बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शिवानी च्या भरवशावर हीना शी पंगा घेउन नेहाचं नुकसान होणार आहे. >> हो ना , काल नेहा ने हिना चं नाव नॉमिनेट केलं तेव्हा मला पण अरेरे असं झालं.
केळकर नेहा चं नाव घेणार हे निश्चित होत , पण याउलट नेहा ने डूख धरून त्याने घेतलं म्हणून मी पण घेणार असं नाही केलं ;उलट नॉमिनेशन साठी दिलेल्या निकषांचा विचार करता अमुक अमुक ला नॉमिनेट करते असं म्हणाली ..
ती रुपाली ही रंग बदलणार्या सरड्यासारखी आहे, सर्वात बेभरवश्याची , डिसलॉयल, फेक इ.>> अगदी अगदी
सर्वांसमोर म्हणते की captaincy साठी तुम्ही कोणी nominate व्हावं असं मला वाटत नाही आणि कॅमेरा ला जाऊन सांगते की कोणी nominate व्हायला तयार नाही म्हणुन....>> हो मला पण खटकलं ते , तिने असं म्हणायला हवं होतं बहुतेक "की captaincy साठी कोणी nominate व्हावं असं मला वाटत नाही, म्हणून आमच्याबाजूने कोणाचेच नॉमिनेशन नाही "
शिवानी चं काय मला कळलं नाही , एकदा लगेच तयार झाली मग म्हणाली मला येऊन नुकतेच ३ दिवस झालेत वगैरे वगैरे . मला वाटतं कोणाच्या लक्षात नको यायला कि ती पाहुणी आहे म्हणून नंतर फिरवलं मत तिने.

अजून एक मला वाटतं की विकेंड डावात म मां नी भाकरी प्रकरण ताणल्याने हिनाला पूर्ण सहानुभूती मिळाली, वीणा एकटी व्हिलन जास्त ठरली असली तरी बाकी सगळेही चुकीचे ठरले तेव्हा माधव आणि नेहाला पण बोलणी खावी लागली. त्यामुळे पण दोघांचा थोडा राग असणार आणि त्यात शिवानी आली परत असं वाटतंय त्यांना.

शिवानीचे कोणतेही वागणे आता खरे समजू नये.सगळे बिबॉ ने पढवलेले वागत बोलत असणार ती. (एक्सेप्ट ते पर्सनल कमेन्ट करायला बिबॉ ने नाही म्हटले काल) बाकी वीणा, शिव ला ला झापणे, इव्हन किशोरीची अचानक इतकी कड घेणे, काल नॉमिनेट करताना दिलेले भाषण, सगळे प्लान्ड! ती काय करतेय त्यावरून बिबॉ चा काय प्रेफरन्स आहे ते कळावे उलट!
यावेळी कोण जाईल हे बघणे इम्य्तरेस्टिंग असेल. किशोरी ला भरपुर फूटेज, (सहानुभुती मिळेल अशा बेताने) मिळत आहे सध्या. पण टास्क मधला, घरातल्या स्ट्रॅटेजीज मधे सहभाग पाहिला तर तीच जायला योग्य आहे असे वाटते. सोमि वरचा कल पाहिला तर वैशालीला सगळ्यात डिसलाइकिंग आहे हे उघड वाटते. अगदी विदर्भ वगैरे प्रादेशिक प्रेफरन्स धरला तरी तीही मतं शिव ला मिळतील तिच्या पेक्षा.
ऑन अ साइड नोट - तिचं वागणं, घरातला वावर मलाही आवडत नाहीच पण पब्लिक सोमि वर जे बोंबा मारतं त्यात सतत तिच्या रंगाचा, दिसण्याचा उल्लेख असतो ते फार वाईट वाटतं. अति खालच्या थराला जाऊन बोलतात लोक, अगदी प्रसिद्ध यूट्यूबर्स पण! सोशल बायस चे बेकार उदाहरण!

तिचं वागणं, घरातला वावर मलाही आवडत नाहीच पण पब्लिक सोमि वर जे बोंबा मारतं त्यात सतत तिच्या रंगाचा, दिसण्याचा उल्लेख असतो ते फार वाईट वाटतं. >>> खरं आहे.

नेहाला पण उंचीवरून, जाडीवरून नावं ठेवली जातात. असं करू नये खरंतर.

