Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
टॅटू काढण्या साठी वीणा आणी
टॅटू काढण्या साठी वीणा आणी रुपालिला कुणाला जास्त मनवावे लागले नाही. शीव काय लगेच तयार होणारच होता पण हीना ही लगेच तयार झाली. की जिथे दुखत नाही तिथे मी करीन म्हणुन.
मला एक प्रश्न आहे..शो पाहून
मला एक प्रश्न आहे..शो पाहून इथे लिहिणे ठीक आहे..पण youtube वर असली फालतूगिरी search कसं काय करू शकतात..इथे सोमी बद्दल सारखा बोलतात म्हणून एकदा twitter वर bb चे सगळे हॅशटॅग search केले तर 200 ते 300 tweet दिसले ते पण 4-5 दिवसांचे..मग नक्की कुठे सोमी वर मोठा सपोर्ट असतो यांना..
खरय या घरात एक नेहा सोडून
खरय या घरात एक नेहा सोडून कोणीच विनर मटेरिअल नाही वाटते मला, बाकी सगळेच अनॉयिंग आहेत.
, इतर सगळ्या अॅक्टिव्ह आणि भरमसाट टी आर पी देणार्यांना खेळवून विनर मात्रं दीपिका कक्करला डिग्निफाइड असल्याने करून जिंकून दिलं !
तसं पाहिलं तर हिना -माधव अनॉयिंग नाहीत पण विनर मटेरियलही नाहीत.
पण हिन्दी बिबॉ १२ ट्रेंड पहाता किशोरी ट्रॉफी घेऊन गेली तर आश्चर्य वाटून घेऊ नका
किशोरी इज एग्झॅक्ट्ली लाइक दीपिका कक्कर
किशोरीताई यावेळी जाईल.
किशोरीताई यावेळी जाईल. बहुतेक सगळ्यांनी nominate केलं तिला. यावेळी बरेच जण आहेत नॉमिनेशनमध्ये. केळकर, शिवानी आणि रुपाली नाहीयेत.
ती शिवानी जबरी कटकट करत, वीणावर जाम चढत होती. आज वीणा सुसह्य वाटली तिच्यामुळे. हे bb नी सांगितल्यापलीकडे बहुतेक पर्सनल खुन्नस काढायला गेली वीणावर आणि मी आता असंच करणार म्हणाली तेव्हा bb नी आत दोघींना बोलाऊन दम दिला. शिवानीचा जाम पचका झाला, मग वीणाला माझ्या आईबाबांची माफी माग म्हणाली, वीणाने ते केलं. पण शिवानीला वीणाबद्दल जे काही पर्सनल बोलायचं होतं त्याला चाप लावला bb नी.
आज वीणा सुसह्य वाटली
आज वीणा सुसह्य वाटली तिच्यामुळे. >> त्या साठीच शिवानिची reentry झाली असे वाटते . विणा चांगली वाटावी आणी तिच्या उध्दट वागण्याने जो राग आहे तो कमी व्हावा.
नेहाचा रागीट चेहराजसा ट्रांसफर झाला होता वीणाला .
तसेच आता मागच्या वीक मधला नेहाचा शान्तपणा ही ट्रांसफर झाला वाटत.नेहा ला ही लास्ट वीक मध्ये सगळे ओरडल्यावर ती शान्त झाली होती तसेच आता वीणा चे .
माधव हीनामध्ये नक्की काय झालं
माधव हीनामध्ये नक्की काय झालं. मी उशिरा लावला tv. आज बरंच फुटेज त्या दोघांनी खाल्लं. हीना रडत पण होती.
बहुतेक सगळ्या घराचे target शिव वीणा आहेत मात्र आता.
त्या साठीच शिवानिची reentry झाली असे वाटते . विणा चांगली वाटावी आणी तिच्या उध्दट वागण्याने जो राग आहे तो कमी व्हावा. >>> मलाही असं वाटतंय. वीणा किती हाय पीच वर कटकट करत होती आधी आधीच्या विकमध्ये ते सगळे या शिवानीमुळे विसरायला झालं खरंच.
एकीकडे शिवानीलापण bb ने दाखवून दिलं कि boss तुझ्यापेक्षा आम्हाला ती महत्वाची आहे.
