मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

एनिवे शिव पहिला, शिवानी दुसरी असेल किंवा उलट. शिवानी अर्थात bb कृपेने. >>> वाह! हे म्हणजे, आपला तो बाब्या अन....
असो, इथल्या कमेंट्स खरेच गमतीदार आहेत. मी ह्यावेळी सगळे एपी नाही बघितलेत, पण फिनाले बघायची इच्छा होती, पण नेमका हरितालिकेचा दिवस निवडलाय ह्यांनी, गणपतीची तयारी करायची आहे सो कदाचित ते शक्य होणार नाही.पण नंतर इकडे वाचेन सगळे

वीणा झी युवा च्या युवागिरी मध्ये ही होती. युवागिरी हा कार्यक्रम झी युवा नविन सुरु झाले तेंव्हा होता.
What's up lagn मूवी मध्ये ती वैभव तत्ववादी ची बहिण झालेली.

आरोहची AV ओकेओके होती
वीणाची अगदीच सपक होती
आणि शिवानीची एकदम इव्हेंटफूल

आरोहच्या रिॲक्शन एकदम मापात होत्या
वीणाच्या खुपच ओढूनताणून आणि खोट्याखोट्या वाटल्या
शिवानी सुंदर दिसत होती ( तिची जर्नी दाखवताना जेंव्हा खालच्या चौकटीत ती दिसत होती तेंव्हा मला बऱ्याचदा अगदी सुरुवातीच्या म्हणजे अबोध वगैरे काळातल्या माधुरी दिक्षितचा भास झाला)

बिग बॉसने तिचा जर्नी दाखवताना सांगितले की शिवानी ने बिग बॉसच्या निर्मात्यांची लेखी माफी मागितली तेंव्हाच बिग बॉसने तिला घरात रिएंट्री दिली.... त्यामुळे तिचा मूड बहुतेक गेला
त्यात बिग बॉसने हेही बोलून दाखवले की शिवानी नेहाच्या भांडणात नेहाने समंजसपणाची भुमिका घेतल्यामुळे त्यांची मैत्री टिकली ..... तेही बहुतेक तिला आवडले नाही!
पण या एखाद दोन गोष्टी सोडल्या तर तिची AV पण अतिशय मन लावून आणि भरपूर मोठी बनवली होती

बिग बॉसने तिचा जर्नी दाखवताना सांगितले की शिवानी ने बिग बॉसच्या निर्मात्यांची लेखी माफी मागितली तेंव्हाच बिग बॉसने तिला घरात रिएंट्री दिली.... त्यामुळे तिचा मूड बहुतेक गेला >>> साहजिकच आहे. " मी घरात मानानी परत आलेय ( कुणाच्या मेहेरबानीनी नाही )" असा सूर तिनी काही वेळा आळवला होता. तोंडावरच आपटवलं नं बिबॉनी! मस्त!

आज चा एपिसोड नाही पहिला पण काल च्या एपिसोड मध्ये साडीत छान दिसत होती शिवानि. ती मेकअप न करता किन्वा कमी मेकअप मध्ये छान दिसते.

आपला तो बाब्या अन.... >>> ती बाहेर जाऊन परत आली म्हणून, बाकी पहिल्यापासून असती तर नसतं असं लिहिलं (आमच्या घरात पण एक शिवानी fan आहे, छोटी भाची माझी, ती बहिणीला सांगत होती शिवानीला voting कर पण बहिण माझी voting वगैरे कोणालाही करायच्याच विरोधात आहे ) तिच्यापेक्षा नेहा चालेल मला म्हणजे शिव पहिला आणि नेहा दुसरी. ती नक्कीच योग्य आहे. रादर शिवानी आणि नेहाची तुलना होऊ शकत नाही, नेहा तिला उगाच दबून राहिली, शिवानीने डाव साधला. वीणा नाही दबली.

बिग बॉसने तिचा जर्नी दाखवताना सांगितले की शिवानी ने बिग बॉसच्या निर्मात्यांची लेखी माफी मागितली तेंव्हाच बिग बॉसने तिला घरात रिएंट्री दिली.... त्यामुळे तिचा मूड बहुतेक गेला >>> अच्छा असं सांगितलं का bb नी. बाकी दिसायला ती छानचं आहे.

वीणा झी युवा च्या युवागिरी मध्ये ही होती. >>> अच्छा. स्टार प्रवाहच्या नकुशीमध्ये पण होती बहुतेक.

