Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आकंठ दु:ख वगैरे म्हणतातच ना
आकंठ दु:ख वगैरे म्हणतातच ना दु:खात आकंठ बुडालेला या संदर्भाने ..... आकंठ इच्छा कशासंदर्भात वापरलेले तिने ते बघितले पाहिजे!
शिवानीची एक्झिट तीच्याकरता
शिवानीची एक्झिट तीच्याकरता वडिलांच्या मृत्युपेक्षा जास्त क्लेशकारक होती. सिरियस्ली? तीच्या चाहत्यांना हे खटकलं नाहि?..>>>>>
मला हे खटकलं नाही, कारण मी नेहाची एक व्हीडीओ क्लिप पाहिली होती. त्यात ती वडिलांबद्दल ब्रीफली बोलली आहे. तिचे आईवडील सेपरेटेड होते. आईनी एकटीनी वाढवलं आहे तिला. (वडील भेटत असत पण कसे, किती , काय संदर्भात, फायनान्सशियली सपोर्टीव्ह होते का ,ते कसे गेले वगैरे काहीच ती बोलली नाही.) ते चित्रकार होते. मनमौजी होते. थोडक्यात वडिलांच्या बॅड क्वालिटीज पण तिने चांगल्या शब्दात सागितल्या. ती ज्या प्लॅटफॉर्मवरुन बोलत होती त्यासाठी ते अतिशय योग्य होते. याउलट शिवानीशी भांडण झालं तेव्हा घरातले जवळपास सगळे तिच्या विरोधात होते, अशा वेळेला शिवानी हा तिचा एकमेव आधार होता. आणि तो पण विरोधात गेल्यावर मुळापासून उन्मळून पडल्याचं फिलींग नक्कीच आलंअसेल आणि त्या अतीव दु:खापोटी वरचे उद्गार अगदीच शक्य वाटले. अर्थातच मला थोडी का होईना हिस्टरी माहित होती त्यामुळे खटकलं नाही, हे ही खरं आहे.
https://www.youtube.com/watch?v=urUCLMXLQqg&t=250s
आकंठ . . त्याचा अर्थ गळ्याशी येईपर्यंत म्हणजेच खूप, भरपूर , शेवटच्या लिमीटपर्यंत. हा शब्द आपण जास्तीकरुन जेवणासंदर्भात वापरलेला पाहिला आहे म्हणजे तो तेवढ्यापुरताच वापरायचा असं नव्हे. तिथे जे शब्द लिहीलेले होते त्यातला खूप, भरपूर , शेवटच्या लिमीटपर्यंत या अर्थाचा तेव्हढा एकच श्ब्द असेल तो निवडून ती बोलली. हासंदर्भ तिनी सांगितला आहे. असो.
नेहाच्या दोषांचं उदात्तीकरण करत नाही. दोष हे दोषच असतात तसे ते सगळ्यांच्यात आहेतच. पण तिचे अनेकगुण ठळकपणे दिसले जे इतरांच्यात अभावानेच आढळले.
ओके आता शिव आणि नेहाबद्दल
ओके आता शिव आणि नेहाबद्दल झाले लिहून . आता वीणाबद्दाल लिहायचे का?
आपली माबो एव्ही 
वीणा मला पँपर्ड प्रिन्सेस वाटते. तिची ड्रीम बॉय ची कल्पना पण "जो माझे नखरे झेलू शकेल" अशी आहे! ( हे तिच्याच शब्दात)
अभिनेत्री म्हणून 'सुमार' यापेक्षा जास्त तारीफ करू शकत नाही. डान्स बद्दल न बोललेले बरे. ती पर्सनली माझी फेवरीट नसली तरी पण तिचे पॉझिटिव्ह पॉइन्ट्सही आहेत. ती कुणाची पत्रास न ठेवता तिला वाटते ते बिन्धास्त बोलते. खेळताना बर्यापैकी फेअर वाटते. तिला जे म्हणायचेय ते व्यवस्थित मांडता येते. जे ती बोलते त्याच्यावर फर्म रहाते. विचार बर्यापैकी क्लियर असतात. शिव बद्दल तिने तिची फीलिंग्ज अॅडमिट केली, पत्रकरांना पण आम्ही लग्न करू वगैरे सरळ सांगितले पण शिव मात्र अजून एकदाही स्पष्टपणे ठाम पणे बोलला नाहीये त्यांच्या रिलेशन बद्दल. उलट कटाक्षाने "फ्रेन्डशिप" असा शब्द वापरतो.
