तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गमत म्हणजे इशा बाळाला बर नाही म्हणुन पुर्ण घरदार चिन्तेत आहे आणी हे बाळ झोपेतुन ऊठ्ते , चालत सुटते आणी थेट माहेरीच पोहोचते. , कुठल्या गुप्त मार्गाने जाते ते केड्यालाच माहित

काल परत तेच गोल्डन शांडल घालून बाळ तरातरा निमकरांकडे आला.. आजारातून उठून

Khik..

किती पाट्या टाकता राव बास की आता

मेट्रो साठी खोदलेल्या रस्त्यावर भुयारी मार्ग पण आहेत वाटतं.?? बाळ त्यातूनच आलं जणु

बाळाला आणि नंदुला दोघींना कपडे म्हणून घालायला झगेच दिलेत काय? ती राजनंदिनी निळ्या ड्रेसमधे पोटुशी असल्यासारखी वाटली. Uhoh

तो गच्चीवरचा सीन केवढा विनोदी होता. आधी टायटॅनिक मग दे धक्का. मी तुला माफ करते आणि पोलिसातपण जाणार नाही असं म्हणाली असती राजू तर काय बिघडलं असतं. गजापण राजनंदिनी असं पूर्ण नाव घेतो. ईशा कर्जतहून चालत चाळीत येते, केस मोकळे, जरीचा ड्रेस आणि सोनेरी सॅंडल, मला बघूनच चिपचिप वाटायलं लागलं. आता ईशा बदला कशी घेणार, सरररररांना धडा कसा शिकवणार एवढ्या तकलादू अभिनयाच्या जोरावर.

एवढी प्रौढ एक्ट्रेस घेण्याचा काय उद्देश्य होता?.. काही कळाले नाहिये...
लग्नाळू मुलगी म्हणून चाळीशी पार केलेल्या नंदूडीला स्वीकारणे महा कठीण होते...
असो... बाळ थोड्या गॅप नंतर सुधारेल अशी आशा वाटत होती.. पण तिथेही निराशा झाली...
लहान बाळांना मातीच्या गोळ्याची उपमा देतात... आपण त्यांना हवा तसा आकार देऊ शकतो.. हे वैश्विक सत्य आहे...
...... इथे आपले ई बाळ मातीचा गोळा नसून गुळगुळीत दगड आहे (अभिनयाच्या बाबतीत) हे आता स्पष्ट झाले आहे...
Disappointed!!!

तो सीन विनोदी आहे खरा पण दोघांच काम सुंदर आहे. >>>>>>>> +++++++++++११११११११ मागच्या दोन एपिसोड शितू चान्गल काम करत होती. तिला डायलॉग्ज पण छान दिले होते. नन्दूच प्रेत रिअ‍ॅलिस्टिक वाटत होत, अन्गावर काटा आला बघून. त्याक्षणी विसचा राग आला होता.

लहान बाळांना मातीच्या गोळ्याची उपमा देतात... आपण त्यांना हवा तसा आकार देऊ शकतो.. >>>>>>>> अस विस सुद्दा म्हणाला होता. Lol

काल परवा पर्यन्त गजा पाटील कोण आहे, चित्रातली ती बाई कोण आहे विचारत होती, आज मी कोण आहे विचारत रस्त्यावर फिरतेय. जोगवाबाई काय तिची वाटच बघत उभी असते वाटत, कधी येते बाळ आणि मला प्रश्न विचारते.

गजापण राजनंदिनी असं पूर्ण नाव घेतो. >>>>>>>> त्याच प्रेमच नाहिये ना तिच्यावर म्हणून. नाहीतर तिला लाडाने नन्दू म्हणाला असता.

एवढी प्रौढ एक्ट्रेस घेण्याचा काय उद्देश्य होता?.. काही कळाले नाहिये... >>>>>>>>> अगदी अगदी मेबी त्यान्ना गजा तिच्यापेक्षा लहान होता अस दाखवायच असेल.