मी युवागिरी बघायचे तेव्हा स्नेहा, जी आता अनिकेत विश्वासरावची बायको आहे आणि अपूर्व तो मस्त होता ते anchoring करायचे. वेगळाच होता prgm म्हणजे लोकसहभाग, काहीतरी गेम्स वगैरे होते. रस्त्यावर शूट करायचे . मग मी सोडून दिलं बघणे. पण छान होता. वै त नव्हता त्यात.

नशीब वीणाबाबत एक बोलले की बरेचदा नॉमिनेशन मध्ये येऊन, प्रेक्षकांच्या voting मुळे तुम्ही इथपर्यंत आलात. खरंच एकदाही immunity नाही मिळाली तिला.

बाकी शिवानी परत आली नसती जर पराग असं वागला नसता तर, असं वाटतं. हे झाल्यावर कोणी यायला तयार नव्हतं, trp खाली गेलेला. बाकी बिचुकलेसाठी मात्र bb ने वकील वगैरे दिलेला आणि प्रयत्न करत होते लवकर आणायला असं वाचलेलं पेपरात का कुठेतरी.

फक्त मला एकच म्हणायचं आहे की तिला जर पुढे जाऊन सदस्य करून घ्यायची इच्छा होती तर मग आल्यावर गेस्ट म्हणून ठेवताना bb नी एकदा जाऊन परत आल्यामुळे सदस्य करणे आमच्या format मध्ये बसत नाही असं का म्हटलं आणि आठ दिवसांनी स्वत:चेच बोलणे का फिरवलं.

बरोबर पण आपल्याला मग सध्या सदस्य एवढंच सांगायचं ना.

बाकी शिवानी वीणाला वाटेल ते बोलली ते सर्व तिला दाखवलं. तसं शिवानीला दाखवलं का वीणा काही बोलली असेल तिच्याविरुद्ध ते, कोणीतरी सांगा. आता bb ना परत भांडणे लावायची आहेत का उरलेल्या दिवसांत.

मी time लावुन बघत होते मला तर वीणा आणि शिवानी ची same duration ची वाटली. खरंतर शिवानीच्या AV मध्ये फक्त तिचा आक्रस्ताळेपणा, आक्रमकता, घमेंड, तिची सगळ्यांबरोबर झालेली भांडणं, तिचं बाहेर जाणं, तिच्या असंख्य चुका हेच अगदी highlight केलेलं आहे.
तिची AV पाहून ती स्वतःच शर्मिनदा झाल्यासारखी वाटली मला. खूप negative होती तिची AV (तिच्यासारखीच). काहीही eventfull नाही वाटलं मला, तिचे दोषच अधोरेखित केले. बाकी सगळे आपापली क्लिप पाहून खूप खूष होते except शिवानी. Actually she deserved that...
On the contrary, विणाची AV फार काही बरी नसूनही तिने एन्जॉय केलं, खूष झाली, मला आवडते म्हणूनच ती.

सान्वी खरंच का, तसं असेल तर बघायला हवी Lol , तिला व्हिलन म्हणून प्रोजेक्ट केलं असेल तर.

विणाची AV फार काही बरी नसूनही तिने एन्जॉय केलं, खूष झाली, मला आवडते म्हणूनच ती. >>> हो हे मात्र आहे. पण शिवला खरोखर गरज असताना पाठीशी उभी राहिली ते दाखवायला काहीच हरकत नव्हती. विणाचे एक आहे मात्र फार टेन्शन घेत नाही. नेहेमी म्हणायची कधीही गेले तरी चालेन पण खेळून जाईन. त्यामुळे शेवटच्या विकेंडला का होईना म मां नी तिचे कौतुक केलं मला बरं वाटलं. बाकी एरवी तिचे कौतुक करायचं तर जीवावर यायचं त्यांच्या. ओरडायच्या वेळेला हायपर.

वीणा बरेचदा सकारात्मक विचार करताना दिसते. आजमध्ये जगणारी मुलगी आहे ती. समाधानी दिसते. त्यामुळे तिचे एवढंसं कौतुक केलं तरी खुश. अर्थात दोष खुप आहेत, अतिफटकळपणा, समोरच्याचं ऐकून न घेणं, इरीटेटींग वाटतं पण हेच शिवानीला नडायची तेव्हा मजा यायची, जबरी टफ दिली तिने मात्र.

मला पण आता शिवानीची एव्ही बघायची उत्सुकता वाटतीये. मी आपली मराठीवर बघते. तिथे यायला वेळ लागतो.

आता मलाही voot वर बघायला लागेल, लवकर टाकत नाहीत एपिसोड. उद्या बघेन. आधी शिवानीची बघून मग वीणाची बघायला हवी, कारण वीणाच्या वेळेला केबल नव्हती, अर्धवट बघितली आहे.