तिचं वागणं, घरातला वावर मलाही आवडत नाहीच पण पब्लिक सोमि वर जे बोंबा मारतं त्यात सतत तिच्या रंगाचा, दिसण्याचा उल्लेख असतो ते फार वाईट वाटतं. >>> खरं आहे.

नेहाला पण उंचीवरून, जाडीवरून नावं ठेवली जातात. असं करू नये खरंतर. >>>>>>>>>> +++++++१११११११११

वैशाली चिखलात बसण्यात का तयार झाली हे कळाले नाही. तिचा समज असा तर नाही झाला कि हा चिखल आयुर्वेदिक आहे, कि नुसतेच लोळत पडायचे आहे म्हणुन तयार झाली ... >>>>>>>>>>> तिने गावात शेतात काम केल होत, म्हणून तिला सवय असेल चिखलाची.

ओळखा पाहु!
अगं अगं सख्यांनो मी तुमच्या वयाची
चला घालू दंगा करू चेष्टा मस्करी,
हे काय झाले देवा माझी ईमेज बिघडायला लागली
नका करू चेष्टा मस्करी मी नाही आता तुमच्या वयाची

कसेही करून मला कॅप्टनची रूम हवी
लोळत पडायला तिथं मला जाम आवडत भारी
दुसर कोणी नसल तरी चालेल, फक्त साथ केळ्याची हवी
फक्त गातानाच ऐका मला नाहीतर तुमचे कान दुखतील भारी

वाणि माझी शुद्ध झळकते भाषा पुणेरी
टार्गेट मलाच करतात सगळे का वागतात असे दुहेरी
खेळ मी खेळते डोके माझे चालवून
ममांच्या धाकामुळ संचालीका येते अंगावर धावून

काय बोलावे कसे बोलावे मला फक्त माझेच कळते
ममां बोलायला लागले की सगळ्यांची नजर माझ्यावर वळते
दोस्त माझा म्हणवतो पण ऐन वेळी पलटतो
काहीही न करता डाव माझ्यावर कसा उलटतो

मला नाही जमत बोलायला मराठी
सगळे मिळून लागतात माझ्याच पाठी
करते मी मदत टास्क मधे नॉमिनेशन घेऊन
ममां येतात मग आणि जातात आधार देऊन

शोधत असतो मी जागा डोळ्यातील पाणी लपवायला
का लावून ठेवले एवढे कॅमेरे बिबॉनी माझा रड्या चेहरा दाखवायला
केळ्या म्हणा रड्या म्हणा काहिही चालेल मला
पण विसरू नका मझा बलगंधर्वतला साडितील बाईल्या

तारा छेडता माझ्या होते माझे हातवारे सुरू
माझ्याच टीम सोबत युद्ध माझे सुरू
आहे मी घरात लाडावलेली गोलू
बास झाले ताई तू आता नको बोलू

खेडायला म्हणून आलो आणि प्रेमात पदलो
विणा हातात घेऊन मी वाजवायला लागलो
नाही आवडले लोकांना ते आमचे थोपटने
वीकेंडच्या डावाला ममांनी शब्दांनी धोपटले.

नाव माझे रूपवती स्वभाव सरड्यावाणी
रंग बदलती माझे सारखे तरी न कोणा कळती
खेळू शकत नाही कॅप्टन्सीचे टास्क एकटी
म्हणतात सगळे मला मी आहे कपटी.

गेले काय आले काय ह्याला काही अर्थ आहे काय..
आले नशीबी बिबॉचे कायदे नाही म्हणून तरी उपयोग काय
झाला डोक्याला ताप तरी चालेल आता मला,
चढला जरी पारा तरी आवर घालेल त्याला
पण कायद्याच्या भाषेत अडकायचे नाही मला

नेहा आणि वीणा ला रुपाली खरी कळली आहे.
किशोरी ला अजून समजत नाहीय कुठे काय बोलावे ते.
या आठवड्यात वाचली रुपाली पण नेक्स्ट आठवड्यात नक्की नॉमिनेट होईल.
सध्या फक्त अभिजित , विना आणि नेहा आवडतायत.

निर्झरा मस्तच Lol उत्तरे अनुक्रमे: किशोरीताई, वैशाली, नेहा, माधव, हिना, अभिजित, विणा, शिव, रुपाली, आणि शिवानी.

