Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आजचा प्रोमो पहिला.. केळ्या
आजचा प्रोमो पहिला.. केळ्या acting करतोय असंच वाटलं.
somehow त्याचे सगळे expressions खोटेच वाटतात मला.. acting स्कूलमध्ये शिकवल्यासारखे..
हो केळ्या १००% अॅक्टिंग करत
हो केळ्या १००% अॅक्टिंग करत आहे. एरव्ही तो स्ट्राँग प्लेयर आहे. अडगळीच्या खोलीत टाकले म्हणून इमोशनल होईल असे वाटत नाही. शिव आणि वैशाली, नेहा, शिवानी सगळेच इमोशनल फूल्स बनले असावेत. मी रुपालीच्या जागी असते तर म्हटले असते, बिबॉ ना सांगू देत खरंच केळ्याला काही प्रॉब्लेम असेल तर. तरच किल्ली मिळेल
त्याला टास्क दिले असेल बिग
त्याला टास्क दिले असेल बिग बॉस ने .
Season 1 मधल्या पुष्कर जोगचे
Season 1 मधल्या पुष्कर जोगचे त्याच्या wife सोबत भांडण झाले आहे असे वाचण्यात आले.. सोमि वर खूप चर्चा सुरू आहे... Jasmine ने insta a/c वर पुष्करला unfollow केले आहे आणि त्याच्यासोबतचे photos पण delete केलेत... हे सगळं पुष्कर साठी पर्सनल असेल पण bigg boss मध्ये विचित्र वागून त्यानेच लोकांना यावर चर्चा करायला भाग पाडलंय... आणि आता याबद्दल बोलू नका असं सांगत आहेत साहेब... Jasmine looks really very strong Woman..
https://l.facebook.com/l.php
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranj...
जाऊ दे ना - पर्सनल लाईफ
जाऊ दे ना - पर्सनल लाईफ बद्धल कशाला चर्चा
आज काय झाले केळकर असे का करत
आज काय झाले केळकर असे का करत होता ?
पर्फॉमर ऑफ द वीक - हिना.
पर्फॉमर ऑफ द वीक - हिना.
डम्बेस्ट प्लेयर ऑफ द सीझन शिव.
फिट्टेस्ट प्लेयर किशोरी. धावण्याच्या शर्यतीत माधवला मागे टाकलं.
शिवानी हिनाला म्हणतेय , तू डोक्यावर पडलीस.
खंजीर कोणाला मिळाला होता? रूपालीचा तहहयात हक्क आहे त्यावर.
हिनाला काय झालंय सध्या,
हिनाला काय झालंय सध्या, सदोदित भांडायच्या मूडमध्ये??
काहीही..
अभिजित चा ग्रुप जॉईन केला तिने??
आणि काय एकेक कारणं देत होती नेहाच्या वस्तू लपवण्याबद्दल की, मी तिच्या खुनाची सुपारी दिली म्हणून मी तिच्या वस्तू लपवल्या म्हणे
शिवानी परत आल्यामुळे नेहा आणि माधवने तिला दूर केलं बहुतेक त्याचा राग सगळ्यांवर काढत्ये भांडून भांडून!!!
उद्या च्या प्रोमो मध्ये
उद्या च्या प्रोमो मध्ये कोणीतरी केळ्या ला फोन करून खून करायला सांगत आहे. कोण असेल हा माणूस. नवीन एंट्री ?
आवाजावरून काहीच कळलं नाही नीट.
आरोह वेलनकर आहे नवीन स्पर्धक
आरोह वेलणकर आहे नवीन स्पर्धक असं म्हणतायेत सोमीवर.ख.खो.दे.जा.
अभिजीत 'जीझस जीझस' का म्हणतो?
अभिजीत 'जीझस जीझस' का म्हणतो?
ह्यावेळी नेहा कॅप्टन
ह्यावेळी नेहा कॅप्टन व्ह्यायला हवी आहे. ती झालीच नाहीये आणि तिने सामान्य नागरीक आणि खूनी दोन्ही टास्कस छान केले. रुपाली अजिबात नको, केळकर चालेल एकवेळ.
