Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तू आता पाहूणी नसून सदस्य झाली
तू आता पाहूणी नसून सदस्य झाली आहेस
वाटले च होते बिबॉ असे काहितरी करणार. शिवानि च्या बिहेवियर वरुन पण असे वाटत होते की ती पूढे जाऊन सदस्य होणार. कारण तसे नसते तर तिने माधव आणी नेहाला हिना ला धरुन ठेवायला संगीतले असते. आणी ती सगळ्यात ज्या पदधतीने भाग घेत होती. ज्यापद्धतीने माधव आणी नेहाला सपोर्ट देत होती. तिला ही कल्पना असणार याची.
हे उगीच तू मारल्या सारखं कर
हे उगीच तू मारल्या सारखं कर मी रडल्या सारखं करतो टाईप्स
बिबाॅ तिला विचारत होते कि
बिबाॅ तिला विचारत होते कि तुला तुझ्या त काही फरक जाणवला का ? तब्येतीची आता काही इश्यू नाही ना पूर्वी सारखा वगैरे वगैरे
शीव ने शिवानि ला कसा सपोर्ट
शीव ने शिवानि ला कसा सपोर्ट केला कैप्टनशिप साठी . का बिबॉ ने टीम ठरवल्या.
आता बिचुकले सुटला कि त्यालाही
आता बिचुकले सुटला कि त्यालाही आणा मग
>>काहीही होऊ शकते येथे अजुन त्यांची पाटी आहे घरात . सामान ही आहे बहुतेक.त्यांची वाट बघत आहेत.
त्या आरोह ने पण काल टॉप 5मध्ये शिवानि चे नाव घेतले होते
त्याला तर माहिती असणारच ना की ती पाहुणी आहे . तरिही त्याने तिचे नाव घेतले.
वैशाली या आठवड्यात खुप शान्त झाली होती.
एका अनसीन वेडीओ मध्ये पहिले होते की तिला घरी जावेसे वाटत होते.
मागच्या आठवड्यात नो elimination होते तेंव्हातिला वाटले होते की ती जाणार.
शीव ने शिवानि ला कसा सपोर्ट
शीव ने शिवानि ला कसा सपोर्ट केला कैप्टनशिप साठी . का बिबॉ ने टीम ठरवल्या.>>>>हो बिबॉ ने ठरवल्या टिम
सोमी वर लोक जाम भडकलेत शिवानी
सोमी वर लोक जाम भडकलेत शिवानी ला परत आणून सदस्य केलं म्हणून ..
शिवानी अजूनही मेंटली
शिवानी अजूनही मेंटली अन्स्टेबल आहे. >>> मलाही वाटली, काहीतरी करूदे राडा. बिग बॉसचं नाक चांगलं कापावं तिने.
ती कॅप्टन व्हावी म्हणून तगड्या शिवला तिच्या टीममध्ये टाकलं. एवढे काय bb मेहेरबान तिच्यावर.
बिग बॉसचा insult करून धमकी देऊन, स्वतः चा insult होऊन बाहेर पडलं तरी चालते. इमेज सुधारायची परत संधी मिळते. नंतर मखरातही बसवलं जातं. धन्य हा सीझन.
तसे आधीपासून मेहेरबान होते म्हणा, ती खेचत होती आणि वीणाने पायावर मारलं तेव्हा तिने तिच्या छातीत लाथ मारली तेव्हा वीणा दोषी आहे आणि ती नाही हे proved.
थुंकून चाटले बिग बॉस ने.
थुंकून चाटले बिग बॉस ने. शेमलेस खरंच
सरळ विनर डिकलरे करून टाका शिवानी ला, कशाला आमचा वेळ घालवताय.
आजचा ९०% भाग पळवला. खूपच बोर
आजचा ९०% भाग पळवला. खूपच बोर टास्क आणि त्याहून बोर स्पर्धक आहेत.
स्वतःचा स्टँड असणं म्हणजे
स्वतःचा स्टँड असणं म्हणजे सतत मोठा आवाज लावून, नाक फेंदारून, हातवारे करून, दरडावणीच्या स्वरात आणि शब्दांतअसेइतर, इतरांची लायकी काढणं असं असेल, तर स्टँड न घेणारेच मला आवडतात.
हीना भाकरी प्रकरणात एकट्या किशोरीने सेन्सिबल मत मांडलं होतं. आता ती आवाज लावत नाही (मांजरेकरांनी तिला सांगितलं याबद्दल), नॉन स्टॉप बोलत नाही, अपशब्द वापरत नाही, स्कीमिंग प्लॉटिंग करत नाही, यामुळे ती मासळी बाजारात बसायला नालायक ठरत असेल.