शिव म्हणाला ना शिवानीने tont
शिव म्हणाला ना शिवानीने tont मारल्यावर, प्यार के लिये कुछभी, आईला मनवणे हा माझ्यासाठी task आहे, टेन्शन आलंय.
पण हाच पाठीमागे लागला हे सर्वांनी बघितलं आहे, पण आता टेन्शनमध्ये, वीणा बिनधास्त हे बरोबर मैत्रेयी.
अनसीन अनदेखा वर मात्र म्हणाला मी मनवेन आईला लग्नासाठी.
मै, वीणाबद्दलच्या वरच्या
मै, वीणाबद्दलच्या वरच्या पोस्टला++१११
ती टास्कही चांगला खेळते. वेळ्प्रसंगी जास्त ताणून न धरता हार मानूनही ती खेळीमेळीत असते. भांडण झाले तरीही त्याचे रेसिड्यू न ठेवता पटकन गोडीत येते. स्वतःच्या लिमीटेशन्स ती ओळखून आहे. शिवसाठीची तिची कमीटमेंट ती बोलून दाखवते पण या बाबतीत तो सेफ राहायच्या प्रयत्नात असतो.
शिव वीणा यांच्यात विनर ठरवायचा असेल तर मी वीणाला निवडेन. शिव आवडतो पण विनर मटेरियल वाटत नाही मला.
>> म्हणजे तो तेवढ्यापुरताच
>> म्हणजे तो तेवढ्यापुरताच वापरायचा असं नव्हे.<<
जाउदे, विस्तारभयामुळे लिहित नाहि. केवळ अर्थ जुळतो म्हणुन चूकिचा शब्दप्रयोग वापरणार्याला माझ्याकडुन तरी माफि नाहि...
वीणाचा मोठ्ठा दुर्गुण म्हणजे चर्चेत्/संभाषणात ती वारंवार इंटर्जेक्ट करते. चॅटरबाक्स एक्वेळ परवडला, पण हे फार इरिटेटिंग होतं...
नेहा वुमन कार्ड खेळते हा सोमि
नेहा वुमन कार्ड खेळते हा सोमि ने केलेला कांगावा आहे. उदा. परवाच्या त्या पायर्याटास्क मधे अंगाला हात लावू नको असे शिव ला म्हटले म्हणजे ते वुमन कार्ड का ? ते कसे काय? मी स्त्री आहे / तू पुरुष आहेस म्हणून हात लावू नको असे तर ती म्हटलेली नव्हती कधीच. अन हे तर ती हिनाला पण म्हणाली होती एका भांडणात. अंगाला हात लावू नकोस = फिजिकल होऊ नकोस, बळ वापरू नकोस. तिला पुरुष स्पर्धक वि. स्त्री स्पर्धक असा काही फरक पडतो असे कधी वाटले नाही मला.>>+१११
नेहा बुद्धीमान आणि बहुश्रुत वाटते, तिची भाषा छान आहे, सुंदर लिहिते आणि बोलते. अभिनेत्री म्हणून पण चांगली आहे ती. फॉलोअर नाही, लीडर आहे. लुक्स आणि आवाज वगैरे तिच्या हातात नाही. मला स्वतःला नेहा जास्त आवडेल विनर किंवा निदान टॉप २ मधे तरी.>.+१११
मला वाटतं की शिवानी ला नेहा थ्रेट वाटायची त्यामुळे तिने हा मुद्दा (आणि असे अनेक) काढला होता. तसं कॅमेरा हलल्यावर सगळ्यांचंच थोडं लक्ष त्या हालचालीकडे जात असेल.. शिवानीने हे नेहाच्या बाबतीत मुद्दाम highlight केलं. बिचुकले काय, शिवानीच्या हो ला हो म्हणणार!>>+१११, शिवानीच्या वागण्यात बाहेरुन आल्यापासूनच नेहाबद्द्ल इन्सिक्युरिटी दिसत होती. बाप्पा आणि नंतर माधवनेही जाताना नेहाला सेफ केल्यावरतर या भावनेचा कडेलोटच झाला व त्यातून तिने हा मुद्दा काढला.
