घरबसल्या भटकंती

Submitted by मामी on 13 May, 2020 - 00:42

दुसर्‍या एका धाग्यावर विषय निघाला तेव्हा या विषयावर अनेक सुंदर व्हिडिओज, टिव्ही शोज वगैरे आहेत हे लक्षात आलं. या सगळ्यांची इथे नोंद करू.

भारत अथवा भारताबाहेरील विविध प्रेक्षणीय स्थळं, किल्ले, समुद्रकिनारे, प्राचीन शहरं, आधुनिक आणि नेहमीची लाडकी शहरं, म्युझियम्स, नद्या, जंगलं, हॉटेल्स, हटके ठिकाणं आणि हॉटेल्स ...... सर्व काही येऊ द्या.

सध्या काही काळापुरती तरी भटकंती फार फार मर्यादित असेल तर आपण घरीच बसून नेत्रसुख घेऊयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The World From Above - Full Shows : https://www.youtube.com/playlist?list=PLXD21_OtYuSuegKb4nom4Y-Zcg9x7ZdXQ

ही सिरीज डिस्कव्हरी चॅनेलवर (बहुतेक) दाखवत असत. तेव्हा बघितली आहे. फार फार सुंदर आहे. कोणतंही शहर आपण असं बघत नाही त्यामुळे एका वेगळ्या दृष्टीकोनातून सर्व प्रसिद्ध शहरं बघायला मिळतात इथे.

भटकंतीचे विडिओ पाहून त्या ठिकाणी जायचं का नाही हे ठरवणं सोपं आणि उपयुक्त ठरतं. म्हणजे त्या ठिकाणी किती वेळ जाईल हेसुद्धा समजतं.

भारतातील इतर राज्यातील भटकंती आणि खादाडी ( हे मुख्य कारण स्थानिक लोकप्रिय स्वस्त मस्त पदार्थ फारसे कुणी सांगत/ दाखवत नाही.) यासाठी एक चानेल visa2explore. Harish Bali यांचा. साध्या सोप्या हिंदीत. केरळ आणि उडिशा खास आहे.

गड किल्ले भटकंती - काही ठिकाणी आपण जाऊ शकणार नाही हे निश्चित. कारण तिथे रॉक क्लाइमिंग करावे लागते. पण वर काय आहे हे पाहण्याची इच्छा असते. - त्यासाठी एक चानेँल- विनायक परब यांंचा.

https://artsandculture.google.com/explore इथे तुम्हाला कला आणि संस्कृती संदर्भात अनेक म्युझियम्स, कलाकृती, फॅशन शो, ठिकाणं आणि अजूनही बरंच काही बघता येईल. फार फार सुरेख आहे हे. यातही खूप मजा मजा केलीये. स्ट्रीट व्ह्यु, ३६० डिग्री व्ह्यु, झूम इन करून काही फेमस कलाकृतींतील डिटेल्स बघता येतात. भलामोठ्ठा खजिना आहे इथे.

हे बघताना एखाद्या इंटरेस्टिंग कलाकृतीबद्दलची माहिती गुगल करून अधिक माहिती करून घेता येईल.

हे मला व्हाटस अप वर आलेले आहे

महाराष्ट्रातील १२ प्रमुख किल्ले : https://youtu.be/F86flEluZhc
*******************
रायगड किल्ला : https://youtu.be/HEY1PQDzFz8
राजगड किल्ला : https://youtu.be/ymkoahRUluU
शिवनेरी किल्ला : https://youtu.be/xGQ_o08TSaM
सिंहगड किल्ला : https://youtu.be/4sxJl24HSow
तोरणा किल्ला : https://youtu.be/3UecXYiaRWE
प्रतापगड किल्ला : https://youtu.be/NqA6f07uv8k
लोहगड किल्ला : https://youtu.be/AKh0uCxddQM
पुरंदर चा व्हिडिओ उपलब्ध नाही.
पन्हाळा किल्ला: https://youtu.be/q-znH8aQuXY
सिंधुदुर्ग किल्ला : https://youtu.be/WtlhtPQ2VUo
मुरुड जंजिरा : https://youtu.be/NGI7lnsySH4
दौलताबाद(देवगिरी):https://youtu.be/HKxtDHqUlP4