टोकाचा इमेज कॉन्शसनेस. आपल्याबद्दल कोणी जरा वाईट बोललं की स्पष्टीकरणं द्यायला जाते, सगळ्यांच्या नजरेत तिला चां गलं राहण्यासाठी धडपडते - ही तिची कमजोरी.
सगळ्या टास्कस्मध्ये ती अगदी मनापासून , हातचं काही न राखता, भाग घेते. कालही लिलिपुट झाल्यावर तिने चांगली चपळाई दाखवली होती.
कालच्या टास्कमध्ये शिवानीला स्त्री असल्याचा फायला मिळाला. अभिजीतच्या जितके जवळ जाऊन त्या प्रतिमा हिसकवायचा प्रयत्न शिव आणि माधवने केला तसं तिच्याबाबत झालं नाही. आरोह तर विनंतीपत्र देईल असं वाटत होतं. बायकांना पण तिची भीती असावी. लाथा बिथा मारल्या , तर. .
नेहाच्या हातावर वीणाचा हातच पडला होता, तरी तिला खूप दुखलं.
काल शिव वीणाला "तू मला गुड मॉर्निंग नाही म्हणाली" अशी तक्रार करताना दिसला. म्हणून त्याला हाकला असं मी म्हटलं. वीणा-रूपाली- किशोरी हेच करत होत्या.
बाप रे,सोमि चंगलाच पेटला आहे
बाप रे,सोमि चंगलाच पेटला आहे,शिवानीला कंटेस्टंट बनवल्यावर.
सुशांंत आणि ऋतुजा यांनी केस करावी.
खेळाचा आणि स्वताच्या brand
खेळाचा आणि स्वताच्या brand name चा पुर्ण कचरा करुन टाकला आहे.. काहीच्या काही फालतू गिरी चालू आहे..मला वाटतं की शिवानी ला आधीच संगितल असणार की पहिल्यांदा पाहुणी म्हणुन घेणार आणि नंतर कायम करणार..म्हणजे लोकांचा रोष कमी होईल..नाही तर entry लाच प्रेक्षक चिडले असते..ते तर anyways आता पण होतच आहे.. अस असेल तर पराग ला पण आणा ना...त्याच्या वर पर्सनल राग असल्या सारखे वागत आहेत बिग बॉस आणि indemole ची टीम
गेल्या वेळी सुशांत ला मारे
गेल्या वेळी सुशांत ला मारे तोंड वर करुन सांगितल होत ममा ने की एकदा बाहेर गेल्यावर,लोकांच्या संगतीत आल्यावर परत नाही घेता येत तो फ़ॉर्मेट आहे शो चा.. ही शिवानी तर अगदी इंटरव्यू देऊन ,विडियो पोस्ट करुन परत आलीये ..तिला का वेगळा न्याय
आज पुन्हा एकदा टास्कनधे शिव
शिवानीला ठेऊन , तिच्यासाठी नियम तोडून काय साधलं बिबॉने ?
तिच्यामुळे काही नवीन एन्टरटेन्मेन्ट तर नाहीये उलट पुन्हा सगळे तिचे सो कॉल्ड फ्रेंड्स शिवानीके पालतु कुत्ते दिसतायेत, पुन्हा दादागिरी पुन्हा शिवानीसेंट्रिक!
बाकी परत एकदा टास्कमधे शिव छा गया, ऑबव्हियस्स्ली फिजिकल टास्क्स मधे तो अनबिटेबल आहे आणि वीणापासून दूर राहिल्यामुळे !
वीणा कमी दिसली बरं वाटलं !
किशोरीचा फिटनेस इन्स्पायरींग आहे , वीणा रुपाली दोघींपेक्षा चांगलं करत होती किशोरी हे टास्क.
नेहाचा खरोखर पराग होतोय, खुट्ट काही झालं कि कांगावा आणि रडारड, आता ती सिक्रेट्ली जेलसही दिसतेय शिवानीमुळे !
शिवानीत रडताना वेडसर झाक दिसत होती, काय नक्की झालं कळलं नाही, फॉरवर्ड करता करता पाहिला तो पार्ट .
खरच कोण विनर होणार या सिझनला, एकातही स्पार्क नाही , ऑरा नाही विनरचा !
काल जरासाच पाच मिनिटे लावला
काल जरासाच पाच मिनिटे लावला आणि बंद केला. नेहाला कोणीतरी फॅशन कशाशी खातात हे सांगावं. भयाण कपड्यांचा सेन्स आणि भयाण मेकअप.