..इथे सोमी बद्दल सारखा बोलतात
..इथे सोमी बद्दल सारखा बोलतात म्हणून एकदा twitter वर bb चे सगळे हॅशटॅग search केले तर 200 ते 300 tweet दिसले ते पण 4-5 दिवसांचे..मग नक्की कुठे सोमी वर मोठा सपोर्ट असतो यांना..
पराग प्रकरण गाजलं होतं तेव्हा सो मी वर ट्रेंड होत असेल. आता शो इतका रटाळ झालाय की फार कोणी बघत नाही आणि सोमि वर बोलण्यासारखं काहीच नाही.
Shiv has nominated himself
Shiv has nominated himself for Veena, Lol ,not suprising at all ! >>> No. केळकर वैशालीने सांगितलं आमची नावं दे. शिवला पण चालणार होतं पण आधी ते दोघे म्हणाले. किशोरी काहीच नाही बोलली म्हणजे तिची तयारी नव्हती. वीणा मात्र पहिल्यापासून म्हणाली की कॅप्टनशीप नाही मिळाली तरी चालेल. कोणाला nominate करणे बरोबर नाही वाटत मला.
पण ह्या चांगुलपणाचा bb ना राग आला. दोघींनी कोणाला nominate करायला तयार नव्हत्या.
एका विकसाठी वीणाने केळकर, वैशालीची नावं दिली आणि रुपालीने माधव, शिवानीचं.
मग पुढची बोली लावायला कोणी तयार नव्हतं. त्यांना bb नी जाम सुनावलं.
नेहाची nominate व्हायची तयारी नव्हती रुपालीसाठी आणि का नाही त्याचा परफेक्ट आढावा नेहाने घेतला पहिल्यापासून, तो सॉलिड मस्त होता.
खरं तर रुपाली समोरून कॅप्टन उमेदवार असावी ही शिव वीणाची आयडिया होती पण नंतर फार खुश दिसले नाहीत दोघंही. रुपालीने पण शिव वीणाला nominate केलं. हीनाला तर सर्वांनी जवळजवळ केलं माधव आणि नेहाने पण. शिवानी आल्यावर तिला बाजूला करायला बघतायेत.
कोण कोण आहे नॉमिनेट आता?
कोण कोण आहे नॉमिनेट आता?
पराग प्रकरण गाजलं होतं तेव्हा
पराग प्रकरण गाजलं होतं तेव्हा सो मी वर ट्रेंड होत असेल. आता शो इतका रटाळ झालाय की फार कोणी बघत नाही आणि सोमि वर बोलण्यासारखं काहीच नाही. >>> ह्यावर्षी तसा responce कमीच आहे bb ना मागच्यावर्षीच्या तुलनेत. फेसबुकवर फार पोस्टस दिसत नाहीत त्यात पराग गेल्यावर जास्त करून bring back parag पोस्टस होत्या . काही दिवस हे खूप होतं, आता पहिल्यापेक्षा थोडं कमी झालं. त्याच्या fans नी सोडलाच असेल शो बघणे. इतरांना प्रतिसाद फार नाहीच यंदा.
वैशाली नॉमिनेटेड आहे आणि सोशल
वैशाली नॉमिनेटेड आहे आणि सोशल मिडीयावर पब्लिकचा राग आहे त्यामुळे ती जाईल असं वाटतय , पण खरच विदर्भातून वगैरे सपोर्ट असेल तर तरेल.
वैशाली गेली तर केळ्याची टिम कमजोर होईल मात्रं, हिनाला फोडावं लागेल मग त्याला तिथून !
काय माहिती. ती जायचं पण
काय माहिती. ती जायचं पण म्हणत होती. दोन दिवसांनी मुलीचा बड्डेपण आहे आणि इमेज वाईट होतेय असं वाटतंय तिला. ते ती स्वतःच करून घेतेय ना पण. तिला काढतील असं वाटत नाही.
कोण कोण आहे नॉमिनेट आता? >>>
कोण कोण आहे नॉमिनेट आता? >>> किशोरीताई, वैशाली, माधव, हीना, नेहा, शिव, वीणा.