राजमाची किल्ला : https://youtu.be/O7wMsmNHeeo
तिकोना किल्ला : https://youtu.be/BoScQyEZsmk
सज्जनगड किल्ला : https://youtu.be/gXLY615KsXo
अजिंक्यतारा किल्ला : https://youtu.be/cZPJpoImHRo

जीवन कदम नावाच्या एका तरुणाचा मराठीतून व्लॉग आहे. JeevanKadamVlogs : https://www.youtube.com/channel/UC4BFta04-H7yVIa3045chXA

किल्ले आणि इतरही अनेक ठिकाणी फिरतो तो शिवाय पॅराग्लाइडिंग, स्कायडायविंग वगैरे देखिल केलंय. माझे बाबा याचे फॅन आहेत.

आम्ही पण पहातो हे मामी. कालच चंद्रताल सरोवराचा पाहिला. अप्रतिम आहे आणि आपल्या मराठीत Happy
कलावंतीन दुर्ग तर अमेझींग आहे.

लेकीची उन्हाळी सुट्टी (पावसाळ्यात) सुरू झाली आहे. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही कुठेतरी भटकायला गेलो असतो. ते यंदा शक्य नाहीये. तर या काळात एखादा प्रदेश निवडून त्याबद्दलची साग्रसंगीत माहिती वाचण्याचे आणि व्हिडिओ बघण्याचे ठरवत आहे. .... सांगते लवकरच कुठे जाणार भटकायला.

नाही नाही. ओळखा पाहू नाहीये. अजून ठरवलं नाहीये. काही हटके सुचवत असाल तर सुचवा. कदाचित युरोपातील काही ठिकाणं वगैरे करेन. Lol फुकटचे व्हिडिओ बघायला काय जातंय आपलं?

मग जर्मनीच.
YouTube search -
१) "Germany tourism
२) "dw tv documentary germany tours"
३) "history channel german industries"
४) "dw tv documentary art and artists" हे भारी.

फुकटचे व्हिडिओ बघायला काय जातंय आपलं? >>> Lol

मामी तू फिरून आलीस की आम्हालाही फिरव इथे ते व्हिडीओ देऊन.

चालेल चालेल. Biggrin

Srd, जर्मनीचं तिकिट काढू म्हणताय? ठीक आहे. बघते. धन्यवाद.

Travel xp नामक channel चांगले आहे.
विशेषत: युरोप मधल्या खूप शहरांची भटकंती , तिथली विशेष स्थळे , संस्कृती, खाण्यचे प्रकार वगैरेंची प्राथमिक ओळख करून देणे हे उत्तम प्रकारे साधतात.

Travel xp चांगले आहे. नयनरम्य स्थळे पाहायला मिळतात.

गेल्या आठवड्यात Galapagos island बद्दल Animal Planet वर पाहिले. ओळखीतील एक जण मागील वर्षी जाऊन आल्यात. त्यांनी दाखवलेले फोटोज व दिलेली माहिती ऐकून तिथे जाण्याची ईच्छा होती ती पुन्हा ऊफाळून आली. सध्या प्रवास करू शकत नसल्याने व पँकेज ची किंमत पाहता पुढील काही वर्षे तरी YouTube वरच समाधान.

ही तीच प्रसिद्ध ठिकाण जिथे डार्विन ने संशोधन केले.
वनस्पति व प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाति हे तेथील वैशिष्ट्य.

शोध घेतला असता खालील दुवे मिलाले

https://whc.unesco.org/en/list/1/
https://www.galapagosislands.com/

Google /Youtube वर Galapagos सर्च करावे.

https://youtu.be/CCIacOeB9cs

सध्या आम्ही जेवताना जगातल्या सुंदर रेल्वेसफरी बघतो. आज स्वित्झर्लंड मधील बर्निना एक्स्प्रेसचा हा व्हिडीओ बघितला. डोळ्याचे पारणे फिटले.
https://www.youtube.com/watch?v=lTlVxH6QMUU

ह्या आठवड्यात न्युझिलंड च्या TranzAlpine train चे
https://www.youtube.com/watch?v=lI2F9uBIbAc