बाकी काल नेहाची एव्ही पाहिली... जियो बिग्गबॉस!
अचानकपणे वोटिंग ट्रेंड बंद
अचानकपणे वोटिंग ट्रेंड बंद झाले आहेत.वूटनेही देण बंद केल आहे.यू ट्यूबवरच्या सगळ्या रिव्ह्यू देणार्या लोकांनी सांगितल की त्यांच्याही सूत्रांकडून ट्रेंड कळत नाहीत,एकदम विनरच कळणार आहे
किशोरीला जिंकवायच आहे वाटत.
शिवानीची एव्ही पहिली दाखवायला
शिवानीची एव्ही पहिली दाखवायला हवी होती, बड्डे आहेना. शिवानी छान दिसत होती.
आरोह मस्त personality, tv mute. विणाची दाखवतील ती बघेन.
UP द्यायचे बंद केले ते बरं झालं, पण शिव जिंकायला हवाय.
अत्ता आरो ची एव्ही चालू आहे,
अत्ता आरो ची एव्ही चालू आहे, बिबॉ बळंच कौतीक करताएत. कणखर(?) म्हंटल्यावर हसूच आलं . बायको भेटून गेल्यावर रडू आलं तर बिबॉ म्हणाले कि कणखर आरोहची हळवी बाजू प्रेक्षकांना दिसली. अरे तो तर जेव्हा तेव्हा रडतो ,किती रडतो ते प्रेक्षकांना दिसलंच. त्यावरून त्याला आ रो असं नाव पण पडलय
अरे विणाच्या आधी केबल गेली,
धनुडी
टीव्ही mute ठेवलेला आ रोच्यावेळी, मग केबल गेली आणि आता विणाचे झाल्यावर चॅनेल बदलल, विणाचे पण थोडं हुकल्यामुळे उद्या voot वर बघेन.
विणाचे किती कमी दाखवलं, तिने मेघा टीमला सहज हरवलं ते दाखवलं नाही, शिवला आधार दिला, समजावलं गरज होती तेव्हा, ते दाखवलं नाही.
ठीक आहे समजून घ्यायचे, voting असलं तरी तिला तीनात घेतील की नाही शंकाच आहे.
हो, मलाही नेहमी वाटतं कि
हो, मलाही नेहमी वाटतं कि शिवपेक्षा वीणा जास्त सिरीयस आहे रिलेशनशिपमधे, शिव कनव्हिनियंट्ली आईला चालणार उत्तर देऊन बाजुला झाला तर आश्चर्य वाटणार नाही.
पत्रकारांना किंवा इतरांनाही सांगताना स्पेशल फ्रेंडशिप वगैरे शब्द वापरतो.
एक नोटीस केलं का कोणी ह्या
एक नोटीस केलं का कोणी ह्या एव्ही मधे बिबॉ पराग चा अजिबात च उल्लेख करत नाहीये. बाकीच्यांशी झालेले वाद भांडणं सगळ्यांचा उल्लेख झाला पण पराग वर मोठी फुल्ली
>> म्हणजे तो तेवढ्यापुरताच
>> म्हणजे तो तेवढ्यापुरताच वापरायचा असं नव्हे.<<
जाउदे, विस्तारभयामुळे लिहित नाहि. केवळ अर्थ जुळतो म्हणुन चूकिचा शब्दप्रयोग वापरणार्याला >>> राज, त्याबिबॉ घरात कुठेतरी काही श्ब्द ( विशेषणं ) लिहून ठेवलेली आहेत. त्यातला एक शब्द, जो तिला जे म्हणायचे आहे त्या अर्थाच्या जवळ जाणारा , तिने निवडला . आणि तसं तिनी सांगितलं देखील. असो. या विषयावर हेमाशेपो.
