मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

Voot वर अनसीन अनदेखा चे व्हिडिओ बघायला पण पेशन्स लागतात. प्रत्येक छोट्या क्लिप च्या आधी शाखा ची ad . आणि
स्कीप करायला किती उशीरा येतय. वैताग आला. आणि पटापट आधीच्या मेनू वर पण जाता येत नाही

काल बिगबॉखबरीने लिहिलं होतं कि ट्विटरवर , कालच्या रात्रीच्या शुटमधे २ एलिमिएशन झाली आणि उरलेलं शुट आज सकाळपासून आहे.

बिचुकल्याच्या काय अंगात आलं एकदम Uhoh बिबॉवरचा सगळा साठून ठेवलेला राग, ट्रॉफी न मिळाल्याची चिडचिड, इतर सदस्यांनी त्यांच्याबद्दल काय काय बोललय तेही पहायला वेळ मिळाला वाटतं आणि केला राडा त्यांच्या लेव्हलला येऊन !
सुरेखाताई सुध्दा उगीच मधेअधे करत होत्या , ज्याला बोलत होते तो आरोह गेला निघून आत आणि उगीच इतरांनी टेकोव्हर केला राडा !

त्यांचा मूड आल्यापासुन च दिसत नव्हता. अवार्ड नाइट मध्ये ही बिग्ग बॉस नी डोळा पळवुन नेला असे बोलले. ते बीबी वर पण नाराज होतेच. म चिडले तर काही ही बोलतात. आरोह घुबड बोलला म्हणून काय झाले. त्यानी ही सगळ्यां वर काही पण कविता केल्या होत्या ना. आणी नावे ठेवली होती.त्यात सुरेखा ताई नी आगीत तेल घातले.

आता शेवट च्या टप्प्यात खेळ आला तरी पण वीणा तोंडावर हात ठेवून
कुणाचे नाव सांगत होती अभी दादाला.

आता शेवट च्या टप्प्यात खेळ आला तरी पण वीणा तोंडावर हात ठेवून
कुणाचे नाव सांगत होती अभी दादाला. >> शिवानीच . सारखी शिवानी तिला टार्गेट करते म्हणून ती डिस्टर्ब् आहे . आता शेवटचे दोन दिवस गेस्ट आलेत तरी ती त्यांच्या समोर तिचीच बुराई करत असते म्हणून . ती म्हणतेय अरे बास ना आता शो संपायला दोनच दिवस उरलेत . तरी काय सारखं सारखं ? म्हणून ती आणि शिव दोघंच बसले होते तरी ती गुश्यात आहे . त्याच्याशी बोलत नाहीये . असं काही तरी आहे

Voot वर अनसीन अनदेखा चे व्हिडिओ बघायला पण पेशन्स लागतात. प्रत्येक छोट्या क्लिप च्या आधी शाखा ची ad . आणि
स्कीप करायला किती उशीरा येतय. वैताग आला. आणि पटापट आधीच्या मेनू वर पण जाता येत नाही

@धनुडी ..मला पण याचा वैताग येतो. पण अमॅझॉन फायर स्टिकवर वुट अ‍ॅप मध्ये जर बघीतले तर एकपण अ‍ॅड येत नाही. (का ते माहित नाही).

काल बिचुकले ला शिवने ज्या प्रकारे थांबवले ते आवडले..... शिव अश्यावेळी योग्य स्टॅंड घेतो!
बाकीचे उगीचच फुटेज घेतायत असे वाटत होते
त्या बिचुकलेला हाताचे ठसे द्यायचे नसतील म्हणून तो आधीच बाहेर गेला Wink

आज सहज म्हणून सुरुवातीच्या काही पोस्ट्स चाळत होतो.... आपले सुरुवातीला बांधलेले अंदाज/मते खरी-खोटी ठरताना बघायला मजा येते!