वेड्यांची जत्रा आहे. नेमका कुठलातरी मारामारीचा टास्क सुरु होता. शिवानी काहितरी भयानक रडल्यासारखी करत होती. एकदमच विचित्र भाव होते. टीवी बंद केला.
कोणीही बघण्यालायक नाहीयेत की काय परसनॅलिटी.
काय वाईट अवस्था झालिये या
काय वाईट अवस्था झालिये या सिझन ची...

शिवानी ला का परत सदस्य केल? मग पराग ने काय घोडं मारलय ? आणा की त्याला पण परत. चुका सुधारायची संधी सगळ्यांना समान मिळुदेत.
कसला भंगार टास्क. पण तरी त्यातल्या त्यात शिव बेस्ट खेळला काल. अडगळीच्या खोलीच्या गजाला पकडुन कसला मस्त चढला तो काल.
त्याला मुद्दाम अभिदादा च्या विरुद्ध खेळवलं बिबॉ ने
शिवानी ला कन्फेशन रुम मधे बोलवुन तब्बेत वगैरे विचारली आणी ती ती, मी मस्त आहे, फिट आहे, याव नी त्याव बोलली. आणि परत टास्क मधे वेड्यासारखी रडत होती. की मुद्दाम लोकांना distract करायला रडली कोण जाणे. तसं असेल तर हुषार झालीये म्हणायचं
पण तरी काल खुप बोअर झाला एपिसोड. पळवत पाहिला.
हिना का रडली शेवटी ? शिवानी काय बोलली तिला ?कळलं नाही ते.
मला मेघा ची खुप खुप आठवण येतेय ...लास्ट सिझन बेस्ट होता. सगळे लोक एकदम फिट होते आपापल्या जागी. हा सिझन फारच गंडलाय.
बाहेर आलेले सदस्य म्हणत असतील
बाहेर आलेले सदस्य म्हणत असतील ,बरं झालं, सुटलो आम्ही.
शिवानी हिनाला कुत्र्याला
शिवानी हिनाला कुत्र्याला करतात तसं छू छू की यू यू करत होती आणि मर्डर मिस्ट्री टास्क कळलं नाही त्यावरून टोमणे मारत होती.
त्यामुळे ती रडली.
शिवानी चा डायलॉग , "आधी
शिवानी चा डायलॉग , "आधी करयाच आनि नंतर सॉरी म्हणायचा ! काही होत नाही"
आजवर पाहिलेला सर्वात बाद प्रोग्राम
नेहाला कोणीतरी फॅशन कशाशी
नेहाला कोणीतरी फॅशन कशाशी खातात हे सांगावं. भयाण कपड्यांचा सेन्स आणि भयाण मेकअप. >>>>>>>> आणि ती स्वतः त्या आरोह ला सांगत होती कि तुझी फॅशन चांगली दिसत नाही. काल ते कॅमेरा ला ठेवलेली नावं ऐकुन मजा वाटली.
शिवानि स्पॉइल्ड ब्रॅट आहे .
शिवानि स्पॉइल्ड ब्रॅट आहे .
तिला वाटतय चॅनेल ला गरज आहे त्यामुळे जास्तच माजलि आहे ,
मांन्ज्या तर येडा आहे , काहि कळत नाही त्याला ! सलमान चे होस्टींग हज्जार पटीने बरे असते
मला ही ती आरोह ला सांगत होती
मला ही ती आरोह ला सांगत होती की त्याने ठेवलेली दाढी ची स्टाइल चांगली नाही दिसत आहे ते बघुन हसू आले . म तुझे काय असे मनात आले. त्याच बरं खर तुझी नाही चांगली.
सगळ्यात महान ती रुपाली !!
सगळ्यात महान ती रुपाली !! एवढं सगळं होउन बाई परत विणाच्या पुढे आपलं रड्गाणं गायला तयार. ते सगळे टेबल वर बसुन बोलत होते तर ही
किचन मधुन तिच्यावरच्या सो कॉल्ड अन्याया बद्दल सांगत होती कि शिवानी कशी कुजकटासारखी हसली तिला . अभिजीत जेव्हा म्हणाला की रुपालीपण चांगली खेळली. रुपालीला कोणी विचारत नाही का की अत्ता तू कोणाच्या ग्रुप मधुन बोलतेस ? ( दिवार मोड ऑन )
सगळीच मज्जा आहे. गेल्या
सगळीच मज्जा आहे. गेल्या आठवड्यात शिवानी बरीच कन्ट्रोल्ड होती. आता सदस्य झाल्यावर लगेच सुटलीच. मुद्दाम ऑफेन्सिव बोलणे, उचकवणे, माधव ला म्हणत होती" ढकल रे त्याला, काही नाही होत" "दे तिला धक्का, नंतर सॉरी म्हणून टाकायचं, काही नाही होत" तिला काय म्हणणार, तिला मेसेज च तसा गेला आहे बिबॉ कडून! आता अजून अजून अॅग्रेसिव होणार ती. या आठवड्यात तर बघायलाच नको , सगळ्यांना सळो की पळो करेल कॅप्टन असल्यामुळे
काहीही करून आता घर तिच्याभोवतीच फिरणार. आपल्याला आवडो न आवडो ते स्किल आहे तिच्याकडे.
