Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डिजे+++११११
डिजे+++११११
हो काल सगळ्यांच्या एन्ट्रया आवडल्या. केळकर वैशाली विणा शिव च्या टाईमपास ने शिवानी थोडी इरिटे झाल्यासारखी वाटली मला.
बाप्पाचा वावर खुप छान असतो घरात. मॅडीला बरंच नंतर आणलं, मैथिली चं घरातल्या कोणाशीच एवढे बंध जुळले नाहीत ती लगेच बाहेर गेली ना, . काल तिला थोडं "ती ह्या घरातली नाही" असं फिलिंग आलं असेल का? मला निट मांडता येत नाहीये
मला काल मनापासून वाटत होतं कि रुपाली आणि विणा मधला दुरावा रुसवा विसरून त्या भेटाव्यात. मला आवडायचं त्या दोघींचं रुसणंमनवणं,. विणाला कुठेतरी वाईट वाटत होतं रुपाली तिच्याशी एवढी बोलत नाही ते. असो.
काल आता माझी सटकली अवॉर्ड बिचूकले पेक्षा नेहा, शिवानी जास्त डिझर्वींग वाटल्या , बाप्पाला पण बिचूकलेंना नव्हता द्यायचा .
कालचा एपी बघीतला नाही अजुन पण
कालचा एपी बघीतला नाही अजुन पण, << विणाला कुठेतरी वाईट वाटत होतं रुपाली तिच्याशी एवढी बोलत नाही ते. >> असे जर तीने दाखविले असेल तर तो ड्रामा असावा. कारण रुपाली तीला खुप पँपर करायची, तरी तिने बाहेर जावुन कुणाला भेटणार त्यात रुपालीचे नाव नाही घेतले, मग जर रुपालीने तिच्याशी बोलावे अशी जर तीची अपेक्षा असेल तर ती चुकीचीच आहे
काल बाप्पा-दिग्यामुळे मजा आली
काल बाप्पा-दिग्यामुळे मजा आली खरंच
अॅवॉर्ड नाईटची कल्पना चांगली आहे. त्यामुळे घरात जरा हालचाल झाली.
वीणा फक्त काहीच लोकांबरोबर एन्जॉय करत होती, ग्रुप करून बसली होती. ती हीनाशी रूपालीबद्दल बोलत होती, किशोरीबद्दल नाही.
शिव काल पूर्ण निष्प्रभ वाटला. त्याला बोलायला एकच विषय- वीणा आणि आई.
अॅज अगेन्स्ट नेहा वैशाली, केळ्या, सुरेखाताई, दिग्या सगळ्यांशी छान गप्पा मारत होती.
शिवानीचा मात्र मूड ऑफच वाटत होता, का कोण जाणे.
काल ९५वा दिवस दाखवत होते. आज आपण शनिवारवर आलोसुद्धा. मधले २-३ दिवस आजच दाखवणार , का स्किप करणार?
विणाला कुठेतरी वाईट वाटत होतं
विणाला कुठेतरी वाईट वाटत होतं रुपाली तिच्याशी एवढी बोलत नाही ते. >> असे जर तीने दाखविले असेल तर तो ड्रामा असावा. कारण रुपाली तीला खुप पँपर करायची, तरी तिने बाहेर जावुन कुणाला भेटणार त्यात रुपालीचे नाव नाही घेतले, मग जर रुपालीने तिच्याशी बोलावे अशी जर तीची अपेक्षा असेल तर ती चुकीचीच आहे>>>>>>>>>मला असं वाटतय, कि विणाला मनातून आतून वाईट वाटत असेल कारण त्यांची मैत्री तशी चांगली होती. (तिने दाखवण्याचा प्रश्नच नाही)
नंतर रुपालीनेच सारखे ग्रुप चेंज करून स्वतःचे खरे रंग दाखवले ना, तरी त्या फोन च्या टास्क मधे रुपाली ला असं बोलावं लागतय म्हणून विणाला रडू आलेलं. आणि मला तरी ते फेक वाटल नाही. विणा कधीच फेक वागली नाहीये, खोटं रडणं वगैरे प्रकार केला नाही कधीच रुपाली सारखा खोटा आरडाओरडा पण नाही.
वीणा फक्त केळकर वैशाली हिना
वीणा फक्त केळकर वैशाली हिना शी च बोलत होती.
रुपाली शिव ला बोलली आम्ही तुला नंतर हून सेलिब्रेटि असल्यामूळे भेटणार नाही त्याचा तिला राग आला . रुपाली गमंत मध्ये बोलली होती तरिही वीणा ला राग आला.
