मायबोली गणेशोत्सव २०१९ - स्पर्धेचा निकाल

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:13

* शब्दधन चंद्र अर्धा राहिला स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - चंद्र अर्धा राहिला - कुशस्थळीहून आलेला पाहुणा - पायस
https://www.maayboli.com/node/71451#new
chandra 1st prize a1.jpg
###
* हास्यलहरी स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - हास्य लहरी - सर्टिफिकेट! - अज्ञातवासी
https://www.maayboli.com/node/71461
hasya lahari 1st prize a.jpg

###
* शशक स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - "सोळा आण्याच्या गोष्टी - नजर - स्वप्ना_राज"
https://www.maayboli.com/node/71395
16 aane 1st prize_0.jpg
---
द्वितीय क्रमांक - "सोळा आण्याच्या गोष्टी - अनन्य - सनव"
https://www.maayboli.com/node/71378
16 aane 2nd prize.jpg
---
तृतीय क्रमांक विभागून- ("सोळा आण्याच्या गोष्टी - कावळे - मामी" https://www.maayboli.com/node/71377 / "सोळ्या आण्याच्या गोष्टी - नो बॅरीअर्स - अजय चव्हाण" )
16 aane 3rd prize 1.jpg
...
https://www.maayboli.com/node/71413
16 aane 3rd prize.jpg
###
*पाककृती स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - "रुचकर मेजवानी - {हॅव अ सिप्प} - {कोकणी मॉकटेल} - {आरती.}" आणि "रुचकर मेजवानी - {आज्जीचा खाऊ} - {बिरडी} - {आरती}" https://www.maayboli.com/node/71529 , https://www.maayboli.com/node/71433
cooking 1st prize a.jpg

###
*सांस्कृतिक स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - vijaya kelkar
https://www.maayboli.com/node/71290
rangoli 1st prize.jpg

###
* गझल स्पर्धेचा निकाल
गझलेसाठी आलेल्या दोन्ही प्रवेशिका गझलेच्या मुलभूत निकषांवर खऱ्या उतरत नसल्यामुळे या स्पर्धेत कुणीही विजेता होवू शकलेले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< लोकांना विजेत्या कथा शोधून वाचाव्या लागत आहेत. >>>
कथा समजल्या नाहीत तरी समजवून घेण्याची तसदी घेत आहेत ना लोक्स? मग ते कथा शोधायची तसदी घेणार नाहीत का?

विजेत्यांचे अभिनंदन आणि संयोजकांचे आभार.
ता.क. : लोकांच्या वोटिंगनुसार विजेते निवडले आहेत, असे काही वाटत नाही. नक्की क्रायटेरिया काय होता?

मग ते कथा शोधायची तसदी घेणार नाहीत का? >> का घ्यायला लागावी? गणेशोत्सोवाअंतर्गत आलेले लेखन गोष्टी फॅसिलिटेट करून देणे संयोजन मंडळाला सहज शक्य असतांना नव्हे तो त्यांच्या कामाचा भागच असतांना?
ह्या मंडळाने त्यांनी स्वतः आयोजित केलेल्या गझल स्पर्धेची गायब झालेली लिंक आठवडाभर दुरूस्त करावयाची वा करून घ्यावयाची तसदी घेतली नाही आणि गझल स्पर्धेला कमी प्रतिसाद आला असे साळसूदपणे म्हणत आहेत. Lol
लिंक्स वगैरे देणे आणि त्या व्यवस्थित काम करणे ह्या बेसिक गोष्टी मिसिंग असतांना परिक्षणासारखे अवघड काम अंगावर घेण्यामागे काय लॉजिक आहे?

>>संयोजकांचा निर्णय अंतिम आहे याची कल्पना आहे तरी विजेते ठरवण्यासाठी संयोजकांचे निकष काय होते याचे विवेचन वाचायला आवडेल.<<
काहि गरज नाहि. बॅट, बॉल, स्टंप्स, मैदान सगळं संयोजकांचं, तुम्ही फक्त खेळायला आलात. खेळायला मिळालं यातंच समाधान माना. आउट-नॉटाउट ठरवण्याचा अधिकार, आरटिआय वगैरे तुम्हाला नाहि. आणि जाणुन घायचंच असेल तर पुढच्या वर्षी संयोजनात भाग घ्या. अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट...

संयोजकांचं हार्दिक अभिनंदन!

विजेत्यांच़े अभिनंदन.
प्रवेशिकांबद्दल परीक्षक -संयोजका़ंंचे सविस्तर मत वाचायला आवडेल. >> +111 हार्पेन

कथांच्या लिंंक दिल्या असत्या तर फार छान झालं असतं. शोधाशोध करणं जाम कटकटीचं होतं. असो.
विजेत्यांचे अभिनंदन!!

>> निदान वर आलेल्या विजेत्या कथांच्या नावांना हायपर लिंक्स बनवण्याची तसदी तरी घ्या संयोजक. लोकांना विजेत्या कथा शोधून वाचाव्या लागत आहेत.
मी एक दोनदा click करुन बघीतले काही विचार न करता links were naturally expected.