बादवे, नन्दूच्या रोलसाठी मृणाल कुलकर्णी, ऋजुता देशमुख ( ह्या अजूनही तरुण दिसतात) , तेजस्विनी पन्डित, मृणाल दुसानीस या सुद्दा चालल्या असत्या.

गमत म्हणजे इशा बाळाला बर नाही म्हणुन पुर्ण घरदार चिन्तेत आहे आणी हे बाळ झोपेतुन ऊठ्ते , चालत सुटते आणी थेट माहेरीच पोहोचते. केस मोकळे, जरीचा ड्रेस आणि सोनेरी सॅंडल, मला बघूनच चिपचिप वाटायलं लागलं. >>>>>>नैतर काय. नवर्याने आपल्याला दोनदा फसवलय ह्याच जराही दु: ख नाही आणि हि चाललीय फुल्ल मेकअपमध्ये.

आता ईशा बदला कशी घेणार, सरररररांना धडा कसा शिकवणार एवढ्या तकलादू अभिनयाच्या जोरावर. >>>>>>>> आता अस दाखवायला हव की, विस खरच ईशाच्या प्रेमात पडलाय, पण ईशा त्याचा द्वेष करते, त्याचा त्याच्याच पद्दतीने विश्वासघात करते आणि बदला घेते. हे पटणेबल आहे. पण केडया काय लिहिल त्याचा भरवसा नाही. आणि दुसर सन्कट म्हणजे मख्ख बाळ! ईशाला राधिका पार्ट २ नाही केल म्हणजे मिळवल. नाहीतर इथेही पुन्हा प्रेम, पुन्हा विश्वासघात, पुन्हा प्रेम अस चक्र चालू राहायच दोन वर्ष.

बर ही घरातून गेली ती गेली, जाताना फोन तरी घेऊन जायचा. विसला पुन्हा डाउट यायचा. पण कालची विसची ईशाबद्दलची काळजी जेन्युईन वाटत होती.

एवढा मोठा खून पाहिल्यावर एखादा माणूस इतका थंड प्रतिसाद देईल? >>>>>>>> सहमत. विसने निर्घुण रीत्या नन्दूचा खून केला त्याचा हिला राग यायला हवा होता, धक्का बसायला हवा होता. हिच मात्र एकच टुमण चालू, " मी जे बघितल ते खर आहे का? कोण आहे मी?"

नन्दू गेली ढगात, आता तुम्ही ईश्याच बघा. Biggrin

नदीतील गोटे छान गुळगुळीत असतात, दिसायला तरी चांगले वाटतात.
इश्या म्हणजे डोंगर फोडून काढलेला खडक. बेढब, बटबटीत!

>>>>>>एवढी प्रौढ एक्ट्रेस घेण्याचा काय उद्देश्य होता?.. काही कळाले नाहिये...>>>>>>

मला वाटते, शेखर ढवळीकर यांनी मूळ कथा काही वेगळी असावी. त्यात रानं बरीच वर्षे संसार करून मेली असे काही असेल. त्यानुसार शिल्पाला घेतले असावे. दरम्यान अभिजित गुरु आणि दिग्दर्शक, फिनान्सर यांच्यात काहीतरी ट्विस्ट आणायच्या हव्यासाने आणि विसं ला गुन्हेगार बनवायच्या नादात कथा आणि मालिकेचे भजे झाले असावे. पण मध्ये सुबोध भावेचा फावला वेळ संपला आणि मालिका गुंडाळायची वेळ आली. त्यातच titles मध्ये शिल्पा दाखवल्याने दुसरे कोणी आयत्या वेळी आणणे शक्य झाले नसेल.

च्याआयला ईश्या इतकी मख्ख अभिनय कसा करते तेच कळत नाही.स्वप्न बघताना घामाघुम होण्याचा सीन नीट करता येऊ नये.

आज काकुकडे गेले तर तिथं तुपारे Tvवर लावलेलं.
घरी असते तर tv रागानं बंद तरी करता आला असता,तिथं नाय करता आला. Sad
कैच्याकै लिहतो तो केड्या,त्यात हिचा बावळट अभिनय.