ही सीझनच्या दुसऱ्या/तिसऱ्या दिवशी लिहलेली पोस्ट:
Just 2 episodes are too early to predict anything about big boss
तरीपण.....
नेहा, रुपाली, वीणा आणि शिवानी आवडल्या
नेहा सुस्पष्ट वाटली विचाराने.... जरा फेमिनीस्ट आहे पण तिचे मुद्दे बरोबर होते आणि हवे तिथे लीड घेतीय
रुपालीने ज्या प्रकारे तो बिचुकलेचा "ठोकीन" वाला चॅप्टर हॅंडल केला त्यामुळे आवडून गेली ती.... मुख्य म्हणजे हलक्या कानाची नाही वाटली.... शांत पण अतिशय स्पष्ट शब्दात तिने त्या बिचुकलेला समज दिली.... त्याशिवाय तिची परागबरोबर केमिस्ट्री जुळली तर ती फार पुढेपर्यंत जाईल.... तिचे आणि परागचे संभाषण पण अतिशय मॅच्युअर आणि सहज वाटले.... सॉर्टेड वाटले दोघेही.
वीणा पण अजुनतरी समंजस आणि मिळुन मिसळुन रहाणारी वाटतेय.... ती कॅरी छान करतेय स्वताला!
शिवानीचे बोलणे मला खुप आवडले.... आल्या आल्या लीड घ्यायला आणि चर्चेत रहायला सुरुवात केलीत तिने.... गेम पण खेळतीय.... काल अभिजीतबरोबरचे प्लॅनिंग, प्लॉटींग अंगाशी येतेय म्हंटल्यावर त्याच्या टीमसमोर सगळे कबूल करुन डाव मस्त उलटवला तिने (याशिवाय आमच्या सातारची सुन होणार त्यातही आमच्या शाहुपुरीतच सासर आहे म्हंटल्यावर एक सॉफ्ट कॉर्नर आहे) पण गंमतीचा भाग सोडला तरी स्पार्क आहे तिच्यामध्ये!
बिचुकले आता जरी एंटरटेनींग वाटत असला तरी काही दिवसात इरीटेटींग होऊ शकतो.... पण एंट्रीला जो एकटा पडेल असे वाटलेले तो सध्यातरी आख्खे घर स्वताभोवती फिरवतोय या गोष्टीबद्दल त्याला फुल्ल मार्क द्यावेच लागतील
तो शिव ठाकरे फारसा आवडला नव्हता एंट्रीला पण आता जरा जरा तो त्याचा क्युट इनोसन्स दाखवायला लागला आहे.... मुख्य म्हणजे त्याला ॲटीट्यूड बिल्कुल नाहीये आणि टास्कसच्या जोरावर तो बराच पुढेपर्यंत जाउ शकतो
माधव मध्ये मला थोडी थोडी पुष्कर ची झाक जाणवत आहे.... अजुन तरी त्याच्याबद्दल फारसे काही बोलता येणार नाही
विद्याधर जोशी मार्मिक आहेत.... आपला एक कंपू बनवून किमान सीझनच्या मध्यापर्यंत तरी जाउ शकतात
किशोरी मला आवडते.... खुपच मेंटेन केलेय तिने स्वताला.... आणि सिनीयर आर्टिस्, सगळ्यांना बरोबर घेउन चालण्याचा स्वभाव यामुळे तीपण सीझनच्या किमान मध्यापर्यंत जाउ शकते

सुरेखा पुणेकर टास्क कितपत करु शकतील शंका वाटतेय आणि जरा insecured वाटल्या मला
मैथिली जावकर, दिगंबर नाईक काही एपिसोडस मध्ये बाहेर पडतील
वैशालीही मिसफीट वाटली मला या शो साठी आणि बाकी सगळ्यांमध्ये ..... She is damm good singer and she should focus more on singing
अभिजीत केळकरला बघून मला सचिन चीच आठवण येते.... तो ही फारसा टिकेल या शो मध्ये असे वाटत नाही

By the way त्या नेहा शितोळे बघून मला सारखी त्या क्षिती जोगची आठवण येतीय.... आवाजही थोडाफार तसाच वाटला
आणि वीणामध्ये कधीकधी मला तेजश्री प्रधानचा हलकासा भास झाला
अजुन कुणाला वाटले का तसे?

Submitted by स्वरुप on 29 May, 2019 - 13:41

ही सीझनचे दोन आठवडे झाल्यानंतरची पोस्ट:

गेल्या दोन तीन दिवसात सगळा बॅकलॉग भरुन काढला.... एपिसोडसचा आणि या धाग्याचाही!

>>Submitted by स्वरुप on 29 May, 2019 - 13:41
अवघ्या दोन दिवसानंतर नोंदवलेल्या बऱ्याचश्या मतांवर आज दोन आठवड्यानंतरही ठाम आहे.... फारसा फरक पडलेला नाही

वीणा जरा जास्तच आवडायला लागली आहे.... तिच्यात एक एलिगन्स आहे, एक क्लास आहे.... ती जे काही करतेय ते आवडतय (अगदी sure/not sure च्या पुसटश्या सीमारेषेवर ती जे काही खोटे बोलली त्यात पण फारसे काही आक्षेपार्ह वाटले नाही)..... गेम कितपत खेळेल आणि कशी खेळेल माहित नाही पण एक पर्सनॅलिटी म्हणून तिने चांगलेच इंप्रेस केलेय!