कालचा भाग या सीझनचा
कालचा भाग या सीझनचा सगळ्यांत बोअरिंग भाग.
शिवानीची सायकोगिरी. वीणाने एकदाचं तिला कन्फ्रंट केलं ते बरं झालं. वीणालाही इतरांबद्दल बोलताना किंवा इतर कोणी बोलल्यावर त्यात सामील होताना जरा विचार करावा लागेल.
दिवसभर ते नॉमिनेशन टास्कचं दळण.
माधवला काय म्हणायचंय ते कळत नाही हे पुन्हा दिसलं. त्याच्या दोन मैत्रिणी - नेहा आणि शिवानीकडून ट्रेनिंग घ्यायची गरज आहे.
तसंच आपलं अस्तित्व दाखवायला , आवाज चढवायला तो फालतू (inconsequential) निमित्त निवडत असतो,( जिथे स्टँड घ्यायची गरज असते तिथे गायब / गप्प असतो) हेही पुन्हा दिसलं.
शिव- शिवानीचं आली अंगावर, घेतलं शिंगावर एवढं एकच बरं होतं.
वैशालीचं नॉमिनेशन टास्कमध्ये शिवानीला दिलेलं उत्तर आवडलं.
नेहाच्या ग्रुपने हिनाला नॉमिनेट करायला नको होतं. विरुद्ध ग्रुप स्ट्राँग होऊ शकेल. नेहाने अभिजीतला नॉमिनेट केलं का?
आपण हा फालतू कार्यक्रम बघण्यात आणि त्यवर इथे बोलण्यात वेळ वाया घालवतोच आहेत. त्यात वर इन्स्टाग्राम, यु ट्यूब आणि कुठे कुठे जाऊन, पुढे काय होणार त्याच्या अफवा तिथे वाचून इथे लिहितो.
माझ्या मते वैशाली जाईल कारण
माझ्या मते वैशाली जाईल कारण सोशल मीडियावर तिच्यावर जास्त राग आहे . कधीपासूनच . बर ती परवाच्या चिखलाचा टास्क सोडता कुठल्याच टास्क मध्ये कधीच ऍक्टिव्ह नसते. तोंड पाटीलकी करायची असेल तर मात्र ती विखारी बोलण्यात पुढे . त्यामुळे तिला काढतील . किशोरीला ठेवतील . गेल्या सिझन मध्ये पण आऊंना थत्ते गेल्यानंतर शांत असूनही किती आठवडे काढलच नव्हतं तसच किशोरीला पण काढणार नाहीत . बर किशोरीवर पब्लिक चा राग पण नाहीये
बाकी शिवानीने जास्तीत जास्त तीच तीच टिव टिव केल्याने आणि वीणाने पण शिवानीच्या आई- वडिलांची माफी मागितल्याने तो मॅटर आता संपेल अशी आशा आणि शिवानीच्या तुलनेने वीणाचा उद्धट पणा कमी वाटले पब्लिकला . होप सो . . शिवानी वीणाच्या दस पटीने उद्धट असल्याने तिने वीणाला नमवलच शेवटी
किशोरीताई, वैशाली, माधव, हीना
किशोरीताई, वैशाली, माधव, हीना, नेहा, शिव, वीण
>>>>
माधव जाईल
मला वाटत वैशाली जाईल कारण जर
मला वाटत वैशाली जाईल कारण जर ती गेली तर वीणा सरळ केळकर आणि शिव चा ग्रुप जॉईन करेल,केळकरला तसा वीणामुळे प्रॉब्लेम वाटत नाही पण वैशालीला आहे.
टण गेस्ट कस किय नॉमिनेट करु शकतो.
काल स्मिताने यू ट्युबवर परत एक छान इंटर्व्ह्यू दिला आहे.ती म्हणते की एकदा घरातून बाहेर पडलेल्या कंटेस्टंटने परत आत येण हे या शोच्या फॉर्मँटच्या विरोधात आहे.
त्यामुळे शिवानीला गेस्ट म्हणून पाठवल आहे ,ते ही काही खास कारणासाठी,बिबॉ खुप हुशार आहेत.असही म्हणाली.