ही नजर सापडली नाही

विजेत्यांचे अभिनंदन.
खरच, पण लिंका असत्या तर बरे झाले असते. पण हरकत नाही. आपणच वर आणू. नाहीतर कोणीतरी डकवा ना लिंका नविन धागा करून.

विजेते व स्पर्धक, दोघांचे अभिनंदन व भाग घेतल्यामुळे धन्यवाद. आम्हाला छान वाचायला मिळाले.
हा उपक्रम खुप आवडला. कथांचे अर्थ लावायच्या चर्चा तर एकदम धमाल होत्या. झब्बु बरोबरच हा एक उपक्रम कायमचा गणोशोत्सवाच्या यादीत घालायला हरकत नाही. Happy

धन्यवाद अवधूत.
संयोजक सध्या एकमेकांचे जुने धागे काढून ते वाचण्याचे कष्ट सुद्धा न घेता कौतुक करण्यात दंग आहेत. त्यामुळे आपले गाऱ्हाणे ऐकणारे इथे कोणी नाही. आपण आपल्याला गरज असल्यास स्वतःच धागे हुडकून काढून कथा वाचून घ्याव्यात.

अरे आणि हो ह्या https://www.maayboli.com/node/71579 समारोपाच्या धाग्यावर संयोजकांचे आभार मानायला विसरू नका बरका. तुम्ही सगळे फार ऐदी वाचक हात, फुकटात कथा वाचतात आणि संयोजकांना thank you सुद्धा म्हणत नाहीत.

मी एक awesome प्रशस्तीपत्र बनवायला घेतले आहे. ते बनवून झाले की संयोजकांना त्यांच्या कामगिरीसाठी एक अभिनन्दनपर धागा उघडून ते प्रशस्तीपत्र देणार आहे.

मतदान ऐवजी परीक्षण हा बदल करण्यामागे नक्की काय कारण होते याचे उत्तर संयोजकांकडून अजूनही मिळाले नाही
+
निकाल जाहीर होऊन पुरेसा अवधी उलटून गेला आहे तर मग आता माझे मत मांडायला हरकत नसावी. मी फक्त 'सोळा आण्याची गोष्ट' या स्पर्धेबद्दलच लिहणार आहे कारण भरभरून प्रतिसाद फक्त तिलाच मिळाला.

खरंतर यावर्षी 'रहस्य' ही थीम दिली होती; पण ट्रेंड दिसून आला तो मात्र 'घरगुती' कथाप्रकाराचा! बायकांच्या आडयन्सला हमखास टिपं गाळायला लावणार्या बाळंतपण, बाळ-आई वगैरे विषयावर भरपूर कथा आल्या. मला वाटतं सुरवात हायझेनबर्गच्या लाँड्री लिस्ट या कथेमुळे झाली. थीममधे बसत नसल्याने मी या सगळ्या कथा वगळल्या आहेत. (निकालातल्या कोणकोणत्या कथा खरंच 'रहस्य'कथा आहेत बरे? Proud Wink )

काहीजणांनी कथालेखनाच्या आर्ट आणि क्राफ्टमधे फार रोचक प्रयोग केले. त्या प्रयोगांसाठी त्यांचा 'खास उल्लेख' केलाच पाहिजे.
१. पत्ते - हायझेनबर्ग
२. आय लव्ह यू टू - मॅगी
३. सनी व्हिला - स्वप्ना_राज
४. बँडरस्नॅच - अमितव

आणि स्पर्धेत 'मजा' आणल्याबद्दल 'खास खास उल्लेख' Lol
• बोकलत (सर्व कथा - लिंक इल्ले)

एनिवे तर माझ्या पहिल्या तीन आवडत्या कथा आहेत:
१. खिडकीबाहेरचं जग! - मन्या ऽ
२. ठाकठोक - बिपिन सांगळे
३. प्रेस टु............. - चौबेजी

नेहमीप्रमाणे रेडिओ बटन पर्याय देऊन, मतदान पद्धतीने निकाल लावला असता तर मला एका कथेलाच मत द्यावे लागले असते. त्याऐवजी तीन कथा निवडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांचे आभार.

>>संयोजकांचा निर्णय अंतिम आहे याची कल्पना आहे तरी विजेते ठरवण्यासाठी संयोजकांचे निकष काय होते याचे विवेचन वाचायला आवडेल.<<
काहि गरज नाहि>>>
राज, असे खुद्द ‘संयोजक’ म्हणतायत का?... आणि पुढच्या वर्षी संयोजकच परिक्षण करणार ही आतल्या गोटातली बातमी दिल्याबद्दल आभारी आहे. Proud
रच्याकने, मला संयोजक कोण आहेत हे खरंच माहीत नाही. ते जाणून घेण्याची गरजही वाटली नाही.

