मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

शिवानि चा काल वाढदिवस होता. आजच्या एपिसोड मध्ये दाखवतील कदाचित सेलीब्रेट केला असेल तर. नेहा चा पण साजरा केला होता .
मागच्या वेळी मेघा अस्ताद चे केले होते बीबी मध्ये.

बऱ्याच प्रमाणात मतं एकट्या शिवला मिळत असल्याने, hope की bb किमान जनमताचा आदर करतील, नाहीतर विश्वास गमावतील. दुसरं कोणीही असलं तरी त्याच्यात आणि पुढच्यात फार फरक नसणार. आता या बातम्यांवर votings च्या विश्वास ठेवायचा का नाही तो भाग वेगळा, पण त्याच्यासाठी सर्व रोडीजनी त्या सिझनमधल्या अपील केलंय. विदर्भात रॅलीज निघातायेत हे मात्र खरं आहे.

मागे खासदार नवनीत राणा यांनीही वोट अपील केलं होतं.

कदाचित मेघाचा voting रेकॉर्डही शिव तोडेल बहुतेक.

शिवला प्रचंड फॅन्स आहेत हे खरं आहे पण त्या वोटींग ट्रेंड्स वर विश्वास ठेऊ नका, रिलायेबल सोर्स काहीच नाहीत त्या बातम्यांना!

डिजे ++++१ हो गं, अक्षरशहः उरकलीच शिव ची जर्नी. तो ज्या टिम मधे खेळायचा तीच नेहमी जिंकायची एवढच दिसलं बिबि ला ? का जिंकायची कारण हा जिव तोडुन आणि लॉयली खेळायचा, मग कुठली का टिम असेना.

आणि तू नेहा बद्दल लिहिलयस त्याच्याशी पण सहमत.

मी पण सहमत डीजेने नेहाबद्दल लिहिलं त्याच्याशी.

हो डीजे नाही विश्वास ठेवत पण जितकं सांगत असतील त्यात 10 ,20 टक्के वजा धरलं तरी तो चांगल्या मताने पुढे असेल.

एनिवे मी ते एडिट करते, टक्के काढून टाकते त्यातले.

यात दुमत नाही , आहेच ती हुषार आणि टॉप ३ मधे येण्यासारखी.
पण मला तिच्या सेम परागसारख्या कांगावाखोर स्वभावाचा कंटाळा येतो , शिवाय फेक रडणे, कर्कश्श ओरडा, खुनशी नजर्,सुडो फेमिनिझम प्रकार .. थंब्ज डाउन ! >>>>>>

हम्म .. मला पण तिच्या आवाजाबद्दल तक्रार आहेच.. पण मला तिनी woman card खेळलं असं नाही वाटलं. काही घरातल्या आणि काही बाहेरच्या लोकांनी तिच्यावर तो आरोप केला खरा. पण मला स्वतःला असं कधी वाटलं नाही. आणि परागच्या वेळी तिनी कांगावा केलाच नव्हता. तिची reaction शांतच होती. रडणंही काही जणांना fake वाटतं. मला ती खूप emotional वाटते. त्यामुळे रडणं खोटं वाटत नाही. खुनशी नजर मात्र वाटते कधी कधी.

मी आधी तिची फॅन होते. पण नंतर तिचा एकंदरीत वावर बघून fandom कमी झाला होता माझा. मग मी इथे comments देणं पण बंद केलं. पण त्या नंतर मात्र ज्या पद्धतीनी तिनी स्वतःला बदललं, त्याला सलाम! लास्ट वीक चा जो फोटो इथे वर आहे तो सोडता तिची देहबोली इतर वेळी अगदी छान होती. छोटीशी cute धाकड मुलगी!

इतर स्पर्धकांमध्ये पण काही चांगले वाईट गुण आहेतच. पण एकुणात पाहता नेहाच मला विनर मटेरियल वाटते.