पहिल्या दिवशी एव्ही दाखवलेल्यात पहिले तीन नं असतील का. म्हणजे क्रमाने नाही पण पहिले तीन शिव नेहा ताई यांच्यात आणि दुसऱ्या दिवशी एव्ही दाखवली ते शेवटचे तीन असतील का. क्रम कसाही असेल पण आरोह वीणा शिवानी हे शेवटचे तीन. एक अंदाज. मागच्यावर्षी कशी एव्ही दाखवली ते आठवत नाहीये.

अच्छा, thank u डीजे. मेघासारखं कोणीच नाही यंदा. पण जर्नी बेस्ट नेहाची केली असेल तर मग ती शेवटी हवी होती ना. शिवानीची negative आहे जास्त असं लिहिलं आहे ना इथे, म्हणून म्हटलं.

शुगोल म्हणजे सुपर्ब एव्ही नेहाची होती का >>> माझ्या दृष्टीकोनातून हो!

त्याच्या क्रमाचा विनरशी संबंध असतो का नाही हे मला माहित नाही. कळेल रविवारी.

माझ्या दृष्टीकोनातून हो! >>> मस्त. मागच्यावेळी मेघाची सुपर्ब होती. शुभेच्छा नेहा fansना, अगदी मनापासून हा. मनातून शिव जिंकावा वाटत असला तरी Happy .

कळेल रविवारी. >>> हो नक्कीच.

अन्जू, धन्यवाद. दुसर्‍या आणि तिसर्‍याला पण रक्कम मिळते काय?

बाकी, आमच्या एका ग्रूपमध्ये जी एक , कलर्सच्या टेकनिकल टीम्मध्ये आहे तिने पिल्लू( उगीच) सोडलय की,
कलर्सला, नेहाला आणायचीय आणि मेकर्सना( बिबॉ) शिवला.
कलर्सचा प्लॅन आहे, नेहाला मूवीज आणि सिरियल देवु शकतो म्हणून तिची ईमेज इथून क्लीन गेली पाहिजे हा प्रयत्न आहे.
तर, बिबॉ, शिव म्हणताहेत.
शेवटी, ह्या दोन ग्रूपचे ईंटरनल वोटींग वरून ठरणार. पब्लिक मग, ‘किस झाड की पत्ती‘?
पब्लिक वोटींग कोणीच विचारत घेत नाही. उगाच पब्लिकला गुंतवून ठेवून पैसा कमवला( डिजिटल, वगैरे) की बस.

त्यामुळे, नवीन निकाल असा‘च’ असणार आहे,
१) नेहा
२) शिव
३)वीणा
४) किशोरी
५) आरोह
शिवानी मध्यरात्री किंवा शुक्रवारी रात्री बॅग ऑफर घेवून जाणार.

त्याच मैत्रीणीच्या मते, वीणाने सोडलेले पिल्लू तिलाच महागात पडू शकते जर तिने असे काही भासविले वा दर्शविले तर लग्न वगैरे. लग्नाचे प्लॅन्स टीवीवर सांगून, कोणीच मेकर्स तिला लगेच प्रोजेक्ट ऑफर करण्याआधी विचार करतील. वीणा पण तशी हुशार आहे, हवा का झोंका बघून टर्न घेणारी.
शिव आणि कायम ‘खास मैत्रीण‘ बोलून फक्त सेफ रहातोय.
त्यालाही ओफर्स मिळण्याचे चॅन्सेस ज्यास्त आहेत. येडा बनवून पेढा खाण्यात पटाईत आहे बंदा. ( इति बिबॉ स्वयःघोषित अभ्यासक एक मैत्रीण आणि तिचे डोकं. नोटः माझा इतका अभ्यास नाहि)
आत्ता , मी इथे हे मैत्रेणीचं पिल्लू सोडलय. पण माझ्या मते, सगळेच बेक्कार आहेत. तरी त्यातल्या तुकाराम म्हणीने, मी आधीच्या माझ्या पोस्टीत लिस्ट दिलीय.

फुकट सल्ला( घ्यायचा तर घ्या): वोट करण्यात वेळ घालवू नका.

दुसर्‍या आणि तिसर्‍याला पण रक्कम मिळते काय? >>> नव्हती मिळाली पण दोन लाखाचे एक स्पेशल बक्षीस स्मिताला मिळालेले, कधीही आजारी वगैरे पडली नाही यासाठी.

फुकट सल्ला( घ्यायचा तर घ्या): वोट करण्यात वेळ घालवू नका. >>> झाले देऊन, आता काय. जाउदे.