Travel xp हे माझे आवडिचे चॅनेल आहे.
कदाचित युरोपातील काही ठिकाणं वगैरे करेन. @ मामी........ प्राग, व्हिएन्ना, हंगेरी ही मला आवडलेली ठिकाणे. जर फुलबागा बघण्याची आवड असेल तर ट्यूलीप सिझन मधे अ‍ॅमस्टरडॅमला जायचे. दर वर्षी एखादी थिम घेउन त्या प्रमाणे ट्युलिपच्या फुलांची लागवड करून पार्क तयार केले जाते.
हंगेरीला नैसर्गिक गरम पाण्याच्या झर्‍याचे मोठ मोठे तरण तलाव आहे. हा एक वेगळाच अनुभव घ्यायला फार छान वाटते. दिवस कमी पडतो. त्या वेगवेगळ्या तापमानाच्या सगळ्या तलावात थोडा थोडा वेळ डूंबत बसण्यात वेळ कसा निघुन जातो ते कळत नाही. तर व्हिएन्ना -प्राग हा ट्रेन प्रवास खुप छान आहे.
स्विस तर स्वप्नातिल देशाप्रमाणे आहे. कुठेही जा नयनरम्य दृष्य आपली पाठ सोडत नाहीत. पॅरिस का माहित नाही परंतु मला तितके आवडले नाही. पण डिझनेलँड अतिशय छान आहे.

सध्या आम्ही जेवताना जगातल्या सुंदर रेल्वेसफरी बघतो. >>> सही.

मला मुळातच रेल्वे क्लिप्स बघायला खूप आवडतात. अनेकदा मोकळा वेळ असेल आणि "लेझी एण्टरटेन्मेण्ट" हवी असेल तर यू ट्यूब वर बघत बसतो.

वरच्या चर्चेतील ठिकाणे पाहता आता हे जरा बटाट्याच्या चाळीतील भ्रमण मंडळ काश्मीर वरून सुरूवात करून मुंबईतील जवळच्या ठिकाणांवर येतात तसे वाटेल पण मी नुकतीच ही क्लिप बघितली. पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवासाची.

मी शाळेत असताना सह्याद्री एक्सप्रेसने पुणे ते कोल्हापूर प्रवास केला होता. तेव्हा माझे एक आजोबा व मी रात्री सगळी स्टेशने वगैरे पाहात बसलो होतो जागत. ते मिरज वगैरे भागांत खूप फिरलेले असल्याने त्यांना तेथील रेल्वेमार्गाची प्रचंड माहिती होती. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक मोठ्या स्टेशनबद्दल ते काहीतरी सांगत. त्या प्रवासानंतर रेल्वेने कोल्हापूरला पुन्हा कधी गेलेलो नाही. मुळात कोल्हापूरलाच फारसा गेलेलो नाही. नंतर शिंदवणे या गावी एक मित्र राहात होता त्याच्याकडे एकदा राहायला गेलो होतो. व जेजुरीला एक दोन वेळा गेलो तेव्हा या रेल्वे लाइनच्या किमान जवळून गेलो होतो. शिंदवणे भागात बहुधा एक जुना रेल्वेमार्ग होता त्याचा बोगदा अजूनही शिल्लक आहे. किमान तेव्हा तसे काहीतरी वाटले होते.

परवा ही क्लिप सहज यू ट्यूब ने सुचवली व या आठवणी जाग्या झाल्या. मग सुमारे अर्धा तास हे पाहिले. पूर्वी चोराची आळंदी असे नाव असलेल्या त्या स्टेशनचे नाव आता नुसतेच "आळंदी" केले आहे असे दिसले (याच गावाला म्हातोबाची आळंदी म्हणतात असेही ऐकले होते). तसेच "सातारा" हे सातारा रोड या नावाने होते बहुधा पूर्वी. ही रेल्वेची स्टेशनच्या नावात "रोड" असण्याची काय भानगड आहे अजूनही नक्की माहीत नाही. बहुधा गावाबाहेरून पण जवळून जाणार्‍या रेल्वेलाइन वर स्टेशन असले की तसे देत असावेत. नाशिक रोड वगैरे.