Btw नेहाच्या दिसण्यावर नाही
Btw नेहाच्या दिसण्यावर नाही केलेली मी कॉमेंट, ते खुनशी, मारक्या म्हशीसारखे भाव हे तिच्या नेहेमीच्या लुक्स /एक्स्प्रेशन्स, ओव्हर अॅग्रेसिव वागण्यावर आहे.
दिसायला चांगलीच आहे कि ती, ड्रेसिंग सेन्स /मेकप हेअर सेन्स भयंकर आहे हे मात्रं म्हणते मी नेहमी.
आजही वीणाची जर्नी बहुदा शिवने भरलेली किंवा बोरिंग असेल.
शिवानीची मात्र एखाद्या सिनेमाच्या स्टोरीसारखी मन लाऊन बनवलीत असा अंदाज, कारण संजुबाबाच्या बायकोने म्हंटलय तसं ‘Bad choices often make a very good story ‘
सोमि वरच्या व्लॉग्ज वर वगैरे
सोमि वरच्या व्लॉग्ज वर वगैरे असतात दिसण्यावरून कमेन्ट्स.

हो ड्रेसिंग सेन्स खरंच वाईट आहे तिचा
विणाचे किती कमी दाखवलं, तिने मेघा टीमला सहज हरवलं ते दाखवलं नाही, शिवला आधार दिला, समजावलं गरज होती तेव्हा, ते दाखवलं नाही. >> हो का? मेघाच्या आणि बाकी पाहुणे मंडळींसोबत चे टास्क्स तसेही लुटुपुटीचे होते. म्हणून असेल.ते काही इतरांच्या पण एव्हीत नाही घेतलेले बहुतेक.
शिवानीची मात्र एखाद्या सिनेमाच्या स्टोरीसारखी मन लाऊन बनवली असेल असा अंदाज >>>> हो असेल तसेच.
शिवानी सुरेख दिसतेय, ड्रेस पण
शिवानी सुरेख दिसतेय, ड्रेस पण छान दिसतोय.
डिजे ++++११११११११ तूझ्या कमेंट्स कधीच चुकीच्या वाटल्या नाहीत. आणि सभ्य भाषेतच होत्या त्या.
दिसण्यावरून सर्वात वाईट
दिसण्यावरून सर्वात वाईट ट्रोलिंग वैशालीवर केलं गेलय, पब्लिक टिपिकल गोरी म्हणजे सुंदर कॅटॅगरीत मोडतात अजुनही

खरं तर वैशालीही किती स्मार्ट, कॉन्फिडन्ट दिसते , सगळ्याप्रकारचे कपडे छान दिसतात तिला पण पब्लिक डस्की काँप्लेक्शन म्हणजे अग्ली अश्या बुरसटलेल्या मान्सिकतेचं आहे अजुनही
डीएस्के सारख्या युटुबर्सनेही अनेकदा ‘जैसी गन्दी सूरत वैसी गन्दी सोच’ प्रकारच्या कॉमेंट्स केल्या वैशालीवर, तेंव्हापासून फॉलो करणं सोडलं मी त्याचं चॅनल.
लुटुपुटीचे असले तरी सुशांतने
लुटुपुटीचे असले तरी सुशांतने कौतुक केलेलं आणि मेघा नाराज झालेली, हरली म्हणून. किशोरीताईपण म्हणाली म मां ना, मेघाला खूप लागलं हरली ते.
शिवने केलेला task दाखवला त्यावेळेचा, एनिवे सुशांत म्हणाला बुद्धीचातुर्याने जिंकला विणाकडे बघत, त्यात आलं सर्व. म मां एका वाक्यात का होईना म्हणाले की टास्कक्वीन ला हरवलं, त्यात आलं सर्व.
