतो.

आणि आता खरेच वीट आला आहे या सर्वच दलबदलू आणि फेकू लोकांचा. आघाडीला हटवून युती आणली आता युतीला हटवून पुन्हा आघाडी अशीच संगीत खुर्ची खेळण्यात रस नाही. कारण यापौकी कोणीच त्या पात्रतेचे वाटत नाही.

मग काय करावे? काय पर्याय समोर आहेत? थोडासा उलटसुलट विचार माझ्या लेवलला करतो.

१) भाजपा येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण त्यांचे पारडे जड झाले तर महागात पडतील. मग युतीतील प्रादेशिक पक्ष शिवसेनेला मत द्यावे का? जेणे करून त्यांच्यावर थोडा अंकुश राहील... खरेच राहील?

२) राजसाहेब म्हणत आहेत मला विरोधी पक्षनेता करा. करावे का? विरोधात कोणीतरी खळ्ळखट्याक हवाच.... पण ते ही भुमिका योग्य बजावतील का? की सेटलमेंट किंग म्हणून नावारुपास येतील?

३) एखाद्या नवीन पक्षाला मत द्यावे का? एखादा नवीन पर्याय शोधावा का? एका मित्राने वंचित हा पर्याय सुचवला, तर एकाने एमआयएम. पण असे मत तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्यास फुकट जाण्याचीही शक्यता वाढते. तरी मनाच्या समाधानासाठी द्यावे का?

४) की मग नोटा झिंदाबाद!?

शक्य झाल्यास तटस्थ लोकांनीच आपली तटस्थ मते मांडा आणि तटस्थ स्ल्ले द्या. राजकीय धुळवडीला ईतर धागे आहेतच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नेते पक्ष बदलून बदलून खुर्ची पकडत आहेत. सामान्य माणसांनी फार विचार न करता जो निवडून येईल त्याच्याकडून काम करवून घेण्याचे तत्व ठेवायचे.

खरं तर सामान्य लोकांनी मत देताना जास्त खोलात जाण्याची गरज नाही .
मतदार नी राष्ट्रीय प्रश्न,अंतर राष्ट्रीय प्रश्न,काश्मीर,पाकिस्तान,मंदिर,धर्म धोक्यात,जात धोक्यात,असल्या प्रश्नांच्या गर्दी मधून पाहिले बाहेर पडावे .
मतदार ज्या विषयात काहीच समजत नाही त्याच pointvar मतदान करतो .
फक्त आपला प्रतिनिधी मतदार संघातील प्रश्न सोडवत आहे की नाही.
तो गुन्ह्येगरी प्रवृत्तीचा नाही ना .
आपल्या मतदातीला किती वेळा धावून येतो ह्याच प्रश्नावर मतदान करावे .
पक्ष बघून मतदान बिलकुल करू नये .
चांगला व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक मतदार संघातून निवडून गेला तर सभगृह मध्ये योग्य लोकांना जागा मिळेल .
आणि उत्तम सरकार आणि विरोधी पक्ष राज्याला मिळेल

विरोधी पक्षनेता होण्याइतपत जागा मनसे लढवत आहे का?
महाराष्ट्रतील प्रादेशीक पक्ष हे इतर राज्यांतील प्रादेशीक पक्षांपेक्षा अपरिपक्व वाटतात, व्यापक दृष्टीकोन असणारे नेतृत्व दिसत नाही हेमावैम.

मी महाराष्ट्रात असतो तर नोटा दाबला असता.

<भाजपा येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण त्यांचे पारडे जड झाले तर महागात पडतील. मग युतीतील प्रादेशिक पक्ष शिवसेनेला मत द्यावे का? जेणे करून त्यांच्यावर थोडा अंकुश राहील... खरेच राहील?>

भाजप आणि सेना , दोघांचे उमेदवार तुमच्या मतदारसंघात उभे आहेत का? की आपल्याला हवे तिथे जाऊन मत द्यायची काही स्पेशल सोय आहे?

