मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

किशोरीताई जिंकल्या तर खूप आवडेल मला.
नेहासारखा violence, थरकीपणा केलेला नाही. शिव वीणा सारखं strategy म्हणून अफेअर केलेलं नाही. शिवसारख्या कोणाला चावलेल्या बिवलेल्या नाहीत. कोणाबद्दलही अपशब्द नाहीत.
त्यांच्या प्रवासाला 'वो रहनेवाली महलों की' असं नाव द्यावं लागेल. कारण इतरांच्या तुलनेत खूप मोठ्या स्टार, कायम सासर माहेरच्या सुरक्षित उच्च मध्यमवर्गीय-श्रीमंत वातावरणात राहिलेली बाई अचानक इतक्या विविध प्रकारच्या कॉमनर्स , यंग ,ओल्ड लोकांसोबत राहते. घरात कामं करते. टास्क करते. फायनलला पोचते. चॅनेल/मेकर्सचा शून्य सपोर्ट असताना केवळ पब्लिक सपोर्टवर दरवेळी नॉमिनेशन पासून वाचते. ही journey त्यांना स्वतःला खूप काही शिकवून गेली असेल.
शिवानी खरंच २२ वर्ष वयाची, कधीच कॉलेज मध्ये न जाता १६ व्या वर्षी करियर सुरू केलेली असेल तर तिचं वागणं tantrum म्हणून सोडून देता येईल. पण नेहा माधव हे ३० च्या पुढे आहेत. हीना वीणा आरोह ३० च्या आसपास असतील. आणि त्यांच्या वयाची म्हणजे ३०-३२ वर्षांची असेपर्यंत किशोरीने ऑलरेडी भरपूर success मिळवला होता. २५ च्या वयातच ती सुपरस्टार होती, शिवाय घर, मुलं , संसार सांभाळत होती. मग तुलनेत या बाकीच्यांना कसला माज आहे नेमका, केलंय काय यांनी लाईफमध्ये?
मोठे लोकच नम्र असतात हे परत एकदा दिसून आलं.

आपला तो बाब्या अन.... >>> ती बाहेर जाऊन परत आली म्हणून, बाकी पहिल्यापासून असती तर नसतं असं लिहिलं >>>

अंजुताई तुम्हाला कळलेच नाही मी काय बोलले, शिवानी जिंकणार नाही हे तर तिलाही माहीत असेल, पण तरी ती जिंकलीच तर ते बिबॉ कृपेने असे तुम्ही लिहिले . मला इतकेच म्हणायचे होते की जसा शिव त्याच्या फॅन्स मुळे जिंकू शकतो तर समजा चुकून ती जिंकली तर तेही तिच्या फॅन्स मुळे असू शकते न☺️

काल av मधून आणि आधीच्या भाषणातून बिग बॉसनी कडक अपमान केला शिवानीचा..
av मध्ये चांगलं तरी काय दाखवणार. तिचा वावर negativeच होता सिझनभर.. किंवा आपल्याला फक्त negative गोष्टीच दाखवल्या..
btw तो केक आला तेव्हा शिवानीला विशेष आनंद झालेला दिसला नाही.. एवढंच आलंय असं विचारलं तिने..

सान्वी +++११११ मला पण सेम असंच वाटलं शिवानी ची एव्ही बघताना. ती घरात गेल्यावर बोलतच नव्हती खुष नव्हती दिसत. आणि एव्ही बघताना जेव्हा तिने विणाला लाथ मारताना चा प्रसंग दाखवला तेव्हा तरी तिला स्वतः ची चूक कळली असेल का? त्यावेळेस माधव पण तिच्या वर ओरडत होता. बिबॉ ला माफीचे पत्र लिहून दिले हे बिबॉ ने सगळ्यांसमोर उघड केलं , हे अपेक्षित नव्हतं तिला बहुतेक.

|"माझी एक्झिट जशी झाली त्याच्या दहापट दिमाखात माझी रिएंट्री झाली, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच, " असं म्हटल्यावर बिग बॉस सोडणार का तिला?

तिने बिग बॉसला रिएन्ट्रीसाठी अ‍ॅप्रोच केलं होतं हे कन्फेशन रूममध्येही तिच्याकडून वदवून घेतलं होतंच.

