मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

ट्विटरवर पब्लिकच्या प्रतिक्रिया ऐकतेय कि शिवची जर्नी विनरसारखी नाही दाखवली, नेहाची मात्र विनर मटेरिअल दाखवली म्हणे.
चॅनलने फेरफार करून नेहाला जिंकवु नये म्हणजे झाल , काही सांगता येत नाही चॅनलचं.

डीजे exactlly. वीणा दुसरी असेल तरी नेहाला पुढे नेणार पण किमान पब्लिक voting चा सन्मान करून वर शिव तरी पहिला दाखवा यार bb.

अर्थात शिवची आवडली मला एव्ही पण नेहाची बघितली नसल्याने तुलना नाही करू शकत पण तिची जास्त दाखवली असं धनुडीने लिहिलं. त्यामुळे काय माहिती.

Submitted by भरत. on 28 August, 2019 - 20:12 >>> पोस्ट आवडली.

हि माझी पहिलीच पोस्ट आहे. मी पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठी पाहत आहे. आता शेवटच्या टप्प्यात आहे. पण आजवर काही लिहिले नाही वाचत मात्र होते
पण आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटली जी मी अनेक बीबी बघून व काही ग्रुप्स मध्ये राहून सांगू शकते, हे वोटिंग ट्रेंड्स सर्व खोटे असतात. अनेकदा फॅन्स मध्ये पॅनिक निर्माण करण्यासाठी खोट्या अफवा पसरवतात. इंडेमॉल असा ट्रेंड कधीच बाहेर येऊ देत नाही. सर्व अंदाज असतात.

बरेचसे खबरी त्यांच्या फोल्लोवेर्स ना खुश करण्यासाठी खोटी वोटिंग ट्रेंड देतात म्हणजे शिव्या पडणार नाहीत व फोल्लोवर वाढतील . काही जण पी आर आहेत. किशोरी, पराग व मेघाचा पी आर एकच आहे. ते एकूण वातावरण निर्मिती करतात. लोक त्याला पूर्ण फसतात त्यामुळॆ वीणा २ नंबर वर वोटिंग मध्ये आहे वगैरे वर विश्वास ठेऊ नका. विचार करा सकाळी ६ ला याना कोण ट्रेंड देते ?
शेवटी विनर ठरवताना वोटिंग शिवाय इतर अनेक गोष्टी पहिल्या जातात. विनर बाहेर काय संदेश पाठवतो, तो कसा बोलू शकतो, शो मध्ये किती काँट्रीब्युशन केले हे सर्व पहिले जाते. चॅनेल चा निर्णय हि असतो
आणि हा शो लोकांच्या भावनांवर चालतो त्यामुळे चॅनेल व प्रोड्युसर जास्तीत जास्त प्रयन्त करतात कि तुम्ही ह्यात आपल्या भावना गुंतवावया व वोट करावेत त्यामुळे अँप चे डाउनलोडस हि वाढतात. शेवटी हेच तर महत्वाचे आहे ना ? सर्वच विन विन

प्रतिसाद प्रथमच लिहीत आहे त्यामुळे काही चुकल्यास माफ करा

वेलकम मस्त मगन.

प्रतिसाद प्रथमच लिहीत आहे त्यामुळे काही चुकल्यास माफ करा >>> चांगला लिहिलाय, माफी कशाला.

अनेकदा फॅन्स मध्ये पॅनिक निर्माण करण्यासाठी खोट्या अफवा पसरवतात. इंडेमॉल असा ट्रेंड कधीच बाहेर येऊ देत नाही. सर्व अंदाज असतात. >>> अच्छा. म्हणजे voots voting डिक्लेअर करते आणि ती माहिती मिळते असं vloggers सांगतात ती अफवा असते का.