केळकरने नेहाला सोपा खून करायला दिला वीणाचा, ते दोघं बावळट आहेत. काहीतरी टफ दिलं असतं तरी नेहाने इझी केलं असतं आणि बघायला मजा आली असती.
ते वीणा शिव मठ्ठ आहेत.
माधवला मारण्यापेक्षा रुपालीला मारायचा सोपा टास्क द्यायला हवा होता केळकरने. तो कठीण दिला आणि वेळ कमी होता नेहाकडे. शिवानीला इझी दिला. तो केळकरपण मुर्ख आहे.
आरोह वेलनकर आहे नवीन स्पर्धक
आरोह वेलनकर आहे नवीन स्पर्धक असं म्हणतायेत सोमीवर.ख.खो.दे.जा. >>> अच्छा आरोह वेलणकर, रेगे मधला. म मांची मूवी होती. मस्त आहे तो.
मग शिव खरंच जातोय की काय.
आज केळकर बरोबर सांगत होता सगळ्यांना , समोरचा grp मस्त खेळला.
हीना task चांगला करुदे पण प्रचंड डोक्यात गेली. कटकट आणि किरकिर नुसती. वीणा शांत झाली, मागे भाखरी करून दिली नाही पण आता पोळी करून दिली हिनाला आणि समजावत पण होती.
अभिजीत 'जीझस जीझस' का म्हणतो? >>> असं म्हणतो का, माझ्या लक्षात नाही आलं.
मला केळकर दिसला की हिंदी
मला केळकर दिसला की हिंदी बिगबॉस मधल्या सब्यसाची चीच आठवण येते.आज तो हसत असताना प्रकर्षाने जाणवलं ते.चेहरेपट्टी सेम आहे त्यामुळे असेल बहुतेक.
हिना का सगळ्यांशी भांडण
हिना का सगळ्यांशी भांडण करतेय आणि किरकिर करतेय . ? आज पूर्ण एपिसोड तिच्या भांडणांचीच फुटेज दाखवत बसले बिग बॉस . म्हणूनच ती डोक्यात पण जायला लागली . तिला काढायचं आहे कि काय बिग बॉस ना ?
कब्बडी टास्क केळकरने आणि
कब्बडी टास्क केळकरने आणि माधवने चांगला केला.
दुसऱ्या channel च्या prgm ची add केली कलर्सवाल्यांनी ह्याचं थोडं आश्चर्य वाटलं पण कब्बडी खास मराठी मातीतला खेळ आहे म्हणून असेल, good.
किचनमध्ये स्वयंपाक करताना,
किचनमध्ये स्वयंपाक करताना, जेवताना भांडू नका सगळे सांगतात ह्या लोकांना तर ह्यांची सर्वांची भांडणे जास्तीत जास्त तिथेच. हीना सर्वात पुढे यात. पण रुपालीने पण जाम कचकच केली. नेहाने पण. वीणा सुधारली.
माधवला मारण्यापेक्षा रुपालीला
माधवला मारण्यापेक्षा रुपालीला मारायचा सोपा टास्क द्यायला हवा होता केळकरने. तो कठीण दिला आणि वेळ कमी होता नेहाकडे. शिवानीला इझी दिला. तो केळकरपण मुर्ख आहे.>>खून कसा करायचा हे सगळ बिग बॉस ठरवत होते...अभिजित फक्त convey करत होता मेसेज
...तस बघायला काही रोल नव्हता अभिजित चा..उगीच त्याला पळवणे आणि आणून सोडणे केल.. अभिजित फक्त खुनी choose करत होता आणि बिग बॉस चा मेसेज पोचवत होता.. खाऊन पिउन सुखी होता..आणि नंतर जणू काही अती प्रसंग झालाय अशी ऐक्टिंग करत होता... रुपाली पण महा बावळट..सांगता नाही का येत की बिग बॉस चा आदेश येईपर्यंत मी बाहेर काढू नाही शकत. गेल्या आठवड्या मध्ये त्यांनीच warning दिली होती... ती अतिशय कणा हीन व्यक्तिमत्व आहे.. जसा वारा वाहिल तिथे वळते... हीनाशी काल केलेल भांडण सुधा शिवानी नेहा च्या gang मध्ये येण्या साठी..ते भांडत आहेत तर मी पण..अस होत... भांडताना मध्येच नेहा म्हणाली तिला की नको लक्ष देऊ..बोलूच नकोस..तर लगेच बाई गप्प..स्वताचा काही stand च नाही तिला
उलट अभिजीत अडगळीच्या खोलीत
उलट अभिजीत अडगळीच्या खोलीत असताना रूपाली व्यवस्थित वागली. शिव आणि वैशाली उगाच हायपर होत होते. त्याची तब्येत महत्त्वाची आहे की बिग बॉसचा रूल वगैरे. अभिजीत कुठे होता हे शिवला माहीत होतं. आणि दार उघडल्यावर अभिजीतने डान्स केला तेव्हा हा अभिनय करत होता, हे त्यांना कळलंच असेल.