सलग 4 तास त्या तुपारे ला आज सहन करावं लागलं. Angry Angry

वाईट फक्त सुभा साठी वाटतं कि तो तुपारे सारखं काम घेऊन पार फसला.

दिवाळीतले फटाके तुळशीच्या लग्नाला ठेवतो तसे थोडा संताप शिल्लक ठेवा लोकहो, म्हापिसोडसाठी
कोण कोण चाखणार आहे ते हलाहल?

बादवे, नन्दूच्या रोलसाठी मृणाल कुलकर्णी, ऋजुता देशमुख ( ह्या अजूनही तरुण दिसतात) , तेजस्विनी पन्डित, मृणाल दुसानीस या सुद्दा चालल्या असत्या >>>>> मला तर निर्मिती सावंतही चालल्या असत्या. संवाद तरी दण्दणीत म्हटले असते.

बाळामुळे आज निमकर माबाबा पण फिके वाटले.वाण नाही पण गुण लागला.
एवढ मोठ सत्य,त्यात जावई खुनी,त्यात बाळ पुनर्जन्म,हे कळल्यावर कोणालातरी चक्कर ,किंवा जबरदस्त शॉक बसायला हवा होता.पण नाही.एखाद्या पिक्चरसारखी स्टोरी सांगितल्यासारखी ही मंद सत्य सांगत होती आणि हे ऐकत होते.
हे बाळ धडा शिकवणार आहे म्हणे.एकंदरीत कठीण आहे.
सुभा बहुतेक काढता पाय घेणार अस दिसत आहे,लंडनला जाणार बहुतेक.

कोण कोण चाखणार आहे ते हलाहल? परिक्षे आधी रिविजन करतात तसा होता आजचा महा एपिसोड... सगळं परत तेच ते दाखवल पालकांना सांगताना.. त्यातलं एक वाक्य ईशा दार बंद करुन खिडक्या सताड उघड्या ठेवून:"आई, बाबा..इथे बघा".. म्हंटलं आता बडबड गीत म्हणते का काय.. ईशा च्या बाबतित काहिच बोलू शकत नाही..तिच्यापेक्षा शाळेतली मूल टिळकांच भाषण करताना आवाजात चढउतार दाखवतात

नंदूच्या चपलेचा रंगही सोनेरीच होता.

राजनंदीनीला सुभा फारच आवडत असणार म्हणून परत ह्या जन्मीही प्रेमात पडून बिडून नंतर वाजत गाजत डेस्टीनेशन लग्न केलं. माहेरी सासरी सर्व कोडकौतुक करून घेतली आणि आता फीवर उतरल्यानंतर वर्षभरानं स्वप्नं "पाडायला" सुरुवात केलीये. सूडाचा प्रवास असता तर परत लग्न कशाला केलं असतं?

आजचा एपि म्हणजे जे जे सगळं आपल्याला ठाऊक आहे ते ते सर्व आज निमकरांना समजलं इतकंच.

मालिकेचा संभाव्य शेवट: विक्याने मूर्खपणा करत रान च्या सगळ्या गोष्टिंसोबत त्या recorded casset पण संभाळून ठेवल्या ज्यात विक्या झेंडे च बोलणं आहे.. ईबाळ खूप सार्या महा एपिसोड नंतर तो पुरावा सादर करणार पोलिसाना.. आणि सरन्जामे ग्रुप ची हैड बनणार.. सगळीकडे कौतूक सोहळा..किती ग बाई ही हुशार..किती ग बाई ही हुशार.. Lol आम्ही नविन सेरीयल ची वाट बघणार

सुभा बहुतेक काढता पाय घेणार अस दिसत आहे,लंडनला जाणार बहुतेक.>> सुभा सध्या सुट्टीवर आहे सहपरिवार ..सिंगापूर ला..म्हणून तो लंदन ला चालला

आजपर्यंतचा सर्वात निरस कंटाळवाणा एपिसोड काल होता. झी हिंदी चे सारेगम लिट्ल champs सुरू होईपर्यंत एकीकडे स्वयंपाक करता करता अधेमधे थोडेफार पाहिले. सहन करण्यापलीकडे गेलंय सगळं.