रुपाली ने ग्रुप बद्दलला नाहिये. वीणा ने तिला एकटे पाडले त्याला ती तरी काय करणार. वीणा तिला वेळ न देता सारखी शिव बरोबर वेळ घालवायची.
ती रुपाली बद्द्ल शिव कडे बोलत होती की किती लाउड बोलतेय, सूटली आहे ती तिला थांबवावे लागेल. मला भेटली नसती तरी चालले असते. मी लाम्ब उभी होते मला नाही फरक पडत.
रुपाली वीणा ची मैत्री तुटायला एकटी रुपाली जबाबदार नाहिये वीणा ही तितकीच जबाबदार आहे.
वीणा सतत बाकीच्याना उध्दट पणे बोलुन त्यांचा अपमान करत असते स्वत: ला आणी शिव ला गमतींत जरी काही बोलले तरी तिला राग येतो.
हिना ने तिचे नाव घेतले नाही म्हणून बरोबर सुनवले तिला.
काल ९५वा दिवस दाखवत होते. आज
काल ९५वा दिवस दाखवत होते. आज आपण शनिवारवर आलोसुद्धा. मधले २-३ दिवस आजच दाखवणार>>>>>>
95 वा चुकून आला असेल काल चा 97वा दिवस होता जे गुरुवार चे शूटिंग होते. आज शनिवारच्या एपिसोड मध्ये शुक्रवारचे म्हणजे 98 व्या दिवसाचे आणी शनीवार चे 99दिवसाचे दाखवणार आणी रविवार 100वा दिवस.
काल आता माझी सटकली अवॉर्ड
काल आता माझी सटकली अवॉर्ड बिचूकले पेक्षा नेहा, शिवानी जास्त डिझर्वींग वाटल्या , बाप्पाला पण बिचूकलेंना नव्हता द्यायचा . >>> अगदी अगदी.
नंतर रुपालीनेच सारखे ग्रुप चेंज करून स्वतःचे खरे रंग दाखवले ना, तरी त्या फोन च्या टास्क मधे रुपाली ला असं बोलावं लागतय म्हणून विणाला रडू आलेलं. आणि मला तरी ते फेक वाटल नाही. विणा कधीच फेक वागली नाहीये, खोटं रडणं वगैरे प्रकार केला नाही कधीच रुपाली सारखा खोटा आरडाओरडा पण नाही. >>> अगदी अगदी.
शिवानीचा मात्र मूड ऑफच वाटत होता, का कोण जाणे. >>> बाप्पा तिला म्हणाला ना, तू परत आल्यावर तुझा गेम मला आवडला नाही. मला तुला तिकीट टू फिनाले द्यायचं नव्हतं, शिवला द्यायचं होतं पण दिलं ती strategy होती. यावर काहीजण म्हणतायेत म्हणजे तिकीट टू फिनाले कोणाला द्यावं हे वरून सांगितलं गेलं असा संशय येतोय तो खरा आहे. मैथिलीने मात्र स्पष्ट नकार दिला असेल आणि शिव वीणाला निवडलं असावं.
वीणा उद्धट आहे या अमुपरीच्या मताशी सहमत पण किशोरीताई सोडून सर्वच मुली उद्धट, उर्मट आणि अति आगाऊ आहेत हे बरेचदा जाणवलं आहे. बाकी रुपाली शिव वीणा वर अति जळायची पण आधी परागबरोबर सतत असायची त्याचं काय. बाकी रुपालीचा भाऊ संकेत आलेला त्यानेही खुणेने शिव वीणाला सांगितलेलं तुमची जोडी आवडते, मस्त आहे. रूपालीला आरसा दाखवलेला त्याने.
रूपालीला तोटाच झाला ग्रुप बदलला त्याचा, ती नेहा शिवानीच्या पूर्ण आहारी गेली, आधी परागच्या होती तशी. त्यात task कळत नव्हते. ते आधी पराग आणि वीणाबरोबर होती म्हणून समजायचे खरंतर. तिने स्वत:चं डोकं एकदाच बिचुकलेला उचकवले आणि जागा सोडायला लावली तेव्हा चालवलं.
