मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

शिवानीची एव्ही पाहिली. तिच्या पॉझिटिव्ह बाजू होत्याच की घरामध्ये. उदा. नेहाला एका प्रसन्गात कन्सोल करणे, तिची नेहा- माधवबरोबरची मैत्री, सुरेखाताईन्ना मान देणे, बिचुकलेला साम्भाळून घेणे, वै वै. तिने दोन- तीन टास्कस ( मर्डर टास्क) छान केले होते. कॅप्टन्सी टास्कच्या वेळी पॅनिक झाल्यामुळे रडत होती, तरीही ती तिथेच उभी होती, सातबाराच्या टास्कमध्ये किशोरीला काडया टोचत होत्या म्हणून रडणे ( आता ते खर होत का खोट हे देव आणि तीच जाणे) इ. इ. पण बिबॉने तिची एव्ही निगेटिव्हीटीनेच भरुन टाकली. तिला स्वत:ची लाज वाटत होती ते बघताना, म्हणून ती आल्यावर गप्प गप्प झाली. अर्थात त्यासाठीच ती डिझरविन्ग होती म्हणा.

पण काहीही म्हणा, वाईट असो का चान्गला, शिवानीने कण्टेट दिला. टिआरपी दिला तिने. तीन आठवडयापुर्वीची शिवानी गुर्मीत वावरायची, अगदी गुण्डासारखा आवाज लागायचा तिचा बोलताना, परत आल्यावर तिने स्वत: काही बदल केले ते चान्गल केल. जर शिवानी पहिल्यापासून बिबॉमध्ये असती, स्वतः मध्ये बदल करत करत खेळली असती, आणि विनर झाली असती तर वाईट वाटल नसत. उलट ती फेवरिट झाली असती सगळयान्न्ची.

तिच्या एव्हीमधून आणखी एक गोष्ट कळली की, ति नेहाला बिबॉमध्ये येण्याआधी फारस ओळखत नव्हती, ' हाय, हॅलो पुरती ओळख होती. इथे येऊन मैत्री झाली दोघीन्ची.

ह्या गोष्टी चा खुप इशु झाला आणि नंतर त्यांच्यात जोरदार भांडणं झालेली >>>>>>>> +++++++++१११११११११११ सहमत धनुडी

पण जर येणारी votings खरी असतील तर शिवानीला फायदा होतोय कालच्या negative एव्हीमुळे, तिचे fans जागे झालेत आणि votes करतायेत. तिने नेहाला पाठीमागे टाकलं आहे, ख खो देव जाणे आणि bb जाणे Lol

ठीक आहे ग. पण प्रोमोज bb शिव नेहावर करतायेत जास्त, त्यांचा पंगा वगैरे त्यामुळे ती दोघेच असतील top 2 . वोटसवर नसणार, झंपी यांनी लिहिलं ते खरं वाटतंय. शिव नेहालाच हायलाईट करतायेत bb.

Tech tech baher padlele loks parat yetat.bichukalenna don divsanpurvich send off dila na ? Ya saglyani radarad pan keli ani don divsat hajar?

अ‍ॅक्चुअली येणार्या एक्स काँटेस्ट्न्ट्समधे बाहेर हाकल्लेल्या परागलाही बोलवून थोडा धुमाकुळ घालता आला असता बिगबॉसला Happy

हा विक बोअरच आहे पण बाप्पा मस्त म्हणाला शिवानीला की परत आल्यावर तुझा गेम आवडला नाही मला , मी खरंतर शिवला वोट देणार होतो पण तुला दिलं, कारण काय सांगितलं ते समजलं नाही. पण शिव नेहा टॉप 2 असतील हे जवळजवळ नक्की, सेम मेघा पुष्करचं नाव यायचं शेवटी मागच्यावर्षी आलेल्या पाहुण्यांकडून, तसंच आता शिव नेहा नाव सगळ्यांच्या तोंडी आहे.

हिना काय आज अशी आली. हिना बरोबर रागावली विणावर, प्रेस कॉन्फरन्समध्ये नाव घेतलं नाही म्हणून. रुपाली जाम जळते वीणावर, हे दिसून येतं.