जियो बिग बॉस!
काय AV बनवलीय नेहावर..... इतका कौतुकाचा वर्षाव झाल्यावर त्यापुढे त्या ट्रॉफीची पण मातब्बरी वाटेनाशी होईल एखाद्याला!
नेहा तू जिंकलस! Happy>> अगदी अगदी.. बिग बॉस सलाम!!

ट्रेंड बद्दल नाही माहिती पण सोशल मिडिया वर शिव आणी वीणा ला जास्त सपोर्ट दिसत आहे बाकिच्या सदस्यांच्या तुलनेत.

म्हणजे नेहा जिंकणार. तसेही सगळेच बंडल आहेत.
लोकं कशाला वोट करण्यात वेळ घालवतात?

अन्जू,
बक्षिसाची रक्कम काय आहे?
गेल्या वर्षी किती होती?

अच्छा. म्हणजे voots voting डिक्लेअर करते आणि ती माहिती मिळते असं vloggers सांगतात ती अफवा असते का. >
ते पण खूप ब्रेन वॉश करतात. मी कधीच पाहत नाही .पण ट्रेंड प्रत्येक जण वेगळा देतो त्यावरूनच समजते, ज्याला फॅन्स जास्त त्याला सपोर्ट करतात म्हणजे जास्त लोकांनी पहिले कि जास्त व्युझ मिळतात, जास्त जाहिराती मग तसे पैसे. शेवटी तोही व्यवसाय आहे ना
खबरींचा एखादा चॅनेल मध्ये काम करणारा ओळखीचा असतो त्याच्याकडून माहिती मिळवतात पण तोही रोज काय शूट झाले हेच सांगतो. बाकीवोट्स निर्णय वर निर्णय सी वी घेतात ते बाहेर शूट झाल्यावरच कळते.

नेहाला ड्रेसिंग सेन्स नाही हे आज पुन्हा दाखवून दिलं तिने. आज av दाखवणार हे सगळ्यांना सकाळपासून माहीत होतं, तर छान dress up व्हायला हवं होतं तिने. हा finalists ना av दाखवण्याचा कार्यक्रम त्या contestant साठी खूप स्पेशल असतो , once in a lifetime असतो. तिने काय चेक्स ची पँट न तो टॉप घातला होता. मेघाचं dressing जबरदस्त होतं, छान प्रेसेंटेबल दिसायची सगळ्या इव्हेंट्स ला.
Still missing मेघा !

अन्जू,
बक्षिसाची रक्कम काय आहे?
गेल्या वर्षी किती होती? >>> गेल्या वर्षीची आठवत नाही. यावर्षी सतरा लाख. पंचवीस होती पण त्यातले आठ घालवले सगळ्यांनी, नॉमिनेशन task पूर्ण झाला नाही नीट म्हणून.

मेघाचं dressing जबरदस्त होतं, छान प्रेसेंटेबल दिसायची सगळ्या इव्हेंट्स ला.
Still missing मेघा ! >>> हो करेक्ट आणि स्मितापण तशीच असायची अगदी. मला दोघींची आठवण येते.

उत्तरासाठी धन्यवाद, मस्त मगन.

मी कधीच पाहत नाही .पण ट्रेंड प्रत्येक जण वेगळा देतो त्यावरूनच समजते >>> मी दोन तीन बघते त्यांनी सेम दिलेले वाटले. Act riders, bollywood spy आणि honestly insane.

काय AV बनवलीय नेहावर..... इतका कौतुकाचा वर्षाव झाल्यावर त्यापुढे त्या ट्रॉफीची पण मातब्बरी वाटेनाशी होईल एखाद्याला!

नेहा तू जिंकलस!>>> व्वा! बघीतलं नाहीये अजून...बघतो आता..बाकी शिवची बघण्यात ईंटरेस्ट आहे पण वीणा असेलच जागोजागी सो स्कीप करावी लागेल...त्यांचे सो कॉल्ड प्रेमाचे पांचट चाळे पुन्हा बघायचे एवढं धैर्य नाहीये या पामरात.