नेहा जबरदस्त प्लेयर आहे.... किचन सांभाळतीय, झोकून देउन टास्क करते, लूपहोल्स शोधतीय, स्टॅंड घेतीय, समोरच्याच्या ग्लॅमरने दबून न जाता (जिथे पाहिजे तिथे योग्य आदर ठेउन) ठाम विरोध करतीय, गरज असेल तिथे फारसा इगो मध्ये न आणता चटकन सॉरी म्हणून टाकतीय, शिवानीच्या रुपाने तिने आता एक मैत्रीण (सपोर्ट सिस्टीम) ही मिळवलीय आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या गेमचा आणि होस्टचा आदर करतीय, नॉमीनेशनला घाबरतीय (म्हणजेच प्रेक्षकांना गृहीत धरत नाहीये)..... थोडक्यात मागच्या वेळी मेघा ज्या ज्या गुणांमुळे जिंकली होती ते ते सर्व गुण नेहामध्ये (सध्यातरी) दिसतायत..... त्यामुळे ती आपली फेव्हरेट आहेच!

शिवानी अरोगंट असली तरी आवडतीय.... She has a strong parsonality..... तिच्याशिवाय शो अगदीच मिळमिळीत होईल.... परवा मांजरेकरांनी सुद्धा मान्य केले की शिवानी दिवसभर गप्प बसली तर शो चालणार कसा?

रुपालीने मात्र फारशी काही चमक दाखवलेली नाही.... त्या बिचुकलेंवर ओरडण्याच्या एपिसोडनंतर ती जरा हरवल्यासारखी वाटतीय
पराग एक प्लेअर म्हणून त्यातल्या त्यात बरा असला तरी माणूस म्हणून तो आवडेनासा झालाय.... तो आहे त्याच्यापेक्षा भारी प्रोजेक्ट करतोय स्वताला पण त्या चोरीच्या टास्कमध्येही आणि वकीलीच्या टास्कमध्येही तो सपशेल गंडला होता.... तो ज्या पद्धतीने इतरांना कमी लेखतोय ते नाही आवडत.... त्या तिघी त्याला आवडत नाहीत असे म्हणतोय पण अजुन एखादा ड्यूड कॅटेगरीवाला घरात आला तर परागची गम्मत बघायला मजा येईल!

वैशाली आणि अभिजीत केळकर माझ्या अपेक्षेपेक्षा चांगले खेळतायत पण किशोरी शहाणेंकडून अपेक्षाभंग झाला.... म्हणजे तश्या त्या चांगल्या आहेत पण नेहा आणि शिवानीबरोबरच्या भांडणात मला त्यांची बाजू पटली नाही
नेहा परवा एकदम कडक बोलली की या घरात रिसपेक्ट डिमांड करायचा नसतो तर कमांड करायचा असतो
परवा पण सुरेखा पुणेकरांच्या फीटनेसबद्द्लची चुगली त्यांनी मान्य करायलाच हवी होती

बाप्पा जोशी जे बोलतो ते अगदी नेमके बोलतो.... त्याचा ॲनालिसीस पण बहुतांशी पटणारा असतो.... He is going good!

मैथिली बाहेर पडली ती पडणारच होती.... माधव, दिगंबर, पुणेकर वगैरे मंडळी नॉमीनेशन मध्ये येतायत तोपर्यंत बाकीच्यांनी ताण घ्यायची फारशी गरज नाही

बिचुकले काय खेळतायत ते त्यांचे त्यांना माहित पण अजुन तरी एंटरटेन करतायत!

हे झाले गेम शो बद्दल पण अनसीन अनदेखा बघतय का कुणी?
त्यात ही सगळी माणसे एकदम वेगळीच वाटतात..... आपल्यातुपल्यासारखी नॉर्मल वाटतात (ते एक बिचकुले सोडले तर... ते दोन्हीकडेही सारखेच एंटरटेनींग/इरिटेटींग आहेत)..... नेहा, शिवानी आणि पराग मधला घोड्यांबद्दलचा संवाद, शिवानीच्या वडीलांबद्दलच्या बाप्पा जोशीबरोबर गप्पा किंवा पराग, वीणा आणि रुपालीचे गोवा प्लॅन्स आणि परागच्या स्वीडीश गर्लफ्रेंडसंबंधीच्या गप्पा ह्या सगळ्याच क्लीप्स खुप छान आहेत बघायला आणि जर ही माणसे इतर वेळा जर इतकी मिळून मिसळून रहात असतील तर आपण एपिसोडमध्ये बघतो ते खरोखर स्क्रीप्टेड वाटायला लागते!