बाहेर पडल्यावर शिव वीणा काहीही करूदेत, इथे थोडाफार आनंद दिला, अति नाही आवडलं तरीही. छान bonding होतं दोघांचे. त्या जोडीची मी एक fan. बाकी करणार असतील लग्न तर शुभेच्छा, otherwise आपल्याला काय करायचं आहे, त्यांचे आयुष्य आणि त्यांचा निर्णय Happy .

बाकी बऱ्याच जणांचे पहिले तीन common दिसतायेत, क्रम कसाही असो. माझा तोच, आधी लिहिलाय, शिव वीणा नेहा.

बाकी हा सिझन शिव वीणा नावाशिवाय पूर्ण होणार नाही, हे ही तितकंच खरं.

शिव आणि विणाची प्रेमकहाणी अति टुकार आणि भुक्कड वाटत होती बघायला. प्रत्येक क्षणी फेकता जाणवत होती. लोकांना गोड वगैरे कशी वाटली ती? विणा म्हणजे दिवसभर केस गळ्यात/ डोळ्यावर घेऊन सारखं सारखं त्यात हात घालणं आणि तोच हात स्वैपाकात. यॅक वाटायचं बघायला. त्यात सतत चेह-यावर घमेंड आणि गुर्मी आणि फुसफुसणारा चेहरा आणि त्याला न शोभणा-या नाटकी मिठ्या. कुठलंच स्वच्छतेचं काम वेळेवर करायची नाही आणि केलेला
कामचुकारपणा झाकण्यासाठी कचाकचा भांडणं करायची. शिवला धरून पुढे टिकून रहायला फायदा झाला तिला नाहीतर काय शिवच्या फॅमिलीबरोबर राहील अशी वाटत नाही ती.

लोल्स ! नेहाला काय़ मुव्ही आणि सिरीयल देणार? तिच्याकडे नायिकेसाठी आवश्यक व्यक्तिमत्व नाही. खलनायिका ती ऑलरेडी शोभतेच पण त्याचा कलर्सला काय फायदा! एकवेळ शिवानीला प्रमोट करणं समजू शकेल.
तिचं ते गटणेसारखं प्राज्ञ मराठी बोलणं, शाळेने संस्कार केले म्हणणं तर विनोदी वाटतं कारण वर वर सुसंस्कृत असल्याचं , चांगल्या शाळेतून आल्याचं कितीही wrapper लावलं तरी खरी ती कशी आहे हे expose झालं आहे.

आत्ता , मी इथे हे मैत्रेणीचं पिल्लू सोडलय.
<<
शिवानी मनीबॅग नेणार हे तिच्या रिएंट्री पासूनच ऑलरेडी खूपदा खूप लोकांनी खूपदा बोलून झालय , फक्त बिबॉ मराठीत त्यासाठी टॉप ३ मधे यावं लागतं, शुक्रवारी नाही देत ऑफर , टॉप ३ पर्यंत नेतील तिला बहुदा तिला.
बाकी नेहा / शिव कि सगळ्यांना मागे टाकून किशोरीताई हे कळायला आता २ दिवस राहिले Happy

>>>> बाहेर पडल्यावर शिव वीणा.... <<<<<<
>>> नेहाला कुठला मूवी.... <<<<<<

माझी वरची पोस्ट हे माझे मत नाहिये. लोकांचे, काही ग्रूप्समधून काय तर्क-वितर्क आणि चर्चा चाललीय ते म्हणून लिहिलय ; जशी काही जणं इथे लिहितात तसेच.
बाकी, माझ्या आधीच्या पोस्ट प्रमाणे, बिबॉ हा शो मधले मला पहिल्यापासूनच बेकार वाटलेत.
बाकी, कोणी काय पण करे ना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आपल्याला काय फरक पडतो.

हीना तरी ठेवायची ह्या लिस्टीत हे वाटलेले मात्र. होती किरकिरी जराशी पण फाईट द्यायची बरी. शिवानी काढून तिला ठेवायचे ना...

>>>>शिव कि सगळ्यांना मागे टाकून किशोरीताई हे कळायला आता २ दिवस राहिले<<<

म्हणजे, माझे भविष्य खरे ठरणार, किशोरी, शिव,नेहा, ... असे.

हो झंपी मी तुम्हाला असं नाही लिहिलं, इन जनरल लिहिलं, मला समजलं की काय चर्चा ते तुम्ही लिहिताय, शिवानीऐवजी हिना हवी होती यासाठी अनुमोदन.

Pages