मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

मला उलट वाटलं. कारण वीणा वैशालीचं हसत खेळत चाललं होतं.
ते परागला टॉंंट करत होते असं वाटलं. >>> अच्छा असं होय, असेल तसंच मग मला बरोबर उलट वाटलं.

आरोहला शिवानी परवापासून इग्नोर करतेय अस मला का वाटतय? >>>>>हो सुलू हे वाचल्यावर मलापण तसं वाटतय

मलाही असेच वाटले की वीणा मुद्दामून तशी बोलली. तसेच ही वीणा टोमणे मारण्यात पटाईत आहे. आरोह नेहा वगैरे पण तिच्या टोमणे मारण्या विषयी बोलतअसतात.
पराग ने नाही दाखवलेली गुलाबजाम ची रेसिपी त्याच्या channel वर.
पण रुपाली साठी सगळी कडेच कमेंट येत होते 2थेम्ब तेलात गुलाबजाम बनवायची रेसिपी दाखव ते तिने वाचले असतिल.

>>रुपाली शिव ला बोलली आम्ही तुला नंतर हून सेलिब्रेटि असल्यामूळे भेटणार नाही त्याचा तिला राग आला . <<
यात सेलेब्रिटी म्हणजे शिव (बिबॉ जिंकल्यावर तो होईल) असं रुपाली उपरोधाने म्हणाली - अशी शक्यता देखील असु शकते ना? मनात अढी धरलेली असेल तर त्या व्यक्तिच्या साध्या वाक्याचंहि टोमण्यात रुपांतर होतं. असाच काहितरी प्रकार घडला असावा... Wink

काल वैशालीचा काय धुडगूस चालला होता वीणाबरोबर!
वीणाबरोबर घरभर दंगा करत फिरलेले केळ्या, वैशाली आणि नेहाबरोबर गप्पा मारत बसलेले केळ्या, वैशाली एकदम वेगवेगळेच वाटत होते!

पराग ला वरती कुणीतरी "फ्री बर्ड" म्हंटलय पण खर म्हणजे बाहेर पडलेल्यांपैकी कुणीच त्याच्याइतके अजुनही बिग बॉसच्या घरात अडकून पडलेले नाही!
तो पराग जो भेटेल त्याला interview देत सुटलाय.... आणि सगळीकडे तिचतिच पिरपिर Sad
मी सगळ्यात strong player होतो म्हणून सगळ्यांनी मिळून मला बाहेर काढले म्हणतो तेंव्हा हसू अगदीच आवरत नाही Rofl

मी लिहिलं परागने लिहिलेलं ते, मी स्वतः नाही म्हणत त्याला फ्री बर्ड. तो अडकला आहे bb मध्ये पण त्याला मीडिया जास्त हवा देतेय, तो काय म्हणतो ते लगेच व्हायरल करून, त्याचे interviews घ्यायला सगळेच जातायेत, त्यामुळे अजून.

फ्री बर्ड लिहिल्यावर मला contract मधून मुक्त केलं असावं, असं वाटलं फक्त.

आधी त्याला मिडीयाशी बोलायला बंदी होती, पण आता नाही.

त्यात काय झाल? हे लास्ट सिझनलाही झाल होत. तेव्हा महाराष्ट्र दिनाला पहिल्यान्दा सदस्य आले होते, नन्तर मला वाटत शेवटच्या आठवडयात आले होते सगळेजण. ---adhicha season madhe konala grand send off dila navhata bichukalensarkha mhanun mhatal .tyach pramane finale madhe nivadayla pan sagale sadasya ale navate.tyaveli phakt manjrekar ale hote.he pathopath ghadal mhanun lihil

या वेळ च्या सीझन मध्ये मागच्या सीझन पेक्षा टास्क कमी होते पण घडामोडी बर्याच घडल्या शिवानि चे बाहेर पडणे ,पराग चे निलंबित होणे
शिवानी चे परत येणे ,बिचुकलेंचे सारखे बाहेर येणे जाणे,वीणा शिव ची लव स्टोरी. आरडाओरडा ही जास्त होता.

बाय्दवे काल बाप्पा म्हणे मला शिव आणि नेहाला तिकिट टु फिनाले द्याय्चे होते पण स्त्रॅटेजी बदलावी लागली ऐन वेळी असे काहीतरी अर्धवट बोलून एकदम ब्रेक लावला त्यांनी. आणि नंतर सारवा सारव केली. तेव्हा पुन्हा एकदा वाटून गेले की ते वाक्य "मला शिव आणि नेहाला तिकिट टु फिनाले द्याय्चे होते पण बिबॉ ने सांगितले म्हणून शिवानीला द्यावे लागले" असे असावे का???? Happy