पण मग मागच्या सीझनच्या स्पर्धकान्मधली अजुन टिकून असलेली खुन्नस बघून सगळेच काही स्क्रीप्टेड नसेल/नसावे असे म्हणून आपली समजूत काढून घेतो

पण या निमित्ताने मागच्या सीझनमध्ये या धाग्यावर भेटलेले सगळे आयडी बघून बरे वाटले
डीजे मागच्या वेळसारखीच एकदम फॉर्मात आहे
मोक्षू, स्मिता श्रीपाद, पुंबा, अंजू वगैरेना बघून मागच्या सीझनच्या धाग्यावर केलेली मज्जा आठवली
योग ला बघूनही बरे वाटले.... मागच्या सीझनला त्याच्यामुळे खुप रंगत आलेली!
मामींना मिस करतोय या धाग्यावर Happy

Submitted by स्वरुप on 11 June, 2019 - 13:31

नेहा पहील्या आठवड्यापासून आवडतीय

स्वरुप Lol

adhicha season madhe konala grand send off dila navhata bichukalensarkha mhanun mhatal .tyach pramane finale madhe nivadayla pan sagale sadasya ale navate.tyaveli phakt manjrekar ale hote.he pathopath ghadal mhanun lihil >>>>>>>> सहमत सुजा. मलाही पटल. त्या फालतू तिकिट टु फायनल टास्कला ह्यान्ना आणायला नको होत. लास्ट सिझनचे चालले असते. तसच काल बिचुकलेला आणून त्यान्नी किती मोठ्ठी चूक केली ते कळल असेलच त्यान्ना.

पण अन्जू म्हणते त्याप्रमाणे मलाही बिचुकलेच भाण्डण स्क्रिप्टेड वाटल. शो मध्ये इतक violent कधी वागला नव्हता. जर खर भाण्डण असत तर बिचुकलेने न्यूज चॅनेल्सवर शो सिक्रेटस सान्गून ( त्याच्या भाषेत सर्वान्ची लायकी काढून) शोची वाट लावली असती. एकतर बिचुकलेला डिल करुन गप्प बसवल असेल किव्वा भाण्डण स्क्रिप्टेड असेल.

काल बिचुकले ला शिवने ज्या प्रकारे थांबवले ते आवडले..... शिव अश्यावेळी योग्य स्टॅंड घेतो! >>>>>> अगदी अगदी. पण एका क्षणी तो बिचुकलेला मी मारेन म्हणाला तेव्हा भीती वाटली.

दिग्याने यावर चान्गला जोक केला , " बिचुकले, आवाज खाली करा नाहीतर घसा बन्द होईल. " Proud

सुरेखाताई सुध्दा उगीच मधेअधे करत होत्या >>>>>>>> नाही. त्या बरोबर बोलत होत्या. त्याची लायकी काढली त्यान्नी ते आवडल. त्यान्च्या तोण्डून जेल सारखा शब्द पुसटसा ऐकला.

काल बाप्पा मात्र माझ्या मनातून उतरला. कपडे सर्वान्समोर बदलत होता म्हणून सुरेखाताईन्नी त्याला अडगळी खोलीत टाकले. तेव्हा तो हसत हसत म्हणाला, शिवानीने गुडघ्याएवढी नाईटी घातलीये. नेहाने एवढीशी चड्डी घातलीये, मग मी सर्वान्समोर कपडे बदलले तर काय झाल. काहीही. जर मुलीन्नी सर्वान्समोर कपडे बदलले तर चालेल काय ह्यान्ना. मैथिलीने उगाच नाही त्याला ह्याच मुद्दयावरुन नॉमिनेट केल होत.

मैथिलीने वैशाली, केळकरविरोधात आग लावली विणाकडे तुमचीच माणसे तुझ्या आणि शिव विरोधात होती बोलून. बाई ग, असा गेम जर पहिल्यापासून खेळला असता तर पहिल्याच आठवड्यात एव्हिक्ट झाली नसती.