बरं वीणाने एवढा काही तिचा अपराध केलेला नाहीये. बिचुकले खरंतर घाण घाण तिच्या charactorवर बोलला तेव्हा बाहेर तिची आई त्याच्या थोबाडीत द्यावीशी वाटते अशा मुलाखती देत होती, आता बाहेर जाऊन रूपालीला समजलं असेल पण तरी त्याच्याशी गोड गोड बोलतेय की पण वीणाशी नाही. रुपाली स्वत:च फेक आणि जळकुडी आहे. त्यात शिवला सांगितलं होतं की तुला एकट्याला बघायचं आहे पण शिवने तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्यात वीणाला tont मारून गेली की तू कधी कोणाचे ऐकत नाहीस, तुला काय सांगायचं. ठीक आहे की ती स्वत:च्या हिमतीवर फायनलला पोचली आणि तिची तयारी होती काहीही झालं तरी जबाबदारी घ्यायची. कलर्सची असली तरी बसून राहून, काहीच न करता वीणा पोचली नाहीये, छान खेळून पोचलीय. प्रत्येक task चांगला खेळलीय. त्यात वीणाने प्रेस समोर पराग रुपालीची bb त यायच्या आधीच काही strategy ठरलेली उजेडात आणली, ह्या मुळे रुपाली अजून भडकली असेल.
बाकी सगळ्या सीझन मधले लोक
बाकी सगळ्या सीझन मधले लोक म्हणतात आपण सीझन संपल्यावर हे करु ते करु. इकडे फिरायला जाऊ तिकडे जाऊ. पण नंतर कोणी कुणाला भेटत ही नाही फार कधी कोणत्या कार्यक्रमाला भेटले तरच.
मेघा आणी सई तरी कुठे भेटतात वरचेवर. बिग्ग बॉस मध्ये जास्त लोक नसतात म्हणून काही जण जवळ येतात एकत्र वेळ घालवतात. बाहेर गेल्यावर मात्र त्यांच्या priorities बदलतात. आता बघू या सीज़न मधले किती नंतर पण एकत्र वेळ घालवतात.
मेघा आणि सईत तेवढं चांगलं
मेघा आणि सईत तेवढं चांगलं रिलेशन नाहीये, स पु जळतात अजूनही मेघावर. याउलट तिची स्मिताशी छान मैत्री झालीय बाहेर आणि रेशमशी पण. तशी स्मिताशी आतही होती.
काल कोण कोण काय बोलत होतं ते कळले नाही पण शिव वीणाला सांगत होता, मला मायने नाही ठेवत बाहेर गेल्यावर हे कोणी, मला तू मायने ठेवतेस, बाकी त्यांचाशी संबंध ठेवणार नाही, त्याला नावे ठेवतात त्यांच्याशी बाहेर गेल्यावर. असं काही सांगत होता.
अन्जू रुपाली चा स्वभाव इतका
अन्जू रुपाली चा स्वभाव इतका चांगला नाही आहे. पण तरिही मला वाटते वीणा ने तिला कुठेतरी खुप हर्ट केलाय म्हनूण ती अशी वागते. बिचुकले ही रुपालीला बोलले होते पण त्यांच्या शी तिचा काहीच संबध नव्हता.सो तिने ते सोडले असेल. पण वीणा चे ती खुप लाड करायची आधी. पण वीणा ने स्वत: ला तिच्या पासुन तोडले. किशोरी ताई शी पण वीणा अशीच वागली होती. पण त्यानी ते सोडून दिले.
वीणा रूपालीचे व्हायचं बरेचदा
वीणा रूपालीचे व्हायचं बरेचदा पण त्या एक व्हायच्या बरेचदा पण exactlly त्यावेळी नक्की काय झालं आठवत नाहीये. पण तरीही individual खेळ तू, एकटी बस पण त्या grpच्या आहारी जाऊ नकोस हे तिच्या भावानेच स्पष्ट सांगितलं तिला. एकंदरीत भावालाच पसंत नव्हतं ती नेहा शिवानी बरोबर गेली आणि वीणाबरोबर नाही ते. तू आता आम्हाला कुठेच दिसत नाहीयेस, दुसऱ्याचे ऐकतेयस असं त्याने सांगितलं.
किशोरी ताई शी पण वीणा अशीच वागली होती. पण त्यानी ते सोडून दिले. >>> त्यांच्यात समेट झाला नंतर. त्या माफ करतात सगळ्यांना. शिवानी वीणापेक्षा पण वाईट बोलली की त्यांना पण माफ केलं त्यांनी. नेहाला मात्र ताई आवडत नाहीत अजिबात आणि त्यांचे जमत नाही दोघींचे.
फायनल voting ट्रेंड्स ( voots ने पाठवलेले असं सांगतात vloggers) ते असे एक नं शिव आहे, दोन नेहा, तीन वीणा, चार शिवानी, पाच ताई, सहा आरोह.