भरत +११११
अन म्हणूनच मला नाही वाटत की बिबॉ ने तिला कधी फेवर केले असेल, काल तिची av झाल्यावर तिचा पडलेला चेहरा बघून काही क्षण वाईट वाटले, पण नंतर वाटले की ती स्वतः त्याला कारणीभूत आहे

निगेटीव्ह असणारच होती तिची AV..... त्यात काही वादच नाही पण ड्रॅमॅटिक बनवली होती..... तिचा सुरुवातीपासूनचा अभिनिवेश, अगदी पहील्या आठवड्यापासून दाखवलेला माज, कुठलीही भिडभाड न ठेवता घेतलेले पंगे, मग तिची बाहेर जाण्यासाठीची धडपड, वीकेंडच्या डावातुन अपमानित होऊन करावी लागलेली exit, परत आल्यानंतरचे सुरुवातीचे जुळवून घेणे असेल मग परत हळूहळू घेतलेले पंगे, नेहा, माधव, आरोहशी मैत्री, वीणाबरोबरच्या व्हर्बल फाईटस, मग नेहा बरोबरचे भांडण आणि समेट, फिनाले टिकीट असा सगळा जर्नी खरच eventful वाटला मला!
वीणा सारखा एकसुरी नव्हता

असो! बिगबॉस त्यांच्या विरोधात जाणाऱ्या कुणालाही सोडत नाहीत.... आणि शिवानी कशी परत आली हे सांगायला AV सारखा दुसरा मौका नाही!
त्यामुळे शिवानीचा मूड जाणे साहाजिकच होते!

आणि ती अशीच पोर्ट्रे होणार आहे बाहेर हे तिला नक्कीच माहिती असेल फक्त ते "लेखी माफी" वगैरे इतक्या उघडपणे सांगतील याची तिला अपेक्षा नसेल!

बिबॉ ने फेवर केले तर त्यात बिबॉचा फायदा काय? आणि त्यात बिबॉचा फायदा असेल तर ते फेवर कसे? त्याम्ची ती गरज असेल ना? हे लोक पैसा कमावणारे व्यावसायिक आहेत. उगीच फेवर कशाला करतील?

शिवानीचा चेहरा पडला होता पण अशीच असणार होती तिची जर्नी, या सिझनची व्हिलन एकच होती , ती म्हणजे शिवानी !
बिबॉने वर तिला अजुन एक टोमणा मारला तिला कि तिच्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीचा (अंजिक्यचा) बिगबॉस उल्लेखही करणार नाही कारण जरी इथले सदस्य बाहेरच्या आयुष्याबद्दल कॉमेंट्स करत असतील तरी बिगबॉस तसं कधीच करणार नाहीत.
वीणाची जर्नी शिवपेक्षा चांगली होती तिने वेळोवेळी घेतलेल्या पंग्यांमुळे, स्टँड्समुळे.
आरोहची बघितलीच नाही मी.
आता उरलेले २ दिवस काय दाखवणार काय माहित, उद्या पुन्हा जुने सदस्य येणार असं दिसतय, केळ्या-वैशाली-दिग्या-हिना दिसले प्रोमो मधे.

शिवानीची जर्नी बघताना एक समाधान झाल कि बिगबॉसनी ग्लोरिफाय नाही केलं, जसा बिचुकलेचा जोकर म्हणून वापर केला तसा शिवानीचा व्हिलन म्हणून, नेहाला महान बनवलं तिच्याशी बोलताना, तिच्यात झालेला बदल अंशतःच आहे आणि बाहेर जाऊन ती अशी रहावी असा टोमणा मारला, आज तर सायकोही म्हणून घेतलं बिबॉने तिला (अर्थात इतरांनी दिलेली विशेषणं सांगताना.) Proud
शिवानी श्रीसन्त बनायला आली होती हे डे १ पासून दिसत होतं पण अजिबात जमलं नाही तिला हे !
मागच्या हिन्दी सिझनची कंपॅरिझन डोक्यात आली
सुरभि राणा = शिवानी
दीपक ठाकुर= बिचुकले
दीपिका कक्कर= किशोरी
जस्लीन मथारु= हिना
रोमिल चौधरी= पराग कन्हेरे
सोमि खान = रुपाली
शिव = शिवाशीष्+करणवीर बोहरा

खर तर आज बिबॉ बघण्यात वेळ न घालवता येथे येउन मनोरंजन करून घ्यायचे ठरवले होते. पण शिवानीचा दाखवलेला प्रवास बघावा वाटतोय ईथे लिहिलेलं वाचून. नक्कीच बिबॉला मी मानाने परत आलीये हे तिचे शब्द चांगलेच टोचले असणार.