पुन्हा एकदा स्मिता आवडली.तिला एकटीलाच गेस्ट म्हणून पाठवायच.
शिवानी उगाच तो मुद्दा उकरून
शिवानी उगाच तो मुद्दा उकरून काढत आहे जो खरंच पब्लिक ला आठवत पण नाही आहे.
महाराष्ट्र विसरला पण होता.
माधव काय बोलतो यार खरच कळत
माधव काय बोलतो यार खरच कळत नाही अज्जिबातच. नेहा ने प्लीजच त्याला जरा शिकवावं मुद्देसुत बोलायला.
काल हीना ची दया आली मला. तिला नीट मराठी बोलता येत नाही त्यामुळे तिचे मुद्दे समोरच्याला समजत नाहित पटकन. पण असं असुन सुद्धा ती मराठी बोलणं सोडत नाही म्हणुन तिचं कौतुक. नेहा ने उगीच हीना ला नॉमिनेट केलं. काहीच गरज नव्हती. हीना खरच एक चांगली खेळाडु आहे. शिवानी च्या भरवशावर हीना शी पंगा घेउन नेहाचं नुकसान होणार आहे.चुकुन या आठवड्यात माधव गेला आणि शिवानी पण बाहेर पडली तर नेहा फारच एकटी पडेल.
रुपाली आणि वीणा चं अगदीच फाटलय का ? काल रुपाली विनर झाल्यावर वीणा जीवावर आल्यासारखी तिचं अभिनंदन करत होती. मनात नाही पण लाजेकाजेखातर केलं. शिव चा पण राग आला मला काल. इतके दिवस जितके कॅप्टन झाले त्या सगळ्यांना शिव ने स्वतः उचलुन घेउन कॅप्ट्न रुम मधे आनंदाने नेले. पण काल रुपाली वीणा च्या विरुद्द जिंकली म्हणुन शिव ने अजिबात उत्साह दाखवला नाही. This is not Shiv which we saw before. वीणा मुळे खरच चेंज झालाय तो हे नक्की. Not good for him.
वैशाली जावी आता कारण तिच्यापेक्षा किशोरी ने जास्त टीआरपी दिला मागच्या वीक मधे. तसही वैशाली विखारी बोलण्याशिवाय जास्त काही करत नाही.
वीणा च्या चेहेर्यावर वाजलेले १२ अजुन तसेच आहे या वीक मधे पण. आणी त्यामुळे शिव च्या चेहेर्यावर पण १२ वाजलेत

गेल्या २ आठवड्यात एकदम एकमेकांच्या मागे पळणारे आणि हार्ट वगैरे करणारे लोक एकदम रडका चेहेरा करुन फिरत आहेत
माधव हीनामध्ये नक्की काय झालं
माधव हीनामध्ये नक्की काय झालं. मी उशिरा लावला tv. आज बरंच फुटेज त्या दोघांनी खाल्लं. हीना रडत पण होती.>>>ते बाथटब चे टास्क चालू होते तेव्हां हीना वैशालीशी जाऊन गप्पा मारत होती . ते माधवला आवडले नाही . सो माधव ने शिवानि ला सांगून हीना ला आत पाठविले .
हीना ला ते आवडले नाही म्हणुन ती रडत होती .की डायरेक्ट मला सांगायचे आवडले नाहीते आत का पाठवले म्हणुन. याच्या आधीही ती तिला नेहा म्हणून हाक मारतो म्हणून चिडली होती ती.
माधव चि राग व्यक्त करायची पध्दतकाही तरी विचित्र आहे. बोलणे चालू असताना एकदमच ओरडतो एक मीनट आता मी बोलू करुन.
माधव जर असाच वागत राहिला तर तो लवकरच बाहेर पडेल.
बिग्ग बॉस पण काय गाणी लावतात
बिग्ग बॉस पण काय गाणी लावतात . "दूम दबाकर भाग जा तू बात मेरी मान आगया हूं तोंडने मैं तेरे सब गुमान" . हे नेमक कुणाला उद्देशून होत. शिवानि वीणा करुन सॉरी बोलून घेणार त्यासाठी का.? का शिवानि ला यातुन प्रेरणा मिळाली आणी तिने तोच संपलेला टॉपिक परत सुरु केला.