आरोह आणि शिवने आपला नं पहिल्या दिवसांपासून सोडला नाहीये. मधले थोड्या फार फरकाने बदलत राहत होते. पण विनर अर्थात वरचे ठरवतील. मला तर वीणा तिसरी असून तिला खाली दाखवतील असं वाटतंय. शिव पहिला असून जिंकवतील की नाही याची खात्री नाही मला. जिंकायला हवाय तोच.
रुपाली ला बघून सरडा पण लाजतो
रुपाली ला बघून सरडा पण लाजतो .
शिव ला विनर करणार आहे त्याला
शिव ला विनर करणार, आहे त्याला खुप सपोर्ट.
त्याला तुफान voting आहेच.
त्याला तुफान voting आहेच. त्याच्यासाठी हिंदीतले फक्त रोडीज नव्हे, काही हिंदी bb विजेते यांनीही voting अपील केलं होतं. नेहा दुसरी असली तरी तिच्यात वीणात आणि शिवानी किशोरी ताईत फार फरक नसणार कारण काल वीणा दुसरी, शिवानी तिसरी आणि नेहा चौथी होती. ह्याचा अर्थ हाच की शिवला रेकॉर्डतोड voting आहे आणि बाकीचे उरलेल्यात.
शिवानी वाट बघतेय पैशाच्या
शिवानी वाट बघतेय पैशाच्या थैली ची.
पण त्यासाठी तिसरा नं असावा
पण त्यासाठी तिसरा नं असावा लागतो. वीणाला शिवानी साठी मागे ठेवणार असतील तर काही सांगता येत नाही मेकर्सचं. मागच्यावर्षी मेघा, पुष्कर, स्मिता असताना ऑफर दिलेली, आधी नाही.
सगळ्यात पहिल रुपालीला गेमच
सगळ्यात पहिल रुपालीला गेमच कळत नव्हता.आधी परागमुळे.
पराग गेल्यानंतर तिची सगळ्यात मोठी चूक ही झाली की परागसारख ती वीणाला ताब्यात ठेवायला गेली,ती स्वत:शिवशी बोलायची,त्याला तो संकेतसारखा आहे अस म्हणायची,पण वीणाने त्याला किती वेळ द्यावा,किती बोलाव ह्यावरून सतत विद घिलत राहिली,वीणिला तिब्यित ठेवण ही अशक्यप्राय गोष्ट होती, जे त्या घरात फक्त शिवला जमल.
त्या वेळी रुपालीने थोड डोक चालवून किशोरीला जवळ केल असत,वीणाला आंजारत गोंजारत जवळ केल असत,तर कदाचित राहिली असती.पण ती इतरांसमोर शिववरून वीणाला बोलत राहिली
किशोरीशी सुध्दा वीणाच फक्त किचनवरून नव्हत वाजल तर किशोरी त्यांच्या रिलेशनला टाईमपास म्हणाली होती,त्यामुळे वीणाला राग आला होता
पण नंतर किशोरीने जस जुळवून घेतल माफ करून ज्याला आरोह आणि नेहा कंन्व्हिनियंटली खेळण म्हणतात,तस रुपालीला जमल नाही,ती सरड्यासारखे रंग बदलत गेली आणि टोटल लॉस्ट झाली घरामध्ये.त्यात मर्डर मिस्ट्री टास्क मधला तिचा मूर्खपणा दाखवून ममांनी त्यावर शिक्कामोर्तब केल.
या सगळ्यात खरा गेम कोण खेळला असेल तर तो सो कॉल्ड इनोसंट शिव खेळला.केळकर,वैशालीला इच्छा नसूनही वीणाला अँक्सेप्ट करायला भाग पाडल,हीनाला वीणासाठी ठराविक अंतरावर ठेवून त्याला हव ते हीनाकडून करून घेत राहिला,जस किशोरीला नॉमिनेट करायला लावण.वीणा आपल्यापासून दूर जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली,मग अगदी त्याचे ताई,दादा,आई,सख्खी बहीण,ममां यांचे उपदेश सुध्दा धाब्यावर बसवले
वीणाला अतिशय सयंमाने हँडल केल,ती सोपी गोष्ट नव्हती,हे हीनानेही तिच्या एफ बी च्या इंटर्व्यू मध्ये सांगितल आहे.
वीणा फक्त शिवच ऐकते,हे पराग,रूपाली,किशोरी यांच्या तोंडी बरेचदा यायच.