वीणा ची av
Entry
Joine Kvr group
Left kvr group
Tai tu tar boluch nako
Shiv
..
.
.
Shiv
The end

आता परत नवीन वोटिंग ट्रेंड आला आहे
1 शिव
2वीणा
3शिवानी
4नेहा
5किशोरी
6आरोह
मला नाही खरा वाटत,नेहा 2वरून 4वर,शक्यच नाही.

केक बरोबर अजिंक्य फुले किन्वा ग्रीटिंग पाठवेल असे शिवनिला वाटत होते म्हणून फक्त केक च आल्याने ती नाराज झाली ती.

शिवानीच्या निगेटीव्ह AV बद्दल सहमत.
बिबॉने तिला आधी डोक्यावर बसवून काल चांगलाच आपटलं की.
वीणाच्यावेळी ती तिच्या हिम्मतीवर फायनलला पोहचली आहे तर शिवानीच्या वेळेस ती नशिबाने असे म्हणाले बिबॉ. तेपण एकदा नव्हे तर दोनतीन वेळा.

शिवानीचा प्रवास बिबॉने दाखवला त्यानुसार ज्या प्रकरे सगळ्यांना काहीना काही सांगण्यासारखे होते तसे शिवानीला आपलयाबद्दल बोलायला काही ठेवलेच नाही बिबॉ ने... काय दाखवले विचारले तर काय सांगणार ही ........ खरं तर ममांनी सुरवातिलच तिच्या अ‍ॅटिट्यूड वरून बोलले पण बहुदा ते एवढे लक्षात आले नाही. जेव्हा शिवानीचा घरात प्रवेश झाला तेव्हा ममां म्हणाले होते..... ज्या अ‍ॅटिट्यूडने तू लीड रोलच करायचा असे म्हणते त्याच अ‍ॅटीट्युड्ने तू घरात राहणार का........ ईथेच ओळखायला हवे होते आपण शिवानीचा वावर कसा असेल ते.

सगळ्यात चांगला av नेहा चा होता 2नंबरला वीणा चा av चांगला होता.
शिव पेक्षा वीणा चा av छान वाटला.

>>>> सायको, पळून गेलेली मुलगी वगैरे? <<<<<<
बापरे, शिवानीला पण चांगलच हुमिलेट केलं की इतकं सगळं बोलून. बघायला पाहिजे हा भाग आता. बिबॉ पुर्णपणे व्यवसायिक आहेत. त्यांनी बदला घेतला एकदम. तिचे निर्णय चुकलेच मग. सॅड वाटले का कुणास ठावूक..

शिवानि ची av नेगेटिव असली तरी सगळे रंग दाखवले तिचे शिव च्या av पेक्षा छान होती. शिव ची av इतकी सो सो का बनवली बीबी ने . त्याची पण आणखीन चांगली करता आली असती.
शिवानि नी ला इतर लोकानी सायको वगैरे बोलले बीबी.
बीबी नी तिला हट्टी म्हणले.
आणी शेवटी असे बोलले की बीबी च्या घरात चमत्कार देखील होतात. त्यामुळेच अर्ध्यावर पळ काढलेली मुलगी finalist झाली.
मला नाही वाटत शिवानि ला av बघुन वाईट वगैरे वाटले. तिला अपल्या सगळ्या चुका पटल्या. मध्ये ती बीबी ला सॉरी देखील बोलली.
वीणा आणी आपल्या मधिल संघर्ष आजगायत सुरु आहे असे बीबी नी सांगितल्यावर ही ती नाही बिग बॉस आता नाही आहे असे बोलली.

आता बघायलाच हवी शिवानीची एव्ही. विणाची पण बघणार.

विणाने अनेक चांगल्या केलेल्या गोष्टी दाखवल्याच नाहीत, एनिवे तिला शेवटच्या तीनात ठेवायचं असेल, पण voting करणारे एव्ही बघून थोडी करतात, ज्यांना करायचं ते करणार, नाही ते नाही.