भारीच हा निर्झरा !! एकदम चपखल !! :टाळ्या: Happy
उत्तरे अनुक्रमे: किशोरीताई, वैशाली, नेहा, माधव, हिना, अभिजित, विणा, शिव, रुपाली, आणि शिवानी.>>+११

ओके च्रप्स.
7का झाले ते नंतर लक्षात आले . समान वोटस पडले असतिल.

निर्झरा लय भारी जबरदस्त.

शिवानी आल्यावर हिनाला साईडलाईन केल्याचा पश्चाताप होणार नंतर नेहा मॅडीला. तिची दुष्मन वीणा जमवून घ्यायला लागली तिच्याबरोबर.

वीणाने स्मार्टली ओळखलं खून झाला ते आणि खुनी कोण ते, कोणाचा खून झाला असेल तेही. यासाठी स्पेशल मार्क्स नाहीत, नाहीतर हे सगळे वीणाला मिळाले असते. अर्थात सतत शिवसोबत असतेना, त्यामुळे सोपं होतं ते.

शिवानी वैशालीकडे एक बोलली आणि नंतर माफी मागितली विणाची, काय सांगितलंय bb ने काय माहिती. अर्थात वैशालीने पण समजावलं तिला, त्यामुळे असेल.

हिनाला पण शिव वीणा टीम मध्ये वळवण्याचा डाव आहे का bb यांचा. ते कार्य पण शिवानी करतेय.

नेहा आणि वैशालीत पण समेट घडवण्यासाठी सांगितलं आहे की काय.

नेहा, वीणा, केळकर, शिव, मॅडी, वैशाली यांना टिप्स द्यायला पाठवलं आहे एकंदरीत.

वीणाने स्मार्टली ओळखलं खून झाला ते आणि खुनी कोण ते, कोणाचा खून झाला असेल तेही. यासाठी स्पेशल मार्क्स नाहीत, नाहीतर हे सगळे वीणाला मिळाले असते. अर्थात सतत शिवसोबत असतेना, त्यामुळे सोपं होतं ते. >>
हो शीव बरोबर सतत असते त्यामुळे आणी मागच्या सीज़न चा पण हा टास्क पहिला असणार.

पराग कान्हेरे येतोय बहुतेक, अर्थात गेस्ट म्हणून असेल. त्याच्या fb पेजवर लिहिलंय त्याने, असं मी youtubeवर बघितलं. मला खरं वाटलं नाही म्हणून मी त्याच्या fb पेजवर गेले तर खरंच त्याने लिहिलंय येतोय मी, आता सगळ्यांचा हिशोब होणार, तू तो आणि तीपण जाणार. अर्थात पुढचं confused करायला असेल. त्याला गेस्ट म्हणून एक चान्स देतील असं वाटतंय.

शिवानीला गेस्ट म्हणून चान्स दिला तो त्यालाही देण्यासाठी असेल. त्याला आणण्यासाठी, आधी तिला आणले असेल.

सर्वात मजा रुपाली आणि किशोरीताईची येणार, तो नाहीये तर सगळं काही त्याच्या नावावर खपवतात. मागे वीणाने हिंग पण परागवर खपवले पण तेव्हा म मां लगेच म्हणाले तिला आता तो नाही तर त्याच्या नावावर खपवू नका.

https://www.youtube.com/watch?v=HNjcSsizrSI

किती खरं किती खोटं, कळेल लवकरच.

एनीवे आणणार असतील तर शिवानी असतानाच आणायला हवं. अर्थात आता तोही पपेट म्हणून येणार bb चा आणि त्याच्या fans ना bb बघा सांगण्यासाठी येईल.

खरं तर कंटाळा आलाय ह्या सीझनचा. नवीन wild card एन्ट्री ची मजाच निघून गेली यावेळी.

