सोळा आण्याच्या गोष्टी - नजर - स्वप्ना_राज

Submitted by स्वप्ना_राज on 6 September, 2019 - 08:12

तो आला तेव्हा तिथल्या एकुलत्या लहानश्या बेंचवर एक तरुणी बसलेली होती.

‘तुमची हरकत नसेल तर इथे बसू का?’

‘बसा ना’

‘थँक्स. दोन दिवस इथे सकाळी फिरायला येतोय. हिरव्या रंगाच्याही किती वेगवेगळ्या छटा असतात ते अश्या ठिकाणी आलं की कळतं. नवे पक्षी, फुलं, फुलपाखरं दिसतात. दूरच्या डोंगरांच्या माथ्यावरचं धुकं, त्यावरून वहाणारे धबधबे दिसतात. पाय निघतच नाही इथून. सॉरी.....खरं तर अश्या ठिकाणी शांत बसायला हवं. मी आपला बडबडतोय आल्यापासून.’

‘असू दे हो. तुमच्या नजरेतून हा सगळा देखावा दिसतोय मला.’

तो चमकला. मगाशी ‘बसा ना’ म्हणताना तिने आपल्याकडे का पाहिलं नाही ह्याचा त्याला आत्ता उलगडा झाला - तिच्या दुसर्या बाजूला ठेवलेली काठी पाहिल्यावर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही!

छान.

छान!

Chan

टचिंग

Pages