भरत, वर मी चार पर्याय, चार वैयक्तिक विचार माण्डले आहेत. समजा मी क्रमांक १ ला प्राधान्य देत ठरवतो की भाजपला पाशवी बहुमत नको तर सेनेला मत देऊया. पण आमच्याईथे सेनेचा नसून भाजपाचा उमेदवार असेल तर तो पर्याय बाद. मग मी उर्वरीत तीन पर्यायांपैकी कुठलातरी निवडेल.
सध्या मुंबई ठाणे आणि जवळपासच्या बरेच मराठी लोकांमध्ये असे दिसून येतेय की सेनेचा उमेदवार असेल तर त्याला मत द्या किंवा मग मनसेला द्या.

विषय तेव्हढा ज्वलंत नसल्याने हा धागा राफेल व लिंबुच्या धाग्याएव्हढा जोर कदाचित पकडणार नाही.
>>>

जर खरेच लोकांना लिंबाच्या चर्चेत जास्त रस असेल पण यंदा मत कोणाला द्यावे हा क्षुल्लक विषय वाटत असेल तर याला दुर्दैव्य बोलू शकतो. बट आई डोण्ट थिण्क सो असे असेल !

मानवमामा
जर राज ठाकरे स्वत: विरोधी पक्ष बनायचे टारगेट ठेवत आहेत तर किमान सीट लढवतीलच ना.

यंदा मत कोणाला द्यावे हा क्षुल्लक विषय वाटत असेल तर याला दुर्दैव्य बोलू शकतो. बट आई डोण्ट थिण्क सो असे असेल !

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 15 October, 2019 - 09:27. >>>

नक्कीच क्षुल्लक नाही. पण कुणाला मत द्यावे हे प्रत्येकजण मनात ठरवत असतो, जाहीरपणे कुणाला मत देणार वा द्यावे हे सांगत नसतो (राजकीय प्रचारक हा अपवाद वगळता).

बरं, एक पाचवा पर्याय सुचवतो. तुमच्या मतदारसंघात सर्वात सुशिक्षित वा सर्वात प्रामाणिक (किंवा हे दोन्ही निकष एकत्रित) असलेल्या उमेदवाराला ही मत देऊ शकता.

गट /पक्ष बदललेले लोकं तुमच्या मतदारसंघातून उभे नसतील तर काळजीचे कारण नाही. तुमच्या मतदारसंघात काम कोण करतात पक्ष का माणूस? आमच्या मतदारसंघात नेहमी तोच माणूस निवडून येतो, राज्य सरकार कोणाचेही असले तरी. राज्यसरकार त्याच्या पक्षाचे असले तर काम होतात आणि नसेल तर होत नाहीत. मला स्वतःला नोटा पर्याय वापरणे पटत नाही, हा अधिकार मिळावा म्हणून खूप संघर्ष करावा लागलाय. प्राप्त परिस्थितीत जे चांगले वाटते ते निवडावं नाहीतर आपल्या loyalties नुसार निवडावे.

चान्गला धागा आहे. फक्त बाकी धाग्यांप्रमाणे वाट लागू नये ही सदिच्छा. माझे मत पुढिलप्रमाणे:

1. आपल्याला कोणत्या पक्षाला मत द्यायचंच नाहिये हे आधी पक्कं ठरवाव्ं म्हणजे ते पर्याय अपोआप बाद होतिल.

2. मतदार नी राष्ट्रीय प्रश्न,अंतर राष्ट्रीय प्रश्न,काश्मीर,पाकिस्तान,मंदिर,धर्म धोक्यात,जात धोक्यात,असल्या प्रश्नांच्या गर्दी मधून पाहिले बाहेर पडावे . असं Rajesh188 म्हणतात त्याच्याशी सहमत. अर्थात हे मुददे तुम्हाला कळीचे वाटत असतील तर कोणाला मत द्यायचं हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे म्हणा.

3. पक्ष पाहून मतदान करु नये ह्ताच्यशी मात्र असहमत. निवडून आलेल्या लोकाना ह्याबाबत किती मत वा निर्णयस्वातंत्र्य असतं मला शंका आहे. पक्ष म्हणेल ती पूर्वदिशा अशीच स्थिती असणार. म्हणून मुद्दा 1 मधले पक्ष वगळून बाकीच्यांचे उमेदवर कन्सीडर करावे.