VB यापुढे votes असतील शिवानीला पण इथपर्यंत ती आलेलीच bb कृपेवर आहे. हे माझं वैयक्तीक मत.

बाकी यांना voting वर जिंकवायचे नसेल तर किमान फायनलचे voting बाहेर देऊ नका ना, पहिल्याच दिवसापासून, कशाला देता. बाकी दाखवतायेत त्यानुसार शिवने पहिली जागा सोडली नाहीये आणि आरोहने शेवटची, हे खरं असेल तर करा तसं, मधले बदलत रहात आहेत त्यामुळे त्यावर bb हवे ते ठेऊ शकतात.

चॅनेल आणि bb च ठरवणार असतील तर किमान शिव पुढे आहे, हे डिक्लेअर करू नका. कारण voots डिक्लेअर करते असं सांगतात आणि काल द्यायचे बंद केले, आज परत देतायेत बाहेर ही नाटकं कशाला, लोकांनी रात्रीपर्यंत voting करत रहावं हा कमर्शियल हेतू का.

VB यापुढे votes असतील शिवानीला पण इथपर्यंत ती आलेलीच bb कृपेवर आहे. हे माझं वैयक्तीक मत. >> तुमच्या मताचा आदर आहेच, शेवटी प्रत्येकाचे विचार वेगळे असतात Happy पण कालचा तिचा AV बघितल्यावर मला तरी वाटत नाही की बिबॉने तिच्यावर क्रुपा केलीच, ऊलट तिचा वापर करुन वर तीलाच अपमानित केले अस वाटले. ह्या वेळी शो असाही बकवासच होता, पण शिवानी मुळे त्यांना एक व्हिलन मिळाली त्याचा TRP मिळवला, नाही तर पुर्णच फ्लॉप शो होता, शिव विणाची लवस्टोरी तर पुर्ण फेक अन बोरींग, नेहा पण नंतर बर्यापैकी शांत झाली अन म्हणुनच बिबॉने शिवानी अन बिचुकलेला वापरले असे मला तरी वाटते.

शिवानी आणि बिचुकले दोघांचाही वापर करून घेतला बिबॉ ने यबद्दल अगदी सहमत. मला तर तिला मनी बॅग देतील असेही वाटत नाही खर तर. बघू कळेलच आता.
शिवानी ची एव्ही पाहिली मुद्दाम. भरपूर खेटरपूजा करून घेतली की बिबॉ ने! आल्यापासून वाइट अ‍ॅटिट्यूड, अग्रेशन, बिबॉ ला दिलेली कायद्याची धमकी, लेखी माफी, परत आल्यावर पण 'अंशतः' च झालेला बदल, नेहाच्या आणि नशीबाच्या जोरावर फायनल ला येणे हेच हायलाइट केले! निगेटिव कन्टेन्ट भरपूर दिला तिने, जो अर्थात हवाच असतो बिबॉ ला.
बाकी वीणा, आरोह चे पाहिले नाही. कंटाळा आला. व्हॉट अ शेम, शेवटच्या आठवड्यात दाखवायला बिबॉ कडे आणि बघायला प्रेक्षकांसाठी काहीही ड्रामा, करमणूक नाही.

विणाची बघितली एव्ही आत्ता tv वर, रिपीट होता एपिसोड.

तिच्याबद्दल छान positive कमेंट्स केल्या bb नी. तिच्या आत्मविश्वासानेच ती इथे आहे आणि तिला प्रेक्षक votes देतायेत म्हणाले आणि तिच्या individual खेळाचे कौतुक केलं . तिने प्रेक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला आणि छान खेळली असं कौतुक केलं, शेवटी बेस्ट performer म्हणून निवड झाली ह्याचंही कौतुक केलं. ती फार छान आणि गोड, ग्रेसफुल दिसली. माधव आणि बिचुकलेशी शेवटपर्यंत जमलं नाही हे सुनावलं पण शिवानीबद्दल तिला नाही सुनावलं.

तिला म मां बोलायचे तेव्हा शिवानी खुश व्हायची हेही दाखवलं, शेवटी डाव उलटला शिवानीवर आणि तिलाच नावं ठेवली गेली तेव्हा मात्र कसं वाटलं, अर्थात हे त्यात दाखवलं नाही पण विकेंड डावात दाखवलं होतं.