बिचुकले मनापासून आलेत असं वाटत नाही. ते फार involved नाहीत.

रुपाली जाम जळते वीणावर >>>हो Happy
ती म्हणत असेल अरे यार! हा असा गेम तर मला खेळायचा होता! प्रेम, भांडणे सगळेच.
ती बर्‍याचदा वीणाला म्हटली होती, ' तुझ्याकडे शिव आहे जवळ घेऊन लाड करायला, पँपर करायला, तसे मला कोणी नाहीये'. दुसरीकडे शिव ला वीणापासून लांब रहा असे म्हणायची. ती आणि किशोरी शाळकरी मुलींसारखे वीणाला "किती दिवसात आपण एकत्र युनिटी रिस्पेक्ट लव बोललो नाहीये" असे ओरडायच्या Uhoh

हो ना, आत्ता पण जळली परत, बेस्ट जोडी म्हणून तिने आणि शिवानीने दुसरी नावं घेतली, बाकी सर्वांनी शिव वीणा. त्यामुळे award शिव वीणाला मिळालं. पचका दोघींचा झाला.

बाप्पा आणि दिग्यादादाने स्कीट्स छान केली. आरोह anchoring मस्त करतो.

विणाची advertise दाखवतात तेव्हा ती कोणाला तरी सांगते , कोण विचारतं तिला प्रेमात पडलीस का ? तर हो सांगते विणा, तो आहे तो, अभि आहे का?

आज जरा मजा आली, माधव नेहाची भेट पाहून शिवानी फुलटू जलकुकडी झाली होती, बाप्पाने पण झापलं तिला, बिचुकले पण बोलले थोडं, बरं झालं...
बिचुकले फारसे interested दिसले नाहीत आत येण्याबद्दल ना त्या अवॉर्डस बद्दल, BB ने पचका केला फायनलचे तिकीट न देऊन, मूड ऑफ झाला होता त्यामुळे त्यांचा . !
आज सगळे एकत्र आले होते तर परागला पण बोलवायला हवं होतं यार BBने, जरा राडा झाला असता तर त्यांना अजून TRP मिळाला असता, नाहीतर शेवटच्या आठवड्यात सगळंच गुडी गुडी होतं...
थोडं बोरिंगच म्हणा ना !!

अवॉर्ड function छान होतं आजचं. तसही त्यांना दाखवायला काही उरलं नाहीये फारसं. वीणा के म्हणत होती की शिवला ताई म्हटली की तुला आम्ही कसे भेटणार नंतर आम्ही तर सेलिब्रिटी आहोत वगैरे, वीणा हीना ला सांगत होती कधी झालं हे? असं असेल तर चुकलं किशोरीताई चं.
रुपाली किती वरवरचं आणि fake भेटली विणाला, जी कधीकाळी अगदी जवळची मैत्रीण होती, असो
बाप्पा आणि दिगंबर ने मज्जा आणली, छान सादर केले अवॉर्डस, बाप्पा घाबरलाच विणाला ते खूप फनी होतं. हीना पण खूप छान पॉझिटिव्ह वाटत होती आणि केळकर पण छान
वैशाली ला कधीपासून नेहा आवडायला लागली त्यांचं तर कधी पटलं नाही, आणि ती प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये नेहा शिव चं नाव घेत होती.

पराग आला तर प्रचंड टीआर पी मिळेल. बिबाँना हे माहिती असेलच. तेव्हा त्याला बोलावलं असल्याची शक्यता आहे. त्यानीच नाकारलं असेल. Proud

Parag kashala rada Karel? Kay Karan >>> राडा म्हणजे actual राडा नाही, पण जरा रुसवा फुगवा किंवा थोडं टेन्शन, जे झालं टास्कमध्ये त्यानंतर असं म्हणायचं होतं हो मला...

Btw नेहाची av सॉलिड आवडली मला, मस्त झालीये एकदम, खूप मन लावून केलीये आणि लिहिलंय पण छान,
आणि शिवानी ला जाम फटके पडलेत, but she deserved it .... जाम आगाऊ आणि जलकुकडी आहे ती !!