यात दुमत नाही , आहेच ती हुषार आणि टॉप ३ मधे येण्यासारखी.
पण मला तिच्या सेम परागसारख्या कांगावाखोर स्वभावाचा कंटाळा येतो , शिवाय फेक रडणे, कर्कश्श ओरडा, खुनशी नजर्,सुडो फेमिनिझम प्रकार .. थंब्ज डाउन ! >>>>>>

हम्म .. मला पण तिच्या आवाजाबद्दल तक्रार आहेच.. पण मला तिनी woman card खेळलं असं नाही वाटलं. काही घरातल्या आणि काही बाहेरच्या लोकांनी तिच्यावर तो आरोप केला खरा. पण मला स्वतःला असं कधी वाटलं नाही. आणि परागच्या वेळी तिनी कांगावा केलाच नव्हता. तिची reaction शांतच होती. रडणंही काही जणांना fake वाटतं. मला ती खूप emotional वाटते. त्यामुळे रडणं खोटं वाटत नाही. खुनशी नजर मात्र वाटते कधी कधी.

मी आधी तिची फॅन होते. पण नंतर तिचा एकंदरीत वावर बघून fandom कमी झाला होता माझा. मग मी इथे comments देणं पण बंद केलं. पण त्या नंतर मात्र ज्या पद्धतीनी तिनी स्वतःला बदललं, त्याला सलाम! लास्ट वीक चा जो फोटो इथे वर आहे तो सोडता तिची देहबोली इतर वेळी अगदी छान होती. छोटीशी cute धाकड मुलगी!

इतर स्पर्धकांमध्ये पण काही चांगले वाईट गुण आहेतच. पण एकुणात पाहता नेहाच मला विनर मटेरियल वाटते.

परागसारख्या कांगावाखोर स्वभावाचा >>>> अर्रर्र, आत्ता कळलं काय म्हणायचं होतं ते. पण माझं मत तरीही सेम आहे. मला ती खूप कांगावा करते असं नाही वाटलं. बऱ्याच वेळी तिनी अनेक गोष्टी 'इट्स ओक' म्हणून सोडून दिल्या आहेत. अभिजितचं मारणं सोडून दिलं. ममा रागावले त्याला. तिनी आवाज नव्हता उठवला. एका खेळात तिच्या हाताला लागलं होतं तेव्हा पण तिनी काहीच आवाज नाही केला.

असो!

एखाद्याचे दिसणे ,आवाज ह्यावरुन मत कसे ठरवतात लोक? ते आपल्या हातात असते का?
शिव चांगलाय यात वाद नाही पण त्यामुळे नेहा वाईटच कशी हे सिध्द करु नका. शिव जिंकणार हे नक्कि आहे कारण त्याला असलेला विदर्भातला पाठिंबा.

हि खरच काल नेहाने काय तो ड्रेस घातला होता... एरव्ही खुप छान राहते.. अन एक काल नोटिस केलं तिचे दात पण स्वच्छ दिसले. Happy
आमच्याकडे सगळ्यांना तिच आवडते..

त्या दिवशी नेहा सांगत होती तिने गाण्याच्या तिन परिक्षा दिल्यात .बिचुकले बोलले गुरु शेजारी कसे बसले. तेव्हा ती म्हणाली की तिचा आवाज आधी चांगला होता आणी ऑपरेशन नंतर बदलला आहे .
प्रेस कॉन्फरेंस च्या वेळी छान दिसत होती नेहा.

एखाद्याचे दिसणे ,आवाज ह्यावरुन मत कसे ठरवतात लोक? ते आपल्या हातात असते का? >>>

मला वाटतं डीजेने दिसण्यावर टीका नाही केली नेहाच्या. ती बरेचदा खुन्नसने बघते, ते ओरीजनल नाहीये, ती चांगलीपण बघतेकी. आवाज तिला जिथे चढवायचा असतो तिथे हाय पीच, पण शिवानीसमोर खालचा सूर अगदी. त्यामुळे तिला नीट बघता येते आणि नीट आवाजात बोलताही येतं पण ते ती करत नाही बरेचदा.

बाकी कांगावा केलाच की तिने शिवबाबत, एरवी शिवच्या जवळ जात असते की स्वत:हून, त्याने बोट दाखवलं तर लगेच वाटेल ते बोलली आणि वुमन कार्ड खेळलीच, म मां ही बोलले की तिला. नंतर शिवही वीणाला सांगत होता की.

ऑपरेशननंतर गाता गळा राहिला नसेल म्हणजे ती अगदी सुरेल असेल आधी पण नीट जेव्हा बोलते नॉर्मल तेव्हा तिचा आवाज चांगला आहे पण तिला हवं तेव्हा फार वर नेते, त्रास होण्याइतपत असतो.