रूपाली म्हणाली अभिजीतला की आपण एकत्र काम केलंय, मला तुझी अॅक्टिंग कळते.
बाकीचे लोक त्याचे हात काय शेकत होते आणि काय काय!
दिवसेंदिवस बोअर होत चाललंय हे.
मर्डर मिस्टरीतर अगदीच पुचाट होतं.
त्यापेक्षा अमक्याचा प्रतीकात्मक खून झाला म्हणजे काय झा लं? तो कोणी केला हे शोधा, असं केलं असतं तरी ते बरं वाटलं असतं.
रुपालीला बरोबर कळलं होत कि
रुपालीला बरोबर कळलं होत कि बिग बॉस ने सांगितल्यानंतरच अभिजीतला बाहेर काढायचा . ते व्यवस्थित त्या शिव ला न सांगता नुसतं माझ्या वर ओरडायचं नाही- माझ्यावर ओरडायचं नाही कशाला बोलत होती ? सरळ सरळ सांगायचं ना बिग बॉस ची अनाऊंसमेंट होऊ दे मग काढते मी त्याला बाहेर . फुकटच शिव च ऐकून घेतलं तुझ्यात माणुसकीच नाही , तुला स्वतःची कॅप्टनशिप महत्वाची वाटते . माणसाची किंमत नाही इत्यादी इत्यादी . कशाला ?
किव्वा सांगितलं हि असेल पण एडिटिंग मध्ये ते दाखवलच नाही . मुदामून पब्लिक ची समजूत करून द्यायला " किती ग बाई ते कमी डोकं रुपालीला " बिग बॉस स्वतःच्या मनाप्रमाणे एडिटिंग करून पब्लिक समोर प्रत्येकालाच वेगळ्या अँगलने दाखवतात . न्यू एंट्री आरोह वेलणकरची आहे असं म्हणताहेत लोक्स . तोच केळकरला कॉल करून नेहा आणि शिवानीच्या खुनाची सुपारी देतोय . नवीन एंट्री नाट्यपूर्ण
पण शिवचे शब्द त्याच्या घशात
पण शिवचे शब्द त्याच्या घशात गेले आपोआप.
रुपाली चा एकमेव डायलॉग : मी
रुपाली चा एकमेव डायलॉग : मी तुझी नोकर नाहिये / वेगवेगळ्या सुरात :p
हळू बोल हळू बोल : हे पण ओरडून बोलते
तिच्या अगेन्स्ट शिवानी जरी असेल तरी माझा मत शिवानी ला पण रुपाली नो नो
रुपाली ने अभिजित च्या बाबतीत
रुपाली ने अभिजित च्या बाबतीत जे केले ते बरोबर होते तिला माहिती होते की तो acting करतोय. शीव तर त्या वेळी वेड्या सारखा करत होता. शीव खरोखर इमोशनल फुल आहे. वीणा आणी शीव रुपालिला बोलले की तिला चांगला performance द्यायचा आहे. अरे तुम्ही काहीच केले नाही तर तिने पण करु नये का ?
वैशाली ला तर गेमच कळला नाही म्हणे. तुम्ही दुसर्याना नावे ठेवता की दुसर्याच्या डोक्याने खेळता. आणी तुमची टीम अभिजित नसल्यावर फेल का.?
अभिजित ने चांगले खेळलेल्यां चे कौतुक केले ते आवडले.
वैशालीचं डोकं गेमबाहेर चालतं
वैशालीचं डोकं गेमबाहेर चालतं वाटतं.