संपूर्ण सिझनमध्ये चावण्याचा टास्क वगळता वीणाचा शिववर टीपेचि आवाज लागल्याच मी कधीच पाहिल नाही,तिचे रुसवेफुगवेही हा आवडीने सहन करायचा
आता हे प्रेम होत की त्याचा गेमप्लँन माहित नाही,पण सगळ्यांच्या गुड बुकात राहून,वीणासारख्या इंपल्सिव्ह मुलीला सांभाळून,स्वत:ला हव तस करणारा आणि आज शिवच विनर व्हावा अस मत बनवणारा शिव हाच खरा विनर आहे.
मला अस वाटत की खरा माईंड गेम शिवच खेळला,नेहा नाही.
छान पोस्ट. पण वीणाही त्याला
छान पोस्ट. पण वीणाही त्याला छान handle करायची. केळकर, वैशाली काही बोलले तरी तो वीणाला सांगायचा, येऊन रडायचा. तो तिच्याशीच comfortable होता आणि ती त्याच्याशी.
अभिजीत साठी नेहाबरोबर बळाचा वापर केला तेव्हा वीणाने त्याला nominate केलं नाही, हे बघून त्याने वैशालीला पण सुनावलं की तू केलंस nominate मला. तेव्हापासून तो वीणाच्या जास्त जवळ गेला, वीणाचं आपल्याला साथ देईल शेवटपर्यंत निदान इथे तरी हे कळून चुकलं त्याला. पण मला त्यांचे bonding फेक नाही वाटत, कोणीही कोणाचा वापर केलेला नाहीये. जर ह्याचा गेम प्लान असेल तर घरचे का घाबरले त्याच्या, त्यामुळे मला एवढं वाटत नाही. अर्थात असला तर असला पण शिव वीणा च्या छान bonding मुळे मी बघितलं bb यंदा.
मी अनसीन अनदेखा पण फक्त त्यांचेच बघते. इतके छान बोलतात, सर्व सांगतात एकमेकांना. कॉलेज, मित्रमैत्रिणी, एकमेकांचा आत्तापर्यंतचा प्रवास, तिने उल्हासनगरहून केलेला ट्रेनचा प्रवास, त्यात आमच्या डोंबिवलीचा उल्लेख, दोघांचे नातेवाईक, त्यांची नावे हे सर्व एकमेकांना माहितेय आता. एकदा शिवानीपण होती गप्पात, ती आमच्या डोंबिवलीची, तिने ट्रेनचा प्रवास सांगितला. दिवा गेल्यावर डोंबिवली येईपर्यंत कसं वाटतं हे ती डोंबिवलीकरांच्या मनातलं बोलली. आता ती सायन आणि ठाण्यात राहते.
अन्जू तू आधी पण उल्लेख केलायस
अन्जू तू आधी पण उल्लेख केलायस कि विणा शिव च्या अनसीन अनदेखा व्हिडिओ मधे ती सिंधी बोलते, मला बघायचय पण मिळतच नाहिये ते व्हिडिओ.
मी अत्ता ३१ जुलै चा व्हिडिओ बघत होते ज्यात घरच्यांना पत्र टास्क होता. सगळे पत्र लिहीताएत इमानेइतबारे, आता आरो ची बारी आली पत्र लिहायला सुरवात केली दोन ओळी नाही लिहील्या तर अगदी एकटं वाटतय म्हणून रडायला लागला, आता काय म्हणावं याला? आत्ताच ना आलास तू? कधी आला आरो?
आणि मला एक आठवत नाहीये माधव च्या घरून कोण आलं होत ? अजिबात आठवत नाहीये
धनुडी माधव अधीच out झाला होत
धनुडी माधव आधीच out झाला होत सो त्याच्या घरातून कोणिही आले नव्हते. पत्र लिहताना आरोह ला फक्त 8 9दिवस झाले होते येउन.
आरोह फारच इमोशनल आहे सारखा च रडत असतो तो
अंजू, छान पोस्ट्स.
अंजू, छान पोस्ट्स.
रूपालीला वीणाने डिच केलं असेल, तर ती (रूपाली) किशोरीला तरी कुठे धरून होती? तिथे कोणी कोणाला डिच केलं? पराग गेल्यावर किशोरीला दोघीही टाळत होत्या ना? रूपाली गेल्यावर वीणा -किशोरी matter, sort out झालं.
"मी ग्रुपच्या strategies follow करणार नाही," हे वीणा पराग असल्यापासूनच म्हणत होती.
शेवटचं रूपालीनेच वीणाला झटकून टाकलेलं. मी दमलेय, मला मी टाइम हवा, असं म्हणून. आणि हे नेहाच्या ग्रुपकडे जाऊन सांगितलं.