हो वैशालीला तर फार जास्त
हो वैशालीला तर फार जास्त ट्रोल केले गेले होते. त्या बाबतीत ऑनेस्टली इनसेन लोक पण असेच उथळ आहेत. तेही तिला एकदा म्हटले होते की "झोपताना थोडा तरी मेकप करून झोपावं ना तिने! कशी दिसते मॉर्निंग डान्स मधे" वगैरे.
नेहाच्या दिसण्याबद्द्ल मलाही
नेहाच्या दिसण्याबद्द्ल मलाही कमेंट कराविशी वाटली नाहीये. ती कुरुप दिसते म्हणून आवडत नाही असं नाहीए तर तिचं वागणं कुरुप आहे म्हणून ती आवडत नाही. एका घरात नाही पण एका नेबरहुडमध्ये राहायला किशोरी वीणा शिव च आवडतील मला. नेहा म्हणजे त्रास आहे दुसर्याना.
सहज म्हणून शिवच फेसबूक अकाउंट
सहज म्हणून शिवच फेसबूक अकाउंट बघितल आणि मग लक्षात आल की रोडिज मध्ये नाही,कारण मी ते कधीच बघत नाही,पण कुठेतरी याला पाहिल आहे आणि अचानक सह्याद्रीच्या दम दमा दम ह्या डान्स शो मधला त्याच्या अँकँडमी्या ग्रुपचा जिंकलेला फोटो समोर आला,त्यात हा होता,मी बघायचे तो प्रोग्रॅम, सह्याद्रीशी नाळ तोडवत नव्हती,पण नौतर प्रोग्रॅम बंद झाला
मग नंतर सगळे फोटोज पाहिल्यावर लक्षात आल ,बंदा स्मार्ट आहे,त्याचँया अँकँडमीमधल्या मुलांनी खूप रिअँलिटी शो मध्ये सक्सेस मिळवला आहे.
अमरावतीमध्ये शिव ठाकरे डान्स अँकँडमी फेमस आहे.
हा इव्हेंट मँनेज फिल्डमध्ये पण आहे.खूप कॉन्टँक्ट्स आहेत याचे.
आपल्या जानूसोबत पण फोटो आहे याचा.
आणि फँमिली पण वेल टू डू आहे.
पोरग हुशार दिसत आहे.
वैशालीचं सगळं करीयरच रिअ
वैशालीचं सगळं करीयरच रिअॅलिटी टीव्हीत झालंय. इतक्या वर्षात कधी कोणी तिला लुक्सवरुन ट्रोल केलं नाहीये. अगदी तिच्या सारेगमपपासून ते घर मोरे परदेसिया पर्यंत मीही तिची चाहती होते. पण इथलं वागणं वाईट होतं त्यामुळे ट्रोल केलं गेलं. खुर्ची सम्राट मध्ये नेहाची असिस्टंट बनून टोर्चर करण्याची दुर्बुद्धि तिला झाली आणि तोच तिचा डाऊनफॉल ठरला. शिवाय सतत आळशीपणा करत बसणं / झोपणं. नियम मोडायला पुढे असणं. लोक चिडले की टीका करायला लुक्सवर घसरतात पण ट्रोलिंग शिवानी-किशोरी-वीणा या सुंदर चेहर्यांचेही झालेले आहे.
हो युपी. मला काहीच माहिती
हो युपी. मला काहीच माहिती नव्हतं पण मला आवडला लगेच, रोडीज मधला येणार ऐकलं होतं पण मी रोडीज काय बघितलं पण नव्हतं.
अनसीन अनदेखा मध्ये तो वीणाला सांगत असतो सर्व, डान्स academy, रोडीज, नातेवाईक, तेव्हा समजतं. मी त्या दोघांचे बघते बरेचदा. वीणापण सगळं सांगते, मध्ये मध्ये सिंधित बोलते थोडं.