ती काल दिवसभर लोळतच असलेली दाखवली.
हिना चा तर स्वत: चा काही तरी
हिना चा तर स्वत: चा काही तरी वेगळा च गेम चालला होता. तिला नेहाच्या वस्तू लपवून ठेवायची काहीही गरज नव्हती. नेहाने तिच्या वस्तू लपवून ठेवल्या नव्हत्या शिवानिने ठेवलेल्या तिला रडवायसाठी. नंतर ही तिने दिलेले स्पष्टीकरण पटले नाही की मी नेहाची सुपारी दिलेलीम्हणून मी लपवले. ती उगाचच सगळ्याना इरिटेट करत होती.
विणा शीव ला बोलली की तू माझा
विणा शीव ला बोलली की तू माझा टॉप फाडला असता तर चालले असते. शीव त्यावर बोलला की मला तूला खल्लास करायचे नव्हते . विणा बोलली की मी खलास झाले असते तरी तू शेवट पर्यंत राहिला असतास ना गेम मध्ये . शीव बोलला की माझ्या ते लक्षातच नाही आले.
What शीव खरोखर rodies मधुनच आलय ना.? वीणा च्या प्रेमात शिव आंधळा झालाय त्याचे डोक्के ही चालेना.आणी शीव ने वीणा च्या सांकेतिक खूनात नेहाची नकळत मदत केली वीणा बरोबर डांस करुन.
खर तर त्या गेम मध्ये बूथ मध्ये जाणे पण महत्त्वाचे होते. रुपालीचे नाव कोणी बूथ मध्ये आधी संगीतले असते तर तिचा सांकेतिक खून झाला असता . रुपाली लक ने वाचली. किशोरी ताई फास्ट जाऊन पण सारखे शिवानि चे नाव सांगत होत्या.
वैशालीचं डोकं गेमबाहेर चालतं
वैशालीचं डोकं गेमबाहेर चालतं वाटतं.
ती काल दिवसभर लोळतच असलेली दाखवली. >> ती सततच लोळत असते. हे मी या धाग्यात खूप वेळा लिहिलंय . बाहेर लोक पण तिच चर्चा करतात. ती जास्तीत जास्त वेळा आडव्या स्थितीत च असते. पांघरून घेऊन सतत झोपलेलीच असते त्यामुळे कॅमेराला पर्यायच राहत नाही . नाहीतर एडिटिंग करून दाखवलं असत . पण ९० टक्के जर ती लोळतच असेल तर एडिट तरी किती करणार ? सोमिवर मी डोलकर या गाण्यात शब्द घालून वैशालीवर लिहिलेलं गाण वाचल
मी लोळकर लोळकर लोळकर बिगबॉसची राणी
भर पलंगावरी कुचूकुचू करते गाऱ्हाणी ssssss ...
बिगबॉसाची लेक मी लारी
चादर पिवली गो घेतलीय अंगावर सारी
माझ्या तोंडात गो भलत्याच कडूकडू शिव्या
त्या हलक्याश्या चारोळ्या मानून तुम्ही खाव्या
असं
(No subject)
सुजा
सुजा
खरंच लोळत पडलेली असते वैशाली, तिला पाठवा.
हो तुरु bb मारायचं कसं ते सांगत होते त्यामुळे bb ना ती रुपाली महत्वाची आहे का माधव पेक्षा, असं वाटतं, माधव बरा.
काल शिव उगाच हायपर होत होता, रुपाली पण खाणा खुणा काय करत बसली, bb ना आदेश देऊदे मग मी काढणार. वीणा बरोबर म्हणाली शिवला तू तरी राहिला असतास गेम मध्ये, नाहीतरी टॉपही गेला, वीणाही गेली
ती हिना जाम कटकट करते, पण एक पोळी करून द्यायची ना तिला, जो भाखरीला न्याय तोच पोळीला. पण ती कधीच adjust करत नाही असं दिसलं. पण ज्या न्यायाने वीणाची शाळा घेतली त्या न्यायानेच पोळीवरून रुपाली आणि नेहाला बोलायला हवं.
हिनाची तर सेपरेट शाळा घ्यायला हवीय.
शिवला जाम शिव्या मिळणार आहेत.
Pages