मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

बिबॉ म्हणाले की गार्डन एरियात पहिल्यांदाच पत्रकार परिषद असल्याने वेगळेपणा आलेला आहे (?) म्हणजे? काय वेगळे होणार होते?>>होना .... काहिपण होत ते Lol या वर्षी तसही activity area जास्त दिसलाच नाही.. काय तो कबड्डी टास्क पुरताच मला वाटत वापरला

शिव हा रोडीज मध्ये असल्याने हिंदी ओडियन्सला माहिती आहे,
टास्क मस्त खेळतो,
जिंकला तर हिंदी बिग बॉस साठी आयता उमेदवार आहे चॅनेल कडे!
बादवे, विदर्भात ग्रुप वोटिंग , कॅम्पपेन होत आहेत शिव साठी !
पुण्या मुंबईत असे होत नाही

माझा क्रम खालीलप्रमाणे. सगळेच टास्कस चांगले करतात पण मला त्यांच्यामध्ये तुलना करताना खालील मुद्दे महत्वाचे वाटतात.

१. किशोरी - हिच्या बिगबॉसमधला प्रवासात खूप हेलकावे होते. सुरुवातीला ही ग्रुपने निर्णय घ्यायची.. नंतर तिला वेगळे पाडल्यावर ती थोडे दिवस चाचपडत राहिली पण नंतर ती स्वतंत्र्यपणे खेळू लागली. बा़कीच्याबरोबर तुलना केली तर हिला ग्रुपमध्ये सामावुन घेणारे कोणी नाही. वेळोवेळी तिने स्वतःहून इतरांबरोबर संभाषण करुन वाद मिटवणाचा प्रयत्न केला. हिचे वागणे बहुतेकवेळा संयमित होते.

२. शिव - हा सगळ्यांशी बोलतो. वातावरण हलकंफुलकं ठेवतो. चावण्याचा प्रसंग सोडला तर याचे बिगबॉसमधले वागणे चांगले आहे.

३. वीणा - स्पष्टव्यक्तपणा. पण सगळ्याबरोबर मिसळता येत नाही. शिवसारखा मित्र नसता तर तिला बिगबॉसमध्ये राहायचा त्रास झाला
असता.

४. नेहा - ही नेहमी शिवानीलाच साथ देते भले ती लाथ मारो आणि रडूबाई

५. आरोह - हा खूप उशिरा आला. नियमानुसार वागतो पण नेहा/ शिवाणी सोडून बाकीच्यां चुकीवर बारिक नजर आणि हा पण रडवा...

हो, आता हा आठवडा बोअर होईल फार. वीणाला शिवमुळेच सगळ्यात जास्त फायदा झाला आहे. अदरवाईज, आळशी, फटकळ आणि नॉट अ पब्लिक पर्सन म्हणून कधीच बाहेर गेली असती. त्त्यामुळे मला वीणा नं २ वरही अजिबात यायला नको आहे, तिच्यापेक्षा तर किशोरी डिझर्विंग आहे. कोणाच्याही कुबड्यांशिवाय, एकटीने, रडत-माफ्या मागत- बॅकफुटवर जात का होईना ती टिकली आहे. तिच्या वयाचं कोणी नाही, तिची कोणाशीही घट्ट दोस्ती नाही, तरी ती टिकली. मला हे कमेन्डेबल वाटतं, किशोरी फारशी आवडत नसूनही. आरोह पहिल्यापासून यायला हवा होता, फारच मजा आली असती. नेहाची जिगर मला पहिल्यापासून आवडते. त्यामुळे माझा क्रम
शिव
नेहा
किशोरी
शिवानी
आरोह
वीणा

वीणा कधीच आवडली नाही, ती कधी विनर म्हणून डिझर्विंगही वाटली नाही. त्यामुळे ती शेवट Proud

तरी यावेळचे पत्रकार चांगले वाटले, शिवला रोडिजच्या सिझनमधल्या मुलीबद्दल आणि लव्ह अँगल स्ट्रॅटेजीबद्दल विचारले, परागला यायला नाही मिळालं शिवानीला मात्रं मिळालं हे अनफेअर आहेका याबद्दल विचारल गेलं, शिवानीला खरच तू डिझर्विंग आहेसका विचारलं , या सिझनला बिबॉजास्तं हिंसक होताका विचारलं आणि किशोरीला विचारलेला प्रश्न आवडला कि अशोक सराफ-लक्ष्याच्या काळात बिगबॉस असतं तर कसं स्वरुप असतं ?
उत्तरं मात्र तिच ती होती, शिव पुन्हा थोडा फिका पडला बोलण्यात, आरोह चांगला बोलला पण जास्तच सुटला होता कधी नव्हे ती संधी मिळाल्याने , शिवानी-नेहा चांगल्या बोलल्या पण तेच ते मुद्दे जे बोलून झालय विकेन्ड्सना.
वीणाकडून एक उत्तर चांगलं आलं मैत्रीचा वापर प्रश्नाबद्दल, तिने रुपाली परागच भिंग फोडलं कि त्याचं आधीच फेसबुकवरून ठरल होतं फेक लव्ह अँगलबद्दल.
नेहाला जास्त फुटेज नव्हत मिळत म्हणून ती जास्तं पल्हाळ लावत होती उत्तरं देताना, तरी तिची श्ब्दांवरची कमांड चांगली आहे , तिची कविता मस्तं होती आणि एकदम योग्य उत्तरात वापरली तिनी.