वीणा के म्हणत होती की शिवला ताई म्हटली की तुला आम्ही कसे भेटणार नंतर आम्ही तर सेलिब्रिटी आहोत वगैरे, वीणा हीना ला सांगत होती कधी झालं हे? असं असेल तर चुकलं किशोरीताई चं. >>> अच्छा ताईबद्दल बोलत होती का, मला कळेना कोणाबद्दल ते. हे दाखवलं नाही पण वीणा कोणाबद्दल बोलतेय कळेना. मागे ताई रुपालीला पण असंच काहीतरी बोललेली पराग असताना, खूप मस्करी किंवा जवळीक दाखवलेली तिने तेव्हा पण या इतक्या महिन्यांनंतर बोलायला नको होतं. याउलट हिंदीतला करणवीर, ज्या commonersना त्याने आपलं मानलं, ते त्याच्या घरी पण जाऊन राहतात, असं बघितलं होतं कुठेतरी.

परागला नाही बोलावणार, त्याला contract मधून मुक्त केलं असेल. तो कुठला रेसिपी शो करतोय तेव्हा त्याने फ्री बर्ड असं लिहिलेलं त्यावरून तेव्हाच वाटलं. मग तो दुसरा शो करू शकला असेल. त्याला फायनलला पण नाही बोलावणार. पण तो एव्हीत होता बऱ्याच जणांच्या. त्याचा भाग असलेलं काही कॅन्सल केलं वगैरे असं नाही केलं.

आणि शिवानी ला जाम फटके पडलेत, but she deserved it .... जाम आगाऊ आणि जलकुकडी आहे ती !! >>> ती नाही सुधारणार. शिव वीणाला अगदी खोदून विचारत होती तुमचं कधी जमलं, तेव्हा नॉर्मल नव्हतं ते. परत शिव वीणा जोडी निवडताना तिचे मत घेतलं नाही म्हणून भडकली आणि तिची आणि बिचुकले जोडी सांगितली का तिची आणि नेहा सांगितली. रुपालीने पण शिवानी नेहा जोडी निवडली बहुतेक पण नेहा म्हणाली शिव वीणा जोडी आता जगजाहीर आहे. बाकी बहुतेकांनी अगदी आरोहने पण त्यांचेच नाव घेतलं बहुतेक. त्यामुळे त्यांना निवडलं गेलं.

शिव वीणाला केळकर, ताई आणि हिनाला किती सांगू आणि किती नको झालेलं. दोघेही एकमेकांचा रिस्पेक्ट करत एकमेकांची बाजू घेऊन अजूनही बोलतात हा. पहाटे चार च्या सीनचा विषय काढतात तेव्हा मात्र शिव tensed दिसतो. आता घरी जाऊन काय ऐकायला लागणार आहे असं वाटत असेल. केळकर म्हणाला मात्र आता तू फार मनावर घेतलं आहेस म मां नी सांगितलेलं, अगदी लांब लांब राहतोस.

हीनाच्या taskबद्दल मैथिलीने पण कौतुक केलं मात्र. बाप्पा किशोरीताईचं पण कौतुक करत होता त्यामुळे एकंदरीत पहिले तीन शिव नेहा आणि ताई असणार असंच वाटतंय. म्हणजे क्रम बदलू शकतो.

शिवानीची जर्नी सर्वात मोठी २८ मिनिटांची आणि वीणाची सर्वात कमी १७ मिनिटांची होती. नेहा २६, ताई २१, आरोह १९ आणि शिव २२ . Voot वर सेपरेट दिलंय आता, त्याखाली व्हिडीओ किती मिनिटांचा आहे ते दिलंय.