नेहा आधीच म्हणाली होती की शिवानी आली तर सगळ्यांना ओवरशॅडो करेल. तिला स्वतःला सुद्धा. तिला आता इनसिक्युरिटी होत असणारच आहे. शिवानीने येऊन तिच्या चान्सेस ना डायरेक्ट धक्का दिलेला आहे.
बाकी काल माधव आणि शिव मस्त खेळले, अभिजीत पण छान लढला. त्याने ते ऊठ सूठ रडणे सोडले तर बरं होईल.
बाकी कुणी दिसलेच नाहीत फारसे . माझे कौतुक नाही केले हा रुपालीचा कांगावा ऐकून हसूच आले त्यामुळे.
मै च्या पूर्ण पोस्ट्ला++१ ,
मै च्या पूर्ण पोस्ट्ला++१ ,
शिवानी शिव ला पण म्हणत होती ना ,हीना ला ढकल ढकल...... नंतर सॉरी म्हणायचं
शिवानीचा attitude अजून वाढणार
शिवानीचा attitude अजून वाढणार, एक प्रोमो बघितला. हीना वीणा कुजबुज करत होत्या म्हणून शिक्षा दिली bb नी. शिवानीने अडगळीच्या खोलीत टाकलं आणि दोघींनी एकमेकींशी बोलू नका सांगितलं, तर हा रूल नाहीये कोणीतरी म्हणाले, तर हा माझा रूल आहे असं शिवानी म्हणतेय. चला असेच रूल कर स्वत:चे आणि अति attitude दाखवून bb ना नाकीनऊ आण ते बघायला आवडेल.
ती सुधारलेली वाटत नाहीये फार मलातरी. शिवानी आणि नेहा दोघींचा घरातील वावर फार negative आहे सध्या.
मैत्रेयी good post.
केळकर असाच positive वागला तर तो जिंकायचे चान्सेस जास्त आहे, शिव नेहापेक्षाही.
शिवानी चा पेड PR जोरात आहे
शिवानी चा पेड PR जोरात आहे ट्विटर वर . बाहेर जाऊन सगळी सेटिंग करून आलीय.
कसला भंगार टास्क. पण तरी
कसला भंगार टास्क. पण तरी त्यातल्या त्यात शिव बेस्ट खेळला काल. अडगळीच्या खोलीच्या गजाला पकडुन कसला मस्त चढला तो काल. >>> हो त्याने मस्त केलं पण रूल तोडून, गुडघ्यावर बसायचं होतं त्याला हा रूल होता. केळकरने वर चढू नये हा रूल नव्हता.
शिव, माधव मुळे तर शिवानी जिंकली. बेकार खेळली एकदम. वुमन कार्ड वापरू नको शिवानी हिनाला सांगत होती, स्वत: तेच केलं.
असे tasks एकही मेम्बर प्रामाणिकपणे खेळत नाही. काल केळकरच्या बाहुल्या लांब टाकल्या, जो रूल नव्हता पण bb उशिरा जागे होतात. सगळे चीटिंग करूनच जिंकतात, सगळे एका माळेचे मणी आणि ओवायला नाही कोणी.
सगळीच मज्जा आहे. गेल्या
सगळीच मज्जा आहे. गेल्या आठवड्यात शिवानी बरीच कन्ट्रोल्ड होती. आता सदस्य झाल्यावर लगेच सुटलीच. मुद्दाम ऑफेन्सिव बोलणे, उचकवणे, माधव ला म्हणत होती" ढकल रे त्याला, काही नाही होत" "दे तिला धक्का, नंतर सॉरी म्हणून टाकायचं, काही नाही होत" तिला काय म्हणणार, तिला मेसेज च तसा गेला आहे बिबॉ कडून! आता अजून अजून अॅग्रेसिव होणार ती. या आठवड्यात तर बघायलाच नको , सगळ्यांना सळो की पळो करेल कॅप्टन असल्यामुळे >>>अगदी बरोबर
Pages