Btw शिवानी विषयी नव्या अफवा
Btw शिवानी विषयी नव्या अफवा पसरतायेत कि तिचा मधूनच जाणे हा ड्रामा होता , अशा नाट्यमय सिच्युएशनने जाईल हे आणि परत येईल हे स्क्रिप्टेड होतं, मधे जाऊन ती सिनेमाचं राहिलेल शुटींग करून आली वगैरे नव्या अफवा पसरवतय पब्लिक.

तसच पत्रकारांनाही परवा विचारलं कि परागला नाही येता आलं हिला मात्रं आणलं .
त्यावर कलर्सचे सर्वेसर्वा निखिल सानेंनी स्वतः लोकमत कि कुठल्यातरी न्युज चॅनलला इंट्रव्ह्यु देऊन सारवासारव केली आहे कि फॉरमॅटप्रमाणे ६० दिवसाच्या आत परत घेता येता, ऋतुजा स्वतः परत यायला नाही म्हंटली होती आणि सुशान्तला ६० दिवस उलटून गेलेले, बिचुकलेंनी म्हणे घरात मिनिमम दिवस काढले नाहीत इ. अनेक कारणे दिलीयेत निखिल सानेंनी हे ठळक करत कि आम्ही कोणाला फेवर करत नाही
मागच्या वर्षी म.मांनी मात्रं भलतच काहीतरी सांगितल होतं ,एकदाका बाहेरच्या जगाशी संपर्क आला कि परत घेता येत नाही , अनफेअर फॉर अदर काँटेस्टंट्स असं सांगितलं त्यांनी.
अर्थात पुढच्या वर्षी ७० व्या दिवशी कोणी परत आलं तर अजुन नवीन कारणे देतील चॅनलवाले फॉर शुअर
Honestly Insane वाल्यांनी
Honestly Insane वाल्यांनी खूपच निराश केलं अशा उथळ आणि वाईट कमेंट्सनी. त्यांचे रिव्ह्यू खूप छान होते मागच्या सिजनला.
आताचे किळसवाणे आवाज काढणं, रंगावरुन कमेंट्स करणं वगैरे बघुन मी तर त्यांना अनफाॕलो पण केलं.
Honestly Insane च्या फायनल
Honestly Insane च्या फायनल पोल रिजल्टमध्ये टॉप २ मध्ये शिव - किशोरी आहेत.
बाकी बिग बॉस खोटे रिजल्ट दाखवू शकतात पण हाच रियल पोल आहे जो लाईव्ह ओपनमध्ये केला गेला.
फिल्मचे शूटिंग फेब्रुवारीत
डीजे फिल्मचे शूटिंग फेब्रुवारीत झालं असं म्हणाली माझी भाची, किंवा भाचीचे झालं असेल तेव्हा.
सुशांत 2 दिवस तर गेलेला.
एनिवे शिव पहिला, शिवानी दुसरी असेल किंवा उलट. शिवानी अर्थात bb कृपेने.
सनव,
सनव,
ते पोल वर वोट्स आणि कॉमेंट्स करणारे ऑनेस्ट्ली इन्सेनचे फॉलॉअर्स आहेत, त्यामुळे त्यांच्याच विचारसरणीचे असणार.
अर्थात २० हजारच्या आसपास लोकांनी मत मांडलं आहे हेही खरच आणि ए टु झी सगळ्या कम्युनिटीज, चॅनल्स्नी घेतलेल्या पोल्स वर शिव टॉप वर आहे हेही तितकच खरं.
तरी मला वाटतं नेहा टॉप २ मधे येणार अॅक्चुअल चॅनलच्या रिझल्ट्स मधे ज्या प्रकारची एव्ही बनवली आहे त्यावरून.
कलर्सचे सर्वेसर्वा निखिल
कलर्सचे सर्वेसर्वा निखिल सानेंनी स्वतः लोकमत कि कुठल्यातरी न्युज चॅनलला इंट्रव्ह्यु देऊन सारवासारव केली आहे >>> काहीही आहे !!
असली वेडपट कारणं देत बसण्यापेक्षा न बोललेले बरे की !
Pages