काल अवार्ड नाइट ची आयडिया
काल अवार्ड नाइट ची आयडिया चांगली होती.. काही(च) जुन्या लोकांनी मजा आणली. बाप्पा, दिग्या खरंच इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज आहेत. बिचुकले, सुरेखा हे पण मस्त एंटरटेन करतात.

माधव आणि बिचुकलेची एन्ट्री फनी होती. बिचुकले एकदम नटून आले होते. नाराज दिसले पण जरा. शिवानीचे काय बोलणे ऐकले त्यांनी बाहेर जाऊन? तिला आल्या आल्या सुनावले माझ्या मागून बोलतेस वगैरे
रुपाली आधीपासून डंब प्लेयर होती. घरात परत आली तेव्हाही तशीच वाटली. तसेही काही फूटेज पण देत नव्हते तिला. शिव ला बाहेर गेल्यावर तुला आम्ही कसे भेटणार असे रुपाली म्हणाली होती? जोक म्हणून म्हटली का? नसेल तर हे विनोदीच आहे मग. तिचे कसले सेलेब्रिटी स्टेटस? कुणी ओळखत पण नव्हते तिला. स्पिकिंग ऑफ दॅट मला क्युरिऑसिटी वाटते, बिबॉ नंतर कोण कुठे असेल?! नेहा, शिवानीकडे काम असेल नक्की असे दिसते. रुपालीला बिबॉव्चा काही फायदा होईल हे अनलाइकली. वीणाबद्दल पण शंकाच वाटते. अभिनयाचे, डान्स चे वगैरे काहीही टॅलेन्ट नाही. शिव चेही अॅक्टिंग मधे वगैरे काही होईल हे अवघड वाटते. १-२ रिएलिटी शो मिळू शकतील. नंतर काय ? बॅक टु डान्स स्कूल?
हिनाला फार नाही पण थोडा फार फायदा होईल बिबॉ मुळे मिळालेल्या ओळखीचा. बिचुकलेंना पण मिळेलच लाइमलाइट. पण तो ते चुकीच्या मार्गाने वापरून घेण्याची शक्यता जास्त वाट्ते. वैशालीला बिबॉ च्या फायद्याची गरज आहे असे वाटत नाही. ती एस्टॅब्लिश्ड आहे. किशोरी पण.
Tech tech baher padlele loks
Tech tech baher padlele loks parat yetat.bichukalenna don divsanpurvich send off dila na ? Ya saglyani radarad pan keli ani don divsat hajar? >>>>>>>> त्यात काय झाल? हे लास्ट सिझनलाही झाल होत. तेव्हा महाराष्ट्र दिनाला पहिल्यान्दा सदस्य आले होते, नन्तर मला वाटत शेवटच्या आठवडयात आले होते सगळेजण. कालचा एपिसोड बघण्यासारखा झालेला. पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आले होत सगळे. पण ते चार दिवस राहणार हे नाही पटल. लास्ट सिझनमध्ये सदस्य फक्त १५-२० मिनिटान्साठी आले होते.
काल अवार्ड नाइट ची आयडिया चांगली होती.. >>>>>>>> +++++++१११११११११ दिग्या आणि बाप्पाचे पन्चेस भारी होते. आरोह छान सुत्रसन्चालन करतो. पुढे जाऊन त्याला होस्टिन्गच्या ऑफर्स मिळू शकतील. पण त्याची हेअरस्टाईल अशी कशी बिघडली?
वीणा के म्हणत होती की शिवला ताई म्हटली की तुला आम्ही कसे भेटणार नंतर आम्ही तर सेलिब्रिटी आहोत वगैरे, वीणा हीना ला सांगत होती कधी झालं हे? असं असेल तर चुकलं किशोरीताई चं >>>>>>>> कोणी म्हणतय की किशोरीताई अस म्हणत होती, कोणी म्हणतय रुपाली. पण मला विणा ' तो शिवबद्दल अस म्हणाला' अस ऐकू आल होत. मला वाटल बाप्पा किव्वा केळकर असावा.
बाप्पा विणाशी बोलत होता तेव्हा शिवानीने त्याला तिकडून ओढून नेल.
शिवानी विणाला म्हणाली की एव्हीमध्ये आपण अडगळीच्या खोलीच उदघाटन केलेल दाखवल. नन्तर ती ' ओव्हरएक्टिन्ग, ओव्हरएक्टिन्ग, ओवरएक्टिन्ग दाखवली अस म्हणाली. नक्की कुणाबद्दल म्हणाली, स्वत: बद्दल की तिच्याबद्दल?