रुपाली आणि वीणा चं अगदीच
रुपाली आणि वीणा चं अगदीच फाटलय का ? काल रुपाली विनर झाल्यावर वीणा जीवावर आल्यासारखी तिचं अभिनंदन करत होती. मनात नाही पण लाजेकाजेखातर केलं. शिव चा पण राग आला मला काल. इतके दिवस जितके कॅप्टन झाले त्या सगळ्यांना शिव ने स्वतः उचलुन घेउन कॅप्ट्न रुम मधे आनंदाने नेले. पण काल रुपाली वीणा च्या विरुद्द जिंकली म्हणुन शिव ने अजिबात उत्साह दाखवला नाही. This is not Shiv which we saw before. वीणा मुळे खरच चेंज झालाय तो हे नक्की. Not good for him.
<<
उलट शिवने तिला नाही उचललं ते अतिशय आवडलं, ती रुपाली ही रंग बदलणार्या सरड्यासारखी आहे, सर्वात बेभरवश्याची , डिसलॉयल, फेक इ.
या आधी कॅप्टन झालेले त्याचे मित्रं होते (वैशाली, केळ्या, माधव ).
उगीच नाहीये मैत्री तर मस्का मारून कशाला उचलायचं कॅप्टन होण्याची अजिबात लायकी नसलेल्या प्रतिस्पर्ध्याला !
रूपाली बिन पेंदी का लोटा आहे.
रूपाली बिन पेंदी का लोटा आहे.
तिचं एकास एक संभाषणातलं बोलणं इरिटेटिंग आहे, ऐकणं पण. ती हुं हुं भरते किंवा एक शब्दी रिस्पॉन्स देते ते.
रुपाली खरोखर मनातून उतरली...
रुपाली खरोखर मनातून उतरली... सर्वांसमोर म्हणते की captaincy साठी तुम्ही कोणी nominate व्हावं असं मला वाटत नाही आणि कॅमेरा ला जाऊन सांगते की कोणी nominate व्हायला तयार नाही म्हणुन....
आज बीबी मध्ये ते murder
आज बीबी मध्ये ते murder mystery कार्य आहे . ते सांकेतिक खून करायचे.
केळकर ला उचलुन घेउन गेले
केळकर ला उचलुन घेउन गेले म्हणे
मज्जा 
आता त्याला परत आणण्यासाठी लोकांना टास्क द्यावेत आणि कोणी ते करुच नयेत. म्हणजे केळकर परत येणार नाही
पुन्हा एकदा स्मिता आवडली.तिला
पुन्हा एकदा स्मिता आवडली.तिला एकटीलाच गेस्ट म्हणून पाठवायच. >>> हो खूप छान इंटरव्यु होता. स्मिता आत गेली तर तिच्या चांगुलपणामुळे, हे बाकीचेच वाट लावतील तिची. स्मिता दिसत पण किती ग्रेसफुल होती. ती फेक नाहीये अॅक्च्युअली, तिचा स्वभावंच खूप चांगला आहे, त्यादिवशी म मां पण म्हणाले ना, हॉटेल टास्कमधे तिचं वागणं किती छान होतं, मुळात तिच्या स्वभावातच नाही वाईट वागणं.
रुपाली खरोखर मनातून उतरली... सर्वांसमोर म्हणते की captaincy साठी तुम्ही कोणी nominate व्हावं असं मला वाटत नाही आणि कॅमेरा ला जाऊन सांगते की कोणी nominate व्हायला तयार नाही म्हणुन.... >>> हो तिच्यापेक्षा वीणा खरंच खूप चांगली आहे, तिने स्वतःच स्टँड घेतला की नाही कॅप्टनशिप मिळाली तरी चालेल, टीममधल्या कोणाला गमवु इच्छीत नाही.
उगीच नाहीये मैत्री तर मस्का मारून कशाला उचलायचं कॅप्टन होण्याची अजिबात लायकी नसलेल्या प्रतिस्पर्ध्याला ! >>> अगदी अगदी.