नेहा जिंकते कि काय? ... कॅमेराकडे बघून खोटे खोटे रडून, लोकांना प्रोव्होक करून त्यांना आणखी बोलायला किंवा मारायला भाग पडायला लावणे.. गेम मस्त खेळली आहे .लोक पण गंडले आहेत आता.

नेहा वुमन कार्ड खेळते हा सोमि ने केलेला कांगावा आहे. उदा. परवाच्या त्या पायर्‍याटास्क मधे अंगाला हात लावू नको असे शिव ला म्हटले म्हणजे ते वुमन कार्ड का ? ते कसे काय? मी स्त्री आहे / तू पुरुष आहेस म्हणून हात लावू नको असे तर ती म्हटलेली नव्हती कधीच. अन हे तर ती हिनाला पण म्हणाली होती एका भांडणात. अंगाला हात लावू नकोस = फिजिकल होऊ नकोस, बळ वापरू नकोस. तिला पुरुष स्पर्धक वि. स्त्री स्पर्धक असा काही फरक पडतो असे कधी वाटले नाही मला.
बाकी लूक्स वरून सोमि नेहमीच ब्रुटल कमेन्ट्स करतात.
नेहापेक्षा शिव अर्थात जास्त लोकप्रिय आहे पण मला तरी तो बैल बुद्धी आणि टिपिकल वळू कॅटेगरी वाटतो. त्याला इतरांच्या किस्से, गाणी, कविता, गझला अशा गप्पा काही केल्या डोक्यात शिरत नाही म्हणून तो ५ मिनिट कोणाशी गप्पाही मारू शकत नाही असे तोच परवा म्हणाला Happy नाच आणि व्यायाम एवढेच येते त्याला. त्या पलिकडे एरव्ही अत्यन्त माठ आणि बोरिंग मनुष्य असेल असे वाटते. नो वंडर त्याची एव्ही पण तेवढीच रटाळ होती.
नेहा बुद्धीमान आणि बहुश्रुत वाटते, तिची भाषा छान आहे, सुंदर लिहिते आणि बोलते. अभिनेत्री म्हणून पण चांगली आहे ती. फॉलोअर नाही, लीडर आहे. लुक्स आणि आवाज वगैरे तिच्या हातात नाही. मला स्वतःला नेहा जास्त आवडेल विनर किंवा निदान टॉप २ मधे तरी.

नेहा बुद्धीमान आणि बहुश्रुत वाटते, तिची भाषा छान आहे, सुंदर लिहिते आणि बोलते. अभिनेत्री म्हणून पण चांगली आहे ती. फॉलोअर नाही, लीडर आहे. लुक्स आणि आवाज वगैरे तिच्या हातात नाही. मला स्वतःला नेहा जास्त आवडेल विनर किंवा निदान टॉप २ मधे तरी.>>> अगदि अगदि..

नेहा वुमन कार्ड खेळते हा सोमि ने केलेला कांगावा आहे. उदा. परवाच्या त्या पायर्‍याटास्क मधे अंगाला हात लावू नको असे शिव ला म्हटले म्हणजे ते वुमन कार्ड का ? ते कसे काय? मी स्त्री आहे / तू पुरुष आहेस म्हणून हात लावू नको असे तर ती म्हटलेली नव्हती कधीच. अन हे तर ती हिनाला पण म्हणाली होती एका भांडणात. अंगाला हात लावू नकोस = फिजिकल होऊ नकोस, बळ वापरू नकोस. तिला पुरुष स्पर्धक वि. स्त्री स्पर्धक असा काही फरक पडतो असे कधी वाटले नाही मला.
बाकी लूक्स वरून सोमि नेहमीच ब्रुटल कमेन्ट्स करतात.
नेहापेक्षा शिव अर्थात जास्त लोकप्रिय आहे पण मला तरी तो बैल बुद्धी आणि टिपिकल वळू कॅटेगरी वाटतो. त्याला इतरांच्या किस्से, गाणी, कविता, गझला अशा गप्पा काही केल्या डोक्यात शिरत नाही म्हणून तो ५ मिनिट कोणाशी गप्पाही मारू शकत नाही असे तोच परवा म्हणाला Happy नाच आणि व्यायाम एवढेच येते त्याला. त्या पलिकडे एरव्ही अत्यन्त माठ आणि बोरिंग मनुष्य असेल असे वाटते. नो वंडर त्याची एव्ही पण तेवढीच रटाळ होती.
नेहा बुद्धीमान आणि बहुश्रुत वाटते, तिची भाषा छान आहे, सुंदर लिहिते आणि बोलते. अभिनेत्री म्हणून पण चांगली आहे ती. फॉलोअर नाही, लीडर आहे. लुक्स आणि आवाज वगैरे तिच्या हातात नाही. >>>+ ११११