पराग ला वरती कुणीतरी "फ्री बर्ड" म्हंटलय पण खर म्हणजे बाहेर पडलेल्यांपैकी कुणीच त्याच्याइतके अजुनही बिग बॉसच्या घरात अडकून पडलेले नाही!
तो पराग जो भेटेल त्याला interview देत सुटलाय.... आणि सगळीकडे तिचतिच पिरपिर >>>> हे वाक्य सॉलिड आवडलं आणि पटलं !!
मी सगळ्यात strong player होतो म्हणून सगळ्यांनी मिळून मला बाहेर काढले म्हणतो तेंव्हा हसू अगदीच आवरत नाही Rofl >>> बरोबर, अगदी बरोबर

खर शिवानि आणी नेहा ला तिकीट टु फिनाले देणे हे असेच एक टाईमपास च होता. त्या वीक ला सगळ्यांनाच शेवटी तिकिट टु फिनाले मिळालेच की. सगळेच फाइनल मध्ये आले.
बाप्पा असे म्हणाला की त्यावेळी माझ्या काहीवेगळ्या strategy होत्या .मला वाटते शिवानी nomination मध्ये येऊ नये ,शिव वाचेल असा विचार केला असेल त्याने.

झाले असेल सुरु पहिला सदस्य बाहेर ही पडला असेल. पण कुठेच काहिच खबरा दिसत नाहियेत. आज रात्री बारा पर्यंत कळेल कोण विनर ते.

आज आहे की उद्या live.

अफवा पसरतायेत की शिव पहिला असून नेहाला जिंकवणार आहेत.

मागच्यावर्षी live होतं ना. यावर्षी आज कसं काय.

आरोह झाला ६ नं वर एव्हिक्ट म्हणे.

वैशालीला बिबॉ च्या फायद्याची गरज आहे असे वाटत नाही. ती एस्टॅब्लिश्ड आहे. किशोरी पण.
<
यावरून आठवलं, वैशाली एलिमिनेट झाली तेंव्हा म्हंटली कि आता १५ दिवस माझ्या मुलीला सोडून कुठेही जाणार नाही , माझ्या डोक्यातल्या फिल्मी किड्याला उगीच शंका आली म्हणून तिचं इन्स्टाग्रॅम चेक केलं १५ दिवसांनी , तर त्याच दिवशी तिनी रेकॉर्डींग स्टुडिओ मधला फोटो टाकला होता, बरोब्बर २ आठवड्यानी Wink , त्यानंतर काही दिवसांनी यशराज स्टुडीओ मधे रेकॉर्डीण्ग करतानाचा फोटो टाकला तिनी Happy
वैशालीला पब्लिक सपोर्ट नव्हता हे खरं पण नॉमिनेशन्स बिबॉ थोडं तरी मॅनेज करत असतील नक्की.’बाप्पाही बरोब्बर १ महिन्याने एलिमिनेट झाला, तो म्हंटला जाताना कि आता त्याला जॉब करतो तिथे जॉइन करायचय , मॅनेजमेन्टचे आभारही मानले त्यानी सुट्टी दिल्या बद्दल Happy
काल बाप्पा शिवानीला जे म्हंटला त्याच्यावर भरपूर चर्चा झाली आहे सोमि वर, नक्कीच सगळे फिक्स होते !

अच्छा.

बिचुकलेचं scripted आहे का, अचानक violent झाला.

शिव आणि नेहा घरातले लाईट्स ऑफ करताना पण नेहा रडत रडत कविता सादर करेल का?
शिव आणि वीणाला लाईट्स ऑफ करताना बघताना जास्त छान वाल असत.

वीणा भयंकर नालायक आहे टॉप 5 साठी हे या दोन एपिसोड मध्ये उठून दिसते आहे. सतत तोंड पांडुन किरकिर करतेय अभि कडे. केवळ शिव मुळे तिला 2-4 लोक मित्र म्हणून मिळाले आहेत. नाहीतर सगळ्यांशी तिचे जोरात वाजलेले आहे. शिवानी परत आली नसती तर विणाच टॉप मोस्ट व्हीलन झाली असती

आरोह झाला एव्हिक्ट>>>>

बिचुकलेला घराबाहेर काढलं.
उशिरा सुचलेल शहाणपण.>>>>>>म्हंजे अजून बाकीचं पब्लिक आहे का? मला बघायला नाही मिळते आज, गणपतीची तयारी सुरू आहे

आरोह किचनची साफसफाई करताना स्वगत म्हणतोय ते ९६ वा दिवस अशी घोषणा झाली.
आणि त्याच्या बोलण्यात लोक आले होते, अस़ंही आलं. म्हणजे नक्की कधीचं दाखवताहेत?

कालचा एपिसोड नंबर 97आहे वूट वर. आणी हे लोक सगळ्यांची av झाल्यानंतर आलेत. आणी शिवानि चा वाढदिवस झल्यावर तिचा वाढ दिवस बुधवारी होता. म्हणजे हे जूने लोक गुरुवारी आले.

Pages