काय AV बनवलीय नेहावर.....>>> अक्षरशः! अत्यंत उच्च अभिरुचीसंपन्न ! गो गर्ल!

एवढ्या दिवसात प्रथम बिबॉ चं अभिनंदन करावसं वाट्तंय! काय अफलातून काम केलंय बिबॉ तुम्ही!

ह्या वर्षीच्या विनरला हिंदी bb मध्ये पाठवणार असाल तर मधेच पाठवू नका, पुढच्या वर्षी पाठवा. किंवा यंदा पहिल्यापासून पाठवा. मेघाला खरं यावर्षी पहिल्यापासून पाठवायला हवं होतं.

कसे शक्य आहे अंजु- हिंदी बीबॉ सप्टेंबर मध्ये सुरु होतंय, इकडचा विनर डायरेक्ट तिकडे कसे तयार होतील घरापासून दूर राहायला आणखी 3 महिने:)

हो बरोबर. पण मध्ये पाठवतात ना wild card, तसं नकोच मग यंदा. पुढच्या सिझनला contestant म्हणून पाठवावं. शिव जिंकला तर योग्य आहे हिंदीसाठीपण.

विणाला 'शिव नसता तर तू कुणाशी मैत्री केली असतीस' विचारल, तिने काय उत्तर दिल? >>> मला ह्याचं कोणी उत्तर दिलेलं दिसलं नाही. ती म्हणाली जे आहे समोर त्याचाच विचार करते मी. ते नसतं तर असं झालं असते, तसं झालं असते हा विचार नाही करायचा मला. अगदी शब्द आठवत नाही पण आशय हाच.

नेहाची एव्ही चांगली होती. बिग बॉसनी तिचीच कविता वापरली. तिच्या प्रवासात अनेक उतार चढाव होते, त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आल्या.
तुलनेने शिव आणि किशोरीच्या एव्हीत डायमेन्शन्स कमी होते.
किशोरी तुळशीशी बोलायची हे आजच कळलं.
आज पण हेच असेल.

Neha the best! Hands down!

Talented! A friend one would love to have on their side!

बिबॉने शेवटपर्यंत आपला पार्शल अ‍ॅटीट्युड सोडला नाही, आज नेहा शितोळेची एकटीचीच जर्नी बिगबॉसने अतिशय मन लाऊन सर्वात मोठी आणि इंटरेस्टींग बनवली होती, प्रत्येक शब्द न शब्द कौतुकाने ओथंबून वहाणारा , खास नेहाला अपिल होईल अशा अलंकारीक भाषेत बनवलेला होता !
सांगता करतानाही ‘काटेकरबाई, बिगबॉसचा हा गेमही तुम्ही सेक्रेड्ली खेळलात‘ , आज नेहा धन्य झाली असेल आणि तिचे फॅन्सही !
मागच्या वर्षी जशी मेघाची स्तुति झाली, त्यापेक्षा थोडी जास्तच बिबॉकडून नेहाची झाली , ऑनेस्ट्ली मला नाही वाटत नेहा इतकी स्तुति डिझर्व करते म्हणून.
असो, आता आजच्या एपिसोडच्या हिंटवरून समजून घ्यायच झालं तर नेहाच बिबॉच्या पसंतीची विनर दिसत आहे.

या विरुध्द सर्वात बेकार, उरकलेली जर्नी शिवची !
किशोरीचीही जर्नी शिवपेक्षा खूप चांगली होती, शिवकडे ना बिबॉकडे फार कौतुकाचे शब्द होते, ना काही स्पेशल एव्ही !
यावरून एक दिसतय कि ज्या स्पर्धकांचे छळ होत नाहीत, एकटे पडत नाहीत, टार्गेट होत नाहीत, मैत्रीत धोका होत नाही, ढसाढसा रडून खचून जायचे प्रसंग येत नाहीत त्यांची एव्ही शिव सारखी उरकली जाणार , मग पब्लिकचा पाठिंबा कोणालाका असेना Happy
किशोरी ,नेहा , मागच्या वर्षी मेघा यांना वरचे सगळे प्रसंग अनुभवाय्ला मिळाले म्हणून त्यांची जर्नी स्पेशल !