मी बरेच दिवस हा धागा वाचतेय, यावेळी बि बॉ मध्ये ईतकी मजा नाही आली, कोणीच विनर कॅटेगरी नाहीये. थोडीफार शिवानी होती पण तीनेही मध्येच बाहेर पडुन माती खाल्ली. तिच्या नंतर फक्त नेहा योग्य वाटते. ते टीकेट टु फिनाले बद्दल सुद्धा पब्लिक लिहीतेय की भीक , दया वगैरे पण मला असे नाही वाटत. त्या पंधरा पैकी नऊ जणांचे मन जिंकायला तुम्हाला माणुस म्हणुन देखिल चांगले असायला हवे न , असे कसे बि बॉ ईतक्या लोकांना दबाव आणतील.

त्यातही एकवेळ विणा परवडली पण शिव अगदी ईईईई कॅटेगरी वाटतो मला पण. काय बोलतो कळतच नाही, अन तो दाखवतो तसे भोळा वगैरे तर बिल्कुल नाही वाटत.

यावेळी मुळात बि बॉ ईतके आवडलेच नाही सो, वोटींग पण नाही केले कुणाला,

पण नेहामध्ये अहंमपणा खूप आहे, स्वतःलाच इतरांपेक्षा जास्त कळते... या गोष्टी बिगबॉसमध्ये ठळकपणे दिसल्या म्हणून पहिल्यांदा तिला खूप़
जणांनी नॉमिनेशन दिले होते...नंतर तिने वागणं सुधारलं म्हणजे तसे दाखवलं..मला तिने कधीच शिवानी/ माधव सोडून कोणाला जवळ केले नाही म्हणजे दुसर्याना मैत्रीचा दर्जा दिला नाही... अस काही कारण नव्हत की बाकीच्यांनी तिला अगोदर वाळित टाकले होते... पण शिवानीने कितीही
हाड-तुड केले तरी ती तिलाच प्रिफरन्स द्यायची...

आणि एक तिच वागण कधी कधी ढोंगी वाटायचं म्ह्णजे ती ढोंगीच वागायची आणि हाच मुद्दा खुपवेळा शिवानी आणि बिचुकलेने सांगितला होता...
एकदम दु:खी असताना लक्झरी बजेट मिळ्यावर आंनदी होणे, कधीही उभ न करणार्या बिचुकल्याला जाताना रडत मिठी मारणे..काहीही झालं तर
कॅमेराकडे तोंड करून कोणितरी घरच गेल्यासारख आवंडा गिळून रडणे...

त्यापेक्षा किशोरी तीन आठवड्यानंतर खूप चांगली मनापासून खेळली..तीने बिचुकले किंवा इतर खेळाडूशी कधी भेदभाव केला नाही..

धन्स अन्जू . Happy

शिवची जर्नी झटक्यात उरकवली ह्यान्नी. तो आरोहला चावला होता ते दाखवलच नाही.

नेहाला रुपाली आणी शिव ला वीणा दीली होती. आणी आता शिव वीणा च एकत्र आहेत. >>>>>>> हो. पहिल्यान्दा शिव नॉमिनेट झाला होता तेव्हा विणानेच त्याला इतरान्बरोबर मिक्स अप होण्याबद्दल समजावल होत, हे काल त्याच्या एव्हीवरुन कळल. सो, विणा त्याला सुरुवातीपासून समजून घ्यायची. शिवानी त्याला आधी तुच्छ लेखायची.

किशोरीताईचाही एव्ही बरा होता. नेहाची एव्ही कित्ती प्रेमाने बनवली ह्यान्नी.

एका सिनमध्ये नेहा कविता वाचताना हिना मला फक्त टॉवेलमध्ये दिसली.

