बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हिना ला कि नेहा ला? >>> ओहह नेहा का. मी हीना का ऐकलं. मला हीना वाटलं. आता परत voot वर बघेन पण उशिरा टाकतात तिथे व्हिडीओज.

उद्याबद्दल दाखवलं त्यात हीना परत काहीतरी लपवतेय आणि शिवानी तिच्यावर पाणी टाकतेय त्यामुळे मला हिनाच वाटली Lol

हिना का म्हणतायेत काही लोक.की मीच चुकीचं ऐकलं ? >>> मीच लिहिलं हीना, मला तेच वाटलं.

शीव चा सांकेतिक खून झाल्यावर वीणा ला धक्का बसला असेल. >>> वीणापेक्षा माधव, किशोरी आणि नेहाला बसला.

वीणाचं समजलं नाही मला. तिला ते माहिती नसेल ना खुन्याची सुपारी दिली तरी खून होत नाही. तिला वाटलं झाला असेल.

माधव आणि शिवानी रंगे हात पकडायला गेलेले शिवला, त्यांना संशय आला होता म्हणून पण शिवने विणाचा top त्याच्या jacket मध्ये लपवला होता.

शिवानी ज्या व्यक्तीला त्रास देते ती व्यक्ती पब्लिकमध्ये हिरो ठरते.. इतिहास गवाह है..
पण ती आज हिनाला का त्रास देत होती एवढा?
वस्तू काय लपवल्या.. कपडे काय स्विमिंग पूल मध्ये टाकले>> शिवानी हीना च्या टॉप सोबत खेळत होती..रुपाली ने पायाने तो स्विमिंग पूल मध्ये टाकला.. काय गरज होती तिला .. उगीच..काही तसा टास्क पण नव्हता.. हीना ने tatoo बनवला हे पण विसरली का रुपाली.. खर तर रुपाली च जायला हवी..बाकी सगळे काही ना काही कंटेंट देत आहेत..ती काल आणि आज दिसलीच नाही..काहिच करत नाही..किशोरी खर तर 20 वर्ष तरी मोठी आहे या सगळ्या मध्ये..पण आज ती किती वेळ उभी होती सुपारी द्यायला...बर तो बझर कधी वाजेल हे पण माहीत नव्हत.. बाकी वीणा वैशाली तर बेड वरच बसून होत्या

तस नसेल.बिबॉसनेच ठरवल असेल.शिव 2वेळा कँप्टन झाला आहे,वैशाली झाली आहे,किशोरीला बिचारीला चान्स मिळत नाही,आता कदाचित पुढच्या आठवड्यात वीणाला कँप्टन करायचे असेल, >>> बिग बॉस चिडलेले दिसले शिववर एकंदरीत केळकरला सूचना देताना.

हीना ने tatoo बनवला हे पण विसरली का रुपाली. >>> रुपाली किसीकी नही हो सकती. तिला पुढच्या विकमध्ये काढायला हवं.

किशोरी बरोबर ही किती वाईट वागली होती रुपाली. पन्चींग बैग च्या टास्क मध्ये गरज नसताना पण खुप काही बोलली होती. हीना ने इतकी हैल्प करुन तिच्या बरोबर असे वागत आहे.
एकतर स्वत: कोणताही खेळ नीट खेळत नाही नेहमी दुसर्यांच्या मदती मुळे हिला सगळे मिळते.

हीना ने tatoo बनवला हे पण विसरली का रुपाली. >>> रुपाली किसीकी नही हो सकती. तिला पुढच्या विकमध्ये काढायला हवं.>>>>>>+++११११

शीव ने वीणा चा खून करायला काही हरकत नव्हती. तसेही विणा च्या कैप्टन सी च्या टास्क ला तो नौमिनेट होण्या साठी तयार होता. वीणा चा खून केल्याचे तिला काही वाटले नसते . शीव ने नसता केला तर कुणी दुसर्याने केला असता किंवा करणारच. पण शीव ला काय प्रूव करायचे होते काय माहिती. वीणा वीणा करुन शीव ने स्वत: चा गेम खराब केला आहे . तो नेहमी वीणा चा विचार करुनच खेळत असतो.