नेहाची कविता मस्त होती

सगळेच निम्मे काळे असतात निम्मे गोरे
तू कुणाला काळा दिसशील कुणाला गोरा....

नेहा कितीही aggressive असली तरी डोकं सॉलिड आहे तिचं, कविताही छान करते, एकंदर जिगर आहे पोरीत, मला आवडते ती.. व्यक्तिशः मला आवडेल ती जिंकली तर, पण एकंदर voting पाहिलं तर शिव पहिल्या नंबरवर फिक्स वाटतो आणि नेहा किंवा वीणा 2 नंबरवर असतील असं वाटतं..

जितके काही भाग पाहिले त्यावरून मला असे विजयी चालतील की,

१) किशोरी- मला आवडली नाहीच पण चाचपडत, कुठली ना कुठली काठी धरत तगली. बरीच फेक आहे आणि अवाजवी मोठेपणा त्यात भलतीच ईमेज कॉन्शस असायची तो खोटेपणा दिसतो पण दगडापेक्षा वीट मऊ हिशोबाने त्या साळकाया-माळकायांपेक्षा ( नेहा, वीणा, शिवानी) हि बरीच बरी ; उगीच मारामारी आणि तमाशे कमीच केले बहुधा. मी सुरुवातीचे भाग नाही पाहिले त्यामुळे पण बर्‍यापैकी पिचक्या मारत होती तगण्यासाठी.
२)शिव- हा येडा बनून पेढा कॅटागरीतला आहे खरं तर. काहीही भोळा वगैरे नाही पण टक्कर बरी दिली जितके भाग पाहिले त्यात. लोकांमध्ये व्यवस्थित ईमेज केली की मी भोळा आहे.
३)नेहा - खेळली बरी पण अनॉयिंग व्यक्ती आहे जराशी.

४)शिवानी/आरोह - काही खास नाहितच म्हणून , की फर्क पेंदा नुसार इथे आले तर चालतील.

५)वीणा - अतिशय आळशी, खोटारडी, अहंकारी, स्वार्थी आणि फटकळ. अगदीच नाही आवडली. खेळली ठिकठाक.
तुलना करायचीच तर, खरे तर शिवानी म्हणजे मुर्ख आणि अहंकारी आहे तर ह्या वीणा बाईसाहेब महास्वार्थी आणि अहंकारी आहेत; अगदी पुर्ण उल्हासनगरचे जीन्स आहेत. Wink

मी गेल्या दोन आणि ह्या आठवड्यात ईथेच येवून अपडेट वाचतेय. काही उरलेच नाहीये असेच दिसतेय.

असा क्रम असेल असा अंदाज : १.शिव २.वीणा ३.शिवानी ४.नेहा ५.किशोरी ६.आरोह>>>>>>>>>>>
माझा पण सेम क्रम आहे, फक्त नेहा आणि शिवानी ची अदला बदली.
१. शिव
२. विणा
३.नेहा
४.शिवानी
५.किशोरी
६. आरोह

माझा पण सेम क्रम आहे, फक्त नेहा आणि वीणाची अदला बदली.
१. शिव
२.नेहा
३.वीणा
४.शिवानी
५.किशोरी
६. आरोह

माझा क्रम
१. शिव
२. नेहा
३.किशोरी
४.वीणा
५.शिवानि
६. आरोह

माझा क्रम
१. शिव
२.नेहा
३.वीणा
४.शिवानी
५.किशोरी
६. आरोह

ह्या वीणा बाईसाहेब महास्वार्थी आणि अहंकारी आहेत; अगदी पुर्ण उल्हासनगरचे जीन्स आहेत >>>> म्हणजे काय झंपी ???
कळलं नाही मला

माझा क्रम
शिव
वीणा
नेहा
किशोरी
आरोह
शिवानी
असा येणार नाहीच पण इच्छा आहे!

ह्या वीणा बाईसाहेब महास्वार्थी आणि अहंकारी आहेत; अगदी पुर्ण उल्हासनगरचे जीन्स आहेत >>>> म्हणजे काय झंपी ???
कळलं नाही मला >> म्हणजे उल्हास नगर ला नाव ठेवली आहेत. उल्हास नगर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीन्स चा स्पेशल अभ्यास दिसतोय त्यांचा Happy