शिवानीची जर्नी सर्वात मोठी २८ मिनिटांची आणि वीणाची सर्वात कमी १७ मिनिटांची होती. नेहा २६, ताई २१, आरोह १९ आणि शिव २२ . Voot वर सेपरेट दिलंय आता, त्याखाली व्हिडीओ किती मिनिटांचा आहे ते दिलंय>> <बरे झाले तुम्ही हे इथे लिहिले, मी वुटवर फक्त एपी डाउनलोड करते जर बघायचे असतील तर, अन नेहचा av बघितला नाहीये, सो त्यासाठी पूर्ण एपी डाउनलोड करायचा कंटाळा आलेला, आता फक्त तिचा av बघेन☺️

शिवानी, माधव , नेहा आणि बहुतेक आरोहनेही नेहा-शिवानी सांगितलं. रूपालीने बाप्पा- सुरेखा सांगितलं.

नेहावर खूप लिहून झालं ते पुरे म्हणून थांबलो होतो. पण तिच्या एव्हीत की माझी सटकली नॉमिनेशन क्लिप्समध्ये शाळा टास्कच्या वेळी शिवला नडताना , त्याच्या भाषेवरून हिणवताना दिसली. त्या टास्कमध्ये शिवने मस्त डोकं वापरलं होतं. (ड -ळ ची अदलाबदली) तिथे नेहाचे संस्कार काढल्याचा तिला राग आला. पण एव्हीच्या शेवटी तिनेच सगळ्याचं श्रेय आपल्यावरच्या संस्कारांना दिलं, तर याचं का नको?

माधव डबल सेंचुरी म्हणत होता; पण शिवानीने सेंचुरी कुठे केलीय?

वीणाच्या जर्नीत तिने केव्हीआरपी ग्रुपचा भाग असतानाही पराग च्या चुकीच्या वाटलेल्या गोष्टींना विरोध केलेला दाखवायला हवं होतं.

पहाटे चारचं स्पष्टीकरण वीणाने शनिवारी दिलेलं.

शिवानी, माधव , नेहा आणि बहुतेक आरोहनेही नेहा-शिवानी सांगितलं. रूपालीने बाप्पा- सुरेखा सांगितलं. >>> अच्छा thank u. मी बघेन तो शॉट परत voot वर टाकलंकी. मग शिव वीणा कसे निवडले गेले. सुरेखाताई, वैशाली, केळकर, बाप्पा, दिग्यादादा, हीना यांनी शिव वीणा सांगितलं का. शिव वीणा तर सांगणार, मी नीट बघितलंच नाही बहुतेक ते.

वीणाच्या जर्नीत तिने केव्हीआरपी ग्रुपचा भाग असतानाही पराग च्या चुकीच्या वाटलेल्या गोष्टींना विरोध केलेला दाखवायला हवं होतं. >>> हो तिच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी नाही दाखवल्या. शिव चावला तेव्हाही किती समजावलं आठवडाभर.

VB Happy . हो आता सेपरेट हवं त्याचं बघू शकता.

आज बिचुकलेनी कसली भारी एंट्री मारली, थोडा मेकोव्हर केला होता, एकदम सुपरस्टार दिसत होते , बोलेतो एकदम मराठीतला मुन्नाभाई संजुबाबा Proud
वैशाली-केळ्या आल्यावर शिव वीणा बरोबर भट्टी मस्तं जमली होती त्यांची , बाप्पा दिग्याही मस्तं पॉझिटिव एनर्जी घेऊन आले होते, मजा आली.
रुपाली काय भयानक दिसत होती, सुट्लेलं पोट हायलाइट करणारा पोटीमा ड्रेस आणि त्या हिरव्या लेन्सेस आणि तो महाडंब एक्स्प्रेशन असलेला चेहरा, तिचा वावरही अतिशय निगेटिव आहे , जेलस नं .१ !
मला वाटतं कि वीणा जे हिनाला सांगत होती ते रुपालीबद्दल होतं, किशोरीताईबद्दल नाही.
हिनाने बरं झालं कानउघडणी केली वीणाची तिला प्रेस कॉन्फरन्स मधे मैत्रीण म्हणून काउंट न केल्याबद्दल.
Btw त्या ‘आता माझी सटकली’ अ‍ॅवॉर्ड मधे सर्वात कर्कश्श -दुष्ट नेहाच दिसत होती Biggrin , मला काही केल्या आवडत नाही ती Wink

Pages