4. उमेदवार निवडीवर कित्येक मायबोलीकरानी फार चांगले निकष सुचवले आहेत. सुशिक्षीत, प्रामाणिक, विभागातले प्रश्न सोडवण्याचा रेकॉर्ड असलेले असे. फक्त ही माहिती मिळवण्ं कितपत सोपं आहे माहित नाही. कोणाला अश्या माहितीची लिंक माहित असेल तर टाका प्लीज. दलबदलू लोकाना मत देऊ नये असं माझं मत आहे Happy

5. नोटा पर्याय मी पूर्वी वापरलला आहे. तुम्हाला कोणतेही उमेदवार लायकीचे वाटत नसतील तर तो वापरण्यावाचून पर्याय नाही. वाईटातले चान्गले निवडून देण्यात short term gain असला तरी long term loss, देशाचा म्हणजे पर्यायाने तुमचा आणि माझा आहे. ठामपणे वाईट नाकारलं तरच भविश्यात चान्गल्याचा पर्याय समोर येईल.

6. वर Srd ह्यानी म्हटल आहे त्याप्रमाणे 'जो निवडून येईल त्याच्याकडून काम करवून घेण्याचे तत्व ठेवायचे.' आपण सध्या इथेच कमी पडतोय.

इतक्यात जे mass party shifting झाले त्यातल्या किती लोकांना नव्या पार्टीने तिकीट दिलेलं आहे? आपले आयुष्यभर प्रेफेरेन्सस तेच राहतात का? आपले विचार, निर्णय बदलतात तसे इतर लोकं बदलू शकत नाहीत का? लोकांनी प्रेफेरेन्सस बदलल्यामुळे तर किती सध्या चर्चा घडतात, प्रश्न पडतात. नाहीतर एक देश , एक पक्ष होतंच! शिवाय युवानेते युवराजांनी सत्तर वर्षे घाण करणाऱ्या पक्षाला मत देऊ नका असं सांगितले आहे, मग प्रश्न नको पडायला किंवा सगळी उत्तरे मिळायला हवीत.

महाराष्ट्र निवडूनिकीच्या रिंगणात सुद्धा देशात अव्वल च आहे.
मतदार संयमी आहेत .
महाराष्ट्र नी कधी जात बघून मत दिलेलं नाही (
काही उदाहरण असतील अपवाद म्हणून)
निवडणूक संपली की आपसात द्वेष ठेवला नाही.
सुडाचे राजकारण केले नाही .
ही महाराष्ट्र ची ओळख अबाधित राहवी अशी खूप इच्या आहे .

एक देश , एक पक्ष कधी होते ?

हिंदू सभा संघवाले स्वातंत्र्यपूर्व पासून निवडणुका लढवत आहेत , त्यांना यश 2014 ला मिळाले ,

>>आपले आयुष्यभर प्रेफेरेन्सस तेच राहतात का? आपले विचार, निर्णय बदलतात तसे इतर लोकं बदलू शकत नाहीत का?

ह्या दलबदलूतल्या किती लोकांचं विचार वा ह्रदय परिवर्तन वगैरे झालंय ह्याबद्दल निदान मला तरी शंका आहे. तापल्या तव्यावर पोळी भाजायची हाच हेतू बहुतेकांचा असणार. त्यांच्या दृष्टीने तेही बरोबरच आहेत म्हणा. काही सन्माननीय अपवाद असतीलही. पण ते कसे ओलखनार? त्यापेक्षा हा गट टाळलेला काय वाईट??? कारण पुढे परिस्थिती बदलली की हे इकडून पुन्हा तिकडे जाणार नाहीत ह्याची काही खात्री नाही. तिकिट मिळालं नाही किंवा तिकिट मिळुनही निवडून आले नाहीत तरी नव्या पक्षाची किती चाकरी करतात ते तरी बघता येईल.

तसंच तुमच्या आमच्या सारख्यांचे निर्णय बदलले तर त्याचा परिणाम आपल्या आणि कुटुंबाच्या आयुष्यापुरता मर्यादीत रहातो. इथे तसं नाहिये. कारण हे लोक सार्वजनिक क्षेत्रत आहेत.

>>एक देश एक पक्ष हे भारता सारख्या वैविध्य पूर्ण देशात बिलकुल योग्य नाही

कुठल्याच लोकशाही हवी असलेल्या देशात ते योग्य नाही.