चंद्रा, तुम्ही राज यांचा प्रतिसाद परत वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल ते काय म्हणताहेत... या धाग्यावरील माझ्या आवडत्या प्रतिसादात त्यांचा प्रतिसाद आहे. दोन नंबरवर अर्थात हाब. हाब धागा कधी काढताहेत या प्रतीक्षेत..

आणि स्पर्धेत 'मजा' आणल्याबद्दल 'खास खास उल्लेख' Lol
• बोकलत (सर्व कथा - लिंक इल्ले)>>>>> धन्यवाद Happy

संयोजकांचा निर्णय अंतिम आहे याची कल्पना आहे तरी विजेते ठरवण्यासाठी संयोजकांचे निकष काय होते याचे विवेचन वाचायला आवडेल.<<
काहि गरज नाहि. बॅट, बॉल, स्टंप्स, मैदान सगळं संयोजकांचं, तुम्ही फक्त खेळायला आलात. खेळायला मिळालं यातंच समाधान माना. आउट-नॉटाउट ठरवण्याचा अधिकार, आरटिआय वगैरे तुम्हाला नाहि. आणि जाणुन घायचंच असेल तर पुढच्या वर्षी संयोजनात भाग घ्या. अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट...

संयोजकांचं हार्दिक अभिनंदन + ११११

माझ्या मते स्पर्धेतील सर्वोत्तम तीन कथा. क्रम महत्वाचा नाही.

नो बॅरीअर्स - अजय चव्हाण
प्रेस टु............. - चौबेजी
सनी व्हिला - स्वप्ना_राज

आणि ही उल्लेखनीय
घटनाक्रम - कविन

साधना, राज यांचा प्रतिसाद कळला होता म्हणून पुढचे वाक्य लिहून फिदी फिदी हसण्याची स्मायली दिली आहे Happy

संयोजक आणि विजेत्यांचे अभिनंदन!

मला आवडलेल्या शशक सांगते. आवडण्याचे कारण कंसात दिले आहे आणि क्रम महत्वाचा नाही हेही नमूद करते.
१. लाँड्री लिस्ट - हायझेनबर्ग ( कथेची वेगळी मांडणी)
२.सनी व्हिला - स्वप्ना_राज ( विशेष शशक कथा कल्पना)
३.नो बॅरिअर्स- अजय चव्हाण ( संयत शब्द आणि बंदिस्त मांडणी)
४. हजेरी - सायकलस्वार ( विशेष शशक कथा कल्पना) ही कथा योग्य भाषेत / शब्दात मांडली तर अधिक प्रभावी होईल हेमावैम.
५. प्रेस टू ... - चौबेजी ( ही कथा शशक रचनेत बसवण्याच्या कौशल्याबद्दल)

फक्त उत्सुकतेपोटी विचारतेय, संयोजकांपैकी कोणी कोणी परीक्षण केले ? कोणत्या स्पर्धेचे केले?

दोन तीन संयोजक शशकांच्या स्पर्धेच्या धाग्यावर प्रतिसाद देत होते, एकीने सांगितले की ती आता संयोजक नाही, दुसर्याने सांगितले की तो जरी संयोजक असला तरी परीक्षक नाही, तर तिसरा शांत बसला.

अर्थात आत्ताही उत्तर मिळणार नाहीचे म्हणा, पण तरी जमल्यास सांगा

बाकी बेफिन्ची गझल यायला हवी होती, पण त्यांनी कदाचित भागच नाही घेतला की मला लिंक दिसली नाही

संयोजकांची नावे गुप्त ( hidden )ठेवली पाहिजेत.>>> संयोजन फेल गेले तर असे वाटणे स्वाभाविक आहे, पण जर सफल झाले तर प्रसिद्धी ची हव्यास असते. तेव्हा जर असा रुल जरी केला न तरी तो तोडतील लोकं

थँक्स अ‍ॅमी.
चुकुन चुकीच्या जागी लिहिलेले इथे योग्य जागी पण लिहि(णारच) Happy

काय शशक आल्यात हे पुन्हा जाऊन न पहाता ज्या ठळक आठवत आहेत व कथेतल्या भावना काहीही अडथळा न येता थेट मनात पोचल्या त्या >> यात पहिले ५-१० असे नसुन सर्वच समान धरल्यात >>
नो बॅरीयर्स, कावळे, भिती, लिस्ट, डॉ. यादव, बोकलत लाट व चेटकीण , बाहुलीची खिडकी.

बाकी वर प्रतिसादात आलेल्या काहीकाही समजायला सहज नव्हत्या म्हणुन विस्मरण झाले. पुन्हा वाचते.

सॉरी, लिस्ट लगेच समजली नव्हती पण आशय कळल्यावर खुप आवडली होती.
आणि हो, ‘कावळ्यातली कोकिळा’ पण खुप आवडली होती.

विजेत्यांचे अभिनंदन. सनी व्हिला खूप आवडली होती. अरे मध्येच काय संपली असे आधी वाटल, मग लक्षात आले की शब्दसंख्या ९० हा कथेचाच भाग आहे !!

Pages