रुपालीने स्वतः आभार मानायला हवे होते उलट विरुद्ध टीमचे, तिला मोटीवेट आणि मदत त्यांनी केली उमेदवार म्हणून समोरच्या टीममधून आणायची. आता ती सेफ आहे, पण नेक्स्ट विक ती जावी, या विक मधे वैशाली गेली तर.
शिवानी च्या भरवशावर हीना शी पंगा घेउन नेहाचं नुकसान होणार आहे. >>> हो ना. अजून एक हिनाबद्दल काही मिसगाईड केलंय का शिवानीने ह्यांना.
आता त्याला परत आणण्यासाठी
आता त्याला परत आणण्यासाठी लोकांना टास्क द्यावेत आणि कोणी ते करुच नयेत. >>>
वैशाली, शिव, वीणा नक्की करतील. केळकर असेल नक्के फायनलमध्ये, जर वैशाली लवकर बाहेर पडली तर. तो जिंकणार नाही पण असेल.
Amupari thank u, माधव हीना उत्तरासाठी.
चिखलाच्या खेळा मधे बर्फ
चिखलाच्या खेळा मधे बर्फ टाकणे, वर लिहल्याप्रमाणे तिखट टाकणे असे अपेक्षित होते. अजुन एक म्हणजे खेळाडूला त्यातुन बाहेर येण्यास भाग पाडण्यासाठी त्याचेच कपडे बाथटब मधे टाकणे, सर्फ टाकून फेसाळ चिखल करणे, टब धरून हलवणे असे करता आले असते.
ममांनीपण खर भाकरीची री जरा जास्तच ओढली.
वैशाली चिखलात बसण्यात का तयार झाली हे कळाले नाही. तिचा समज असा तर नाही झाला कि हा चिखल आयुर्वेदिक आहे, कि नुसतेच लोळत पडायचे आहे म्हणुन तयार झाली .....
बाकी एक गोष्ट मात्र खरी की ममां माबोचा आधार घेतात.... लंडनला गेल्यावर ज्या माणसाने त्यांना ईतके प्रश्न विचारले त्याची एक झलक चित्रित करून दाखवायला काहीच हरकत न्हवती. कारण चुगली बॉक्स मधे नाव दाखवतात, एका व्यक्तिला आठवड्याच्या दिवशी समोर उभे राहून प्रश्न विचारायला देतात, तर परदेशात राहणारी व्यक्ती आपले बोलणे चित्रित करून दाखवु शकते.
शिवानीला परत घरात प्रवेश देण्याच कारण मल तरी अस वाटतं की वीणा वर तिने केस करून बिचुकलेंसारख तिलाही बाहेर पडायला लागू नये. त्या पेक्षा तुच घरात ये आणि सर्वांसमोर तिच्याकडून माफी वदवून घे.
या भागामधील एकंदरीत परिस्थिती बघता वाईल्ड्कार्डसाठी नक्कीच दुसरे कोणी खेळाडू घरात येण्यास तयार नसणार.
शिवानीला परत घरात प्रवेश
शिवानीला परत घरात प्रवेश देण्याच कारण मल तरी अस वाटतं की वीणा वर तिने केस करून बिचुकलेंसारख तिलाही बाहेर पडायला लागू नये. त्या पेक्षा तुच घरात ये आणि सर्वांसमोर तिच्याकडून माफी वदवून घे. >>> तसं नसेल उलट शिवानीवरच केसची टांगती तलवार होती bb च्या. हे प्रकरण आणलं ते वीणापेक्षा परागसाठी असणार. बाहेर लोकं पराग पराग करतायेत, तर दाखवायचं की तो बघा कसा वीणाशी शिवानीबद्दल वाईट बोलत होता आणि वीणापण. पण ती शिवानी जेव्हा अति करायला लागली, विणावर डाव उलट्वायला लागली तेव्हा, bb ना ते पसंत पडले नसणार. शिवानी पर्सनल स्कोअर सेटल करायला लागलेली बहुतेक कारण म मांनी पण तिला माफ कर, मोठी होशील वगैरे करत पडदा टाकलेला पण ती त्या विरोधात जाऊन बोलायला लागली म्हणून bb नी पुढचं पाउल उचललं असावं.
Pages