मला काही कळत नाही अवॉर्ड रुपालीला सुद्दा नॉमिनेट करायला हवा होता. Biggrin

केळकरने घरातून जाण्याआधी जे काही केल ते बघून डेली सोपमध्ये हिरवीण कशी घर सोडण्याआधी घरातल्या वस्तून्ना स्पर्श करुन रडते ते आठवल. फक्त बॅकग्राउण्ड म्युझिकची उणीव होती. Proud

आरोह माधवशी बोलताना ' मी दुसर्या ग्रुपशी बोलायला गेलो तर ती पझेसिव होते. बोलत नाही माझ्याशी' म्हणाला. कुणाबद्दल होत ते? शिवानीबद्दल?

लास्ट दोन एपिसोडसाठी क्रिएटिव्ह टिम बदलली होती का? छान झाले एपिसोडस. Happy शो मध्ये कण्टेण्ट नव्हता त्याची कसर ह्या दोन एपिसोडसने भरुन काढली.

स्वरुप मस्त पोस्ट!

तुमचा "नेहा " बाणा पहिल्यापासून आहे बघून मजा वाटली.

मी शिवानी पहिल्यांदा बाहेर पडते तेव्हापासून बघायला सुरवात केली.

मी वूटवर बघितला कालचा एपिसोड. बिचूकलेंनी खुपच राडा केला जाता जाता. आणि बिबि लाच बोलत होते ते डायरेक्ट माझ्या लायकीची माणसं नाही पाठवली bla bla bla आणि कुठल्या पाच जणांची complaint करायची म्हणत होते ते सुरवातीला? त्या award functionला पण गुश्श्यातच दिसत होते.
पण बिबॉ ला म्हणावं घ्या तुम्हालाच आवडतं ना अजून ठेवा त्यांना चढवून

योग्य रीझल्टस आलेत. शेवटचा पण येऊदे मनाप्रमाणे. शिवानी वीणाच्या आधी जावी हिच इच्छा होती. थँक यु bb. वीणाला तीन नं votes होते आणि दोन नं असते तरी नेहालाच पुढे नेलं असते कारण ती, नेहा, शिवानी यांना बहुतेक थोड्या फार फरकाने सेम voting आहे, कधी वीणा पुढे कधी नेहा असं व्हायचे, अर्थात शिव वीणा आवडले असतेच पण नेहासाठी पण ok मी. आता पहिला रिझल्ट मनाप्रमाणे यावा, माझा आवडतं शिव जिंकावा, गणपतीबाप्पा मोरया.

बाकी टॉप 2 कोण असणार ह्या hints bb आधीपासूनच देत असतात, गेस्ट पण सांगतात. त्यामुळे शिव नेहाच असणार हे किती दिवस माहिती होतं, पण पहिल्या नं साठी जनमतांचा आदर करावा ही विनंती bb ना.

बिचुकले आले आहेत. हिना छान दिसतेय. म मां कधी कधी फालतू जोक्स करतात.

>>वीणा इव्हिक्ट झाली<<
तीने पैसे घेउन क्विट करायची ऑफर घेतली कि नाहि. घ्यायला हवी, शिव जिंकुन सगळे पैसे आले तर ठिकंच, अन्यथा थोडे तरी पैसे एकाच घरात आले असते... Wink

मी शिवानी पहिल्यांदा बाहेर पडते तेव्हापासून बघायला सुरवात केली>> असली राडा तो उसके पेहेले था. >>> नक्कीच! शिवानीची एव्ही बघताना जाणवलं ते! Bw

बिचुकले चा राडा Lol जिथून इतके कौतुकाने निरोप दिला होता, येऊन तिथेच माती खाऊन गेला. बायदवे आरोह ने कधी घुबड म्हटले त्याला?
एकूण फिनाले आणि एव्हिक्शन्स प्रेडिक्टेबल होती. शिवानी ला मनीबॅग ऑफर नाही दिली ते बरे झाले.

आरोहच्या कृपेनी आणि मॅनीप्युलेटीव्ह जनमताधारानी शिव इथपर्यंत आला . आता यापुढे मेरिट बघायला पाहिजे.

Ganpari Bappa morya !
Only good thing about this season is finally a deserving winner Happy

Good for him! Good luck for his journey ahead.

आता ते जे घर मिळणार आहे तिथे वीणेबरोबर " नांदा सौख्यभरे ! " Bw

Pages