आता शिवानीची बघतेय. वीणा आणि तिच्यातल्या संघर्षात कोणाचीही बाजू न घेता छान सुनावलं शिवानीला पण वीणाला मात्र सुनावलं नाही तिच्या एव्ही वेळी. शिवानी नशिबाने इथे आहे जाणवून दिलं, वीणा मात्र स्वत:च्या individual खेळामुळे प्रेक्षकांची मते जिंकून आहे हे bb ने सांगितलं. वीणाच्या एव्हीत शिव किंवा शिवच्या वीणा अपरिहार्य होतं. त्या दोघांच्या नात्याबद्दल छान बोलले bb. त्या दोघांनी trp दिलेला आहेच त्यामुळे bb नी त्या नात्याला हायलाईट केलं नाहीतर केराची टोपली दाखवली असती. तरीही वीणाच्या काही गोष्टी हायलाईट करू शकले असते. त्या नाही केल्या पण ती स्वत:च्या individual खेळामुळे इथपर्यंत पोचली आणि स्वत:च्या आत्मविश्वासाने हे bb नी जाणवून दिलं तिला आणि प्रेक्षकांना हे बघून मला मात्र बरं वाटलं, thank u bb त्यासाठी.

शिवानी छान, गोड दिसत होती मात्र attitude जाणवलाच थोडा सुरुवातीला, आणि अंशत: बदल झालाय असं म्हणाले bb, खूप बदल म्हणाले नाहीत.

बिचुकले आणि तिच्या नात्याबद्दल छान बोलले मात्र bb. नेहा तुझ्यापेक्षा चांगली हे सुनावलं बरे झाले. शिवानीची जास्त निगेटिव्ह दाखवली. पण तिचे पप्पाबरोबरचे moments छान दाखवले, मलाही डोळ्यात पाणी आलं. बाकी बिचुकलेबरोबरचे दाखवलेच नाहीत. परागबरोबरचे सगळे दाखवले सीन आणि त्यात शिवानीच negative दाखवली, पराग नाही. कारण तेव्हा पराग sportingly घ्यायचा तिच्यावेळी.

शिवानीची इतकी निगेटिव्ह केली नसती पण bb ना कुठेतरी राग असणार की केवळ तिच्यामुळे शेवटचा task पूर्ण झाला नाही.

व्हॉट अ शेम, शेवटच्या आठवड्यात दाखवायला बिबॉ कडे आणि बघायला प्रेक्षकांसाठी काहीही ड्रामा, करमणूक नाही. >>> हो ना, मुळात ह्यावेळी मजा येईल असे टास्कच नाही झाले, जर ह्यांची क्रियेटीव्ह टीम चांगले टास्क देऊ शकत नाही तर ३र्या सिझनचा विचारच करु नये यांनी

यावेळी पराग ची घटना घडल्यानंतर घाबरून सगळे टास्क्स टोन डाउन केले त्यांनी. मागच्या सीझन ला कसे आधी टीम टास्क असायचे, त्यात जी विनिंग टीम असेल त्यातले २ बेस्ट परफॉर्मर्स कॅप्टनशिप साठी लढायचे. दर वेळेला लढून कॅपटनशिप मिळवावी लागायची. टास्क्स पण काय इन्टेन्स असायचे एकेक!! तो दरवाजाच्या चौकटीवर उभे रहाणे, फूड टॉर्चर वाला कोणता होता तो , एक जण मूल आणि दुसरा खेळणे होऊन उड्या मारायला लावा पळायला लावा, त्या स्किइईग च्या पट्टीवर तिघांनी उभे राहून फिरणे, हुकुम शहा, वगैरे. यावेळी सगळे नुस्ते वोटींग आणि फेवरीट्स. टिकिट टु फिनाले पण वोटिंग ने! बर्‍याचश्या टास्कना आणि त्याच्या रिजल्ट्स ला काही अर्थच उरला नाही.

हो मागच्या वेळेस जरा चांगले टास्क तरी होते, तो एक टास्क कुठचा ज्यात मेघा ने पुष्कर ला पाणी प्यायला लावून टॉयलेट ला जाउ द्यायचे नव्हतं असं काहीतरी?
नंतर ह्या गोष्टी चा खुप इशु झाला आणि त्यांच्यात जोरदार भांडणं झाली

Pages