6. वर Srd ह्यानी म्हटल आहे त्याप्रमाणे 'जो निवडून येईल त्याच्याकडून काम करवून घेण्याचे तत्व ठेवायचे.' आपण सध्या इथेच कमी पडतोय.

ह्या दलबदलूतल्या किती लोकांचं विचार वा ह्रदय परिवर्तन वगैरे झालंय ह्याबद्दल निदान मला तरी शंका आहे. तापल्या तव्यावर पोळी भाजायची हाच हेतू बहुतेकांचा असणार. त्यांच्या दृष्टीने तेही बरोबरच आहेत म्हणा.>>>>

दलबदल विचार किंवा हृदय बदलल्यामुळे होत नाही तर सत्तेसाठी होतो. ज्यांना आपण आपल्या भागातून निवडून येणार पण आपला पक्ष पुरता आपटणार, त्यामुळे आपल्याला निवडून येऊनही काहीही लाभ होणार नाही याची खात्री आहे ते सत्तेत येणाऱ्या पक्षांची कास पकडतात. काही पक्षांना खात्री असते की त्यांचे उमेदवार येणार पण संख्याबळ किती होईल याबाबत पूर्ण खात्री नसते ते अशांना जवळ करतात कारण त्यांची 1 सीट पक्की होते. कदाचित यामुळेच भाजपाने मेगाभरती करून घेतली पण सगळ्यांनाच तिकिटे दिली नाहीत.

मत कोणाला द्यायचे याबाबत राजसीशी सहमत.

नोटामध्ये काहीही दम नाही. भविष्यात कधी काही होईल असे वाटत नाही. सध्या जी फौज राजकारणात उतरते ती पाहता मला नोटाकडून काही आशा नाही. एखाद्या मतदारसंघात सगळ्यात जास्त नोटा मते निघाली तर तिथले सगळे उमेदवार अमुक एका वर्षासाठी बाद ठरून पूर्ण नव्या संचात निवडणुका झाल्या तर नोटाचा फायदा होईल. पण हे असे नजीकच्या भविष्यात होणार नाही व समजा झालेच तरिही हे खूप महाग पडेल. त्यामुळे मी तरी नोटाप्रेमी नाही. तसेही माझ्या भागात विद्यमान आमदार उभा आहे, त्यानुले मत कोणाला देऊ हा प्रश्न मला भेडसावत नाही.

1. आपल्याला कोणत्या पक्षाला मत द्यायचंच नाहिये हे आधी पक्कं ठरवाव्ं म्हणजे ते पर्याय अपोआप बाद होतिल. >>>> हो हे ठरवलंय. वर्षानुवर्षे वरकरणी संभावितासारखी प्रतिमा ठेवून आतून स्वतःचे आणि स्वतःच्या नातेवाईकांचे खजिने शेकडो/हजारो कोट्यांनी भरणार्‍या नेत्यांना, त्यांना साथ देणार्‍या/पाठीशी घालणार्‍या नेत्यांना, ठराविक लोकांना प्रचंड श्रीमंत करून एकिकडे गरीबांचा प्रचंड कळवळा असल्याचा अभिनय करणार्‍या, स्वतःचे काडीचेही कर्तृत्व नसताना फक्त पुर्वजांच्या पुण्याई (ह्यातही काही वाद आहेतच) वरच भिस्त असणार्‍या, आम्ही कितीही घोटाळे केले तरी कुणी आमचा केसही वाकडा करू शकत नाही असा माज असणार्‍या लोकांच्या पक्षाला मी मत देणार नाही. आणि ते मत अजून अजून ठाम होत आहे. एकवेळ बडबड करणारे परवडले कारण ते १० गोष्टी बोलत असतील त्यातल्या ४-५ तरी करत असतील (त्या acknowledge करता यायला हव्यात) तरी चालेल पण वरून सभ्य मुखवटा आणि आतून प्रचंड बेरकी स्वार्थीपणा करणारे लोक मला जास्त धोकादायक वाटतात.
हे लोक आंतरराष्ट्रीय किंवा काश्मिर वगैरे प्रश्नही स्वतःच्या स्वार्थासाठी भिजत ठेवतात. आर या पार करणं त्यांना कदाचित परवडणारं नसतं. विधानसभा निवडणुकीत अर्थातच आंतरराष्ट्रीय किंवा काश्मिर प्रश्नाचा विचार करायची गरज नाही कारण त्या प्रश्नांचा विधानसभेच्या कार्यात काही संबंधच नाही.