पुलंच्या एका लेखात माणसे पोटापाण्याकरता काय करतात याचे उदाहरण म्हणून शेणोली व ताकारी स्टेशन्स चा उल्लेख आहे. ती दोन्ही स्टेशने या लाइनवर आहेत हे समजले Happy पण एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रमुख गावे या लाइन वर आहेत. पुण्याहून पुढे जेजुरी, नीरा, लोणंद, सातारा, किर्लोस्करवाडी, कराड, सांगली, मिरज आणि मग कोल्हापूर (मधला क्रम कदाचित अचूक नसावा). मी स्पेसिफिकली पाहिले नाही पण पुण्याजवळ नीरा व कोल्हापूरजवळ पंचगंगा व यामधे अनेक मुख्य नद्याही ही लाइन ओलांडून जात असावी. तो एक भयंकर इण्टरेस्ट वाला उद्योग पूर्वी होता. अजूनही आहे. रस्ता किंवा रेल्वे पुलावर बाजूला तो पूल कोणत्या नदीवर आहे याचा एक बोर्ड सहसा असतो - तो चेक करण्याचा.

पुणे-कोल्हापूर पूर्वीचा रस्ता यातील बरीच गावे बायपास करून जात असे व आतातर हायवे झाला आहे असे ऐकले. एकूणच रस्त्याचे किमीमधले अंतर रेल्वेलाइनपेक्षा खूप कमी आहे व त्यामुळे वेळही कमी लागतो. रेल्वे लाइन एकतर मुळात कोल्हापूरकरता नव्हती. मिरज वरून ती नंतर बांधून घेतली (बहुधा शाहूमहाराजांनी). त्यात आधी दक्षिण मध्य रेल्वेचा भाग होती. त्यांचा सगळा फोकस तिकडे हैदराबाद कडे, त्यामुळे ही लाइन उपेक्षित वाटायची जवळच्या दौंड-सोलापूर च्या लाइन त्या तुलनेत. आता पुणे विभागात आल्यावर काय फरक पडला आहे माहीत नाही. डबल लाइन व विद्युतीकरण चे काय प्लॅन आहेत कल्पना नाही.

बाय द वे मी ट्रान्झअल्पाईन ने ख्राइस्टचर्च ते आर्थर्स पास पर्यंत गेलो आहे. अतिशय सुंदर प्रवास आहे. आम्ही गेलो त्याच्या ३-४ दिवस आधी वर्ल्ड कप २०१५ च्या प्रमोशनचा भाग म्हणून रिचर्ड हॅडली या ट्रेन मधे असणार होता. ते थोडक्यात हुकले आमचे. नाहीतर किमान एखादा फोटो व थोडेफार बोलणे झाले असते कारण या ट्रेन्स इतक्या गर्दीच्या वगैरे नसतात.

आर्थर्स पास ला स्टेशनच्या जवळ "वॉबली किया" नावाचे एक कॅफेवजा रेस्टॉ आहे. तेथे काउण्टर शेजारीच एक बॅट होती फ्रेम मधे. नीट बघितल्यावर दिसले की ती तेंडुलकरची सही असलेली बॅट होती Happy अर्थात हा त्या कॅफेच्या मालकाचा इण्टरेस्ट असावा. कारण तेथे काम करणार्‍यांना ढिम्म काही माहीत नव्हते त्याबद्दल. पण तेथे आलेले देसी लोक थबकतच तेथे.

फा, मस्त लिहिलंयस.

ठरलं माझं मग. या सुटीत मी जगभर रेल्वेनं प्रवास करणार. एक आगळी वेगळी सुट्टी.

मामी, मस्त कल्पना आहे. प्रवासाचे साधन फिक्स्ड आणि डेस्टिनेशन्स वेगवेगळी!
लगे हाथ बीबीसीची भारतीय रेल्वेवरची चार भागांची डॉक्युमेंटरी पण पहा जर आधी पाहिली नसेल तर.
भाग १ - https://youtu.be/D6nKHZwxr-c

फारएन्ड मस्त प्रतिसाद!! पूल पार करताना नदीचं नाव बघायची सवय मलापण आहे. इथून पहिल्या पहिल्यांदा म्हैसूरला जाताना कावेरी पार करताना छान वाटायचं उगाचच. नवीन नदी आपल्यासाठी म्हणून.

Pages