त्याला इतरांच्या किस्से, गाणी, कविता, गझला अशा गप्पा काही केल्या डोक्यात शिरत नाही म्हणून तो ५ मिनिट कोणाशी गप्पाही मारू शकत नाही >>>>>>>> एखाद्या माणसाला किस्से, गाणी, कविता, गझला कळतात म्हणजे तो माणूस जिनियस, ग्रेट, बुद्धीमान असतो अस काही नसत. नेहा टॅलेण्टेड आहे ह्यात वादच नाही, पण शिवही त्याच्या जगात चान्गला आहे. डान्स टिचर असण्याचा, रोडीजमध्ये जाण्याचा एटिटयूड कधी दाखवला नाही त्याने.

तो खरच निरागस आहे का तस दाखवतोय ते माहित नाही. पण एक सान्गावस वाटत की त्याने बिबॉमधून बाहेर पडल्यानन्तर पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याविषयी विचार करायला हवा. इण्डस्ट्रीत टिकायच असेल तर हे करायलाच हव. तो मिळमिळीत बोलतो ते कमी करायला हवा. कधीकधी लाडात बोलतो. हा, जर त्याचा निरागसपणा खरा असेल तर इण्डस्ट्रीत राहूनही हा निरागसपणा हरवू देऊ नये त्याने. यश डोक्यात जायला नको त्याच्या. मुख्य म्हणजे व्यसने लावून घेऊ नये. असो.

बादवे, काल जाहिराती खूप होत्या का? शेवटचा सेगमेण्ट मिसला मी. नेहाची इण्टरएक्शन झाली का इतर हाउसमेटशी एव्ही दाखवल्यानन्तर? काय बोलली इतरान्शी ती?

मला आवडली शिवची पण जर्नी Happy
त्याच्याबद्दल पण खुप चांगले बोलले बिग बॉस.... आणि तो ही भारावला होता!
याउलट किशोरीची उरकल्यासारखी वाटली.... तिच्या उणीवा जास्तकरुन दाखवल्या असे मला वाटले.... तिचे ते बॅग लपवणे हायलाईट केले..... किशोरी स्वतः ही फारशी खुश दिसली नाही तिची जर्नी बघून झाल्यावर!

नेहा सतत किशोरीताईंना संधीसाधु म्हणत असते, पण तीच्या सारखी संधीसाधु आणि दांभिक घरात कोणिहि नाहि. स्वतःचं काम काढुन घ्यायला ती काय वाट्टेल ते करायला/बोलायला तयार असते. काय तर म्हणे शिवानीची एक्झिट तीच्याकरता वडिलांच्या मृत्युपेक्षा जास्त क्लेशकारक होती. सिरियस्ली? तीच्या चाहत्यांना हे खटकलं नाहि?..

आणि आता भाषेच्या संदर्भात - "आकंठ" शब्दाचा तीने केलेल्या दुरुपयोगामुळे तीची भाषेवरची पकड समजली... Proud

सुलू बरोबर, वीणानेच शिवला पहिल्यापासून समजून घेतलं, तिच्यामुळे दोनदा कॅप्टन झाला तो, ती लकी आहे त्याच्यासाठी.

बाकी नेहाचे लुक्स चांगले आहेत, आवाजही नॉर्मल आहे, पण ती लोकांना खटकेल अस दाखवते. ती ज्या ज्या वेळी सुंदर दिसली, छान नाचली, चांगली कविता केली त्या त्या वेळी मी कौतुक केलं आहे. तसं जे खटकतं तेही लिहिलं आहे, फक्त मला डीजेचं पटलं आणि तिने पर्सनल टीका केली नाही असं मला वाटलं आणि ते मी सांगायचा प्रयत्न केला.

माझा नवरा बघत नाही bb, पण त्याने शिवानी सोडून सर्वांना votes दिली, शिव वीणा मला आवडतात म्हणून जास्त आणि बाकीच्यांना 10, 10 त्यामुळे नेहा जिंकली किंवा दुसरी आली तरी आमच्या घरातून खारीचा वाटा असेल Lol

नक्कीच मला राग आला पण तो बघत नाही त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून त्याने योग्य केलं, जाऊद्या आता काय.