आरोहला शिवानी परवापासून इग्नोर करतेय अस मला का वाटतय? आरोह सुद्दा त्याची एव्ही बघितल्यानन्तर आधी चक्क शिव- विणाशी बोलायला गेला.
बिचुकले वैशालीला ' ज्याचा रन्ग काळा, त्याचे मन काळे' बोलला ते नाही आवडल. तरी बर तिने ते मनावर नाही घेतल.
हिना- रुपालीची एण्ट्री आवडली. हिना एवढ सगळ होऊनही ( शिवानीने पोटात लाथ मारणे), तिला मिठी मारली. टिकिट टु फायनलच्यावेळी तिला पप्पी दिली.
रुपाली शिवानीला सुप्रसिद्द दोन थेम्बवाले गुलाबजाम शिकवत होती.
मैथिली कधीच बिबॉ टाईप नव्हती. ति कालसुद्दा घुम्यासारखी बसून होती.
शिवानीचा मात्र मूड ऑफच वाटत होता, का कोण जाणे. >>>>>>>> तिचा मूड एव्ही बघितल्यापासूनच ऑफ झालाय.
ही गुदगुल्या नाही करत, बोटं मारते की खुपसते, हे परागबद्दल होतं का?
रूपालीच्या दोन थेंबवाल्या गुलाबजामवरून तसं वाटलं. >>>>>> आ? वैशालीच्या बोटं खुपसण्याचा आणि रुपालीच्या थेंबवाल्या गुलाबजामचा काय समबन्ध आहे? समजावून सान्गाल का भरत?
बाकी विणा - शिव- वैशाली- केळकरची मस्ती छान होती.
नेहाकडे पण असेल काम >>>>>> नेहाला येरे येरे पैसा ३ मिळालाय ना. शिव विणाला कदाचित वेबसिरिज मिळतील. किव्वा झी युवा काम देईल.
नेहाला ही आधी ते उंची वरून आवाज वरून नावे ठेवायचे. >>>>>> अगदी अगदी. पण जेव्हा विणा त्याला शाळा टास्कमध्ये त्याच्या दात पडण्यावरुन बोलली तेव्हा किती चिडला होता तिच्यावर. लायकी काढण्यापर्यन्त मजल गेली होती त्याची. विणा गप्प बसली, इथे मेघा असती तर त्याचीच लायकी काढली असती तिने.
अवार्ड नाइटमध्ये ' सर्वोत्कृष्ट रडूबाई' अवार्ड असायला हवा. नॉमिनेशन असे असतीलः केळकर, नेहा, आरोह.
अच्छा हो काय, मी आपली
अच्छा हो काय, मी आपली डोक्याला ताण देउन देउन आठवण्याचा प्रयत्न करत होते. मग म्हंटल इथेच विचारते एक्सपर्ट अॅडवाइस आणि रिलायबल
धन्स अमुपरी.
आरो चं मला खरंच खुप हसायला आलं त्या व्हिडिओ मधे, तुझा गेम जस्ट सुरू झालाय आणि लगेच एकटं वाटतय फॅमेलीची आठवण येउन? थोडसं डोळ्यात पाणी येइल तर तसंही नाही एकदम कंठ दाटून आला हो त्याचा.
मैथिली ला सगळ्यांनीच इग्नोर
मैथिली ला सगळ्यांनीच इग्नोर केलेलं दिसतय. कोणी तिची दखल घेतलेली दिसत नाही,
भरत thank u.
भरत thank u.
अन्जू तू आधी पण उल्लेख केलायस कि विणा शिव च्या अनसीन अनदेखा व्हिडिओ मधे ती सिंधी बोलते, मला बघायचय पण मिळतच नाहिये ते व्हिडिओ. >>> काही व्हिडीओज काढतात बहुतेक नंतर. वीणाचं आजोळ सिंधी आहेना, त्यामुळे सिंधी नातेवाईक आहेत आणि तिचे तिकडचे कझिन्स बहुतेक आसपास राहतात, कोणाची मुलं लहान आहेत आणि वीणा जास्त छोट्या मुलांच्यात रमते आणि तिची भाचे कंपनी कशी भांडते, काय करते ते सिंधी भाषेत सांगत होती शिवला म्हणजे छोटे बोलतात ते जसंच्या तसं. तसंच ती जॉब करायची तेव्हा उल्हासनगरहून तिच्याबरोबर interview ला भेटलेला आणि जॉब लागलेला मुलगा असायचा, तो सिंधी होता तर त्याच्याबरोबर काय काय गप्पा व्हायच्या ते सांगायची सिंधीत आणि त्याच्या बायकोशी पण मैत्री झालेली, ती काय बोलायची सिंधीत ते जसंच्या तसं शिवला सांगितलं होतं.