सर्वात मजा रुपाली आणि किशोरीताईची येणार, तो नाहीये तर सगळं काही त्याच्या नावावर खपवतात. मागे वीणाने हिंग पण परागवर खपवले पण तेव्हा म मां लगेच म्हणाले तिला आता तो नाही तर त्याच्या नावावर खपवू नका.
<
मजा आणि पराग २ गोष्टी एकत्रं असु शकत नाहीत.
काही नाही, ती रुपाली रंग बदलता सरडा आहे, ना तिला तिचं ठाम मत ना स्ट्रॉंग पर्सनॅलिटी, फुटेज साठीअत्यंत लाचार आहे ती !
पुन्हा परागला बघून फेक टिअर्स, पुन्हा फेक लव्ह , फेक रोमान्स सगळं सुरु केलं तर आश्चर्य वाटणार नाही.
बिबॉ कंप्लिट फेल आहे, कोणी मिळत नाही म्हणून शिवानी आणि आता पराग !
ना तो माणुस फिजिकली फिट ना मेंटली, ना त्याच्या स्ट्रॅटेजीज वर्क होत ना मैत्री, शून्य पेशन्स आणि टेक्निकली कमिटेड अ क्राइम इनसाइड हाउस, बिबी सर्वात जास्तं लाचार झालेत अ‍ॅ़चुअली Uhoh

DJ +1

पराग अजिबात नको.तो येणार असेल तर निदान हा आठवडा तरी वैशालीला ठेवतील आणि तिच्यासाठी किशोरी किंवा हीनाचा बकरा बनवतील.

केळकरला त्या समान वगैरे येते त्या रुम मधुन( त्याला कोणती रुम म्हणतात मी विसरले ) तीन चार लोक घेउन गेले. व त्याला सीक्रेट रुम मध्ये ठेवलाय. पहिल्यांदा तो घाबरला होता त्याला वाटले की त्याला शिक्षा करायसाठी ठेवले पण नंतर बिग बॉस ने संगीतले की त्याला विशेष अधिकार देणार आहेत आणी कार्यात त्याला महत्वाची भुमिका बजावयाची आहे . सांगितल्यावर तो खुश झाला.तिकडे त्याला टीवी वर घरात काय चालले हे बघता येते.

मी बघणे बंद केले( झाले) कारण माझी मैत्रीण्च बघत नाही. सध्या ती गप्पा मारत बसते माझ्याशी. आणि गप्पामध्ये बिबॉ कसा बेकार झालाय सांगते शिवानीला बोलवून.
एकंदरीत पातळी घसरलीय शिवानीला बोलवोइन.
मैत्रीणीच्या खात्रीदायक सोर्स नुसार(ख. खो.) किशोरी नक्की जाणारच ह्या आठवड्यात.
बाकी, सावळा गोंधळ चालूच रहाणार.. अतिशय हिन दर्जा आहे शोचा.

परागला हुकूमशहा म्हणून आणतील नंकी सारखं >>
हा हा हा...तो एकदम दिसेल पण हुकुमशाह..."मोगॅम्बो खुश हुआ" Happy
अरे कोणा नवीन व्यक्ती ला आणा रे...काय तेच तेच तेच...

घरातल्या ना संगीतले की घरावर संकट आले आहे आणी एकत्र रहा . नंतर muder mystery कार्य दिले . त्याच्या मध्ये 2खुनी असणार आहेत . आणी समान्य नागरिक. कनफेशन रुम मध्ये जाऊन तिथे 2बन्दुका ठेवल्या आहेत त्यापैकी एक निवडून चालवायची जर गोळि बाहेर आली तर खुनी नाहितर सामन्य नागरिक . मला तर वाटते की ते ठरवणे पूर्ण पणे बिग्ग बॉस च्या हातात होते . ज्याना समान्य नागरिक बनवायचे आहे . त्याच्या दोन्ही बन्दुक रिकाम्या असतिल. आणी ज्याना खुनी बनवायचे आहे त्याच्या दोन्ही बन्दुक भरलेल्या असतिल अपल्याला काय कळणार आहे. असो. तर याप्रमाणे किशोरी रुपाली वीणा हीना वैशाली माधव नेहा हे सामन्य नागरिक झाले . आणी शीव आणी शिवानि खुनी झाले. बाहेर गार्डन एरीयात एक बूथ ठेवला होता तिथे buzzer वाजल्यावर जो कोणी पहिला जाईल त्याला खुनाची सुपारी देता येईल.
Buzzer वाजल्यावर पहिल्यांदा नेहा आणी माधव गेले सो त्याना संधी मीळाली. माधव ने किशोरी ताई चे नाव घेतले . आणी नेहाने हीना चे नाव घेतले.