लोकल लेव्हलवर म्युनिसिपालिटी इलेक्शनला मात्र मी पक्षापेक्षा व्यक्ती पाहून मत देते.

जो निवडून येईल त्याच्याकडून काम करवून घेण्याचे तत्व ठेवायचे. >>>> हे अगदीच मान्य. मग तो आपण मत दिलेला उमेदवार निवडून येवो किंवा दुसरा कुणी येवो. काम करवून घेण्याची ताकद मतदारात यायला हवी.

काम करवून घेण्याची ताकद मतदारात यायला हवी>>>

हे होतेय आता हळूहळू. आमच्या भागात तरी लोक कामाला लावतात या लोकल उमेदवारांना. आमदार, नगर सेवक जो कोणी असेल त्याचे तोंड दिसत राहिले पाहिजे सतत सगळीकडे. फक्त 5 वर्षांनी दिसत असेल तर त्रास आहे.

काम करवून घेण्याची ताकद मतदारात यायला हवी>>> अगदी अगदी.

आमचा कल्याण ग्रामीण मतदारसंघ, सेना मनसे सरळ सामना. रा. कॉ. उमेदवार उभा नाही, मनसेला पाठींबा दिलाय त्यांनी. राज यांनी खेळी छान खेळलीय, प्रचार पण जोरात दिसतोय. एक आमदार दोन टर्ममागे निवडून आलेला मनसेचा तो भाजपत गेलाय, त्याचा भाऊ मनसेत आहे, त्याला तिकीट दिलंय. हे हल्ली मस्त दिसायला लागलं आहे उत्तरेत होतं तसं, एकाच घरातल्यांनी वेगवेगळ्या पक्षात जायचं, कोणीही येऊदे, सत्ता आपल्या घरात. बघुया काय होतं.

बाकी मत कोणाला द्यायचं हे ठरवतेय, नोटा किंवा दुसरा पर्याय.

कामं नगरसेवकांनी केली आहेत काही, मेन रोड काँक्रीट आहेच पण गल्लीही झालीय. पण आमदार कामं बघता, त्या लेवलवर इथल्या कोणी फार काम केलेलं दिसत नाहीये, रस्ताबाबत तर नाहीच. अनेक रस्ते भयानक आहेत त्यातले काही लोकल लेवलवर असतील पण हायवे MMRDA आहे बहुतेक म्हणजे आमदारांची जबाबदारी ना.

इथली मतदारसंघ विभागणी मला कळलीच नाही, आमच्या दोन गल्ली आधीपर्यंत डोंबिवली मतदारसंघ, आमच्या मेन रोडवर अजून साधारण अर्धा एक किलोमीटर पूर्वीची म्युनिसिपल हद्द संपायची, मग गावं होती म्हणजे तो भाग आधी kdmcत नव्हता तरी आमचा भाग, पाथर्ली रोड वरचापण सर्व भाग कल्याण ग्रामीणमध्ये टाकला त्यावेळी. असो, काय करणार.

लिहून घ्या, कणकवलीत नीतेश राणेंना ७०% मतं मिळतील: फडणवीस..हे नक्की काय आहे? मगरुरी,अतीआत्मविश्वास की लोकांना ग्रुहीत धरणे?
तरीही राणे सुपुत्र निवडुन आले तर धन्य ती लोकशाही आणि धन्य ते मतदार.

मी कोकणात आमच्या गावी असते तर सेनेला दिलं असते, म्हणजे तिथली मतदार असते तर. नितेश राणेला अजिबात नाही. मुळात भाजपने घेतलं त्यांना हे मान्य नाही मला. मला कोण विचारतंय तो भाग वेगळा Wink .

सेना कमी पडली, अट ठेवलीच नाही यावेळी राणे नको अशी किंवा भाजपने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. बाकी नितेश राणेला मागे भाजप झंझावातात पण तिथल्या लोकांनी निवडून दिलं तर आता तर काय तो त्यांचाच उमेदवार, फक्त शिवसेना विरोधात असेल, येणार तोच नक्की Sad .

Pages