मी किशोरी ला दिलाय वोट >>> आता परदेशातून वोट देता येतं का, मागच्यावर्षी देता येत नव्हतंना म्हणून विचारतेय. तसं असेल तर चांगली सिस्टीम.

मी शिव वीणाला दोन आणि माधवला एक दिलं.

शिकला तो नेहा वीणा हीना आणि शिवानीचं.>>>>नाय नाय, हे मॅडी चं वर्जनल आहे, नावाला जागतो तो अधून मधून, ती वेडसर पणाची झाक! Lol

हे मॅडी चं वर्जनल आहे, >>> Lol

बिचुकले असतानाही बिचुकलेंच कुणाबरोबर काही झाल की हा मधुनच अंगात आल्यासारखे बिचुकले ना ओरडायचा. >>> Lol हो हो आठवलं.

मला mad वगैरे नाही वाटत मात्र. पण हुशारही नाही वाटत. मध्ये वाटायला लागलेला पण आता परत नाही.

माधव ला आपले कोणतेही बोलणे नीट एक्सप्रेस करता येत नाही. आणी आपले मुद्दे ही नीट मांडता येत नाहित. तो काय समजवायच प्रयत्न करतोय तेच कळत नाही लोकांना. तो बीबी साठी योग्य नाहिये.

नेहाचे जिंकण्याचे चान्सेस जास्त वाटतात कारण ती जाम हुशारीने, शातिर दिमाग अगदी task मध्ये. मेहेनतही घेते. मराठी चांगलं असल्याने सूचना वाचायला लावतात आणि वाचता वाचताच तिच्या डोक्यात सुरु होतं कसं खेळायचं ते.

शिवला सांगून ऐकत नाहीये, इमोशनल फुल झालाय, त्याला वाटतं यावर votes मिळतील पण तसं नसतं. केळकरने परत bb ने सांगितलेल्या सूचना दिल्या, समजावलं तरी तेच. मग पब्लिकला हे आवडेल का, तर नाही. आज मलाही नाही आवडलं.

शिव जिंकावा असं मलाही वाटतं पण तो त्याच्या हाताने त्याचं नुकसान करतोय तर काय करणार.

शिवने सावरावे, अजूनही चान्सेस आहेत. केळकरने बाहेर आल्यावर वीणाला सांगावं सर्व की हा काय करतोय, समजाव त्याला.

माधव जाईल या आठवड्यात .
शिवानी ला मस्त इंसल्ट करून काढायला पाहिजे बिबा ने.
रुपाली सरड्याला पण लाजवेल !!!!

सगळे काही ना काही कंटेंट देत आहेत..ती काल आणि आज दिसलीच नाही..काहिच करत नाही.. >> तशीही कॅप्टन असल्याने तिला इम्युनिटी मिळाली आहेच म्हणजे तिचा खून होऊ शकत नाही असं वाटत. म्हणून ती जास्त काही करत नाही

https://www.loksatta.com/manoranjan-news/parag-kanhere-returning-to-bigg...

ही news वाचून मला नाही वाटत परागला आणतील, त्याला जायचंय पण bb नी बोलावलं आहे असं नाहीये. कन्फर्म्ड नसताना काही लिहू नये परागने. त्याच्या fans ना उगाच आशा वाटते.

मला तर शिवानीला आणलं तेही आवडलं नाही. पराग नको आणि तो बिचुकले पण नको, त्याची पाटी काढा आता.

शिवानी ला डम्ब च स्पेलिंग येत नाही आणि हिना च स्पेलिंग पण जमत नाही . साधी डावी साईड आणि उजवी साईड पण समजत नाही . डाव्या साईडला सांगितलं मोबाईल तर उजव्या साईडलाच पहिल्यांदी शोधला आणि हि स्वतःला हुशार समजते . शाळेच्या टास्क मध्ये मी नापास नाही म्हणाली आणि स्वतःचा नापास चा शिक्का पुसला . ती सायको तर आहेच पण ढ सुद्धा Happy

रुपाली ने हिना ची पॅन्ट स्विमिन्ग पूल मध्ये का टाकली?
हिना ने टॅटू बनवला तिच्यासाठी ...

Pages