सर्व प्रतिसादांना अनुमोदन.. >>>>> माझी पण सेम टू सेम प्रतिक्रिया शब्द सहित सेम भावना....
...बिनकामाच्या एपिसोड मध्ये काहीच अर्थ दिसला नाही.... तु नळी वर सीरियल रिव्यू पाहतोय का काय असंच वाटत होतं... कुठलीही विरामचिन्हे न वापरता बाळ काय काय घडलंय ते सांगत होतं....
... ई आई बाबांना सपाट रिएक्शन का दिल्या होत्या कोण (केड्या) जाणे... ते पण निर्विकारपणे सर्व ऐकून थंडच वाटले... मुलगी घोर संकटात असावी असे जराही व्यक्त झाले नाहीत... किंबहुना होऊ दिले नाही कारण आपला नदीतील गोटा; गार्गी - गटणे यांच्या अभिनयाच्या प्रवाहात वाहून दिसेनासा झाला असता....
... खरंच धन्य आहे सुभाची... बर्‍यापैकी त्यानेच बिचार्‍याने इथवर रेटलीय
मालिका

झी हिंदी चे सारेगम लिट्ल champs >>>>
खूप छान आहेत सिंगर्स. सुगंधां दाते काल किती छान गायली.
आवडलेले सिंगर्स
सुगंधा दाते
Swaransh Tiwari - हा अगदी ५ वर्षांचा छोटू काय गातो (तो नॉन-कॉम्पेटिटोर आहे)
अनुष्का पात्रा
Aastha Das
Mohammed फैझ
Ritik Gupta

आजचा एपि म्हणजे जे जे सगळं आपल्याला ठाऊक आहे ते ते सर्व आज निमकरांना समजलं इतकंच.
बिनकामाच्या एपिसोड मध्ये काहीच अर्थ दिसला नाही. >>>>>>
आज देतील ना ते पुढची प्रतिक्रिया. काल फक्त धक्का + जावई माझा भला कौतुक, विश्वास + ई श्याला काय झालय अशा टाईपचे हावभाव दावले असतील ना?

आता एक म्हापिसोड रूपाली + बिपीनला सांगून त्यांना "माझी" मदत करा सांगताना
मग एक म्हापिसोड स्नेल + जैदीप + सर्जेराव + परांजपेना सांगून त्यांना "माझी" मदत करा सांगताना

एक शंका -- तरूण वकील दखणेचे नाव म्हातारपणी महाजन कधी कसे झाले? तेही घरजावई झाले का कोणाचे?

आता संभाव्य शेवट लिहू या. तुरूंनी एक दिलाच आहे.
मला वाटते ---
विस फक्त फ्रॉडसाठी जेलात जाईल. ई श्या "धनि मी तुमची वाट पाहीन" म्हणत विसच्या पादुका खुर्चीवर ठेवून राज्यकारभार करेल. जेलचे प्रायश्चित्त घेऊन परत आल्यावर त्याच्यावर पूर्वीच्या*२ प्रेम इतके करेल. दोन जन्माचे टोटल ??

बाकी सर्व खून अँगल गायबेल. झालंगेलं विसरून, आप्ली गेलेली माण्सं तो फासावर गेल्याने परत थोडीच येणार, ईश्याची काय चूक तिचे का नुकसान करावे म्हणत स्नेल + जैदू + निमकर्स मोठ्या मनाने क्षमा करून १ संधी देतील.
तसेही ३-४ च खून केलेत. सच्च्या प्रेमात ७ खून मुआफ....

अशी ही ..... न्यायदेवतेला तोंडात बोट घालायला लावणारी प्रेमकहाणी.
पहात रहा रे.... शिव्या घालत रहा रे.... हतबुद्ध होत रहा रे

Pages