धनुडी वीणा शिवला मराठी ळ कसा म्हणायचा ते शिकवतेय, तो व्हिडीओ बघ. मी कालच बघितला, नंतर काढून टाकतील.
शेवटचं रूपालीनेच वीणाला झटकून टाकलेलं. मी दमलेय, मला मी टाइम हवा, असं म्हणून. आणि हे नेहाच्या ग्रुपकडे जाऊन सांगितलं. >>> हा बरोबर. विनाशकाले विपरीत बुद्धी.
वरती च्रप्स यांनी रुपालीचा उल्लेख बरोबर केलाय, सरड्यासारखे रंग बदलणारी.
नेहा, शिवानीकडे काम असेल नक्की असे दिसते. >>> शिवानी आत्ताही बिझी असावी बहुतेक. नेहाकडे पण असेल काम आणि पुढे कलर्स देईल. ती zee ची पण लाडकी आहे. वीणाला पण काम मिळेल तिनेही आधी स्टार प्रवाह, प्लस हिंदी मालिकेत काम केलंय, zee युवा वर केलंय असं कालच अमुपरीने लिहिलेलं तसंच त्याआधी ती asst. director होती. यातले काही मला माहिती नव्हतं पण youtube वर आहे माहिती. त्यामुळे कोणीना कोणी काम देईल, नाहीतर ती production टीम मध्ये जाईल. ती धडपडी आहे, काही नाही मिळालं तर शिकलीय, जॉब करेल. पण ज्याअर्थी वीणाला लगेच bb मध्ये पाठवलं कलर्सने, ते बघून तेच तिला काम देतील पुढे असं वाटतं.
शिवानी विणाला म्हणाली की एव्हीमध्ये आपण अडगळीच्या खोलीच उदघाटन केलेल दाखवल. >>> तेव्हा वीणा मस्त म्हणाली की मी केलं. शिवानी कारण जायला तयार नव्हती, वीणा पटकन गेली.
यावेळी बीबी च्या घरात कोणी ही
यावेळी बीबी च्या घरात कोणी ही आले तरी ते मुक्काम केल्या शिवाय जात नाहित. पाहुणे असो वा जूने सदस्य .
हो सुलू मला ही बिचुकले वैशाली ला ते बोललेल आवडले नाही. नेहाला ही आधी ते उंची वरून आवाज वरून नावे ठेवायचे.
वैशाली- वीणाचं गुदगुल्या आणि
वैशाली- वीणाचं गुदगुल्या आणि वीणाचं , "ही गुदगुल्या नाही करत, बोटं मारते / खुपसते, " हे परागबद्दल होतं का?
रूपालीच्या दोन थेंबवाल्या गुलाबजामवरून तसं वाटलं.
कालचा एपिसोड एकंदर छान होता.
आरोहला शिवानी परवापासून
आरोहला शिवानी परवापासून इग्नोर करतेय अस मला का वाटतय? आरोह सुद्दा त्याची एव्ही बघितल्यानन्तर आधी चक्क शिव- विणाशी बोलायला गेला. >>> काय दाखवलं असं एव्हीत आरोहच्या, मी बघितली नाहीये. ते एव्ही प्रकरण सगळ्यांना दाखवायला हवं सगळ्यांचे खरंतर.
भरत म्हणतायेत ते मलाही वाटलं म्हणजे पराग सांगत होता की बोटं खुपसत होती वैशाली आणि नेहा ते बरोबर असावं. वैशाली गुदगुल्या म्हणते पण बोटं खुपसायची सवय असावी तिची.
पराग नखं मारत होती असंही म्हणाला पण बोटं खुपसते हे बरोबर बोलला की काय वाटायला लागलं, काल वीणाच्या बोलण्यावरून.
मला उलट वाटलं. कारण वीणा
मला उलट वाटलं. कारण वीणा वैशालीचं हसत खेळत चाललं होतं.
ते परागला टॉंंट करत होते असं वाटलं.
रूपालीची दोन थेंब तेलावरच्या गुलाबजामची रेसिपी परागने त्याच्या you tube channel किंवा जे काही आहे, तिथे दाखवली, असं मी इथे मायबोलीवरच वाचलंय.
तेव्हा काल रूपाली त्याच्याबद्दलच बोलत होती.
Pages