शिवची एव्ही उरकली वगैरे काही नाही. आताजो वावर त्याचा होता तेच दाखवणार ना. कंटेंटेड गोष्टी सगळ्या होत्याच की त्यात. एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्याच्या एव्हीत निम्मा वेळ वीणाच दिसली मला. Sad

Shiv did nothing but run after Veena... what else was there to show? They showed how their love story started and how strong it is going.... other than that what did he really do?

आणि शिवची जर्नी पण तशी प्लेन आहे. फारा चढउतार नाहीत त्यात
<<
हो म्हणुनच म्हंटलना छळ होत नाही तोवर जर्नी इंटरेस्टींग नाही.
तरी त्याची टास्क्स , वैशाली आणि केळ्याबरोबरच्या बाँड बद्दल स्पेशल मोमेंट्स अजुन दाखवता आल्या असत्या, ते टास्क जिथे गुडघे बांधून जेलच्या भिंतीवर केळ्याच्या मागे चढला होता , हिना बरोबर डान्सेस,तिच्याबरोबर व्यायाम हे दाखवता आलं असतं,पण त्याच्या जर्नीत फक्तं वीणाच वीणा !

माझ्यासाठी नेहाच विनर आहे. ती प्रचंड हुशार आहे. खूपच जीव लावून खेळली आहे ती. अगदी मनापासून. तिनी कधीही मैत्रिणीला दगा नाही दिला. माधव च्या जाण्यासाठी ती कधीच कारणीभूत नव्हती. तो स्वतःच्या कर्माने गेला. शिवणीचा कांगावा हा फक्त TRP साठी केलेला stunt वाटला मला.

माझा क्रम:

नेहा
शिव
किशोरी
आरोह
वीणा
शिवानी

. ती प्रचंड हुशार आहे. खूपच जीव लावून खेळली आहे ती. अगदी मनापासून. तिनी कधीही मैत्रिणीला दगा नाही दिला. माधव च्या जाण्यासाठी ती कधीच कारणीभूत नव्हती. तो स्वतःच्या कर्माने गेला. शिवणीचा कांगावा हा फक्त TRP साठी केलेला stunt वाटला मला.
<<
यात दुमत नाही , आहेच ती हुषार आणि टॉप ३ मधे येण्यासारखी.
पण मला तिच्या सेम परागसारख्या कांगावाखोर स्वभावाचा कंटाळा येतो , शिवाय फेक रडणे, कर्कश्श ओरडा, खुनशी नजर्,सुडो फेमिनिझम प्रकार .. थंब्ज डाउन !

नेहा ची एव्ही खरोखर मस्त होती. अजिबात कंटाळा आला नाही बघताना. तिच्या एव्ही सगळे इमोशन्स होते राग चिडणे प्रेम मैत्री भांडण .
शिव च्या एव्ही त फक्त वीणा च होती बाकी काही नाही.

काल शिव ची एव्ही बघुन आठवले पहिल्या आठवड्यात शिव आणी नेहा जेंव्हा कैप्टनसी साठी उमेदवार होते तेंव्हा प्रत्येकाला एक प्रतिनिधी दिला होता. नेहाला रुपाली आणी शिव ला वीणा दीली होती. आणी आता शिव वीणा च एकत्र आहेत.

किशोरी तुळशी शी गप्पा मारायच्या हे एपिसोड मध्ये ही दाखवले होते. रुपाली पण मारायची तुळशी शी गप्पा.

काल चा एपिसोड पुर्ण स्किप..बघितलाच नाही.. 3 महीने आधीच स्वताचा छळ मी केलाय..परत तेच का बघायचं अस झाल..

Pages