केळकरला विशेष अधिकार दिला आहे की खुनाची सुपारी आलेल्या नावंपैकी कुणाचा खून करायचा हे त्याने ठरवायचे आणी तो कोणत्या खुन्याला करयला सांगायचा हे ही त्यानी ठरवायचे. पण त्याने दोन्ही खुन्याना समान संधी द्यायची.त्याने किशोरी ताईंची सुपारी निवडली आणी खुनी म्हणून शीव ची निवड केली .दोन्ही खुन्या ना छोटे फोनदिलेत.
सो त्याने शीव ला फ़ोन करुन सांगितले की किशोरी ताईंची फोटो फ्रेम पाण्यात टाक म्हणजे त्यांचा सांकेतिक खून होईल . मग शीव ने फ्रेम टाकली. नंतर किशोरी ताई शिवानि ने आणलले apple खात होत्या तेंव्हा बीबी ने खून झाला त्यांचा असे सांगितले. तर त्याना वाटले apple खाल्ल म्हणुन झाला. पण त्यांचा खून फोटो फ्रेम पाण्यात टाकली म्हणून झाला होता.

हिना आणी नेहा चा आता अजिबात पटत नाहिये काल हिना ने नेहा च्या नवरया ने लीहलेले पत्र आधी उशीत लपवून ठेवले होते आणी नंतर तिने आणी वीणा ने मिळुन ते वॉशरुम मध्यला कपाटात टिशु पेपर च्या मागे लपवून ठेवले.

किशोरी ला अजून गेम समजत नाहीय. फ्रेम पाण्यात आहे तरी त्यांना वाटत आहे कि अँपल खाल्ले म्हणून खून झाला Happy

मला तर वाटते की ते ठरवणे पूर्ण पणे बिग्ग बॉस च्या हातात होते . ज्याना समान्य नागरिक बनवायचे आहे . त्याच्या दोन्ही बन्दुक रिकाम्या असतिल. आणी ज्याना खुनी बनवायचे आहे त्याच्या दोन्ही बन्दुक भरलेल्या असतिल अपल्याला काय कळणार आहे. असो.

हो माझ्याही अगदी हेच मनात आले. खेळाडूला निवडायला द्यायला हव होत काय व्हायच ते.

अभिजीतला उचलून नेताना असे जाणवले की हे पण ठरलेल होत माहित होत... कारण बजर वाजल्यावर कोणीच आश्चर्यचकीत झाल नाही की उठून दार उघडायला पळाल नाही अभि शिवाय. सगळे बसून होते. नाहीतर किती घाई असते काय आल ते बघायची सगळ्यांना.
अभि सोबत नाही म्हणल्यावर वैशालीने लगेच हिनाला जवळ केले.
फोटोची केलेल्या नासधुसीवर किशोरीताईंचे वागणे आणि अभिचे वागणे किती फरक आहे..... कुठेही संयम सोडला नाही किशोरी ताईंनी.

सामान्य नागरिकाने जर का ओळखलं कि कोण खुनी आहे तर काय होणार आहे ?! जर का वीणा ने सांगितलं असतं मला माहित आहे कोण खुनी आहे तर काय झालं असतं ? ती का सांगत नव्हती ?!
अभिजीतला उचलून नेताना असे जाणवले की हे पण ठरलेल होत माहित होत... कारण बजर वाजल्यावर कोणीच आश्चर्यचकीत झाल नाही की उठून दार उघडायला पळाल नाही अभि शिवाय. सगळे बसून होते. नाहीतर किती घाई असते काय आल ते बघायची सगळ्यांना.>> हो मला पण वाटलं असच .. आणि अभिजित आत जाऊन पण काय आलंय वगैरे कोणीच काही विचारलं नाही .. पण जर हे ठरलेलं असेल तर मग अभिजित लाच का निवडलं असेल या कार्यासाठी ?!

किशोरी ला अजून गेम समजत नाहीय. फ्रेम पाण्यात आहे तरी त्यांना वाटत आहे कि अँपल खाल्ले म्हणून खून झाला>> हो आणि हि आपलीच फोटो फ्रेम आहे हे कळून सुद्धा त्यांनी लगबगीने ती उचलली का नाही ?!

Pages