माझा क्रमः

१. नेहा
२. वीणा
३. शिव
४. आरोह
५. किशोरी
६. शिवानी

कालच्या पत्रकार परीषदेत फक्त शिव-वीणा यांचीच उत्तरं प्रामणिक आणि त्यांच्या घरातल्या वावर/वर्तणुकिशी कंसिस्टंट होती. किशोरी ते नेहा या सर्वांची उत्तरं समोरच्याला आवडतील, टाळ्या मिळवतीत्ल या हेतुने दिलेली होती. त्यामुळे अर्थातंच त्यांची घरातली वर्तणुक पहाता सगळी उत्तरं भलत्याच टोकाची वाटत होती. नेहाने तर संस्कारांचा मुद्दा आणुन तीच्या आई-वडिल, शिक्षकांना एकप्रकारे एक्स्पोज केलेलं आहे. अरेला कारे करणं, खुन्नस बाळगणं हि माणसाची सामान्य वृत्ती आहे. अशा प्रसंगात मनावर ताबा ठेउन ती सिचुएशन कशी हँडल करायची, अ‍ॅमिकबली डिफ्युज करायची हे संस्कार शिकवतात. नेहाचं घरात्लं वागणं तीच्या संस्काराने प्रेरीत झालेलं असेल तर कठिण आहे...

शिव मला आवडतो पण शारीरिक बळ आणि एक प्रकारचा ग्रामीण निरागसपणा याशिवाय त्यानी कुठल्या क्वालिटीज दाखवल्या ते शोधावेच लागेल. चावाचावी प्रकरणानंतर तर तो आणखीनच मनातून उतरला. जो एखाद्याच्या मेहेरबानीवर आत आहे, तो विनर कसा होऊ शकतो? असो.

विनर निवडताना फक्त पब्लिक सपोर्ट विचारात घेणं चूक आहे. कारण हा घटक मॅनिप्यूलेट करता येतो. पण त्यांचा बिबॉच्या घरातील एकंदर वावर, घरातील कामं करण्याची क्षमता आणि इच्छा, बुद्धीची झेप, १०० दिवसात त्यांच्यात झालेला सकारात्मक बदल यासारखे क्रायटेरिया ती व्यक्ति कशी आहे हे दाखवतात आणि तेच जास्त महत्वाचे आहे. असो.

शुगोल..... couldn't agree more!

माझा पसंतीक्रम:
१. नेहा
२. वीणा
३. शिव
४. आरोह
५. शिवानी
६. किशोरी

धन्स झेण्डू गाण्याबद्दल. Happy बिचकुलेने ते गाण ओरिजिनल गायले आहे हे माहितच नव्हत. मला ते सलमान खानच्या ९० च्या काळातल्या सिनेमातल (सुब्रमण्यमने गायलेले) वाटल.

धन्स शुगोल. Happy

काल शिवानीने रडता रडता यमके जुळवली, ' रुपालीची शाल, बिचकुलेची पाटी, घरात राहिल शेवटी' अस काहीतरी. Proud

नेहाला ' कॅमेर्यासमोर रडते' म्हणणारी शिवानी काल कॅमेर्यासमोर रडत बोलत होती.

प्रमोशनल टास्कमध्ये मात्र सगळेच काहीच्या काही ओव्हरॲक्टींग करतात! >>>>>>>>> अगदी अगदी. जसे कधी आयुष्यात गुलाबजाम खाल्ले नाहीत असे वागत होते हे लोक. Lol

गार्डन एरिया मध्ये पत्रकार परिषद घेण्याच कारण शिवानीच ब्रिदिन्ग प्रॉब्लेम असाव एक्टिव्हिटी एरिया बन्द असतो त्यामुळे तिला श्वास घेण्यात त्रास होऊ शकला असता.

शिव विणाला तेच तेच प्रश्न विचारले जात होते. लग्नाबद्दल, शिवची आई रिलेशनशिप असेप्ट करण्याबद्दल वै वै. किशोरीचा घसा बसला होता वाटत काल. शिव आणि विणाने छान उत्तरे दिली.

नेहाची कविता मस्त होती >>>>>> ती तिची कविता नव्हती कदाचित. तिच्या म्हणण्याप्रमाणे, ' तु' नाटकात ती काम करत होती, त्यात कोणाच्यातरी उर्दू कवितेच मराठीत केलेल भाषान्तर होत.

एबीपी माझावर दिसलेलं पत्रकार परिषदेतलं नेहाचं शेवटचं वाक्य बिग बॉसनी दाखवलं नाही. >>>>>>> दाखवल ना भरत, मला तर दिसल.

शिव नखं खात होता पत्रकारांसमोर ते मात्र नाही आवडलं. >>>>>>>>> ++++++++११११११११११ लहान मूल जस टेबलावरुन खेळण्याची गाडी फिरवतो, बोटे फिरवतो तसे शिव बोटे फिरवत होता टेबलावर ते मात्र क्यूट होत.

शिव आणि नेहाला ' तुम्हाला ट्रॉफी मिळाली तर काय वाटेल' विचारल तेव्हा शिवने एव्ही एन्जॉय करेन, मला ट्रॉफीची पर्वा नाही अस कायतरी म्हणत होती. नक्की काय म्हणत होता तेच कळत नव्हता.

विणाला 'शिव नसता तर तू कुणाशी मैत्री केली असतीस' विचारल, तिने काय उत्तर दिल?

Pages