आणि आता भाषेच्या संदर्भात - "आकंठ" शब्दाचा तीने केलेल्या दुरुपयोगामुळे तीची भाषेवरची पकड समजली... Proud>>>>> हे कधी झालंय? संदर्भ नाही समजला

यावेळी मुळात बि बॉ ईतके आवडलेच नाही सो, वोटींग पण नाही केले कुणाला, >>>>. अगदी अगदी.. माझ्या पण डोक्यात हाच विचार आला होता. पण नंतर वाटलं की कोणीतरी जिंकणारच आहे तर आपल्याला जी स्पर्धक चांगली वाटते तिला तरी फायदा करून देऊया.. त्यामुळे नेहाला सगळी votes दिली. बाकी स्पर्धक तिच्यासमोर फिके वाटतात.

नंतर तिने वागणं सुधारलं >>> राजू७६, ह्यामुळेच ती परत चांगली वाटायला लागली. तसे सगळेच जण काळे पांढरे होतेच आणि आहेतच. पण सुधारणा फक्त नेहा आणि किशोरींमध्येच दिसते. मग ह्या दोघींमध्ये बाकी मुद्दे बघता नेहा उजवी वाटते.

आणि एक तिच वागण कधी कधी ढोंगी वाटायचं म्ह्णजे ती ढोंगीच वागायची आणि हाच मुद्दा खुपवेळा शिवानी आणि बिचुकलेने सांगितला होता... >>> मला वाटतं की शिवानी ला नेहा थ्रेट वाटायची त्यामुळे तिने हा मुद्दा (आणि असे अनेक) काढला होता. तसं कॅमेरा हलल्यावर सगळ्यांचंच थोडं लक्ष त्या हालचालीकडे जात असेल.. शिवानीने हे नेहाच्या बाबतीत मुद्दाम highlight केलं. बिचुकले काय, शिवानीच्या हो ला हो म्हणणार!

शिवानीची एक्झिट तीच्याकरता वडिलांच्या मृत्युपेक्षा जास्त क्लेशकारक होती >>> exit नाही, तिच्याबरोबर झालेलं भांडण. पण काहीही असो, हे जरा चुकीचंच होतं. पण माणूस बोलण्याच्या भरात काहीतरी वेड्यासारखं (अतिशयोक्ती अलंकार?) बोलून जातो तसं वाटलं ते. पण बिग बॉस मध्ये कोणत्याही चुका TRP साठी मोठ्या करून परत परत चर्चेत आणल्या जातात तसं काहीसं वाटलं ह्याबद्दल.

. अन हे तर ती हिनाला पण म्हणाली होती एका भांडणात. अंगाला हात लावू नकोस = फिजिकल होऊ नकोस, बळ वापरू नकोस.

स्वतः "आकंठ " बळाचा उपयोग केल्यावर दुसऱ्यांना असं काही सांगायची हिंमत होतेच कशी!
पराग किशोरीताईंच्या बेडजवळ उभा होता (चोर पोलीस) तेव्हाही नेहा कांगावा करत होती आणि परागने तिला टच पण केलं नव्हतं. नंतर खुर्ची सम्राट ला तिने पराग आणि शिवबरोबर जो प्रकार केला तो disgusting होता.
अर्थात शिव चावलेला आहे . त्यामुळे मला दोघेही होपलेस वाटतात.

सनव करेक्ट अगदी नेहासाठी. शिव चावलेल्याचा निषेधच पण तो आवडती मला.

याउलट एकदा शिवानी विणाच्या अंगावर जोरात पडून होती, वीणाला लागलं खूप तरी तिने बोंबाबोंब केली नाही.

>>आणि आता भाषेच्या संदर्भात - "आकंठ" शब्दाचा तीने केलेल्या दुरुपयोगामुळे तीची भाषेवरची पकड समजली... Proud>>>>> हे कधी झालंय? संदर्भ नाही समजला<<
पत्रकार परिषदेत. तीचं वाक्य - घराला मिस करण्याचं आकंठ दु:ख होतंय, आकंठ इच्छा वगैरे. हे ऐकुन माझाच कंठ दाटुन आला... Proud

पत्रकार परिषद नाही पाहिली. हे आकंठ दु:ख वगैरे नाही पाहिलेले. पण कधी कधी विचित्र विशेषणे (बेक्कार चिडलो, भयंकर सुंदर, इ.) अतिशयोक्ती करायला वापरतो तसे तर नव्हते ना Happy

Pages